जैन साध्वींना 'मोक्ष' फॅसिलीटी नाही

ऑफिसमधला एक सहकारी जैनधर्मीय आहे. असेच एकदा गप्पांवरून विषय 'राष्ट्रसंत आचार्य तरूणसागरजी महाराज' यांच्यावर आला. त्या अनुषंगाने दिगंबर जैन साधुंविषयी काही चर्चा झाली. चर्चेत मित्राने पुढीलप्रमाणे मते मांडली-

"दिगंबर जैन साधु सर्वश्रेष्ठ असतात. त्यांच्याइतका त्याग करणे कोणालाही शक्य नसते. खरं म्हणजे, ते जवळपास देवच असतात."

"हे कसे काय? कपडे न घालणे याशिवाय दिगंबर जैन साधुंच्या इतर तत्त्वे कोणती?" मी.

तो-
"१) दिगंबर जैन साधु वस्त्रे, चपला, दागीने वापरत नाहीत.
२) सदैव पायीच प्रवास करतात. एका ठिकाणी जास्त दिवस थांबत नाहीत. (अपवाद- पावसाळा)
३) थाळीत जेवत नाहीत. ओंजळीत अन्न घेऊन उभ्याउभ्याने जेवतात.
४) सुर्योदयापुर्वी आणि सुर्यास्तानंतर अन्नपाणी घेत नाहीत.
५) ऊर्जा मिळावी म्हणून शक्यतो हाय कॅलरी फूड घेतात. शिरा, रसगुल्ले वगैरे.
५) घर बनवून कुठेही राहत नाहीत
६) जैन साध्वी इतर संसारी लोकांना स्पर्श करत नाहीत.
७) हिंसा होऊ नये म्हणून जंतुनाशक औषधे कधीही घेत नाहीत.
८) डास वगैरे कोणताही जीवजंतू मारत नाहीत.
९) जमिनीत खड्डा करून त्यात मलमूत्रविसर्जन करतात"
इत्यादि इत्यादि...

या सर्व प्रॅक्टिसेसमुळे मोक्ष मिळतो, असा त्याचा दावा आहे. यावर मी प्रश्न केला की मग जैन साध्वींचे काय? त्या तर कधीही दिगंबर अवस्थेत नसतात...

"जैन साध्वींना मोक्ष मिळत नाही."

"का?"

"स्त्रीयांची शरीररचना अशा पद्धतीची असते की त्यांच्याकडून नकळत हिंसा होते. गर्भाशयादि अवयवात लाखो जीवजंतू असतात.. जे मासिक स्रावाच्या वेळी नष्ट होतात."

"मग जैन साध्वींनी काय करावे?"

"त्यांनी इतर (दिगंबरावस्थेव्यतिरिक्त) गोष्टी कराव्यात. सेवा करावी. त्यामुळे त्यांना पुढला जन्म पुरूषाचा मिळतो. मग त्यांना दिगंबर साधु बनता येते, ज्यायोगे त्यापुढच्या जन्मात त्यांना मोक्षप्राप्ती मिळू शकते."

आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी त्याने मला ही जोडणी वाचण्याचा सल्ला दिला-
http://www.digambarjainonline.com/dharma/djsect.htm
त्यात पुढील विधान आहे- In the Digambara tradition, women cannot gain moksha, liberation, unless they are first reborn as men.

हे सर्व वाचल्यावर जैन दिगंबर पंथ ह एक 'कल्ट' असल्याचे माझे मत झाले आहे.
वाचकांची मते जाणून घेण्यास उत्सुक आहे.

------------------------------------------

[सदर लेख यनावाला प्रणाली वापरून लिहिलेला आहे. :)]

लेखनविषय: दुवे:

Comments

सल्ला

तुम्हाला विनंती करतो की ऑफिसात असल्या चर्चा करू नका (मतप्रदर्शन तर नकोच पण निरागस प्रश्न विचारणेही टाळावे). "माझ्या शेपटीवर पाय पडला" असा गळा कोण कधी काढेल ते सांगता येत नाही.

