बुद्ध व बौद्धधर्म..एक टिपणी

बुद्ध आणि बौद्धधर्म ... एक टिपणी

(१) बुद्ध आणि चातुर्वर्ण
(अ) प्रथम बुद्ध एका ब्राह्मणीच्या उदरात जन्म घेतो; पण " भीक मागणार्‍या जातीत बुद्धाचा जन्म नको" म्हणून तो गर्भ तेथून काढून एका क्षत्रिय राणीच्या उदरात ठेवण्यात येतो.
(आ) बुद्धाला आपल्या क्षत्रिय जातीच्वा अभिमान होता. त्या काळी क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ट मानला जाई. बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.

(२)बौद्ध धर्म प्रसार
बुद्धाच्या हयातीत फक्त १०५ भिक्षू संघांत सामिल झाले होते. त्यातले ब्राह्मण ३९, क्षत्रिय २८, (बरेचसे त्याच्याच शाक्य कुळातले), उच्चकुलीन २१, व फक्त ८ शूद्र जातीतले. ब्राह्मणातले सुखवस्तूच जास्त, पुरोहित वगैरे नगण्य. बुद्धाच्या हयातीत अस्पृष्यांनी त्याकडे फार लक्ष दिलेले दिसत नाही. ( क्र. ३ पहा.)

(३) बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार
बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही
तो संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल." त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष झाला.
(४) तात्विक फरक
बुद्ध व हिन्दू धर्मात फारसा तात्विक फरक आढळून येत नाही. याचे साधे कारण हिन्दू विचारसारणीतली विविधता. तुम्ही कोणताही तत्वज्ञानातला विचार मांडावयाचा ठरवला तर येथील कोणत्या तरी दर्शनात त्याची पुसट का होईना छाया तुम्हाला आढळून येईलच. बुद्ध धर्मातील किती तरी विचार उपनिषदांत दिसतात. डॉ. र्‍हिस डेव्हिड्स (पाश्चात्यांना बौद्ध धर्माची ओळख करून देणारा, "बुद्धिझम" या ग्रंथाचा लेखक) म्हणतो "" गौतम बुद्ध हा अतिशय शहाणा,विद्वान, थोर पुरुष होता. तो सर्वोत्कृष्ठ हिन्दू होता." दुसर्‍या बाजूने जगत्गुरू शंकराचार्यांना "प्रच्छन्यबुद्ध" म्हणतात. दोघेही सरळ किंवा आडवळणाने वेदप्रामाण्य नाकारतातच. दोघांनाही पुनर्जन्म मान्य आहे. वेदांतात व बौद्ध धर्मात मोक्षाकरिता वैराग्य, समाधी, तपश्चर्या, ज्ञानमार्गाने जाता येते व त्याकरिता निरनिराळ्या जन्मात आपली प्रगती करता येते असेच म्हटले आहे.

(५) डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्म
एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला. पण या धर्मांतरात तांत्रिक गोंधळ झालाच. डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत. पण ते महत्वाचे नाही. महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.

आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म

आर्य लोक ध्रुवीय प्रदेशांच्या जवळ असताना यम - यमी संवाद घडला ना?

एकदा "हिंदू म्हणून मरणार नाही" असे ठरवल्यावर डॉ. आंबेडकरांसमोर जे ३-४ पर्याय होते त्यातला जास्तीत जास्त उत्तम पर्याय त्यांनी निवडला.

त्यांनी नास्तिकांची तुलना वेश्यांशी केली होती असे स्मरते. (वेश्यांना सन्मानास्पद स्थान नाकारणे हा दुसरा आक्षेपही शक्य आहे.)

संदर्भ हवा

माहितीचे संकलन चांगले आहे. माझ्या माहितीत बुद्धाची समकालीन माहिती नाही. थोडीफार उलटसुलट माहिती वेगवेगळ्या साधनातून मिळते. तेव्हा माहितीचा संदर्भ मिळाला तर मुळात वाचून काढायचा प्रयत्न करीन.

प्रमोद

उद्देश ???

संकलन चांगले की वाईट यापेक्षा या लेखनाचा उद्देश काय ते शोधणे महत्त्वाचे वाटते.
विचार करतो आहे....

संकलन(?)

दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पांमधला एक चॅप्टर वाचला तरी बुद्ध धर्मावर यापेक्षा अधिक माहिती मिळते. याला संकलन वगैरे म्हणणे रुचत नाही पण असो. कोणताही संदर्भ दिल्याविना या लेखनाचा उद्देश काय असावा असा प्रश्न मलाही पडला.

विस्कळित

मला वाटते शरदरावांनी कोणत्या तरी अभ्यासपूर्ण लेखासाठी तयार केलेल्या कच्च्या टिपण्या (नोट्स) चुकून उपक्रमवर टाकल्या असाव्यात. लेखाचा उद्देश व त्यातून काय सांगायचे आहे हे लिहायचे राहूनच गेले असावे.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चंद्रशेखर यांच्याशी सहमत.

अगदी. अगदी.

चंद्रशेखर यांच्याशी शंभर टक्के सहमत.

हे जे काही वर सादर करण्यात आलेले आहे, त्याला `टिपणे ` तरी कसे म्हणावे ? अभ्यासपूर्ण आणि संशोधनपर लेखन करायचे तर, (अहो, लेखन ही फार पुढची गोष्ट झाली...लेखनाची केवळ पूर्वतयारी करायची म्हटले तरी), त्यात एक प्रकारची शिस्त असावी लागते. या तथाकथित `टिपणां`मध्ये ती कुठेच आढळत नाही. माझ्या मते तर ही `टिपणी `ही (हिंदीत टिप्पणी/ मराठीत टिपण्णी) नाही की टिपणही नाही !

मजकुरातील अशुद्धलेखनाबद्दल तर काय बोलावे !

विस्कळित वाटते

विस्कळित वाटते आहे.

प्रत्येक टिप्पणी कुठल्याशा प्रचलित समजुतीच्या विरोधात आहे काय?

म्हणजे "गौतम शाक्य हा व्यक्ती चातुर्वर्ण्याच्या विरोधात होता किंवा बुद्धधर्म हा चातुर्वर्ण्याचा विरोधात आहे/होता" असा प्रचलित समज आहे, पण येथील टिपणांनी तो समज खोडला जातो, असा काही उद्देश आहे काय?

(२) आणि (१) यांचे मिळून काय करावे समजत नाही. "फक्त ८ शूद्र भिक्षू" म्हणून शूद्रांविषयी तुच्छता दिसत असेल तर मग "तब्बल ३९ ब्राह्मण भिक्षू" या संख्येमधून ब्राह्मणांबद्दल विशेष प्रीती दिसत असावी. मात्र हे टिपण (१)च्या विरोधात आहे.

आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !

जरूर अधिक लिहा, पण चर्चेला थोडी दिशासुद्धा द्या.

जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा...

यम-यमी संवादावरुन 'त्या काळात बहीण-भाऊ' विवाह मान्य होता, असे म्हणता येईल का? हा संपूर्ण संवाद कुणी देऊ शकेल का? मी जेवढे वाचले आणि लक्षात राहिले त्यावरुन या संवादात यमी एक स्त्री म्हणून तिच्या नैसर्गिक कामभावनांच्या शमनाची बाजू मांडते, परंतु यमाला केवळ स्त्री-पुरुष संबंधांपेक्षाही नैतिक चौकटींचे आणि सख्ख्या नात्याचे भान असल्याने तो तिची समजूत घालताना आणि संयमाचा पुरस्कार करताना दिसतो. याचाच अर्थ त्याहीकाळी असे काहीसे बंधन (नैतिक/सामाजिक चौकट) असावे, असे दिसते. भाऊ-बहीण विवाह रुढ असता तर यमाने नकार का दिला असता? अशी काही इतर उदाहरणे सापडतात का?

आपल्यात सगोत्र विवाह मान्य नाही. रक्ताच्या नात्यातील विवाह तर सर्वथा अनुचित समजला गेला आहे. कर्नाटकात पूर्वी मामाला मुलगी देण्याची प्रथा होती, पण त्याचे कारण लग्ने अल्प वयात आणि त्यानंतर सातत्याने संतती या कारणाने पुष्कळदा आई आणि मुलीचे बाळंतपण एकाच सुमारास अथवा आगेमागे असायचे. मामाच्या आणि भाचीच्या वयातले अंतर कमी असायचे. लग्नानंतर कुळ बदलत असल्याने असा विवाह मान्य असे. पुढे विवाहाची आणि संततीक्षम वयाची मर्यादा वाढली तशी मामाच्या मुलीशी विवाहाची प्रथा सुरु झाली (जी आजही आढळते), पण मातुल कुळाखेरीज इतर भाऊ-बहिणीत (चुलत, मावस, सख्खे) विवाह त्याज्ज समजतात. त्यामुळे मला नाही वाटत, की पूर्वीही भाऊ-बहीण विवाहाला मान्यता असावी.

जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

डाउनलोड

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास marathipustake.org या साईटवरून डाउनलोड करू शकता.

गल्लत...

गल्लत करताय तुम्ही, योगप्रभू

इथे `भाऊ-बहीण विवाहास मान्यता`, हा प्रश्न नसून `भाऊ-बहीण संबंध` असा मुद्दा आहे...भाऊ-बहीण विवाहाला पूर्वी मान्यता नसेलही...!

मानवाच्या एकंदर इतिहासाची एकूण `प्रगती` पाहता `नाते` ही संकल्पना तशी खूपच अलीकडची म्हणावी लागेल !
पूर्वी एकच एक नाते सुनिश्चित होते, असे म्हणता येईल व ते म्हणजे जन्मदात्री आई आणि तिच्या उदरातून जन्मलेले अपत्य.

`भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास` हे वि. का. राजवाडे यांचे पुस्तक आवर्जून वाचावे. या विषयावर राजवाडे यांना खूप खूप काही लिहायचे होते; परंतु त्यांच्या निधनामुळे ते सारेच राहून गेले. हे पुस्तक म्हणजे त्या खूप खूप काही लिहिण्याची केवळ पूर्वतयारी होय. ही पूर्वतयारी पाहून आणि वाचून वाचक स्तिमित होऊन जातो.

`व्होल्गा ते गंगा` हे राहुल सांकृत्यायन यांचेही पुस्तक अवश्य वाचावे.

नाही गल्लत नाही...

प्रदीपजी,
वाचनासाठी संदर्भ नमूद केल्याबद्दल धन्यवाद.

बहुतेक माझी गल्लत होत नसावी कारण शरद यांनी स्पष्टपणे लिहिलेल्या वाक्याच्या आधारेच मी शंका मांडली आहे. पाहा.

>>बुद्ध अंबठ ब्राह्मणाला म्हणतो " आम्ही क्षत्रिय वंशाचे शुद्धत्व राखण्यासाठी बहिणीशी लग्न करतो." पूर्वी भाऊ-बहिण विवाह मान्य होता (पहा : यम - यमी संवाद) पण या अभिमानापोटी त्याने अस्पृष्यांना संघात प्रवेश नाकारला नाही, त्यांना सामावून घेतले.<<

यातून भाऊ-बहीण संबंध असा अर्थ ध्वनित होत नाही. इथे लग्न आणि विवाह असे स्पष्ट शब्द वापरले आहेत. संबंध असणे वेगळे आणि त्याला विवाहाच्या कोंदणात समाज मान्यता मिळणे वेगळे. वंशशुद्धीच्या हेतूने विवाह संबंध नात्यांमध्येच करण्याची चाल आजही रुढ आहे. पारशी जमातीत आजही ते दिसून येते. पारशी मुलीने इतर जाती-धर्माच्या तरुणाशी लग्न करायला टोकाची हरकत नसते, पण बाहेरच्या जातीतील मुलीला पारशी म्हणून कधीच मान्यता मिळत नाही. या वंशशुद्धीच्या कल्पनेतून तेथे चुलत-मावस-मामे-आते अशा बहिणींशी विवाह केले जातात. अशा विवाहांचा परिणाम म्हणून जातीत अल्पायुषी, आजारी किंवा अनुवांशिक दोषांची पुनरावृती करणारी संतती आढळते, असे एक निरीक्षण पूर्वी वाचल्याचे आठवते. मुस्लिम समाजातही मातृक अथवा पैतृक नात्यांचा विचार न करता बहिणींशी विवाहास मान्यता आहे.

