ज्युलियाचे धर्मांतर आणि हिंदू...

ज्युलिया रॉबर्टस या इंग्रजी अभिनेत्रीने हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची बातमी नुकतीच टीव्हीवर वाचली. आपल्या इट, प्रे, लव्ह या चित्रपटासाठी भारतात आल्यावर हिंदुत्त्वाची ओळख झाल्याचे ज्युलियाने सांगितले आहे.
तर एकंदरच मला या निमित्ताने काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे कुणाला देता आली तर द्यावीत. कदाचित या प्रश्नांची उत्तरे आधीच बर्‍याच जणांना माहित असतील तर निदान ती मलादेखील कळू द्यावीत. मला पडलेले काही प्रश्न असे...

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का? किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या? सध्या काय आहेत?

२) भारतात असलेल्या उपक्रमींना "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? तुम्ही कशाची भक्ती करता?" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का? अशावेळी ते काय उत्तर देतात?

३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे? असे विचारले तर मी काय उत्तर देऊ? विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत? मला याबाबत काहीच कसे माहित नाही? का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली? :-)

४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा? भगवदगीता? मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का? ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे?

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय? अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत?

८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. त्यावर उपक्रमावर उल्लेखनीय अशी परिक्षणेही आली. तर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे " वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्विक विचारधारांमुळे हिंदू संस्कृतीत नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. येणारी प्रत्येक विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली" खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का? सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?

९)भारतात मराठी लोकांचे धर्माचार (हा शब्द अचू़क म्हणता येणार नाही ) वेगळे (त्यातले परत ब्राम्हण, मराठा आणि अजून इतर जातींचे वेगळे), गुजराती वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, उत्तर भारतीय वेगळे, बंगाली वेगळे, परत पूर्वोत्तर राज्यात अजून वेगळे असे आहेत. हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे? या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे?

१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?

सध्या तरी इतकेच प्रश्न सुचले आहेत. बाकीचे सुचतील तसे विचारीन.

बाकी, ज्युलियाच्या धर्मांतराबाबत तुमचे काय मत आहे? चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वीचा हा एक प्रसिद्धीस्टंट आहे असे वाटते का? की पुढच्या भविष्यात भारत सगळ्या जगाचे आध्यात्मिक (?) नेतृत्व करेल असा आशावाद, असे विचार अनेक जणांनी बोलून लिहून ठेवले आहेत त्याची ही सुरुवात आहे? ( किंवा ऍंजेलिना जोलीच्या मुलं दत्तक घेण्याला सुरुवात केल्यानंतर अशा दत्तक घेण्याला जे ग्लॅमर आले तसे याबाबतीत होण्याची शक्यता आहे का? हिंदू धर्मात प्रवेश करण्याचे प्रमाण यापुढे वाढेल? आणि त्यातून मग पूर्वेचे आध्यात्मिक ज्ञान आणि पश्चिमेची वैज्ञानिक प्रगती, भौतिक ज्ञान यांचा मेळ घालून हे जग अधिक सुंदर करण्याचा विचार कुणीतरी मांडला आहे ( बहुतेक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ) त्याची ही सुरुवात आहे?

-सौरभ.

Comments

थोडी अजून माहिती...

इस्लापूर्व काळात अरबांचे साडेतीनशे देव होते असे तर्कतीर्थांनी त्यांच्या विचारशिल्प या पुस्तकात दिले आहे. इतर माहिती म्हणजे अरबांच्या अनेक टोळ्या होत्या आणि प्रत्येक टोळीचा स्वतंत्र देव असे. मक्का शहर त्यांच्या टोळ्यांचे केंद्र झाले होते आणि त्यांच्या देवतांचेही केंद्रस्थान बनून राहिले होते. काबाचे मंदिर हे या साडेतीनशे देवांचे वसतिस्थान होते आणि महंमदाचे घराणे या मंदिराचे पुजारी होते. पुढे महंमदाला साक्षात्कार झाल्यावर मग अरब टोळीवाले महंमदाच्या नेतृत्वाखाली एक झाले आणि पुढच्या अल्प काळात बाकीचे देव विराम पावले.

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

काही उत्तरे

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का? किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या? सध्या काय आहेत

?

ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यास येणार्‍यांच्या मते हिंदू धर्म हा पायाविरहित (बेसलेस) धर्म आहे. अनेक देवांना पुजल्यामुळे त्यांना ईश्वर एकच असतो असे माहित नसते त्यामुळे ते माणसांत भेदभाव करतात. (हे सर्व पाश्चात्त्यांचे मत नसावे पण हे मी शेवटचे ऐकलेले मत आहे.)

२) भारतात असलेल्या उपक्रमींना "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? तुम्ही कशाची भक्ती करता?" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का? अशावेळी ते काय उत्तर देतात?

नाही. पण मला मग तुम्ही ख्रिसमस साजरा करत नाही? येशूची प्रार्थना करत नाही? चर्चमध्ये जात नाही? असे प्रश्न विचारलेले आहेत. बर्‍याच अमेरिकनांना हिंदू धर्म माहित नसावा किंवा जाणून घेण्याची आस्था नसावी. (पुन्हा हे माझे एक मत आहे. मी हिंदू देवळात येणारे [धर्मावर अभ्यास करणारे] अमेरिकन प्रोफेसर आणि विद्यार्थीही पाहिलेले आहेत.) हिंदू झालेले आणि नित्यनियमाने पूजापाठ करवून घेणारे एक आफ्रिकन अमेरिकन कुटुंबही पाहिलेले आहे.

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

नसावे. हिंदू धर्मात येण्याचा त्यांचा हेतू काय यावरून ते स्पष्ट होईल.

६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय? अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

मीना प्रभू नास्तिक आहेत हे आज कळले. असो. परंतु काही कट्टर मुसलमानांशी माझी चर्चा झाली होती. धर्मावर म्हणण्याचे धाडस नाही पण तत्सम चर्चा. त्यांनी मला सांगितले की "तुमच्या अशा विचारांनी डूम्स डेच्या दिवशी परमेश्वर तुमच्यासमोर उभा राहील आणि तुम्हाला योग्य ती शिक्षा करेल." ;-) जाऊ दे!

९)भारतात मराठी लोकांचे धर्माचार (हा शब्द अचू़क म्हणता येणार नाही ) वेगळे (त्यातले परत ब्राम्हण, मराठा आणि अजून इतर जातींचे वेगळे), गुजराती वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, उत्तर भारतीय वेगळे, बंगाली वेगळे, परत पूर्वोत्तर राज्यात अजून वेगळे असे आहेत. हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे? या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे?

कारण म्हणण्यासाठी सोयिस्कर असा हा एकच शब्द असावा. त्यांच्यात जोडणारे अनेक आचार विचार,सण, समारंभ आहेत.

१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?

असे मार्ग ख्रिश्चन आणि मुस्लिमांतही आहेत. चांगले वाईट ठरवता येत नाही.

हेच...

परंतु काही कट्टर मुसलमानांशी माझी चर्चा झाली होती. धर्मावर म्हणण्याचे धाडस नाही पण तत्सम चर्चा. त्यांनी मला सांगितले की "तुमच्या अशा विचारांनी डूम्स डेच्या दिवशी परमेश्वर तुमच्यासमोर उभा राहील आणि तुम्हाला योग्य ती शिक्षा करेल." ;-) जाऊ दे!

मीना प्रभू यांनाही असेच सांगण्यात आले होते. बहुतेकांनी हिंदूधर्माबाबतचे हे असे ऐकल्यावर डोळे मोठे केले, त्यांचा विश्वास बसला नाही. बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर पहिल्यांदाच असे काहीतरी ऐकल्यासारखा भाव होता आणि काहींनी तुमचे बोलणे ऐकायला गोड वाटते असेही सांगितले.

सविस्तर प्रतिसादासाठी आभार.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

बिनकट्टर मुसलमान

माझी बिनकट्टर मुसलमान मित्राशी चर्चा झालेली आहे. तो स्वतः कट्टर नास्तिक व साम्यवादी आहे. मुद्दा असा आहे की व्यक्तिगत नास्तिकता ही कुठच्यातरी ग्रंथात सांगितली आहे म्हणून नसते. ती व्यक्तीवरच्या संस्कारांनी, त्यांच्या विचारसरणीतून ठरते. एखादी व्यक्ती कर्मकांडं करते म्हणजे ती आस्तिक असं बिलकुल नाही.

मला वाटतं जर आस्तिकता व नास्तिकता या दोन टोकांना जोडणाऱ्या अक्षावर आपण लोकसंख्या वितरण काढलं तर ते हिंदू व मुस्लिम यांत फार वेगळं दिसणार नाही. अर्थात हा माझा कयास आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

परमेश्वर नव्हे हो; अल्ला !

>>>"तुमच्या अशा विचारांनी डूम्स डेच्या दिवशी परमेश्वर तुमच्यासमोर उभा राहील आणि तुम्हाला योग्य ती शिक्षा करेल." ;-) जाऊ दे!

- परमेश्वर नव्हे हो; अल्ला !
ही चूक केल्याबद्दल तर नक्कीच होणार तुम्हाला शिक्षा. आता बसा !!

अल्ला नाही :-)

मी मुसलमान नसल्याने अल्ला माझ्या भानगडीत पडणार नाही यावर त्यांची अढळ श्रद्धा असावी. ;-) त्यामुळे परमेश्वर (पक्षी: गॉड) असे म्हटले की सर्वधर्मसमभाव (पक्षी: गुळमुळीतेझम्) आला, त्यांच्यापक्षी. ;-)

गुळमुळीतेझम् ...

>>> मी मुसलमान नसल्याने अल्ला माझ्या भानगडीत पडणार नाही यावर त्यांची अढळ श्रद्धा असावी. ;-)

- हां. हे खरंय. शेवटी शिक्षाही धर्मनिहाय वेगळ्याच म्हणायच्या :) पण अल्लाने तुमच्याकडे दुर्लक्ष करणे, हीच तुम्हाला शिक्षा !

>>> त्यामुळे परमेश्वर (पक्षी: गॉड) असे म्हटले की सर्वधर्मसमभाव (पक्षी: गुळमुळीतेझम्) आला, त्यांच्यापक्षी. ;-)

- गुळमुळीतेझम् ! आवडला शब्द. :) . एखाद्या हिंदू राजाचंच नाव वाटलं मला हे (मुगल-ए-आझमच्या धर्तीवर) !!

- उडवलेले तिन्ही `पक्षी`ही आवडले :)

अभिप्राय

जात कोणती स्वीकारली??

....खर तर मला हि हा प्रश्न पडतो हि ह्या नव हिंदू ची जात कोणती? व कशाच्या आधारावर ठरवत असतील?....जर त्यांना जात नसेल तर मूळ धर्मियांना जात व नव धर्मीयांना नाही असा भेदभाव का?

