जनगणनेत जात?

भारत सरकारच्या वतीने देशव्यापी जनगणनेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी असलेल्या भारतात होऊ घातलेली ही जनगणना अर्थातच अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्यक्ष जनगणनेला अद्याप सुरुवात व्हायची आहे. ही जनगणना जातीनिहाय व्हावी की नाही याविषयी सध्या मतमतांतरे आहेत. जात हा भारतीय समाजव्यवस्थेवरील कलंक असल्याचे काहींचे मत आहे. पण जात हे भारतीय समाजव्यवस्थेचे एक अभिन्न अंग असल्याचे जातीव्यवस्थेवरच्या टिकाकारांनाही मान्य करावे लागते. आज भारतात सर्वच जातींची रचना ही उतरंडीप्रमाणे आहे. जातीत सामाजिकदृष्ट्या उच्चनीचता असल्याने ज्या जाती नीच मानल्या गेल्या त्या सामाजिक तसेच शैक्षणिक, सांपत्तिक व तत्सम बाबींमध्ये मागासलेल्या राहिल्या. उच्च मानल्या गेलेल्या जातींना सहज संधी उपलब्ध असल्याने त्यांचा वरील बाबतीत विकास झाला. हे सगळे सरसकटपणे झाले असे म्हणता येत नाही पण बहूतांशी असे झाले. हाच निकष प्रमाण मानून मागास जातींचे मागासलेपणाच्या बाबतीत वेगवेगळे वर्ग प्रवर्ग तयार केले गेले. (यात जी जात सामाजिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्तरावर होती तिचा समावेश अर्थातच जास्त प्रमाणात मागासलेली जात अशा प्रवर्गात समावेश केला गेला. उदा. विशेष मागासप्रवर्ग, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती इ.) या सगळया मांडणीत ज्या जाती सांपत्तिक व शैक्षणिकदृष्ट्या खरे तर मागास नव्हत्या पण जातीच्या उतरंडीत त्यांचे स्थान खाली होते त्यांचीही रवानगी एकाच न्यायाने मागासवर्गात करण्यात आली. (उदा. सोनार, गुरव, वाणी, माळी यांना ओबीसीत तर राजपूत लोकांना भटक्या विमुक्त जातीत टाकण्यात आले.) ज्या जाती खरे तर सांपत्तिक व शैक्षणिक दृष्ट्या सरसकट सुधारलेल्या नव्हत्या त्यांचा समावेश सामाजिकदृष्ट्या उच्च जातीचे असल्याने खुल्या प्रवर्गात झाला. (उदा. कुणबी, मराठा, मुसलमान) या सगळ्यांसाठी १९३० सालची म्हणजे जवळपास ऐंशी वर्षापूर्वीची जातीनिहाय झालेली जनगणना आधारभूत मानन्यात आली. आज नव्याने या मागासवर्गातील लोकांची संख्या माहित व्हावी म्हणून जातिनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. या मागणीला विरोधही होत आहे. सध्याच्या माझ्या माहितीनुसार जातिनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ खालील मुद्दे मांडले जातात.
१. कोट्यावधी रुपयांचा निधी मागास जातींच्या विकासासाठी आज खर्च केला जातो. अनेक योजना सोयी, सवलतींची आखणी व अंमलबजावणी केली जाते. हे सगळे ऐंशी वर्षापूर्वीची जनगणना आधारभूत मानून केले जाणे योग्य नाही.
२. जातनिहाय जनगणनेमूळे त्या त्या जातीची खरीखुरी लोकसंख्या पूढे येईल आणि अल्पसंख्य, बहूसंख्य म्हणून जे राजकारण चालते ते बदलेल. ( खरे म्हणजे हे राजकारण चालूच राहील फक्त बदलेल कारण नव्याने हाती आलेल्या आकड्यात काही बहूसंख्य व काही अल्पसंख्य जाती असतीलच)
जातिनिहाय जनगणनेचा विरोध करतांना खालील मुद्दे मांडले जातात.
१. अशा जनगणनेमुळे जातीजातीतला दूरावा वाढेल. बहूसंख्य अल्पसंख्य असे वाद सुरु होतील.
२. जातीभेद निर्मुलनाच्या चळवळीचा आजपर्यंतचा प्रवास उलट्या दिशेने सुरु होईल.
वरील मुद्यांमध्ये अजून बरीच भर पडू शकते. पण या सगळ्यात जर जातीनिहाय जनगणनेचा निर्णय झालाच तर मागास असण्यानसण्याचा आणि विशिष्ट जातीचा असण्याचा कितपत संबंध सध्याच्या काळात आहे याविषयी संदेह वाटतो. जनगणनेतून हाती आलेल्या जातींना त्यांच्या जातींच्याच आधारावर (त्यांच्या मागास असण्यानसण्याचा विचार न करता ) जर सोयी सवलती दिल्या जाणार असतील तर ते कितपत योग्य ठरेल हा ही मोठा प्रश्न आहे.
एकूणच जनगणना जातिनिहाय असावी का? असावी तर का? नसावी तर का?
(जनगणना फॉर्म मधल्या सध्याच्या प्रश्नावलीवरुन तरी एखादे कुटुंब मागास की प्रगत हे निर्विवादपणे स्पष्ट होते असे दिसते. मग तरीही जात का असाही एक प्रश्न मनास पडतो.)

