श्री. धनंजय आणि श्री. रिकामटेकडा यांच्या चर्चेचे फलित २०५० पर्यंत जाहीर होणार किंवा नाही?

शीर्षकाबद्दल क्षमस्व. श्री. ठणठणपाळ यांचा प्रभाव.
तिकडची चर्चा लांबली, दुसर्‍या पानावर गेली म्हणून त्या चर्चेतील एका मुद्द्यावर फोकस करण्याचा प्रयत्न. (क्यानन इओएस ७, ३५-१०५, ऑटोफोकस.)

मागचे ब्याकग्राउंड : विश्वातील प्रत्येक वस्तूबरोबर एक वेव्ह फंक्शन असते, त्याला साय (स) म्हणूया. (उपक्रमावर ग्रीक अक्षरे टंकता येतात की नाही कल्पना नाही.) त्या वस्तूचा कुठलाही गुणधर्म (प्रॉपर्टी) मोजला तर त्या गुणधर्माशी निगडीत साय कोलॅप्स होते आणि आपल्याला त्या गुणधर्माची किंमत मिळते. उदा. एक इलेक्ट्रॉन आहे. याला वस्तुमान, वेग इ. बरोबर स्पिन नावाचा प्रकारही असतो. ही स्पिन वर किंवा खाली अशा दोन किमतीमध्ये असू शकते. पुंजभौतिकी (क्वांटम मेकॅनिक्स) च्या नियमांप्रमाणे जोपर्यंत एखाद्या इलेक्ट्रॉनची स्पिन मोजली जात नाही तोपर्यंत ती वर किंवा खाली असण्याची शक्यता समसमान असते. मोजल्यावर इलेक्ट्रॉन स्पिन वेव्ह फंक्शन वर किंवा खाली यापैकी एका स्टेटमध्ये कोलॅप्स होते आणि आपल्याला ती किंमत मिळते.

श्री. धनंजय आणि श्री. रिकामटेकडा एका ऍक्सेलरेटर प्रयोगशाळेत संशोधन करतात. ऍक्सेलरेटर काही किमी लांब आहे. त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडला की श्री. धनंजय त्याची स्पिन मोजतात. श्री. रिकामटेकडा दुसर्‍या टोकाला आहेत. इलेक्ट्रॉन त्यांच्यापर्यंत पोचला की ते ही स्पिन मोजतात. सो फार सो गुड.

प्रश्नः
१. श्री. धनंजय यांनी स्पिन मोजल्यावर वेव्ह फंक्शन कोलॅप्स झाले. त्यांच्या साठी वेव्हफंक्शनची किंमत स = वर आहे असे मानू. पण श्री. रिकामटेकडा यांच्यासाठी अजूनही स ची किंमत वर किंवा खाली ठरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी वेव्हफंक्शन वेगळे आहे. याचे स्पष्टीकरण कसे देता येईल?

२. वेव्ह फंक्शन कोलॅप्स होते म्हणजे नेमके काय होते?

३. जर कुणीही मोजणारे नसेल (जंगल मे मोर नाचा, किसीने न देखा) तर इलेक्ट्रॉनला inherent अशी स्पिन किंमत असते का? इथे बेल्स इनिक्वालिटीमध्ये जावे लागेल पण ते चर्चेत झाले तर बरे.

लेखनविषय: दुवे:

Comments

निकाल

तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर बहुधा "हा प्रश्नच निरर्थक आहे कारण त्याचे उत्तर व्हेरिफाएबल नाही"

शीर्षकातल्या प्रश्नाचे उत्तर : ठणठणपाळ यांनी २०६० मधली ऍपॉइंटमेंट घेतली आहे त्यावेळी निकाल ठणठणपाळ यांच्या कानात सांगण्यात येईल.
व ते उपक्रमावर लेख लिहून कळवतील. कृपया हलके घ्यावे.

(तोपर्यंत आपण सर्वांचे वेव्ह फंक्शन मात्र स्मशानात कोलॅप्स झालेले असेल). :)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

माझ्या मते

तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर बहुधा "हा प्रश्नच निरर्थक आहे कारण त्याचे उत्तर व्हेरिफाएबल नाही"
माझ्या मते स्पिन असते कारण -

लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या तार्‍यांमध्ये नेहेमी रासायनिक प्रक्रिया होत असतात. तिथे अर्थातच मोजणारे कुणी नाही. जर inherent स्पिन नसते असे गृहित धरले तर या प्रक्रियांमध्ये इलेक्ट्रॉनना पॉली एक्स्लूजन तत्वाप्रमाणे वागणे अशक्य होईल आणि प्रक्रिया बंद पडतील. ज्या अर्थी प्रक्रिया अव्याहत चालू आहेत त्या अर्थी न मोजताही प्रत्येक इलेक्ट्रॉनला स्पिन असली पाहिजे.

शीर्षकाचे वेव्ह फंक्शन अनडिटरमिनेबल आहे असे वाटते :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

उत्सुक

चक्क स्वतःच्या क्षेत्रातील विषयावर लेखन केल्याबद्दल आरागॉर्न यांचे अभिनंदन वा आभार!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

एन्टॅगलमेंट आणि साधे क्वान्टम

(हा धागा उघडायच्या आधी तिकडे काही लिहिले होते. ते इकडे डकवले आहे.)

वरील चर्चेत दोन प्रयोग होते. एका प्रयोगात एका पिशवीत दोन रंगांचे अनेक चेंडू होते (नंतर ते दोन झाले). एक धनंजय यांनी पाहिला आणि एक रिकामटेकडा यांनी पाहिला (हा कदाचित माझा गैरसमज असेल.) पण एन्टॅगलमेंट सहसा अशीच होते. मात्र त्याची संकल्पना मात्र जास्त कठीण आहे (मला वाटली.).

दुसर्‍या प्रयोगात (नितीन थत्ते यांचा) ज्यात एकच चेंडू आहे आणि तो धनंजय यांनी पाहिला पण रिकामटेकडा यांना बघायचा आहे.

पहिल्यांदा दुसर्‍या प्रयोगा बद्दल लिहितो.
रंग नावाची गोष्ट क्वांटम मधे नाही. स्पिन ही संकल्पना मात्र रंगासारखी वापरली जाते. एखाद्या सूक्ष्म कणाला (आपण लेगब्रेक ऑफब्रेक सारखा धरूया) स्पिन असतो. हा स्पिन ओळखणे या क्रियेला आपण रंग बघणे असे म्हणूया. हा स्पिन कुठल्या दिशेने आहे हे जाणण्यासाठी ज्या मोजमापांची गरज आहे त्या मोजमापांनंतर त्या कणाचा स्पिन बदलतो. अशा मोजमापामुळे फक्त मोजमापापूर्वी काय स्पिन होता हे निस्चित होते मोजमापानंतरची नाही. त्यासाठी वेगळे मोजमाप करावे लागेल (आणि परत स्पिन बदलेल असे पुढे चालू.) आता आपल्या रुपकात धनंजय यांनी या चेंडूचा रंग बघितला असे म्हटले होते. याचाच अर्थ धनंजय यांनी मोजमाप केली असा होतो. धनंजय यांनी तो रंग निळा बघितला म्हणजे परत बघितल्यावर तो निळाच राहील असे नाही. (कारण मोजमाप केल्यावर स्पिन बदलतो म्हणजे रंग बघितल्यावर रंग बदलतो.) एकदा धनंजय यांनी त्याला निळा आहे असे बघितल्यावर त्या चेंडूचा रंग सर्वांसाठी बदलला गेला आहे. नितीन यांचे दोन वेव फंक्शन (धनंजय यांच्या साठी एक व रिकामटेकडा यांच्यासाठी दुसरे) हे बरोबर नाही. त्याउलट रिकामटेकडा यांचे त्या क्रियेने रंग बदलतो हे म्हणणे बरोबर आहे.

आता दुसर्‍या प्रयोगा बद्दल. हा प्रयोग क्वांटमसाठी जरा अडचणीचा होता. म्हणजे आता दोन चेंडूंची जोडी आहे असे समजू या. (ही जोडी परत दोन कणांची व त्यांच्या स्पिनची असते.) त्यात एक चेंडू निळा असेल तर दुसरा लाल आहे असेच असणार आहे. हे कणांच्या बाबतीत कळणे थोडे जास्त सोपे आहे. म्हणजे दोन कण एकत्रित आहेत आणि त्यांचा एकत्रित स्पिन शून्य आहे मात्र ते वेगळे झाल्यावर प्रत्येकाला वेगवेगळे स्पिन असे होतील की दोघांची बेरीज शून्य असेल. (एक लेगब्रेक आणि एक ऑफ ब्रेक यांची बेरीच शून्य असू शकते.) आता असा विचार करू की काही कारणाने हे दोन चेंडू (कण) वेगळे होतात. एक धनंजय यांच्या कडे जातो आणि एक रिकामटेकडा यांच्या दिशेने जातो. यातील धनंजय आधी मोजमाप करतात. आणि रिकामटेकडा यांना सांगतात की त्यांच्या कडच्या चेंडूचा रंग निळा आहे. याचा अर्थ असा धरला जातो की रिकामटेकडा यांना त्यांच्या कडे येणार्‍या चेंडूकडे न बघताही सांगता येईल की तो कुठल्या रंगाचा आहे. (हेच एक कण ऑफस्पिन होत असेल तर दुसरा लेगस्पिन होत राहील असे आहे.) आइन्स्टाईन आणि इतर दोघांनी या प्रयोगाद्वारे असे सांगितले की कुठलीही मोजमाप न करता एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान मिळू शकते. मात्र हीच गोष्ट मूळ क्वांटम (हायजनबर्गच्या) विरुद्ध ठरते. म्हणून याला पॅरडॉक्स असे म्हटले गेले. (ईपीआर पॅरडॉक्स). यावरील चर्चेला उपाय म्हणून असे म्हटले गेले की हे दोन चेंडू सतत एक म्हणून वावरत असतात (अंतर किती का असेना.). म्हणजे या दोन चेंडूत अशी संदेशवहन यंत्रणा असते की ती ताबडतोब (रिलेटीविटी विरुद्ध) दुसर्‍याची स्थिती जाणून घेते. यामुळे कधी एक चेंडू निळा असतो तर कधी तो लाल असतो पण त्याच वेळी दुसरा चेंडू लाल आणि निळा असतो. पण एकत्रित रित्या ते दोन चेंडू कधीच लाल -लाल वा निळा-निळा असे नसतात. (याला दोघांचे एकत्रित वेवफंक्शन असे म्हणू.) आता धनंजय यांनी यातील एक चेंडू निळा म्हणून बघितला म्हणजे तो चेंडू आता निळा वा लाल असा राहिला नाही (कारण त्यांनी मोजमाप केली.) आता जो चेंडू रिकामटेकडा यांच्या दिशेने येत आहे त्याच्यावरही धनंजय यांनी चेंडू बघितल्याच्या क्रियेचा परिणाम होतो. (कारण ते दोन चेंडू एन्टॅगल्ड आहेत) व तो ही आपला रंग बदलतो. हे दोन चेंडू अगदी काही प्रकाशवर्षे दूर असतील तरी ते एन्टॅगल्ड राहू शकतात असा दावा केला गेला आहे.

