ब्लॉगजगत्??
वृत्तपत्रात लिहिणार्या काही होतकरू लेखकांसाठी आजकाल 'इंटरनेटवरील मराठी' हा एक पानं भरायचा विषय झाला आहे का? सुरुवातीला ह्या लेखांची गंमत वाटायची. जाल लेखनाची दखल प्रिंट मिडियालाही घ्यावी लागते वगैरे स्वप्नरंजन करणारे काही बहुप्रसव जाल पडीक भलतेच हुरळूनही जायचे. पण अधून मधून वृत्तपत्रातून डोकावणारे हे उथळ लेख म्हणजे निव्वळ पाट्या टाकण्याचे पान भरण्याचे साधन आहे हे आता त्यांनाही कळून चुकले असावे.
उदा. अभिनय कुलकर्णी ह्यांचा लोकमत मधील हा लेख पाहा. मराठी ब्लॉगजगत ह्या शीर्षकाखाली मनोगत मिसळपाव अश्या साइटींविषयी लिहिणार्या ह्या लेखकाला इतकेही माहीत नसावे की ब्लॉग वेगळे आणि ह्या साईटी वेगळ्या. टुकार लेखक/ब्लॉग/जाल अंक असले संदर्भ भरून कुठल्यातरी फुटकळ संमेलनांचे उल्लेख देऊन पानं भरण्याचा हा प्रकार वाटतो.
उपक्रमींना ह्यावर काय वाटते?जाल लेखनाची अशी घेतलेली दखल योग्य आहे की हा एक पाट्या टाकण्याचा प्रकार आहे?
Comments
लेकसत्ता
शरद पवारांच्या हाती नाही गेले ना हे वृत्तपत्र? ;-)
बाय द वे, लेख लोकमतमध्ये आहे. वाचून (म्हणजे वाचावासा वाटला तर) अधिक लिहिन (लिहावेसे वाटले तर). ;-)
बाकी हे ओळखा कोण प्रश्न आवडले. बिनचूक उत्तरे देणार्यांना खरडवहीतून शाबासकी असे पुढे लिहिता आले असते.
पोलीस खात्यात बिनतारी यंत्रणा पाहणारी व्यक्ती.
संगणकावर कळफलक बडविणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर.
लोकांना विमा पॉलिसी विकणारा एजण्ट.
सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन दिवस 'काढणारा' माजी कर्मचारी.
महाविद्यालयात ज्ञानदान करणारा प्राध्यापक.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार.
परदेशात उच्चपदी आसनस्थ झालेला अनिवासी भारतीय.
हॉटेलात लोकांना मिसळपाव खायला घालणारा व्यावसायिक.
माझा अंदाज...
श्री प्रकाश घाटपांडे
आजानुकर्ण / रिकामटेकडा
तात्या अभ्यंकर
प्रमोद देव
धनंजय
राजे
विकास / चित्रा / सहज / प्रियाली
प्रभाकर पेठकर
-दिलीप बिरुटे
बोंबला!
उडणार तुमचा प्रतिसाद. व्यक्तिगत टिका म्हणून. ;-) उत्तरे ख. व. मध्ये शाबासकीही ख.व.मध्ये ;-)
वर लेकसत्ताचे लेकमत झालेले दिसते आहे. ही "लेक" काही पाठ सोडत नाही. ;-)
बाय द वे, माझ्या स्वैपाकघरातील टेबलापाशी असणार्या उंच खुर्च्या (बारसाईझ) सोडून मी कोणत्याही उच्चासनावर स्थित नाही. गैरसमज नसावा. ;-)
लेकमत ?
>>>उडणार तुमचा प्रतिसाद.
उडू द्या...! :)
संपादकांनी नाही तरी, 'लोकसत्ताचे' 'लेकमत' केले दिसते.
'लेकमत' चा अंक कोठून निघतो ?
-दिलीप बिरुटे
बारामती
ज्यांची मती अनेक ठिकाणी नको तशी धावत असते तिथून. ;-)
हाहाहा
>>>>ज्यांची मती अनेक ठिकाणी नको तशी धावत असते तिथून. ;-)
-दिलीप बिरुटे
नाही
उपजीविकेसाठी मी संगणक कळफलक बडवतो पण मी सॉफ्टवेअर इंजिनिअर नाही. मी डॉक्टर आणि जैववैद्यकीय अभियंता आहे.
बार्नम परिणाम होतो आहे:
उदा: लोकांना विमा पॉलिसी विकणारा एजण्ट, सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन दिवस 'काढणारा' माजी कर्मचारी, ही दोन वर्णने तात्या अभ्यंकर यांनाही लागू आहेत, तुम्ही महाविद्यालयात ज्ञानदान करणारा प्राध्यापक आहात, धनंजय शेअर मार्केटमध्ये (अप्रत्यक्ष ;) ) पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार, परदेशात उच्चपदी आसनस्थ झालेला अनिवासी भारतीय आहेत, नाही का?
धन्यवाद...!
>>>मी डॉक्टर आणि जैववैद्यकीय अभियंता आहे.
माहितीबद्दल धन्यवाद...!
वरील ओळखा पाहूत रिकामटेकडा च्या ऐवजी मुक्तसुनित हे नाव वाचावे.
>>>>धनंजय शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार, परदेशात उच्चपदी आसनस्थ झालेला अनिवासी भारतीय आहेत, नाही का?
हाहाहा......हे माहिती नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद...! :)
अवांतर : प्रतिसाद उडणार आहेत हे माहिती आहे. फूटबॉलची म्याच सुरु होईपर्यंत मजा करु द्यावी ही नम्र विनंती.:)
-दिलीप बिरुटे
हाहा
ज्ञानदान करणारा प्राध्यापक म्हणून मी "प्रा.डॉ.दिलीप बिरुटे" ही आयडी भरलेली होती.
"धनंजय" हा "शेअरबाजारात [अप्रत्यक्ष] गुंतवणूक करणारा" या रकान्यात गुंतल्यामुळे त्या ठिकाणी माझेच उत्तर अधिक सयुक्तिक वाटते!
(कोणीतरी मला त्या रकान्यात राहाण्यापुरते तरी "उच्चपदस्थ" करा रे!!!)
"उच्चपदस्थ"
कदाचित डेन्व्हर मधे राहाणारा कुणी असेल ज्याचे वर्णन "उच्चपदस्थ" म्हणून केले असेल. सॉरी , धनंजय. तुला कोलोराडोला जावे लागेलसे दिसते. ;-)
डॉक्टर तुम्ही सुद्धा?
अरेरे! काय हे अवांतर प्रतिसाद!!
उच्चपदस्थ की उच्चपदी आसनस्थ
दोहोंमध्ये फरक आहे. माझ्या इमारतीतील सर्वात वरच्या मजल्यावर राहणारा त्याच्या घरात नेहमीच उच्चपदी आसनस्थ असतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
फालतू विनोद आहे, कृपया स्वतःच्या जबाबदारीवर प्रतिसाद वाचावा.
तुम्ही उत्तरेकडे रहात असल्यास भूगोलाच्या मास्तरांच्या विचारपद्धतीतून हे सिद्ध करता येईल. (समजा) तुम्ही उत्तरेला रहाता (कशाच्या उत्तरेला हे विचारायचं नाही); उत्तर नकाशात वर, उंचावर असते ... ;-)
उत्तरा?
उत्तरेला हे विचारायचं नाही
ही उत्तरा कोण? तिचा उपक्रमावर आयडी आहे का? ;)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे पोलीस खात्यातून सेवा निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांची सध्याची ओळख ही, 'सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन दिवस 'काढणारा' माजी कर्मचारी' अशी असावी
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
बिनतारी
बिनतारी हा शब्द वाचल्यावर अनेकांची बिनतारी लागते त्याचे काय?
उडवा रे हे प्रतिसाद!
हॅहॅहॅ
आमी सरकारी नोकरीत तशे बी दिवसच काढत व्हतो. आमच्या भाषेत त्याला एल बी डी एन असे म्हणतात. लुकिंग बिझी डुईंग नथिंग. लोकांच्या करावर आमचे पगार अगदी सुखनैव चालतात याची आम्हाला खात्री होती / आहे. यस् सर करण्यासाठी बर्यापैकी पगार मिळतो शिवाय स्वतःचे डोके वापरायचे नाही. आमची निवृत्ती तशी २०२० साली.
बिनतारी जगत्
प्रकाश घाटपांडे
दुरुस्ती
क्र. २ = निखिल देशपांडे / धम्या असावेसे वाटते(त्यांच्याच प्रोफाईलमधे हे वाचले होते)
शेवटून दुसरे: मिसळभोक्ता (सर्कीट) असावे
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
ब्लास्फेमी
कंसातले नाव उच्चारायचे लिहायचे नसते हा संकेत आपल्याला माहित नाही काय? उडवा रे प्लीज!
पुढील प्रश्नः
अधिक श्रीमंत/ उच्चपदस्थ कोण? पिडा की मिभो?
महत्वाचा मुद्दा
त्या लेखात उपक्रम हे केवळ एक 'ऑल्सो रॅन' आहे. आयडींची माहिती उपक्रमवरून घेतली नसणार.
नक्कीच
त्या लेखात उपक्रम हे केवळ एक 'ऑल्सो रॅन' आहे. आयडींची माहिती उपक्रमवरून घेतली नसणार.
हो नक्कीच ;) लेखकाला इतक्या लेखांत मानसोपचारावरची 'सांगोपांग' चर्चा आठवावी ? ह्याचा अर्थ तो तो नक्कीच बालवाडीतला आहे ! उपक्रमावर येऊन एक दोन शीर्षके वाचली. मग टॉस करून मानसोपचारावरची चर्चा निवडलेली दिसते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मऊ लागले म्हणून
टॉस केले म्हणून की मऊ लागले म्हणून? धनंजयांचा एखादा विवेचनात्मक, भाषांतर किंवा तत्सम जड सॉरी विद्वत्तापूर्ण लेखाचे शीर्षक टाकायची हिम्मत आहे काय? ;-) ह. घ्या. * धनंजयांच्या लेखांचा अपमान करायचा हेतू नाही. फुटकळ कोटी करायचा आहे. *
सॉफ्टवेअर इंजिनियर?
संगणकावर कळफलक बडविणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर = आजानुकर्ण?
I am an Architect! - George Costanza
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हाहाहा
१ हेराफेरी चित्रपटातला एक संवादः "आजकल आप लोगों को भी इज्जत से बुलाना पडता है|"
२
पण मी खरंच आर्किटेक्ट आहे
आय एम नॉट जोकिंग. उद्या एमबीबीएस झालेल्या तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून बोलावले तर कसे वाटेल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सॉरी
ऊप्स.
सच कहूँ तो
मी पण गंमत केली. मला सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा प्रोग्रॅमर असे बोलावलेले अधिक आवडेल. सॉफ्टवेअर इंजिनियर असे पद नावापुढे लावले की कुठल्याही कंपनीत कुत्राही विचारत नाही त्यामुळे आर्किटेक्ट असे कुस्टांझाप्रमाणे सांगावे लागते.
(सिस्टमग्रस्त) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हा
हा प्रतिसाद तर्कक्रीडा क्र. १९८५४ मध्ये हलवण्यात यावा.
उत्तरे व्य.नि. ने द्यावीत. धन्यवाद.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
निषेध ! निषेध !
उपक्रमाबद्दल, लेखकाने फारसे न वाचता, चांगलेच लिहिले आहे. त्यामुळे तक्रार नाही. पण सुकुमार उपक्रमी श्री. प्रकाशराव घाटपांडेबद्दल (त्यांच्याबद्दलच आहे असे गृहीत धरले आहे) असे लिहिणे म्हणजे कळस आहे. त्यांना किंवा उपक्रमावरील इतर 'ज्येष्ठ' सदस्यांना आम्ही 'निवृत्त' समजत नाहीत आणि दिवस 'काढणारे' तर मुळीच नाही. आता 'काढणे' ह्या क्रियापदाचे संसदर्भ वाक्यात उपयोगही करून दाखवायला हवे का? निषेध ! निषेध !
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
वृत्तपत्रे दिवसेंदिवस उथळ होत चालली आहेत काय?
हहपुवा
माझे मत
अभिनय कुलकर्णी उर्फ मिसळपाववरील सन्माननीय सदस्य 'भोचक' यांचा 'मराठी ब्लॉगजगत आंतरजालावरील चविष्ट मिसळ' हा लेख चांगलाच होता. छापील आणि जालीय लेखनाची तुलना आणि एक उत्तम आढावा लेखनाच्या निमित्ताने घेतलेला दिसून येतो. मुद्रीतमाध्यमात लेखन करणार्या लेखकांइतकेच दर्जेदार लेखन जालावरही होते त्याचबरोबर जालावरील मराठी संकेतस्थळे, लेखन, लेखकांच्या वैशिष्ट्यांचा उत्तम परिचय लेखाच्या निमित्ताने घेतला आहे असे वाटले. मिसळपाव मराठी संकेतस्थळावर त्यावरील अभिनंदनाचा धागाही वाचण्यात आला होता.
असो, समजा लेखनाचे शिर्षक चुकलेही असेल म्हणून असे 'लेख म्हणजे पाट्या टाकण्याचे साधन' म्हणने म्हणजे कोत्यापवृत्तीचे लक्षण आहे असे वाटले. बाकी, चालू द्या.....!
>>>उपक्रमींना ह्यावर काय वाटते ?
अभिनय कुलकर्णी यांचा लेख वाचून आनंद झाला.
>>>जाल लेखनाची अशी घेतलेली दखल योग्य आहे..
हो, योग्य आहे.
>>>एक पाट्या टाकण्याचा प्रकार आहे?
चर्चा प्रस्ताव तसा वाटतो.
-दिलीप बिरुटे
बिरुटेंचे 'मन' भलतेच मोठे दिसते
विषयाचा नीट अभ्यास न करता शीर्षकातच चूका करुन लेखकाने नक्कीच पाट्या टाकलेल्या आहेत.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मन मोठेच.
>>>बिरुटेंचे 'मन' भलतेच मोठे दिसते
त्याबद्दल तर प्रश्नच नाही. :)
>>>विषयाचा नीट अभ्यास न करता शीर्षकातच चूका करुन लेखकाने नक्कीच पाट्या टाकलेल्या आहेत.
जाऊ द्या हो..!
कोणीतरी आपला एक जालीय मित्र चांगले लेखन करतो तेव्हा त्याचे कौतुक केले पाहिजे असे वाटते.
आपण कशाला म्हणायचे हे पाट्या टाकणे आहे म्हणून....!
-दिलीप बिरुटे
खरडीचीही सर नाही
मुद्रीतमाध्यमात लेखन करणार्या लेखकांइतकेच दर्जेदार लेखन जालावरही होते त्याचबरोबर जालावरील मराठी संकेतस्थळे, लेखन, लेखकांच्या वैशिष्ट्यांचा उत्तम परिचय लेखाच्या निमित्ताने घेतला आहे असे वाटले.
इतर मुद्रितमाध्यमांचे माहीत नाही. पण वृत्तपत्रीय लेखनाचा दर्जा दिवसेंदिवस अधिकच खालावतो आहे. बदतर से बदतरीन. हे लेखक कुठलीही मेहनत घेत नाहीत, गृहपाठ करत नाहीत. लेखनात त्यांची काहीच गुंतवणूक नसते. अशा लेखनाची तुलना उपक्रमावरील अनेक विद्वान, व्यासंगी, चतुरस्र लेखकांच्या दर्जेदार लेखनाशी करता येणार नाही. कुणाचे नाव घ्यायचे नाही. [ पण एका प्रतिसादात प्रियाली ह्यांनी एक नाव घेतलेच आहे :) ] ह्या वृत्तपत्रीय लेखनाला काही उपक्रमींच्या खरडीचीही सर नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उगाच दिलेला प्रतिसाद :)
१. भोचक हे येथीलही सन्माननीय सदस्य आहेत.
२. उपक्रम हे ब्लॉग आहे का?- माझ्या जुन्या कंपनीत उपक्रम/मिसळपाव ही उघडता येत नसत. त्यावेळी स्क्रीनवर "कॅटेगरी: ब्लॉगस्/चॅटरूमस् " असा मेसेज साईट बॅन असण्याचे कारण म्हणून येत असे.
नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)
भोचकपणा
भोचक यांचे उपक्रमावरील खाते
अनवांतर प्रतिसाद
जर छापील माध्यमांच्या वाचकांना या संकेतस्थळांची ओळख फारशी नसेल, तर असे लेख येणे अपेक्षित आहे. उपयोगी आहे.
लेख काळजीपूर्वक वाचला नाही. क्षमस्व.
मात्र एक उद्धरन या चर्चेसाठी योग्य आहे :
ब्लॉग आणि सोशल साईट हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत, असे लेखकाला ठाऊक आहे, असे वाटते.
मात्र अनुदिनी-विश्व आणि समूह-संकेतस्थळांमध्ये देवाणघेवाणीचे काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण साम्य आहे, असे मलाही वाटते. प्रतिष्ठित-एकदिक् संकेतस्थळे (वर्तमानपत्रे, सरकारी स्थळे, वगैरे) यांच्यापेक्षा वेगळेपणा आहे. कुठलीही एक अनुदिनी बहुशः एक-दिकच असते, हे खरे आहे. मात्र कोण्या अप्रतिष्ठितालाही अनुदिनी उघडता येते, म्हणून अनुदिनी-विश्वात देवाण-घेवाण असल्यासारखे वाटते.
म्हणून अनुदिन्या आणि समूह-संकेतस्थळे या दोहोंचा एकत्र उल्लेख करण्यासाठी एकत्रित शब्द सोयीस्कर आहे, आवश्यक आहे. लोकमतमधील लेखकाने "ब्लॉगविश्व" शब्दाची व्याप्ती वाढवून दोन्ही प्रकारांना सामावून घेतले आहे, हा फार मोठा दोष वाटत नाही.
सहमत
सहमत
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
का बरे?
कशावरून ठाऊक आहे? ठाऊक होते तर मग २ वाक्ये टाकायला हवी होती.
टमाट्यात, वांग्यात आणि मिरचीत साम्य आहे. म्हणून वांग्याला टमाटा आणि मिरचीला टमाटा म्हणायचे का?
लंगडे आर्ग्युमेंट आहे. जाऊ द्या. उपक्रमाबद्दल (आल्सोरॅन असले तरी), इथल्या लेखनाबद्दल चांगले छापून आले आहे. त्यामुळे आनंदच झाला आहे. पण म्हणून मी डोळेझाक करणार नाही ;)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सहमत
चांगले रूपक आहे. तिन्हींना भाजी म्हणता येते पण कुलकर्णी यांचा लेख वेब २ विषयी नाही. एका उपविषयावरील लेखाला दुसर्या उपविषयाचे शीर्षक चूकच आहे.
एकाच फ्यामिलीतल्या भाज्या
तिन्ही भाज्या आहेत आणि बहुधा एकाच फ्यामिलीतल्या (धोतरा राहिलाच) आहेत, असे वाटते. चूभूद्याघ्या.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
प्रयोगशरणा: कोशकारा:
सांगता येत नाही. याबाबत आपण प्रयोगशरण आहोत. (वांगे-मिरचीच्या उदाहरणाबाबत असे होणार नाही, असे मला वाटते, ते स्पष्टीकरण खाली.)
भाज्यांचेच म्हणावे तर हिंदीतले एक उदाहरण घेऊया. हिंदीच्या काही बोलींमध्ये हिरव्या ("सब्ज़" रंगाच्या) पालेभाज्यांना "सब्जी़" म्हणतात, तर अन्य रंगांच्या भाज्यांना "भाजी" म्हणतात. मात्र या प्रकारच्या शिजवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी साम्य असते. ते सांगण्यासाठी काही हिंदीभाषकांनी "सब्जी़" शब्दाची व्याप्ती वाढवली. आजकाल सुशिक्षित हिंदीभाषक सर्रास "आलूकी सब्जी़" म्हणतात. (खाण्यालायक बटाटा जवळजवळ कधीच हिरवा नसतो.) कोशकाराला असे म्हणता येत नाही, "उपप्रकाराचे नाव समावेशक अर्थाला देता येतच नाही". "[हिरव्या-बिनहिरव्या कुठल्याही प्रकारच्या] शिजवलेल्या खाद्य-वनस्पती" असा काही अर्थ निमूटपणे मान्य केला पाहिजे.
मराठीतले उदाहरण आठवते - "मुरंबा" .
मुरंबा, मोरावळा... असे असता मुराननस, मुरसंत्रे अशी रूपे व्हायला हरकत नव्हती. तरी कित्येक घरात "आवळ्याचा मुरंबा", "अननसाचा मुरंबा" असे शब्दप्रयोग सर्रास ऐकू येतात. म्हणजे "मुरलेल्या आंब्या"ची व्याप्ती वाढवून कुठलेही मुरलेले फळ असल्यास "मुरंबा" म्हणता येते.
इंग्रजीतले अगदी आपल्या हयातीतले उदाहरण "डिस्क". "डिस्क" म्हणजे गोलाकार चकती. चौकोनी आकाराची वस्तू सहसा डिस्क नसते. पूर्वी नसायचीच. पूर्वी संगणकाच्या डिस्काही - फ्लॉपीमधील चकती, हार्डडिस्कमधील चक्र, सीडी - सर्व गोलाकारच असायच्या. मात्र आजकाल गोलाकार नसलेल्या "फ्लॅश डिस्क" मिळतात. येथेसुद्धा "डिस्क" शब्दाची व्याप्ती वाढवून "सांख्यिक स्मृती साठवण्याचे [कुठल्याही आकाराचे] अवजार" असा अर्थ झालेला आहे.
"टमाटो, मिरची, वांगे" यांचे साम्य सांगणारा शब्द "भाजी" सध्या उपलब्ध आहे. "टमाटो, मिरची, वांगे, धोतरा" यांचे साम्य सांगणारा शब्द "वनस्पती" सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे यापैकी कुठल्याची एका वनस्पति-विशेषाची व्याप्ती वाढवण्याचा मोह कोणाला होणार नाही, असे वाटते. (मात्र तसे झालेच, आणि तो अतिव्याप्त शब्द रूढ झाला, तर कोशकाराला नवीन अर्थव्याप्ती मान्य करावी लागेल.)
"बहुदिक् देवाणघेवाणीचे वैशिष्ट्य असलेले ब्लॉगविश्व आणि समूह-संकेतस्थळ" यांच्यातले साम्य सांगणारा कुठला वेगळा शब्द आजकाल रूढ आहे काय (म्हणजे टमाटो-मिरची-वांगे साठी "भाजी" सारखा)? तसे असल्यास लोकमत मधल्या लेखकाने तो शब्द वापरायला हवा होता, असे सुचवता येईल. नाहीतर एका उपप्रकाराच्या नावाच्या अर्थाची व्याप्ती वापरण्याचा प्रकार भाषेमध्ये सामान्य आहे, त्याला फार दोष देता येत नाही.
रूढ शब्द
नवी संकल्पना रोवताना ट्रॅक्सोलिन असा काही नवा शब्द शिकविला तरी चालेल. मुळात ब्लॉगला अनुदिनी/जालनिशी हे शब्द असूनही ब्लॉग हा शब्द वापरणे चालणार असेल तर सरळ वेब२ का शिकवू नये?
फ्लॅश ड्राईव असा शब्दप्रयोग माहिती आहे, फ्लॅश डिस्क हा प्रयोग ऐकला नाही. चांदीचा तांब्या, स्टीलचा ग्लास, ही उदाहरणे मात्र प्रचलित आहेत.
हिंदीत भाजी हा शब्द असल्याचेही मला माहिती नव्हते, धन्यवाद.
ओढून ताणून
सगळाच युक्तिवाद ओढून ताणून केलेला आहे. सब्जी ह्या शब्दाचा शब्दकोशतील अर्थ 'refers to any vegetable dish in Indian cuisine' (विकिपीडीया) असा दिलेला आहे. सबब सब्ज म्हणजे हिरवे हे खरे असले तरी प्रचलित अर्थ हा कोणतीही भाजी असा आहे.
ब्लॉगजगताचे तसे नाही. उपक्रम हा 'ब्लॉग' कोणत्याही अर्थाने ठरत नाही. उपक्रमावर लिहिणार्यांना ब्लॉगर्स म्हणजे लेखन दोषच आहे. फेसबुक वेगळे ब्लॉग वेगळे फोरम्स वेगळे. इंग्रजीत अनेक विषयांना वाहिलेले फोरम्स आहेत. त्यावर लिहिणार्यांना ब्लॉगर्स संबोधल्याचे माझ्या पहाण्यात नाही.
फ्लॅश डिस्क असेही कधी ऐकले नाही. फ्लॅश ड्राईव/जम्प ड्राईव/थंब ड्राईव असे ऐकले आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
नवीन नवीन काय काय ऐकायला मिळते :-)
ही फ्लॅश डिस्कांची चित्रे :
(गूगल दुवा)
तरी मान्य करू की तुम्ही आणि श्री. रिकामटेकडा हे "फ्लॅश डिस्क" शब्द वापरत नाहीत, आणि तुम्ही तो कधी ऐकलेला नाही. मात्र तुम्ही "हार्ड डिस्क" ऐकलेला-वापरलेला आहे. "हार्ड डिस्क" म्हणजे एक चकती नसून चकत्यांचा संच/गठ्ठा असतो. तरी त्याला "एक डिस्क" म्हणतो. (उद्या कोणी "पत्रावळीच्या गठ्ठ्या"ला "एक जाड-पत्रावळ" म्हणेल तर अतिव्याप्ती अगदी स्पष्टच दिसेल. तशी ही "हार्ड डिस्क"ची अतिव्याती अतिव्याप्ती झालेलीच आहे.)
भरपूर सामान्य शब्द अर्थाच्या अतिव्याप्तीने तयार झालेले आहेत.
इलेक्ट्रिक - अंबराने बनवलेले ->-> (अंबर घासल्याप्रमणे कुठलीही) विद्युत्
कॅल्क्युलेट - दगड योजणे ->-> (दगड योजून मोजल्यासारखे कुठल्याही प्रकारे) गणित करणे
यातील आदला शब्दार्थ पूर्वीच्या कोशात होता, पुढचा अर्थ हल्लीच्या कोशात आहे.
...
कालांतराने व्याप्ती बदललेले शब्द मुबलक आहेत. "व्याप्तीचा बदल ओढूनताणूनच होतो", असे जर तुम्ही म्हणत असाल, तर तो विरोध विस्मृतीमुळे होत आहे.
"प्रयोगशरणा: कोशकारा:" म्हणजे शब्दकोशकार प्रयोगशरण असतात, असा मथितार्थ आहे. म्हणून विकि-शब्दकोशातला हल्लीचा अर्थ/रूढार्थ/प्रचलितार्थ हा माझ्या वरील मुद्द्यासच पोषक आहे. विकिपेडियाने मान्य केलेला अर्थ प्रचलित होण्यापूर्वी "सब्जी"चा काय अर्थ होता? तेव्हाच्या शब्दकोशांत काय होता?
खुद्द "ब्लॉग" शब्द घ्या.
<- "वेबलॉग" <- "वेब-जाळे ची अतिव्याप्ती"+"लॉग-जहाजातून ओंडके मोजून नोंदी ठेवायच्या, त्याची अतिव्याती"
अतिव्याप्ती नेमकी कुठे "अतिरेकी" होते त्याच्या मर्यादा मला माहीत नाहीत.
जहाजातून ओंडके मोजून दररोज नोंदवणे ->->-> कुठल्याही बाबतीत नियतकालिक किंवा अनियतकालिक नोंदी करणे ही अतिव्याप्ती इतकी प्रचंड आहे, त्या मानाने जाल-अनुदिनी->जाल-अनुदिनी+जालसमूह ही अतिव्याप्ती मला तरी क्षुल्लक वाटते.
आता उपक्रमींना ब्लॉगर्स म्हणावे की नाही याबद्दल माझे कुठले ठाम मत नाही. "म्हणू नये" अशी रूढी झाली तर म्हणणार नाही. "रूढी" म्हणजे काय? तुमचे शब्दप्रयोग, लोकमतावरील लेखकाचे शब्दप्रयोग आणि अन्य लोकांचे शब्दप्रयोग यांचा समुच्चय. (माझे स्वतःचे शब्दप्रयोगही "रूढी काय" मध्ये मोजण्यात यावे. पण माझे ठाम मत नाही, असे सांगितलेच आहे.) तुम्हाला शब्दाची ही अर्थव्याप्ती आवडत नाही याची नोंद केली आहे.
३३%
flash disc: 06420000 results
flash disk: 03140000 results
flash drive: 19000000 results
शब्दांचे अर्थ बदालतात हे खरे आहे पण बदलाचा प्रयत्न करणार्याला विरोध होणार हेही खरे आहे. ब्लॉग हा शब्द सध्याच्या रूढ अर्थाने उपक्रमसाठी वापरणे चूक आहे की नाही?.
माहीत नाही
शिवाय :
colour -color-नाही : २१९,०००,०००
color -colour-नाही : ९३५,०००,०००
साधारण १९ टक्के पहिले स्पेलिंग ८१ टक्के दुसरे स्पेलिंग. "रूढ" म्हणण्यासाठी किती टक्केवारी असावी याबद्दल प्रमाण-दर मला माहीत नाही.
- - -
मराठी जालविश्वातले पारिभाषिक शब्द मी अजून शिकतो आणि घडवतो आहे. समर्थक-विरोधकांची टक्केवारी मोजून जी काय "रूढ"साठी टक्केवारी तुम्ही मानता त्याच्याशी तुलना केली पाहिजे. या विवक्षित उदाहरणात विरोधकांच्या यादीत मी नाही. पण टक्केवारी काय आहे, "रूढ" म्हणण्याइतपत आहे की नाही, ते मला माहीत नाही.
- - -
मागे मी आंतरजालावर "विदा" शब्द ("डेटा" या अर्थाने) वापरत असे. आजकाल मी तो त्यागलेला आहे. पूर्वीच उपलब्ध असलेला "आत्त" शब्द वापरतो. (कोणी टक्केवारी मोजत असल्यास आपली नोंद करून ठेवली.)
- - -
विकिपेडियावर इंग्रजी शब्द "ब्लॉगोस्फियर"चा अर्थ येणेप्रमाणे :
ब्लॉगोस्फियरात सोशल नेटवर्के सुद्धा येतात, असे या विकिपेडिया लेखकाचे मत दिसते. मी खुद्द आता "उपक्रमा"ला "ब्लॉग-विश्वात" घालण्यास तयार झालेलो आहे. हा शब्दार्थ विकीपेडियाइतका तरी रूढ मानता येतो.
आउट ऑफ कंटेक्स्ट
सोशल नेटवर्क या शब्द तेथे वेगळ्या अर्थाने आहे. तुम्हाला अपेक्षित अर्थानेही उपक्रम हे सोशल नेटवर्किंग संस्थळ नाही. ब्लॉग आणि फोरममधील महत्त्वाचा फरक असा की ब्लॉगमध्ये प्रतिसादांना नगण्य किंमत असते. फोरममध्ये अनेकदा, 'काही सदस्य' मूळ लेखापेक्षा मोठमोठे प्रतिसाद देतात.
आत्त आणि विदा या शब्दांच्या व्युत्पत्ती काय आहेत?
मग टक्केवारीसाठी माझी मान्यता समजा
मग "रूढत्वा"ची टक्केवारी मोजताना वरील प्रतिसाद "कॉन्टेक्स्ट-एन्लार्जमेंट"करिता माझी मान्यता म्हणून मोजा.
नाहीतरी विकीलेखकांपैकी मीसुद्धा आहेच. (वरील विकी-पानाचा लेखक मात्र मी नव्हे.)
- - -
नाहीतर तुम्ही मदत करा :
या संकल्पनेसाठी (बहुदिक् स्थल-जालांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी) मला लघु-शब्दरूप हवे आहे. ही माझी गरज आहे.* याबद्दल कोणी रुचेलसा शब्द सुचवला - किंवा आधीच उपलब्ध शब्दाची मला ओळख करून दिली** - तर मी जरूर वापरेन.
नाहीतर माझ्या गरजेसाठी मी "ब्लॉगविश्व" च्या शब्दार्थाची व्याप्ती वाढवून घेणार आहे. दिलगीर आहे. पण काही वाचक माझा मथितार्थ समजतील, तेही काय थोडे? त्या वाचकांबरोबर तरी संवाद साधेल.
- - -
*"माझी गरज आहे", हेच तुम्ही अमान्य करू शकता. पण मग हा संवादच वृथा आहे. खरा आक्षेप "अशा संकल्पनेची गरज नाही" हा आहे, आणि आक्षेप तसा मांडला पाहिजे. शाब्दिक आक्षेपाच्या वादाने संवाद भलतीकडेच जातो.
**"डेटा" साठी "आत्त" हा पूर्वीच उपलब्ध शब्द मला शब्दकोशांत सापडला, तेव्हा "विदा" या ध्वनीला दिलेला नवा शब्दार्थ मी त्यागला. तो ध्वनी मला आधीच नापसंत होता, पण "आत्त" शब्द कळण्याआधी "विदा" शब्दाने माझी निकड भागत होती.
- - -
"विदा" शब्दाची कल्पना कोणालातरी "विद्"/"विद्या"/"वेद" वगैरे "जाणणे" वरून सुचली. विद्->विदा असे रूप संस्कृतात, किंवा मराठीत होण्याची सोय नाही. संस्कृतात ओढूनताणून अर्थ लावायचा ठरवला तर "जाणणारी स्त्री" असा काही होतो. पण संस्कृतातला हा अर्थ मराठीसाठी नि:संदर्भ आहे.
"आत्त" शब्दाची (संस्कृत) व्युत्पत्ती "आ+दा+त" = (अर्थ) "घेतलेले" अशी आहे.
आ=विरोधार्थ
दा=देणे (याचा विरोधार्थ घेणे वरील "आ"मुळे)
त= भूतकाल-कर्मवाचक
"डेटा" (लॅटिनमध्ये "दिलेल्या वस्तू", इंग्रजीमधील "गिव्हन दॅट" वाक्प्रचारही आठवावा) म्हणजे दिलेली/मिळालेली साधनसामग्री असते, तर "रिझल्ट्स् (बहुवचन)" म्हणजे विश्लेषणाच्या अखेरी पोचलेल्या निष्कर्षाबद्दल सामग्री असते, हा हल्लीचा इंग्रजीतला वापर आठवावा.
"आत्त" हा शब्द संस्कृतात ("दिलेले-मिळालेले-घेतलेले", "गृहीत धरलेले", "जिंकून/काढून घेतलेले") अर्थांनी पूर्वीपासून वापरात आहे. मात्र मराठीत सोयीसाठी त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती संकुचित करून "[विश्लेषणासाठी] घेतलेली [साधनसामग्री]" असे करण्यात सोय आहे. मराठीतला हा अर्थसंकोचही पूर्वीच झालेला आहे. शब्दकोशांत सापडतो.
ठीक
व्युत्पत्तींबद्दल अनेक आभार.
संवादसंस्थळ हा शब्द कसा वाटतो?
ब्लॉग हा इंग्रजी शब्द चालणार असेल तर वेबटू किंवा द्वितीयजाल असे शब्द का वापरू नयेत?
मुळात इंग्रजीततरी वेब २ साठी काही सुटसुटीत शब्द आहे का?
BTW: वेब २ च्या विकिपिडिआ दुव्यावर एक मजेशीर माहिती सापडली.
क्ष्