परत एकदा जेम्स लेन

श्री. धम्मकलाडू यांनी या विषयावर एक धागा 2,3 दिवसापूर्वीच सुरू केला होता. त्यातच प्रतिसाद न देता हा नवीन धागा मी का सुरू करतो आहे असे काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. परंतु श्री. धम्मकलाडू यांच्या धाग्यात एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटते म्हणून हा खटाटोप.
प्रथम हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मी वाचलेले नाही आणि वाचनाची इच्छाही नाही. परंतु या पुस्तकाची काही परीक्षणे मी आंतरजालावर वाचली. त्यावरूनच मी ही निरिक्षणे करतो आहे.
जेम्स लेनच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश शिवाजीचा इतिहास सांगणे हा नसून, शिवाजीच्या कारकीर्दीने व कर्तुत्वाने महाराष्ट्रावर व मराठी माणसांच्यावर जो एक कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवला आहे तो खरोखर योग्य आहे का? की पोवाडेकार व बखरकार यांच्या अतिरंजित वर्णनांमुळे एक HYPE निर्माण हो ऊन त्यामुळे असे झाले आहे याचे विश्लेषण करण्याचा आहे असे दिसते.
या विश्लेषणामधून जेम्स लेन या अनुमानापर्यंत पोचल्यासारखा दिसतो की शिवाजीचे कर्तुत्व असाधारण असले तरी त्याला हिंदवी साम्राज्याचा संस्थापक म्हणणे योग्य ठरणार नाही. या साठी तो प्रमुख दोन कारणे देतो. पहिले म्हणजे सुरवातीच्या कालात शिवाजीने घेतलेली अदिलशाहच्या दरबारातली मनसबदारी व मिर्झा राजे यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार त्याने मोगलांच्या दरबारात स्वत: व आपले चिरंजीव संभाजीराजे यांच्यासाठी मान्य केलेली याच प्रकारची मनसबदारी. शिवाजीने मोगलांचे राज्य तोडण्याची जी कामगिरी केली त्यामुळेच या इस्लामिक देशावर प्रभुत्व मिळवणे ब्रिटिशांना सोपे गेले असेही या साहेबमजकुरांना वाटते.
मी वाचलेल्या माहितीप्रमाणे हे जेम्स लेन साहेब इतिहासकार वगैरे नाहीतच. आपल्या पुण्यातल्या वास्तव्यात त्यांनी शिवाजीबद्दल ही माहिती जमा केली व हे अकलेचे तारे तोडले आहेत.
कोणतेही मोठे कार्य उभे करताना काही वेळा परिस्थितीमुळे व काही वेळा व्ह्युहात्मक माघार घ्यावी लागते हे या साहेबांना बहुदा माहिती नसावे. तसेच 400 वर्षाच्या परकीय अंमलाखाली एखादा देश जेंव्हा गुलामगिरीत खितपत पडलेला असतो तेंव्हा त्या देशातील सामान्य जनतेची अस्मिता जागृत करणे हे केवढे मोठे कर्तुत्व आहे याची या साहेबमजकुरांना कल्पना येणे अशक्यच वाटते. एवढ्या शक्तीमान मोगल शहेनशहाच्या राज्याचे तीन तेरा वाजवून मराठी साम्राज्य उभे करण्यात शिवाजीने प्रारंभ केला व त्यांचे कार्य थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पूर्ण केले, या इतिहासाचे एवढे विकृत विश्लेषण करण्याचे धाडस या जेम्स लेन प्रोफेसर मजकुरांनी केवळ स्वत:च्या अज्ञानापोटीच केले असावे असे दिसते. पुस्तकाला नाव देताना सुद्धा त्यांनी पुस्तकाला इस्लामिक देशाचा हिंदू राजा, असे नाव देऊन भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची करामत करून दाखवली आहेच.
एक हती व दहा आंधळे यांची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. शिवाजीसारख्या असामान्य कर्तुत्वाच्या एक ऐतिहासिक व्यक्तीचे या अज्ञानी साहेबांनी केलेले हे विश्लेषण या आंधळ्यांच्या निरिक्षणांइतकेच महत्वाचे वाटते. या कारणांमुळेच पुण्यातील सर्व इतिहासतज्ञांनी हे पुस्तक अतिशय चुकीच्या माहितीने भरलेले असून ते प्रसिद्ध करू नये अशी विनंती प्रकाशकांना केली होती व ती त्यांनी मान्य करून माफीनामाही सादर केला होता.
एक निरर्थक, निष्कारण व मूर्खपणाने केलेली लेखी बडबड इतकेच महत्व या पुस्तकाला आहे. या पुस्तकावर बंदी घालावी असे काहीही या पुस्तकात नाही. या पुस्तकाला एकच जागा आहे ती म्हणजे कचर्‍याची टोपली! असे मला वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

