मी लिनक्सवासी झालो त्याची कथा.........

फार्फार वर्षापूर्वीपासूनच मला लिनक्स वापरायची खुमखुमी होती. त्याची कारणे वेळोवेळी बदलत गेली मात्र खुमखुमी तशीच राहिली.
कारण क्र. १ : मी ऐकलेला सुविचार : "Linux is not for everybody" मला "everybody" असण्यापेक्षा "somebody different" होण्यात इंटरेस्ट होता.
मात्र त्यावेळी फॅशन शो मधील कपड्यांचा व्यवहारात जेवढा फायदा असेल तेवढाच लिनक्स चा होता.
कालाय तस्मै: नमः या उक्तीप्रमाणे फॅशन शो मधे बघीतलेली वस्त्रप्रावरणे ललनांच्या अंगाखांद्यावर (काहीतरी चुकतंय इथं !) दिसू लागली आणी त्याचप्रमाणे लिनक्सदेखील दैनंदिन गरजा भागविण्याच्या द्रुष्टीने सक्षम होते गेले. (येथे कपड्यांचा प्रवास कमाल पासून किमान पर्यंत आणी लिनक्स चा प्रवास किमान पासून कमाल असा होत गेला असा अर्थ घ्यावा.)

नमनालाच घडाभर तेलं संपलयं.... आता मूळ मुद्द्याकडे.........

तर लिनक्स वापरण्याची अपेक्षा वाढण्याची कारणे.....
१) लिनक्स मोफत आहे. (जर तांत्रिक सेवा हवी असल्यास पैसे मोजावे लागतात.)
२) तुमच्या जुन्या संगणकावर देखील उत्तम प्रकारे चालते.
३) सध्यातरी संगणक विषाणू मुक्त आहे. (मात्र विषाणूप्रतिकारक सॉफ्टवेअर ही उपलब्ध आहेत.)
४) दैनंदिन वापरातील विंडोज वर होणारी जवळजवळ सारी कामे लिनक्सवर करता येतात.
५) खिडक्या वापरुन कंटाळा आला होता.
६) आपण चोरीचे सॉफ्टवेअर्स वापरतोय पण त्याचवेळी विकत घेऊन वापरणे शक्य नाही ही भावना देखील प्रबळ होत गेली.

तर अशाच कारणांमुळे मी लिनक्स कडे आकर्षीत झालो. मग सुरु झाला मला हव्या असणार्‍या योग्य लिनक्स चा शोध.
मी हार्डवेअर क्षेत्रातच काम करीत असल्यामुळे काही सॉफ्टवेअर्स अतिशय म्हणजे अतिशय गरजेची होती. ती अशी.....

१) ऑफीस सुट : सगळीकडे मायक्रोसॉफ्ट ऑफीस वापरुन बनविलेल्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट फाईल्स उघडणे, त्यात बदल करणे आणि पुन्हा मायक्रोसॉफ्ट
ऑफीस वाचू शकेल अशाप्रकारे सेव्ह करणे. ( ओपन ऑफीसने हा प्रश्न सोडविला. वापरण्यास अगदी सोपे आणी मायक्रोसॉफ्ट ऑफीस सारखेच.)

२) इमेल : ही सुविधा हवी म्हणजे हवीच. इमेल म्हणजे आजच्या युगातली ढाल, तलवार, माहितीकोष इ. इ. तुम्हीही कोणतेही विशेषण घ्या. ते इथे लागू होणारच.
पूर्वी संगणक साक्षर आणी निरक्षर हा भेद होता. तो आता जवळपास नाहीच. मात्र मेल वापरता येणारा तो साक्षर आणि नाही तो निरक्षर हा या युगाचा नवीन नियम
आहे. तुम्ही तुमच्या सहकार्‍याच्या / बॉसच्या मांडीला मांडी लाउन बसत असाल, रोज त्याला तोंडी सुचना / कामाचे अपडेटस देत असता. मात्र एखाद्या अवघड
क्षणी तो तुम्हाला "मेल पे डाला था क्या ?" असे विचारुन खिंडीत गाठतो. त्यावेळी जर तुमच्याकडे मेलची कॉपी मिळाली नाही तर तुम्ही मेलातच समजा.
(ह्या अवघड क्षणी मोझीला थंडरबर्ड अगदी देवासारखा धावून येतो. तो तुमचे आऊटलुकचे मेल वाचून आपल्या फॉरमॅटमधे सेव्ह करु शकतो. मी तर विंडोजवरही
मोझीला थंडरबर्ड वापरत असल्याने माझे काम अगदी सोपे झाले.)