असे होते का? की या बाजारातल्या तुरी सारख्या गप्पा आहेत यावर बराच खल चालू असे. मात्र हळू हळू त्याबद्दल करावयच्या प्रयोगाची कल्पना येत गेली. हल्ली अशा बातम्या येत असतात की एन्टॅगलमेंट असते असे सिद्ध करणारे प्रयोग झाले. हे प्रयोग कसे करावेत याबद्दल बेल यांनी स्वतःची योजना बांधली व एक सिद्धता केली होती. त्यानुसार हल्ली हे प्रयोग केले जातात व प्रयोगांती असा निष्कर्ष काढला जातो की ईपीआर पॅरडॉक्स हा पॅरडॉक्स राहिला नाही आणि त्याचे उत्तर म्हणून दिलेली एन्टॅगलमेंट ही वास्तविकता आहे.

प्रमोद

प्रमोद

नक्की?

१. श्री. धनंजय यांनी स्पिन मोजल्यावर वेव्ह फंक्शन कोलॅप्स झाले. त्यांच्या साठी वेव्हफंक्शनची किंमत स = वर आहे असे मानू. पण श्री. रिकामटेकडा यांच्यासाठी अजूनही स ची किंमत वर किंवा खाली ठरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी वेव्हफंक्शन वेगळे आहे. याचे स्पष्टीकरण कसे देता येईल?

"वेवफंक्शन वेगळे आहे" हा प्रायोगिक निष्कर्ष आहे काय? माझ्या माहितीप्रमाणे, विग्नरच्या मित्राविषयी विकीपिडियावरील पानावर असे दिले आहे की सर्वांसाठी वेवफंक्शन समानच असते.

तुमचा

तुमचा धनंजय यांच्याशी संपर्क नाही. त्यामुळे धनंजय त्यांच्या मोजमापाचे उत्तर तुम्हाला सांगू शकत नाहीत. तुम्हाला मोजमाप करून स्पिन वर की खाली हे ठरवायचे आहे. अशा वेळी तुमच्यासाठी मोजमाप करण्याआधी स्पिन वर किंवा खाली या समसमान शक्यता आहेत. म्हणून तुमच्या दृष्टीने वेव्हफंक्शन वेगळे असणार असे वाटते.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

तसे नाही!

विग्नरच्या विकीपिडिया पानावर तसे दिलेले नाही.
जेव्हाजेव्हा धनंजय यांना 'मांजर मृत' असे निरीक्षण मिळेल तेव्हातेव्हा मलाही 'मांजर मृत' असेच निरीक्षण मिळेल. कोलॅप्स नसता तर मला ५०% वे़ळा 'मांजर जिवंत' असे निरीक्षण मिळाले असते.

विकी

विकीच्या ह्या पानावर विग्नरचा मित्र ह्याखाली हे वर्णन आहे. हेच आधीच्या चर्चेतही चिकटवले होते. मला तरी माझ्या प्रयोगात आणि ह्या प्रयोगात काही फरक दिसत नाही.

Wigner puts his friend in with the cat. The external observer believes the system is in the state (|\text{dead}\rangle + |\text{alive}\rangle)/\sqrt 2. His friend however is convinced that cat is alive, i.e. for him, the cat is in the state |\text{alive}\rangle. How can Wigner and his friend see different wave functions?

The Copenhagen Interpretation: Wigner's friend highlights the subjective nature of probability. Each observer (Wigner and his friend) has different information and therefore different wave functions. The distinction between the "objective" nature of reality and the subjective nature of probability has led to a great deal of controversy. Cf. Bayesian versus Frequentist interpretations of probability.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.व्

विग्नरचे मत

या दुव्यावर विग्नरचे मत आहे: "The consciousness causes collapse interpretation was Wigner's motivation for introducing Wigner's friend by asserting that collapse occurs at the first "conscious" observer." म्हणजे पहिल्या सजग निरीक्षकामुळे कोलॅप्स होतो. 'निरीक्षकसापेक्ष कोलॅप्स' असे वर्णन अपेक्षित असेल तर 'पहिला निरीक्षक' असे काहीच खास उरत नाही.क्ष्

"परिस्थितिसापेक्ष"

माझी त्यांच्याशी उपप्रतिसादा-उपप्रतिसादी झाली,
(माझा "पॅरॅलॅक्सचे उदाहरण" मुद्दा, त्यांचा "अगदी मान्य" प्रतिसाद)
तर ते माझ्याशी सहमत झाले की :
"व्यक्तिसापेक्ष" म्हणजे "परिस्थितिसापेक्ष" म्हणायचे आहे.

मुद्दा

माझा युक्तिवाद इतकाच की विग्नरचे उदाहरण मात्र व्यक्तिसापेक्षच आहे.

५०% निरीक्षणासाठी किती वेळा निरीक्षणे मोजणार होता?

५०% वेळा 'मांजर जिवंत' असे निरीक्षण मिळाले असते.

"५०% वेळा" म्हणजे असेच ना -- १०० वेळा प्रयोग केले, तर ५० वेळा 'मांजर जिवंत' असे निरीक्षण मिळेल
मग मोजूया की १०० वेळा.
मात्र "१०० प्रयोग" कसे मोजायचे? शंभर प्रयोग कथानकाच्या सुरुवातीपासून पुन्हापुन्हा करायचे. धनंजयला (खोलीमध्ये) ~५० वेळेला मांजर मेलेले दिसेल, आणि रिकामटेकडा पात्राला (खोलीबाहेरून आत आल्यावर) ~५० वेळा मांजर मेलेले दिसेल. असे गणित मी करतो. यास प्रयोगाने सिद्ध करता येईल.

वरील प्रतिसादातल्या रिकामटेकडा पात्राने फक्त "धनंजयने मांजर मृत पाहिल्यानंतर" असे १०० प्रयोग घेतले का? (मूळ कथानक ~२०० वेळेला पुन्हा कार्यान्वित केले, मात्र त्यातले निवडक प्रयोग टक्केवारीच्या गणितासाठी घेतले.) निवडायचे ते १००च प्रयोग कुठले ते रिकामटेकडा-पात्राने कसे ठरवले? धनंजयने रिकामटेकडा-पात्राला खूण करून सांगितले का - "हा प्रयोग गणितासाठी निवडून घे...हा प्रयोग मोजू नकोस..." त्या अर्थी रिकामटेकडा पात्रापर्यंत धनंजयचा संदेश पोचू शकतो. सापेक्षवादाशी कुठलाच विरोध येत नाही.

आता म्हणाल की एकदाच निरीक्षण करायचे आहे, तर काय? असे असल्यास तुमचा "५०% वेळा" हा शब्दप्रयोग नि:संदर्भ आहे. नि:संदर्भ शब्दप्रयोग करण्यासाठी पुंजभौतिकीची चमत्कृती नको. अशी मजेदार कथानके शब्दाला शब्द जोडून कोणीही करू शकते. हे घ्या :
हे एकच पिंड ५०% सफरचंद आणि ५०% पियानो आहे.
("शंभर पिंडांपैकी ५० सफरचंदे आणि ५० पियानो आहेत" या वाक्याला मात्र अर्थ आहे.)

- - -
मला वाटते, तुमचे अध्याहृत गणित असे काही आहे.
जसे-जसे पॉझिट्रॉन आणि इलेक्ट्रॉन खूप-खूप दूर जातात, तशा तशा स्पिनच्या संभवनीयतांचे डिस्ट्रिब्यूशन (पुंजभौतिकीचे एंटँगलमेंट भाकीत सोडल्यास) बदलत जाते.
संभवनीयता(धनंजय +१/२, रिकामटेकडा +१/२ ) = २५%
संभवनीयता(धनंजय +१/२, रिकामटेकडा -१/२ ) = २५%
संभवनीयता(धनंजय -१/२, रिकामटेकडा +१/२ ) = २५%
संभवनीयता(धनंजय -१/२, रिकामटेकडा -१/२ ) = २५%
एकूण १००%.
(विरोध मिळण्यासाठी असे तुमचे अध्याहृत गणित असावे की) पुंजभौतिकी नसल्यास एकूण १०० प्रयोग केल्यास
निरीक्षण(धनंजय +१/२, रिकामटेकडा +१/२ ) = ~२५ वेळा
निरीक्षण(धनंजय +१/२, रिकामटेकडा -१/२ ) = ~२५ वेळा
निरीक्षण(धनंजय -१/२, रिकामटेकडा +१/२ ) = ~२५ वेळा
निरीक्षण(धनंजय -१/२, रिकामटेकडा -१/२ ) = ~२५ वेळा
असे दिसेल. (असा पूर्वपक्ष अध्याहृत.)