स्वतःचे ठेवलेय झाकुन

प्रत्येक धर्मात ह्याहीपेक्षा स्फोटक चर्चा होइल अशा अनेक चालीरीती आहेत. त्यावरही चर्चा होणे अगत्याचे आहे. नाहीतर , "स्वतःचे ठेवलेय झाकुन आणि दुसर-याचे बघतोय वाकुन" अशी गत व्हायची.

करूया की !

नाही कोण म्हणतंय?
तुम्ही जरूर असे चर्चाप्रस्ताव सुरू करा. आम्ही लिहू त्यावर.

प्रस्तुत विषयावर आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

हेच कशाला?

जैनांचे हे विचार मी या आधीही ऐकलेले आहेत परंतु साध्वी/ साधुंवर जाण्याआधी हे ऐका.

माझ्या मुलीच्या वर्गात दोन जैन मुली आहेत. पैकी एक नॉनवेज खाते. दुसरी खात नाही. जी नॉनवेज खाते तिला जी नॉनवेज खात नाही ती अनेकदा टोचत असते की "आपण जैन. आपण हे खाऊ नये. आपल्याला हे निषिद्ध आहे." गंमत म्हणजे जी नॉनवेज न खाणारी जैन आहे तिच्या वडलांचे सबवे रेस्टॉरंट आहे. त्यात हे कुटुंब (आई-वडिल मिळून चालवतात) इतरांना बीफ, पोर्क, चिकन, टर्की, ट्यूना सर्व खाऊ घालते. :-)

पुण्य मिळवण्याच्या कल्पना कुठून कशा वाहवत जातील याची कल्पना न केलेली बरी.

वाडीलाल (आईस्क्रिमवाले) यांची सून माझ्या एका बहिणीच्या ओळखीची होती. ती सांगत असे की आम्ही वाडीलालचे आईसक्रिम कधीच खात नाही. त्यात अंडे असते ना!

पर्यूषणपर्व कशासाठी असते ;)

अल कबीर खाटिकखाना हा जैन मालकीचा आहे बहुधा. तसेच माणिकचंद आणि पानपरागवाले जैनच. असो. पर्यूषणपर्वात माफी मागितली की झाले ;)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आणखी

अतिरेक्यांना हवालाचे पैसेही जैन बंधूच देत ना?

हीहीहीहीही!

पर्यूषणपर्वात माफी मागितली की झाले

पर्यूषणपर्वात "मिच्छामी दुक्कडम्" का असे काहीसे म्हणतात. (चू. भू. दे. घे.)

माझा अर्ध-जैन भाचा आमच्याकडे चिकन-मटण खाऊन घरी आजीला जाऊन मी सुरणाची भाजी, वांग्याची भाजी खाल्ली असे सांगत असे. त्याला आम्ही चिडवायचो की नॉनवेजही खातोस आणि खोटेही बोलतोस.

तो सांगायचा - पर्यूषणपर्व येऊ दे.