३) आंतरजाल न्याहाळक (वेब ब्राऊजर) : आय ई च्या बदल्यात फायरफॉक्स, गुगल क्रोम इ.इ.) - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
४) ऑडिओ / व्हिडिओ : व्ही.एल.सी. प्लेयर : - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
५) पीडीएफ रीडर : ऍडोब - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
६) टीमव्ह्युवर : इंटरनेटवरुन दुसरा संगणकाशी जोडून त्याचा ताबा घेऊन त्याला मदत करणे : - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.

आणी याव्यतिरीक्त इतर अनेक ऍप्लिकेशन्स... त्याबद्दल पुढील लेखात......

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत!

लिनक्स वापरणार्‍या परिवारात हार्दिक स्वागत!
बाय द वे, कोणता फ्लेवर वापरता आहात?

||वाछितो विजयी होईबा||

बाय द वे, कोणता फ्लेवर वापरता आहात?

बरेच वापरुन पाहिले.

सध्या उबंटू १०.०४ वापरत आहे. वापरलेल्या सगळ्या फ्लेवरवर एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे. बघू या जमतयं का ते !

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

उबंटू १०.०४

मी सध्या उबंटू १०.०४ वापरत आहे. पण ल्यापटॉपचा किबोर्ड अचानक गायब होणे आणि खिडकीच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातली बटने डावीकडे नेल्याने माझा थोडा विरस झाला आहे. परत उबंटू ९.१० टाकावे म्हणतो. १०च मिनीटांचे काम असल्याने काही काळजी नाही.
कोणी बॉस वापरले आहे काय? असल्यास येथे माहिती द्यावी ही विनंती.






उजव्या कोपर्‍यातली बटने

डिफॉल्ट थीम बदला, अडचण दूर होईल.

अस्स्?

एवढं सोप्प? आहे?






सोपा उपाय

gconf-editor वापरुन बटणांचे लेआऊट बदलता येईल.
किंवा खालील कमांड टर्मिनलवर वापरा.

gconftool-2 --set “/apps/metacity/general/button_layout” --type string “:minimize,maximize,close”


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

अच्छा

हे करुन पहातो. पण मधुनच किबोर्ड गायब होतो त्याचे काय?






काहीतरी घोळ झाला असावा

इन्स्टॉलेशन करताना काहीतरी घोळ झाला असावा किंवा कीबोर्ड खराब झाला असावा. लिनक्स मिंट वापरा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विंडोज

विंडोजवर चालतो व्यवस्थित. किंबहुना उबंटु वर पासवर्ड व्यवस्थित घेतो पण मधुनच किबोर्ड गायब होतो आणि मग माउस सुद्धा काम करेनासा होतो. माउस फिरतो स्क्रिनवर पण टिचकी मारल्यास काहीच होत नाही. मेन्यु सुद्धा उघडत नाही.

लिनक्स मिंट वापरा.

हे काय आहे?






इथे पाहा

इथे

लिनक्सचे उबुंटू आधारित वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर असे फ्लेवर आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

धन्यवाद. कमांड वापरल्यावर हवा तो बदल झाला.






लिनक्स

लिनक्सचे भरपूर फायदे आहेत.

डिफ्रॅग करायची कटकट नाही.
व्हायरस, स्पायवेअरची कटकट नाही.
खिडक्यांपेक्षा कितीतरी पटीने वेगवान.
लिनक्स उत्तरोत्तर सुधारत जाताना जाणवते. (याउलट नवीन खिडकी वापरताना आधीची बरी होती असे वाटते.)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

जखमेवर मीठ...

का उगाच आम्हा खिडकीवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळता रे? आम्हाला गिल्टी उर्फ खजिल वाटायला लागते ना मग!

असो. मला जरा माहिती हवी आहे.

१)लिनक्स मध्ये खेळायला काही टाईमपास गेम्स आहेत का? आणि काही रेसिंग गेम?
२)मला माझ्या कॅमेर्‍याच्या रॉ फाईल्स संपादायला काही सॉफ्टवेअर्स आहेत का? फोटोशॉपच्या तोडीचे असेल तर बरे होईल.
३)गाणी ऐकायला उत्तम प्लेअर्स उर्फ वादक आहेत का?
४)मी बर्‍याचदा Avi फाईल्स Mp4 करुन पीएसपीत बघतो. या कामासाठी काही व्हिडीओ कन्व्हर्टर्स उर्फ रुपांतरक आहेत का?
५)टोरन्ट डाऊनलोडिंग जमते का? त्यासाठी काय आहे? नाहीतर गाजलेले देशीविदेशी चित्रपट कसे मिळणार?
६)डीव्हीडीज राईट करणे हे माझे जवळजवळ दर आठवड्याचे काम आहे. यासाठी काय आहे?
७)पुढे मागे मला चांगला FTP client पण लागेलच. त्यासाठी काय करु?
८)माझा कॅनन कॅमेरा लिनक्सला जोडला जाईल ना? की काही अडचण येईल?
९)चांगले डाऊनलोड मॅनेजर्स आहेत का? मी कधीकधी युट्यूबवरच्या फिती उतरवून घेतो नि नंतर सावकाश बघतो.
१०)पीएचपी फाईल्स एडिट उर्फ संपादित करायला चांगला एडिटर उर्फ संपादक आहे का?

हे तरी मला सध्या सुचलेले प्रश्न आहेत. आणि हे मुद्दाम खोडीलपणा करण्यासाठी किंवा कशी जिरवली असे म्हणण्याकरता विचारलेले नाहीत. या प्रश्नांना लिनक्स मध्ये उत्तरं असतील तर लगेच विंडोजला लाथ मारुन लिनक्स टाकायची माझी तयारी आहे. नाहीतरी बरेच दिवस माझे मन मला आतून खात आहेच. :D त्यामुळे लिनक्सप्रेमींनो आता तुमच्या इज्जतचा सवाल आहे असे म्हणता येईल.

(याउलट नवीन खिडकी वापरताना आधीची बरी होती असे वाटते.)

खी: खी: खी:

-सौरभ.

==================

+

या प्रश्नांना लिनक्स मध्ये उत्तरं असतील तर.............

आहेत ना उत्तरं साहेब ! हे घ्या.

१) लिनक्स मध्ये खेळायला काही टाईमपास गेम्स आहेत का? आणि काही रेसिंग गेम?
- उबंटू सॉफ्टवेअर सेंटरवर सुमारे ४८८ विविध गेम्स उपलब्ध आहेत.
२) मला माझ्या कॅमेर्‍याच्या रॉ फाईल्स संपादायला काही सॉफ्टवेअर्स आहेत का? फोटोशॉपच्या तोडीचे असेल तर बरे
होईल.
- गिम्प (Gimp), क्रिता (krita) इ.
३) गाणी ऐकायला उत्तम प्लेअर्स उर्फ वादक आहेत का?
- बरेच आहेत पण मी व्ही.एल.सी. सुचविन.
४) मी बर्‍याचदा Avi फाईल्स Mp4 करुन पीएसपीत बघतो. या कामासाठी काही व्हिडीओ कन्व्हर्टर्स उर्फ रुपांतरक आहेत
का?
- Avidemux , kdenlive
५) टोरन्ट डाऊनलोडिंग जमते का? त्यासाठी काय आहे? नाहीतर गाजलेले देशीविदेशी चित्रपट कसे मिळणार? -
ट्रान्स्मिशन बीट टोरेंट.
६) डीव्हीडीज राईट करणे हे माझे जवळजवळ दर आठवड्याचे काम आहे. यासाठी काय आहे?
- ब्रासेरो (brasero) डिस्क बर्नर
७) पुढे मागे मला चांगला FTP client पण लागेलच. त्यासाठी काय करु?
- फाईलझिला
८) माझा कॅनन कॅमेरा लिनक्सला जोडला जाईल ना? की काही अडचण येईल?
अडचण येऊ नये असे वाटते. तरीही कोणते स्पेसिफीक सॉफ्टवेअर वापरत असाल तर सांगा.
(अवांतर : तुम्ही तुमचा आयपॉडदेखील वापरु शकता. ) हा खुलासा "आयपॉड हा कॅमेरा नाहीये यासारख्या संभाव्य
प्रश्नासाठी आहे.
९) चांगले डाऊनलोड मॅनेजर्स आहेत का? मी कधीकधी युट्यूबवरच्या फिती उतरवून घेतो नि नंतर सावकाश बघतो.
- केगेट (Kget), जीडब्ल्यूगेट (Gwet).
१०) पीएचपी फाईल्स एडिट उर्फ संपादित करायला चांगला एडिटर उर्फ संपादक आहे का?
- इमॅक्स (Emacs).

येथे तुमची अपेक्षा पूर्ण होईल.
http://wiki.linuxquestions.org/wiki/Linux_software_equivalent_to_Windows...

लिनक्स परिवारात तुमचं स्वागत करावयास उत्सुक आहोत.

याच विषयावरील उपक्रमावरील "बाप" लोकांची चर्चा येथे वाचता येईल.
http://mr.upakram.org/node/1675

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

माझ्याकडून तुटपुंजी मदत्

मी वापरते ती सॉफ्टवअर्स:
गाणी ऐकण्यासाठी : ऑडेशस
टोरंट : अझुरियस
पीएचपी फाईल्स साठी: (हे काम मी कधीच केलेलं नाही) पण अनेकांना व्हिम (किंवा व्हाय) आवडतं

डीवीडी लिहिणेसाठी

डीव्हीडीज राईट करणेसाठी k3b वापरा. अत्त्युत्तम आहे.
बाकी सॉफ्टवेअरे वरीलप्रमाणेच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विडीओ कन्वर्टर

मी बर्‍याचदा Avi फाईल्स Mp4 करुन पीएसपीत बघतो. या कामासाठी काही व्हिडीओ कन्व्हर्टर्स उर्फ रुपांतरक आहेत

ffmpeg बस नाम ही काफ़ी हैं|


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लिनक्स

लिनक्स पहिल्यांदा वापरायला लागाल तेव्हा थोडासा लर्निंग कर्व्ह आहे. पण तो एकदा पार केलात की अडचणी येऊ नयेत.
बाकी प्रश्नांची उत्तरे राजकुमार यांनी दिलीच आहेत.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

रॉ फाईल्स आणी कॅनन

रॉ फाईल्स संपादायला ---
मी UFRaw वापरतो. हे सरळ GIMP ला जोडले जाते. प्रथम रॉ फाईल UFRaw मध्ये उघडते. रॉ संपादन केल्यानंतर लगेच GIMP उघडते व पुढे नेहमीप्रमाणे ...

माझे दोन्ही कॅनन कॅमेरे (अ६०, १०००ड) व्यवस्थित जोडले जातात.
तसेच कॅनन चे १०००ड बरोबर मिळणारे, विंडोजसाठीचे सॉफ्टवेअर WINE वर ठिकठाक चालते.

मस्तच

आरागॉर्न यांच्या प्रतिसादाशी सहमत, राजकुमारांचा लेख तर आवडलाच.

मी ~ सहा वर्ष लिनक्स वापरत आहे. रेड हॅट टाईपमधले फ्लेवर्स मला फार जास्त आवडले नाहीत. खास कारण असं नाही. सुरूवातीला स्वतःच्या संगणकावर 'जेन्टू' टाकलं होतं. सुरूवातीला टाकताना त्रास होतो, दोनेक दिवस लागायचे पण पुढे सिस्टम पळते. आता उबुंटू वापरते, सध्या ८.०४ आहे, पण त्यात अलिकडे केडीई त्रास देत आहे. वेळ मिळाला की १०.०४ टाकून बघेन. ग्नोमबद्दलही अशीच, उगाच नावड आहे; कारण ग्नोम कधीच वापरलं नाही आणि आता केडीईची सवय झाली आहे.

३) आंतरजाल न्याहाळक (वेब ब्राऊजर) : आय ई च्या बदल्यात फायरफॉक्स, गुगल क्रोम इ.इ.) - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.

क्रोमवर माझ्याकडे देवनागरी फॉण्ट्स चौकोनी दिसतात. कोणाला याची काही कल्पना आहे का? अर्थात फाफॉ मस्तच् आहे त्यामुळे नाही चालला क्रोम तरी भीती नाही.

५) पीडीएफ रीडर : ऍडोब - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.

