'भाषा आणि जीवन'चा पावसाळा २०१० अंक उपलब्ध

मुखपृष्ठ : रविमुकुल
अनुक्रमणिका
आदरांजली
संपादकीय/कवितेची भाषा/प्र०ना० परांजपे
मराठी कवितेची बदलती भाषा/हेमंत गोविंद जोगळेकर
मराठी कवितेची बदलती भाषा : उपबोधाख्यान/सलील वाघ
मराठी कवितेची बदलती भाषा/नीलिमा गुंडी
आदिआछिपलेया/ब्रह्मानंद देशपांडे
बहुभाषिक भारत - वास्तव आणि स्वप्न/मॅक्सीन बर्नसन
रुचेची ना, पटेची ना!/प्र०ना० परांजपे
संगणकव्यवहाराचे मराठीकरण/सुशान्त देवळेकर
मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन/अरविंद कोल्हटकर
धुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ/प्रकाश भामरे
ज्याची त्याची प्रचीती : १) भाषेची मुळं लोकजीवनात!/विजया देव
२) बदलणारी मराठी भाषा/अ०पां० देशपांडे
३) ‘ण’ की ‘प’?/मेघना सामंत
४) हिंदीचे आक्रमण आता मराठीच्या पाठयपुस्तकातही/अनिल शेळके
दखलयोग्य : अरबी-मराठी/डॉ० उज्ज्वला रेगे
भाषावार्ता : प्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका
पुस्तक-परीक्षण : बोलींचा अभ्यास/विश्वनाथ खैरे
प्रतिसाद : १) ‘म्हणून’ची चूक/शकुंतला क्षीरसागर
२) वर्ण आणि अक्षर/दिवाकर मोहनी
३) अठरा विश्वे/शं०दे० पसारकर
४) अठरा विश्वे/शकुंतला फडणीस
शंका ... तिन्ही सांजा/सुशान्त देवळेकर
... आणि समाधान/संपादक
परिषद-वार्ता : १) परिषदेचा वर्धापनदिन/रंजना फडके
२) डॉ० वि०बा० प्रभुदेसाई ह्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा/ विजय पाध्ये
पानपूरके

पावसाळा २०१० अंक वाचून प्रतिक्रिया द्या.

 
लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिसाद

अंक आवडला. जमेल तसे वाचतो आहे.
मराठी आंतरजालाच्या संदर्भातली एक गमतीशीर गोष्ट.

हे वरील उदाहरण म्हणजे "अमुक अमुक गोष्ट केल्या जाईल" या (मराठवाड्याकडच्या ?) वाक्प्रयोगाच्या बरोबर उलट आहे असे धरायचे काय ?

अंक चाळला

अंक चाळला. सविस्तर नंतर वाचेन. आमच्या प्रिय मैत्रिणीचा चुटकुला वाचला. मागे तिने जय मराठी हा लेख लिहिला होता.

शक्य असल्यास बाईंना प्रोत्साहित करा ही विनंती. त्यांना लेखनाचे अंग आहे.

बायदवे, आम्हीही वाटपच म्हणतो. वाटण नाही. असो.

गोव्याच्या कोंकणीसारखे

गोव्याच्या कोंकणीत "प"कारांत रूप हे अधिक सामान्य आहे.

मराठी शब्दकोशांत क्रियापदाचे मूळ रूप "णे"कारांत देतात. करणे, चलणे, वगैरे. कोंकणी शब्दकोशात "कर", "चल" असे देतात. (असे जुन्या अर्धवट आठवणीवरून ठोकून देत आहे - हाताशी कोंकणी शब्दकोश नाही, आणि पूर्वीसुद्धा फार बघितलेला नाही.)

+१

मी ही दळप आणि कांडप असे शब्द (चिपळूण/रत्नागिरीत) ऐकले आहेत.

