लग्न-संमतीचे वय

"दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका" ह्या लेखातील प्रतिसाद वाचून हा छोटासा धागा सुरु करावासा वाटला. मुळ लेखाला आलेले सर्वच प्रतिसाद मी वाचले नाहीत, त्यामुळे मी खाली दिलेले संदर्भ चर्चेत आले होते की नाही, माहीती नाही. तरीही बहुतांश प्रतिसाद वाचता, लग्नाचे अधिकृत वय सध्या तरी ठिक आहे, असे गृहीत धरले जातेय की काय असे वाटले. खालील दुवा वाचल्यास अधिक माहिती मिळेल.

हेतू एव्हढाच आहे की, ही माहिती नजरेखालून जावी.

जगभरातील अनेक देशात आजही लग्न-संमतीचे वय ८, १२ आहे. -

http://en.wikipedia.org/wiki/Age_of_consent

Comments

एज ऑफ कन्सेंट

मूळ दुवा एज ऑफ कन्सेंटचा आहे. लग्न-संमतीचा नाही. :( तेथे हा दुवा पाहिजे. लग्नाचे अधिकृत वय बहुसंख्य देशात (सौदी, इराण आणि इतर काही देश वगळता) पुरुषासाठी किमान १८ आणि मुलींसाठी किमान १६ किंवा त्या वरतीच आहे आणि ते योग्य आहे.

दुव्यावरील माहिती गोंधळात टाकते

खरे आहे. त्यादुव्यावरील माहिती गोंधळात टाकते. खूप वेगवेगळ्या पैलूंनी ती माहिती व आशय बघता येईल. तरीही, काही देशात "एज ऑफ कन्सेंट" खूप कमी असणे हे मला व्यक्त करायचे आहे.

दुवा

मी दुवा अद्याप वाचला नाही परंतु आपल्याकडे लग्नाचे वय हे मुलींसाठी १८ आणि मुलांसाठी २१ आहे ही फार जुनी आणि प्रचलित गोष्ट आहे. :-) एज ऑफ कन्सेंटचे वय (याला मराठी शब्द?) कायद्याने नमूद नसावे असे वाटते.

विशिष्ट वयाखालील व्यक्तींनी सेक्शुअल ऍक्टिविटिजमध्ये भाग घेतल्यास (म्हणजे संभोगच असे नाही तर सेन्सॉरशिप वगैरेही यात येत असावे) त्यांच्यावर किंवा संबंधितांवर कायदेशीर कारवाई होते.

लग्न आणि संमती

चांगला विदा...

जगभरातील अनेक देशात आजही लग्न-संमतीचे वय ८, १२ आहे.

या वयात लग्न कुणाचेही असले तरी संमती ही त्या वर/वधूची असते का पालकांची? बर वर-वधूची संमती असेल तर ते इतर गोष्टींसाठी देखील त्या त्या ठिकाणी कायद्याने सज्ञान समजले जातात का?

वरील नकाशावरून भारतात लग्न संमतीचे वय १७ आहे असे वाटते. मात्र आपल्याकडे लग्नाचे अधिकृत वय मला वाटते १८ आहे ना? ते देखील मुलीसाठी १८ आणि मुलासाठी २१ असे कधीकाळी तरी होते. आत्ताचे माहीत नाही. शिवाय विकीवरीलच भारतीय दंडविधानाच्या माहीतीप्रमाणे, विवाहबाह्य संबंधांसंदर्भात, जर संमतीवयाहून लहान व्यक्तींच्या संदर्भात असे सिद्ध झाले की त्या व्यक्तीचे लग्न झाले आहे, तर संमतीवयाचा कायदा लागू होत नाही. एकूण गोंधळ आहे असे दिसते... :(