आता हिंदूंमध्ये काय पद्धत आहे? आपल्याच प्रदेशाचे उदाहरण पाहूया. वंशशुद्धीचा आग्रह अगदी अलिकडेपर्यंत चित्पावन ब्राह्मण, तसेच शहाण्णव कुळी मराठ्यांत पाळला जात होता. (विवाहाने घरात येणारी मुलगी आपल्याच पोटजातीची असली पाहिजे). यात थोडा फरक असा आहे, की चित्पावनांनी हा आग्रह धरताना नातेसंबंधातील (मामाची मुलगी) विवाह कटाक्षाने दूर ठेवले. मराठ्यांमध्ये मात्र मामेबहिणीशी विवाहाची पद्धत मान्य होती आणि त्यांच्याशी राहणीसंबंध आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील देशस्थ ब्राह्मणांनीही ही प्रथा उचलली.

माझा मुद्दा वेगळा होता. बुद्धाचे वाक्य उद्धृत केल्यावर शरदजी म्हणतात की 'पूर्वी भाऊ-बहीण विवाह मान्य होता (पाहा यम : यमी संवाद)' इथे मी वाचताना अडखळलो. यम-यमी संवादाचे ललित कथेत रुपांतर मी वाचले आहे, पण मूळ संवाद वाचला नाही. हा एका बहिणीने सख्ख्या भावाकडे शरीर संबंधांची मागणी करण्यासंदर्भात आहे. त्यात अशा विवाहाचा स्पष्ट उल्लेख यम किंवा यमीच्या तोंडी येतो का? त्या काळात तसा विवाह मान्य होता का? तसे असल्यास यम हा रुढीची चौकट तोडणारा किंवा नकार देणारा पहिला बंडखोर ठरु शकतो. पण ज्याअर्थी यमाने यमीला तसा विचार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याअर्थी त्याच्या मनावर संयमाचा/नैतिकतेचा/ सामाजिक बंधनांचा प्रभाव आहेच.

हा संवाद झाल्यावर यम ध्रुवीय प्रदेशाबाहेर गेला आणि त्याने दुसर्‍या कुळातील एका योद्ध्याला पाहुणचाराचे आमंत्रण दिले. तो त्या बलशाली तरुणाला अश्वावर बसवून घेऊन आला. त्या सौष्ठवपूर्ण तरुणाला यमासोबत पाहून यमी दुहेरी अर्थाने (स्वतःचा आधीचा उतावीळपणा आणि भविष्यातील परिणयाची अपेक्षा) लाजली. पुढे त्याच तरुणाशी यमीचा विवाह संपन्न झाला. यावरुन ध्रुवीय प्रदेशात विरळ लोकवस्ती असतानाही तत्कालीन समाजाला असा शारीर किंवा विवाह संबंध मान्य नव्हता, हे दिसून येते.

यम यमी वगैरे

योगप्रभूंच्या प्रतिसादाशी बव्हंशी सहमत. एका यम आणि यमीचे उदाहरण मिळाल्याने तो संपूर्ण संस्कृतीचा निष्कर्ष किंवा नियम बनत नाही. सख्ख्या बहिणीशी विवाह किंवा संग करण्याची यापेक्षा अधिक किंवा सर्रास उदाहरणे हवीत. ती तशी मिळत नाहीत असे वाटते किंवा मिळाली तरी त्यांची भलावण केलेली आढळत नाही (उदा. ब्रह्मदेव आणि त्याची कन्या). चू. भू. दे. घे.

बुद्धाचे वाक्य उद्धृत केल्यावर शरदजी म्हणतात की 'पूर्वी भाऊ-बहीण विवाह मान्य होता (पाहा यम : यमी संवाद)' इथे मी वाचताना अडखळलो.

शरद हे अशी उद्धृते मांडण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी पूर्वी यापेक्षाही भयंकर निष्कर्ष काढले आहेत.

ज्याअर्थी यमाने यमीला तसा विचार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याअर्थी त्याच्या मनावर संयमाचा/नैतिकतेचा/ सामाजिक बंधनांचा प्रभाव आहेच.

हेच. जेव्हा यम यमीला नाकारतो तेव्हाच प्रचलित समाजरुढीची कल्पना येते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास बारकाईने वाचले तर अनेकदा राजवाडे अपवादात्मक स्थिती दाखवून निष्कर्षास येतात किंवा वाचकांना तसे भासवतात का काय अशी शंकाही येते.

 
^ वर