अडोब रीडर फार हेवी आहे, त्याऐवजी एव्हीन्स डॉक्यूमेंट व्ह्यूअर वापरून पहा, पीडीएफ आणि पीएस दोन्ही प्रकारच्या फाईल्ससाठी वापरता येतो. पण अर्थात अडोब रीडरएवढी फन्कन्श त्यात नाहीत.

१०.०४

१०.०४ वापराच. बूटिंग १५-२० सेकंदात होते, शटडाउन ४ सेकंद. ऑल प्रोसेसेस टर्मिनेटेड इन् ३ सेकंड्स :)

माझ्या मते केडीई थोडे बोजड झाले आहे, त्यापेक्षा ग्नोम मस्त आहे. मी हार्डीवर केडीई टाकले तेव्हा ते विस्टापेक्षाही हळू चालत होते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सवय

माझा लॅपटॉप आता म्हतारा झाला आहे त्यामुळे तुम्ही म्हणता त्यापेक्षा (कदाचित) जास्त वेळ लागू शकेल. १.८३ गीगाहर्ट्झ कोअर २ ड्युओ, २ जीबी मेमरी हे म्हातारंच ना!

केडीईची सवय म्हणून मी आता केडीई वापरते. अधूनमधून ते त्रास देतंही, पण बरेचसे त्रास मलाच निस्तरता येतात. इतरांच्या संगणकावर ग्नोम वापरताना त्रास होतो तो सवय होईपर्यंत दोन-चार दिवसही काढायची माझी तयारी नाही, बाकी काही नाही. पण् माझ्या संगणकावर व्हीस्टाच जास्त वेळ लावतं, ८.०४+केडीईपेक्षा. व्हीस्टावर स्काईप, फायरफॉक्स वगळता फारशी इन्स्टॉलेशन्सही नाहीत.

थोडा वेळ मिळेल तसं १०.०४ टाकतेच.

अहो म्हातारा कसा......?

अहो म्हातारा कसा ! मी तर पेंटीयम ४, १.८ गिगाहर्ट्झ, १ जीबी रॅम वर वापरतोय.
तुमचा लॅपटॉप तर तसा तरणाच हाय की !

केडीई ग्राफीक्ससाठी जास्त मेमरी खातो त्यामुळे वाटत असेल. शिवाय ऍप्लीकेशनची नावे ही "क" च्या बाराखडीतील.
अगदी केकता कपूर.....माफ करा एकता कपूर ने च सगळी नावे ठेवली असावीत असे वाटते.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

नेटबुक

डेल मिनी १०v: ऍटम एन२८० प्रोसेसर, १ जीबी रॅम, १६० जीबी डिस्क, १० इंची स्क्रीन.
केडीई नेटबुक प्लास्मा आरामात चालते पण ग्नोम नेटबुक एडिशन अधिक मस्त आहे. साधे ग्नोमही आरामात चालते. टॉरंटसाठी केटॉरंट अधिक आवडते. टॉरंट लावून दिवसभर आणि मी झोपल्यावरही नेटबुक चालूच राहते, तेव्हा स्वस्त आणि मस्त असा एक्सएफसीई चालवितो.
फाफॉपेक्षा थोडेसे स्वस्त एपिफनी आहे, शिवाय कॉंकररमधून ब्राऊझर आयडेंटिफिकेशन स्पूफ करणे सोपे असते. काही संस्थळे आयई शिवाय चालत नाहीत तेव्हा हे बरे पडते.

माझाही

-
माझाही विशेष तरूण नाही. खालच्या प्रतिसादात कॉन्फ आहे.
-
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

???

इंटेल आय७, ८जीबी डीडीआर३, २ जीबी ग्राफिक्स कार्ड असं काही आहे का हो तुमच्याकडे?
माझ्या ऍथलॉन एक्स२ २.९ वर मला एक्स्पी ची खिडकी रिस्टार्ट करायला कमीत कमी ३ मिनिटे लागतात. उबंटू ८ साठी २ मिनिटे तरी लागतातच.
मी व्हिस्टा / ७ वापरित नाही.

||वाछितो विजयी होईबा||

डेल

मी डेल एक्सपीएस एम १५३० वापरतो. डुओ सीपीयु २.४ गिगाहर्झ, ४ गिग रॅम.
ग्राफिक्स कार्ड VGA compatible controller: nVidia Corporation G84 [GeForce 8600M GT] आहे.
मात्र मी उबंटू ८ वापरत होतो तेव्हा मलाही २-३ मिनिटे लागायची. फास्ट बूटींग १०.०४ मध्ये झाले.
विस्टाला ३-४ मिनिटे लागतात.

