ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उघड उघड संपूर्ण ग्राम पंचायतचाच घोडेबाजार मांडला

घोडे बाजार .... भारतीय राजकारण्यांच्या सत्तालोलुपपणाला, नित्तीमत्ता लाज-लज्जा गुंडाळून पैश्या साठी जनतेच्या मताशी बेईमान होत स्वत:ला विक्रीस काढणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या व्यवहारास घोडेबाजार असा शब्द प्रचलित झाला. घोड्यांच्या बाजारात विविध जातीचे घोडे,गाढव खेचरे विकावयास येतात. या घोड्यांची किमत कांही हजारो पासून करोडो रुपयान पर्यंत असते. जे जनावर अधिक गुणवान तेवढी त्याची जास्त किमत हा या बाजाराचा कायदा असतो.पण राजकारण्यांच्या घोडे बाजारात जो राजकारणी अधिक बेईमान अवगुण वाला असतो त्याची किमत सर्वात जास्त तर जो गुणी इमानदार त्याची किमत शून्य असा उलट न्याय या बाजारात या मुळे या बाजाराला घोडे बाजार म्हणणे हा अस्सल घोडे बाजाराचा अपमान आहे , येथे फक्त गुणांनाच किमत असते हे लक्षात घ्या.
हा घोडे बाजार आयाराम गयाराम सुरु करण्याचे श्रेय १९७० च्या दशकात हरियाना राज्यातील बन्सीलाल,देवीलाल आणि भजनलाल याना जाते यांनी सुरु केलेला घोडेबाजार जंगलाल लागलेल्या आगी सारखा संपूर्ण भारतात लगेच पसरला. कोणताही पक्ष या आगीच्या कचाट्यातून सुटला नाही. भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा आपले पद सरकार वाचवण्या साठी घोडेबाजाराचा आसरा घ्यावा लागला या घोडेबाजारा मुळे पक्षा पेक्षा व्ययक्तिक राजकारणाचे फायद्या तोट्याचे स्वरूप आले.
आता पर्यंत हा व्यवहार उच्च पातळी वरील नेत्यांच्या देखरेखीत गुपचूप चालत होता. पण संसद,विधान सभा, जिल्हा परिषद, नगर पालिका,ग्राम पंचायत अंतर्गत निवडणुकीतून दिसून येत होता. सर्वच बेईमान असल्याने टेरी भी चूप मेरी भी चूप असा हा बाजार धंदा झाला होता.
हे पाहून जनता मतदार देखील या बाजारात सामील झाला. ग्रामीण भागातील मतदारांनी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उघड उघड संपूर्ण ग्राम पंचायतचाच घोडेबाजार मांडला .आणि जो पक्ष गावाला जास्तीतजास्त रक्कम देयील त्यास बिविरोध निवडायचे अशी प्रथाच सुरु केली .आता वरती मागून घोडे या म्हणी प्रमाणे शासनाने याची चोकशी करण्या साठी आयोग नेमला .या आयोगाचा अहवाल हाती येई पर्यंत दोन-चार निवडणुका सहज होवून जातील आणि तो पर्यत अनेक विधानसभा, कदाचित लोकसभा संसद सुद्धा कोणी तरी पक्ष किंवा जागतिक कंपनी ५ वर्षा साठी लिलावात विकत घेवून राज्य कारभार करण्यास सुरुवात करेल आणि घोडे बाजारास कायेदेशीर मान्यता देईल
जाता जाता.....
या सर्व घोडे बाजारास आपणच जबाबदार आहोत. आपणाला नशिबाने दर ५ वर्षाने ही बाजारू सत्ताधारी बदलण्याची संधी मिळते, पण आपण ही संधी जात, धर्म, पैसा, दारू यात घालवून बसतो. आणि शिकलेले मतदार माझ्या एक मताने काय होणार म्हणत विक एंड साजरा करत घरात रामायण महाभारत पाहत बसतो,जणू कांही समाजात चालू असलेल्या महाभारताशी याचा कांही संबंध नाही, किंवा शिर्डीच्या दर्शनाला निघून जातो . जसे कांही हे बाबा यांच्या सर्व समस्या दूर करणार घोडे बाजार बंद करणार आहेत. यामुळे जशी जनता तसे राज्यकर्ते ही म्हण आठवते.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

"भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा आपले पद सरकार वाचवण्...":

प्रकाश बा. पिंपळे has left a new comment on your post "भारताच्या पंतप्रधानाला सुद्धा आपले पद सरकार वाचवण्...":

या घोडे बाजाराची खरी जिम्मेदारी आपलीच आहे. आणि या घोडे बाजाराचे अनेक प्रकार आहेत. येथे घोडा सरळ विकत घेतला जातो तर कधी मध्यस्थांच्या हस्ते फुकट सुद्धा.
आपण या राष्ट्राचा भविष्य आणि आपल्या लेकरा बाळांचा भविष्य वाचवू शकतो, हा घोडा बाजार थांबवून. काही गोष्टी सगळ्यांनाच कराव्या लागतील, तश्या गोष्टी साध्याच आहेत पण खूप महत्वाच्या -
१) भ्रष्ट आणि गुंड राजकारण्यांना मतदान करूच नये
याचे 'काही' सरळ तोटे- ते सत्तेवर आले की ते काळजी करणार नाहीत की तुमच्या घर जवळचा रस्ता नित आहे की नाही.
ते एक कॉलेज खोलतील तेथे तुमच्याच मुलाला भरमसाठ फी भरावी लागेल
२) अशा राजकारण्यांनी विकत घेतलेलं वर्तमान पत्रे वाचू नये, कारण पेड जर्नालीसम च्या जोरावर बराच काही चालय
Posted by प्रकाश बा. पिंपळे to THANTHANPAL BLOG

 
^ वर