आंतर्जालावरील मराठी स्पेल चेक

आपल्या ब्लॉग किंवा वेबपेजवर मराठी शुद्धलेखन तपासायचे असेल तर एक उपयोगी एक्स्टेंशन आता मी येथे उपलब्ध करून दिले आहे.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/187582/

स्टेटस बारमध्ये दिसणार्‍या हिरव्या बरोबरच्या खुणेवर टिचकी मारली की पानावरील चुका अशा दिसू लागतात.

अर्थात सर्वच शब्द अशुद्ध आहेत असे नाही. मराठी डिक्शनरीच्या डेटाबेसमध्ये जितके शब्द मिळाले तितक्या शब्दांची तुलना केली जाते. त्यामुळे अर्थात मराठी डिक्शनरीचे एक्स्टेंशन देखील जोडलेले असणे जरुरी आहे.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

याचा फायदा म्हणजे काही शब्द जे आपण शुद्ध धरून चालतो, ते शोधण्यासाठी होतो. उदाहरण म्हणून वरच्या स्क्रीनशॉटमध्ये "माहीती अधुनिक उर्जेसंदर्भात उत्सर्जीत वार्षीक" इतके चुकीचे शब्द मिळाले. मराठी शुद्धलेखनाच्या बाबतीत आग्रही असणार्‍यांना याचा उपयोग होऊ शकेल.

Comments

चुकीच्या शब्दांना योग्य पर्याय...

कुठे दिसणार...ते नाही कळले...ते एखाद्या उदाहरणाने स्पष्ट कराल काय?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

पर्याय दिसणार नाहीत

फक्त चुकीचे शब्द रंगविले जातात. त्यांना पर्याय दिसत नाहीत. शुद्ध शब्दांचे पर्याय हे फक्त जिथे आपण टंकलेखन करता त्या टेक्स्ट बॉक्समध्ये दिसतील. त्यामुळे या सुविधेच्या वापरावर काही प्रमाणात मर्यादा येईल हे खरे, पण नजिकच्या भविष्यकाळात असे पर्याय देणे शक्य होईल असे वाटत नाही.

धन्यवाद!

धन्यवाद शंतनू!
आहे ही सोयही उत्तमच आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धन्यवाद

आंतरजालावरील मराठी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असता.
माझ्यासारख्या अनेकजणांना या स्पेलचेकरचा नक्किच उपयोग होईल. हे एक्स्टेंशन उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद्.

जयेश

उत्तम!

मस्त!

तुमचे काम फार आवडते मला!

उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!

आपला
गुंडोपंत

सुटी अक्षरे

" ले ला ना च्या चे ची चि चा " अशी अक्षरे सुटी सुटी दिसल्यासारखी मार्क होत आहेत. त्याचे कारण मूळ डेटाबेसमध्ये ती अक्षरे नाहीत. ही अक्षरे त्यात जमा करून नवी डिक्शनरी उपलब्ध करून दिली की ही समस्या येणार नाही. आणखी मला काही अक्षरे मिळाली आहेत, ती अशी, डी से वा के को व
आणखी काही अक्षरे डेटाबेसमध्ये टाकणे आवश्यक आहेत का?

झिरो विड्थ जॉइनर

काही वेळा शब्द बरोबर असूनही हिरव्या रंगात मार्क होत आहे. उदाहरण म्हणून हे दोन शब्द पाहा.
आपल्‍या आपल्या
झिरो विड्थ जॉइनर नावाची एक स्पेस पहिल्या शब्दात अर्ध्या ल आणि य मध्ये आहे. त्यामुळे पहिल्या शब्दाची लांबी एकाने वाढून ७ झाली आहे. व ते अक्षर डेटाबेसमध्ये नसल्यामुळे चुकीचे म्हणून मार्क होत आहे. हे दोन्ही शब्द दिसायला सारखे असले तरी प्रत्यक्षात सारखे नाहीत असे मला म्हणायचे आहे. यासाठी जॉइनर न वापरता जोडाक्षरे लिहीणे आवश्यक आहे.

काम छान झाले

करून पाहिले. पहिल्या प्रयत्नात उत्तम चालले.
शब्दकोश वाढवायचे प्रयत्न हवेत.

प्रमोद

एक उदाहरण

http://tinyurl.com/3akwyse

एका लोकप्रिय संकेतस्थळावरील एका लेखाचे विश्लेषण हे एक्स्टिंशन वापरून केले तर त्यात १२ पेक्षा जास्त चुका निघाल्या.

आधारीत यमराजने पुरग्रस्त अक्षरश पोलिस माहित स्वत सा ध्या सरकाचे हेत उफामाचा

हल्ली मला मास्तरांसारख्या इतरांच्या चुका काढण्याचा छंदच लागला आहे की काय कळत नाही :)

इतक्या चुका का?

बालगंधर्व पुरस्कार जाहिर
पुरस्कार हा प्रमुख्याने गायन, वादन, नाटक, चित्रपट, अश्या कलाक्षेत्रातिल कालावंता ना दिला जातो. यंदाचा बालगंधर्व पुरस्कार हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि संगीतकार अजय-अतुल याना नुकताच जाहिर झाला आहे. पुरस्कराचे यंदा १०वे वर्ष आहे. पुरस्कार प्रदान समारंभ हा नागठाणे येथे बालगंधर्व समितिच्या वतिने येत्या नवेंबर या महिन्या मधे देन्यात येनार आहे.

अतिशय सुंदर ब्लॉगवर इतकं अशुद्धलेखन का दिसतं हे समजत नाही. बासमती तांदळाचा भात एखाद्या चांदीच्या पात्रातून वाढला, पण त्यात पहिल्याच घासाला खडा लागला तर जेवणाची मजा निघून जाईल की नाही?
http://mazamaharashtra.wordpress.com/

चार वाक्यात १०-१२ शब्द मनःपूत लिहलेले दिसतात. यामागे नक्की काय लॉजिक आहे, हे कोणी सांगू शकेल का? की मुद्दाम असे लिहीले जाते? की आपण "त्यांनी" केलेले नियम मोडून नवीन क्रांती वगैरे करत आहोत अशी भूमिका असते? का हा काही वाटतो तितका गंभीर विषय नाही अशी समजूत करून दिलेली/ घेतलेली असते?
ब्लॉग म्हणजे काही आपली वैयक्तिक डायरी नव्हे. ते एक छोटेखानी वर्तमानपत्रच आहे. काही ब्लॉगर्सची वाचकसंख्या येत्या १० वर्षात तालुका पातळीवरील वर्तमानपत्रांच्या वाचकांइतकी होण्याची शक्यता आहे. इंटरनेटवर इंग्रजीत इतके लिखाण होते पण त्यात अशा स्पेलिंग मिस्टेक्स आढळत नाहीत. मराठी ब्लॉगलेखक भविष्यात अधिक जबाबदारीने लिहतील अशी आशा आहे.

नाही होत

मी प्रयत्न केला पण होत नाहीये. स्टेटसबार वर बरोबरची खुण येतच नाही.
असे का होत असावे?
ऍडऑन अणि डिक्शनरी दोन्ही टाकले आहेत.
क्रम आधी ऍड ऑन मग डिक्शनरी असा झाला आहे.
चालत नाहीये, काय केले पहिजे?
माझे फाफॉ मराठी ३.५.४ आहे म्हणून चालत नाही का?

-निनाद

काही गोष्टी

मराठी स्पेल चेक एक्स्टेंशन
वापरतो आहे. पण त्यात काही अडचणी येत आहेत.
हे एक्स्टेंशन एकदा सुरु केले की बंद करता येत नाही.
हिरवी अक्षरे माझे लक्ष वुचलित करत राहतात. त्यामुळे मला ते नको असेल तर सरळ फाफॉ बंद करून सुरु करतो.
ते एक्स्टेंशन बंद करण्याची सुवीधा द्याल का?
रंग बदण्याची सुवीधाही देता येईल का?

तसेच्या त्या बरोबरच्या आयकॉन वर माऊस नेल्यानंतर हा मराठी स्पेलचेकचा आयकॉन आहे हे त्याने दर्शवले पाहिजे - जाहिरात! :)

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

छान

उपक्रम चांगला आहे. अभिनंदन!

एक प्रश्न- हे आपण कसे केलेत- मूळ प्रणालीत शब्द कसे साठवले आहेत (सर्व संभव रूपे की केवळ मूळ रूपे व सामान्य रूपे) हे जाणून घ्यायला आवडेल.

राधिका

 
^ वर