फ्रान्सलाही भुरळ स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वाची!

मार्सेलिस (फ्रान्स) - मार्सेलिसच्या शांत समुद्राकाठी सुरू असलेला ऐतिहासिक उडीचा शताब्दी सोहळा पाहण्यासाठी देशविदेशांतील पर्यटकांनीही गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वि. दा. सावरकरांचे कर्तृत्व समजून घेताना विदेशी पर्यटकही भारावले. "वॉव... इट्‌स ग्रेट' अशा शब्दांत त्यांनी सावरकरांच्या कार्याची प्रशंसा केली.
मार्सेलिसच्या समुद्रालगत टेकडीवर फारो बंगल्याच्या हिरवळीवर नटूनथटून आलेल्या महिला, पगडी-धोतर, झब्बा-सलवारमधील पुरुष यांना पाहून स्थानिक रहिवाशांनीही कार्यक्रमाची चौकशी सुरू केली आणि त्यातून त्यांच्यापुढे उलगडला सावरकरांच्या उडीचा शतकापूर्वीचा भारून टाकणारा इतिहास. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका व्हावी, म्हणून मोर्या बोटीतून समुद्रात उडी मारणाऱ्या त्या वीराच्या धाडसाने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. भारतातूनच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सावरकरप्रेमींनी जेव्हा मार्सेलिसचा समुद्रकिनारा पाहिला, तेव्हा "त्या' उडीच्या आठवणींनी त्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.
मासेर्लिस बंदरामध्ये दि. ७ जुलै १९१०च्या रात्री 'मोरया' बोट थांबली आणि दि. ८ जुलै १९१० या दिवशी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोलमधून त्रिखंडात गाजलेली उडी मारली आणि इंग्रजांच्या हातून निसटून जाण्याचा धाडसी प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे फ्रान्सच्या किनाऱ्यावर प्रवेश केला की ती व्यक्ती त्या देशाची नागरिक ठरते आणि अन्य देशांच्या सरकारला, त्या नागरिकाला विनापरवाना ताब्यात घेता येत नसे. या कायद्याचा लाभ उठवण्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयत्न केला. पूर्वसूचनेप्रमाणे मादाम कामा, लाला हरदयाळ हे मासेर्लिस बंदरावर येण्याचे ठरले होते; पण दुदैर्वाने त्यांना येण्यास थोडा उशीर झाला आणि ब्रिटिश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना लाच देऊन सावरकरांना ताब्यात घेऊन बोटीवर आणले. पुढे 'हेग' येथील आंतरदेशीय न्यायालयात खटला भरवून सावरकरांना सोडविण्याचा मादाम कामा, डॉ. राणा आदींनी प्रयत्न केला; परंतु ब्रिटनच्या फ्रान्सवरील दबावामुळे 'हेग'च्या न्यायालयाने सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध युरोपातील स्वतंत्र देशांतील वृत्तपत्रांनी लेख लिहून तीव्र निषेध केला. हिंदी क्रांतिकारकांनीही त्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त करून ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्याचा निश्चय केला. संपूर्ण जगातील देशांमध्येही 'हेग'च्या निर्णयाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला गेला.

या घटनेला दि. १० जुलै २०१० या दिवशी १०० वषेर् पूर्ण होतील. हा दिवस फ्रान्समध्येही साजरा करण्यासाठी भारतीय लोकांनी प्रयत्न केला आणि फ्रान्सच्या शासनाने मासेर्लिसच्या समुदकिनारी स्तंभ उभारण्याचे मान्य करून त्यासाठी जागा देण्याचेही मान्य केले. केवळ आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे, भारतीय शासनाच्या परराष्ट्रीय खात्यातून या स्मारकास संमतीदर्शक पत्र फ्रान्स शासनाकडे पाठवावे अशी सूचना करण्यात आली; परंतु भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन केंद शासनाने, केलेली ही सूचना हेतूत: दुर्लक्षित करून तसे पत्र फ्रेंच सरकारकडे धाडले नाही. तसे पत्र धाडण्यासाठी खासदार, आमदारांनी भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, आपले लेखी विनंतीपत्र सादर करावे, अशी विनंती केली. तरीही भारतीय शासनाने आपले संमतीपत्र फ्रेंच शासनाकडे पाठवले नाही. शासनाच्या या उदासीन वृत्तीचा जनतेने निंदाजनक भाषेने व लेखांद्वारे विरोध केला आणि जनताच मासेर्लिसच्या समुदकिनाऱ्यावर हे शताब्दी वर्ष साजरे करील व शासनाला तशी संमती देण्यास भाग पाडेल अशी आशा निर्माण केली. यानंतर भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद शासनाने यासंबंधी फ्रेंच सरकारला 'विना हरकत पत्र' धाडण्यात अनिच्छा व्यक्त केली. पुढे काँग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंग शासनानेही तशा अर्थाचे पत्र फ्रेंच शासनाला पाठवण्यास मनाई केली. सावरकरांचे जहाल हिंदूत्ववादी विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवत नाहीत. म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते.राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. पण पुढे त्यांची प्रतिमा आणखी मोठी होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले किंवा केले गेले. देशात कॉंग्रेसचे राज्य असल्याने आणि सावरकर कॉंग्रेसविरोधी असल्यानेही सावरकरांसंदर्भात, त्यांच्या विचारांसंदर्भात फार काही झाले नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत सावरकर द्वेष संपलेला नाही. हे भारताचे दुर्देव्य

Comments

सहमत

सावरकरांचे बहुतेक विचार मला पटतात. गांधी की सावरकर या वादात मी सावरकरांना मत देतो.

सहमत

मी तुमच्या मताशि अग्दि सहमत आहे.

सावरकरान्सार्खा क्वचितच् एखादा

हिन्दुन्रुसिन्ह्

जन्मला असेल्

वाह

thanthanpal जि

बाकि लेख फार् सुन्दर लिहिता हो तुम्हि

एक राहिले

या उडीचा परिणाम म्हणून फ्रान्स मधे मोठी घटना घडली.
तत्कालीन फ्रान्स सरकारच्या भूमीवर येऊन ब्रिटीशांनी अटक केल्याने ती त्या सरकारची नामुष्की ठरली. याचा परिणाम म्हणून तत्कालीन फ्रान्सच्या सरकारला राजिनामा द्यावा लागला.

प्रमोद

??????

असे काही घडल्याचे ऐकलेले नाही.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

माहिती

माझ्या माहितीचा दुवा सापडला नाही. मराठी पुस्तकात वाचल्याचे आठवते.
गुगल वर शोध हे सापडले http://en.wikipedia.org/wiki/Aristide_Briand त्यातील दुसर्‍या सरकारचा कालावधी उडीशी जुळतो.

प्रमोद

 
^ वर