लेखनविषय: दुवे:

Comments

हवी

१. अशा जनगणनेमुळे जातीजातीतला दूरावा वाढेल. बहूसंख्य अल्पसंख्य असे वाद सुरु होतील.

आत्ता वाद आहेतच!
माहितीमुळे वाद शमविण्यात मदत होईल. सरकारी आकडे असले की कमिटेड लोकांनी जमविलेल्या खासगी आकड्यांवर (तेही गणनेचे नव्हे, तर सँपल सर्व्हेचे) विसंबावे लागणार नाही.

२. जातीभेद निर्मुलनाच्या चळवळीचा आजपर्यंतचा प्रवास उलट्या दिशेने सुरु होईल.

जात-निर्मूलन हे अधिक चांगले ध्येय असले तरी तुम्ही उल्लेखिलेली चळवळ 'भेद' निर्मूलनाची आहे. कोणत्याही भेद-निर्मूलनात 'सध्या असलेले भेद' उलटे फिरवावेच लागतात.

जनगणनेतून हाती आलेल्या जातींना त्यांच्या जातींच्याच आधारावर (त्यांच्या मागास असण्यानसण्याचा विचार न करता ) जर सोयी सवलती दिल्या जाणार असतील तर ते कितपत योग्य ठरेल हा ही मोठा प्रश्न आहे.

+१

जनगणना फॉर्म मधल्या सध्याच्या प्रश्नावलीवरुन तरी एखादे कुटुंब मागास की प्रगत हे निर्विवादपणे स्पष्ट होते असे दिसते. मग तरीही जात का असाही एक प्रश्न मनास पडतो.

आर्थिक प्रगतीमुळे सामाजिक हँडिकॅपचे परिमार्जन होतेच असे नाही.

सामाजिक हँडिकॅपचे परिमार्जन

आर्थिक प्रगतीमुळे सामाजिक हँडिकॅपचे परिमार्जन होतेच असे नाही.
वरील मत पटले. पण सरकारचे प्रयत्न मागास जातींच्या आर्थिक विकासापर्यंतच येऊन थांबतात. शैक्षणिक विकासाचाही हेतू आता आर्थिक विकास हाच बनून गेला आहे. हे जे सामाजिक हॅंडिकॅप आहे त्याचे परिमार्जन अट्रासिटी सारख्या कायद्यांमूळे होते पण या परिमार्जनाची तऱ्हा ही सध्या उलटीच दिसते आहे. एखाद्या जातीचा सभासद सवलत घेऊन जगतो आहे असे त्याला जोपर्यंत माहित आहे तो पर्यंत त्याचे पंगूपण जाईल काय?

