एम ८० चा वापर


कॅमेरा नीकॉन कूलपिक्स ९९०. ऑटो मोड अंतर १० व २० फूट
कोणा एके सकाळी कोल्हापूराहून एका गावी एका शाळेतील मुलांचा कार्यक्रम व त्या शाळेचा डिजीटल व्हिडीओ तयार करायला गेलो होतो. प्रवासात मी नेहमी फोटो कॅमेरा तयार ठेवतो त्यामूळे एम ८० चा वापर अशा प्रकारे होतो हे मला नविन होते.

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त प्रकाश चित्र

शहरात देखील अशा प्रकारचे चित्र दिसते
प्रकाश घाटपांडे

१००० शब्द

असे म्हणतात ती 1000 शब्दात जे सांगता येत नाही ते 1 चित्र सांगू शकते. आपण तर दोन चित्रे दिली आहेत. सांगण्यासारखे काही उरलेलेच नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण बजाज कंपनीचे एवढे दणकट वाहन बनवल्याबद्दल कौतुक करायचे की फोटोत जी व्यक्ती हे वाहन चालवते आहे त्या व्यक्तीने एका फटक्यात स्वत:चा व रस्त्यावरून जाण्या येणार्‍या असंख्य लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा जो मूर्खपणा करून दाखवला आहे त्याची कीव करायची.

भारत देश महान
चन्द्रशेखर

+१

:-)

गंमत आहे खरी. इतके असुन अश्या वहातुकी मुळे प्रचंड संख्येने अपघाती मृत्यु झाल्याचे वाचनात येत नाही यावरुन एखादी कनवाळू वाहतूक देवता असावी असा संशय बळावतो. :-)

वापर

गाडीचा वापर नियमबाह्य आहे निश्चित!

मात्र जर टक्कर झाली तर (बहुदा)या चालकाला काही होईल असे वाटत नाही. कारण हा इसम तांदुळाच्या फोपश्या पुंगळ्या घेउन जात आहे. हे पदार्थ बसलेला धक्का पचवून घ्यायला मदत करतील असे वाटते. (हे अशा वाहतुकीचे समर्थन नाही!)

बहुदा पदार्थाची किंमत, वजन आणि आकार यात बसवतांना असे वागले जात असावे.

मात्र अश्याच पद्धतीने कोंबड्या घेऊन जाणाराला मात्र थांबवून मी झापले होते. परत दिसला तर प्राण्यांवर अत्याचार खाली गुन्हा नोंदवीन अशी धमकीपण दिली होती. काही उपयोग होईल अशी आसा नाही पण बेकायदा वागण्याची, किमान नोंद होते ही भावना तरी रुजेल ही माझी अपेक्षा.

आपला
गुंडोपंत

~काही सदस्यांच्या सदैव तर्कट डॉकिन्सपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

दुसरा पर्याय नसावा

त्या व्यक्तीकडे सामानाच्या वाहतुकीसाठी दुसरा पर्याय नसावा. अन्यथा स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा मूर्खपणा सहसा कोणी करत नाही. अशाच रीतीने गहू, बाजरी, मका यांच्या पेंढ्या मोटरसायकलवर आडव्या टाकून त्यांची वाहतूक केली जाते. एका ट्रकपेक्षा जास्त जागा अशा मोटारसायकली रस्त्यावर व्यापतात. क्वचित हिंजवडी परिसरात (मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर) उसाचीही अशीच वाहतूक मोटरसायकलवर केल्याचे पाहिले आहे. शहरात अनेक लॉँड्रीवाले कपड्यांची वाहतूक अशाच रीतीने करतात. त्यांना वाहतुकीचे दुसरे परवडणारे पर्याय उपलब्ध नसतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

बरोबर वर्स्ट पार्ट इज जो वर्ग हे अयोग्य आहे अशी बोंब मारतो तो मग दुसर्‍या सुरक्षीत पर्यायाने होणार्‍या महागाईला किमतीला चुकवायलाही अजिबात तयार नसतो. म्हणुन मग हे सब चलता है विभागात टाकून दिले जाते.

:-)

तुम्ही

तुम्ही सांगितले म्हणून नाहीतर एम-८० आहे हे ओळखण्याचा मार्ग नाही.

