मी लिनक्सवासी झालो त्याची कथा.........

फार्फार वर्षापूर्वीपासूनच मला लिनक्स वापरायची खुमखुमी होती. त्याची कारणे वेळोवेळी बदलत गेली मात्र खुमखुमी तशीच राहिली.
कारण क्र. १ : मी ऐकलेला सुविचार : "Linux is not for everybody" मला "everybody" असण्यापेक्षा "somebody different" होण्यात इंटरेस्ट होता.
मात्र त्यावेळी फॅशन शो मधील कपड्यांचा व्यवहारात जेवढा फायदा असेल तेवढाच लिनक्स चा होता.
कालाय तस्मै: नमः या उक्तीप्रमाणे फॅशन शो मधे बघीतलेली वस्त्रप्रावरणे ललनांच्या अंगाखांद्यावर (काहीतरी चुकतंय इथं !) दिसू लागली आणी त्याचप्रमाणे लिनक्सदेखील दैनंदिन गरजा भागविण्याच्या द्रुष्टीने सक्षम होते गेले. (येथे कपड्यांचा प्रवास कमाल पासून किमान पर्यंत आणी लिनक्स चा प्रवास किमान पासून कमाल असा होत गेला असा अर्थ घ्यावा.)

नमनालाच घडाभर तेलं संपलयं.... आता मूळ मुद्द्याकडे.........

तर लिनक्स वापरण्याची अपेक्षा वाढण्याची कारणे.....
१) लिनक्स मोफत आहे. (जर तांत्रिक सेवा हवी असल्यास पैसे मोजावे लागतात.)
२) तुमच्या जुन्या संगणकावर देखील उत्तम प्रकारे चालते.
३) सध्यातरी संगणक विषाणू मुक्त आहे. (मात्र विषाणूप्रतिकारक सॉफ्टवेअर ही उपलब्ध आहेत.)
४) दैनंदिन वापरातील विंडोज वर होणारी जवळजवळ सारी कामे लिनक्सवर करता येतात.
५) खिडक्या वापरुन कंटाळा आला होता.
६) आपण चोरीचे सॉफ्टवेअर्स वापरतोय पण त्याचवेळी विकत घेऊन वापरणे शक्य नाही ही भावना देखील प्रबळ होत गेली.

तर अशाच कारणांमुळे मी लिनक्स कडे आकर्षीत झालो. मग सुरु झाला मला हव्या असणार्‍या योग्य लिनक्स चा शोध.
मी हार्डवेअर क्षेत्रातच काम करीत असल्यामुळे काही सॉफ्टवेअर्स अतिशय म्हणजे अतिशय गरजेची होती. ती अशी.....

१) ऑफीस सुट : सगळीकडे मायक्रोसॉफ्ट ऑफीस वापरुन बनविलेल्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट फाईल्स उघडणे, त्यात बदल करणे आणि पुन्हा मायक्रोसॉफ्ट
ऑफीस वाचू शकेल अशाप्रकारे सेव्ह करणे. ( ओपन ऑफीसने हा प्रश्न सोडविला. वापरण्यास अगदी सोपे आणी मायक्रोसॉफ्ट ऑफीस सारखेच.)

२) इमेल : ही सुविधा हवी म्हणजे हवीच. इमेल म्हणजे आजच्या युगातली ढाल, तलवार, माहितीकोष इ. इ. तुम्हीही कोणतेही विशेषण घ्या. ते इथे लागू होणारच.
पूर्वी संगणक साक्षर आणी निरक्षर हा भेद होता. तो आता जवळपास नाहीच. मात्र मेल वापरता येणारा तो साक्षर आणि नाही तो निरक्षर हा या युगाचा नवीन नियम
आहे. तुम्ही तुमच्या सहकार्‍याच्या / बॉसच्या मांडीला मांडी लाउन बसत असाल, रोज त्याला तोंडी सुचना / कामाचे अपडेटस देत असता. मात्र एखाद्या अवघड
क्षणी तो तुम्हाला "मेल पे डाला था क्या ?" असे विचारुन खिंडीत गाठतो. त्यावेळी जर तुमच्याकडे मेलची कॉपी मिळाली नाही तर तुम्ही मेलातच समजा.
(ह्या अवघड क्षणी मोझीला थंडरबर्ड अगदी देवासारखा धावून येतो. तो तुमचे आऊटलुकचे मेल वाचून आपल्या फॉरमॅटमधे सेव्ह करु शकतो. मी तर विंडोजवरही
मोझीला थंडरबर्ड वापरत असल्याने माझे काम अगदी सोपे झाले.)

३) आंतरजाल न्याहाळक (वेब ब्राऊजर) : आय ई च्या बदल्यात फायरफॉक्स, गुगल क्रोम इ.इ.) - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
४) ऑडिओ / व्हिडिओ : व्ही.एल.सी. प्लेयर : - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
५) पीडीएफ रीडर : ऍडोब - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
६) टीमव्ह्युवर : इंटरनेटवरुन दुसरा संगणकाशी जोडून त्याचा ताबा घेऊन त्याला मदत करणे : - विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.

आणी याव्यतिरीक्त इतर अनेक ऍप्लिकेशन्स... त्याबद्दल पुढील लेखात......

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

लेखनविषय: दुवे:

Comments

लबाडी कशी काय?

ह्यात डेलची लबाडी काय? विंडोजवाले संगणक घेणार्‍या ग्राहकांची संख्या बघता मायक्रोसॉफ्टने त्यांच्यावर इतर ऑपरेटींग सिस्टमवाले संगणक विकण्यास दबाव आणल्याची सहज शक्यता आहे. आणि धंद्याचे गणित मांडले असता डेलला मायक्रोसॉफ्टचे ऐकणे शहाणपणाचे आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

धन्यवाद.

फारच उत्तम महिती.

धन्यवाद.

व्हर्चुअल मशिन

ज्यांना विंडोजवरच लिनक्सचा उपयोग करुन पाहायचा आहे, त्यांना व्हर्चुअल मशिन सोयीच्या पडतात. व्ही. एम. वेअर वापरता येते. एकदा रुळले की, पुढचे मशिन उगीचच भारीतले घेऊन ६०० वॉट पर्यंत वीज जाळण्यापेक्षा, साधे मशिन घेऊन त्यावर लिनक्स पळवता येते.

विंडोजवरच लिनक्सचा उपयोग

उबंटू करिता व्हर्च्युअल मशिनची सुद्धा गरज नाही. विंडोजचे एक ऍप्लिकेशन म्हणून टाकता येते. मशिन पुन्हा सुरु करताच ड्युअलबुट तयार. व्हर्च्युअल मशिन करिता हे सुद्धा वापरता येईल. लिनक्स टाकून त्यात विंडोज सुद्धा करता यावे असे वाटते.






हो

लिनक्स टाकून त्यात विंडोज सुद्धा करता यावे असे वाटते.

तुम्ही दुवा दिला आहे ते वर्च्युअलबॉक्स लिनक्समध्ये वापरून विंडोज इन्स्टॉल करता येते.

पण तुम्ही "उबंटू करिता व्हर्च्युअल मशिनची सुद्धा गरज नाही. विंडोजचे एक ऍप्लिकेशन म्हणून टाकता येते. मशिन पुन्हा सुरु करताच ड्युअलबुट तयार." हा जो उल्लेख केला आहे तो बहुदा वुबीचा असावा. वुबी टाकून काय आणि साधे इन्स्टॉल करून लिनक्स टाकले काय, ड्युअलबूट केले म्हणजे विंडोज आणि लिनक्स हे एकाच वेळी वापरता येणार नाहीच. एकाच वेळी वापरण्यासाठी वर्च्युअल मशीन हवेच.

एकाच वेळी वापरता आले पाहिजे!

खरे आहे, एकाच वेळी वापरता आले पाहिजे, म्हणजे लोकांना जास्त सोपे आणि सोयीचे वाटते. आजच व्हर्च्युअल बॉक्स वापरुन पहात आहे.

एकाच वेळी

एकाच वेळी दोन्ही हवे असेल तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण एकाच वेळी दोन्ही वापरण्याची गरज आहे?

वुबी नाही टाकावे लागत. चकती सरकवल्यावर तुम्हाला मेसेज येतो, कि कसे हवे आहे? तुम्ही वर लिहिलेला पर्याय निवडल्यास एक प्रोग्रम म्हणून तयार होतो आणि काढताना पण एखादे ऍप्लिकेशन काढावे तसेच काढता येते.






नाव

त्याचे नाव वुबीच असेल असे वाटते.

उबंटू १०.०४ चालत नाही

माझ्याकडे उबंटू ९.१० व्यवस्थित चालू होते. एप्रिल २०१० मध्ये १०.०४ आल्यानंतर अपग्रेड करायचा प्रयत्न केला - पण लॉग इन स्क्रीन जवळच गाडे अडून बसू लागले. म्हणून उबंटू १०.०४ स्वतंत्रपणे डाऊनलोड करून पुन्हा प्रयत्न केला, पण व्यर्थ. लाईव्ह सीडी म्हणूनही चालत नाही. ("सेफ" मोडमधे "no screen found" अशी एरर दिसते).
हा प्रकार दोन वेगवेगळ्या संगणकांवर करून पाहिला - दोन्हीकडे चालला नाही. आणि त्या दोन्ही संगणकांवर आजही ९.०४ व्यवस्थित चालते.

गूगलवर सापडलेले उपाय चालले नाहीत. कोणाला असा अनुभव आला आहे का? उपाय माहीत आहे का?

-अमित

कठिण

तुमच्या संगणकात कोणते अतिरिक्त विडिओ कार्ड आहे का? xorg.conf मध्ये विजीए करून पाहिलेत का?
संगणकांचे रचनातपशील (कॉन्फिग) काय आहे?
गूगलवर काय सापडले? त्यातील कोणते उपाय केलेत?

उत्तर

sudo apt-get update && sudo apt-get dist-upgrade असे केले होते.

संगणक IBM thinkpad T43 Pentium-M 2 gb ram आणि Dell vostro 1700 + core 2 duo + 2 gb ram असे आहेत.

xorg.conf मधे विजीए करून बघतो.

धन्यवाद,
अमित

हे फक्त १०% समस्येतून पार पडण्यासाठी .. सॉरी रिकामटेकडेभाऊ, तुमचे स्क्रिप्ट पुढच्या वेळी नक्की वापरले जाईल! हे फक्त १०% समस्येतून पार पडण्यासाठी .. सॉरी रिकामटेकडेभाऊ, तुमचे स्क्रिप्ट पुढच्या वेळी नक्की वापरले जाईल!

'अल्टरनेट' सीडी

उबंटू ची एक अल्टरनेट सीडी म्हणून प्रकार् येतो, तो वापरुन पहा
आणि सीडी कमी स्पीड वर लिहून बघा काही फरक पडतो का

लॉगिन स्क्रीन दिसते आहे म्हणजे व्हिडियो कार्ड चा इश्यू नसावा.

 
^ वर