हा खेळ बाहुल्यांचा
हा खेळ बाहुल्यांचा।
एका वृत्तपत्रात "झोपाळ्यावरील गौरी" असा एक सुंदर फोटो पाहिला.हिरवी साडी, नाकात नथ,गळ्यात हार, अनेक कंठभूषणे,हातात तोडे,मुखावर सात्विक हसरे भाव. अशा लोभसवाण्या मृत्तिकागौरी आणि त्यांच्याकडे कौतुकभरित विस्फारित डोळ्यांनी पाहाणार्या सजीव गौरी फोटोत दिसत होत्या.वाटले माणसांना बाहुल्यांचे एव्हढे आकर्षण का?
आता चौकाचौकात भव्य गणेशमूर्ती बसतील,सजावटींच्या देखाव्यांत आणखी विविध मूर्ती दिसतील,घरोघरी मुखवट्यांच्या किंवा उभ्या गौरी सजतील. नंतर नवरात्रात देवीच्या मूर्ती बसतील, देवळांतील मूर्तींना साड्या नेसवून, दागिने घालून, फुले माळून सजवतील.
तिकडे प.बंगालात कालीमातेच्या भव्य आणि कलापूर्ण मूर्ती; ते विशाल नेत्र, उंचावलेल्या भुवया,पहात राहावे असे रूप, ठिकठिकाणी दिसेल.
माणसाला मूर्तींचे असे विलक्षण आकर्षण का? नुसते आकर्षण नव्हे तर ही देवी आपले कल्याण करील, संकटकाळी रक्षण करील, अशी श्रद्धाही असते.हे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात कसे? असा विचार करता कार्लसेगन यांच्या "द डेमन हॉंण्टेड वर्ल्ड "या पुस्तकातील "द मॅन इन द मून" हा लेख आठवला.त्यात म्हटले आहे:
"जन्मलेले अर्भक जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहू लागते तेव्हा त्याला दिसणारी पहिली आकृती म्हणजे बाईचा--बहुश:त्याच्या आईचा-- चेहरा. ते डोळे, ते नाक,तोंड. आई त्याच्याकडे पाहून हसते. तेव्हा ते स्मित त्या अर्भकाला आश्वासक वाटते. ही आकृती आपले रक्षण करणारी आहे हे कळते.सर्वप्रथम ती प्रतिमा चिमुकल्या मेंदूत पडते. तिथे ठसून राहाते.
त्यामुळे पुढे अनेक गोष्टींत माणसाला मानवी चेहरा दिसतो.ढगांत डोळे, नाक असलेला माणूस दिसतो."
मागे गुजरात मधे एका जुन्या इमारतीच्या बाह्य भिंतीवर शेवाळे आणि मातीचे डाग यांतून साईबाबा प्रकट झाल्याचे दिसले.अनेक भाविक लोक जमून भजन आरत्या करू लागले,असे टिव्हीवर पाहिले होते.
मूल मोठे झाले की त्याला माणसाच्या मर्यादा समजतात.पण जागात सर्वप्रथम पाहिलेली ती मानवी चेहर्याची आश्वासक आकृती विसरली जात नाही. मग मूर्ती घडवून तीच आपले रक्षण करील अशी समजूत करून घेतो.
प्रत्येक गावात (आमच्या कोकणात तरी ) एक माऊलीचे देऊळ असतेच.मग इतर देव देवतांची देवळे असोत नसोत.अवर्षण, साथीचे रोग,असे काही अरिष्ट गावावर आले की गावकरी देवीला संकट निवारणाचे साकडे टाकतात,गार्हाणे घालतात.
माणसाला वाटणार्या बाहुल्यांच्या आकर्षणाचे असे कारण असावे.
लहान मुलींना बाहुली खरीच वाटते.त्या "या बाई या।बघा बघा कशी माझी बसली बया।" असले काहीसे गाणे म्हणतील तर वयाने मोठ्या झालेल्या माणसांना मूर्ती खरीच वाटते. ते:"लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।" असे म्हणतात. तत्त्वत: या दोन गाण्यांत भेद नाही.
Comments
अवांतर
मच्छीमारांनी जीवदान दिल्यामुळे सामुराई खेकड्यांच्या पाठीवरही मानवी चेहर्याची उत्क्रांती झाली असावी असे सगान यांनी प्रतिपादिले होते (नंतर तज्ञांमध्ये मतभेद झाले).
चेहरा दिसण्याचे अजून एक 'उदाहरण' पहा ;)
अति-सुलभीकरण
मूर्तिपुजक नसलेल्या कट्टर श्रद्धावंतांची संख्याही बरीच मोठी आहे. त्यांच्या श्रद्धेचे स्पष्टीकरण कसे देणार?