जातवार जनगणना व्हायला हवी

खरं तर मला एका वेगळ्या कारणासाठी जातवार जनगणना व्हावी, असे वाटते.
मी जन्मलो त्या ब्राह्मण समाजाला गेली अनेक दशके 'साडेतीन टक्केवाले' म्हणून हीणवले जाते. हा शब्द कुणी वापरात आणला याबद्दल वेगवेगळे तर्क वाचायला मिळाले. कुणी म्हणतात, की लक्ष्मण माने यांनी हा शब्द रुढ केला तर कुणी म्हणतात, की ब्राह्मणेतर चळवळीच्या काळात जेधे-जवळकरांनी हा शब्द रुढ केला. यापूर्वीची जातनिहाय जनगणना १९३० मध्ये झाली होती, हे लक्षात घेता १९३० नंतर केव्हातरी हा शब्दप्रयोग रुढ झाला असावा, ही शक्यता जास्त वाटते.
दुसरीकडे ब्राह्मण समाजाने स्वातंत्र्यानंतर आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यावर भर दिलेला आढळतो. बहुतेक ब्राह्मण कुटुंबात 'हम दो हमारे दो' आणि आता तर एकावरच समाधान मानण्याचा कल दिसतो. म्हणजे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या साडेतीन टक्के राहिले नसणार, हे निश्चित. मग सध्या हे प्रमाण किती आहे. जर ते दीड टक्क्यापर्यंत कमी आले असेल तर मग ब्राह्मणांना 'दीड शहाणे' का म्हणले जाऊ नये? साडेतीन टक्केवाले हा झिजून गुळगुळीत झालेला शब्द आहे म्हणून नव्याचा सोस इतकेच.
'ब्राह्मणांनी या देशाचे, येथील समाजाचे वाटोळे केले असल्याने त्यांना भारतातून हाकलून द्यावे', असे अलिकडे जाहीरपणे म्हटले जाते. पण यात अडचण अशी आहे, की देशातील ब्राह्मणांची एकूण संख्या कळल्याखेरीज नक्की कितीजणांना हाकलून द्यायचे, ते कसे ठरवणार? हाताला धरुन हाकलून द्यायचे ठरवल्यास शेजारचा कोणता देश सीमेवरील फाटक उघडून त्यांना आपल्या भूमीत घेणार? भारतात बदनाम झालेल्या जातीची पीडा कोण गळ्यात घेणार? मग उपाय एकच उरतो, की ब्राह्मणांनीच आपणहून भारताबाहेर चालते व्हावे. तसे करायचे झाल्यास निरनिराळ्या देशांच्या वकिलातींसमोर रोज किती ब्राह्मणांनी रांग लावायची, याचा एक कालबद्ध कार्यक्रम आखावा लागेल. त्यासाठीच एकूण ब्राह्मणांची संख्या समजणे गरजेचे आहे.
पण खरे तर हलकट ब्राह्मणांचे समूळ उच्चाटन करण्याचा एक सोपा उपाय आजवर कुणालाच का नाही सुचला? हा उपाय म्हणजे भारतातील सगळ्या ब्राह्मणांना अंदमान-निकोबार द्वीपसमूहावर नेऊन ठेवायचे आणि त्यांची वसाहत करु द्यायची. तेथील आदिवासींना भारतात आणून येथील ब्राह्मणांची मालमत्ता त्यांना द्यायची. कालांतराने या विस्थापित ब्राह्मणांत आपापसातील देशस्थ-कोकणस्थ-कर्‍हाडे-देवरुखे-गौड सारस्वत-द्राविडी-कान्यकुब्ज असे वाद उफाळून येतील आणि मग यादवीत सगळे मरतील. ( थोड्या थोडक्या नव्हे १०० पोटजाती आहेत ब्राह्मणांमध्ये)

कुठल्यातरी

कुठल्यातरी विद्रोही वगैरे परिसंवादात सहभागी जनांचे एकमत झाले की ब्राह्मणांविरोधी चळवळ सुरु करायला हवी. त्यावर नामदेव ढसाळ म्हणाले (जे त्या परीसंवादातील एक होते), "अहो कुणाविरूद्ध आंदोलन करणार तुम्ही? ब्राह्मण उरलेत कुठे इथे? सगळे गेले सिलिकॉन सिटी मध्ये. सत्ताधारी/विरोधी सर्व आपल्यामागे, आरक्षण आपल्या बाजूने, गांधीवधानंतर झालेली जाळपोळ इत्यादी सर्व प्रतिकूल परिस्थितीतूनही आपली प्रगती करून तो समाज पुढे निघून गेला आणि तुम्ही बसला आहात इथे आंदोलने करत आरक्षण घेऊन".