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

लग्नाचे वय

लग्नाचे वय काय असावे या विषयावरचा हा धागा रोचक वाटला. समाजात प्रचलित असलेले लग्नाचे वय हे काल, स्थल व सामाजिक परिस्थिती सापेक्ष असते असे मला वाटते. जीवशास्त्रीय दृष्ट्या लग्न करणार्‍या दोन व्यक्ती वयात आलेल्या असल्याच पाहिजेत हे या साठी कधीच आवश्यक नव्हते. कारण लग्न करणे म्हणजे त्या दोन व्यक्तींना शारिरिक संबंध ठेवण्यास समाजाने त्यांना परवानगी दिली आहे असा कधीच होत नव्हता. या साठी निराळे Norms, रुढी किंवा कुळाचार हे असत. ज्या कालात सरासरी आर्युमर्यादा 25 ते 30 वर्षे होती त्या कालात लग्न संबंध शक्य तितक्या लवकर लावले जात होते हे स्वाभाविकच वाटते. बाल विवाहांचे हे एक प्रमुख कारण असले पाहिजे. स्थल व सामाजिक परिस्थिती यावरही हे वय अवलंबून होतेच. सारखे परकीय हल्ले, गावांना कोणतीही सुरक्षा नसणे, चोर लुटारू यांचे भय अशा परिस्थितीत लग्न न झालेली मुलगी संभाळणे हे जोखमीचे काम वाटत असे त्यामुळे तिचे लग्न शक्य तितक्या लवकर लावून देण्यात येत असे. जगाच्या मागासलेल्या भागातली परिस्थिती अजुनही खूपशी अशीच असल्याने या ठिकाणी लग्नाचे वय अजुनही खूप कमी आहे.
आपल्याकडच्या सध्याच्या परिस्थितीत हे सर्व जुने संदर्भ कालबाह्य व टाकाऊ झालेले असल्याने आपोआपच त्याज्य समजले जाऊ लागले आहेत. परंतु तरीही मागासलेले समाज व सुधारलेले समाज यातील लग्नाच्या वयात तफावत जाणवते. महाराष्ट्रातील शहरी सुशिक्षित समाजातील मुली आता 25, 26 वर्षे वय झाल्याशिवाय लग्नाचा विचार सुद्धा करत नाहीत. या सर्व गोष्टी परिस्थितीनुरूप बदलत असल्याने अमुक योग्य व तमुक गैर असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते.

चन्द्रशेखर

सहमत

+१
हेच म्हणतो

लवकर लग्न केल्याने, त्यामुळे खर्च वाढल्याने, आणि सोबतच्या कुपोषणाने आरोग्य ढासळून आयुर्मान कमी होऊ शकते. यावर आधी लग्नाचे वय वाढवणे हा उपाय होऊ शकतो.

प्रमोद

गौना?

लग्न करणे म्हणजे त्या दोन व्यक्तींना शारिरिक संबंध ठेवण्यास समाजाने त्यांना परवानगी दिली आहे असा कधीच होत नव्हता. या साठी निराळे Norms, रुढी किंवा कुळाचार हे असत.

हे पटले नाही. मासिक पाळी सुरू झाल्यावर सोळा दिवसात गर्भाधान विधी करीत असत.

समजले नाही

श्री. रिकामटेकडा स्वतःच हे मान्य करत आहेत की शारिरिक संबंध ठेवण्यासाठी गर्भादान हा कुलाचार किंवा विधी होणे गरजेचे होते. म्हणजेच लग्नाचा विधी झाला म्हणजे शारिरिक संबंध ठेवण्यास समाजाने परवानगी दिली असे नव्हते असाच याचा अर्थ होत नाही का? मला तरी असे वाटते.

चन्द्रशेखर

तरीही

मासिक पाळी सुरू होऊन सोळा दिवसच झाले आहेत इतक्या कमी वयाच्या मुलीने शरीरसंबंध ठेवणे (सामाजिक) वैद्यकीय ज्ञानाच्या विपरीत आहे.

निसर्गसंकेत

खरे आहे, निसर्ग जरी वेगळे संकेत देत असला तरी, सामाजिक बंधनांमुळे वेगळ्या मर्यादा येतात.