अध्याहृत आहे, असे मी काय म्हणून म्हणतो?
वरील प्रतिसादात "धनंजयने +१/२ मृत मांजर बघितले" असेच प्रयोग निवडले तर ५०% वेळा रिकामटेकडा पात्राला मांजर जिवंत दिसेल असे म्हटले आहे. म्हणजे वरील हिशोबातले "ध+१/२" प्रयोगच घेतले तर उपप्रतिसादातले मत असे काही :
निरीक्षण(धनंजय +१/२, रिकामटेकडा +१/२ ) = ~२५/५० वेळा
निरीक्षण(धनंजय +१/२, रिकामटेकडा -१/२ ) = ~२५/५० वेळा

बहुधा (बाय सिमेट्री) ध-१/२ बद्दल सुद्धा हिशोब उपप्रतिसादात असाच असावा. त्यावरून पूर्ण १०० प्रयोगांचे अध्याहृत डिस्ट्रिब्यूशन काढले. चुकले असल्यास सांगावे.

मात्र पुंजभौतिकीचे गणित अध्याहृतापेक्षा वेगळे सांगते :
संभवनीयता(धनंजय +१/२, रिकामटेकडा -१/२ ) = ५०%
संभवनीयता(धनंजय -१/२, रिकामटेकडा +१/२ ) = ५०%
आणि निरीक्षणांचे पुंजभौतिकी भाकित असे :
निरीक्षण(धनंजय +१/२, रिकामटेकडा -१/२ ) = ~५० वेळा
निरीक्षण(धनंजय -१/२, रिकामटेकडा +१/२ ) = ~५० वेळा
म्हणून अध्याहृत पूर्वपक्षाशी विरोध दिसतो.

मात्र तुमच्या अध्याहृत पूर्वपक्षाचे गणित कुठल्या सिद्धांताने केलेले आहे? असा कुठलाच पूर्वसिद्धांत नव्हता. न्यूटनचा नव्हे की आइन्स्टाइनचा नव्हे.

तसे नव्हे!

आरागॉर्न यांनी प्रतिपादिले आहे की वेवफंक्शनचा कोलॅप्स व्यक्तिसापेक्ष असतो.
तसे असते तर 'ध' यांची निरीक्षणे 'रि' यांच्या निरीक्षणांशी ऑर्थॉगॉनल असती. म्हणजे असे की शंभर प्रयोग केले तर ५० वेळा 'ध' यांना मांजर मृत सापडेल, पण त्यांपैकी २५ वेळा 'रि' यांना मांजर जिवंत सापडेल!

गैरसमज

व्यक्तिसापेक्ष असे माझे म्हणणे नाही. विग्नरचे असल्यास मी सहमत नाही.
वेव्हफंक्शन कोलॅप्स झाल्यावर सर्वांची मोजमापे तीच येणार. मात्र मोजमापांच्या आधी प्रत्येकासाठी वेव्हफंक्शन परिस्थितीवर अवलंबून असतात असे वाटते.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

माझ्यासाठी प्रश्न

("धनंजय" आणि "रिकामटेकडा" हे उपक्रमावरील आयडी आहेत. व्यक्तिशी बोलताना अनेकवचनी उल्लेख करायचा सामाजिक रिवाज मी कधीकधी पाळतो. या चर्चेत मात्र "धनंजय" आणि "रिकामटेकडा" शब्द केवळ दोन वेगवेगळ्या निरीक्षकांचा उल्लेख करण्यासाठी स्थानधारके आहेत असे मानून एकवचनी उल्लेख केलेले आहेत. यामुळे "अमुक उल्लेखात किती निरीक्षक" याबद्दल संदिग्धता टळेल.)

प्रश्नः

१. श्री. धनंजय यांनी स्पिन मोजल्यावर वेव्ह फंक्शन कोलॅप्स झाले. त्यांच्या साठी वेव्हफंक्शनची किंमत स = वर आहे असे मानू. पण श्री. रिकामटेकडा यांच्यासाठी अजूनही स ची किंमत वर किंवा खाली ठरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी वेव्हफंक्शन वेगळे आहे. याचे स्पष्टीकरण कसे देता येईल?

प्रश्न समजला नाही. (म्हणजे कुठल्या प्रकारचे उत्तर प्रश्नाच्या मथितार्थाशी सुसंगत आहे, हे कळले नाही.)
त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडला की श्री. धनंजय त्याची स्पिन मोजतात. श्री. रिकामटेकडा दुसर्‍या टोकाला आहेत. इलेक्ट्रॉन त्यांच्यापर्यंत पोचला की ते ही स्पिन मोजतात. सो फार सो गुड.
हे कथानक पुरेसे स्पष्टीकरण आहे, असे मला वाटले.
तरी हे स्पष्टीकरण पुरेसे नसावे असे चर्चाप्रस्तावकाचे मत आहे, असे स्पष्टच आहे. त्यामुळे चर्चाप्रस्तावात कुठलेतरी लपलेले (अध्याहृत) विधान आहे, आणि त्या विधानाचा कथानकाच्या शेवटाशी विरोध होतो आहे. विधान बहुधा असे असावे :
"एका परिस्थितीतला धनंजय आणि वेगळ्या परिस्थितीतला रिकामटेकडा यांचे गणित एका काळ-इन्स्टंटमध्ये समसमान बदललेले असले पाहिजे."
असे विधान असावे, असे मला का वाटते?
एका/वेगळ्या : धनंजय आणि रिकामटेकडा यांची परिस्थिती समसमान असलेली चालत असती, तर कथानकात त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले नसते.
एका काळ-इन्स्टंटमध्ये : कथानकात "अजून" शब्द वापरलेला आहे. त्याचा संदर्भ साधारणपणे कालक्रमाशी असतो. धनंजयने केलेले गणित बदलण्याचा काळ क्रमाने रिकामटेकड्याने केलेले गणित बदलायच्या काळाच्या आधी आहे, असे काहीसे कथानक आहे. मात्र "काहीतरी आधी आणि नंतर आहे" यातून कथानकाच्या शेवटाशी कुठलाच विरोध उद्भवत नाही. "आधी आणि नंतर असू शकत नाही, एकच समय असला पाहिजे" असे विधान अध्याहृत असावे.
समसमान बदललेले : वरील चर्चेतून सुस्पष्ट.
असे विधान अध्याहृत असल्यास कथानकाच्या शेवटाशी विरोध येतो, हे खरे. असे विधान अध्याहृत आहे का? याबद्दल श्री. आरागॉर्न यांनी खुलासा द्यावा.
वरील अध्याहृत विधान मला चमत्कारिक वाटते. माझ्या रोजव्यवहारातल्या अनुभवांशी ते विसंगत आहे.

२. वेव्ह फंक्शन कोलॅप्स होते म्हणजे नेमके काय होते?

कथानक सांगणार्‍यानेच स्पष्टीकरण द्यावे :-)
मला अगदी-अगदी सामांतर्य असे काही वाटते : "गणितातल्या समीकरण-फलनातील अनेक शक्य रूट्स पैकी काही रूट्स नव्या माहितीमुळे बाद होतात".
म्हणजे
(क्ष+१)(क्ष-१) = ०
यात क्ष=-१ किंवा क्ष=१
मात्र नवी माहिती मिळाली की "क्ष<०", तर "क्ष=१" हे रूट बाद होते.
मात्र त्याचा असा अर्थ नव्हे की "(क्ष+१)(क्ष-१) = ०" याचेच गणित बदलले.
{(क्ष+१)(क्ष-१) = ० ; क्ष<०} या एकत्रित व्यवस्थेचे (सिस्टिमचे) रूट हे { "(क्ष+१)(क्ष-१) = ०"} या व्यवस्थेच्या रूट्सांचे सबसेट आहे.
या तथ्याचा उल्लेख "कोलॅप्स" असा मी करेन.

३. जर कुणीही मोजणारे नसेल (जंगल मे मोर नाचा, किसीने न देखा) तर इलेक्ट्रॉनला inherent अशी स्पिन किंमत असते का?

असेल, नसेल, कोणास ठाऊक. "inherent" म्हणजे काय? आता "समवाय" म्हणजे "inherence" असे काहीतरी असतेच असे वैशेषिकांचे गृहीतक असते. पण ते मला समजलेले नाही.

इथे बेल्स इनिक्वालिटीमध्ये जावे लागेल पण ते चर्चेत झाले तर बरे.

कुतूहल आहे.

वर

प्रश्न समजला नाही. (म्हणजे कुठल्या प्रकारचे उत्तर प्रश्नाच्या मथितार्थाशी सुसंगत आहे, हे कळले नाही.)
वर रिकामटेकडा यांना दिलेल्या उत्तरातील परिच्छेद पहावा. दोघांच्या वेव्हफंक्शनमध्ये फरक आहे असे मला वाटते. जर माझा प्रयोग आणि विग्नरचा मित्र समान आहेत हे पटले तर याही प्रयोगाबाबत माझे तेच म्हणणे आहे.

कथानक सांगणार्‍यानेच स्पष्टीकरण द्यावे :-)
तुम्ही लाल-निळे सगळे चेंडू आमच्याच कोर्टात टाकलेत :)

असेल, नसेल, कोणास ठाऊक. "inherent" म्हणजे काय?
या प्रश्नामागे निरीक्षकाला स्पेशल स्टेटस आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचे आहे. जरी निरीक्षक नसला तरी सर्व प्रक्रियांमध्ये कणांना वेगवेगळ्या गुणधर्मांच्या किमती असतात असे दिसते. मग निरीक्षकामुळे नेमके काय होते?