कोणत्या धर्मात स्त्रीला उच्च स्थान दिले याचा सर्चलाईट जरी लावून

एक म्हण आठवते कदाचित ती सार्थ नसेल पण आठवली, हमाम मे सब नंगे होते है. तसाच प्रकार धर्माचा आहे. स्त्रियांना दुय्यम वागणूक हा जगातील सर्व धर्माचा एक समान धागा आहे. मग तो धर्म,ख्रिचन , हिंदू, मुसलमान, जैन, बोद्ध अजून राहिलेले धर्म .कोणत्या धर्मात स्त्रीला उच्च स्थान दिले याचा सर्चलाईट जरी लावून मागोवा घेतला तरी पुरावा सापडणार नाही. धर्मराजा बरोबर द्रोपती ला स्वर्गात प्रवेश नाकारला कारण तीचे अर्जुनावर जास्त प्रेम होते म्हणून. तिने ५ पुरुषान बरोबर सन्मानाने संसार केला तो त्याग त्या वेळी विसरला गेला. सीतेला सुद्धा चारित्र्य सिद्ध करण्यास अग्नी परीक्षा करावी लागली. राम सुद्धा सीते पासून वनवासात वेगळा राहिला होता पण त्याला अग्नी परीक्षा कर तुझे पावित्र्य सिद्ध कर म्हणून कोण्या धर्ममार्तंडने सांगितले नाही. प्रत्येक धर्मात स्त्रियांना लढा देवूनच अधिकार मिळालेले आहेत. पुरुषांनी ते सहजासहजी दिले नाही. प्रगत म्हणणाऱ्या पाश्चिमात्य समाजात ही वेगळी अवस्था नाही. हंदू धर्मात सर्व व्रत वैकल्य पूजा अर्चा स्त्रियाच करतात , पण महत्वाच्या पूजेचा मान तीला नव्हता . पित्याला अग्नी देण्याचा अधिकार सुद्धा तीला भांडून मिळवावा लागला. १७७६ ला अमेरिका स्वतंत्र झाली आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार भांडून १९२० ला मिळाला. जिवंत असताना स्त्रीला समान हक्क मिळत नाही , तर मेल्यावर तीला समान हक्क मोक्ष कसा मिळणार नाही याची व्यवस्था हा हे पुरुषी अहंकाराचे शुद्र रूप आहे.

thanthanpal.blogspot.com

सुंदर प्रतिसाद.

मनापासून आवडला. :)

शंका-
पित्याला अग्नी देण्याचा अधिकार सुद्धा तीला भांडून मिळवावा लागला.

म्हणजे सध्या हिंदू धर्मात स्त्रीला असा अधिकार आहे का? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.
सध्या कुठल्याश्या चॅनलवर या विषयावर (मुलीला अंत्यसंस्काराचा अधिकार) एक मालिका येते. 'मेरा नाम करेगी रोशन' वा तत्सम काहीतरी.

चातुर्मासात एक चांगली चर्चा

चातुर्मासात एक चांगली चर्चा सुरू केली आहे ;) फार उपयुक्त माहिती. स्पेशल ट्रीटमेंट हिंदू धर्मातही आहे. शूद्र आणि नारी हे ताडन के अधिकारी आहेत असे खुद्द तुलसीदासांनीच लिहिलेले आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात माइल्ड डोमेस्टिक वायलंसला परवानगीच आहे असे वाटते. ह्या दोन्ही धर्मांत बायकोला स्पँक करायची परवानगी दिली आहे असे वाटते. असो. जाणकार अधिक प्रकाश पाडतीलच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हा लेख आणि "टिप्पण्या" एकापाठोपाठ एक

हा अनुभव आणि "बौद्ध टिप्पण्या" एकापाठोपाठ एक वाचायला पाहिजे. :-)

("कल्ट" म्हणजे काय? "खानेसुमारीमध्ये कमी संख्या असलेली श्रद्धाचौकट" असा काही अर्थ आहे काय? येथे इंग्रजी शब्दकोशातल्या अनेक व्याख्या सापडतील - यांच्यापैकी कुठलीशी व्याख्या अपेक्षित आहे काय? व्याख्या क्रमांक ३?)

विक्षिप्त म्हणता येतील अशा समजूती असणारा धार्मिक गट

तिसरी व्याख्या- होय.
मायबोलीवरील ही चर्चाही (आधी वाचली नसल्यास) बघावी-

http://www.maayboli.com/node/9506

छान

लेख चांगला आहे.

बाकीच्या धर्मांइतक्याच विक्षिप्त समजुती

बाकीच्या धर्मांइतक्याच विक्षिप्त समजुती वाटतात.