इथे खर्च परवडत नाही हे कारण आहे असे वाटते त्यामुळे सहानूभूती वाटू शकते. पण एका हाताने बाइक चालवून दुसर्‍या हाताने मोबाइलवर बोलणे, रस्ता आपल्या पिताश्रींच्या मालकीचा आहे असे समजून आधीच हॉर्न वाजवत सुसाट वेगाने जाणे अशा प्रकारांना कुठल्याही प्रकारे समर्थन* देता येत नाही.

*चलता है सोडून.
--

शिवाय

चार मीटर बाजूची पार्किंगची जागा सोडून देऊन भर रस्त्यावर गाडी उभी करणे आणि आजूबाजूच्या सर्व वाहन आणि प्रवाशांची गैरसोय करणे हे विसरता येणार नाही.

दुसरी बाजू

रस्ता आपल्या पिताश्रींच्या मालकीचा आहे असे समजून चालणार्‍या गाववाल्यांचे काय? बस आणि स्टँड यांच्यात पाच फूट रुंद रस्त्याची पट्टी सोडण्याची गरज काय? बाईकला हॉर्नऐवजी टॉर्पेडो हवे असे कधीकधी वाटते.
पीपल गेट द ट्रॅफिक दे डिझर्व.

इथे

इथे बाइकवाले वि. पादचारी असा संघर्ष अपेक्षित नाही. जे बाईकवरून जातात तेच बरेचदा पादचारीही असतात आणि व्हाइसा व्हर्सा.
जो माणूस बाईकवरून जाताना नियमांचे पालन करतो तो पादचारी असतानाही करेल अशी अपेक्षा आहे.
शेवटच्या वाक्याशी सहमत आहे.

डिझर्व

पीपल गेट द ट्रॅफिक दे डिझर्व.

डिझर्व हॅज गॉट नथिंग टू डू विथ इट

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फुटपाथ कुठे आहे?

रस्ता आपल्या पिताश्रींच्या मालकीचा आहे असे समजून चालणार्‍या गाववाल्यांचे काय?

वरच्या तसेच् त्याच्या वरच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
मात्र त्याचबरोबर चालणारे फुटपाथ अस्तित्त्वात नाहि / त्यावर अतिक्रमण झाले आहे ही सबब बर्‍याचदा देऊ शकतात असे वाटते

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मुळ फोटो

मुळ फोटो मोठा बघतांना मला त्याच्या पायाजवळ एम ८० दिसले म्हणून मला समजले नाहीतर कोणती दूचाकी होती हे मला तेव्हां कळले नाह. एकदा वाटले होते तेवढे अक्षर जास्त ब्राईट करावे. पण "घारीची नजर चुकवणे. . . . ते जरा जास्तच झाले असते.
२००२ मधे नुकताच भारतात परतलो होतो. हे सगळेच मला नवीन होते आज हे सगळे बघण्याची सवय करावी लागली आहे. तेव्हां चीड येत असे आता नजर मेली आहे. मी हे फोटो एक क्षणीक धक्का म्हणून साठवले पण प्रतिक्रिया वाचून गर्दीत पिल्लू सोडून मजा बघणे हा चांगला खेळ असू शकतो हे पटले.

अभिनंदन

प्रतिक्रिया वाचून गर्दीत पिल्लू सोडून मजा बघणे हा चांगला खेळ असू शकतो हे पटले.

इतक्या थोड्या कालावधीत आपण मराठी सायटींचे मर्म आत्मसात केलेत याबद्दल अभिनंदन.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

एम ८० चे वापरकर्ते

मी आजवर दोन प्रकारचे एम ८० चे वापरकर्ते पाहिले आहेत.

  1. गवळी
  2. पुणेकर स्त्री

मुळात नेटावर कधी तरी पाहिल्याच्या आठवणी नुसार या गाडीची संरचना जुन्या पाश्चात्य दुचाकीवरून घेतेली आहे. अर्थात माझ्याकडे आत्ता पुरावा नाही.


पुरावा इथेच कुठे आहे

त्या गाडीचे नाव पर्ल (मेक - यामहा) होते.
(तुमचाच धागा होता तो.)

अरे वा

धन्यवाद. :) एम ८० वरुन बजाज ने बीवायके नावाची छोटी मोटर सायकल काढायचा प्रयत्न केला होता. पण ती चालली नाही फारशी.

बजाज बी वाय के
Bajaj BYK

पुन्हा उजळणी

एम ८० बजाज

आणि

पर्ल यामहा

 
^ वर