तुमचे आणि रिकामटेकडा यांचे नाव घेण्यापूर्वी परवानगी घेतली नाही त्याबद्दल क्षमस्व. तिकडचे चेंडूचे उदाहरण जसेच्य तसे इकडे आणले.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

असेल/नसेल/कोणास ठाऊक

या प्रश्नामागे निरीक्षकाला स्पेशल स्टेटस आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचे आहे. जरी निरीक्षक नसला तरी सर्व प्रक्रियांमध्ये कणांना वेगवेगळ्या गुणधर्मांच्या किमती असतात असे दिसते. मग निरीक्षकामुळे नेमके काय होते?

असेल/नसेल/कोणास ठाऊक.
मला वाटते की मला वेगवेगळ्या शब्दांत समजावून सांगायचा प्रयत्न होतो आहे, परंतु मला ते सर्व शब्द तार्किकदृष्ट्या समजूच येत नाही.
"स्पेशल स्टॅटस" म्हणजे काय? याचे स्पष्टीकरण असे काही दिलेले दिसते :
निरीक्षक नसला आणि प्रक्रियांमध्ये कणांना वेगवेगळ्या गुणधर्मांच्या किमती असल्या तर काय फरक पडतो? "निरीक्षकामुळे नेमके काय होते" या वाक्याचा नेहमीसारखा अर्थ लावायचा असला तर असा लावावा?
"क्ष-मुळे काय होते" म्हणजे "क्ष नसल्यास निरीक्षण" आणि "क्ष असल्यास निरीक्षण" यांच्यातला फरक जोखायचा. मग "क्ष-मुळे अमुक फरक होतो" असे ज्ञान होते.

या प्रकारे बघूया. "निरीक्षक नसल्यास निरीक्षण" आणि "निरीक्षक असल्यास निरीक्षण" यांच्यातला फरक शोधायचा प्रयत्न करूया.
पैकी पहिल्या "निरीक्षक नसल्यास निरीक्षण" शब्दशृंखलेत अंतर्गत विरोध आहे. याचा कुठल्याही गोष्टीशी फरक सांगता येत नाही. "निरीक्षक असल्यास निरीक्षण"शी फरक सांगता येत नाही. "२ मीटर"शी फरक सांगता येत नाही. "३ संत्री"शी फरक सांगता येत नाही. अंतर्गत विरोध असलेले कुठलेही विधान तर्कासाठी वापरले जाऊ शकत नाही.

"-मुळे"च्या शब्दार्थाचे माझे वरील विश्लेषण तुमच्याही मनात असावे. तुम्हीच म्हणता :

जरी निरीक्षक नसला तरी सर्व प्रक्रियांमध्ये कणांना वेगवेगळ्या गुणधर्मांच्या किमती असतात असे दिसते.

इथे "असे दिसते" म्हणजे "असे निरीक्षण होते" साठी पर्यायी शब्दरूप आहे ना?
"निरीक्षण नसला तर 'अमुक' असे निरीक्षण होते" हे वाक्य व्याकरणशुद्ध आहे, पण अर्थाच्या दृष्टीने मला मुळीच ग्रहण करता येत नाही.

माझ्या लहानपणी आम्ही शाळकरी मित्र अशी कोडी घालत असू की बेमालूम शब्दांत "० भागिले ०" हे गणित अध्याहृत होते. कितीही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले तरी गणित नि:संदर्भच असायचे. पण कळायचे नाही.
कोड्याची युक्ती अशी असते, की दिसायला "०/०" हे चटकन दिसायला नको. त्यामुळे कित्येक दिवस मी खुद्द कोडे सांगत असतानाही आपण ०/० भागाकार करत आहोत हे मलाच कळत नसे.
गंमत म्हणून त्यांच्यापैकी एक कोडे येथे देतो.

समजा : क्ष = १
तर मग
क्ष - १ = ०
आणि
क्ष - २क्ष + १ = ०
म्हणजे
क्ष - १ = क्ष - २क्ष + १
आता वर्गात शिकवले आहे की
क्ष - १ = (क्ष+१)(क्ष-१)
आणि
क्ष - २क्ष + १ = (क्ष-१)
वर्गात शिक्षकांनी सांगितले आहे, ही समीकरणे नेहमीच खरी असतात, 'क्ष'ची किंमत काही का असेना खरी असतात. आठवते की नाही?
तर मग आपल्या उदाहरणात या किमती भरूया :
(क्ष+१)(क्ष-१) = (क्ष-१)
आता दोन्हीकडे एक कॉमन फॅक्टर (क्ष-१) कॅन्सल करूया
म्हणजे : (क्ष+१)(क्ष-१) = (क्ष-१)(क्ष-१)
म्हणजे : क्ष+१ = क्ष-१
म्हणजे : क्ष+२ = क्ष
आता आपण ठरवलेच आहे, की क्ष = १. बाकी आपण बीजगणितातली चिरंतन समीकरणे, फॅक्टरायझेशने वगैरे वापरलेली आहेत. परत मूळ "क्ष = १" करूया.
क्ष+२ = क्ष म्हणजे ३=१
(टाळ्या!)

मग "कॅन्सल करणे" असा कुठला चिरंतन बीजगणिती सिद्धांत मला कधीच कोणी शिकवलेला नव्हता. मी स्वतःच्या प्रज्ञेने शोधलेला नव्हता. तरी "कॅन्सल" प्रक्रिया करायची इतकी प्रतिक्षिप्त सवय झालेली असते, की तर्कात तिथेच गडबड होते आहे, हे मानायला मन तयारच नसायचे. मग बीजगणितातले "फॅक्टर मुळात आहेतच की नाहीत अशी चिंता करत राहायची... बीजगणितात काहीतरी चुकले आहे असे वाटत राहायचे.
दृष्टांत असा आहे : माझ्या लहानपणाच्याकोड्यातील छुपे ०/० गणित <-> येथील कथानकात वेगवेगळ्या शब्दात सांगितलेले "निरीक्षक नसताना निरीक्षण". पहिले गणित बीजगणितात नि:संदर्भ आहे, तरी कागदावर "०" "/" "०" अशा खुणा क्रमाने करता येतात. गणितातल्या प्रक्रियेसारखा भास होतो. दुसरे विधान तर्कशास्त्रात नि:संदर्भ आहे, पण "निरीक्षक" "नसताना" "निरीक्षण" हे शब्द क्रमात तोंडाने उच्चारता येतात. व्याकरणशुद्ध मराठी वाक्य असल्यामुळे तार्किक विधान असावे असा भास होतो.

तीच तर गंमत आहे!

"सिल्वर ब्रोमाईडचा रंग कोणता?, निर्मनुष्य जंगलात झाड पडले तर आवाज होतो काय?, अशा प्रश्नाची उत्तरे शक्य नाहीत" असा काहीतरी तुमचा युक्तिवाद आहे असे वाटते.

स्थूल वस्तूंच्या बाबतीत, "बघण्यापूर्वी चेंडूला नेहमीच ठाम रंग असतो" असे सिद्ध करणे शक्य नाही (पण आजवर केलेल्या सर्वच प्रयोगांमध्ये तसा अनुभव आलेला आहे) पण क्वांटम प्रयोगांमध्ये मात्र "बघण्यापूर्वी चेंडूला रंग निश्चित नसणे शक्य असते" असे मी म्हटले होते. ते सिद्ध करण्यासाठी रॉजर पेनरोज यांनी एक प्रयोग सुचविला आहे:

Bertlmann's socks हे स्थूल चेंडूंसारखे उदाहरण आहे.

पेनरोझ हळूहळू वाचेन, पण स्थूलही

पेनरोझ हळूहळू वाचेन, पण स्थूलही बाबतीत म्हणणे समजलेले नाही -

स्थूल वस्तूंच्या बाबतीत, "बघण्यापूर्वी चेंडूला नेहमीच ठाम रंग असतो" असे सिद्ध करणे शक्य नाही (पण आजवर केलेल्या सर्वच प्रयोगांमध्ये तसा अनुभव आलेला आहे)

हा अनुभव तुम्हाला (किंवा मला) प्रयोगामध्ये कसा आला? अशा एखाद्या प्रयोगाचे वर्णन करता का? या वाक्यांत व्यक्ती (पार्टिक्युलर इन्स्टन्स) आणि जाती (जनरलाइझ्ड एन्टिटी) यांचाही गोंधळ होत आहे असे मला वाटते. पण याबद्दल खात्री नाही. तुम्ही प्रयोग सांगितल्यावर खात्री पटेल/वेगळे कळेल.

"सिल्वर ब्रोमाईडचा रंग कोणता?, निर्मनुष्य जंगलात झाड पडले तर आवाज होतो काय?, अशा प्रश्नाची उत्तरे शक्य नाहीत"

नाही. मला वाटत नाही की हा माझ्या मुद्द्याचा सुयोग्य सारांश आहे.

सारंश असा केला तर नि:संदर्भता स्पष्ट दिसेल :
"निर्मनुष्य जंगलात झाड पडले तर ते ऐकणार्‍या मनुष्याला त्याचा आवाज कुठल्या प्रकारचा ऐकू येईल?"
या प्रश्नात "ते ऐकणारा मनुष्य नसल्यास ऐकणार्‍या मनुष्याला..." हा अंतर्गत तार्किक विरोध आहे. म्हणून प्रश्न तर्कचर्चेतून बाद आहे.