वेगवेगळ्या धर्मांमधील "खास" समजुतींमध्ये बरेच वैविध्य आहे. एखाद्या पूजाप्रकारात खूपच अतिरेकी विक्षिप्तपणा सापडतोही - उदाहरणार्थ भक्तांनी आत्महत्या करायची पूजापद्धती काही समूहांत आढळते, ती अगदी अपवादात्मक असते.

तितका टोकाचा विक्षिप्तपणा मला वर दिलेल्या जैन विवेचनात दिसत नाहीत. २५००-३००० वर्षांचा इतिहास असलेली कुठलीही पूजापद्धती-श्रद्धासमूह घेतला, त्यातील वेगवेगळ्या काळातल्या ग्रंथांमधून टिपणे काढली, तर आज वागण्याच्या पद्धतीपेक्षा खूप वेगळे, विक्षिप्त, असे बरेच काही सापडेल.

तरीही

खुळचटपणाची क्रमवारी लावली तर सध्या 'जिवंत' असलेल्या 'जीवनपद्धतीं'मध्ये हा कल्टच अग्रभागी राहील असे वाटते.

'जिवंत' या शब्दाच्या व्याख्येविषयी येथे खूपच रोचक चर्चा झाल्याचे दिसते ;)

टिपणे झाली, गणेशोत्सव झाला, दिगंबरांचे वस्त्रहरणही झाले, आता ईदची वाट पाहूया/लावूया ;)

पण मोक्ष हवाच कशासाठी

जैन दिगंबर पंथ ह एक 'कल्ट' असल्याचे माझे मत झाले आहे.

सहमत.

जर सध्याचे आयुष्यच अगदी साध्या अक्कलहूशारीने जगता येत नसेल तर (उदा. ताप आल्यावर गोळी घेणे, रक्त शोषणाऱ्या डासाला एका चापटीत मुक्त करणे) या जगण्यापलिकडला निव्वळ भामटा मोक्ष हवाच कशासाठी?

स्त्रियांवरून

सगळ्याच धर्मांच्या ग्रंथांमध्ये काही ना काही म्हटलेले असते, असे वाटते.
त्यावरून कल्ट आहे हे सिद्ध होत नाही.

जैन धर्माला कल्ट म्हणायच्या आधी अभ्यास करुन मग आपले मत लिहावे

एका धर्मातील एका संकल्पनेमुळे तो धर्म कल्ट कसा काय होतो बॉ ?
तुम्ही ह्या शब्दाचा वापर करुन धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न तर नाही ना करत ?

आता मुळ मुद्दा स्त्रीला मोक्ष मिळत नाही असे जैन धर्म म्हणतो. जैन धर्मानुसार फक्त पंचमरमेष्ठीच मोक्षप्राप्तिसाठी योग्य आहेत ( अर्हत्, सिद्ध, आचार्य, उपाध्याय और मुनी (साधू) ).
हो बरोबर आहे जैन धर्माच्या तत्वानुसार ज्यांने राग,लोभ,माया व इतर स्वभावगुणांवर ज्यांने विजय मिळवला आहे असा व्यक्ती मोक्ष प्राप्तिसाठी योग्य मानली जाते. आधी मोक्ष म्हणजे काय हे समजून घ्या.
पुन्हा पुन्हा जन्म-मृत्युच्या चक्रातून मुक्ती एवढेच नसून मोक्ष म्हणजे भगवान, देव अथवा जो सर्वशक्तीशाली असेल त्याच्यात समावून जाणे. मागील पुढील सर्व गोष्टी म्हणजेच स्वभावगुण येथेच सोडून जाणे.

जैन धर्मानुसार स्त्री ही सर्वप्रकारच्या स्स्वभावगुणातून मुक्त होऊ शकते परंतु लोभ, माया हा गुण ती सोडू शकत नाही, लोभ म्हणजे संपत्ती अथवा जमिन जुमल्याचा लोभ नाही तर आपलेच जे आहेत किंवा आपल्या रक्ताचे संबधी आहेत त्यांच्या विषयी असलेले ममत्व हे स्त्री त्यागू शकत नाही त्यामुळे स्त्रीच्या अंगी हा गुण राहतो व ती मोक्ष प्राप्तीसाठी अपात्र ठरते.