'मानवी आकृती' आपले रक्षण करील, अशी मनाची समजूत असतांना लोक हत्तीसारख्या किंवा माकडासारख्या दिसणार्या देवतेसमोर लीन का होतात?
श्रद्धा ही यापेक्षा बरीच गुंतागुंतीची गोष्ट असावी, असे वाटते.
सहमत
सहमत आहे. विषयाचे अति-सुलभीकरण होते आहे. विविध संस्कॄतींमधील मायथोलॉजी आणि समाजाचे मानसशास्त्र यांचा संबंध याहून बराच गुंतागुंतीचा आहे.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम
खरे आहे
तत्त्वत: या दोन गाण्यांत भेद नाही.
शंभर टक्के मान्य.
गणपतीचा सण साजरा करायचा नाही, तर त्याची जागा दुसर्या कशाने भरून काढावी? या दिवशी काय करता येईल ते पर्याय दिले तर या चर्चाप्रस्तावात वेगळी काही चर्चा करता येईल.
(खरेतर थोडी कळ काढली, तर ज्याची गरज नाही, ते सणवार आपोआपच संपतील. श्रावणात पूर्वी नागपंचमी, जिवती असे सर्व सणवार होत, आता कितीजण हे नेमाने करतात? )
अमेरिकेत हॅलोवीन असतो, तोही असाच सण. पण फारसा विरोध होत नाही. मुलांच्या हौशीसाठी केला जातो.
या निमित्ताने काही एक वेगळे स्वरूप घराला येते. तसे आले तर आवडत नाही का?
सण सुदिन
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गणेशोत्सव साजरा करू नये असे मी मुळीच म्हणत नाही. सण,सुदिन,सामुदायीक उत्सव, सोहळे इ.आवश्यक आहेतच. नाहीतर जीवन एकसुरी होऊन जाईल.इतर करमणुकींच्या अभावी जुन्याकाळी अशा उत्सवांची आवश्यकता अधिकच होती.पूर्वजांच्या काही परंपरा चालू ठेवणेही इष्ट आहे. पण तारतम्य हवे. त्यांत कालानुरूप योग्य त्या सुधारणा करायला हव्या. आज जीवनातील गतिमानता खूपच वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव चौदा दिवस असावा का यावर विचार व्हायला हवा.
उत्सव करणे वेगळे आणि तो गणपती नवसाला पावतो म्हणून त्याच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत ताटकळ राहाणे, तो बुद्धिदाता असे मानणे वेगळे.विरोध या अंधश्रद्धेला आहे.
तारतम्य
गणेशोत्सव साजरा करू नये असे मी मुळीच म्हणत नाही. सण,सुदिन,सामुदायीक उत्सव, सोहळे इ.आवश्यक आहेतच. नाहीतर जीवन एकसुरी होऊन जाईल.इतर करमणुकींच्या अभावी जुन्याकाळी अशा उत्सवांची आवश्यकता अधिकच होती.पूर्वजांच्या काही परंपरा चालू ठेवणेही इष्ट आहे. पण तारतम्य हवे. त्यांत कालानुरूप योग्य त्या सुधारणा करायला हव्या. आज जीवनातील गतिमानता खूपच वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव चौदा दिवस असावा का यावर विचार व्हायला हवा.
उत्सव करणे वेगळे आणि तो गणपती नवसाला पावतो म्हणून त्याच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत ताटकळ राहाणे, तो बुद्धिदाता असे मानणे वेगळे.विरोध या अंधश्रद्धेला आहे.
अशा भाषेत मूळ लेख लिहायचे तारतम्य ठेवले तर मला नाही वाटत अगदी धार्मिक, धर्मांध, अंधश्रद्धाळू वगैरे पण ऐकणार नाहीत.
होय
त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव चौदा दिवस असावा का यावर विचार व्हायला हवा.
उत्सव करणे वेगळे आणि तो गणपती नवसाला पावतो म्हणून त्याच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत ताटकळ राहाणे, तो बुद्धिदाता असे मानणे वेगळे.विरोध या अंधश्रद्धेला आहे.
तुमचा विरोध ज्या गोष्टीला आहे असे वाटते आहे, त्याच्याशी सहमतच आहे. पण तुम्ही बाहुली म्हटल्यानंतर ती चर्चा दुर्दैवाने दुसर्या मार्गाला लागते.
हा खेळ कावळ्यांचा
एक भारी उपाय आहे. जन्मलेल्या बालकाला आई आणि इतर सर्व मनुष्यांपासून तोडून वाळवंटात जिथे समोर काहीच दिसणार नाही तिथे टाकून द्यायचे. स्पार्टात असे करत.(प्लीज, स्पार्टात वाळवंट कुठे आहे असे विचारू नये.) जगले वाचलेच अर्भक तर मोठेपणी जाम पावरबाज होणार. मूर्तीपूजा वगैरेच्या भानगडीत पडणार नाही.
- वरील लेखात पराचा कावळा (हा खेळ कावळ्यांचा) करण्यात आमचीही भर. ;-)
अवांतरः हा खेळ सावल्यांचा चित्रपट मला जाम आवडतो. लय भारी आहे. अजूनही बघताना मजा येते. (काशिनाथ घाणेकरांचा डान्स बघूनही मजा येते ;-)) नरसूच्या भूताची लहानपणी मला जाम भीती वाटायची आता नरसूच्या भूताचा बाप आला (हॅम्लेटच्या बापासारखा) तर त्याला माझीच भीती वाटेल. लहानपणीचे विश्वास मोठेपणी टिकतातच असे नाही. असो.
शब्द
"या बाई या।बघा बघा कशी माझी बसली बया।" किंवा "लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।" या द्न्ही गाण्यातल्या शब्दांना फारसा काहीच अर्थ नाही. या दोन्ही हाण्यात श्री ऑरागॉर्न यांची सही असलेले रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम् वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम हे शब्द घातले म्हणून काहीच फरक पडणार नाही. लहान मुलीला तिच्या समोरच्या बाहुलीत रस असतो गाण्यातल्या शब्दांच्यात नाही. तसेच आरती म्हणणार्यांना त्या वेळचा माहोल आवडतो गाण्यातले शब्द नाहीत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
अर्थ.
अर्थ.
ह्या गाण्यांतल्या शब्दांस फारसा काहीच अर्थ नसेल. परंतु श्री. ऑरागॉर्न यांची सही असलेले गाणे, त्यास अर्थ आहे. तो असा:
"रोबो तू अपौरुषेय आहेस, चिट्टि तू उच्चजातीतला आहेस, विद्युतशरीरात रक्त, नवयुगातील ज्ञानाचे आश्चर्य आहेस, तुला तोंड आहे पण भूक नाही, तुल बोलणे आहे पण श्वास नाही, तुला नाडि आहे पण हृदय नाही, इतकी पावर् आहे पण अजिबात गर्व नाही."
माहितीसाठी सांगितले, अन्यथा ह्यासही अर्थ नाही म्हणायला लागाल!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
गाणे
ज्या कोणत्या भाषेत या गाण्यातल्या शब्दांना काही अर्थ असल्याचा आपला दावा आहे ती भाषा मला ज्ञात नसल्याने माझ्या दृष्टीने हे फक्त शब्द आहेत. या शब्दांना कोणत्याही भाषेत काही अर्थ असला तर त्या अर्थाचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
धन्यवाद
हॅ हॅ हॅ.
आता तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु याचा पण अर्थ सांगून टाका. आधीच कुठे सांगितला असेल तर दुवा द्या. :-)
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
नाडि
एक् सेकंद, तुला नाडि आहे पण् भविष्य नाही असे वाचले आणि उडालोच.
-Nile
हॅ हॅ हॅ
काही विज्ञानवाद्यांनी मोठ्यांसाठी देखील बाहुल्यांशी खेळायची सोय केली आहे. जाउ दे अजुन काही लिहले तर उडेल! कळले नसल्यास गुगलचा घट्ट आधार घ्यावा.
खिक्
देवदासींची सोय धर्मानुसारच
देवदासींची 'सोय' मात्र तुमच्या धर्मानुसारच आहे. मूटा मॅरिजची 'सोय'ही धर्मानुसारच आहे.
"तुझं वाचन किती? तू गुगलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चेहेरा व मूर्ती
लहानपणी दिसणारा आईचा चेहेरा व त्यातून उद्भवणारं मूर्तीचं आकर्षण हा संबंध पटला नाही. चेहेरे ओळखणं, त्यांच्याविषयी आकर्षण वाटणं, त्यांवरचे भाव ओळखणं - हे सर्व होण्यासाठी जनुकीय कारणं असावीत. ते संस्कारांनी होत नसावं. कुठच्याही कारणाने का असेना, अंधश्रद्धांचं मूळ त्यात असावं असं वाटत नाही. त्या विविध कारणांतून जन्मतात (अनामिक भीती, चुकीची कारणपरंपरा इ) व आपल्याला असलेल्या चेहेऱ्यांच्या आकर्षणामुळे चेहेरा घेऊन प्रस्थापित होतात. पण इतर धर्मांमध्ये त्या चेहेऱ्याशिवायही राहातातच. त्यामुळे आधी अंधश्रद्धा व नंतर तिचं (जमल्यास) चेहेरीकरण होत असावं असं वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
तसे नसावे
-असे नसावे. श्रद्धा इतकी (संकुचितपणे) डोळस नसते. मूर्तीला चेहरामोहरा हवा असाही अट्टाहास नसतो. तसा हट्टाग्रह असता तर दगडाला देवपण लाभते ना. श्रद्धा केवळ चर्मचक्षूंनी पहात नाही. ती मनःचक्षूंनी पाहते. त्यामुळे मूर्ती घडवून तिला चेहरा द्यावा अशी गरज तिला नसते. श्रद्धा सगुण-साकार/निर्गुण-निराकार यात फरक करत नाही.
फारफार तर असे म्हणता येईल की निर्गुण-निराकारावरील श्रद्धेचे 'मूर्ती ' हे सगुण-साकर अपरूप आहे. जिथे मूर्ती नसते तिथेही श्रद्धा असू शकते.
-या मातेच्या पूजेचे 'स्तोम' वीस हजार वर्षांपासून जगभर माजलेले आहे. कोकणाची काय (वेगळी)कथा? आणि मातेच्या/स्त्रीच्या मूर्तीला चेहरा असावा असाही काही दंडक नाही. 'विशिरा' नावाची देवी (मातृका) अगदी महाभारतातही वर्णिलेली आहे.
-मूर्ती खरीच वाटते म्हणजे काय? मूर्ती खरीच असते.श्रद्धाही खरीच असते.
मुळात तत्त्वतःच भेद आहे, एक मुलांचे गाणे - श्रद्धाविहीन आहे तर दुसरे मोठ्यांचे गाणे श्रद्धायुक्त आहे. एखादी प्रौढ व्यक्ती जेव्हा मूर्तीपूजा/गुणगायन करते तेव्हा तिची श्रद्धा त्या मूर्तीपुरती मर्यादित नसते. आयुष्याच्या प्रत्यक्ष अनुभवातून श्रद्धेची गरज त्या व्यक्तीला वाटत असते. ही गरज तिला नाहीच असे तुम्ही-आम्ही कोण ठरवणार? शेवटी जिवंत असणे आणि नवी पिढी बनवणे हे कोणत्याही जीवाचे साध्य/यश आहे. ते मिळवण्यासाठी तो जीव कोणता मार्ग अवलंबतो ते त्याचे त्याने ठरवावे.
वरील लेखातून मूर्तीपूजा न मानणार्याची श्रद्धा ही मूर्तीपूजकापेक्षा उजवी आहे असे ध्वनित होत आहे.
मुळात माणसाच्या श्रद्धेवर प्रहार करण्यासाठी लिहायचे असेल तर 'मूर्तीपूजा' हे दुबळे साधन तरी कशाला?
काळ बदलतो तशी मूर्तीपूजेची रूपे बदलतात.
नव्या जगातही यंत्रांची पूजा होते, बोटींवर शँपेनची बाटली फोडली जाते, स्क्रीनवॉलपेपर म्हणून देवतांचे फोटो असतात. 'अनुभवप्रामाण्याशिवाय विश्वास म्हणजे श्रद्धा' ही व्याख्या असेल तर त्या अनुषंगाने पुढे जावे.
अंशतः असहमत
मूर्ती ही एक कॉन्शस एजंट वाटते.
मुलांमध्ये मेक-बिलीव हा 'दोष' असतो. त्यांना ती बाहुली खरीच सजीव वाटू शकते.
लोकांनी गोरे व्हावे, पेप्सी प्यावे हे ठरविणारा शाहरुख तरी कोण? आणि ग्रीनपीस, पेटा, इस्कॉन, विमानतळ आणि लोहमार्गस्थानकांवर आपल्या मागे लागतात त्याचे काय? धर्मप्रचाराचे स्वातंत्र्य आहे त्यापेक्षा वैज्ञानिकतेला घटनेची अधिक स्वीकृती आहे.
"एखाद्या प्रश्नावर दोन मते असतील तेव्हा सत्य नेहमीच त्या दोन्ही टोकांच्या अगदी मध्यावर असते असे नाही" -- डॉकिन्सबाबा
मी नाही त्यातला!