समजले नाही

कृपया खुलासा करा.

ऋतू-चक्र

ऋतू-चक्र ज्या वयात चालू होते ते चालू करण्याचा निर्णय निसर्गाचा आहे. तो नियम निसर्गाने ज्या कारणांसाठी घेतला असेल ते तोच जाणे.

फॅलसी?

निसर्ग करतो ते योग्य आणि त्यावरील सामाजिक बदल हे कमस्सल/तडजोड/अपरिहार्यता असे तुमचे गृहीतक आहे का?

निसर्ग-योग्य-अयोग्य

निसर्ग जे करतोय त्यावर योग्य-अयोग्य अशी टिप्पणी करण्याचा अधिकार मा़झा तरी नाही. जे दिसते आहे ते मी लिहिले. सामाजिक बदल जे केले आहेत ते योग्यच आहेत.

तरीही

आपला मुद्दा अतिशय योग्य व शरीरशास्त्रदृष्ट्या अचूक आहे असे वाटते. त्याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
या पद्धतीचे अनेक जुने रितीरिवाज होतेच. ते आता समाजाने त्याज्यच समजले आहेत.
चन्द्रशेखर

असहमत

समाजाने त्याज्य समजले असते तर प्रश्नच मिटला असता. हे 'वाईज मॅन्स बर्डन' आहे. समाजाला हाकावे लागते. "लग्न करणे म्हणजे त्या दोन व्यक्तींना शारिरिक संबंध ठेवण्यास समाजाने त्यांना परवानगी दिली आहे असा कधीच होत नव्हता. या साठी निराळे Norms, रुढी किंवा कुळाचार हे असत." या विधानांतील रूढी वाईट असत असे माझे प्रतिपादन आहे.

लग्नाच्या

लग्नाच्या वयासंबधुचा हा दुवा बघा:
http://en.wikipedia.org/wiki/Marriageable_age

वर दिलेला दुवा हा कंसेंट बद्दल आहे. शरीर संबंध ठेवण्यासाठीचे वय असा त्याचा अर्थ आहे. शरीर संबंध म्हणजेच् लग्न असं नाही. भारतात लग्नाचं वय १८ आणि २१ आहे (होतं) ( संदर्भः मी दिलेला दुवा). त्यात सुधा कोर्टाच्या निकालानुसार पुरुषांसाठीचे वय १८ आहे. यात अजुन एक गोम आहे. १६ वर्षाच्या खालची लग्न void आहेत आणि १६ ते १८ च्या दरम्यानची लग्न voidable आहेत. याचा अर्थ १६ वर्षाखालील लग्न कायद्यानुसार मुळात लग्नच नाहीत. १६ ते १८ च्या दरम्यानची लग्न ही पोटँशियली इल्लिगल आहेत (म्हणजे तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ह्या लग्नाचा निकाल लागु शकतो. हे लग्न मुळातुन कायदेबहाय्य नाही)

हाच महत्वाचा मुद्दा

>>शरीर संबंध ठेवण्यासाठीचे वय असा त्याचा अर्थ आहे..>>

खरे म्हणजे हाच महत्वाचा मुद्दा आहे. लग्न करणे म्हणजे शरीरसंबंध ठेवण्यास दिलेली संमती असा एका दृष्टीने होतो. जे नियम मानवाने सामाजिक व् इतर् कारणांसाठी घेतलेले आहेत ते त्याचे निर्णय आहेत- ते योग्य आहेतही. तरीही त्याच नियमांमधे जगभरात किती तफावत आहे हे ही पाहणे आवश्यक आहे. प्रगत युरोपात हे वय कमी असणे ह्याची काय कारणे असू शकतील हे माहिती आहेच. पण काही देशात हेच वय ९ वर्षे आहे हे पाहून् धक्का बसला म्हणून् मी उपक्रम वाचकांसमोर वरील माहिती ठेवली.

 
^ वर