>या सर्व प्रॅक्टिसेसमुळे मोक्ष मिळतो, असा त्याचा दावा आहे

त्याला माझा चरणस्पर्श सांगा व माहित नसेल काहीतर तोंड उघडत जाउ नकोस असा सल्ला देखील द्या.

फक्त हेच असते व अश्याने मोक्ष मिळाला असता तर सगळेच मुनी मोक्षवासी झाले असते राव.
वर तुमच्या मित्रांने जे सांगितले आहेत मुद्दे ते मुनींची दिनचर्या आहे मोक्ष प्राप्तिचे साधन नाही. जो व्यक्ती संसारातील सुख-दुखः पासून अलिप्त होतो, मोह, माया, लोभ व इतर स्वभावगुणापासून मुक्त होतो. आपल्या इंद्रियांवर विजय मिळवतो तो मोक्षसाठी योग्य उमेदवार !

जैन धर्माला कल्ट म्हणायच्या आधी अभ्यास करुन मग आपले मत लिहावे ही विनंती.

***
अभ्यास असल्या शिवाय बोलू नये, एकाद्या महत्वाच्या अथवा ज्या विषयामुळे सामाजिक / संकेतस्थळाचे स्वास्थ बिघडू शकते. वर एक एक महानव्यक्तीचे प्रतिसाद वाचून हसावे की रडावे हे समजले नाही.

***
व्यक्तीगत स्वरुपात माझा मोक्ष व इतर गोष्टीवर काडिमात्र विश्वास नाही आहे ना जाती / धर्म ह्यावर.
सर्वहारी आहे त्यामुळे शाकाहार / मांसाहार... अगदी कुठलाही हार चालतो.

असं कसं?

व्यक्तीगत स्वरुपात माझा मोक्ष व इतर गोष्टीवर काडिमात्र विश्वास नाही आहे ना जाती / धर्म ह्यावर.
सर्वहारी आहे त्यामुळे शाकाहार / मांसाहार... अगदी कुठलाही हार चालतो.

अहो राजकाका, जर तुमचा विश्वासच नाही तर हिरिरीने बाजू कशी मांडताय जैन धर्माची?

जैन धर्मानुसार स्त्री ही सर्वप्रकारच्या स्स्वभावगुणातून मुक्त होऊ शकते परंतु लोभ, माया हा गुण ती सोडू शकत नाही, लोभ म्हणजे संपत्ती अथवा जमिन जुमल्याचा लोभ नाही तर आपलेच जे आहेत किंवा आपल्या रक्ताचे संबधी आहेत त्यांच्या विषयी असलेले ममत्व हे स्त्री त्यागू शकत नाही त्यामुळे स्त्रीच्या अंगी हा गुण राहतो व ती मोक्ष प्राप्तीसाठी अपात्र ठरते.

असं कसं? स्त्री आणि पुरुष दोघे ममत्व त्यागू शकतात किंवा नाही त्यागू शकत. दोघांमध्ये फरक नाहीच. म्हणूनच स्त्रियांवर अन्याय करतो जैन धर्म असे म्हटले आहे ना. तसं पाहिलं तर स्त्री आणि पुरुषाच्या भावनांमध्ये फरक सर्वच धर्म पाहतात.

जैन धर्माला कल्ट म्हणायच्या आधी अभ्यास करुन मग आपले मत लिहावे ही विनंती.

आपला अभ्यास खूप दिसतो. थोडे आमचेही प्रबोधन करावे.

-राजीव.

प्रतिसाद..

>>अहो राजकाका, जर तुमचा विश्वासच नाही तर हिरिरीने बाजू कशी मांडताय जैन धर्माची?