अच्छा!

म्हणजे उबंटू १०.४ ची रीस्टार्ट सायकल फास्ट आहे तर! आजची रात्र डाऊनलोड आणि उद्याची सुट्टी अपग्रेड मध्ये जाणार तर.

||वाछितो विजयी होईबा||

नक्कीच

आत्तापर्यंत मी वापरलेल्या लिनक्समध्ये सर्वात जलद बूटींग लुसिडचे आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

दुरुस्ती

१०.४ मध्ये प्रकाशित आवृत्तीचे नाव 'कार्मिक' आहे, लुसिड ०९-ऑक्टो मध्ये आला होता.

चूक

10.4 मध्ये प्रकाशित आवृत्तीचे नाव लुसिड आहे. कार्मिक 9.10.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हो

गलतीसे मिस्टेक हो गया. प्रतिसाद बदलेपर्यंत तुम्ही प्रतिसाद दिलात :P

लुसिड मस्त आहे.

केडीईविषयी नावड

मला केडीईविषयी तीव्र नावड आहे. केडीई पाहिले की विंडोजची आठवण येते आणि केडीई उगाचच ब्लोटेड वाटते. ग्नोम सुटसुटीत आहे.

एव्हीन्स ऐवजी xpdf अधिक हलकाफुलका पीडीएफ वाचक आहे.

क्रोमवर माझ्याकडे देवनागरी फॉण्ट्स चौकोनी दिसतात. कोणाला याची काही कल्पना आहे का?

देवनागरी फाँट सपोर्ट टाकून पाहा. सिनॅप्टिक मध्ये देवनागरी शोधल्यावर मिळेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद...

मदतीबद्दल आभारी आहे. बहुतांश सॉफ्टवेअर्सना पर्याय आहे असे दिसते. आता पुढचा प्रश्न म्हणजे फ्लेवर कोणता वापरु? बरेच फ्लेवर्स आहेत ना? या फ्लेवर्समध्ये काय फरक असतो? एकच प्रकार काढायचा सोडून इतके वेगवेगळे फ्लेवर्स का काढले जातात/ आहेत?
सगळ्यात उत्तम फ्लेवर कोणता आहे?

-सौरभ.

==================

+

फ्लेवर्स

वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे फ्लेवर सपोर्ट करतात.उदा. कॅनॉनीकल ही कंपनी उबंटूला सपोर्ट करते.
काही लोकप्रिय फ्लेवर पुढीलप्रमाणे:
-उबंटू

-उबंटू
-के-उबंटू
-एज्यु-उबंटू
-उबंटू-स्टुडिओ

-सुसे
-मँड्रेक
-रेडहॅट
-मिंट

सर्वच लोकप्रिय आहेत आणि चांगलेही आहेत. जो तो आपल्या आवडी आणि सवयीप्रमाणे फ्लेवर वापरतो.
(उदा. मला बटरस्कॉच आईस्क्रीम आवडते, कुणाला चॉकलेट आवडत असेल, तर कुणाला प्लेन व्हॅनिला-आवड आणि सवयीचा भाग आहे.)

||वाछितो विजयी होईबा||

डेबियन

उबुंटूचे पितामह असलेले डेबियन हे फ्‍लेवरही लोकप्रिय आहे.

डिस्ट्रोवॉच या संकेतस्थळावर लोकप्रिय फ्‍लेवरांची माहिती मिळेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद...

सध्या उबंटू उतरवून घेत आहे. झाल्यावर जोडून बघतो.

-सौरभ.

==================

+

छान धागा

छान धागा आणि चर्चा
लिनक्स वापरण्याचे बरेच फायदे आहेत ते वर आलेच आहेत.
मी लिनक्सवासी होण्याची कथा थोडक्यात लिनसची कथा लिहिता लिहिता ईथे लिहिली होती :-)

सध्या विंडोज नावाच्या एका दुष्टचक्रात अडकलो आहे.