अडचण्
इथेच् अडचण् आहे, असा 'कुठलाही मार्ग' तो अवलंबु शकत् नाही (म्हणुनच समाजाचे नियम असतात्, बरोबर ना?) त्यामुळे त्याचा मार्ग जर समाजासाठी अहितकारक असेल् तर् आक्षेप/विरोध होणारच. (उदा. इथे गणेशोत्सवाच्या, ज्याप्रकारे साजरे होत आहे त्या पद्धतीतील् काही बाबींमुळेतरी, समाजाचे नुकसान होत आहे आणि त्यामुळेच (तशा) उत्सवाला विरोध होत आहे असे वाटते, तो यातच मोडावा)
-Nile
तसेही नाही
Nile,
-समाजाला अहितकारक नसेल पण तरीही श्रद्धेचा असेल अशा मार्गाला विरोध नाही असे म्हणायचे आहे का?
अवश्य!
तेव्हा सक्तीचा विरोध होणार नाही पण शांतपणे प्रचार, टीका करूच.
मिरवणूक आणि ध्वनिप्रदूषण हे मुद्दे "subject to public order, morality and health" या अटीमुळे धार्मिक स्वातंत्र्यात टिकत नाहीत त्यामुळे ते सक्तीने बंद केले पाहिजेत.
वैयक्तीक मत
हो तेव्हा स्वतःहुन विरोध नसेल हे माझे वैयक्तीक मत आहे. थोडे अपवाद् आहेत्.
उदा.
१. माझ्या आप्ताच्या वर्तनाने त्याचे काही नुकसान् होत असेल् (माझे नाही, समाजाचेही म्हणण्यासारखे नाही) तर माझा त्याला विरोध असेल्, तो का ते त्या आप्ताला समजावुन् देण्याचा माझा प्रयत्न असेलच.
२. जर् कुणी स्वतःहुन् अश्या श्रद्धेबद्दल् (ज्याला मी अंधश्रद्धा म्हणु शकतो) माझे मत् विचारले तर् माझा विरोध असेल्. (तुम्ही वर् दिलेल्या उदाहरणांपैकी, कंप्युटर स्क्रीनवर् देवांचे फोटो लावणे, गाडीत देवाची मुर्ती वगैरे ठेवणे बद्दल् माझे मत् विचारले गेले तेव्हा मी त्याला काही अर्थ नाही असेच् उत्तर दिले होते.)
( तिसरे, महत्त्वाचे पण् विसुनाना यांच्या प्रश्नाच्या कक्षेबाहेरचे, जर् कुणी एखाद्या अंधश्रद्धेचा प्रचार् करत् असेल् (ज्याने समाजाचे नुकसान् होउ शकेल्) अशा प्रचाराला स्वतःहुन् विरोध असेल्.
थोडक्यात. 'तिसर्याची' एखादी श्रद्धा जर फारसे नुकसान् करत नसेल् तर मी विरोध करणारा कोण्? अशीच् भुमिका असते.
-Nile
अंनिस...
उपक्रमावर कोणी अंनिस चे कार्यकर्ते आहेत काय ? नसतील तर ह्या प्रकारच्या चर्चेत भाग घेणार्या मंडळींना त्यांचे सभासद होण्याची अपेक्षा आहे काय ? कदाचित त्यामुळे त्यांना भरीव असे काहीतरी करता येईल.
इथे येणारी बहुसंख्य मंडळी ही "श्रद्धा" न माननारी किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक नाही असे माणणारी आहेत. जे श्रद्धाळू आहेत ते आपली श्रद्धा कशी योग्य आहे ते पटवून देण्यात कमी पडत असतात. त्यामुळे ह्या विषयावर त्यांचे वारंवार बौद्धिक घेऊन काय साध्य होणार ?
ह्याच विषयावर रोज नवीन धागे काढुन काय साध्य होते ? (आणी मी ते वाचून काय साध्य करतो ?) हे न उलगडलेले कोडे आहे. यापेक्षा आपण अंनिस किंवा तत्सम माध्यमाद्वारे समाजाकडे जा आणी काहीतरी भरीव कामगिरी करा. तेथे आपली खरी गरज आहे.
ही दोन वचने बघा :
१. श्रद्धाळूंसाठी : श्रद्धानो जो हो विषय तो पुरावानी जरुर नथी. कुराण मां क्याय पण पैगंबरनी दस्तखत नथी ! (श्रद्धेचाच विषय असेल तर पुराव्याची गरज नाही.
कुराणामधे कोठेही पैगंबरांची स्वाक्षरी नाहिये)
२. अश्रद्धाळूंसाठी : (हे एका महाराष्ट्रात वर्ल्ड फेमस दैनिकाचे घोषवाक्य आहे) अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहित.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com