हे काहिसे ओवररीऍक्शन वाटले!

ज्युलिया रॉबर्ट ह्या अभिनेत्रीला सुंदर का म्हणतात बुवा? तिचे ओठ अगदीच पसरलेले, पेचके आहेत. ती हसते तेव्हा मला ती व्यंगचित्रच वाटते.
एखाद्या व्यक्तीने, प्रसिद्ध व्यक्तीने आपला धर्म बदलला म्हणून त्या धर्माविशयी इतके प्रश्न पडावेत हे आश्चार्यजनक आहे.
मायकल जॅक्सन नेही इस्लाम धर्म स्विकारला होता. तेव्हा, 'यापूढे इस्लाम जगभर पसणार' अशा आशयाचे मत कुठे वाचले नव्हते.

ब्यूटी

ब्यूटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर.

सर्व जगाला ज्युलिया अशी दिसते.

आणि तुम्हाला अशी दिसते. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर

ज्युलिया रॉबर्ट्स सुंदर आहे असे मला वाटते. पण मला साईनफेल्डमधील एलेन बेनेस ही विश्वसुंदरी वाटते.

मात्र कुस्टांझा तिचे वर्णन करताना kind of short, big wall o'hair, face like a frying pan असे करतो...


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मला

मला निशिगंधा वाडला पाहिले की एलेन आठवते. अर्थात दोघींच्या अभिनयक्षमतेमध्ये अंदाजे ६५८९ किमिचे अंतर आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

दादा

मला सौरव गांगुलीला पाहिले की निशिगंधा वाड आठवते... (उलटसुलट कसेही)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

व्यंगचित्र सुंदर आहे!

अरे वा! खरचं ज्युलियाचे हे व्यंगचित्र सुंदर आहे!
व्यंगचित्रकाराने तिचे नाक, ओठ व दात छानच टिपले आहेत.

सुंदर ज्युलिया ~~

>>> ज्युलिया रॉबर्टस् ह्या अभिनेत्रीला सुंदर का म्हणतात बुवा? <<<

थोडेसे अवांतर पण एक गंमतीशीर योगायोग म्हणून श्री.रावले यांच्या प्रतिसादाला हे उत्तर :

वैशिष्ट्य म्हणजे "नॉटिंग हिल" या चित्रपटात ज्युलियाला हाच प्रश्न पडतो जो तिने "अँना स्कॉट"च्या मुखातून प्रकट केलाय. त्या पुस्तकविक्रेत्याच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर असते आणि साहजिकच तिच्या सौंदर्याची तारीफ होत असताना अगदी सहजगत्या ती म्हणून जाते, "त्याला जास्त महत्व देऊ नका, सौंदर्य म्हणाल तर माझ्या नाकावर व जिवणीवर झालेल्या यशस्वी ऑपरेशनची ती मेहरबानी आहे."

चारचौघासारखे साधेसुधे आयुष्य कंठायची इच्छा असलेल्या ज्युलियाला रात्रीच्यावेळी एका बागेत एक बाकडे दिसते. त्यावर कोरलेले आहे :

“For June who loved this Garden. From Joseph who always sat beside her.”

अँना प्रभावित होते "काही लोक किती सुंदररित्या आयुष्य व्यतीत करतात ~ एकत्र !"
ज्युलियालादेखील "हिंदू" धर्मात असेच सुंदर आयुष्य मिळेल असे म्हणू या.

फक्त

ज्युलिया फक्त सौंदर्यासाठी प्रसिद्ध नाही. सौंदर्याबरोबरच ती सशक्त अभिनय करू शकते हे तिने अनेकवेळा दाखवून दिले आहे. अन्यथा दिसायला सुंदर पण चेहेर्‍यावरची माशीही हलत नाही अशा नायिका आपल्याकडे आणि पलिकडे भरपूर आहेत.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अशा नायिका

>>> अन्यथा दिसायला सुंदर पण चेहेर्‍यावरची माशीही हलत नाही अशा नायिका आपल्याकडे आणि पलिकडे भरपूर आहेत. <<<

अशांना "निर्बुद्ध सौंदर्यवती" म्हटले जाते. उदा. पूनम धिल्लाँ. फक्त चकचकीत, गुळगुळीत टाईल.

हिंदू कोणाला म्हणावे?

हिंदू माणूस एकेश्वरवादी, अनेकदेवतावादी किंवा नास्तिक असू शकतो. त्याचा पुनर्जन्मावर विश्वास असू किंवा नसू शकतो. भूत-खेत, मंत्र-तंत्र, पूजा-आराधना, पाप-पुण्य यांच्यावर तो विश्वास ठेवेल किंवा नाही. स्वर्ग-नरक त्याने मानलेच पाहिजेत असे नाही. त्याची वेदांवर वा दुसर्‍या एखाद्या ग्रंथावर श्रद्धा असेल वा नसेल. मुंज आणि इतर पंधरा संस्कार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे असे नाही. त्याचे लग्न हिंदू पद्धतीने(लाजाहोम, सप्तपदी, कन्यादान) होण्याची आवश्यकता नाही, नोंदणी पद्धतीने झाले असले तरी चालेल. त्याने आत्मा मानलाच पाहिजे असे नाही, त्यामुळे श्राद्ध वगैरे भानगड नाही. तो गौतम बुद्धावर, येशू ख्रिस्तावर किंवा गुरु नानकादींवर श्रद्धा ठेवू शकतो. त्याने देवळात जाण्याची गरज नाही. फक्त तो मुसलमान, ख्रिश्चन, किंवा बौद्ध आदी नसला की झाले. मात्र त्याचे वडील हिंदू असले पाहिजेत, नसल्यास, त्याने विधिवत हिंदू धर्म स्वीकारलेला असला पाहिजे. अशा व्यक्तीला हिंदू समजावे.--वाचक्‍नवी

सुरेख प्रतिसाद...

एकुणात हिंदूंना अमके तमके केले पाहिजे, याच्यावर विश्वास असलाच पाहिजे असे काही नाही.

फक्त तो मुसलमान, ख्रिश्चन, किंवा बौद्ध आदी नसला की झाले.

खरेतर अशी एक नाही म्हणजे दुसरा आहे अशी व्याख्या करता येत नसली तरी हिंदू धर्माचा आवाका बघता ही देखील चालवून घेण्यास हरकत नसावी.

मात्र त्याचे वडील हिंदू असले पाहिजेत, नसल्यास, त्याने विधिवत हिंदू धर्म स्वीकारलेला असला पाहिजे. अशा व्यक्तीला हिंदू समजावे.

नवीन माहिती! रोचक आहे.

धन्यवाद.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

तर्कशास्त्र

लॉजिकशास्त्राप्रमाणे काळा रंग कशाला म्हणावे? जो पांढरा, तांबडा, निळा, पिवळा आदी नाही तो. तसेच हिंदू धर्माबाबत.
कुंकू लावणारी स्त्री हिंदू असतेच, बुरखा घालणारी नक्की मुसलमान, शेंडीधारी बहुतेक हिंदू, दाढीधारी बहुधा मुसलमान, पण नक्की शीख. नमाज पढणारा/री नक्की मुसलमान, अधूनमधून/ दर दोनचार वाक्यांनंतर अल्लाचे नाव घेणारे निश्चित मुसलमान, दर रविवारी नियमितपणे चर्चला जाणारा ख्रिश्चन. अन्यधर्मीयांना आपल्या कळपात ओढणारा हिंदू नसतो. ज्याला जात असते तो नक्की हिंदू, पण कधीकधी तो मुसलमान किंवा बौद्धही असू शकतो.
जी मंगळागौर, डोहाळजेवणे, हळदीकुंकू करते; ऋषिपंचमी, बैलपोळा, दिव्याची अमावास्या पाळते; जिला काकडआरती, धुपारती, ओवाळणे, नैवेद्य दाखवणे वगैरे माहीत असते ती स्त्री, आणि तिची मुलेबाळे नक्की हिंदू. हिंदू पुरुषाची मात्र अशी खास खूण नाही.--वाचक्नवी

माझी उत्तरे

माझ्या उत्तरात परदेश म्हणजे अमेरिकेचा संदर्भ आहे असे समजावे. पाश्चात्य म्हणजे अमेरिकन. जिथे इतर काही (परदेश) सुचला तर तसे नाव घेईन.

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? ... सध्या काय आहेत?

या प्रश्नाच्या संदर्भात मला हा लेख आठवला. पाश्चात्यांच्या संदर्भात, हिंदू धर्म म्हणल्यावर भारतीय वंश आणि संस्कृतीशी जास्त करून मिळता जुळता असतो असा अनुभव आहे आणि बघण्यातपण आहे. हिंदू म्हणजे अर्थातच अनेक देवांना मानणारा धर्म, गरीबी, अंधश्रद्धा वगैरे समजुती होत्या. कालानुरूप बदलत चालल्या आहेत. त्याचे प्रमुख कारण भारतीयच आहेत. आज अमेरिकेतील भारतीय समाज हा शिक्षणाला मानणारा आहे, सुशिक्षित आहे आणि श्रीमंतही आहे. त्याचे परीणाम होत आहेत. मग भारतीय स्वतःला हिंदू समजत असोत अथवा नसोत. भारतात अज्ञान, अंधश्रद्धा, वगैरे असले तरी हिंदू तत्वज्ञानाचा त्याच्याशी काही संबंध नाही असे वाटणारे पण भेटतात. न्यूजविक साप्ताहीकाच्या लिसा मिलर या स्तंभलेखीकेचा, "We Are All Hindus Now" हा लेख त्याबद्दल बरेच काही बोलून जातो. आपणसर्वच म्हणजे पिढ्यान् पिढ्या जन्माने हिंदू म्हणून (किमान) जन्माला आलेल्या हिंदूंच्या बरोबर एक बॅगेज असते, तसे ते यांना नसल्यामुळे ते स्वतंत्र विचार करून त्यातील चांगल्या-वाईटात नीरक्षीरविवेक वृत्तीने फरक करू शकतात.

२) भारतात असलेल्या उपक्रमींना "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? ... अशावेळी ते काय उत्तर देतात?

मला आजपर्यंत असा प्रश्न कोणी विचारलेला नाही. पण सण कसे साजरे करतात हे मात्र विचारले जाते. बर्‍याच जणांना (किमान आमच्या भागात) दिवाळी माहीत असते. दिवाळीच्या शुभेच्छा पण देतात आणि जेवायला बोलवावे अशी अपेक्षाही असते... ;) अनेक राजकीय आणि सामाजीक नेते हे वेगवेगळ्या हिंदू कार्यक्रमात सहभागी होतात.