राजकाका ??
हेच काय फळ मम् तपाला ;)

जैन आहे, दिगंबर जैन.
राज जैन हे माझे नाव.

व काय राव विश्वास नाही म्हणून बाजू देखील मांडू नका असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?

>>आपला अभ्यास खूप दिसतो. थोडे आमचेही प्रबोधन करावे.

आवड म्हणून वाचतो फुटकळ काहीतरी जेथे मिळेल तेथे.
समोरचा त्या तोडीचा हवा. उगाच आहे किबोर्ड व अमाप वेळ म्हणून इतरांच्या (कु)आनंदासाठी चर्चा करणे मी टाळतो. जेथे योग्य वाटेल तेथे माझा प्रतिसाद असेलच.

>>असं कसं? स्त्री आणि पुरुष दोघे ममत्व त्यागू शकतात किंवा नाही त्यागू शकत. दोघांमध्ये फरक नाहीच.

:)

काही संदर्भ देता का ?

>>म्हणूनच स्त्रियांवर अन्याय करतो जैन धर्म असे म्हटले आहे ना. तसं पाहिलं तर स्त्री आणि पुरुषाच्या भावनांमध्ये फरक सर्वच धर्म पाहतात.

ह्याला तुम्ही अन्याय हा शब्द का वापरता ? आता अय्यप्पा स्वामीच्या मंदिरात आज ही स्त्रींना प्रवेश नाही, बघा बघू प्रयत्न करुन तेथे जाऊन की हा अन्याय आहे म्हणून. त्यांच्या संप्रदायाचा त्यांनी हा नियम बनवला आहे तुम्हाला पटला तर तुम्ही या संप्रदायात नाही तर् सोडून द्या, हा सरळसोट मार्ग.

अन्याय शब्द कुठे वापरावा ह्या बद्दल एकादी चर्चा चालू करावी म्हणतो आहे.

चर्चेचा रोख

तुमचे दोन्ही प्रतिसाद मनापासुन आवडले. सुरुवातीपासुनच मला ह्या चर्चेचा रोख ओढून-ताणून काहीतरी आणण्याचा प्रकार जास्त वाटत होता.

उत्तर

काय राव विश्वास नाही म्हणून बाजू देखील मांडू नका असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?

हो विश्वास नसताना बाजू मांडू नये. तसे करणारे लोक खोटेपणा करतात.

काही संदर्भ देता का ?

मूळ विधान तुम्ही केलेत. संदर्भ तुम्ही द्यायला हवेत. पित्याच्या आणि मातेच्या प्रेमात मला फरक दिसत नाही.

ह्याला तुम्ही अन्याय हा शब्द का वापरता ? आता अय्यप्पा स्वामीच्या मंदिरात आज ही स्त्रींना प्रवेश नाही, बघा बघू प्रयत्न करुन तेथे जाऊन की हा अन्याय आहे म्हणून. त्यांच्या संप्रदायाचा त्यांनी हा नियम बनवला आहे तुम्हाला पटला तर तुम्ही या संप्रदायात नाही तर् सोडून द्या, हा सरळसोट मार्ग.

मार्ग धरला किंवा सोडला म्हणून अन्याय होण्याचे बंद कसे होणार आणि माझ्यावर नाही झाला पण इतरांवर झाला तरी अन्याय हा अन्यायच असतो.

-राजीव.

असहमत

"स्त्री आणि पुरुष दोघे ममत्व त्यागू शकतात किंवा नाही त्यागू शकत. दोघांमध्ये फरक नाहीच. म्हणूनच स्त्रियांवर अन्याय करतो जैन धर्म असे म्हटले आहे ना. तसं पाहिलं तर स्त्री आणि पुरुषाच्या भावनांमध्ये फरक सर्वच धर्म पाहतात."