"आवाज होतो काय" या स्थूलातल्या वाक्यास अन्य प्रायोगिक अर्थ आहेत. त्याबाबत फाइनमन यांनी चर्चा केली आहे :

पुंजभौतिकीपूर्वीच्या भौतिकशास्त्रात निरीक्षक कधीकधी महत्त्वाचा होता - पण ते महत्त्व तात्विकदृष्ट्या पायाभूत नव्हते - तपशीलमात्र होते. ही समस्या उठवली जाते : जर अरण्यात वृक्ष कोसळला, आणि ऐकायला कोणी नसले, तर त्या परिस्थितीत ध्वनी होतो का? अर्थात, हे जर कुठल्याही वास्तविक अरण्यामधल्या वास्तविक वृक्षाबाबत बोलत असू, तर अर्थातच ध्वनी होतो - तिथे कोणी नसले तरीही. ऐकायला कोणी हजर नसले तरीही अन्य खाणाखुणा उरतात.ध्वनीमुळे पाने हलतील, आणि आपण अगदी काळजीपूर्वक शोधू, तर असे दिसूही शकेल, की कुठलेतरी पान काट्यावर घासून खरचटलेले दिसेल, आणि त्यावरून ध्वनीमुळे पानाचे कंपन झाल्याची निश्चित खूण सापडेल. कुठल्यातरी प्रकारचा ध्वनी होता असे आपल्याला म्हणावे लागेल. (धनंजयचे स्पष्टीकरण : कंपन उत्पन्न करणारा = ध्वनी, असे काही घडले, असे त्या खुणेवरून ओळखता येते.)

स्थूल बाबतीतच म्हणणे कळले नाही, तर "त्यापेक्षा वेगळे" हा प्रकार पेनरोझ यांच्या लेखनातून कळण्याबाबत अतिशय नैराश्य वाटत आहे. तरी वाचून बघतो. (पेनरोझ यांनी स्थूल बाब समजावून सांगितलेली आहे काय? पटकन दिसले नाही.)

- - -
चेंडूची बाब अशी काही असते :

चेंडूच्या निर्मात्याकडून आपल्याला "चेंडूला पॅककरण्यापूर्वी रंग होता" अशी माहिती अध्याहृत मिळते. "चेंडू" "रंग" वगैरे शब्दांबद्दल व्याख्या आपल्याला माहीत असतात. ती जी काय एकके असतात, त्यांच्या बाबतीत आपण प्रयोग केलेले असतात. (म्हणजे लहानपणी माझ्याकडे चेंडू होते. रात्री खेळण्यांच्या डब्यात ठेवत असे. ठेवताना बघितलेले रंग आणि पुढल्या दिवशी बघितलेले रंग समसमान असत. त्यावरून विगमनाने (इन्डक्शनने) आपण म्हणतो, चेंडूचा रंग निर्मात्याने बघितला, पॅकिंग उघडताना तोच रंग असणार. हे आपले भाकीत इतके विश्वासाचे असते, की आपण लघुरूपाने म्हणतो - पॅकबंद चेंडूला निर्मात्याने पाहिल्यासारखा रंग आहे.

- - -
आता आपण हा खराखरा प्रयोग करूया.

मी आताच (हा मराठी शब्दकोशातला शब्द नव्हे) "ठ्यां" नावाचे एकक तयार केले आहे. याला रूढार्थाने "स्थूल" म्हणता येते. "ठ्यां"ला रंग आहे असे तुम्ही ठामपणे म्हणू शकता का? (शक्य तर ठाम विश्वासाबद्दल काही स्पष्टीकरण द्यावे.)

आपले दोघांचे मित्र उपक्रम-आयडी "ऋषिकेश" यांना मी व्य.नि. ने या "ठ्यां" एककाबाबत अधिक माहिती पुरवत आहे. तुम्ही उत्तर दिल्यानंतर व्यनि मधील मजकूर येथे देतील, त्यावरून तुमचे उत्तर आपण तपासू शकतो.

(मला असे वाटते, की तुम्ही म्हणावे - "स्थूल"पेक्षा अधिक माहिती नाही, तर रंगाबद्दल ठाम होकार/नकार देणारच नाही. प्रश्न बाद. पण तुमचे तुम्हीच सांगा. प्रयोगाचे उद्दिष्ट्य : "चेंडू आधी बघितलेला आहे" हे गृहीतक अध्याहृत असल्याचे स्पष्ट व्हावे. प्रयोग नुसता खोटा-खोटा न राहाता त्याला "निरीक्षणसिद्धता" प्राप्त व्हावी म्हणून मुद्दामून एकक निर्माण करून, घरगुती जमतील तसे प्रयोग करून त्याबद्दल आपले मित्र ऋषिकेश यांना माहिती कळवली.)

खुलासा

हा अनुभव तुम्हाला (किंवा मला) प्रयोगामध्ये कसा आला? अशा एखाद्या प्रयोगाचे वर्णन करता का?

पेनरोज यांनी सुचविलेला प्रयोग स्थूल वस्तूंच्या बाबतीतही करता येईल.

या वाक्यांत व्यक्ती (पार्टिक्युलर इन्स्टन्स) आणि जाती (जनरलाइझ्ड एन्टिटी) यांचाही गोंधळ होत आहे असे मला वाटते. पण याबद्दल खात्री नाही.

तसे नाही. "आजवरच्या सर्व अनुभवांमध्ये असे दिसते की बघण्यापूर्वी स्थूल चेंडूंना ठाम रंग असतात परंतु या नियमाला अपवाद नसल्याचे सिद्ध झालेले नाही" असे वाक्य द्यायचे होते.

झाड पडणे, इ.

खुलासा समजला असे वाटते.
पण "सिल्वर ब्रोमाईडचा रंग कोणता?" हे रूपक योग्य आहे असे वाटते.

चेंडूची बाब

चेंडूच्या निर्मात्याकडून आपल्याला "चेंडूला पॅककरण्यापूर्वी रंग होता" अशी माहिती अध्याहृत मिळते.

स्थूल चेंडूच्या निर्मात्याकडून आपल्याला "चेंडूला पॅक करण्यापूर्वी रंग होता" अशी माहिती अध्याहृत मिळते. हे मान्य आहे. परंतु सूक्ष्म चेंडूंच्या बाबतीत तशी महिती नाही. तरीही आपण दोन्ही शक्यता पडताळून बघू शकतो. "चेंडूला पॅक करण्यापूर्वी लाल रंग होता" आणि "चेंडूला पॅक करण्यापूर्वी निळा रंग होता" यांपैकी कोणतेही गृहीतक वापरल्यास अनुभवांशी विपरीत भाकिते करावी लागतात. "बघण्याच्या कृतीवेळी चेंडूला ठाम रंग प्राप्त होतो" हे गृहीतक मात्र अनुभवांशी सुसंगत असते.

मिळाली

आपले दोघांचे मित्र उपक्रम-आयडी "ऋषिकेश" यांना मी व्य.नि. ने या "ठ्यां" एककाबाबत अधिक माहिती पुरवत आहे.

ही माहिती मला मिळाली आहे. आरागॉर्न यांच्या उत्तराची वाट पाहत आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

प्रश्न

ही माहिती मला मिळाली आहे. आरागॉर्न यांच्या उत्तराची वाट पाहत आहे

प्रश्न मला उद्देशून होता की श्री. रिकामटेकडा यांना हे कळले नाही. मला असेल तर प्रश्न बाद म्हणण्याऐवजी माहित नाही असे उत्तर देईन.
इथे (श्री. धनंजय व श्री ऋषिकेश) यांच्यासाठी आणि (मी व श्री रिकामटेकडा) यांच्यासाठी ठ्यां च्या वेव्हफंक्शनची किंमत वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याची किंमत परिस्थितीजन्य आहे असे वाटते.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

गलतीसे

"गलतीसे..." :-)
प्रश्न श्री. रिकामटेकडा यांच्यासाठी होता.

मात्र येथे वाटल्यास तुम्ही उत्तर द्या. तेही आवडेल.
तुम्ही म्हणता : "ठ्यां"ची किंमत परिस्थितिजन्य आहे.
तुम्ही (स्थानधारक नव्हे, तर खुद्द निरीक्षक म्हणून तुम्ही) तुमच्या परिस्थितीत आहात. तुमच्यासाठी "ठ्यां"चा रंग याच्या वेव्हफंक्शनची किंमत काय आहे?
मग श्री. ऋषिकेश आणि मी (स्थानधारके नव्हे तर निरीक्षक व्यक्ती) आमच्याकडील उत्तर सांगू.

मान्यच!

'अध्याहृत' हा तुमचा पर्याय मला मान्य आहे. तरीही मी उत्तर देणे अपेक्षित आहे काय?
Bertlmann's socks या उदाहरणातही अध्याहृत हेच उत्तर असते असे मला वाटते.

अरे - तुम्ही उत्तर दिलेलेच आहे

होय की - तुम्ही उत्तर दिलेलेच आहे.

तुमचे उत्तर "अध्याहृत गृहीतके सांगितली नाही, तर प्रश्न बाद" असे आहे. सारांश योग्य आहे ना?

आरागॉर्न यांचे उत्तर मात्र "प्रश्न बाद" असे नाही. "माहीत नाही" असे आहे. या दोन वाक्यांतला फरक मला कळलेला नाही. पण जर काही फरक असेल तर संवादात काही हशील होते आहे. "फरक आहे" असे श्री. आरागॉर्न यांना वाटते. ते समजावून सांगतील, अशी आशा आहे.

असे वाटते, माहिती असण्यासाठी श्री. आरागॉर्न यांना कुठलेसे आत्त (डेटा) हवे आहे काय? ते आत्त "इनिशियल कन्डिशन"बाबत आहे काय? जर "इनिशियल कन्डिशन"बाबत आत्त हवे असेल, तर माझ्या मते ते "प्रश्न बाद" असेच म्हणत आहेत.

फरक

फरक मलाही नीट कळलेला नाही. :)
प्रश्न बाद म्हणण्यात मला डिसक्वालिफाशिकेचनची छटा आढळली. त्याऐवजी (आत्त नाही म्हणून) उत्तर माहित नाही जरा बरे वाटले.

जर "इनिशियल कन्डिशन"बाबत आत्त हवे असेल, तर माझ्या मते ते "प्रश्न बाद" असेच म्हणत आहेत.