वध नाही

गांधीवध हा शब्द प्रचलित असल्यामुळे पटकन वापरला जातो. तसा तो वापरू नये ही विनंती.
मी बिल्कूल गांधीवादी नाही.

क्षमस्व...

विनंती स्वीकारता येत नाही त्याबद्दल क्षमस्व. "गांधीवध" हा प्रचलित आहे म्हणून नव्हे तर जाणीवपूर्वक वापरलेला आहे. अर्थात त्यावरून वादविवाद करायची अजिबात इच्छा नसल्याने ज्यांना पाहिजे त्यांनी तो "गांधीहत्या" असा वाचावा... धन्यवाद

प्रतिसाद

हा शब्द आपण ढसाळ यांच्या तोंडी घातला आहे की त्यांनीच तसा वापरला ते स्पष्ट करावे.
जर हा शब्द आपण निवडला असेल पण वादविवाद नको असतील तर बोटांवर लगाम घाला.

वैयक्तिक रोखाचा मजकूर संपादित.

ढसाळ

ढसाळ यांचा शब्दन् शब्द लिहिलेला नाही. तो आशय आहे एवढी साधी गोष्ट समजायला हरकत नव्हती. बोटं माझी आहेत तेव्हां काय लिहायचं आणि कुठले शब्द वापरायचे याचं स्वातंत्र्य मला आहे असं माझं मत आहे. तेव्हां "बोटांवर लगाम" घालण्याची विनंतीही अस्विकारार्ह. ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही.

मजकूर संपादित. वैयक्तिक रोखाच्या संवादासाठी कृपया, खरडवही किंवा व्य. नि.चा वापर करावा.

प्रतिसाद

अवतरणचिन्हांमध्ये लिहिलेला मजकूर बघूनही 'ढसाळ यांचा शब्दन् शब्द लिहिलेला नाही. तो आशय आहे एवढी साधी गोष्ट' समजण्याची प्रथा ***बांच्यात प्रचलित असेल, माणसे उलट गृहीत धरतात.
बोटांवर लगाम घालण्याची विनंती नाही, मागणी केली होती.
वैयक्तिक रोखाचा मजकूर संपादित.

मागण्या

मागण्या करत रहा आम्ही त्याला कचर्‍याच्या टोपल्या दाखवू. कदाचित एवढीच पद्धत .....कड्यांच्यात समजत असेल.

महत्वाचा मुद्दा

आता ज्या प्रमाणात लोकसंख्या असतील त्या नव्या प्रमाणात मागास जातींना आरक्षण देणे म्हणजे ज्या गटाने जन्मदर नियंत्रित केला नाही त्यांना बक्षीस देणेच आहे की!

बक्षीस कसे काय?

आता ज्या प्रमाणात लोकसंख्या असतील त्या नव्या प्रमाणात मागास जातींना आरक्षण देणे म्हणजे ज्या गटाने जन्मदर नियंत्रित केला नाही त्यांना बक्षीस देणेच आहे की!

बक्षीस कसे काय? अशा जन्मदर नियंत्रित न करणाऱ्या जातींमध्ये विशिष्ट जागेसाठी अर्ज करणारेही तुलनेने अधिक असणारच की.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्वतःचा एक डोळा फोडणे

जात म्हणून तो गट अधिक जागा फस्त करेल. त्यांची संख्याच अधिक असल्यामुळे त्यांना वैयक्तिक फायदा नाही (काटेकोर आकडेमोड केली तर थोडासा तोटाच असल्याचे दिसेल). पण ज्यांनी कुटुंबनियोजन केले त्यांच्या वंशजांना मात्र उगीचच कमी जागा मिळतील. तो तोटा बराच मोठा असेल. असे हे सापेक्ष बक्षीस.

वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने

जास्त लोकसंख्येचे विशिष्ट जातवाले व कमी लोकसंख्येचे विशिष्ट जातवाले या समूहांमधील व्यक्तींना संख्याशास्त्रीय आकडेमोड केल्यास वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने नफा तोटा होऊ नये हे सिद्ध करता येईल असा माझा कयास आहे. त्यामुळे कुटुंबनियोजन करणाऱ्यांच्या वंशजांना कमी जागा मिळतील हा तोटा आहे हे मानण्यास कठीण जात आहे. एक समूह म्हणून लोकसंख्या कमी असल्याचा तोटा वैयक्तिक पातळीवर जितका त्या समूहातील व्यक्तीला होणार तितकाच तोटा जास्त लोकसंख्या असणाऱ्या समूहातील व्यक्तीलाही होणार ना?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वेगळा मुद्दा

कुटुंबनियोजन करणार्‍यांच्या वंशजांना जागा मिळण्याची शक्यता पूर्वजांची काहीही चूक नसताना कमी झाली. लोकसंख्या वाढविणार्‍या जातीच्या लोकांच्या जागाही कमी झाल्या पण यास त्यांचे पूर्वज स्वत:च कारणीभूत असल्यामुळे त्यास पूर्वजांचा तोटा मानता येणार नाही.
वंशजांचा तोटा मोजायचा नसून पूर्वजांचा तोटा मोजायचा आहे.
समजा क आणि ख गटांचे ५०-५० सदस्य आहेत आणि नोकर्‍या/शिक्षणाच्या जागा ५-५ वाटल्या जातात. क च्या द्रष्ट्या स्त्री-पुरुषांनी २०० वंशज बनविले पण ख चे वंशज ५० च राहिले. नव्या रचनेत क च्या वाट्याला ८ जागा येतील. म्हणजे संख्येत वाढ=३००%, पण जागांची वाढ=केवळ ६०%. यास मी थोडा तोटा म्हणतो. ख च्या बाबतीत संख्येत वाढ=०%, जागांची घट=६०%. यास मी खूप तोटा म्हणालो.

जात गणना हवी

+१ सहमत आहे.

१९३० नंतर पहिल्यांदा जात गणना होत आहे (? होते आहे की नाही माहित नाही. आमच्या घरी आलेल्याने विचारली नाही व लिहिली पण नाही.) ही गणना झाली तर सामाजिक स्थित्यंतराची भरपूर माहिती मिळू शकेल. सामाजिक विज्ञानात रस असणार्‍यांना ती पर्वणीच ठरेल. जाती निहाय सॅम्पल सर्वे आय्.एस्.एस्,ओ ने मागे केला होता. त्यात बरीच चांगली माहिती मिळाली होती.

मी असे ऐकले होते की जातीनिहाय डी.एन्.ए. चाचण्या झाल्या आहेत. आपल्या मिश्र वंशावर त्यामुळे बराच प्रकाश पडू शकतो. कदाचित जातिभेद नष्ट होण्यास (वा तेढ वाढण्यास देखिल) अशा चाचण्यांची मदत होऊ शकतो.

खरे ते बाहेर येऊ द्या ते अडचणीचे असले तरी चालेल या पक्षाचा मी आहे.

आता जातनिर्मूलनाबाबत. मिश्रविवाह होऊनही जात मोडली जात नाही असे सध्याचा कायदा मानतो. फक्त बापाची जात पुढे धरली जाते. माझ्या मते घटनेच्या समानतेच्या तत्वाच्या हे विरुद्ध आहे. (आईची जात का धरली जात नाही?). जात मोडायची असेल तर मिश्रविवाह आणि पुढच्या पिढीची जात संपणे हा एकच उपाय मला दिसतो. पण सध्याच्या कायद्याने जी जात नाही ती अशीच व्याख्या केलेली दिसते.खे बदलायला हवे.

प्रमोद

पुरुषसत्ताक


बहुतेक जगभर पुरुषसत्ताक समाज आहे आणि सध्या तेच सोयिस्कर दिसते आहे. केरळ, ऍमेझॉन, इ.मध्ये कोणत्या परिस्थितीमुळे मातृसत्ताके बनली ते मला माहिती नाही.