जैविक कारणांमुळे दोघांमध्ये लक्षणीय फरक आहेतच. (तरीही, नेटाने भांडले तर सार्वजनिक धार्मिक स्थळांमध्ये, उदा. (शिंगणापूरच्या) शनीच्या मंदिरामध्ये स्त्रियांना, (साबरीमालाच्या) अय्यपाच्या मंदिरात प्रजननक्षम स्त्रियांना, प्रवेश मिळेलच. धार्मिक बंधने ठरविणार्‍या देवबंद, तक्त, पीठ, इ. यांना काहीही घटनात्मक मान्यता नाही.)

हिंदू स्त्रियांना सुद्धा मोक्ष नाही

वेदाचे पठण करण्यास बंदी असल्याने हिंदू स्त्रियाही मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत असा शोध मला आत्ताच लागला.
हे संपूर्ण पुस्तक या चर्चेच्या विषयालाच वाहिलेले आहे.
यातील एका तळटीपेतला उल्लेख पहा -

"The theme of strimoksa is conspicuous by its absence in P. V. Kane's voluminous History of Dharmasastra with the exception of a single reference to the possibility of women securing knowledge of moksa (in the absence of their access to the Vedic scripture) on p. 921, n. 1468a (vol. V, p. II). "

अंधार युगात गुलाम/शूद्र आणि स्त्रिया यांना जिवंतपणीच पारतंत्र्याच्या नरकात ढकलण्याचे उद्योग तथाकथित धर्ममार्तंडांनी सार्‍या जगात केले होते. जैन किंवा अमूक एक धर्म त्याहून वेगळा नाही याचेच हे उत्तम उदाहरण आहे.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ओशोंची मल्लिनाथी

जैन धर्मानुसार स्त्री ही सर्वप्रकारच्या स्स्वभावगुणातून मुक्त होऊ शकते परंतु लोभ, माया हा गुण ती सोडू शकत नाही, लोभ म्हणजे संपत्ती अथवा जमिन जुमल्याचा लोभ नाही तर आपलेच जे आहेत किंवा आपल्या रक्ताचे संबधी आहेत त्यांच्या विषयी असलेले ममत्व हे स्त्री त्यागू शकत नाही त्यामुळे स्त्रीच्या अंगी हा गुण राहतो व ती मोक्ष प्राप्तीसाठी अपात्र ठरते.

असो.

जन्माने जैन असलेल्या ओशो ह्यांनी इतर धर्मांप्रमाणे जैन धर्मावर भरपूर मल्लिनाथी केली आहे. नारी और क्रांती ह्या आपल्या लेखात ते म्हणतात, "जैन धर्म के हिसाब से नारी मोक्ष की अधिकारी नहीं है। उसे पुरूष की तरह जन्‍म लेना पड़ेगा। जैनियों के चौबीस तीर्थंकर में एक तीर्थक स्‍त्री है। नाम था मल्ली बाई—उन्‍होंने उस का नाम बदल कर मल्ली नाथ कर दिया, क्‍योंकि वे कहते है कि नारी मोक्ष की उत्‍तराधिकारी नहीं है।"

१. हा शब्द ज्याच्यावरून आला तो टीकाकार मल्लिनाथ वेगळा. आणि तीर्थंकर मल्लिनाथ वेगळे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हिहिहि

आयला !

ओशो ने अजून काही खुप काही लिहून व बोलून तथा करुन ठेवले आहे, ते म्हणजे सगळे सत्यच का ?
तुम्ही ५००० हजार वर्षापुर्वीच्या घटनेला कालपरवाचा ओशो काय म्हणाला हे सांगून पुरावा देत आहात असे वाटत आहे ;)

असो,
विनोदाचा भाग सोडा.
पण ओशो ने अनेक धर्मातील अनेक संकल्पनेवर असेच चित्रविचित्र अर्थ काढले असतील / आहेत.. ओशो काय म्हणतो ह्यात मला स्वारस्य नाही, चार विदेशी लोकांसमोर गोड गोड बोलून संभोगाकडून समाधीची तयारी करणारा व त्यांचे प्रॉक्टिकल करुन दाखवणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त विश्वास मी उपलब्ध असलेल्या ग्रथांवर व पुस्तकांवर ठेवेन.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

झाले तर मग

अभ्यास असल्या शिवाय बोलू नये,

पटले नाही. प्रत्येकाला आपले मत अधिकार आहे. पटत नाही त्यांनी प्रतिवाद करावा.

एकाद्या महत्वाच्या अथवा ज्या विषयामुळे सामाजिक / संकेतस्थळाचे स्वास्थ बिघडू शकते. वर एक एक महानव्यक्तीचे प्रतिसाद वाचून हसावे की रडावे हे समजले नाही.

फार्फार तर काही लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडेल, पण उपक्रमाच्या स्वास्थ्याला काही होणार नाही. ड्रूपल ५ वर आहे. आणि अजूनही ठणठणीत आहे.

व्यक्तीगत स्वरुपात माझा मोक्ष व इतर गोष्टीवर काडिमात्र विश्वास नाही आहे ना जाती / धर्म ह्यावर.
सर्वहारी आहे त्यामुळे शाकाहार / मांसाहार... अगदी कुठलाही हार चालतो.

झालेच तर मग. कसला जैन धर्म, कशाचा मोक्ष आणि कशाचे काय. खरा तो एकची धर्म | मटण बर्बाट वरपावे ||

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

>खरा तो एकची धर्म | मटण बर्बाट वरपावे ||

+ 1

आवडले.

बाकी मुद्द्यांना उत्तर देणे शक्य नाही, समक्ष्व. कारण ती माझी मते आहेत.

प्रति श्री. राज जैन,

आपण लेख पुन्हा एकदा व्यवस्थित वाचावा, ही विनंती. सदर लेखात मी कुठेही 'जैन धर्म हा एक कल्ट आहे' अशा आशयाचे विधान केलेले नाही.

मूळ विधान असे आहे- "हे सर्व वाचल्यावर जैन दिगंबर पंथ ह एक 'कल्ट' असल्याचे माझे मत झाले आहे." खाली 'कल्ट' या शब्दाचा मला अभिप्रेत असलेला अर्थही दिलेला आहे.
कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अथवा गोंजारण्याचा काहीही हेतू नाही. उपक्रमावर याआधीही धार्मिक बाबींवर चर्चा झाल्या आहेत.

सहमत

कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अथवा गोंजारण्याचा काहीही हेतू नाही. उपक्रमावर याआधीही धार्मिक बाबींवर चर्चा झाल्या आहे.

धर्मांविषयी चर्चा सुरु झाली की धार्मिक भावना हटकून दुखावल्या जातातच. :-) परंतु उपक्रमावर याआधीही धार्मिक बाबींवर चर्चा झाल्या आहेत हे खरे आहे.

मोक्ष!

मोक्ष मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या विविध प्रकारांना / पंथांना / धर्मांना वगैरे विविध नावे असावीत असे वाटते. जैन धर्मीयांनी / साधूंनी, 'जैन साध्वीला मोक्ष मिळी शकत नाही' असे स्वतःचे मत बनवले असेल व ते मत ते इतरांवर बिंबवत असतील व इतर ते अंशत: / पूर्णतः मान्य करत असतील व जैनेतरांना त्यापासून काही हानि नसेल तर काही प्रॉब्लेम नसावा. इतरांनी त्यांना काय समजावे हा इतरांचा प्रश्न आहे. पण निदान जैन धर्म शांततेचा पुरस्कार करताना दिसतो व हिंसेच्या विरुद्ध आहे असे दिसते यावरून त्यांना धर्म म्हणून सन्मान मिळणे व 'कल्ट' न समजले जाणे आवश्यक ठरावे असे वाटते.

चु.भु.द्या.घ्या.

उपक्रम जिंदाबाद

बाबा

बाबा

nityanand

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

 
^ वर