होय. याला तुम्ही प्रश्न बाद म्हणत असताल तर हेच उत्तर.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

ऋषिकेश यांनी आता उत्तर प्रकाशित करावे

आता ऋषिकेश यांनी "ठ्यां"बद्दल माहिती द्यावी...

बाकी "ठ्यां"बद्दल माहिती काही का असेना.

जर "ठ्यां"चे पूर्वनिरीक्षण झालेले नाही/सांगितलेले नाही, त्याची इनिशियल कन्डिशने माहीत नाहीत, तर त्याबद्दल "बदला"ची विधाने-हायपोथेसिस-प्रयोग सर्वच निरर्थक आहेत, असे कळते.

आणि परिस्थिती स्थूलातच तर्काच्या दृष्टीने अर्थशून्य आहे, तर स्थूलातल्या तर्काची सूक्ष्मातल्या तर्काशी तुलना करता येत नाही. स्थूलात तर्क वेगळे, सूक्ष्मात तर्क वेगळे, असे सांगता येत नाही.
(सूक्ष्माबद्दल माहीत आहे, असे पेनरोझ म्हणतात, असे दिसते. ते जमेल तेव्हा वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करेन. सूक्ष्माबाबत तर्क माहिती असेल, तरी त्याची स्थूलाशी तुलना कशी करावी? म्हणून वाचन लांबणीवर टाकले आहे.)
पण मजा आली. लोक म्हणतात क्वांटम तर्क समजायला भन्नाट कठिण असतात. तर इथे असे दिसते, की स्थूलाविषयीच तर्क समजायला भन्नाट कष्टसाध्य असतात!

ठ्यां

आताच मी एक "ठ्यां" (हा मराठी शब्द नाही) हे एकक तयार केले.
हे एकक म्हणजे दोन हातांनी फोफशी ओंजळ बनवली. (दूर कोणाला बोलावताना आपण तोंडाजवळ दोन्ही हात नेतो, तशी.) ही ओंजळ तोंडाजवळ नेली आणि त्यात तोंडाने मोठ्यांदा "ठ्यां" असा ध्वनी केला. ओंजळीजवळचा कागद फडफडला, म्हणजे ओंजळीत काही कंपन-करवणारे काही होते, याबद्दल माझी खात्री आहे.
"ओंजळीतला ठ्यां-असा ध्वनी" ही या नव्या "ठ्यां"शब्दाची व्याख्या आहे. "ठ्यां"ला दृश्य रेंजमध्ये रंग नव्हता, असे निरीक्षण मी केलेले आहे.

माझ्या वैयक्तिक "वेळ" या एककाच्या अनुपलब्धतेमुळे हा प्रतिसाद द्यायला उशीर झाला. क्षमस्व

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पुस्तक

पुस्तकाच्या पानांबद्दल आभार. वाचनीयच्या यादीत टाकले आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

२०५०च होईल बहुधा

मला पेनरोझचे पुस्तक वाचून घ्यायला २०५० उजाडेल, असे वाटते. सध्या ते वाचायची दुर्दम्य इच्छा होत नाही. त्यामुळे "वाचण्यासाठीच्या पुस्तकांची यादी" मध्ये ते खूप खाली आहे.
वरील पानांत प्रयोग सुरू होतो तो परिच्छेद ५.३ माझ्यासाठी "मोफत वाचण्यास प्रतिषेध" म्हणून दिसतो आहे. म्हणून आता वाचण्याची सोय श्री. रिकामटेकडा यांनी केली, तिचा फायदा करून घेता येत नाही.
जर पेनरोझचाच प्रयोग त्याच्याच पुस्तकात वाचणे आवश्यक असेल, तर चर्चेचे फलित व्हायला खूप विलंब होईल, असे वाटते.

चर्चेच्या मथळ्यातील प्रश्नासाठी माझे उत्तर "२०५०पर्यंत बहुधा होणार नाही" असे आहे.

निरिक्षण नव्हे

इथे "असे दिसते" म्हणजे "असे निरीक्षण होते" साठी पर्यायी शब्दरूप आहे ना?

निरिक्षण नव्हे. निरिक्षक नसला तर निरिक्षण होणे अशक्य आहे. "असे दिसते" हा निष्कर्ष तर्काने काढला आहे. त्यासाठी मोजमाप करण्याआधी स्पिन अस्तित्वात असते किंवा नसते ह्या दोन शक्यता विचारात घेतल्या आहेत. स्पिन्स् नसेल तर (म्हणजे दोन स्पिनच्या शक्यतांची बेरीज असेल) तर अशा इलेक्ट्रॉनना कुठल्याही रासायनिक प्रक्रियेत भाग घेणे अशक्य होईल. तसे होत नाही याचा अर्थ स्पिन असली पाहिजे.

हा उलट्या दिशेने जाउन सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

वेगळ्या शक्यतांचा हिशोब

येथे वेगळ्या शक्यतांचा हिशोब केला आहे.

"मोठ्या संख्येतल्या कणांना कुठल्याही रासायनिक प्रक्रियांमध्ये भाग घेण्यालायक स्पिन-गुण आहे" आणि "मोठ्या संख्येतल्या कणांना कुठल्याही रासायनिक प्रक्रियांमध्ये भाग घेण्यालायक स्पिन-गुण नाही"
मग प्रयोगात रासायनिक प्रक्रिया घडवली.
रासायनिक प्रक्रिया घडली, हे निरीक्षण केले.
निष्कर्ष : "रासायनिक प्रक्रियांमध्ये भाग घेण्यालायक स्पिन-गुण आहे"

"कणांच्या एका जोडीचा हिशोब केला तर निश्चित बेरीज करून रासायनिक प्रक्रिया होते" आणि "असे नाही" या शक्यतांचे वर्णन नाही.

यासाठी प्रयोग असा :
अशी दोन यंत्रे बांधावी : यंत्रात एका वेळी एक-एक हायड्रोजनचा रेणू घ्यावा आणि तो फोडून त्यातले दोन घटक अणू वेगवेगळ्या दिशेला जावेत. पैकी एक अणू एके ठिकाणी स्तब्ध करावा. त्यास प्रकारे दुसर्‍या यंत्रातून मिळवलेला एक अणू स्तब्ध करावा.
हे दोन अणू एकमेकांच्या जवळ आणावेत, आणि त्यांच्या जोडीचे रासायनिक मीलन होते की नाही याचे निरीक्षण करावे.
हा प्रयोग अनेक वेळा करून अनेक निरीक्षणांची नोंद करावी.

कधीकधी रासायनिक मीलन होईल, तर कधीकधी होणार नाही (५०%-५०%) असे माझे भाकीत आहे.
अशा रीतीने इलेक्ट्रॉन-स्पिनमधील ५०%-५०% हे रासायनिक प्रक्रिया होण्याच्या ५०%-५०% मध्ये परिवर्तित होते.

मात्र जर "प्रत्येक वेळेला रासायनिक मीलन झाले" असा निरीक्षणांचा हिशोब लागला, तर माझे भाकित खोटे पडले. (भाकित "फॉलसिफायेबल" आहे.) किंवा असे म्हणा, तुमचा उपन्यास (हायपोथेसिस) आहे : "प्रत्येक वेळी रासायनिक क्रिया करेलच असा स्पिन-गुण इलेक्ट्रॉनमध्ये असतो". त्यातले भाकित असे : "वर सांगितलेल्या प्रयोगात १००% निरीक्षणांत दोन हायड्रोजन अणूंचे रासायनिक मीलन होईल." हे सुद्धा सिद्धासिद्ध करण्यालायक (फॉल्सिफायेबल) आहे.

- - -
मला वाटते की "समूहाचा गुणधर्म" (निरीक्षणे केल्यास पैकी ५०%-५०% मिळणे) आणि "व्यक्तीचा गुणधर्म" (निरीक्षण केल्यास १ किंवा ० मिळणे) यांचा काही गोंधळ होत असावा. ही तार्किक अडचण फार प्राचीन आणि खरोखरच कष्टसाध्य आहे. इलेक्ट्रॉनचा विचार न करता साध्या (किंवा कठिण पण मूलभूत!) नंबर सिद्धांताकडे बघूया.
"दोन असणे" हा गुण कुठे असतो-- जे काय मोजले जाते आहे, त्यांच्यापैकी प्रत्येक व्यक्तीत "दोन-पणा" असतो काय?
हा जटिल तार्किक गुंता हल्लीच ५-६ शतकांत सुटलेला आहे. मात्र शाळेतल्या पाठ्यपुस्तकांत "नंबर थियरी", "सेट थियरी" वगैरे या चवीकरिता भुरभुरत दिलेल्या धड्यांकडे मी दुर्लक्ष केले, असे सखेद आठवते. त्यामुळे हजारो वर्षे न-सुटलेले गुंते पुन्हा माझ्या मनात हे असले पॅरॅडॉक्स म्हणून येतात. तिथे मुळी कुठला विरोध नाहीच, हे समजणे कष्टसाध्य होते.

- - -

दूर तार्‍यांवरती होणार्‍या रासायनिक प्रक्रियांबद्दल तुमचे वर्णन असे काही असावे :

तार्‍याचे दोनदा तरी निरीक्षण केले. त्याच्या आदल्या स्थितीमध्ये अमुक डेन्सिटीने तमुक प्रकारचे कण दिसले. पुढच्या कुठल्या काळात तमुक डेन्सिटीने तमुक कण सापडतील, असे भाकित गणितातून केले. (=रासायनिक प्रक्रिया.) पुन्हा निरीक्षण केले. भाकित केल्यासारखी स्थिती निरीक्षली.
तार्‍यामधील कणांच्या स्पिनबद्दल काही सांगितले, असे वाटत नाही.

तार्‍यांबद्दल उल्लेख नाट्यमयतेसाठीच ना? माझ्या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत अनेक प्रयोग करताना नळी किंवा चंचुपात्र चिमट्यात धरत. किंवा दूरवर ठेवत. चंचुपात्र "निरीक्षकापासून" अनेकानेक मायक्रोमीटर दूर असते, आणि तारे अनेकानेक प्रकाशवर्ष दूर असतात. "अंतर आहे" म्हटले की नेमके किती अंतर ते सांगण्यात कुठलाच मूलभूत अर्थ साध्य नाही.
आणि तारे कधीकधी आपण बघत नाही, असे विशेष आहे काय? आमच्या महाविद्यालयातली द्वाड पोरे तुमच्या ओळखीची नाहीत. एकीकडे चंचुपात्रात रसायन उकळते आहे, आणि पोरे दुसरीकडे बघून चकाट्या पिटत आहेत, असे चित्र खूपदा दिसायचे!

तारे

तार्‍यांचे उदाहरण सुरूवातीला दिले कारण तिथे निरिक्षक असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पण मग लक्षात आले की त्याची गरज नाही. इथेही लाखो प्रक्रिया निरिक्षकाविना होत असतात. त्यामुळे तार्‍याचे उदाहरण बाद केले तरी चालेल.

तुमचा उपन्यास (हायपोथेसिस) आहे : "प्रत्येक वेळी रासायनिक क्रिया करेलच असा स्पिन-गुण इलेक्ट्रॉनमध्ये असतो". त्यातले भाकित असे : "वर सांगितलेल्या प्रयोगात १००% निरीक्षणांत दोन हायड्रोजन अणूंचे रासायनिक मीलन होईल." हे सुद्धा सिद्धासिद्ध करण्यालायक (फॉल्सिफायेबल) आहे.

माझा हायपोथेसिस. इलेक्ट्रॉनला न मोजताही स्पिन असते.
वरील प्रक्रियेमध्ये मीलन होईल किंवा नाही हे स्पिनच्या दिशांवर अवलंबून आहे. मीलन झाले तर दोन्ही अणूंमधील इलेक्ट्रॉन स्पिनच्या दिशा पॉलीचे तत्व पाळतात. मीलन झाले नाही तर त्यांच्या दिशा समांतर आहेत त्यामुळे त्या पॉलीचे तत्व पाळू शकत नाहीत. मात्र कुठल्याही परिस्थितीत त्यांना आधी स्पिन नव्हती हे सिद्ध होत नाही. १००% प्रयोगात मीलन होईल असे भाकित नाही. त्याचा अर्थ १००% इलेक्ट्रॉनच्या स्पिनच्या दिशा परस्परविरोधी असतील असा होतो. तसे मानण्यास काहीच पुरावा नाही.

याउलट मीलन झाले असा एक जरी पुरावा सापडला तरी त्याचा अर्थ इलेक्ट्रॉनना स्पिन होत्या असा होतो असे वाटते.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

उपन्यासासाठी प्रायोगिक प्रमाण कुठले?

माझा हायपोथेसिस. इलेक्ट्रॉनला न मोजताही स्पिन असते.

या उपन्यासासाठी ("फॉल्सिफायेबल") प्रमाण कुठले आहे?
म्हणजे "अमुक प्रयोग केला, तमुक दिसले, तर उपन्यास ठीक नसल्याचे दिसते."

तुमच्या एकवचनी उल्लेखावरून असे दिसते, की तुम्ही एक इलेक्ट्रॉनचा गुण सांगत आहात. इलेक्ट्रॉन-समूहाचा गुण सांगत नाहीत. म्हणजे प्रयोग बहुधा एक इलेक्ट्रॉन (किंवा एक इलेक्ट्रॉन असलेला हायड्रोजन अणू) घेऊनच केला पाहिजे. मग हा प्रयोग खूपदा करावा. असा एक प्रयोग मी सुचवला, तो तुम्हाला पटलेला नाही. आता तुम्ही प्रयोग सुचवा.

एकाच वेळी खूप इलेक्ट्रॉन घेऊन (म्हणजे चंचुपात्रात किंवा तार्‍यामध्ये) तर समूह-गुणाबद्दल कुठलासा उपन्यास तपासता येतो.

मात्र कुठल्याही परिस्थितीत त्यांना आधी स्पिन नव्हती हे सिद्ध होत नाही.

वरील वाक्यातल्या जाड ठशातील वाक्य कोणाचे आहे? या वाक्यात अनेकवचन वापरलेले आहे. त्यामुळे हे समूह-गुणाबद्दल वाक्य आहे, की एक-एक इलेक्ट्रॉनच्या गुणाच्या अनेक इन्स्टन्सचे वर्णन आहे, हे मला कळत नाही. तुमच्या उपन्यासाचा पूरक (कॉम्प्लेमेन्ट) उपन्यास हा नाही. तुमच्या उपन्यासाचा पूरक उपन्यास असा :

इलेक्ट्रॉनला न मोजताही स्पिन नसते.

...

वरील प्रक्रियेमध्ये मीलन होईल किंवा नाही हे स्पिनच्या दिशांवर अवलंबून आहे. मीलन झाले तर दोन्ही अणूंमधील इलेक्ट्रॉन स्पिनच्या दिशा पॉलीचे तत्व पाळतात. मीलन झाले नाही तर त्यांच्या दिशा समांतर आहेत त्यामुळे त्या पॉलीचे तत्व पाळू शकत नाहीत.

येथे एक छान विचार आहे, पण हे प्रयोगाचे वर्णन नाही.
किंवा असे असेल की येथे (डिडक्टिव्ह) निगमन वापरायचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्यात अध्याहृत प्रेमिस आहे "पॉलीचे तत्त्व लागू करण्यासाठी न-मोजलेल्या इलेक्ट्रॉनच्या स्पिनचे अस्तित्वविधान आवश्यक आहे". ते योग्य नाही. पॉलीचे तत्त्व "Ψ"च्या भाषेत लिहिता येते.
वरील दुव्यावरील चिह्नातील समीकरण बघूया. क्ष, क्ष हे एका "ठिकाणी*" वसणार्‍या दोन इलेक्ट्रॉनच्या संदर्भात आहे : (*ठिकाण शब्दाचा अर्थ पॉली सांगतो तसा - उदाहरणार्थ एका हेलियम अणूमधे)
Ψ(क्ष, क्ष) + Ψ(क्ष, क्ष) = ०
तुम्ही म्हणता : असे गणित करून भाकिते केली आणि प्रयोगांत तपासून तेच उत्तर मिळाले, तर पैकी प्रत्येक इलेक्ट्रॉनला आधी स्पिन असलाच पाहिजे (असे तुम्हाला अध्याहृत असावे. नाहीतर पॉलीच्या तत्त्वाचा संबंध काय?).
मग असे म्हणा ना :
Ψ(क्ष) = अ
असे गणित करून भाकिते केली आणि प्रयोगांत तपासून तेच उत्तर मिळाले, तर 'क्ष'-इलेक्ट्रॉनला आधीच स्पिन असलाच पाहिजे. एकाऐवजी दोन "Ψ"अवयवांची बेरीज केली म्हणून काहीही तार्किक फरक पडत नाही. उलट बेरजेच्या गुंतागुंतीमुळे आकलन कठिण होते. पण आपल्या लगेच लक्षात येते की हे दुसरे विधानच "उपन्यास" म्हणून सिद्ध करायचे आहे.

अस्तित्वविधान न-करता "Ψ"-भाषेतल्या पॉली एक्स्क्लूजन गणितातून माझ्या प्रयोगात ५०% वेळा मीलन होणार नाही असे प्रॉबॅबलिस्टिक भाकित करता येते. वेळ दिल्यास चंचुपात्रात किंवा तार्‍यामध्ये जवळजवळ सर्व कणांचे मीलन होईल, असे प्रॉबॅबलिस्टिक भाकित करता येते. पॉलीचे गणित करायला एका-एका इलेक्ट्रॉनला न-मोजता स्पिन असतो, असे अस्तित्वविधान करायची गरज नाही. निगमनात्मक सिद्धता होत नाही. म्हणून प्रायोगिक सिद्धता हवी.

हम्म..

या उपन्यासासाठी ("फॉल्सिफायेबल") प्रमाण कुठले आहे?

माझ्या माहितीप्रमाणेतरी नाही. तुम्हाला सुचल्यास सांगा. :)
मी समूह आणि एक इलेक्ट्रॉन सारख्याच दृष्टीने वापरले होते कारण तर्काच्या वाटेने गेले तर दोन्हींमध्ये फरक नाही असे वाटते. यामुळे गोंधळ वाढला हे खरे.

Ψ(क्ष) = अ
असे गणित करून भाकिते केली आणि प्रयोगांत तपासून तेच उत्तर मिळाले, तर 'क्ष'-इलेक्ट्रॉनला आधीच स्पिन असलाच पाहिजे. एकाऐवजी दोन "Ψ"अवयवांची बेरीज केली म्हणून काहीही तार्किक फरक पडत नाही. उलट बेरजेच्या गुंतागुंतीमुळे आकलन कठिण होते. पण आपल्या लगेच लक्षात येते की हे दुसरे विधानच "उपन्यास" म्हणून सिद्ध करायचे आहे.

इथे जरा गंमत होते आहे. तुमचे म्हणणे मला पटते आहे पण त्याच वेळी माझ्या विधानात चूकही सापडत नाहिये. यावर अधिक विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की मला येणारी अडचण वेगळीच अहे. ती अशी.

जर मोजमाप केले नाही तर स्पिन वर किंवा खाली आहे याविषयी भाष्य करता येत नाही. पण असे असले तर असा इलेक्ट्रॉन प्रक्रियांमध्ये भाग कसा काय घेऊ शकतो? प्रक्रियांमध्ये भाग घेण्यासाठी त्याला वर किंवा खाली कुठलीतरी स्पिन असणे गरजेचे नाही का?

खरे सांगायचे तर माझ्या हायपोथेसिसमध्ये दम नसावा असे मानायला भरपूर पुरावा आहे. नाहीतर गेल्या ८०-९० वर्षात याचे उत्तर सापडले असतेच. यावर कोणकोणत्या बाजूंनी विचार करता येऊ शकतो हे बघण्यासाठी हा प्रपंच.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

बहुधा नसावे

(१) पण असे [स्पिन वर किंवा खाली आहे याविषयी भाष्य करता येत नाही] असले तर असा इलेक्ट्रॉन प्रक्रियांमध्ये भाग कसा काय घेऊ शकतो?

"कसा काय" प्रश्नाच्या उत्तराचा फॉरमॅट माहीत हवा. मला तरी असे वाटते, की हा प्रश्न नि:संदर्भ आहे.

प्रक्रियांमध्ये भाग घेण्यासाठी त्याला वर किंवा खाली कुठलीतरी स्पिन असणे गरजेचे नाही का?

येथे "गरज"ची टेस्टेबल व्याख्या केल्याशिवाय प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. माझ्या मते या शब्द येथे व्याख्या करण्याजोगा नाही, म्हणून प्रश्न नि:संदर्भ होतो.

- - -
"अमुक" असणे गरजेचे नाही का? अशा प्रकारचा प्रश्न काही बाबतीत विचारायचे तुम्ही खुद्द सोडून दिले आहे, त्याचे अधिक सामान्य/मान्य उदाहरण देतो.

खाली-वर-संकल्पना

अगदी सुरुवातीला आपल्याला संवेदनांमधून कळते की कुठलीतरी एक दिशा "वर" आहे, आणि कुठलीतरी एक दिशा "खाली" आहे. (कानाच्या आतमध्ये असे एक ज्ञानेंद्रिय आहे. खाली पडताना काही एक संवेदना होते, आणि सावरताना वेगळी संवेदना होते. शिवाय एखादे मोठे पिंड हाताच्या एका बाजूला असले तर स्पर्शेंद्रियाला "दबाव" जाणवतो, मात्र विरुद्ध दिशेने पिंड लोंबवले तर स्पर्शेंद्रियाला वेगळीच "ओढाताण" संवेदना जाणवते. शिवाय वेगवेगळ्या वस्तू मोकळ्या पडण्याचे निरीक्षण करता सर्वच वस्तू एकच मार्ग अनुसरतात ("वर"पासून "खाली") असे आपल्याला दिसते.आपल्याला असे म्हणावेसे वाटते, वस्तू पडतानाचे निरीक्षण झाले नाही, तरी माझ्या आजूबाजूच्या अवकाशात एक "वर" दिशा आहे, आणि एक "खाली" दिशा आहे. पुढे असे जाणवू लागते, की अनेक लोकांना ही दिशा सारखीच असली पाहिजे. रात्री एक जण म्हणतो "माझ्या डोक्याच्या ठीक वर तेजस्वी व्याध तारा आहे, तर शेजारी (चांगला दूरपर्यंतचा शेजारी) म्हणतो - "माझ्याही डोक्याच्या ठीक वर तेजस्वी व्याध तारा आहे." आपल्याला असे जाणवते की न-पडणार्‍या तार्‍यांसाठी जी "वर" संकल्पना वापरतो, आणि पडणार्‍या वस्तूच्या उलट्या दिशेला जी "वर" संकल्पना वापरतो, ती नेहमीच जुळते. पुन्हा आपण म्हणू लागतो - पिंड पडण्याचे निरीक्षण केले नाही, तरी "वर" अशी दिशा असतेच. जेथपर्यंत आपण मोजू शकतो, सर्व वर-खाली अशा ओढलेल्या रेषा (यूक्लिडच्या) भौमितिकदृष्ट्या समांतर असतात. मग प्रत्येक वेळा आपण "प्लंब"लाइन (शिस्याचा लोलक) पाडून वर-खाली निश्चित करत नाही, तर एक-दोनदाच लोलक वापरतो, बाकी सर्व उभ्या रेषा "समांतर" काढतो. रेषा वाटेल तितकी लांब काढतो, प्रयोगांत काही फरक पडत नाही. आपला विश्वास असतो, की आधी वर-खाली दिशा निश्चित केली, आणि मग लोलक सोडला, तर लोलक आधी "खाली" म्हणून ठरवली त्या दिशेला पडेल. मी खुद्द अशी क्रिया घरबांधणीत करताना बघितलेली आहे. स्वतः भिंतीवर चित्रे/फळ्या लावताना वापरलेली आहे. एका प्रकारची दृढ श्रद्धा आहे - वर-खाली दिशा आधीच असल्यामुळे पडण्याची प्रक्रिया होते. (समांतर : स्पिन असल्यामुळे रासायनिक प्रक्रिया होते.)

मात्र माध्यमिक शाळेतच कित्येक लोकांना कळते, की "वर-खाली" या रेषा समांतर नसतात. पृथ्वी साधारण गोलाकार असते, आणि "खाली" दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे जाते, "वर" दिशा ही वेगवेगळ्या अ-समांतर दिशांना जाते. यातील एक विशेष गंमत "अँटिपोड" बिंदूंच्या जोडीत दिसते. पृथ्वीच्या व्यासापेक्षा लांबच लांब अशी रेषा काढली, तर त्या रेषेवर जी दिशा एका ठिकाणी "वर" म्हटली जाते, तीच दिशा दुसर्‍या ठिकाणी "खाली" म्हटली जाते. आपण म्हणतो "या लांबलचक रेषेची उर्ध्व दिशा आणि अधो दिशा अशी कुठली नसतेच. फक्त परिस्थितिजन्य वर/खाली असे काही म्हणता येते. आणि म्हणायचे तरी कसे? एखादी निराधार वस्तू कुठल्या दिशेला पडते, तो प्रयोग करून."

मात्र अशा प्रकारे "पूर्ण रेषेचा ऊर्ध्व एकच नसणे" हे आपल्या लहानपणच्या अनुभवांच्या विपरीत असते. आजवरच्या प्रयोगात रेषा कितीका लांब असेना, "वर" ही दिशा एकदाच पूर्ण रेषेसाठी ठरवायची सवय असते. यातून कुठलेच भाकित तोवर चुकलेले नसते. "वर" संकल्पना परिस्थितिजन्य-निरीक्षणसिद्ध आहे, असे मानायला आपण तयार नसतो. तेव्हा पडणार्‍या कोड्याचे माझे वर्णन काल्पनिक नव्हे. लहान मुलांना विचारले तर "ऑस्ट्रेलियामध्ये लोक जमिनीकडे-डोके-आकाशाकडे-पाय चालतात की काय" असे कोडे ते आपल्याला सांगतात. किंवा गोल-पृथ्वीसुद्धा वराहाने किंवा आटलासने "खालून" उचलून धरली, या कल्पनेत त्यांना काहीच वैचित्र्य दिसत नाही. "पृथ्वीच्या खाली काय आहे?" याचे उत्तर कूर्म/क्षीरसागर असे दिल्यास त्यांना विचित्र वाटत नाही.

तुम्हाला मात्र मी जर प्रश्न विचारला "पृथ्वीच्या खाली काय आहे" तर बहुधा तुम्ही मला उत्तर द्याल "पृथ्वीच्या खाली ही संकल्पना निरर्थक आहे. या प्रश्नाचे कुठलेच उत्तर नाही." (समांतर : एका रेणूचे तापमान ही संकल्पना निरर्थक आहे. एका इलेक्ट्रॉनचा मोजण्यापूर्वीचा स्पिन ही संकल्पना निरर्थक आहे.)
मात्र "वर" हे सर्व ठिकाणसाठी एकच असते, अशी सवय झालेला म्हणतो "खाली-वर असे आधीपासून काहीच नसले, तर निराधार वस्तू पडताना दिसते ते कसे?" किंवा "निराधार वस्तू पडण्यासाठी दिशा निवडेल, ते खाली-वर बघूनच ना? मग पडण्यासाठी शाश्वत अशा खाली-वरची गरज नाही का?"

मात्र या संकल्पना त्यागल्याशिवाय गत्यंतर नसते. आपल्याला नीट आठवावे लागते, की आधी आपण "वस्तू पडतात" हे निरीक्षण केले, आणि मग "निरपेक्ष-खाली-वर"ची भूमिती बनवली. वस्तू पडण्यासाठी निरपेक्ष-खाली-वर संकल्पनांची काहीच गरज नसते.

आपण "खाली-वर" संकल्पना त्यागू शकतो, "आकाश=ईथर" संकल्पना त्यागू शकतो (ईथर-लहरी=प्रकाशलहरींचा प्रसार होण्यासाठी मुळातच ईथरची गरज नाही का? हा प्रश्न नि:संदर्भ म्हणून बाद करतो). तशाच प्रकारचा विचार-प्रयास या बाबतीतही तुम्ही करावा, असा एक मार्ग मला सुचतो.

रोचक अवांतर

रोचक अवांतर

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

शट अप & कॅल्क्युलेट

शट अप & कॅल्क्युलेट असे म्हणणारे मिळेपर्यंत हे चालेल.

किंवा ज्या दिवशी दीपक चोप्रा (अथॉरिटी ऑन क्वांटम (spirituality) थेरी) उपक्रमवर टंकतील त्या दिवसापर्यंत हे चालू शकेल.

(तरी अजून यांचे लक्ष Black होल, white होल वा worm होल याकडे गेलेले नाही म्हणून त्यांचे आभार मानायला हवेत. )

चू.भू. दे. घे.

निकाल

साठ वर्षे जुन्या वादाचा निकाल लागला आहे. त्यामुळे याचाही लागेल.

श्रद्धा - सबुरी :-)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर