छायचित्र टिका - सोलोमन टेंपल

छायाचित्र टिका -
हे छायाचित्र 'सोलोमन टेंपल ', बक्स्टन इग्लंड येथील आहे. बक्स्टन येथील एका लहानशा टेकडीवर वरिल छायाचित्रातील वास्तु बांधलेली आहे.


""

प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.
-मित्र

Comments

मोठ्या आशेने

सोलोमन टेम्पल म्हटल्यावर मोठ्या आशेने लेखावर टिचकी मारली परंतु नेहमीप्रमाणेच हाती काही लागले नाही. ;-)

फोटो थोड्या मोठ्या आकारात लावायला हवा होता. या आकारात आस्वाद घेणे कठिण वाटते.

मांडणी उत्तम

मांडणी उत्तम - पाठ्यपुस्तकात सांगावी अशी.

काही खिडक्या चिणून बंद, तर एका खिडकीतून पलीकडची खिडकी दिसत आहे, यातली कथा गूढ-रम्य आहे. (र्‍हने माग्रित् ची आठवण आली.) नाहीतर अद्भुतरम्य रंगसंगतीत आणि पाठ्यपुस्तकाचा कित्ता गिरवणार्‍या मांडणीमध्ये तोच-तोचपणा वाटला असता.

प्रसिद्ध वास्तूवर खिडक्या कशा असतील त्यावर छायाचित्रकाराचे नियंत्रण नसते. पण अभावितपणे सापडलेल्या दृश्यातून कथा बनवून सांगणे हे मोठे कौशल्य आहे.

चित्र आवडले, हे सांगणे नलगे.

चित्र

चित्र छान आहे. मोठे हवे होते असे मलाही वाटते. डावीकडचा पांढरा रंग थोडा प्रखर वाटतो आहे.

--

वा!

वा!! चित्र लै भारी!!!

चित्र मोठे हवे..
शिवाय काहि प्रोसेसिंग केले आहे असे वाटते.. केले असल्यास काय?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सुंदर रचना

रचना/मांडणी आणि रंग सुंदर आहेत. फोरग्राऊंड थोडी अजून शार्प हवी होती असे माझे वैयक्तिक मत आहे.

चित्र आवडले

तांत्रिक बाबींवर काही सांहता येणार नाही पण वास्तुचा एकटेपणा आणि खिडकीपलिकडची खिडकी, त्यातून पाहता येणे या गोष्टी आवडल्या.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

धन्यवाद!

प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांना धन्यवाद!

इकडे चित्र टाकताना माझा नेहमीच गोंधळ उडतो. मला मोठेच टाकायचे होते.
इकडे बघता येईल. - http://www.flickr.com/photos/srwalke/4641852014/sizes/l/

फोटो काढल्यावर नेहमी करावे लागणारे सोपस्कार केलेले आहेत. म्हणजे कॉनट्रास वगैरे. जास्त काही नाही. पण फोटो काढताना कोकिन पी चा ND Grad वापरला होता.

- मित्र

ब्रॅकेटींग केले असेलच्.

केले असेल तर उरलेल्या प्रतिमा टाकल्यात तर जरा कळेल. मला exp जरा जास्त वाटतो आहे. तुम्ही म्हणता त्या फिल्टरने डाव्या बाजूच्या ढगांची जास्त डिटेल्स् दिसायला हवी होती. हे आपले माझे मत. बरोबरच असेल असे मुळीच नाही.
फोटो चांगला आहे.
जयंत कुलकर्णी.

आवडले

चित्र आवडले, अगदी मासॉ विंडोजचा वॉलपेपर असल्यासारखे आहे!
हे मंदीर का व कुणी बांधले?
आपला
गुंडोपंत

 
^ वर