इंग्रजी शब्दांचे अर्थ आपल्या भाषेत

इंग्रजी मजकूर वाचता वाचता अडलेल्या शब्दांचे अर्थ मराठीत दिसले तर ते विद्यार्थांना व सामान्य वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. इंग्रजी ते सिंहल / तमिळ भाषेसाठी असा प्रयत्न कोणीतरी केला आहे व त्याचे फायरफॉक्स एड-ऑन उपलब्ध करून दिले गेले आहे.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/183344/

यासाठी इंग्रजी शब्द व त्यापुढे मराठी अर्थ अशी एक टेक्स्ट फाईल कुठे उपलब्ध असेल तर मराठी साठी देखील अशी सुविधा सहजगत्या तयार करता येईल. नमुना म्हणून खालील चित्र पाहा.

सिंहल भाषेतील शब्दांचे अर्थ इंग्रजीत असे दिसतात. व मराठी टू इंग्रजी अर्थ देणारी टेक्स्ट फाईल मिळाली तर बहुधा तेही करता येईल.

१) कोणाला अशी टेक्स्ट फाईल कुठे मिळेल हे माहीत आहे का?
२) नसल्यास कोणी (फुकटात) बनवून देऊ शकेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

हिंदी शब्दांची डिक्शनरी

http://www.cfilt.iitb.ac.in/~hdict/webinterface_user/

हिंदी शब्दांची डिक्शनरी मला येथून मिळाली. बरेचसे शब्द मराठी/ हिंदीत सारखे असल्यामुळे मराठी वेबसाईटवरही ही सुविधा काम करते.

http://saraswaticlasses.net/shabdasampada/hindi.xpi

वर दिलेल्या पत्त्यावरून ही फाईल उतरवून घ्या. फायफॉक्समध्ये फाईल - ओपन फाईल हा पर्याय वापरून ही सुविधा फायरफॉक्समध्ये जोडून घ्या. (युबंटूवर टेस्ट केले आहे. विंडोजचे माहीत नाही) कॉपीराईटचा काही इश्यू आहे का हे पाहून योग्य वाटल्यास मोझिलाच्या ऑफिशीयल साईटवरून हे एड-ऑन उपलब्ध करून देता येईल.

वा! आभार

वा सुविधा फारच उपयोगी वाटाली. विषेशतः माझ्यासारख्या इंग्रजी शब्दसंपदा कमी करणार्‍यांसाठी!
याशिवाय मराठी टु इंग्रजी आल्यास मला फारसा फायदा होणार नसला तरी मराठीच्या अभ्यासकांना तो व्हावा.

श्री. शंतनू यांनी दिलेली माहीती नेहमीच रोचक तर असतेच पण ती अतिशय उपयोगी असते. श्री. शंतनू यांचे अनेक आभार

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

क्रमवार मार्गदर्शन

१) प्रथम येथे उपलब्ध असलेले एड-ऑन जोडून घ्या.
http://www.subasa.lk/ingiya-download.php

२) आता इंग्रजी-हिंदी डिक्शनरी उतरवून घ्या.
http://saraswaticlasses.net/ingiya/en-hi.dict
(वरील लिंकवर "राईट क्लिक" करून सेव्ह लिंक एज... हा पर्याय निवडावा, नाहीतर फाईल ओपन होईल!)
ही फाईल एका नवीन फोल्डरमध्ये साठवून ठेवा. उदा. c:\hindi

३) आता टूल्स - एडऑन - इन्गिया - ऑप्शन्स - एडव्हान्स - "फोल्डर विथ युजर डिक्शनरी" यात वर दिलेल्या (c:\hindi) फोल्डरचा पाथ द्या.

४) फायरफॉक्स पुन्हा सुरू करा.

आपल्याला या चित्रात दाखविल्याप्रमाणे इंग्रजी शब्दांचे अर्थ दिसण्यास सुरुवात होईल.
http://saraswaticlasses.net/ingiya/welcome.png

त्यात दाखवलेल्या अर्थामधील एखाद्या शब्दावर टिचकी मारल्यावर तो शब्द त्या इंग्रजी शब्दाची जागा घेईल. मग ते पान असे दिसेल.
http://saraswaticlasses.net/ingiya/swagat.png

मी हे युबंटूमध्ये टेस्ट केले आहे. पण विंडोजमध्ये देखील चालायचा हरकत नाही.
मराठी डिक्शनरीच्या शोधात आहेच. मिळाली की तिचा उपयोग करता येईल. पण सध्या हिंदीवर काम भागवून न्यावे लागेल असे दिसते. सुमारे सव्वा लाख इंग्लिश शब्द व त्याचे हिंदी अर्थ असलेली ही डिक्शनरी आहे.

_____

गुगल ट्रान्स्लेट

http://translate.google.com/

अर्थात गुगल ट्रान्सलेट खूपच उत्तम आहे आणि त्याचा उल्लेख केल्याशिवाय हा विषय पुरा होणार नाही. मी उदाहरण म्हणून दैनिक भास्कर मधील एक पान गुगलच्या मदतीने इंग्रजीत भाषांतरित करून पाहिले.

http://www.bhaskar.com/article/INT-india-pakistan-talks-begins-in-islama...

या वाक्याचे भाषांतर खाली दिलेले आहे आणि ते समाधानकारक नसले तरी ठीक आहे.
करीब एक घंटे से अधिक चली इस बैठक पर दोनों देशों ने दिल खोल कर अपनी बात रखी
The meeting lasted about an hour over the two countries expressed their heart out.

स्क्रीनशॉट:
http://saraswaticlasses.net/ingiya/googleTrans.png

वर दिलेली सुविधा ही वाचताना एखादा शब्द अडला तर वापरण्यासाठी आहे.

धन्यवाद...

या माहितीसाठी लाख धन्यवाद. सुविधा वापरतो आहे.

मात्र काही काही शब्दांवर कर्सर नेला असता जी विंडो उघडते त्यात वर तो शब्द येतो आणि त्यापुढे काही अगम्य अक्षरे दिसतात आणि तोच शब्द परत खाली दिसतो आणि त्यावर योग्य हिंदी अर्थ असतो. वरच्या ओळीत काय माहिती असते? त्याचे कुठले एनकोडींग आवश्यक आहे का? ती काढता येईल का?

अर्थात सुविधा वापरताना काही त्रास नाही याचा.

परत एकदा धन्यवाद.

==================

+

सोपा पर्याय

विंडोच्या अगदी तळात, उजव्या बाजूला (घड्याळाच्या वर) एक फुलपाखराचे चिन्ह दिसेल. त्यावर उजवी टिचकी दिली की en-si असा पर्याय दिसेल, त्यावर बरोबरची खूण असली तर त्या भाषेत (सिंहली) अर्थ दिसतील. आपण त्यावर टिचकी मारून त्याला तात्पुरती रजा देऊ शकता.
वर दिलेला सव्यापसव्य करायचे नसतील तर खाली दिलेली १.१ वर्जन उतरवून घ्या.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/184619/versions/

अजून

उत्तम सुवीधा! वापरतो आहे.
हिंदी का असेना पण शब्द हाताशी असणे फारच उपयोगी पडते आहे.

मला मराठी - इंग्रजी टेक्स्ट फाईल मिळाली.
http://sanskritdocuments.org/all_txt/marathi-dict.txt
पण त्यात मराठी शब्द रोमन लिपी मध्ये आहेत. :(

कदाचित यांत्रिक रीतीने रोमन मध्ये असलेल्या शब्दांचे मराठीकरण करता आले तर उपयोग होईल.

-निनाद

अवघे दीड हजार शब्द?

>> पण त्यात मराठी शब्द रोमन लिपी मध्ये आहेत.
ही एक अडचण झाली. दुसरे म्हणजे त्यात शब्द फारच कमी म्हणजे सुमारे दीड हजार आहेत. इतके शब्द पुरेसे वाटत नाहीत.

इतर युरोपीय भाषा

अशी सुवीधा इतर युरोपीय भाषांसाठीही बनवता येईल का?
म्हणजे प्रामुख्याने फ्रेंच, स्पॅनिश आणि जर्मन?

मला काही ठिकाणी त्याच्या डिक्शनरीज टेक्स्ट फाईल तयार आहेत (फ्रेंच - हिंदी) असे आढळले.
http://sanskritdocuments.org

-निनाद

 
^ वर