मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका ..एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे. मराठी माणसा करता बरोबरीने काम करावे म्हणून आज मुंबईत मूक मोर्चा दोघांच्या घरावर काढला..... या प्रयत्नाची दोघानाही कित्येक दीवस आधी कल्पना देण्यात आली होती. पण दोन मराठी माणस एकत्र येतील ते कसले मराठी या उक्तीनुसार आज या दोघांचे वागणे होते. आधी माहित असूनही राज ने घरी न थांबून जनतेला भेटण्याचे साधे सोजन्य सुद्धा दाखवले नाही तर उद्धवने भेटण्याचे सोजन्य दाखवत जनतेला असले मोर्चे काढून वेळ खराब करू नका म्हणत सर्वानीच शिवसेनेत यावे असे आवाहन करत मनोमिलन अश्यक्य असल्याचे सांगत त्यांना कोणाची गरज नाही असे ठणकावले. यावरून या दोघांना मराठीभाषा आणि मराठी माणसाच्या भल्या बद्दल किती प्रेम आहे हे दिसून आले.

मराठी माणसा आता तरी जागा हो! या दोघांना हि मराठीचे जे प्रेम आहे ते पुतना मावशीचे प्रेम आहे. मराठीच्या राजकारणावर या दोघांना स्वत:ची राजकारणाची दुकानदारी चालवायची आहे. एकदा महानगर पालिकेची निवडणूक येवू द्या मग पहा हे दोन बोके कोणाच्या ही मध्यस्थी शिवाय कसे एकत्र येतात ते? आणि नाही आले तरी निवडणुका झाल्यावर सत्तासुंदरी साठी जागा कमी पडू लागल्यावर हेच दोघे बोके सत्तेचे लोणी खाण्या साठी कसेही करून एकत्र येतील. आणि मराठी, मुंबईकरांच्या भल्या साठी आम्ही यापुढे एकत्र सत्ता राबवूत (वाटून खावू) ,अशी मानभावी घोषणा करतील . मराठी माणसाला मूर्ख बनवत मुंबई महानगर पालिकेचे भूखंड ओरपत आता मराठी माणसाचे अस्तिव असलेल्या डोंबिवली मधून सुद्धा मराठी माणसाची हक्कलपट्टी थेट कसारा कर्जत घाटाच्या पलीकडे करून डोंबिवली चे पवई, लावासा सारखे मेक-ओवर करण्यासाठी हिरानंदानी , हिराचंद या सारख्या बिल्डरांना आंदण म्हणून दिल्या जाईल. आणि मराठी माणूस रेल्वे च्या डब्ब्याला लटकत ६-७ घंट्या चा प्रवास करत त्यांची चाकरी करेल. मग परत बेळगाव महाराष्ट्रात घेणारच म्हणत नार्काश्रू ढाळत जय महाराष्ट्र !! जय मराठी भाषा !! आहेच .
जाता जाता. बांद्रा पश्चिम रेल्वे स्टेशन समोरची अवघ्या ३०-३५ वर्षा ची सहकारी भांडार असलेले भक्कम इमारत पडण्याच्या अवस्थ्ये मध्ये असून ही इमारत त्वरित खाली करण्याची भाडेकरूना नोटीसी देवून ती मोक्याची जागा बिल्डर्स च्या घश्यात घालण्याचा मुंबई महानगर पालिकेच्या अधिकरत्यांचा (प्रशासकीय आणि राजकारणी) लीकांचा डाव तेथील एका भाडेकरुनी माहितीचा अधिकार वापरून हाणून पडला . माहिती मागताच प्रशासनाने आपला निर्णय फिरवत नोटीसा मागे घेतल्या. या संदर्भात वार्ताहरानी महापोराना विचारले असता असे प्रकार मुंबईत घडत आहे हे मान्य करत जनतेने आम्हाला याची माहिती द्यावी असे मानभावीपणाने आवाहन केले.

Comments

माहितीच्या अधिकाराचा फायदा

ही इमारत त्वरित खाली करण्याची भाडेकरूना नोटीसी देवून ती मोक्याची जागा बिल्डर्स च्या घश्यात घालण्याचा मुंबई महानगर पालिकेच्या अधिकरत्यांचा (प्रशासकीय आणि राजकारणी) लीकांचा डाव तेथील एका भाडेकरुनी माहितीचा अधिकार वापरून हाणून पडला . माहिती मागताच प्रशासनाने आपला निर्णय फिरवत नोटीसा मागे घेतल्या.

म्हणजे तुम्ही तरी मान्य करत आहात की माहितीच्या अधिकाराचा फायदा आहे. तुम्ही माझ्याकडे मागितलेलं उदाहरण तुम्हीच दिलंत. लोकशाहीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड थोडी तर कमी झालीय तर. बरं वाटलं.

बाकी मूळ लेखाबद्दल फारशी मतं नाहीत किंवा ती मांडण्याची इच्छा नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हजारातून एखाद्यालाच नक्की माहिती मिळते.

माहितीचा अधिकार ही काय प्रगतीचे लक्षण झाले? अन्याया विरुद्ध शासन व्यवस्था दाद देत नव्ह्ती म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले नैतिक वजन वापरून शासनाला जबरदस्तीने हा कायदा अमलात आणावयास लावला. ही व्यवस्था पण लालफितीत अडकली आहे. या कार्यालयात वास्तविक सामाजिक कार्यकर्ते जे शासन यंत्रणेशी संबंधित नाही त्याना नेमले पाहिजेत. पण सरकारने आपली नोकरशाहीतील माणसेच नेमली यामुळे हा अधिकार वापरणे हे जीवा वर बेतत आहे. आणि हा अधिकार वापरणार्यांना आयुष्यातून , सामाजिक जीवनातून खुद्द सरकारी यंत्रणा च उठवत आहे. हजारातून एखाद्यालाच नक्की माहिती मिळते. बाकी टोलवा टोलवी चालू आहे.

बाकी मूळ लेखाबद्दल फारशी मतं नाहीत किंवा ती मांडण्याची इच्छा नाही.
रोजच्या जीवनातील बाबीशी मत न मांडता बाकी बिनकामाच्या गोष्टीची चर्चा करून आपण वेळ फुकट घालवत असतो आणि ठाम मत नसणे किंवा मत नसते,व्यक्त न करणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे. नसबंदी झालेल्या समाजा कडून कांही करण्याची अपेक्षा ही नाही.thanthanpal.blogspot.com

वेळेचा सदुपयोग

आशा आहे की, मोर्च्यातील लोकांना जाणीव झाली असेल-, वेळेचा सदुपयोग कोणत्या कारणासाठी केला पाहीजे.

 
^ वर