आपण दिलेला सभासदाच्या बखरीतला भाग वाचला. तो मी वाचलेल्या हकीकतीशी मिळताजुळता नाही हे उघडच आहे. कधीकधी सभासदाची बखर अपुरी तर कधीकधी निखालस चुकीची माहिती देते, कधी कालविपर्यास असतो त्यामुळे ती इतर साधनांवरून तपासून घ्यावी लागते. मी दिलेली हकीकत ही डॉ. श्रीनिवास सामंत यांच्या लेखमालेत वाचली होती.

अफझलखानाने आधी गळा धरला की शिवाजीने अनप्रवोक्ड वाघनखे मारली तेही माहिती नाही.


इथे शक्यता जास्त अशी आहे की शिवाजीने अनप्रोवोक्ड वाघनखे मारली. त्याला कारणेही आहेत. एक म्हणजे अफजलखान पठाण होता आणि शिवाजीचा पठाणांवर विशेष राग. याच कारणाने शिवाजीने प्रतापरावास "पठाण (बहलोलखान) मारा आणि मगच मला तोंड दाखवा" असा आदेश दिला. दुसरे असे की शहाजीला गाफील पकडण्यात अफजलखानाचा हात होता. तिसरे म्हणजे संभाजीच्या (शिवाजीच्या मोठ्या भावाच्या) मृत्यूस अफजलखान कारणीभूत ठरला होता. कर्नाटकातील एका जहागीरदाराच्या गढीस संभाजी वेढा घालून बसलेला असताना अफजलखानाने मदतीस येणे अपेक्षित होते, तो मुद्दाम आला नाही आणी त्यात संभाजीचा मृत्यू झाला.

विनायक

शहाण्यास शब्दांचा....

@रिकामटेकडा

सकाळ संध्याकाळ एकाच विषयावर अनावश्यक वाद घालण्यास मी रिकामटेकडा नाही.
तुमची महाराजांवरील टीका ही अभ्यासपुर्ण नसून केवळ त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केली आहे हे स्पष्ट आहे.

तुम्ही खालच्या पातळी येऊन टीका केलीत म्हणजे मी पण तसेच प्रत्युत्तर् दिलेच पाहिजे असे नाही. उगीचच खाजवून खरुज काढण्यात काय हशील! काही लोकांस कितीही सांगितले तरी कळत नाही. अशांचे काय करावे हे ठणठणपाळांनी सांगितले आहेच.

जयेश
.............................................................
नको रे मना वाद हा खेदकारी।
नको रे मना भेद नानाविकारी॥
नको रे मना शीकवूं पूढिलांसी।
अहंभाव जो राहिला तूजपासी

प्रतिसाद

सकाळ संध्याकाळ एकाच विषयावर अनावश्यक वाद घालण्यास मी रिकामटेकडा नाही.

हा वाद अनावश्यक नाही.

तुमची महाराजांवरील टीका ही अभ्यासपुर्ण नसून केवळ त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने केली आहे हे स्पष्ट आहे.

तुम्ही खालच्या पातळी येऊन टीका केलीत म्हणजे मी पण तसेच प्रत्युत्तर् दिलेच पाहिजे असे नाही. उगीचच खाजवून खरुज काढण्यात काय हशील!

शिवाजीची बदनामी हा माझा उद्देश नाही. तसा आरोप करून माझी बदनामी करू नका. मी खालच्या पातळीवर येऊन टीका केलेली नाही. तसा आरोप करून माझी बदनामी करू नका.

काही लोकांस कितीही सांगितले तरी कळत नाही. अशांचे काय करावे हे ठणठणपाळांनी सांगितले आहेच.

=))

चांगला व नवीन मुद्दा

शिवाजी-प्रतिमा ही महाराष्ट्रात आज खोल रुजलेली आहे ती कशी काय उमटलेली आहे, बखरकारांमुळे की काय? हा चांगला मुद्दा आहे. राजारामशास्त्री भागवतांचे लेखन वाचता असे समजते की मधल्या इंग्रजी काळात शिवशाहीबद्दल स्फूर्ती महाराष्ट्रात फार कमी झाली होती, आणि कथाही पुसट होत चालली होती. बखरकारांचे अध्ययन करून आणि भागवत-टिळक-राजवाडे वगैरे मंडळींनी ती कथा महाराष्ट्राला पुन्हा स्फूर्तिदायकपणे सांगितली. एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे... असे करत करत शेकडो वर्षांच्या नंतर एखादी स्फूर्तिदायक कथा कशी पोचते, हा अभ्यास जरूर करण्यालायक आहे.

मात्र कथा आणि प्रेरणा-आरोपण कसे झाले, याबाबत जेम्स लेनचे काय मत आहे, ते ग्राह्य की अग्राह्य, हे तुमच्या लेखातून मुळीच कळत नाही.

तुमची टीका बहुतकरून याबाबतीतली नसून इतिहासातील तपशीलांबद्दलच आहे. (म्हणजे अमुक माघार धोरणात्मक होती, वगैरे.) पुढील प्रतिसादांतून बखरकारांचे योगदान काय याबद्दल तुम्ही अधिक सांगाल ही आशा आहे. हा वेगळा आणि नवीन मुद्दा आहे, सहमत.

बखरकार

बखरकारांनी शिवाजीच्या चरित्राचे वर्णन सत्यास धरून केले आहे की अतिरंजित? हा खरा वादाचा मुद्दा आहे. यासाठी कोणती तरी बखर मुळातून वाचून त्यावरून आपले मत ठरवणे जरूरीचे आहे अहे असे मला वाटते.

विनायक लक्ष्मण भावे (1871-1926) हे ठाण्याचे एक साहित्यिक. महाराष्ट्र सारस्वत हा ग्रंथ यांचाच आहे. यांना मराठीमधले पहिले इतिहासकार असे म्हटले जाते. या श्री भाव्यांनी संपादित केलेला एक उत्कृष्ट ग्रंथ सुदैवाने आज आंतरजालावर उपलन्ध आहे व तो सहजतेने वाचता येतो. या ग्रंथात भोसले घराण्याचा संपूर्ण इतिहास, सातार्‍याच्या महाराजांच्याकडे ज्या बखरीत उपलब्ध होता ती संपूर्ण बखर पुनर्मुद्रित केलेली आहे. माझे श्री धनंजय व इतर सर्वांना विनंती आहे की हा ग्रंथ आपण नजरेखालून घालावा.
ही बखर वाचल्यावर हे अतिरंजित वर्णन आहे की इतिहास सांगण्याचा (With some bias) एक प्रामाणिक प्रयत्न आहे हे वाचकाने ठरवायचे आहे.
चन्द्रशेखर

अतिरंजित(?)