य गुणसूत्र जीवनावश्यक नसल्यामुळे त्यातील जनुकांमध्ये विविधता आली तर नवल नसावे. संप्रेरकांचा बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, इ. वर प्रभाव पडतो. तंतुकणिकांचे कार्य अगदीच जीवनावश्यक असल्यामुळे (जरी म्यूटेशनचा दर अधिक असला तरी) त्यात विविधतेला वाव नसावा. य गुणसूत्रात ६ कोटि अक्षरे आहेत तर तंतुकणिकांमध्ये केवळ १६०००!
म्हणून जात लिंगसापेक्ष जनुकीय मानली तर तिचे वहन करण्यासाठी पुरुषांकडे एक शक्यता आहे; स्त्रियांकडे काही मार्ग नाही.
कदाचित, य गुणसूत्रात जातीची जनुके असल्याची मनूची खात्री असेल ;)

वाटोळे, गोंधळ आणि ....

'ब्राह्मणांनी या देशाचे, येथील समाजाचे वाटोळे केले असल्याने त्यांना भारतातून हाकलून द्यावे',
खरे तर आपल्या देशाचे जे काही भले आणि जे काही वाटोळे आतापर्यंत झाले त्यात भारतातील सर्वच समुहांचा थोडाफार सहभाग आहे. एखाद्या जातीने असे केले हे खरे तर आकसापोटी म्हटले जाते.

ब्राह्मणांची संख्या मोजायची तर नेमके ब्राह्मण कुणाला म्हणायचे हे ही ठरवावे लागेल. कारण गुरव, सोनार, वाणी या बांधवांनी आणि स्वाध्याय व तत्सम परिवारात संघटीत झालेल्यांनी (अर्थात सगळे भेदभाव विसरुन) स्वतःच एकजात ब्राह्मण म्हणण्यास अलिकडच्या काही काळात सुरुवात केली आहे. पून्हा जुन्या पोटजातींची समस्या आहेच.

जातीत मराठा म्हणून सर्वसाधारणपणे समजले जाणारे लोक - देशमुख, पाटील, लेवापाटील, कुणबी, मराठाकुणबी अशा नोंदी करुन गोंधळ उडवून देतील.

मराठा नसलेल्या काही जातींकडे पाटीलकी पूर्वापार होती तेही पाटील म्हणून नोंदवतील. कुळकर्णी , देशपांडे ही आडनावे ब्राह्मणांपैकी मानली जात असली तरी ती व्यवसायाशी निगडीत असल्याचे ऐकले आहे. या आडनावाचे सगळे ब्राह्मण असतील का.

मूळात जात सांगतांना जनगणना करणाऱ्या यंत्रणेकडून काही पूरावाच मागितला जाणार नाही मग लोक सांगतील ते खरे असे मानले जाणार असेल तर गोंधळ उडणार नाही काय.

हलकट (हा शब्द कॉपी करुन चिकटवला आहे टाईप केलेला नाही)

मला स्वतःला मी काहीही म्हणू शकतो परंतु मी एखाद्या समुहाचा प्रतिनिधी असलो म्हणजे मी माझ्या समुहाचे नाव घेऊन काहीही बरळण्याचा अधिकार मला प्राप्त होतोच असे नाही.

शब्दामागील भावना समजून घ्यावी

खरे तर एखाद्याच शब्दावरुन चांगल्या चर्चेचा रोख बदलावा, असे मला वाटत नाही. हवे तर माझ्या प्रतिक्रियेकडे उपरोधिक विनोद म्हणूनही दुर्लक्ष करण्यास हरकत नाही. शेवटी शब्दामागील भावना महत्त्वाची.
पण झालंय काय, की गेली जवळपास १०० वर्षे ब्राह्मण समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करुन 'तुम्ही हलकट आहात' असे वारंवार सांगितले गेले. पहिल्या पिढीने जमेल तेवढा त्याचा प्रतिवाद केला नंतर नाद सोडून दिला. याच समाजातील अनेक विद्वानांनी 'होय. पूर्वजांच्या पापांची शिक्षा वारसांनी भोगली पाहिजे' अशी कबुली दिली. सध्याही जे काही चाललंय ते बरोबरच असावे, असे वाटते . (सुवर्णमहोत्सवी वर्षातील महाराष्ट्राची कामगिरी (अचिव्हमेंट).
मला असे वाटते, की प्रदीर्घ काळ इतर समाज एखाद्या समूहाला जे वारंवार सांगत आहेत ते त्या समूहाने मान्य का करायचे नाही? किमान माझ्यापुरते मी ते मान्य करुन चाललो आहे.
मी काही माझ्या समूहाचे प्रतिनिधीत्व करत नाही. 'समूहातील एक' एवढीच माझी ओळख. गंमत म्हणजे माझ्या पूर्वजांनी कोणतेही पाप केले नसतानाही केवळ जातीच्या शिक्क्यामुळे शिक्षेचा वाटेकरी आहेच. न कुरकुरता ती भोगतो आहे.

बरळण्याचा हक्क प्राप्त होत नसला तरी एकदा प्यायल्यानंतर ती कृती आपल्या नियंत्रणात थोडीच असते?
असो. मी या व्यासपीठावर नवीन आहे. माझा तो विशिष्ट शब्द कसा खोडावा, याचे मार्गदर्शन कृपया कुणी तरी केल्यास मी आभारी राहीन.
(आता एक नवीन प्रश्न मला कुरतडायला लागलाय. 'संन्याशाची पोरे' म्हणून हीणवून कोवळ्या पोरांना छळणार्‍या, खेड्यापाड्यांत आपल्या कुलकर्णीपणाच्या ताकदीवर सर्वसामान्यांना वाकवणार्‍या, विठ्ठलाच्या दारात भाविकांकडून भीक मागायला बसलेल्या, परकी आक्रमक आपल्या समाजाला बाटवत असतानाही कर्मकांडाच्या बाहेर न पडणार्‍या अशा काही गटांना काय म्हणून संबोधायचे? एखादा सर्वमान्य शब्द शोधला पाहिजे.)

सहमत

+१ सहमत.

मूळात जात सांगतांना जनगणना करणाऱ्या यंत्रणेकडून काही पूरावाच मागितला जाणार नाही मग लोक सांगतील ते खरे असे मानले जाणार असेल तर गोंधळ उडणार नाही काय.

जनगणनेत सांगितलेल्या गोष्टी इतर कुठे पुरावा म्हणून वापरत नाहीत. म्हणून लोक खरे सांगतील असे धरून चालू. याशिवाय जात न सांगणे हा अधिकार प्रत्येकाला असतो व त्यांनी तो बजवावा. ज्यांची अशी सांगितलेली जात नसणे व त्यांची संख्या एका जनगणनेतून दुसर्‍या जनगणनेत वाढणे हे कुठेतरी जातनिर्मुलनास मदत करणारे राहिल.

प्रमोद

आवडले

जात न सांगणे हा अधिकार प्रत्येकाला असतो व त्यांनी तो बजवावा. ज्यांची अशी सांगितलेली जात नसणे व त्यांची संख्या एका जनगणनेतून दुसर्‍या जनगणनेत वाढणे हे कुठेतरी जातनिर्मुलनास मदत करणारे राहिल.

आपल्या या वाक्याशी संपुर्णपणे सहमत आहे. खरंतर सरकारने स्वतःहून अशा जात न सांगणार्‍यांची संख्या ठळकपणे प्रसिद्ध करावी. असे लोक जरी मुठभर असले तरी आपल्या सोबत् किमान काही लोक आहेत ही भावना मनास उभारी देणारी असते. तसेच अन्य लोकांनाही यातून प्रेरणा मिळू शकते.

जयेश

फायदा काय?

मूळात जात सांगतांना जनगणना करणाऱ्या यंत्रणेकडून काही पूरावाच मागितला जाणार नाही मग लोक सांगतील ते खरे असे मानले जाणार असेल तर गोंधळ उडणार नाही काय.

जनगणनेत दिलेल्या माहितीचा वैयक्तिक पातळीवर काहीच फायदा नसतो. त्यामुळे खोटे बोलण्याचे प्रयोजनच नाही. 'मूळ' ब्राह्मण नसलेल्या एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण असल्याचा दावा केल्याने फारतर काय साध्य होईल?: जेव्हा लोकसंख्येच्या नव्या प्रमाणात आरक्षण देण्याचे धोरण ठरेल तेव्हा या व्यक्तीच्या 'मूळ' जातीला कमी टक्के 'जागा' प्राप्त होतील. त्यात या व्यक्तीचे नुकसान होण्याचीच शक्यता आहे. या व्यक्तीच्या जातीची असलेली माहिती परिचितांच्या मनातून बदलली जाणार नाही. म्हणजे रोटी-बेटी व्यवहारात काहीच फायदा होणार नाही.

जात न सांगण्याचा अधिकार खरोखरच आहे काय ?

थोडेसे अवांतर :

माझे आई वडील ब्राम्हण म्हणून माझी 'जात' ब्राम्हण, माझ्या पत्नीचे आई वडील आगरी म्हणून तिची जात 'आगरी'.
आपल्या संततीला कुठलीही जात किंवा धर्म लावायचा नाही असे आम्ही ठरवलेले.

माझ्या मुलीच्या जन्मनोंदणी वेळी संबधित लिपिक जन्मदाखल्यावर जात आणि धर्म पाहिजेच म्हणून हटून बसला, आणि तेसुद्धा फक्त वडिलांचीच जात मुलांना लावता येते या प्रवादावर!

वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतल्यावर हीच वस्तुस्थिती मला वेगळ्या भाषेत समजावण्यात आली. ( आम्हाला आमचे काम समजत नाही का? पासून कशाला मुलीच्या भविष्याशी खेळताय? इ.इ.)

सरकारी कामाचा दांडगा (आणि कटू) अनुभव असल्यामुळे अखेरीस नमते घेऊन हे मान्यच करावे लागले.

तात्पर्य: कुणीही कितीही गप्पा मारल्या तरी 'जात' ही सरकारपुरस्कृत गोष्ट आहे आणि ती कधीही 'जात' नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रबोधनकार हे केवळ उपनाम म्हणून वापरले आहे, थोर विचारवंत प्रबोधनकार ठाकरेंशी साम्य दाखवण्याचा कोणताही प्रयत्न नाही

नियम

आई-बाप दोघांपैकी 'खालची जात' जी असेल ती नोंदवता येते. विशेषतः आईची. आगरी समाजास ओबीसी दर्जा आहे असे वाटते. खुशाल ती जात कागदावर लावा. हट्टाने. हरकत नाही. त्याने तुमच्या निधर्मीपणास बाधा येत नाही.
(आमच्या बंधूराजांनी आयुष्यभर जात माणूस अन् धर्म माणूसकी असं वापरलं आहे. त्यांच्या दंडाच्या आकारमाणाकडे पाहून कटकट् करायाची कुण्याही कारकुन्ड्याची हिम्मत झालेली नाही आजतागायत. ;) )
तर मुद्दा हा, की तुमच्या अपत्यांस उद्या उठून भांडण करण्यास मुद्दा राहू नये. की तुम्ही आमच्या साठी अमुक चुकीचे केलेत. अपत्याने दंडाचा घेर वाढवून स्वतः कारकूनांस दटावून आपला धर्म मानवता अन् जात मानव लिहवावे. आपण आपले पहावे ;;)

प्रबोधनकारांनी उकरून काढलेला धागा आहे.

म्हणून एक् प्रतिसाद नोंदविण्याची इच्छा झाली.

(आता एक नवीन प्रश्न मला कुरतडायला लागलाय. 'संन्याशाची पोरे' म्हणून हीणवून कोवळ्या पोरांना छळणार्‍या, खेड्यापाड्यांत आपल्या कुलकर्णीपणाच्या ताकदीवर सर्वसामान्यांना वाकवणार्‍या, विठ्ठलाच्या दारात भाविकांकडून भीक मागायला बसलेल्या, परकी आक्रमक आपल्या समाजाला बाटवत असतानाही कर्मकांडाच्या बाहेर न पडणार्‍या अशा काही गटांना काय म्हणून संबोधायचे? एखादा सर्वमान्य शब्द शोधला पाहिजे.)

हे विठ्ठलाच्या दारी बसलेले बडवे असतात.
त्यात ब टाईपताना पुढे चुकून एच् टायपून पहा. योग्य शब्द सापडेल. त्या शब्दाने कुप्रसिद्ध अश्या लोकांत अन् बडव्यांत फरक असा, की तो कुप्रसिद्ध पैसे घेऊन ज्याच्या भेटीसाठी पैसे घेतलेत तो भेटेल याची ग्यारंटी घेतो, हे बडवे ती ग्यारंटी गेली खड्यात, पैसे टाक इतकेच करतात.

 
^ वर