या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.

ब्लॉगिंग जगतातून साभार पोहोंच .
या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.
प्लास्टिक पिशव्यांना बंदी .
सार्वजनिक ठिकाणी दारू , सिगारेट पिण्यास बंदी.
या घातपाता मागे परकीयांचा हात आहे.
आम्ही अंतकवाद्यांचा कठोरपणे मुकाबला करू.
चीन बरोबर लढाई करण्यास आम्ही समर्थ.
दोनहजारवीस साली भारत जगातील महासत्ता होईल . पंतप्रधान
दोनहजारपंधरा पर्यंत देश अंधार मुक्त करुत.
अमेरिकेला पाकी. अंतकवाद्याचे पुरावे देऊन पाकिस्तानला पराभूत करुत.
हेडलीला , अंडरसनला अमेरिकेहून भारतात परत आणून त्यांना सजा देवूत.
देशातून गरिबी ( गरीब!!) हटवली जाईल.
कोणीही उपाशी पोटी राहणार नाही. महागाई कमी केल्या जाईल .
देशातून भ्रष्ट्राचार खतम करुत. नफेखोराना,भ्रष्ट्राच्यारयाना जाहीर फाशी दिले जाईल.
आमच्या नितीमत्तेला जनतेने मान्यता देऊन आम्हाला निवडून दिले.
यामुळे अन्नधान्या पासून दारू निर्मितीस जनतेचा पाठींबा आहे.
हिंदीत लिहिलेल्या पत्रांना त्वरित उत्तर दिले जाईल .
या (सरकारी) कार्यालयात कोणालाही लाच देवू नये किंवा दलाला मार्फत साहेबाना भेटू नये. (सरळ भेटले तर चालेल ?)
कोणाची ही अरेरावी खपवून घेणार नाही सत्तेचे ताकद दाखवून देवूत मु.म.
पोलिसाला आपला मित्र समजा ,पोलीस आपणाशी सोज्जन्याने वागतील.
पो.प्र.:- राजकीय नेते देशात दंगली घडवतात.
नेता.:- पोलिसांना जाहीर वक्तव्य करून सरकारी गुपिते फोडण्याचा करण्याचा अधिकार नाही
भारत माझा देश आहे. कधी कधी .
आपण यात अजून भर घालू शकता.

Comments

वरती दिलेले सगळे कायदे आहेत का?

वरती दिलेले सगळे कायदे आहेत का?
बहुतेक सगळी आश्वासने/विधाने आहेत.

आणखीन् काही वचने

पेपरलेस ऑफिसेस होणार आहेत.
शाळा-महाविद्यालयातून रँगीग कायमचे दूर करण्यात येईल.
मंदिर आणि शैक्षणिक संकुलाच्या क्षेत्रात दारूविक्रीसाठी परवानगी नाही.
मुंबई आतंकी हल्ल्यामागील कारणे शोधुन दोषीव्यक्तींवर कठोर कारवाई.
हुंडाबंदी आहेच, कुणी तसे करताना आढळला तर तो जेलबंद होईल.
राष्ट्रीकृत बँका समाजातील तळागाळाला अत्यल्प व्याज दराने कर्ज पुरवठा करून त्यांची उन्नती होईल हे पाहतील.
एम.एस.ई.बी.ला स्वायत्त करून शेतकर्‍यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येईल.
जागतिक नाणेनिधीचे जोखड झुगारून देवून देश आर्थिक महसत्ता म्हणून पुढे आणला जाईल.
१९९० पासून जे गुन्हेगार फाशी लिस्टवर आहेत त्यांना तातडीने फासावर लटकविण्यात येईल.
ज्यांच्या नावावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांना सार्वजनिक निवडणुका लढविता येणार नाही.
आयपीएल मधुन प्राप्त होणारा नफा गोरगरीबांच्या प्रगतीसाठी वळविला जाईल.
जातीविरहीत समाज रचनेची व्यवस्था करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तळागाळातील मुलाना मोफत प्रवेश दिला जाईल.
'हम दो हमारे दो' ही घोषणा न पाळणार्‍यांना सरकारी सवलती मिळणार नाही.
फूटबॉल या खेळात भारताचा जागतिक दबदबा निर्माण केला जाईल.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ~~
येत्या निवडणुकीपूर्वी बेळगांव-निपाणी-कारवार-बिदर-भालकी सह "संयुक्त् महाराष्ट्र" राज्य स्थापन केले जाईल.

आणखी काही विनोद !

१) सरकार समान नागरी कायदा आणण्यासाठी बांधील आहे. (हे घटनेनी दिलेले आश्वासन आहे असे म्हणतात).
२) आम्ही निधर्मी आहोत.

आम्ही अशा देशात राहतो...

ब्लॉगिंग जगतातून साभार पोहोंच .
आम्ही अशा देशात राहतो...
आम्ही अशा देशात राहतो:
• जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो,
• जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं,
• जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं,
• जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत,
• जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात,
• जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही,
• जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,
• जिथं चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्यांना फासावर लटकवलं पाहिजे" .... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!"

लिंबाचे उपयोग

>>जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,

मागे एका तावातावाने कोकाकोल्याचे तोटे सांगून (फोस्फोरिक ऍसिड हे मुळात टोयलेट क्लीनर म्हणुन वापरते जाते वगैरे) लिंबू सरबत प्या असे सांगणार्‍याला हेच उदाहरण देऊन गार केले होते.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

उदाहरण

'लिंबू सरबत प्या' म्हणणारा असल्या टूकार उदाहरणाने गार झाला म्हणाजे भलतेच कच्चे लिंबू असावा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

 
^ वर