बखर वाचताना गोसाव्यांची वरदाने, देवतांचे दृष्टांत यामुळे अतिरंजितपणा दिसतोच परंतु एकंदर काहीतरी गंडल्यासारखेही वाटले. बखरीत संभाजीचा (शिवाजीराजांचे मोठे भाऊ) मृत्यू राजांच्या जन्मापूर्वीच वर्णन केला आहे. पुत्र पोटी नसल्याने शहाजीराजांनी शंकराला नवस केले वगैरे म्हटलेले आहे. तसेच, राजांच्या जन्मावेळी झालेल्या धामधुमीत जिजाबाईस शिवनेरीवर आणि संभाजीच्या पत्नीस अपत्य नसल्याने तिचीही सोय इतरत्र केल्याचे तपशील आहेत(???) हे काही कळले नाही.

असो. तूर्तास, बखर पूर्ण वाचलेली नाही आणि हा सर्व भाग अवांतर असल्याने येथे चर्चा अनावश्यक असावी.

वरदाने व दृष्टांत

ज्या कालात ही बखर लिहिली गेली आहे त्या कालात नवस, देवी स्वप्नात येणे, वरदान, दृष्टांत या सर्व गोष्टींच्यावर सर्वसामान्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे या गोष्टींच्या वर्णनाना अतिरंजित म्हणू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.

चन्द्रशेखर

सामान्यांचा विश्वास

ज्या कालात ही बखर लिहिली गेली आहे त्या कालात नवस, देवी स्वप्नात येणे, वरदान, दृष्टांत या सर्व गोष्टींच्यावर सर्वसामान्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे या गोष्टींच्या वर्णनाना अतिरंजित म्हणू नये असे माझे वैयक्तिक मत आहे.

आपले मत योग्य आहे परंतु सदर बखरीत वरदाने आणि दृष्टांतांचा सुकाळ आहे. हे मी सुमारे १५ पाने वाचल्यावर म्हटले आहे. म्हणून अतिरंजित म्हटले. याशिवाय, संभाजीच्या मृत्यूची चूकही दाखवली आहे. शहाजींना पुत्रहीन ठरवून नंतर देवाचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजीचा जन्म वगैरे लिहिणे हे अतिरंजित वाटते.

मी पुस्तक वाचेन

केवळ परीक्षणे वाचून पुस्तकाचे आणखी एक परीक्षण (एक निरर्थक, निष्कारण व मूर्खपणाने केलेली लेखी बडबड इतकेच महत्व या पुस्तकाला आहे.) करण्यापेक्षा मी पुस्तक वाचेन. अर्थातच, पुस्तके वाचणे न वाचणे ही वैयक्तिक बाब आहे. मी सॅटनिक वर्सेस वाचलेले नाही. ते वाचावे अशी इच्छाही मला झालेली नाही आणि ती इच्छा अनेक परीक्षणे वाचूनच झालेली नाही हे मी मान्य करेन. परंतु, तसे साहित्यप्रकार वाचणे ही माझी आवडही नाही.

असो. मी ऐतिहासिक सर्व टुकारपट बघते. (अलेक्झांडर, ट्रॉय, नॅशनल ट्रेजर इ. इ.) याचे कारण मी सर्वज्ञ नाही आणि ऐतिहासिक संदर्भ दिलेल्या कलाकृतीत १००% सर्वच चुकीचे असेल असेही नाही. अनेकदा काहीतरी बघताना ४ वेगळे संदर्भ/ लीडस् मिळतात, त्यावर अधिक वाचन होते. अधिक माहिती समोर येते.

त्याप्रमाणेच लेन यांच्या पुस्तकात सर्वच टाकाऊ असेल असे मला वाटत नाही. ती संपूर्णतः निरर्थक, मूर्ख बडबड आहे असे म्हणण्यासाठी मी ते कदाचित वाचून बघेन.

वाचलेले नाही

ऍमेझॉन वरती हे पुस्तक तब्बल बावन्न डॉलर्सना उपलब्ध आहे. तिथली वाचकांची परीक्षणे वाचली असता (२ चांदण्या) निव्वळ कुतुहल शमवण्यासाठी ५२ डॉलर्स खर्चायला धजावेना.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विचारवंत वि. बहुजन

विचारवंत वि. बहुजन अशी आडवी मांडणी झालेली आहे. बहुजन विचारवंत नसतात का? आपल्या मता प्रमाणॅ विचारवंत कोणास म्हणावे. याचा मक्ता कोणी घेतला का? त्याना हा अधिकार कोणी दिला?

तसे नाही

ज्या व्यक्तीला झुंडीची आयडेंटिटी आवडते ती बहुजनांत गणावी असे मला वाटते. नेहरूंची पूजा करणारे, सावरकरांची पूजा करणारे आणि आंबेडकरांची पूजा करणारे हे सारे सारखेच.
जी व्यक्ती स्वतःची अक्कल वापरते ती विचारवंत.

आडवी मांडणी

बहुजन विचारवंत नसतात का?
अशी आडवी मांडणी कुणी केली आहे, ते समजले नाही; तरीसुद्धा, कुठल्याही समाजात विचारवंत बहुधा अल्पसंख्यच असतात. त्या मंडळींचा उल्लेख विचारवंत असा करणारे मात्र बहुजन असतात. बहुसंख्यांना काय किंवा कुणालाच काय, अधिकार द्यावा लागत नाही. स्वतःचे वैयक्तिक मत सांगायला अधिकारपत्राची गरज नसते, अशी माझी बापडी कल्पना आहे. --वाचक्‍नवी.

आक्षेप नेमका काय आहे ?

वरील चर्चाप्रस्तावात लेन यांच्या पान क्र. ९३ [मिसळपाव संकेतस्थळावरील चर्चेत लेन यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लेखन वरील पानावर आहे असा सूर दिसला. ] वरील असा कोणता मजकूर आहे की ज्यामुळे महाराष्ट्रीय माणसाच्या भावना दुखावतील किंवा श्रद्धेला तडा जाईल त्याचा काही बोध होत नाही. त्यामुळे नक्की काय मजकूर आहे कळायला मार्ग नाही. आणि समजा असलाही काही मजकूर तर विचारांनी ते मुद्दे खोडले पाहिजेत त्यावर बंदी वगैरे असे उपाय असू नयेत असे मला वाटते.

शिवाजी महाराज जातीने धनगर होते असा काही दावा रा.चि.ढेर्‍यांनी कोणत्या तरी पुस्तकात केला होता आणि त्यावर समाधान होईल अशी उत्तरे आणि विविध संदर्भ देऊन आक्षेपार्ह वाटणारे सर्व मुद्दे इतिहासकार जयसिंग पवारांनी खोडून काढले होते, त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिले होते असे म्हणतात. (चुभुदेघे) असे काही तरी केले पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

आक्षेप

आक्षेप घेतलेले एक विधान या दुव्यावर आहे.

पुस्तकाच्या प्रती छापणार नाही/महापुरुषांचा अपमान चालणार नाही

ऑक्सफर्ड प्रेसने या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रती छापणार नसल्याचे निवेदन राज्यसरकारला दिले आहे.

त्याचबरोबर महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कृती खपवून न घेण्यासाठी नवा कायदा करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले आहे.

अशा कायद्यांचा मराठी संकेतस्थळांवर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो हे पाहणे रोचक ठरावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हॅहॅहॅ

ओरिएंट लाँगमन यांनी प्रकाशित केलेल्या जेम्स लेनच्या 'एपिक ऑफ शिवाजी' या पुस्तकातही 'लोक इडिपस (बापाला मारून आईशी लग्न करणारा 'फ्रॉइडियन') म्हणतात' असा उल्लेख आहे ना? ती उठली की नाही याची बातमी मला सापडत नाही.

पण जालाची गोष्टच निराळी आहे.
'ड्रॉ महंमद' हा 'मऊ नसलेला' खेळही 'ते' अडवू शकले नाहीत.
'जीसस ऍन्ड मो' यांचा 'पाहुणा मित्रसुद्धा' जालावर या आणि या दुव्यांवर सुखेनैव नांदतो आहे.

कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे.

 
^ वर