३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही....का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली? :-)

इच्छा असली तर माहीती करून घेयची. हिंदू धर्माचे सहा भाग आपल्याला कोण सांगते? अगदी आपल्यापैकी कितींच्या आईवडीलांना पण ते माहीत असते? अर्थात ही माहीती दडून ठेवली आहे असे मला वाटत नाही. अगदी पुर्वीच्या काळात ब्राम्हणांनी स्वतःपुरती ठेवली असे म्हणले तरी आजच्या गुगलबुक्स च्या जमान्यात कुणाला हवे असल्यास हवी तितकी माहीती वाचता येऊ शकते. त्या व्यतिरिक्त मराठी आणि इतर भाषात खूप पुस्तके आहेत ते वेगळेच. धर्म म्हणल्यावर त्यातील प्रथा आणि सणवार याकडेच लक्ष जाते तत्वज्ञानाकडे नाही म्हणून असे होते इतकेच.

४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा? भगवदगीता? ...तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे?

तसे काहीच नाही आहे ना हिंदू धर्मात! गीता हा फारतर वन ऑफ दी धर्मग्रंथ म्हणता येईल. गीतेचे मूळ (तत्वज्ञान) हे उपनिषदांमधे आहे, त्यातही केवळ १३ श्लोकांच्या ईशोपनिषदात आहे असे म्हणले जाते. गीतेत जास्तकरून मानवी मन, आचरण, वृत्ती, सवयी आदींसंदर्भात निरीक्षणे आहेत आणि त्याचे परीणाम काय होतात/होऊ शकतात इतकेच सांगितले आहे. एकाच वेळेस सगळे एकाच पद्धतीतील (आदर्श) असू शकतात असा आशावाद नाही. प्रत्येकाने आहे त्यापेक्षा वरच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न करावा असे म्हणले आहे. त्यासाठी दरोज पूजा-अर्चा केल्याने वगैरे ते होईल असे म्हणलेले नाही...

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

परधर्मिय हिंदू धर्मात प्रवेश करतात, हिंदूत्वात नाही ;). त्यांच्या दृष्टीने हिंदू धर्म हा तत्वज्ञानाशी निगडीत आहे/असतो. असे काही माहीत आहेत. मध्यंतरी "The Complete Idiot's Guide to Hinduism" या पुस्तकाची लेखिका लिंडा जॉन्सन हीच्याशी भेट आणि बर्‍याच गप्पगोष्टी झाल्या होत्या. तसेच हरेकृष्ण हरेराम पंथात असलेल्या एका गोर्‍या दांपत्याशी पण बोलणे झाले होते. अनेक वर्षांपुर्वी डेव्हीड फ्रॉलींचे भाषण ऐकले होते. त्या व्यतिरीक्त काहींचे वाचलेले आहे... प्रत्येकाचे विचार थोडेफार वेगळे असले तरी त्यांना आकर्षण असते ते तत्वज्ञानाचे असते इतके कायम जाणवते. अनेक देव, रुढी वगैरे ते केवळ पार्ट ऑफ दी सिस्टीम समजतात, फिलॉसॉफीतला भाग नाही...

अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले....अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

चार्वाक नास्तिकवादाचा प्रतिनिधी होताच कदाचीत त्याने चालू देखील केला असेल. हिंदूत्ववादाच्या अंगाने विचार केला तर भारतभुमीत तयार झालेल्या अशा सर्व तत्वज्ञानांनाअ एकत्रीत हिंदू म्हणावे लागेल. कारण हिंदू हा शब्द आपण स्वतःला लावलेला नाही तर बाहेरच्यांनी आपल्याला संबोधिला आहे: त्या अर्थाने त्यात वैदीक, पुराणे, वेदांत, शैव, वैष्णव, बौद्ध, जैन, आणि अकाल अर्थात शिख सगळेच विचार येतात.

हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत?

कुठल्याही इतर संशोधनाच्या पद्धतीप्रमाणे पण अभ्यासता येईलः म्हणजे चांगला का वाईट, आदर्श का निरूपयोगी वगैरेच्या फंदात न पडता दोन्ही बाजूने अभ्यासून मग त्यात असे काय आहे म्हणून अजून टिकून आहे यावर स्वतःचा विचार केला तर स्वतःपुरती काही उत्तरे मिळू शकतील असे वाटते. कोणती पुस्तके वाचण्यासारखी आहेत हा अवघड प्रश्न आहे कारण नक्की काय वाचायचे आहे त्यावर हे अवलंबून आहे...

८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. ....सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?

काळाच्या मोठ्या स्पॅनचा विचार केल्यास हिंदू धर्म सर्वसमावेषक आहे असे म्हणता येईल. म्हणूनच तो टिकूनही आहे. कोणीतरी वर पैंगबराला अकरावा अवतार म्हणतील असे म्हणले आहे. तशी भिती पोप जॉन पॉल यांना त्यांच्या पहील्या भारतभेटीत वाटली होती असे ऐकले आहे. त्यामुळे त्यांनी "hinduize christianity" असे काहीसे म्हणले होते असे ऐकून आहे. परीणामी जिथे कॅथलीक चर्चने लक्ष ठेवले तेथे चर्च, तिथली पद्धती ही काही अंशी हिंदू रुढींशी मिळती जुळती झाली. सध्याच्या काळात (छोटा स्पॅन) असे वाटू शकते की हिंदू धर्म देखील कोता झाला आहे, होत आहे. तशा अनेक घटना देखील दाखवता येतील. पण तो एक प्रतिक्रीयात्मक सामाजीक भाग आहे. काळाच्या ओघात रहाणार नाही असेच वाटते...

...हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे? या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे?

सगळ्यांना जोडणारी संस्कृती आहे असेच म्हणावे लागेल. नशिबाने बॉलीवूड नाही! नाहीतर आमच्या घरात पण वटसावित्री लक्षात नाही ते नाही, पण कडवा चौथ चालू होयचा ;)

भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?

more the merrier! मात्र जातीभेद पूर्ण जायला हवा, मनातून आणि आचरणातून इतके नक्की म्हणेन. बाकी एकाच पद्धतीत सगळ्यांना बांधता येणे थोडेच शक्य आहे. तसे असते तर आत्तापर्यंत एकच मराठी संकेतस्थळच सगळ्यांना पुरले नसते का? ;)

बाकी, ज्युलियाच्या धर्मांतराबाबत तुमचे काय मत आहे?

बर्‍याचदा इथल्या ऑफिसांमधे सेक्रेटरीजच्या टेबलवर एक वाक्य लावलेले असते, ते थोडेसे बदलून म्हणतो: everyone brings joy to hinduism, some by joining others by leaving! ज्यांना येयचे आहे त्यांना येउंद्यात. जायचे आहे त्यांना अडवायचा प्रश्न नाही. मात्र कुठल्याही बाजूने कुणालाच कमीजास्त करत बाटवणे होऊ नये इतके नक्कीच वाटते.

उपप्रतिसाद

+ प्रत्येक प्रश्नाचा (वा शंकेचा) मुद्देसूद खुलासा. फार प्रभावी प्रतिसाद आहे हा, विकास जी.

१. "दिवाळी" ~~ मला वाटते आपल्या धर्मातील हा एकमेव सण असावा की जो सर्वधर्मियांना माहित आहे. तुम्ही ज्या देशात आहात तेथील (ख्रिश्चन) बंधू तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देत असतात. पण इथे खुद्द दिल्लीत माझे कित्येक मुस्लिम मित्र व त्यांच्या घरातील ज्येष्ठ मला व माझ्या केरळ मित्रांना आवर्जुन दिवाळीच्या शुभेच्छा देतात. माझ्या बहिणीने दिलेला दिवाळीचा फराळ आनंदाने स्वीकारतात, इतकेच नाही तर एका मुस्लिम कुटुंबातील स्त्रीने (व तिच्या मुलीने) मराठी लोकांच्यात असलेली फराळातील "पुडाची वडी" कशी करतात ती प्रक्रिया समजावून घेतली. अर्थात ही बाब नेमाने आलीच की, आम्हीही त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो व त्यांच्याकडे भोजनालाही जातो.

२. धर्म म्हणल्यावर त्यातील प्रथा आणि सणवार याकडेच लक्ष जाते तत्वज्ञानाकडे नाही म्हणून असे होते इतकेच.
होय. धर्म समजावून घेणार्‍या बर्‍याच इच्छुकांची खरी गोची इथे होते. प्रथा आणि सण तसेच धर्माच्या विविध पोटशाखा यांची माहिती म्हणजे धर्माची शिकवण होऊ शकत नाही. त्यासाठी त्याचे तत्वज्ञान माहिती करून घेणे (जी काहीसी जिकीरीची वाटते) गरजेचे आहे. समुद्र आहे ज्ञानाचा, खरेतर धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे. सखोल वाचनासाठी वेळ आणि सहनशीलता हवी.

आत्तापर्यंत एकच मराठी संकेतस्थळच सगळ्यांना पुरले नसते का? ;)

~~ हा दाखला बिनतोड आहे.

कुठल्याही बाजूने कुणालाच कमीजास्त करत बाटवणे होऊ नये इतके नक्कीच वाटते.

सुदैवाने म्हणा किंवा आपली वेदिक संस्कृतीची शिकवण म्हणा "हिंदू" आपणहून कधी कुणाला बाटवायला गेलेले नाहीत. ख्रिश्चनांनी संपत्तीच्या जोरावर तर इस्लामने तरवारीच्या बळावर हा प्रकार केला होता; पण तो काळही वेगळा होता. आजच्या जमान्यात "मास कन्व्हर्शन" ही कल्पना आता राहिली नसून ज्युलियासारखी फुटकळ उदाहरणे येत राहतात/जात राहतात. त्यामुळे धर्म वाढला किंवा त्याची क्षिती झाली हा विचार आता दुय्यम मानला पाहिजे.

धन्यवाद...

आत्तापर्यंत एकच मराठी संकेतस्थळच सगळ्यांना पुरले नसते का? ;)

~~ हा दाखला बिनतोड आहे.

असेच म्हणतो :-)

बाकी सविस्तर प्रतिसादासाठी विकास यांचे आभार.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

विकास जी

हिंदू कुणाला म्हणावे वा म्हणू नये हे सांगणे फार अवघड आहे, पण ज्या व्यक्तीच्या नावामागे मा. आणि नावानंतर `जी' लावतात तिला शंभरटक्के अमराठी म्हणावे.--वाचक्नवी

मराठीच

पण ज्या व्यक्तीच्या नावामागे मा. आणि नावानंतर `जी' लावतात तिला शंभरटक्के अमराठी म्हणावे.