लिनसची कथा

छान लेख. आवडला. दुष्टचक्रात अडकण्याचे कारण समजले नाही. इछा असेल तर मार्ग सापडेल की.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

जाहिरात

आता डेलनेही उबंटूची जाहिरात तयार केली आहे.

Ubuntu from Keith Kenniff on Vimeo.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

लबाडी

डेलचा उबुंटूवाला लॅपटॉप विंडोज लॅपटॉपपेक्षा एका पैशानेही स्वस्त नसतो. त्यापेक्षा विंडोज लॅपटॉप घेऊन स्वतः उबुंटू ड्युअल बूट करावा. शिवाय डेलच्या नेटबुक उबुंटू एडिशन कर्नल मध्ये २ जीबी रॅमविरोधी खोडा आहे असे वाचले आहे. त्यापेक्षा साईटवरून घेणेच चांगले.

याचा अर्थ

समजा मी एकच कॉन्फिगरेशन असलेले दोन ल्यापटॉप घेतले, एकात विंडोज आणि दुसर्‍यात लिनक्स. पहिल्यासाठी मला खिडक्यांचे पैसे मोजावे लागतील. दुसर्‍यासाठी जर तीच किंमत असेल तर ती रक्कम कुठे जाते? की उबंटूही खिडक्यांच्या किमतीला विकतात?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

एक्जॅक्ट्ली

तेच तर म्हणतो आहे.
शिवाय अल्ट्रालाईट संगणकांसाठीच्या विंडोज एक्सपी च्या परवान्यात १ जीबी रॅमची मर्यादा आहे. त्यामुळे उबुंटूच्या कर्नलमध्येही तसाच हँडिकॅप घालून एक लेवल प्लेइंग फील्ड केले आहे अन्यथा स्वतः २ जीबी रॅम टाकण्याची इच्छा असलेले लोक उबुंटूवाला लॅपटॉप घेण्यास (स्वस्त असो वा नसो) प्रेरित होतील. उबुंटूचा लॅपटॉप संस्थळावर विकत घेण्यासाठी बरेच हुडकावे लागते, थेट दुवा देत नाहीत.

मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट ह्या उत्पादकांना स्वस्त दरात गठ्ठा परवाने देते त्यामूळे ह्यांना वाजवी दरात संगणक विकणे शक्य होते. पण ही घसघशीत सूट मिळण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अटींचे बंधन असण्याची शक्यता आहे. जसे की इतर ऑपरेटिंग सिस्टम असलेले संगणक विंडोज पेक्षा कमी किंमतीला विकायचे नाहीत.

उबंटूवाला संगणक हवा असल्यास सुटे पार्टस विकत घेउन स्वतः असेंबल करावा. (डेल वगैरेच्या भानगडीत न पडता) म्हणजे स्वस्त पडेल. शिवाय कॉन्फिगरेशन निवडण्याचे स्वातंत्र्यही राहील. (लॅपटॉपच्या बाबतीत हे शक्य नाही)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

डेल

शिवाय कॉन्फिगरेशन निवडण्याचे स्वातंत्र्यही राहील. (लॅपटॉपच्या बाबतीत हे शक्य नाही)
डेल मध्ये कॉन्फिगरेशन निवडता येते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हे नविनंच आहे..

डेलच्या दुकानात साधं पाहिजे त्या कंपनीचा मदरबोर्ड (हव्या असलेल्या चिपसेट सहीत) हव्या त्या ग्राफिक्स कार्डाबरोबर घेता येतो का?
त्यांनी निवडायला दिलेले मोजके चार कंपोनंट वापरून कॉन्फिगरेशन बनवणे म्हणजे निवड स्वातंत्र्य नाही. (त्यातही बर्‍याचदा हा प्रोसेसर घेतलात तर ही हार्ड डीस्क मिळणार नाही वगैरे अगम्य अटी)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

कुठे स्वातंत्र्य, कुणा स्वातंत्र्य?

कंझ्युमरिजममधील निर्णयस्वातंत्र्य येथे पहाता येईल.

As you adequately put, the problem is choice. But we already know what you are going to do, don't we? -- The Architect (The Matrix: Reloaded)क्ष्

हा हा हा

झकास दुवा श्री. रिकामटेकडा. :)

मस्त फ्लो-चार्ट

We have to believe in free will. We have got no choice

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
क्ष्

डेलची आणखी एक लबाडी

येथे वाचा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर