ब्लॉगजगत्??

वृत्तपत्रात लिहिणार्‍या काही होतकरू लेखकांसाठी आजकाल 'इंटरनेटवरील मराठी' हा एक पानं भरायचा विषय झाला आहे का? सुरुवातीला ह्या लेखांची गंमत वाटायची. जाल लेखनाची दखल प्रिंट मिडियालाही घ्यावी लागते वगैरे स्वप्नरंजन करणारे काही बहुप्रसव जाल पडीक भलतेच हुरळूनही जायचे. पण अधून मधून वृत्तपत्रातून डोकावणारे हे उथळ लेख म्हणजे निव्वळ पाट्या टाकण्याचे पान भरण्याचे साधन आहे हे आता त्यांनाही कळून चुकले असावे.

उदा. अभिनय कुलकर्णी ह्यांचा लोकमत मधील हा लेख पाहा. मराठी ब्लॉगजगत ह्या शीर्षकाखाली मनोगत मिसळपाव अश्या साइटींविषयी लिहिणार्‍या ह्या लेखकाला इतकेही माहीत नसावे की ब्लॉग वेगळे आणि ह्या साईटी वेगळ्या. टुकार लेखक/ब्लॉग/जाल अंक असले संदर्भ भरून कुठल्यातरी फुटकळ संमेलनांचे उल्लेख देऊन पानं भरण्याचा हा प्रकार वाटतो.
उपक्रमींना ह्यावर काय वाटते?जाल लेखनाची अशी घेतलेली दखल योग्य आहे की हा एक पाट्या टाकण्याचा प्रकार आहे?

Comments

सर्व पर्याय आवडले

सर्व पर्याय आवडले.

एकदोन वाक्यांत वापरून बघतो, कुठला अधिक आवडतो.

धन्यवाद

लोकमतमधील त्या लेखामध्ये ब्लॉग हा शब्द, आपल्या चर्चेतील पर्यायी अर्थाने, वापरला गेला आहे आणि असा अपरिचित (रूढत्वाची टक्केवारी उपलब्ध नसल्यामुळे मी तिची संख्या 'शून्य' अशी गृहीत धरतो आहे) वापर केला गेल्याचा डिस्क्लेमर तेथे नाही. असा डिस्क्लेमर न देण्यास पाटी टाकणे म्हणावे का?

रुढार्थाने

रुढार्थाने ब्लॉग ह्या शब्दाची व्याप्ती फोरम साईट्सना कवटाळण्याइतकी झालेली नाही. जेव्हा ब्लॉग ह्या शब्दाची इतकी व्याप्ती रुढ होईल (रिफर्स टू एनी सोशल ऑर फोरम साईट असा अर्थ शब्दकोश दाखवेल) तेव्हा तुमचे म्हणणे पटेल. तोपर्यंत हा लेखनदोषच आहे.

अवांतरः उद्या जर लंडन अमेरिकेत आहे असे कुणी वर्तमान पत्रात छापले, तर 'जाऊ द्या ना! तसेही सबै भुमी गोपालकीच आहे, अमेरिका काय इंग्लंड काय?' असा क्षमाशील दृष्टीकोन तुमचा दिसतो. जो चांगलाच आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

लंडन अमेरिकेत आहेच मुळी

अवांतरः उद्या जर लंडन अमेरिकेत आहे असे कुणी वर्तमान पत्रात छापले, तर 'जाऊ द्या ना! तसेही सबै भुमी गोपालकीच आहे, अमेरिका काय इंग्लंड काय?' असा क्षमाशील दृष्टीकोन तुमचा दिसतो. जो चांगलाच आहे.

असे कोणी छापलेच तर तुम्ही आक्षेप कसा घेऊ शकता? कारण लंडन अमेरिकेत आहेच आहे. :-)

१. लंडन, आर्कान्सा, युएसए
२. लंडन, केन्टुकी, युएसए
३. लंडन, ओहायो, युएसए
४. लंडन, टेक्सास, युएसए
५. लंडन, वेस्ट वर्जिनिया, युएसए

एक नाही तर किमान पाच लंडने मिळाली. ;-)

बाकी चालू द्या.

:-)

हाण्ण्! :-)

बाकी नक्की आक्षेप पाट्या टाकण्याला आहे (पण् त्यात् काय् नवे?) की विवक्षित संकेतस्थळाचे नाव् पेप्रात आले याला आहे हे (थोडासा इतिहास् माहित् असल्याने) कळेना ब्वॉ! ;-)

बाकी असे चर्चाप्रस्ताव उपक्रमाच्या धोरणात् बसतात् काय्? (धोरण नक्की कुठे आहे शोधावे लागेल.)

-Nile

बरोबर

आणि अमेरिकेतल्या ह्या लंडन मधे बकिंगह्याम पॅलेस आहे असा उल्लेख असेल तर?
बरोबर. असाही युक्तिवाद येऊ शकतोच. हे लिहिणारच होतो.
थोडक्यात, आपला मित्र लिहितो आहे ना? मग ढोबळ चुकांकडे आपण दुर्लक्ष करावे असे मोठ्या मनाच्या बिरुटेंनी म्हंटलेच आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

लेकसत्ता, लेकमत सारखं? ;-)

थोडक्यात, आपला मित्र लिहितो आहे ना? मग ढोबळ चुकांकडे आपण दुर्लक्ष करावे असे मोठ्या मनाच्या बिरुटेंनी म्हंटलेच आहे.

लेकसत्ता, लेकमत सारखं? ;-) बरं बॉ!

बिरुटे काय आणि लिमये काय! सगळेच आपले उपक्रमी (आपला लव, आपला कुशच्या चालीवर) ;-)

उपक्रमी म्हणजे पत्रकार नव्हेत

लेकसत्ता, लेकमत सारखं? ;-) बरं बॉ!

मी काही लोकमत/लोकसत्तात लिहिणारा पत्रकार नाही. तिथे अशी चूक करणे वेगळे आणि इथे वेगळे हे मी तुम्हाला सांगावे काय?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

चूक ही चूक असते

चूक ही चूक असते मग ती कुठेही करा. ;-) पण असो.

बाकी ऑनलाईन वृत्तपत्रांच्या अंकात संपादन वगैरे होते का माहित नाही. तिथे सर्व लेख स्वीकारले जातात की नाकारले जातात हे देखील माहित नाही.

अर्थातच

चूक ही चूक असते मग ती कुठेही करा.

अर्थातच. पण उपक्रमावर केलेला टायपो आणि पेप्रात छापलेल्या लेखाचे चुकीचे शीर्षक ह्यात जमिन आसमनाचा फरक आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

रूढार्थाने

विकिपेडियावर इंग्रजी शब्द "ब्लॉगोस्फियर"चा अर्थ येणेप्रमाणे :

The blogosphere is made up of all blogs and their interconnections. The term implies that blogs exist together as a connected community (or as a collection of connected communities) or as a social network in which everyday authors can publish their opinions.

ब्लॉगोस्फियरात सोशल नेटवर्के सुद्धा येतात, असे या विकिपेडिया लेखकाचे मत दिसते. मी खुद्द आता "उपक्रमा"ला "ब्लॉग-विश्वात" घालण्यास तयार झालेलो आहे. हा शब्दार्थ विकीपेडियाइतका तरी रूढ मानता येतो.
क्ष्

असे वाचा

मी खुद्द आता "उपक्रमा"ला "ब्लॉग-विश्वात" घालण्यास तयार झालेलो आहे.

उपक्रमाला कशाला घालवता. थांबा.

The term implies that blogs exist together as a connected community (or as a collection of connected communities) or as a social network असे वाचायला हवे.

अबाउट.कॉमवर दिलेली (वेबगीक.कॉमवरील) व्याख्याही वाचावी:

The blogosphere is a term used to describe the millions of interconnected blogs on the Internet. The term was first used in late 1999 as a joke, and continued to be used sporadically as a humorous term for the next few years. The blogosphere is a way of describing the social creature that grows from a critical mass of blogs.

पुढे जाऊन तिथला लेखक म्हणतो:

So what’s so great about mining the blogosphere? What can you find in the world of blogs? I think I can sum it up in one word: people. Blogs are all about personal, customized content – what you read is what you get. For instance, I have a personal blog in which I write about my daily life with my family, my cats, and life in general. Sure, it’s probably not interesting to anyone but me, but it’s got that all-important element of “people” in it.

असो. बाकी तुमचे प्रतिसाद एकंदर ज्ञानवर्धकच असतात. धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" क्ष्

मग तुम्ही शब्द सुचवा/आठवण करून द्या

या संकल्पनेसाठी (बहुदिक् स्थल-जालांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी) मला लघु-शब्दरूप हवे आहे. ही माझी गरज आहे. याबद्दल कोणी रुचेलसा शब्द सुचवला - किंवा आधीच उपलब्ध शब्दाची मला ओळख करून दिली* - तर मी जरूर वापरेन.

नाहीतर माझ्या गरजेसाठी मी "ब्लॉगविश्व" च्या शब्दार्थाची व्याप्ती वाढवून घेणार आहे. दिलगीर आहे. पण काही वाचक माझा मथितार्थ समजतील, तेही काय थोडे? त्या वाचकांबरोबर तरी संवाद साधेल.

(*"डेटा" साठी "आत्त" हा पूर्वीच उपलब्ध शब्द मला शब्दकोशांत सापडला, तेव्हा "विदा" या ध्वनीला दिलेला नवा शब्दार्थ मी त्यागला. तो ध्वनी मला आधीच नापसंत होता, पण "आत्त" शब्द कळण्याआधी "विदा" शब्दाने माझी निकड भागत होती.)

गरज योग्य आहे..

पण एकच समर्पक शब्द सुचेपर्यंत दोन वेग वेगळे शब्द वापरायला काय हरकत आहे? ओढून ताणून एकाच शब्दात बांधून एखाद्याच्या चुकीवर पांघरुण घालण्यापेक्षा ते बरे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

काहीच हरकत नाही

ही माझी गरज आहे.
तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही वांग्याला टमाटू म्हणा. काहीच हरकत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दिसते मजला सुख चित्र नवे...

या सगळ्यांमधील उपक्रम हे संकेतस्थळ वेगळे आहे. अभ्यासू नि वैचारिकतेशी परंपरा सांगणारी मंडळी इथे एकत्र आली आहेत. आयुष्य व्यापून उरणाऱ्या विविध विषयांचा धांडोळा घेऊन त्याविषयी सुव्यवस्थित लिखाण करणे हा या संकेतस्थळाचा अजेंडा आहे. यातलीच अनेक लेखक मंडळी मराठी विकिपेडीया समृद्ध करत आहेत. मराठी विश्वकोशाचे खंड काढताना पडलेला 'खंड' आपण पाहतो आहोतच; पण इथे मात्र इंग्रजीच्या तुलनेत मागे असलेला मराठी विश्वकोशाचा आंतरजालीय अवतार समृद्ध करण्याची धडपड व्यापून शेशंभर मंडळी सातत्याने प्रयत्नरत आहेत. याची दखल मराठी साहित्यविश्व, सरकार, प्रकाशक यांनी किती घेतलीय?

आजचे माझे भविष्य 'ज्ञानात भर पडेल' असे आहे. :D

-सौरभ.

==================

+

परदेशात उच्चपदी आसनस्थ झालेला अनिवासी भारतीय.

उच्चपदी आसनस्थ या शब्दांवरुन 'साईनफेल्डमधील The Buttershave' या भागातील जॉर्ज कुस्टांझा टॉयलेटचा प्रकार आठवला.

या भागात कुस्टांझा अपंग असल्याचे नाटक करुन नोकरी मिळवतो व तिथे असलेले अपंगांसाठीचे विशेष शौचालय त्याला फार आवडते. या उच्चपदी आसनस्थ झालेल्या शौचालयाच्या गौरवार्थ त्याने खालील उद्गार काढले आहेत.

'I love that toilet. I feel like a gargoyle perched on the ledge of a building"

असो.

(निम्नपदी आसनस्थ ;)) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छापील अंक

अभिनय कुलकर्णी यांचा लेख छापील अंकांच्या वाचकांसाठी योग्यच होता. आपला बहुससंख्य वाचक वर्ग कोण आहे यावर लिखाण कसे हे ठरते. आंतरजालावर न फिरकणारे हे बहुसंख्य आहेत.त्यांना खुशखुशीत लेखनाद्वारे माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनय कुलकर्णी यांनी केला आहे.त्याला उथळ म्हणता येणार नाही. खुशखुशीत माहिती देताना सोप्या भाषेत द्यावी लागते तिथे ब्लॉग व साईट यातील फरक लगेच विषद करुन चालणार नाही.
विद्वत्ताप्रचुर जडशब्दबंबाळ हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वानांना सामान्यांच्या पचनी पडेल असे सुलभ लेखन करताच येत नाही. कारण त्यांच्या मते सुलभीकरणाने आशयहानी होते अथवा अक्षम्य त्रुटी निर्माण होतात. एखाद्या क्षेत्रातील उच्चतम तज्ञ हा त्या क्षेत्रातील नवोदितांसाठी उपयुक्त नसतो. बालवाडीला शिकवायला वेगळेच शिक्षक लागतात तिथे ऍकॅडमिस्ट उपयोगाचा नाही.
प्रकाश घाटपांडे

कुडन्ट अग्री मोअर

पूर्णपणे सहमत आहे. लेख आला तरी बोंबलायचे आणि नाही आला तर दुर्लक्ष केले म्हणूनही बोंबलायचे अशी प्रवृत्ती उपयोगी नाही.

तसेही पेप्रं वाचतंच कोण? पुढारी वगैरे सारख्या वर्तमानपत्रांचा यूएसपी तर पुणे टुडे सारख्या पुरवण्यांवर छापण्यात येणाऱ्या, निम्मेच कपडे घालून व घातलेल्या कपड्यातूनही तीन चतुर्थांश अंग उघडे दिसेल अशी व्यवस्था करणाऱ्या हिरोईनी असतात. महाराष्ट्रटाईम्सचे संकेतस्थळ तर सॉफ्ट पॉर्नच झाले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

होहो ;)

अभिनय कुलकर्णी यांचा लेख छापील अंकांच्या वाचकांसाठी योग्यच होता. आपला बहुससंख्य वाचक वर्ग कोण आहे यावर लिखाण कसे हे ठरते. आंतरजालावर न फिरकणारे हे बहुसंख्य आहेत.त्यांना खुशखुशीत लेखनाद्वारे माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनय कुलकर्णी यांनी केला आहे.त्याला उथळ म्हणता येणार नाही. खुशखुशीत माहिती देताना सोप्या भाषेत द्यावी लागते तिथे ब्लॉग व साईट यातील फरक लगेच विषद करुन चालणार नाही.

होहो;) प्रकाशराव, माणसे जोडायला हवीत. पुल जाळू नयेत.

विद्वत्ताप्रचुर जडशब्दबंबाळ हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वानांना सामान्यांच्या पचनी पडेल असे सुलभ लेखन करताच येत नाही. कारण त्यांच्या मते सुलभीकरणाने आशयहानी होते अथवा अक्षम्य त्रुटी निर्माण होतात.

नक्कीच आणि सुलभ शौचालयांचे महत्त्व कोण नाकारते आहे? इथे मुद्दा सुलभीकरणाचा नाहीच. ब्लॉग आणि साइटमधला फरक सुलभपणे सांगता यायला हवा होता. बाकी लेख फारच खुसखुशीत आहे.

जाता-जाता:
दिवस 'काढण्याबद्दल' तुमचे मत काय आहे बरे? तेही सुलभीकरणच आहे काय:)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्वच्छतागृह

इथे टॉयलेट आहे का? असा प्रश्न विचारल्यावर समोरच्याला इथे मुतारी आहे का? शौचालय आहे का? असा स्पेसिफिक उपप्रश्न विचारणे कधी कधी भाग असते. काहींच्या मते टॉयलेट म्हणजे मुतारी असा देखील आहे. मला टॉयलेटला जायचे आहे म्हणजे नेमके लघवीला जायचे आहे की संडासला असा उपप्रश्न संयुक्तिक असते . पण संडास असल्यावर तुझी 'कोणतीही' सोय आहे असा अर्थ अभिप्रेत असल्याने आपण असे उपप्रश्न विचारत नाही.
जेथे फक्त मुतारी आहे तिथे स्वच्छतागृह अशी पाटी लावणे योग्य आहे का? म्हणजे टॉयलेट शब्द व्यवहारात रुळल्यानंतर गोंधळ तयार होतोच. 'सुलभ' आहे कि 'अवघड' सोय असणे महत्वाचे.
जाता जाता- दिवस काढणे हे एल बी डी एन चे सुलभीकरण
प्रकाश घाटपांडे

वेगळ्या गहन चर्चेचा विषय

इथे टॉयलेट आहे का? असा प्रश्न विचारल्यावर समोरच्याला इथे मुतारी आहे का? शौचालय आहे का? असा स्पेसिफिक उपप्रश्न विचारणे कधी कधी भाग असते. काहींच्या मते टॉयलेट म्हणजे मुतारी असा देखील आहे. मला टॉयलेटला जायचे आहे म्हणजे नेमके लघवीला जायचे आहे की संडासला असा उपप्रश्न संयुक्तिक असते .
प्रश्न सयुक्तिक असले तरी टॉयलेटला जाताना एवढा वेळ घालवणे योग्य नाहीच.

पण संडास असल्यावर तुझी 'कोणतीही' सोय आहे असा अर्थ अभिप्रेत असल्याने आपण असे उपप्रश्न विचारत नाही.
खरे आहे सुलभ शौचालय म्हटल्यावर असे कुठलेही प्रश्न, उपप्रश्न यायला नको. तिथे तर दरही दिलेले असतात म्हणे.

जेथे फक्त मुतारी आहे तिथे स्वच्छतागृह अशी पाटी लावणे योग्य आहे का? म्हणजे टॉयलेट शब्द व्यवहारात रुळल्यानंतर गोंधळ तयार होतोच. 'सुलभ' आहे कि 'अवघड' सोय असणे महत्वाचे.
प्रत्येकाने आपापली सोय बघावी. आणि काहींना सुलभशिवाय अवघड होते. असो. ह्यावर बरेच काही लिहिण्यासारखे आहे. हा एका वेगळ्या गहन चर्चेचा विषय आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अखेर

अखेर चर्चा स्वच्छतागृहापर्यंत आल्याचे पाहून समाधान वाटले.
मराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात, ही चर्चा लिटरली वळली आहे. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

उड़ जा काले कावाँ तेरे मुँह विच खंड पावा

या उपसंहारानंतर, आता हा प्रस्ताव उडण्यास हरकत नसावी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एक संकलनच करायला

अखेर चर्चा स्वच्छतागृहापर्यंत आल्याचे पाहून समाधान वाटले.
तुम्हाला समाधान का वाटले असावे बरे? :)

मराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात, ही चर्चा लिटरली वळली आहे. :)
तरी म्हटले मराठी सायटीबद्दल एखादे स्वीपिंग स्टेटमेंट कसे आले नाही अजून! एक संकलनच करायला हवे.

जाता-जाता
कृपया, स्वच्छतागृह आणि स्वीपिंग ह्यात कुठलाही संबंध शोधू नये, ही विनंती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मराठी सायटी

मराठी वृत्तपत्रांबद्दल अनेकदा खडे फोडून झाले आहेत हे माहिती आहे. एकदा अशा सार्‍या दुव्यांचेही संकलन व्हावे.
उदाहरणार्थ, महाराष्ट्र 'गणपती' टाईम्सच्या आजच्या जालीय आवृत्तीमध्ये एका बातमीचे शीर्षक आहे 'बळीराजा चिंतातूर'. चिंता करण्यास आतुर असण्यासाठी शेतकरी म्हणजे काही 'दिवस काढणारे', रिकामटेकडे नाहीत. तेथे 'चिंताग्रस्त' हा शब्द नको का? चिंतातूर हा शब्द शोधला की मराठी संस्थळे मिळतात पण चिंतातुर हा शब्द शोधला की हिंदी!

एक से भले दो

चिंतातुर आणि चिंताग्रस्त एकच.

चिंतातूर हा व्याकरदृष्ट्या चुकीचा शब्द वाटतो. त्यामुळे मटाने तो नेमका वापरला असावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पटले नाही

पूरग्रस्त आणि पूरातुर हे उदाहरण चांगले आहे. अनावश्यक चिंता करणार्‍यांसाठी चिंतातुर हा शब्द वापरावा असे मला वाटते.

कामग्रस्त आणि कामातुर

कामग्रस्त आणि कामातुर असे उदाहरण घेतल्यास चिंताग्रस्त आणि चिंतातुर मधला फरक स्पष्ट व्हावा. पण मोल्सवर्थभटाने चिंतातुर म्हणजेच चिंताग्रस्त असे सांगितले आहे ना.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रिडक्शनिझम

ग्रस्त आणि आतुर या सफिक्सचा अर्थ सारखा नसल्यामुळे मोल्सवर्थस्य वाक्यं प्रमाणेतरम्

चिंतातुराणां न सुखं न निद्रा

मोल्सवर्थने आतुर शब्दाचे अनेक अर्थ दिले आहेत. त्यातला distressed किंवा perplexed हा अर्थ ग्रस्तच्या जवळ जावा?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गोविंदाग्रजांची कविता 'चिंतातुर जंतू'

रिकामटेकडा यांच्याशी सहमत.
अनावश्यक चिंता करणार्‍यांसाठी 'चिंतातुर' हा शब्द वापरला जातो. गोविंदाग्रजांची (राम गणेश गडकरी) 'चिंतातुर जंतू' नावाची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती.

नियम

आंतरजालावरील चर्चेची लांबी वाढली की कोणत्यातरी सदस्याने इतर कोणत्यातरी सदस्याची तुलना हिटलरशी करण्याची शक्यता 'एक' कडे झुकते आणि अशी तुलना करणारा सदस्य ती चर्चा हरतो हा गुडविनचा नियम आहे.
मराठीत काही चर्चांची सुरुवातच हिटलर या विषयाने होत असल्यामुळे हिटलरशी तुलना या विषयात नाविन्य वाटत नसावे. त्यामुळे "मराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात" हा वेरियंट असावा.

चिंता करीतो जालविश्वाची..

त्यामुळे "मराठी सायटींवरील बहुतेक चर्चा मेटाफोरिकली स्वच्छतागृहाकडे वळतात" हा वेरियंट असावा.

हाहाहा! अगदी... आणि ह्या वेरियंटला गुडविनचा नियमही लागू होतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सदस्य संख्येचे प्रश्नचिन्ह

मी "उपक्रम" आणि "मायबोली" या दोन ठिकाणी सदस्य आहे. पण आता हा धागा वाचल्यानंतर "ती" बातमीही वाचली व समजले की "मिसळपाव" या साईटची सदस्य संख्या 'दहा हजार' आहे, म्हणून इतके सदस्य नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा करीत असतात हे पाहण्यासाठी "तिथे" गेस्ट म्हणून लॉग इन झालो. त्यावेळी (सकाळी ११.०० वा.) २१ सदस्य "ऍक्टीव्ह" होते; तर आपल्या "उपक्रम" वर ७. दहा हजारातील उपस्थिती २१ ची असेल तर 'रजिस्टर्ड' सदस्यांचा आकडा हा मान्य होण्यासारखा आहे? का असे आहे, संध्याकाळी/रात्री जालावर येणार्‍यांची संख्या शतकाच्या घरात जाते? (केवळ कुतुहल म्हणून विचारले आहे, "डिसेक्शन" नव्हे !)

बिरा के दस माथे बिरा के सौ नाम..

"मिसळपाव" या साईटची सदस्य संख्या 'दहा हजार' आहे

सदर लेखकाने कसलाही अभ्यास न करता टाकलेली ही आणखीन एक पाटी आहे. १०,००० आकड्यामधे किती मयत आयडी आहेत हे लेखकाला सदर संकेतस्थळावर पडिक असल्याने चांगलेच माहित असावे. तसेच (संस्थापक धरुन) अनेक सदस्यांनी (प्रत्येकी) काढलेले अनेक आयडीजही त्यातच येतात. हे सगळे लक्षात घेतले असता जिवंत/ऍक्टिव आयडीज इतर कोणत्याही संकेतस्थळा इतकेच निघतील.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

साशंक

हे सगळे लक्षात घेतले असता जिवंत/ऍक्टिव आयडीज इतर कोणत्याही संकेतस्थळा इतकेच निघतील.

या बद्दल साशंक आहे. हा मुद्दा संख्याबळाशी निगडीत असल्याने संख्याशास्त्रीय निकषच लावावे लागतील. असे धरुन चालू कि डुप्लिकेट आयडी यात भरपुर आहेत तरी भेट देणार्‍या संख्येचा विदाही विचारात घ्यावा लागेल.
वाचनमात्र,प्रतिसादमात्र,लेखनमात्र अशी विभागणी केल्यास कोणत्याही विवक्षित क्षणी असलेले संख्याबळ याचा आढावा घेतला तर मिपावर भेट देणार्‍यांची संख्या जास्त आहेत. साधी गोष्ट आहे तिथे कविता पाककृती कथा कादंबर्‍या आहेत. प्रत्येक संकेतस्थळाची प्रकृती वेगळी असते तुलना हा केवळ सोयीचा भाग आहे.
प्रकाश घाटपांडे

मुद्दा पाट्या टाकण्याचा आहे

तिकडे भेट देणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त आहे. मुद्दा तो नाहीच. मुद्दा पाट्या टाकणे हा आहे. सदस्यसंख्येबाबत व ट्रॅफिकबाबत लेखकाने ठोकून दिले आहे. मिसळपाव, मायबोली नंतर मनोगत, मीमराठी, उपक्रम असा त्याने क्रम कसा लावला काही कळत नाही. चक्क ठोकून दिले आहे. अलेक्सावर जाऊन बघितल्यास क्रम मायबोली, मिसळपाव, मनोगत, मीमराठी, उपक्रम ( उपक्रम शर्यतीत कुठेच नाही. इथेही आल्सो रॅन;) ) असा दिसेल. लेखात ही मेहनत घेतली गेली आहे का? ही मेहनत घ्यायला नको होती का? आणि तुम्ही व धनंजयराव कशाला पाट्या टाकण्याची पाठराखण करीत आहेत? आश्चर्य वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दुसरे उदाहरण

सामना मध्येही पाट्याच टाकल्या आहेत. तेथेसुद्धा फोरमला ब्लॉगच म्हटले आहे ;)

 
^ वर