मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .

मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .

भारतीय जनता मुळातच उत्सव प्रिय आहे. भारतात प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता हिंदू,मुस्लीम,बोद्ध,जैन धार्मिक उत्सव साजरे होत असतात.हे कमी की काय म्हणून गावोगावच्या यात्रा,उरूस, स्थानिक पातळीवर साजरा होत असतात .हे लक्षात घेवून शासनाने जिल्हाधिकारयाना हे उत्सव जनतेला साजरे करता यावेत म्हणून वर्षभरात तीन स्थानिक सुट्या देण्याचा अधिकार दिला आहे. वेळ प्रसंगी कर्ज काढून हे सण उत्सव साजरे केले जातात.

हे कमी होते की काय म्हणून भारत स्वातंत्र झाल्यावर शासनाने राष्ट्रीय सण म्हणून पंधरा ओगस्ट , सव्वीस जानेवारी , आपल्या मुन्नाभाई MBBS वाल्या बापूंचा वाढदिवस बापू मुळे सत्ता मिळाली या करता त्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ २ ऑक्टोबर (जागतिक अहिंसा दीवस दारू बंदी दीवस ) एक दीवस दारूबंदी ठेवून बाकी ३६४ दीवस दारूच्या नद्या वाहण्या साठीचे, सडलेल्या अन्नधान्या पासून दारू उत्पादनाचे स्वातंत्र्य नेत्यांना मिळवण्यासाठी साजरा केला जातो.
स्वातंत्र्याच्या सुरवातीला भारतीय जनता आपल्या उत्सवप्रिय स्वभावामुळे हे राष्ट्रीय सण ही मोठ्या उत्साहाने आनंदाने भल्या सकाळी उठून घरा समोर सडासमार्जन करून रांगोळ्या काढून, स्वागत कमानी, तसेच अभिमानाने घरा समोर तिरंगा झेंडा उभारून आनंदाने साजरा करीत होती . पण हा उत्साह फार वर्ष टिकला नाही. लालबहादूर शास्त्री पर्यंत हा उत्साह कसा बसा टिकून होता.
इंदिरा गांधींच्या काळात समाजकारणी राजकारण्याचे दीवस संपले आणि राजकारणात आयाराम-गयाराम करणाऱ्या मतलबी स्वार्थी नेत्यांचा उदय झाला. स्वार्था साठी साम,दाम,भेद आणि दंड याचा वापर कोणती ही लाज न बाळगता सरास सुरु झाला. या करता भ्रष्ट्र नोकरशाही आणि वेळ प्रसंगी गुन्हेगार गुंड लोकांची मदत घेणे राजकारण्यांनी सुरु केले. लाल किल्ल्यावर , विविध शासकीय कार्यालया वर तिरंगा झेंडा फडकवणारे आणि भ्रष्ट्राचार्या ना लाचखोराना जाहीरपणे चाबकाने फोडण्याची , जाहीरपणे फाशीची सजा देण्याची मागणी करणारे राजकारणी नेते रात्री मात्र यांच्या बरोबर दारूच्या बाटल्या फोडत रंगढंग उधळत होते. या मुळे शासन साधी अटक ही यांना करू शकत नव्हते. आणि हा भस्मासुर एक दिवस आपल्या सत्तेला आव्हान देईल याची यांना जरा सुद्धा शंका आली नाही.

गुंगी गुडिया म्हणून हिणवल्या गेलेल्या इंदिराजीं नी स्वार्था साठी उभ्या कॉंग्रेस मध्ये फूट पाडली स्वतः:च्या पक्षाचा राष्ट्रपतीचा उमेदवार पाडून व्ही व्ही गिरी या आपल्या ताटा खालच्या मांजराला निवडून आणले. येथून या पदाची प्रतिष्टा जी घसरत गेली ती ज्ञानी झैल सिंघ च्या काळात त्यास थेट रब्बर स्टंप चे रूप प्राप्त झाले. गरिबी हटाव चा नारा देत इंदिरा गांधीनी संस्थानिकांचे तनखे, अधिकार रद्द केले , त्याच बरोबर खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करून जुन्या कॉंग्रेस चा पूर्ण सफाया केला. या लोकप्रियतेच्या लाटावर स्वार झालेला त्यांचा रथ चोखुर उधळला गेला. तो आणीबाणी नंतरच झालेल्या निवडणुकीत आपटला. पण नंतर सत्तेत आलेल्या जनता दलाचे तारू दुहेरी निष्ठे च्या खडकावर आपटले आणि १९८० मध्ये इंदिरा गांधी परत निवडून आल्या. पण त्यांनीच अकाली दलास नेस्तनाबूत करण्यासाठी पंजाब मध्ये उभ्या केलेल्या भिंदरवाला नमक भस्मासुराने त्यांचा बळी घेतला. इंदिरा गांधीनी सत्ता राबवण्यासाठी जातिवाद, भाषा वाद, प्रांत वाद याचा सरास वापर केला यामुळे देशात प्रत्येक राज्यात हिदुस्थान-पाकीस्थान वादा सारखे वाद सुरु करून देवून देशात कायमची फुट पाडली.एव्हढेच नव्हे तर पक्षांतर्गत कोणी नेता आपल्याला आव्हान देवू नये या करता पक्ष कार्य्कार्त्यातच भांडणे लावली. याचा वाईट परिणाम देशाचे नेते आणि जनता यांच्यातील कधीही भरून न निघणारी दरी निर्माण झाली.