अगदी मान्य! मी मराठीच आहे आणि माझ्या नावाच्या मागे मी जी लावत नाही. अथवा "राव, जी, साहेब" असे एकत्र पण लावत नाही. ;) वास्तवीक,विशेष करून अमेरिकेत राहील्यावर नावाच्या मागे संबोधनाच्या वेळेस काहीच लावायचे नाही असे आवडते. पण लिहीताना आदरार्थी बहुवचन येते. इथले हिंदी भाषिकच नाही पण इतर प्रांतिय पण (परत मराठी सोडून) "जी" लावतात हे पाहीले आहे.

माननीय आणि जी

>>> पण लिहीताना आदरार्थी बहुवचन येते <<<

शि़क्षण-नोकरी-व्यवसायानिमित्ताने आता मी जरी बाहेर असलो तरी पदवीपर्यंत एका मोठ्या अशा "एकत्र" कुटुंबात मी वाढलो व घरात/सोप्यावर अन्य नोकरलोकांच्याबरोबरीनेच कामानिमित्त येणार्‍या बाहेरच्या लोकांचा राबता चांगलाच होता. अशा व्यक्ती आमच्यातील ज्येष्ठ आणि अनोळखी लोकांना "जी" हे सफिक्स लावूनच बोलवायचे. तर लिखापढाईत सुरुवातीचे "सल्युटेशन" माननीय अशा कार्यालयीन प्रघातीनुसार होत असे. कदाचित ती सवय माझ्यात नकळत उतरली असेल. मात्र ज्यांना मी असे संबोधून लिहिले त्यांनी आवर्जुन खरड पाठवून अगदी "एकेरी" पद्धतीने इथे व्यवहार करावा असे आपुलकीने सुचविले आहे.

इथून पुढे सदस्यांचा "कॅज्युअल" रितीनुसार उल्लेख करत जाईन.

हॅ हॅ हॅ

तसे असते तर आत्तापर्यंत एकच मराठी संकेतस्थळच सगळ्यांना पुरले नसते का? ;)

प्रतिसाद ऑफ द डे. मात्र या विषयाची व्याप्ती हिंदू धर्मापेक्षाही मोठी आहे. ;)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

प्रश्न - काही अनुभवकथनाचा प्रयत्न

आधी प्रश्नांचा प्रचंड आवाका बघून टंकणारी बोटे थिजली. मग कित्येक महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ न समजल्यामुळे उत्तरे देता येणार नाही, हे कळून चुकले. पैकी काही प्रश्न थेट आहेत. अनुभवात त्याची उत्तरे असल्यास द्यायचा प्रयत्न करतो.

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का? किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या? सध्या काय आहेत?

(उत्तरे संयुक्त राज्ये अमेरिकेबद्दल आहेत.) बहुतेक लोकांना काहीएक कल्पना नाही. आपल्या गावाबाहेर काय चालू आहे त्याबद्दल अनास्था आहे, अमेरिकेबाहेर काय चालू आहे, त्याबद्दल घोर अज्ञान. त्यांच्यापैकी बहुतेकांचा धर्म ख्रिस्ती आहे. चुकून ख्रिस्त अमेरिकेत जन्मला नाही, बायबलमध्ये जितपत बेथलहम/जेरुसलेमची वर्णने आहेत तितपत त्यांना ठाऊक असतात. पण बहुतेकांबद्दल बहुधा प्रश्न नाहीच आहे. (बहुतेक मराठी लोकांना आसामबद्दल काय माहिती आहे? नाव ऐकण्यावेगळी काहीच माहिती नाही.) प्रश्न असा असावा : ज्या पाश्चात्य लोकांना हिंदूंबद्दल आस्था आहे, त्यांना कितपत माहिती आहे? आस्था असलेल्य लोकांना कमीअधिक खूप माहिती असते. त्यातही माहिती मिळवण्यातले पूर्वग्रह येतातच. ख्रिस्ती धर्मप्रसाराबद्दल आस्था असलेल्यांना "दुष्ट मूर्तिपूजक पंथ" असे अनेक तपशील माहिती असतात. पुष्कळ लोक "योगा"मार्फत चित्रविचित्र हिंदू देवांकडे आकर्षित होतात. पुष्कळ देव असतात, अशी कल्पना असते. हिंदू धर्मात "योग", "मेडिटेशन" वगैरेंना महत्त्व असते, अशी काही कल्पना असते. काही लोक वेदांताचा चांगला खोलवर अभ्यास करतात. हिंदू सणासुदींबद्दल फारशी माहिती कोणाला नसते. मात्र हिंदूंमध्ये "अरेंज मॅरेज" असते, याबद्दल पुष्कळ लोकांचे कुतूहल असते. (मी ओळखतो किंवा भेटलो आहे, अशा डझनावारी लोकांच्या विसंवादी कल्पना वर नमूद केलेल्या आहेत.)

२) "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? तुम्ही कशाची भक्ती करता?" ... परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का? अशावेळी ते काय उत्तर देतात?

होय क्वचित कोणीतरी धर्माबद्दल विचारते. वेळ असला तर "संस्कृती आणि कर्मकांड-श्रद्धा" यांच्यातला फरक समजावून सांगतो. नातेवाइकांबरोबर आनंदाने ज्या सणा-रिवाजांमध्ये भाग घेतो, ते हिंदू सण आहेत, या नात्याने "हिंदू" म्हणून सांगतो. मात्र "कशाची भक्ती करता" बाबतीत उत्तर देतो - "या प्रश्नाचे वैयक्तिक उत्तर बहुसंख्य हिंदूसारखे नाही. मी कसलीच भक्ती करत नाही. बहुसंख्य हिंदू मात्र वेगवेगळ्या आराध्यदैवतांची भक्ती करतात." जर प्रश्नकर्त्याच्या व्याख्येने यामुळे माझ्या धर्माबद्दल संदेह उत्पन्न होत असेल, तर ती त्यांची जोखीम.

३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे? असे विचारले तर मी काय उत्तर देऊ? विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत? मला याबाबत काहीच कसे माहित नाही? का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली? :-)

:-) मुळात "हिंदू धर्मा"बद्दल कोणी नवीनच, आधी न-ऐकलेला प्रश्न विचारला तर कोण काय विचारते आहे, हेच कळत नाही. मात्र जुन्या प्रश्नांबाबत उत्तरे पाठ असल्यामुळे माहीत आहेत. उदाहरणार्थ दिवाळी हा सण "हिंदू" सण आहे, असे मला माहीत आहे. शंकर-राम-कृष्ण-गणपती-दुर्गा यांची देवळे "हिंदू" देवळे आहेत, हे मला माहीत आहे. तुम्ही सांगितलेली वेगवेगळी दर्शने (दर्शन = फिलॉसॉफी) "सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त" ही एकमेकांची खंडने करणारी दर्शने आहेत. ही साही दर्शने कोणाला समसमान पटणे शक्यच नाही. कुठले एक पटले, तर अन्य दर्शनांचा त्याग आपोआप होतो. बहुतेक दर्शनांबद्दल अध्ययन करताना त्या दर्शनांत एकमेकांची केलेली खंडने अभ्यासावी लागतात. हल्ली सर्वात बहुसंख्य असलेली आराध्य-देव-पूजा-भक्ती विचारसरणी वरील सहा दर्शनांपैकी कुठल्याही दर्शनाशी तात्त्विक पाया साधत नाही.

४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा? भगवदगीता? मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का? ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे?

हिंदूंचे धर्मग्रंथ म्हणजे श्रुती, स्मृती आणि महाकाव्ये. कर्मकांडांबद्दल "हे केले पाहिजे, ते केले पाहिजे" बद्दल माहिती स्मृतिग्रंथांमध्ये सापडते. भगवद्गीता हीस प्रमुख धर्मग्रंथ करण्याचा वाटा शंकराचार्यांचा. त्या आधीही महाभारतातील हा खंड हळूहळू महत्त्व प्राप्त करत होता. पण त्यांनी "प्रस्थानत्रयी"मध्ये, (१) भगवद्गीता, (२) उपनिषदे, व (३) ब्रह्मसूत्रे यांच्यावर व्याख्या केली.
हिंदू धर्मात काय करावे त्याबद्दल काळानुसार ग्रंथ आहेत. स्मृतींबाबत सांगितलेच आहे - त्या १५००-२००० वर्षे किंवा अधिक प्राचीन. हेमाडपंतांनी १००० वर्षांपूर्वीच्या "आवश्यक" कर्मकांडाचे वर्नन केलेले आहे. तितकी कर्मकांडे तेव्हा तरी दिवसाभरात होऊ शकत असतील काय? याबद्दल शंका वाटते. माझ्या पणजोबांच्या काळापर्यंत ब्राह्मणांमध्ये रोज स्नान-संध्या करणे आवश्यक होते, आणि जानवे घालणे आवश्यक होते. मात्र आता नाही. बाकीच्या जातींच्या दैनंदिन कर्मकांडांतही काळानुसार फरक झाला असणार.

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

बहुधा गोंधळ होत नसावा. कुठल्याशा गुरूचे बोट धरूनच आगंतुक प्रवेश करत असावे. तो एकच पंथ ते जाणत असावे.

६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय? अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

कोणास ठाऊक.

७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत?

निरीक्षण. व्याख्या नीट केल्या पाहिजेत.

८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. ... खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का? सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?

माहीत नाही.

९) (प्रादेशिक कर्मकांडे किती वेगळी, किती समान)

काही फरक आणि काही साम्ये असावी.

१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?

बहुधा इतर समुदायांइतकेच पंथ असावेत. चांगले-वाईट वगैरे माहीत नाही. बहुधा मानवी सीमा असावी. आपल्या १००-१००० लोकांचे ऐकणारा खास देव, संत वगैरे आहे, असे म्हणण्यात अधिक दिलासा मिळत असावा. या आकड्याची कुठलीतरी "कम्फर्टेबल" सीमा असावी.

ह्म...

आधी प्रश्नांचा प्रचंड आवाका बघून टंकणारी बोटे थिजली.

सॉरी. प्रश्न बरेच दिवसांचे साचलेले होते. :-)

मग कित्येक महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ न समजल्यामुळे उत्तरे देता येणार नाही, हे कळून चुकले.

म्हणजे काय? प्रश्नांमधले शब्द समजले नाहीत का? की प्रश्न पुरेसे स्पष्ट नव्हते?

दर्शने काय आहेत हे चांगले समजले शिवाय हिंदूंच्या धर्मग्रंथाबद्दलची माहिती दिल्याबद्दलही आभार.