वाटण हा शब्द चटणी (पाट्यावर) वाटणे या अर्थी ऐकला आहे आणि वाटप हा डिस्ट्रिब्यूशन या अर्थी ऐकला आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सहमत

वाटण हा शब्द चटणी (पाट्यावर) वाटणे या अर्थी ऐकला आहे आणि वाटप हा डिस्ट्रिब्यूशन या अर्थी ऐकला आहे.

सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दळप आणि कांडप

>>> मी ही दळप आणि कांडप असे शब्द (चिपळूण/रत्नागिरीत) ऐकले आहेत. <<<

चिपळूण/रत्नागिरीतच नव्हे तर इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील तीन प्रमुख जिल्ह्यात हेच शब्द प्रचलित आहेत (शिवण, कातण, वाटण, चाटण या चालीवर)

वाटप व वाटण

सिंधुदुर्गात वाटपच म्हणतात, परंतु लांजा, राजापूराच्या काही भागात् मात्र वाटण म्हणतात.
जयेश

अंक मिळाला नाही

हा अंक प्रकाशित होऊन त्याचे 'वाटप' झाले आहे का? मला अंकाची कडकप्रत मिळाली नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वितरित व्हायचा आहे.

'कडकप्रत' वितरित व्हायची आहे. ह्यावेळी वेगळा प्रयोग म्हणून आंतरजालावर मजकूर आधीच प्रकाशित केला.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

चांगला प्रयोग

आंतरजालावर असे टीज़र देणे हा चांगला प्रयोग आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कडकप्रत मिळाली

कडकप्रत कालच हस्तगत केली. अंक अतिशय उत्तम वठला आहे. धन्यवाद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान आहे

पानपूरके आवडली..
उज्ज्वला रेगे यांचे लेखन आवडले. लीळाचरित्रातील मराठी कशी असेल ते वाचण्याची उत्सुकता लागून राहिली आहे..

लीळाचरित्र

+१
सुंदर अंक. चित्त यांचे अभिनंदन.

तिकडचा प्रतिसाद इकडे!!!

चित्तरंजन,

अंक वाचून अभिप्राय/टिपणी/मत द्या असं म्हटलंय खरं! पण मत मांडयचं कुठे? हे आपण सांगितले नाही.
त्या अंकातील 'प्रतिसाद' या दुव्यावर टिचकी दिली तरी लेखनासाठीची खिडकी उघडत नाही आहे.
या कारणास्तव माझे मत मी येथेच मांडत आहे.
लेखः वर्ण आणि अक्षर लेखकः दिवाकर मोहनी
या लेखात वर्ण व व्यंजन यावर काही मते मांडलेली आहेत. त्यातील गाभा या विधानावर आधारलेला आहे.-"आपल्या नागरी लिपीत ज्याचा उच्चार होऊ शकत नाही असे काहीही लिहिता येत नाही. केवल व्यंजनांचा उच्चार कोणालाही करता येत नाही. "
या विधानावर मला सांगावेसे वाटते कि व्यंजनाचा उच्चार करता येतो. अक्शराचा
(अक्शर=क्शर+स्वर) उच्चार करताना जी पद्धती आपण स्विकारतो त्याच्या अगदि उलट व्यंजनाचा उच्चार करताना स्विकारायची. म्हणजे
(क्शर= स्वर+अक्शर) {इथे क्शर म्हणजे 'व्यंजन'}
उदा.:
क् = अ+क
म् = अ+म
न् = अ+न

इत्यादी.

लहानपणापासून असे शिकवले जायला हवे.

आता हा प्रतिसाद श्री. दिवाकर मोहनी पर्यँत तुम्ही पोहचवावा, हि विनंती!

संपर्कासाठी दुवा

तुमचा प्रतिसाद मी दिवाकर मोहनींपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करीन.काळजी नसावी.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

धन्यवाद

अतिशय सुंदर अंक.
लेख थोडे अधिक विस्त्रुत(!) असते तर अंक आणखीन आवडला असता.

 
^ वर