यानंतर सरकारे येत गेली जात गेली. तसे गुंड,माफिया, भ्रष्ट्र , एव्हढेच नव्हे तर वाल्या कोळीचा वाल्मिकी होवून रामायण लिहू शकतो तर UP , MP , बिहार चे डाकू दरवडेखोर जनतेचे नेते होवून लोकशाहीचे रक्षण का करू शकत नाही? असा सवाल करत सर्वच पक्षांनी यांच्या करता लाल गालिचे अंथरून त्यांचे स्वागत केले आणि खासदार आमदार केले. कायदे मुद्दामच लवचिक ठेवून यांना निवडणूक लढवण्यास सहकार्य केले. कॉंग्रेसला नेहरू घराण्या शिवाय तारोणोपाय नसल्या मुळे त्यांनी राजीव गांधी नंतर आपल्या निष्ठा सोनिया चरणी अर्पण केल्या. बंडखोर पवारांनी ही शरणगती पत्करत सोनिया चरणी सेवा अर्पण केली. त्यांनी मनमोहन यांच्या मुखवट्या खाली घराणे शाही राबवणे सुरु केले, याचा फायदा नुकसान झाले तर मनमोहन आणि मंत्री जबाबदार आणि फायदा गांधी नेहरू घराण्याचा.
अश्या तऱ्हेने भारतीय लोकशाहीचे रुपांतर भ्रष्ट्र नेत्यांची , नेत्यांच्या भ्रष्ट्राचारा साठीच फक्त जनते कडून निवडलेली राज्य पद्धती अशी झाली. यामुळे जनता सहाजिक राजकारण देश कारण यांच्या पासून दूर गेली . आणि राष्ट्रीय सण हे फक्त पांढरे कपडे घालणारे बेईमान राजकारणी आणि भ्रष्ट नोकरशाहीच वार्षिक श्राद्ध उरकावे त्या पद्धतीने उरकत असतात. आणि जनता रोटी कपडा मकान यातच परेशान असते. तीला आता लोकशाहीचे कोतूक राहिले नाही.मतदानाच्या वेळी सरळ मत विक्रीचे व्यवहार होतात, नेत्यांचा घोडेबाजार जोरात चालतो, ग्रामपंच्यायती चे जाहीर लिलाव होवून निवडणुका जो उमेदवार अधिक पैसे मोजेल त्या नेत्याला ग्रामपंच्यायत सरळ विकत दिली जाते आणि सरकार बोंब झाल्यावर चोकशी समिती नेमते . या समितीचा अहवाल येई पर्यंत संसद सुद्धा मेरा देश महान म्हणत या पद्धतीने लिलावाने विक्री केल्या जाईल . जय हो जय हो .
माझे ब्लोगेर्स मित्र Prakash Pimpale

उष-काल होता होता, काळरात्र झाली,अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...'

जिजाऊ.कॉम, १५ ऑगस्ट २०१०

आम्हाला बदलेला देश बघायचा आहे
या देशात स्वातंत्र्य आहे, हे एक नेहमीचंच नियमित वाक्य. शुभ्र कपड्यातील गुंडांनी ग्रासलेला हा देश खऱ्या स्वातंत्र्या साठी अजून ही विव्हळत आहे. लहानपणी वाटायचं जग बदलण अगदी सोप्प आहे; १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला शाळेत मिरवणूक निघायची आम्ही त्यात उत्साहाने सामील व्हायचो, उरामध्ये प्रचंड स्वाभिमान घेऊन आगदी बेंबीच्या देठा पासून "भारत माता कि जय" चे नारे द्यायचो. लहानपणी बऱ्याच खोड्या देखील करायचो पण मनामध्ये नेहमी एक भीती असायची की चूक केली तर शिक्षा होईल. शिक्षकांची, पालकांची, वडिलधाऱ्यांची एक भीती असायची, म्हणून वाटायच खऱ्या देशात देखील असंच सरकारला आणि न्यायाला भीत असतील लोक. पण जसा जसा मोठा होत गेलो तसं तसा खरा भारत दिसायला लागला. इथे लोक घाबरतात पण न्यायाला नाही तर जे लोक आपल्या खिशामध्ये न्याय घेऊन फिरतात त्यांना. दिवसा ढवळ्या या देशाला लुटणाऱ्या लुटारूंना, आणि या भारत मातेच्या अब्रूचे धिंडवडे उडवणाऱ्या सैतानांना. एखादा प्रमाणपत्र काढायचं झाल तर जिथे २ दिवस लागायचे तिथे ७ दिवस लागतात कारण काय तर कामाचा बोजा, आणि ५० रुपये पुढे केले तर २ दिवसाचे काम २ तासामध्ये होते. कारण काय तर READ MORE http://www.jijau.com/site/?q=node/46
--
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

वाक्याची फेररचना

इंदिराजीं नी स्वार्था साठी उभ्या कॉंग्रेस मध्ये फूट पाडली

माझ्या मते हे वाक्य, इंदिराजींनी स्वार्थासाठी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पाडली, असे हवे होते का?

बाकी चालू दे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

 
^ वर