==================

+

न-समजलेले शब्द

१. धर्म
२. पाश्चात्त्य (पण याचा अर्थ लावून घेतला तो पटण्यासारखा असावा)
३. "मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही."
यात "तुम्ही स्वतःच्या कुठल्या-कुठल्या वर्तनाला हिंदू म्हणता?" या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बहुधा माहिती आहे. म्हणजे "मी पक्ष्याचे प्रकाशचित्र टिपताना कॅमेरा-फोकस काळजीपूर्वक तपासतो, ते हिंदू म्हणून वैशिष्ट्य मला जाणवते (असे बहुधा नसावे)", किंवा "मी गणेशचतुर्थीला आवर्जून घरी मूर्तीची स्थापना करतो, ते हिंदू म्हणून माझे स्वतःचे वैशिष्ट्य मला जाणवते (ही एक शक्यता आहे, खरी यादी तुम्हीच बनवू शकता)". हे सर्व स्मृतीमधून तुम्ही सहज आजमावू शकता. तटस्थ अभ्यासक कसा अभ्यासेल? स्वतःला आत्मविश्वासाने हिंदू म्हणवणार्‍यांना असेच प्रश्न विचारून त्यांचे ग्रथन करेल. तुम्हीसुद्धा करू शकता. मात्र तुम्ही म्हणता की तुम्हाला माहीत नसलेली कुठली बाब हिंदू धर्माबाबत कळीची आहे ("काडीचीही माहिती नाही" म्हणजे ही सगळी स्व-माहिती काडीची माहिती नाही.) त्यामुळे "हिंदू धर्माबद्दल माहिती" हे शब्द मला कठिण गेले. "स्व-माहिती" क;पदार्थ अशी कुठली बरे माहिती असू शकेल?

४. कुराण किंवा बायबलच्या तोडीचा ग्रंथ : वर कोणीतरी सांगितलेच आहे, की कुराण+हदिस+धर्मगुरूंचे लेखन असे मुसलमानांचे धर्मग्रंथ आहेत. बायबलसुद्धा अनेक ग्रंथांचे संकलन आहे. मात्र बायबलमधिल वेगवेगळे ग्रंथ एकत्र बाइंडिंगमध्ये विकायची प्रथा आहे.
अशा सर्व हिंदू ग्रंथांची नावे हवी काय?

बायबलमधील काही भाग आणि कुराणातील काही भाग त्या त्या धर्मातले भाविक अपौरुषेय मानतात. "अपौरुषेय"मध्ये काही हिंदूंच्या मते "वेदातील मंत्र" हा इतकाच भाग येतो.

काही लोक बौद्ध, जैन, शिखांना "हिंदू" मानतात. यांचे पवित्र ग्रंथ वेगळे. हे ग्रंथ + श्रुति-स्मृति-पुराणग्रंथ असे एकत्र मानणारा व्यक्ती क्वचितच सापडेल. (म्हणजे शिख व्यक्ती "ग्रंथसाहिब" धर्मग्रंथ मानेल, पण वेदांना, महाभारताला कल्पनारम्य सांस्कृतिक कथा मानेल.) त्रिपिटके शिरोधार्य मानणारा बौद्ध व्यक्ती वेदांना धर्मग्रंथ मानणार नाही. मात्र काही पंथ वेदांना धर्मग्रंथ म्हणून स्थिर ठेवून बाकी ग्रंथांत फेरफार करेल. जसे कोणी वैष्णव असेल तर विष्णूला दूषण देणारी शैव-"उपनिषदे" आणि शैव पुराणे ही कदापि धर्मग्रंथ म्हणून मानणार नाही. शैव लोक व्हाइसे व्हेर्सा. मात्र शैव आणि वैष्ण्नव दोघे मोठ्याने म्हणतील की "वेद आम्हाला मान्य". भले वेदांमध्ये विष्णू नावाचा कोणी बारीकसारीकच आहे, आणि जटा-सर्पधारी शंकर तर कोणी नाहीच.

अशा प्रकारचे "मिक्स-अँड-मॅच" धर्मग्रंथ ख्रिस्ती धर्मात सुद्धा दिसतात. "मॉर्मन" म्हणून पंथ आहे, त्यांना एक धर्मग्रंथ १००-१५० वर्षांपूर्वी मवीन मिळाला. कॅथोलिक चर्चाने "ऍपोक्रिफल गॉस्पेल्स्" असे कित्येक धर्मग्रंथ उपलब्ध असून अमान्य केलेले आहेत. वगैरे.

म्हणजे "धर्मग्रंथ" या प्रश्नासाठी कुठल्या प्रकारचे उत्तर योग्य आहे, ते कळणे कठिण आहे.

५. मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले
"नास्तिक" म्हणजे वेदांना न-मानणारे. म्हणजे प्रामुख्याने बौद्ध-जैन-लोकायितिक.
आता बरीचशी दर्शने ज्या प्रकारे विश्वाचे वर्णन करतात, त्यात हात-पाय-दाढी असलेल्या देवाला, किंवा सामान्य अर्थाने प्रार्थना करण्यालायक कुठल्याही देवाला कुठलेच स्थान नाही. त्याला वेदांमधल्यासारखा "देव" म्हणता येत नाही, असे त्या प्राचीन काळीच अनेक लोकांना वाटे. म्हणून ते एकमेकांना "नास्तिक" म्हणून हिणावत. मात्र बौद्ध-जैन-लोकायितिक सोडले, तर स्वतःला "नास्तिक" म्हणवून घेणारे कोणी (प्राचीन काळात भारतात) आहेत असे मला माहीत नव्हते. आता यापैकी कुठल्याही दर्शनातला "ब्रह्म" किंवा "प्रकृति-पुरुष" किंवा "अणू" मानून, किंवा बाकी सगळा वेद सोडून एक "नासदीय सूक्त"तितके मानून अज्ञेयवाद मानणारे लोक आजकाल असू शकतात. मात्र यांना "शाखा" म्हणावे काय? वगैरे प्रश्न मोठेच जटिल आहेत. किंवा आजकाल जैनंना "नास्तिक हिंदू" म्हणावे काय? (पण मीना प्रभू जैन नाहीत.) लोकायितिक असे आजकाल कोणीच नाही. लोकायितिकांचा पूर्ण ग्रंथ असा कुठला आज उपलब्ध नाही. म्हणजे ती "शाखा" मीना प्रभूंची असेल, असे वाटत नाही. "शाखा" शब्दच समजलेला नाही.

हिंदू धर्माचे स्वरुप
"स्वरूप" म्हणजे काय? दुसर्‍या कुठल्या वस्तूचे "स्वरूप" आपणा दोघांना समजले असेल, त्याचे असल्याचे उदाहरण दिले, तर प्रश्न कदाचित समजू शकेल. अनुमानधपक्याने मी स्व+रूप असा विग्रह केला. आणि "स्वतःचे + स्वतःला हिंदू म्हणवून घेणार्‍यांचे निरीक्षण केले पाहिजे" असे उत्तर दिले. मात्र "स्वरूप" शब्दाबद्दल गैरसमज असेल, तर माझे उत्तर गैरलागू आहे.

सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?
इथे "सर्व सामावून" हा शब्दप्रयोग भलताच कठिण आहे, हे तुम्हालाच उमगलेले आहे. "सर्व सामावून" साठी "विश्व" (इंग्रजी शब्द "युनिव्हर्स") उपलब्ध आहे. हा "हिंदू"साठी प्रतिशब्द आहे का? नसेल तर "सर्व सामावून"चा अर्थ काही वेगळा आहे. जर हिंदू=विश्व असा प्रतिशब्द असेल, तर जूलिया रॉबर्ट्स्, पोप बेनेडिक्ट, ओसामा बिन लादिन... कोण वाटेल ते नाव घ्या - सर्व विश्वात (युनिव्हर्समध्ये) आहेत म्हणजे हिंदू आहेत. पण जूलिया रॉबर्ट्स आधी हिंदू नव्हती, आता कदाचित हिंदू आहे, असा तुमच्या लेखाचा प्रसंग आहे. म्हणजे पुन्हा "हिंदू"="विश्व" असा "सर्व-समावेशक"चा अर्थ तुम्हाला अध्याहृत नसावा.
आता मुदलात "सर्व समावेशक" शब्दाचा अर्थच कळला नाही, तर त्यावर "चांगले की वाईट" व्याज कुठून आणणार :-)

(प्रश्न ९ आणि १० त्या मानाने स्पष्ट आहेत. वेगवेगळ्या प्रदेशांत स्वतःला हिंदू म्हणवणार्‍यांची व्यवच्छेदक लक्षणे काय? हा प्रश्न निरीक्षणाने आवाक्यात येण्यासारखा आहे. जर व्यवच्छेदक लक्षणात "कुठली-ना-कुठली जात आहे" असे लक्षण येत असेल, तर दहावा प्रश्नही स्पष्ट आहे. थोडासा अंतर्गत-विरोधी किंवा सर्क्युलर-डेफिनिशनचा आहे - पण खूप नाही. अंतर्गत विरोधी कसा? जर स्वतःला हिंदू म्हणवून घेणार्‍यांपैकी काही लोक म्हणाले "आम्हाला जात नाही, किंवा माहीत नाही", तर ते व्यवच्छेदक लक्षण होऊ शकत नाही. आणि व्यवच्छेदक लक्षण नसेल तर "जूलियाची जात काय" असा प्रश्न अनाठायी होतो. पण प्रश्न तर्कशुद्ध करून घेता येतो. सन १९०० पूर्वीच्या सर्व स्व-घोषित हिंदूंची आणि त्या काळातल्या स्वघोषित हिंदूच्या सर्व स्वघोषित हिंदू अपत्यांची जात सांगता येते. म्हणून "जात" हे व्यवच्छेदक लक्षण मानावे... वगैरे.)

अरे बापरे!

इतक्या बारकाईने वाचले जाणारे लेखन त्याच्या दसपटीने बारकाईने लिहिले पाहिजे हे मात्र चांगलेच लक्षात आले आहे. आभार! :-)

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

रोचक विषय

स्मृतिचित्रांची धुंदी उतरली नसली तरी ह्या रोचक चर्चेत माझे चार पैसे:

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का? किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या? सध्या काय आहेत?

उत्तर श्री. धनंजय यांच्यासारखेच. त्यातही हिंदु धर्म आणि अरेंज्ड मॅरेज हा प्रचंडच जास्त कुतुहलाचा विषय आहे. आणि हा मला अमेरिकेत अनुभव डझनभरवेळी आलाच मात्र त्याच बरोबर अन्य प्रगत परदेशात येतो असा अनेकांचा अनुभव आहे. (नुकतंच मंगला गोगटे यांचे 'वेलकम टू फिनलंड' पुस्तक वाचलं. त्यातही जवळ जवळ तीन प्रकरणात लेखिकेला फिनिश लोकांनी (प्रसंगी कोंडाळं करून) ह्यासंबंधित प्रश्न विचारल्याचे दिसते)

२) भारतात असलेल्या उपक्रमींना "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? तुम्ही कशाची भक्ती करता?" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का? अशावेळी ते काय उत्तर देतात?

होय हा प्रश्न मला विचारला गेला. मात्र मी उत्तर देण्याआधीच एका कृष्णवर्णीय सहकार्‍यानेच् "जन्म-पालन-मृत्यू ही त्रिसुत्री आणि त्याची ब्रह्मा विष्णू महेश ही प्रतिके इथ पासून सूरू करून थेट संतपरंपरेपर्यंत" इतकी मुद्देसूद माहिती दिली की मी फक्त "बरोबर" - क्वचित प्रसंगी एखादी पुरवणी- इतकंच सांगितलं :)
दुसर्‍या एका प्रसंगात एका सहकार्‍याला हिंदु हा प्रेषितांपेक्षा वेगळ्या देवांना मानणारा धर्म आहे हेच माहित नव्हत.. तो प्रेषितांच्या यादीतली नावे घ्यायला लागला आणि मी यातले कोणीही आम्ही मानत नाहि सांगितल्यावर एक आश्चर्ययुक्त भाव देऊन विषयच बंद केला.

३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे? ........का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली? :-)

बरोबर हेच प्रश्न मलाही आहेत.. अर्थात उत्तर माहित नाहि

४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा? भगवदगीता? मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का?

भगवदगीता हे हिंदूचे बायबल नव्हे. हिंदूना एक असा ग्रंथ नाहि.

ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे?

प्रत्येक देवाला नमस्कार करावा असे सांगितले आहे. यातच सगळा दिवस जातो.

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

कल्पना नाही. मी जन्माने हिंदु असूनही गोंधळालेलो आहे :)

६)

हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय? अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

हिंदूच्या शाखांची कल्पना नाहि . मात्र नास्तिकवाद ही हिंदू धर्माची एक मुख्य शाखा आहे व त्यालाही संतपरंपरा आहे असे परवा डि.एन्.ए. मधील एका लेखातही वाचल्याचे आठवते.

७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत?

हिंदु धर्माचे एक असे स्वरूप नाहि मात्र ते बदलते आहे. आणि तो बदल मात्र जुनी पुस्तके वाचली की लगेच जाणवतो. जसे स्मृतीचित्रांच्यावेळी (एकोणीसाच्या शतकाच्या शेवटी) हिंदु समाज व आताचा याच्या स्वरूपात-वर्तनात चालीरितींमधे बर्‍यापैकी तफावत आढळते. जर एका शतकात इतका फरक पडतो त्या धर्माचे एकूण स्वरूप एखाद्या ग्रंथात देणे कठीण वाटते. आणि असे कोणी दिले असले तरी ते कालातीत नसावे. किंबहुना काळाप्रमाणे बदलणे हाच हिंदु धर्माचा गुण म्हणता येईल.

खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का? सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?

सगळॅ माहित नाहि पण बरेचसे.. जे जे सवयीचे होते ते कालांतराने हिंदु पद्धत म्हणून समाविष्ट होते.किंवा एखाद्या "स्पिरीच्युअल"पंथाचा/संताचा प्रभाव वाढू लागला की तो हिंदू धर्मातील पंथ घोषित केला जातो.

मग यांच्यात जोडणारे असे काय आहे? या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे?

याचे उत्तर भाषा वेगळी असली तरी मूळ चालीरीती कुठेतरी एकत्र येतात. शिवाय देवांचे ह्या एकत्र राहण्यात मोठे योगदान आहे. बर्‍याचशा प्रांतात काहि देव कॉमन आहेत जसे गणेश, शंकर, राम, कृष्ण , लक्ष्मी वगैरे.

हे चांगले की वाईट?

माझ्यामते चांगले. त्याचे साईड इफेक्ट गंभीर होते पण ते कमी होतील हा आशावाद

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आभार...

प्रत्येक देवाला नमस्कार करावा असे सांगितले आहे. यातच सगळा दिवस जातो.

:-)

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

कल्पना नाही. मी जन्माने हिंदु असूनही गोंधळालेलो आहे :)

अरेरे. एकाच नावेतले प्रवासी...

जन्म-पालन-मृत्यू ही त्रिसुत्री आणि त्याची ब्रह्मा विष्णू महेश ही प्रतिके

आवडले...

==================

नमस्कार आणि नमाज

>>> प्रत्येक देवाला नमस्कार करावा असे सांगितले आहे. यातच सगळा दिवस जातो. <<<

हे ठीक आहे; पण याचा प्रत्यक्षात हिंदुधर्मियांच्या सर्व शाखांत हे पाळले जातेच असे नाही. म्हणजे जाता जाता रस्त्यावर शेंदूर फासलेला दगड जरी दिसला तरी आपण एक उडता का होईना नमस्कार टाकतो, त्यात सगळा दिवस जातो असे नाही. "रोज मी देवळात जाऊन मगच दिवसाच्या कामाची सुरुवात करतो" असे विधान करणारे कुणी हिंदू असलेच तर त्यांची संख्या टक्केवारीच्या हिशोबात फार कमी असेल. ख्रिश्चन कुटुंबात "रविवारी" चर्चला जाण्याचा प्रघात आहे आणि बहुतांशी तो कटाक्षाने पाळतात. मुस्लिम दिवसातून पाच वेळा नमाज करतात हे जाहीर असले तरी हा प्रकार ज्यांच्या घरात "हाजी" आहे तिथे न चुकता करतात, मात्र मी पाहिलेले काही तरुण मुस्लिम फक्त सायंकाळची नमाज पठण करतात.

जन्माने हिंदू.

प्रत्येक माणूस जन्माने हिंदू असतो, त्याच्यावर बाप्तिस्मा, सुंता आदी विधी केल्यानंतरच तो ख्रिस्ती वगैरे होतो. जन्मतःच हिंदू असल्याने कुठल्याही संस्कारांशिवायही हिंदू हिंदूच राहतो.--वाचक्नवी

व्याख्या

  1. ५० पेक्षा अधिक प्रतिसाद असलेल्या या धाग्यात अजूनही कोणी हिंदू असण्याची व्याख्या का केली नाही? "क व्यक्ती हिंदू आहे" असे विधान करण्यासाठी आवश्यक आणि पर्याप्त असलेल्या वर्तनांची यादी केली नाही तर चर्चा केवळ 'हत्तीभोवतीचे आंधळे' प्रकारची राहील.
  2. "क व्यक्ती हिंदू नाही" असे जाहीर करण्यासाठी 'क'ने इतर धर्म स्वीकारणे आवश्यक आहे हे प्रतिपादन अन्यायकारक वाटते कारण हा इहवाद्यांवर अन्याय आहे. "क व्यक्तीस हिंदू कायदा लागू नाही" असे जाहीर करण्यासाठी 'क'ने इतर धर्म स्वीकारणे आवश्यक आहे हे प्रतिपादन ठीक आहे. जन्माने प्रत्येक व्यक्ती इहवादी असते, "त्यांना डीफॉल्ट कायदा हिंदूंसाठीचा लावावा" असे म्हटले तर ठीक आहे.

ही व्याख्या

प्रत्येक माणूस जन्माने हिंदू असतो, त्याच्यावर बाप्तिस्मा, सुंता आदी विधी केल्यानंतरच तो ख्रिस्ती वगैरे होतो. जन्मतःच हिंदू असल्याने कुठल्याही संस्कारांशिवायही हिंदू हिंदूच राहतो.

ही व्याख्या मी देखील ऐकली होती. हिंदू धर्म/तत्वज्ञानचे व्यापक रूप पहाता काही अंशी पटते देखील. जर राजकीय/भौगोलीक संदर्भात "हिंदू कोण?" म्हणून विचार केला तर या व्याख्येला भारत, भारतीय आणि भारतीय वंशाचे म्हणून मर्यादा आहेत. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून असे तत्वतः म्हणता येईल असे वाटते.

असहमत

इतर धर्म न स्वीकारलेला मानव असणे यालाच हिँदू असण्याची व्याख्या ठरविणे तद्दन हिँदूसापेक्ष आहे कारण "हिँदू धर्म अनादि असून देव प्रत्येकास हिंदू बनवून पाठवितो" हे गृहितक तटस्थ निरीक्षकांना मान्य नाही.

अवश्य!

हे गृहितक ---- निरीक्षकांना मान्य नाही.

निरीक्षक तटस्थ असोत अथवा नसोत, कोणी काय मान्य करावे यावर हिंदूमधे बंधन नाही. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात also म्हणणे ही हिंदूंमधे दिसते, only म्हणणे नाही.

संवाद तोडणे

"तू हिंदू असशील किंवा बाटगा हिंदू" हे दोनच पर्याय तुम्ही लोकांना दिल्यास हिंदू नसलेल्यांशी तुम्हाला संवादच शक्य होणार नाही. इस्लामचाही असाच दावा असतो की महावीर, बुद्ध, हेही अल्लाचे जुने प्रेषितच आहेत आणि गीतासुद्धा कुराणाचे भ्रष्ट रूप आहे. ती व्याख्या ऐकून तुम्हीसुद्धा संवाद तोडालच ना?
गांधीजींनी "सर्व धर्म बरोबर" असे म्हणणे म्हणजे वास्तविक "सर्व धर्म चूक" असे म्हणण्यासारखे होते असे कुरुंदकरांनी जागर या पुस्तकात लिहिले आहे. ऑल्सो म्हणणे हा भंपकपणा आहे. ऑल्सो तत्त्वज्ञानावर कृपया माझा एक जुना प्रतिसाद पहावा.
"बाप्पाला जयजय कर" असे एखाद्या मुलाला शिकविलेले नसेल तरीही त्या मुलाला कोणत्या विश्वासामुळे/वागणुकीमुळे हिंदू ठरवावे? ते मूल इहवादी का ठरवू नये?
हिंदू धर्म अनादि असल्याचा तुमचा दावा आहे काय? अन्यथा, जर हिंदू धर्म पौरुषेय असल्याचे तुम्हाला मान्य असेल तर हिंदू धर्म लिहिला जाण्यापूर्वीच मेलेल्या लोकांनाही हिंदू ठरविणे हा खुळचटपणा आहे. मृतांचाही बाप्तिस्मा करणार्‍या मॉर्मॉनांच्याही ते मत वरताण आहे.

आधी म्हणल्याप्रमाणे...

आधी म्हणल्याप्रमाणे हे तुमचे विचार आहेत. माझे वेगळे आहेत.

आधीच्या प्रतिसादातील माझे शेवटचे वाक्य सरळ होते: "तत्वज्ञानाच्या क्षेत्रात also म्हणणे ही हिंदूंमधे दिसते, only म्हणणे नाही."

त्यातील अधोरेखीत भाग हा महत्वाचा आहे. मी क्रियाकर्म, प्रेषित, अवतार कसलाच भाग त्यात घेतला नाही. त्या आधीच्या प्रतिसादात देखील मी स्पष्ट केले होते, नीट वाचल्यास कदाचीत कळेल.

एक उदाहरणच देयचे झाले तर आपण (म्हणजे किमान महाराष्ट्रात आणि कदाचीत वरच्या भागातील हिंदू ) आपण दशावतारातला नववा अवतार हा बुद्धाचा मानतो. त्या उलट दाक्षिणात्य (तमिळ नक्की इतरांचे माहीत नाही) हे बुद्धाला केवळ संत मानतात, अवतार नाही. तरी देखील असे हे मानतात तसे ते मानत नाही असे म्हणू शकतो. तेच अगदी देवांच्या बाबतीतही. गणपतीस आपल्याकडे दोन बायका आणि कार्तिकेय हा ब्रम्हचारी. दक्षिणेत याच्या उलट. तरी देखील समोर यातील कुठलाही देव आला तरी भाविक/श्रद्धावान नमस्कार करून पुढे जाऊ शकतो. कारण कुठेतरी माहीत असते, मान्य असते की या सगळ्या श्रद्धा आहेत आणि त्या वेगवेगळ्या असू शकतात.

गांधीजींनी "सर्व धर्म बरोबर" असे म्हणणे म्हणजे वास्तविक "सर्व धर्म चूक" असे म्हणण्यासारखे होते असे कुरुंदकरांनी जागर या पुस्तकात लिहिले आहे.

कुरंदकरांचे "जागर" हे माझे आवडते पुस्तक आहे आणि कुरंदकर, सगळे पटले नाही तरी ते माझे आवडते लेखक/विचारवंत आहेत, प्रेषित नाहीत (असे मी कुणालाच प्रेषित मानत नाही). सगळे पटले नाही तरी आवडते म्हणू शकतो कारण हिंदू असल्याने "ऑल्सो" हे मान्य करतो, "ओन्ली" चा अडमुठेपणा नाही. आपण उर्धृत केलेले वाक्य, हे त्यांचे मत झाले. गांधीजींना जे म्हणायचे होते, ते गांधीजींचे आणि त्याचे विश्लेषण कसे करायचे हे ज्यांना करायचे त्यांचे... या संदर्भात हिंदू हे सर्व पर्याय देऊ शकतात. अमूक एक ग्रंथच तितका बरोबर, एकच देव, एकच प्रेषित ते मान्य कर नंतर संवाद असे म्हणत नाही.

इस्लामचाही असाच दावा असतो की महावीर, बुद्ध, हेही अल्लाचे जुने प्रेषितच आहेत आणि गीतासुद्धा कुराणाचे भ्रष्ट रूप आहे. ती व्याख्या ऐकून तुम्हीसुद्धा संवाद तोडालच ना?

हा प्रश्न मला असला तर, मी कुणाशीच संवाद तोडत नाही. आत्तापण तुमच्याशी कुठे तोडलाय? :-)

अवांतरः जागर सारखे, इतके परखड जर एखाद्या "हिंदूत्ववाद्याने" लिहीले असते तर काय झाले असते हा मला कायम प्रश्न पडतो ;)

तसे नाही

आधी म्हणल्याप्रमाणे हे तुमचे विचार आहेत. माझे वेगळे आहेत.

त्यांवर माझा "तुमचे विचार चूक आहेत" असा प्रतिसाद आहे. त्यालाही "यू आर ऑल्सो करेक्ट" असे म्हणणार आहात काय?

इस्लामचाही असाच दावा असतो की महावीर, बुद्ध, हेही अल्लाचे जुने प्रेषितच आहेत आणि गीतासुद्धा कुराणाचे भ्रष्ट रूप आहे. ती व्याख्या ऐकून तुम्हीसुद्धा संवाद तोडालच ना?

हा प्रश्न मला असला तर, मी कुणाशीच संवाद तोडत नाही. आत्तापण तुमच्याशी कुठे तोडलाय? :-)

इस्लामच्या प्रचारकाशी बोलताना मी किंवा तुम्ही अग्रीव्ड पार्टी असतो. तुमच्याशी बोलताना मी/इतर तटस्थ निरीक्षक अग्रीव्ड पार्टी आहोत. तुम्ही माझ्याशी संवाद तोडाल असे मी म्हटले नाही.

नीट वाचल्यास

माझा मुळचा प्रतिसाद (ज्याच्याशी तुम्ही असहमती दर्शवली):

जर राजकीय/भौगोलीक संदर्भात "हिंदू कोण?" म्हणून विचार केला तर या व्याख्येला भारत, भारतीय आणि भारतीय वंशाचे म्हणून मर्यादा आहेत. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून असे तत्वतः म्हणता येईल असे वाटते.

त्यावर तुम्ही असहमती दर्शवत तथाकथीत तटस्थ निरीक्षण काय केलेत? तरः

"हिँदू धर्म अनादि असून देव प्रत्येकास हिंदू बनवून पाठवितो" हे गृहितक तटस्थ निरीक्षकांना मान्य नाही.

म्हणजे माझ्या मूळ प्रतिसादात, ना धड देवाचा उल्लेख ना धड कुठे असे म्हणले आहे की हिंदू धर्म अनादी आहे. किंबहूना त्याच्या मर्यादापण सांगितल्या आहेत. तरी देखील माझ्या लिखाणात जे शब्द आणि विचार नाहीत ते घुसडणार आणि वर त्यालाच तटस्थ निरीक्षण म्हणत, "तुमचे विचार चूक आहेत" असे म्हणणार.

यातच ऑल्सो आणि ओन्ली मधला फरक येतो. असो.

मूळ मत

"तत्त्वत: विचार केल्यास प्रत्येक व्यक्ती जन्माने हिंदू असते" हे तुमचे मत नाही? मी घुसडले?
हे 'तत्त्वतः' मत केवळ "हिंदू धर्म अनादि असून देव प्रत्येकास हिंदू बनवून पाठवितो" या एकाच गृहीतकावर आधारित असू शकते म्हणून आधीच स्पष्ट करून ठेवले की ते गृहीतकच अग्राह्य आहे. ते गृहीतक टाळल्यास तुमचे मत निराधारच आहे!
"तत्वज्ञानाच्या क्षेत्रात also म्हणणे ही हिंदूंमधे दिसते, only म्हणणे नाही." हे मत मूळ प्रतिसादात नाही. तो वाद नंतरच्या प्रतिसादात आला.

अजिबात नाही...

हे 'तत्त्वतः' मत केवळ "हिंदू धर्म अनादि असून देव प्रत्येकास हिंदू बनवून पाठवितो" या एकाच गृहीतकावर आधारित असू शकते म्हणून आधीच स्पष्ट करून ठेवले की ते गृहीतकच अग्राह्य आहे. ते गृहीतक टाळल्यास तुमचे मत निराधारच आहे!

अजिबात नाही. जे शब्द मी गृहीतच धरले नाहीत ते परत घुसडण्याचा हा प्रयत्न आहे. परत तेच तेच बोलले म्हणजे खरे होत नसते. मी (म्हणजे कोणिही व्यक्ती) हिंदू आहे याचा अर्थ "देव" मानतेच असा कसा काय घेता? नास्तिकता पण हिंदूंमध्ये असू शकते आणि तेथेच तर ऑल्सो येते.

"तत्वज्ञानाच्या क्षेत्रात also म्हणणे ही हिंदूंमधे दिसते, only म्हणणे नाही." हे मत मूळ प्रतिसादात नाही. तो वाद नंतरच्या प्रतिसादात आला.

असे दिसतयं की तुम्ही मी वरच्या (या आधीच्या प्रतिसादात) जे "यातच ऑल्सो आणि ओन्ली मधला फरक येतो.", असे लिहीले आहे त्या संदर्भात म्हणत असावात. मी का लिहीले याबद्दल गैरसमज झालेला दिसतोय. मी तेथे माझे मत पटवायला लिहीलेले नाही तर conclusion म्हणून लिहीले आहे. थोडक्यात मला असे म्हणायचे होते की आपण "ओन्ली, ओन्ली" म्हणत आहात. आत्ताचा आपला प्रतिसाद आणि त्यातील आपल्या एका गृहीतकावरून माझे आपल्या "ओन्ली" चे अनुमान बरोबर आहे असेच दिसत आहे.

ठीक

अजिबात नाही. जे शब्द मी गृहीतच धरले नाहीत ते परत घुसडण्याचा हा प्रयत्न आहे. परत तेच तेच बोलले म्हणजे खरे होत नसते. मी (म्हणजे कोणिही व्यक्ती) हिंदू आहे याचा अर्थ "देव" मानतेच असा कसा काय घेता? नास्तिकता पण हिंदूंमध्ये असू शकते आणि तेथेच तर ऑल्सो येते.

"हिंदू धर्म अनादि असून देव प्रत्येकास हिंदू बनवून पाठवितो" हा बेनेफिट ऑफ डाऊट आहे, तुम्हाला नको असेल तर मी मुळीच लादत नाही. पण त्याचा आधार न घेता कृपया "तत्त्वत: विचार केल्यास प्रत्येक व्यक्ती जन्माने हिंदू असते" हे विधान स्पष्ट करावे. "बाप्पाला जयजय कर" असे एखाद्या मुलाला शिकविलेले नसेल तरीही त्या मुलाला कोणत्या विश्वासामुळे/वागणुकीमुळे हिंदू ठरवावे? ते मूल इहवादी का ठरवू नये?

तत्वज्ञान

"हिंदू धर्म अनादि असून देव प्रत्येकास हिंदू बनवून पाठवितो" हा बेनेफिट ऑफ डाऊट आहे, तुम्हाला नको असेल तर मी मुळीच लादत नाही.

"बेनेफिट ऑफ डाऊट" दुसर्‍याला देण्यासंदर्भात म्हणतात, दुसर्‍याच्या विरोधात घेण्याला नाही. असो. इतक्या वेळेस सांगितल्यावर कशाने का होईना माझ्या प्रतिसादात देव हा शब्द नव्हता आणि धर्म हा शब्द जरी सुरवातीस "/तत्वज्ञाना" बरोबर वापरला असेल तरी नंतर तत्वज्ञानापुरतेच बोललो होतो, हे थोडे तरी कळले असावे असे वाटते.

"पण तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून असे तत्वतः म्हणता येईल असे वाटते. " असे जेंव्हा मी म्हणतो, तेंव्हा झापडे लावून विचार न करणार्‍या कुणाच्याही लक्षात येयला काही हरकत नसावी की मी "प्रॅक्टीसिंग रिलीजन" या अर्थाने "धर्मा" संदर्भात बोलत नाही आहे तर तत्वज्ञान म्हणून बोलत आहे. मात्र तरी देखील, "तत्त्वत: विचार केल्यास प्रत्येक व्यक्ती जन्माने हिंदू असते" याचा अर्थ आपल्याला समजला नसावा म्हणून चर्चा "बाप्पाला जयजय करणे" म्हणजेच काय तो "हिंदू" इथेच घोटाळत बसली आहे...

ते मूल इहवादी का ठरवू नये?

माझ्या वरील प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, "नास्तिकता पण हिंदूंमध्ये असू शकते" हे मी म्हणले आहे आणि तुमचा काय तो "बेनेफिट ऑफ डाऊट" असणं-नसणं-लादणं- न लादणं च्या संदर्भात तुम्ही ते तत्व मान्य देखील केलेले दिसते आहे. थोडक्यात मला इतकेच म्हणायचे आहे की हिंदू तत्वज्ञानात सर्व प्रकारच्या विचारांचे स्वागत झाले आहे. याचा अर्थ वाद-चर्चा झाली नाही असे नाही. पण मीच काय तो शहाणा आणि मलाच काय ते माहीत आहे असे म्हणले गेलेले नाही. त्यातील कधी अज्ञाताच्या ओढीने तयार झाले, तर कधी व्यवस्था तयार करायला, कधी अंतर्गत संघर्षासाठी तर कधी बाहेरील आक्रमणाविरुद्ध... त्यात द्वैत, अद्वैत, नास्तिक, वैदीक, वेदांत, बौद्ध, जैन, अकाल वगैरे सर्व प्रकार येतात. त्यांच्या परंपरा झाल्या त्यातून त्यांचे धर्म/पंथ तयार झाले. पण त्या सगळ्याचा विचार करता तुकारामाच्या अभंगात सगळा सारांश येतो:

पुण्य परउपकार पाप ते परपीडा। आणिक नाहीं जोडा दुजा यासी।।
सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म। आणिक हें वर्म नाहीं दुजें।।
गति तोचि मुखीं नामाचें स्मरण। अधोगति जाण विन्मुखता।।
संतांचा संग तोचि स्वर्गवास। नर्क तो उदास अनर्गळा।।
तुका म्हणे उघडे आहे हित घात।जयाचें उचित करा तैसे

हिंदू तत्वज्ञान हे यातील कुठल्याही ओळीत आहे. त्यातील एक ओळ पण हिंदूच आहे आणि सगळा अभंग पण हिंदू तत्वज्ञानच आहे. हे काही केवळ तुकोबाचेच नाही. असे इतर अनेकांचे पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिणेतील हजारो वर्षाच्या इतिहासात सांगितलेले कदाचीत दाखवता येईल... रंजल्या-गांजल्यांची सेवा करणे (उपकार) आणि भ्रष्टाचार न करणे (परपीडा) वगैरे शिकवताना "जय जय बाप्पा" म्हणा अथवा नको, अर्थ बदलणार नाही. तेंव्हा तसे वागणारा हिंदूच. मात्र जर कोणी केवळ हे येशूच्या नावानेच अथवा अल्लाच्याच नावाने करणे म्हणजेच बरोबर आणि इतर सर्व चूक असे समजत असेल तर कदाचीत त्यांचे उपकार आणि परपीडा न करणे हे चांगले असू शकेल, पण ते त्यांच्या धर्माच्या चौकटीत. हिंदू तत्वज्ञानाला आणि म्हणूनच त्यानावाने ओळखल्या जाणार्‍या हिंदू व्यक्तीस ही चौकट असत नाही. म्हणूनच त्याच्या उलट, "अशी चौकट ज्या व्यक्तीस नसते ती हिंदू", असे समजणे मी "तत्वज्ञाच्या दृष्टीने तत्वतः म्हणता येईल", असे म्हणतो. आणि अर्थातच तुम्ही तसे म्हणायलाच हवे असे देखील म्हणत नाही, कारण मी तशी चौकट पाळत नाही.

एक्सक्लुजिव?

  1. येशूने वेगळे काय शिकविले? पॉलचा धर्म वेगळा! (ज्यू लोकांचे "नो अदर गॉड" तत्त्वज्ञान त्याने येशूवर लादले.)
  2. "द्वैत, अद्वैत, नास्तिक, वैदीक, वेदांत, बौद्ध, जैन, अकाल" या सार्‍यांचा 'माणुसकी' इतकाच सारांश आहे काय? 'नास्तिक' म्हणजे येथे निरीश्वरवाद अपेक्षित आहे काय? (माझ्या माहितीनुसार नास्तिक हे दर्शन निरीश्वरवादी नाही. उलट, जन्मजात मूल इहवादी/निरीश्वरवादी या अर्थाने नास्तिक असते. पारलौकिक विषयांची चर्चा नसलेल्या तत्त्वज्ञानाला इहवादच म्हटले पाहिजे.)
  3. "प्रत्येक माणूस जन्माने हिंदू असतो, त्याच्यावर बाप्तिस्मा, सुंता आदी विधी केल्यानंतरच तो ख्रिस्ती वगैरे होतो. जन्मतःच हिंदू असल्याने कुठल्याही संस्कारांशिवायही हिंदू हिंदूच राहतो." येथे बाकी सर्व विशेषनामे ही धर्म(=पारलौकिक विषयांवरील मते) आहेत. या काँटेक्स्टमध्ये चर्चा करताना हिंदू हा शब्दही धर्म या अर्थानेच असला पाहिजे.

प्रतिसाद

या काँटेक्स्टमध्ये चर्चा करताना हिंदू हा शब्दही धर्म या अर्थानेच असला पाहिजे.

माझा प्रतिसाद हा वाचक्नवींच्या प्रतिसादाबद्दल मला काय वाटते हे सांगणारा होता. तुम्ही प्रत्यक्ष प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला दिला होता. वाचक्नवींच्या प्रतिसादास नाही. त्यानंतर तुमचे आणि माझे भरपूर लिहून झाले आणि आता नंतर आठवण झाल्यासारखे नवीन नियम सांगत आहात असे वाटत नाही का? आणि तो देखील माझ्या मूळ प्रतिसादाच्या संदर्भात नाहीच...

पारलौकिक विषयांची चर्चा नसलेल्या तत्त्वज्ञानाला इहवादच म्हटले पाहिजे.

मग म्हणा ना! मी कुठे आक्षेप घेतोय? तुम्ही नास्तिक आणि इहवादात फरक करू इछ्चिता आणि तो देखील चर्चेच्या संदर्भात. मी करू इच्छित नाही. एखाद्या चर्चेखोर इहवाद्याशी जर श्रद्धावान देवा-धर्माबद्दल सांगायला गेला आणि निरीश्वरवाद्याला सांगायला गेला तर चर्चा काही फार वेगळी होईल असे वाटत नाही.

येशूने वेगळे काय शिकविले? ...

नक्की काय म्हणायचे ते समजले नाही. पण येशूचे नाव का असे म्हणत असाल असे गृहीत धरूनः जेंव्हा, "जर कोणी केवळ हे येशूच्या नावानेच .." असे लिहीले असते तेंव्हा त्यात येशूने काय शिकवले याचा संबंध नसून त्याचे पूजक अथवा फॉलोअर्स काय म्हणतात याच्याशी संबंध असतो.

प्रति: प्रतिसाद

माझा प्रतिसाद हा वाचक्नवींच्या प्रतिसादाबद्दल मला काय वाटते हे सांगणारा होता. तुम्ही प्रत्यक्ष प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला दिला होता. वाचक्नवींच्या प्रतिसादास नाही.

तुम्ही मूळ प्रतिसाद देण्याआधीच मी वाचक्नवींना प्रतिसाद दिला होता. तुम्ही त्यांचीच री ओढल्यामुळे तुम्हाला मी दिलेला प्रतिसादही तसाच होता. मुळात, एक प्रति-प्रतिसाद असताना त्याचा प्रतिवाद करणे सोडून नवा प्रतिसाद देण्याची पद्धतच मला वैयक्तिक पातळीवर उद्धट (अनुल्लेखाने मारणे, इ.) वाटते पण माझा नाइलाज आहे.

त्यानंतर तुमचे आणि माझे भरपूर लिहून झाले आणि आता नंतर आठवण झाल्यासारखे नवीन नियम सांगत आहात असे वाटत नाही का?

नाही.

आणि तो देखील माझ्या मूळ प्रतिसादाच्या संदर्भात नाहीच...

धर्म म्हणा नाहीतर तत्त्वज्ञान, जर ख्रिश्चन/मुस्लिम/ज्यू नसणे ही हिंदू असण्याची व्याख्या मांडत असाल तर निव्वळ माणुसकीचाच अंतर्भाव हिंदू असण्याच्या व्याख्येत करणे अप्रामाणिकपणा आहे कारण ख्रिश्चन/मुस्लिम/ज्यू या धर्म/तत्त्वज्ञानांत पारलौकिक विषयांवरील मते आहेत. अन्यथा ही तुलना संत्री-सफरचंदे अशी होईल.

मग म्हणा ना! मी कुठे आक्षेप घेतोय? तुम्ही नास्तिक आणि इहवादात फरक करू इछ्चिता आणि तो देखील चर्चेच्या संदर्भात. मी करू इच्छित नाही.

नास्तिक हा शब्द तुम्ही सांख्य, वेदान्त यांच्यासोबत मांडलात म्हणून मी खात्री करून घेतली कारण नास्तिक या शब्दाचा (=बौद्ध+जैन+चार्वाक+अकाल) मूळ अर्थ वेगळा (वेदप्रामाण्य न मानणे) आहे. तुम्ही केवळ चार्वाक असा अर्थ दिलात तर त्याला हिंदू तत्त्वज्ञानात बसविण्याचा हक्क गमावून बसाल.

नक्की काय म्हणायचे ते समजले नाही. पण येशूचे नाव का असे म्हणत असाल असे गृहीत धरूनः जेंव्हा, "जर कोणी केवळ हे येशूच्या नावानेच .." असे लिहीले असते तेंव्हा त्यात येशूने काय शिकवले याचा संबंध नसून त्याचे पूजक अथवा फॉलोअर्स काय म्हणतात याच्याशी संबंध असतो.

स्पष्टीकरणः माणुसकी म्हणजेच हिंदू तत्त्वज्ञान अशी व्याख्या करण्यावर माझा प्रश्न असा की येशूनेही तेच शिकविले ना? त्याच्या तत्त्वज्ञानाला अहिंदू का म्हणता?

 
^ वर