नृशंस

माझे वडिल इझ्रायल प्रेमी असल्याकारणाने आमच्या घरात सर्वांत जास्त पुस्तके इझ्रायल, ज्यू, ज्यू तत्वज्ञान, दुसरे महायुद्ध ह्या संदर्भात होती. ना.ह. पालकरांचे "इझ्रायल, छळाकडून बळाकडे" मी अनेकदा वाचले. त्यावेळी मला दोन गोष्टींचा प्रचंड अभिमान वाटत असे - १) जगाच्या पाठीवर भारत हा असा एकच देश आहे जिथे ज्यू धर्मीयांचा केवळ ते ज्यू आहेत ह्या एका गोष्टीमुळे छळ झाला नाही. २) ना.ह. पालकरांच्या लिखाणाची दखल घेऊन त्यांना अभिवादन म्हणून इझ्रायलमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले (लक्षात घ्या की इझ्रायल हा एक आकारमानाने महाराष्ट्राच्या १/३ देश आहे).

त्यानंतर वि. ग. कानेटकरांचे "इझ्रायल, युद्ध, युद्ध आणि युद्धच" हे पुस्तक वाचले. इझ्रायल सारखे एक चिमुकले राष्ट्र जन्मल्याक्षणी सहा क्रुर व खुनशी इस्लामी शेजार्‍यांशी कसा लढा देते व पुढे पण वेळोवेळी अतुट राष्ट्रनिष्ठा, विजिगिषु वृत्ती आणि योग्य राजकीय डावपेच ह्यांच्या जोरावर ते कसे सततच्या लढाया जिंकत जाते ते मूळातूनच वाचण्याजोगे आहे.

मी अनेकदा पाहते की लोक म्हणतात की अमेरिकेचा पाठिंबा होता म्हणून इझ्रायल तगले. पण इझ्रायल जरी अमेरिकेचे सहाय घेत असले तरी ते एक व्यापाराचा भाग म्हणून. त्यात कोणताही मिंधेपणा नाही. अनेकदा इझ्रायलने अमेरिकेला न पटणारे निर्णय घेतलेला आहेत. प्रत्येक इझ्रायली परराष्ट्रमंत्र्याने अमेरिकेला बजावले आहे की इझ्रायलला अमेरिकेची गरज नसून अमेरिकेला शीतयुद्धात मध्यपूर्वेत गैर-इस्लामिक सहयोगी म्हणून इझ्रायलची गरज आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्यू धनिकांच्या हातात आहे.

तसेच केवळ अमेरिकेच्या पाठिंब्यावर जर कोणतेही राष्ट्र सशक्त बनू शकते असे जर कोणाला म्हणायचे असेल तर त्यांनी आज पाकिस्तानची अवस्था पाहावी. असो.

पुढे पुढे, इ. ९-१० मध्ये असताना इंग्रजी पुस्तके वाचायची सवय लागली. एनिड ब्लिटन, एरिक क्येस्तनर वैगरेंची पुस्तके वाचता वाचता लिऑन युरिसचा "एक्सोडस" हा पहिलाच मोठा ग्रंथ वाचला. खरेतर ती एक सुरस कादंबरी आहे. मात्र त्यातील प्रसंग हे सत्य घटनेवर आधारित आहेत. कादंबरी वाचत गेले आणि मला तिचे वेडच लागले. तिचे इतके वेळा पारायण केले की कित्येक उतारे तोंडपाठ झाले. सुरवातीला इंग्रजी शब्दांचे अर्थ संदर्भाने कळायचे. मग मी एकदा न कळलेले शब्द लिहून काढायचा व शब्दकोशात त्याचा अर्थ शोधायचा व मग पुन्हा एकदा तो उतारा वाचायचा असे चालू केले. मग ही कादंबरी पुन्हा नवी होऊन समोर आली.

विशेषत: ऑश्विट्झ, ट्रेबलिंका, बिर्केनाऊ वै. ची वर्णने वाचून अंगावर काटा उभा राहिला. युरोप आणि रशियातून ज्यूंचा समूळ नि:पात करायचा ह्या वेड्या विचारांपायी ज्या क्रुरतेने ६० लाख ज्यूंची ह्या छळछावण्यातून निर्मम हत्या करण्यात आली ती वर्णने वाचवत नाहीत. त्यातूनही जे बचावले त्यांची, विशेषत: मुलांची शारीरिक व त्याहीपेक्षा जास्त मानसिक अवस्था पाहून मन विदीर्ण होते.

आज हे सर्व आठवायचे कारण की भारतात सध्या हिस्टरी वाहिनीवर आश्विट्झ विषयी विशेष मालिका चालू आहे. ती पाहिल्यावर मनाला प्रश्न पडतो की कोणाचीही एखाद्या गोष्टीबद्दल, समाजाबद्दल इतकी टोकाची मते कशी काय बनू शकतात? मात्र जर समाजातील काहींची अशी मते बनली तरी त्यांच्या अमानवी आज्ञांचे पालन समाजातील इतर माणसे उदा. आईखमन, डॉ. योसेफ मिंगेल इ. कशी काय करू शकतात?

एखादा डेन्मार्क सारखा देश सोडला तर सरसकट सर्व युरोपीय देश ह्या ज्यूंच्या कत्तलीकडे डोळेझाक करतात किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याकरता स्वत:हून आपल्या देशातील ज्यूंना जर्मनांच्या ताब्यात देतात. जणू काही ज्यूंचे शिरकाण ही त्यांची स्वत:चीच इच्छा जर्मन गेस्टापो पूर्ण करीत असते. उदा. रशियामध्ये अनेक शतके ज्यूंच्या कत्तली (पोग्रोम) उघड चालू होत्या. रस्त्यात चालणार्‍या एकट्या दुकट्या ज्यूंना ठार मारणे हा काहींचा छंद होता. रशियन सरकारच अश्या गोष्टींना सतत प्रोत्साहन देत असे.

पुढे ऑश्विट्झ सारख्या छळ छावण्या झाल्यावर गाड्या भरभरून ज्यू संपूर्ण युरोप आणि रशियातून आणण्यात आले. फार कमी सहृदय लोकांनी ह्या काळात ज्यूंना आश्रय व रसद दिली. पोलंडसारख्या देशात तर दुसरे महायुद्ध संपल्यावर जे दुर्दैवी ज्यू छळ छावण्यांमधून कसेबसे वाचून परत आपल्या घरी परतायचे ह्या विचारांनी परत येताना दिसले त्यांना पोलिश लोकांनी प्रचंड विरोध केला. हे सर्व समाजशास्त्राच्या दृष्टीने अनाकलनीय आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

का विरोध

मला पडलेले काही प्रश्न.

१. ज्यु लोक सर्वसाधारणपणे कोणत्याही समाजाला का नकोसे वाटत असावेत?
२. सावकारी करणारे, व्याजाने लुबाडणूक आणि फसवणूक करणारे कोणत्या समाजाला आवडतात?
३. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या आडनावात 'मॅन' नसेल अथवा तुमचे नाव ज्यु सदृष नसेल तर किती उचल मिळते?
४. गेल्या काही दशकात जर अमेरिकन माध्यमे ज्यु लोकांच्या हाती नसती तर...?
५. गांधीजींचे नातु (सुद्धा!) अमेरिकेतील ज्यु उदोउदो करणाला का कंटाळले असावेत?
६. अति कर्मठ व फक्त हाच धर्म चांगला व बाकी सगळे तूच्छ असे मानणारे लोक सगळ्यांना हवेसे वाटतात की नकोसे?

ज्यु म्हणजे कोणत्याही 'बावाजी' कडून व्याजी पैसे उचलण्याचा वैयक्तिक अनुभव कुणाला आहे काय?
असल्यास तो कसा होता?

ही माझी मते नव्हेत. हे फक्त पडलेले प्रश्न आहेत.

कुणाला उत्तरे द्यावीशी वाटली तर नक्की द्या....
आपला
गुंडोपंत

माझ्या अल्पस्वल्प

वकुबाप्रमाणे मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते...

१. ज्यु लोक सर्वसाधारणपणे कोणत्याही समाजाला का नकोसे वाटत असावेत?

उ. सर्वच समाजाला ते केवळ ज्यू आहेत म्हणून नकोत असे नाही. हिंदु समाजाला व पारशी समाजाला ते नक्की चालतात. ख्रिश्चनांना ते ज्यू आहेत म्हणून चालत नाहीत कारण ख्रिश्चन त्यांना येशु ख्रिस्ताचे मारेकरी समजतात. मुस्लिमांसाठी तर ज्यूच नव्हेत तर हिंदु सुद्धा परके. सर्वच गैर-इस्लामी काफिर.

२. सावकारी करणारे, व्याजाने लुबाडणूक आणि फसवणूक करणारे कोणत्या समाजाला आवडतात?

कोणत्याच समाजाला आवडत नाहीत. कोणत्याही भारतीय चित्रपटात मारवाडी शेठची प्रतिमा पहा. त्यांना कंजुस, धूर्त, विधिनिषेध न बाळगणारेच दाखविले जाते. मात्र मारवाड हा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या दुस्तर आहे. जिथे पाण्याचा थेंब पण जपून वापरावा लागतो तिथे आपोआप काटकसरीपणा येतोच. तसेच एकदा जन्मभूमीची नाळ तुटली व जीवनासाठी संघर्ष करावा लागला की नीतीमत्ता राखण्याचे प्रमाण कमी होत जाते. आजही सिंधी व्यापार्‍यांबद्दल लोक काय म्हणतात ते कान उघडे ठेवून ऐकले की ते जाणवते. तशीच स्थिती ज्यू समाजाची होती.

३. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या आडनावात 'मॅन' नसेल अथवा तुमचे नाव ज्यु सदृष नसेल तर किती उचल मिळते?

उ. फार लांब जायला नको. दादरमध्ये जर आपण टॅक्सीला हात दाखवला आणि आपल्या नंतर एखाद्या गुजराती कुटुंबाने हात दाखवला तर टॅक्सीवाला गाडी त्यांच्यासमोर नेऊन उभी करतो. हे कशाचे द्योतक आहे? जसे टॅक्सीवाल्याला ठाऊक असते की गुजराती ग्राहक म्हणजे हमखास लांबचे भाडे आणि मीटरचा हिशोब न करता पैसे चुकते. तसे ज्यू व्यापार्‍यांना पैसे उचल देणार्‍यांना दामदुप्पट पैसे परत मिळण्याची हमी असते. तसेच आजही सौराष्ट्राच्या काही व्यापारी जमातींबद्दल मी असे ऐकले आहे की त्यांचे व्यापारात कितीही अधःपतन झाले तरीही कधीही पैसे उधार देणार्‍याला आणि भागिदाराला फसवत नाहीत. असेच काहीसे ज्यू व्यापार्‍यांबद्दल ऋणकोला वाटत असेल. (मान उपसर्ग असलेले आडनाव जास्त करून जर्मनांचे असते, काही जर्मन ज्युंनी पण असे आडनाव घेतल्याचे आढळते).

४. गेल्या काही दशकात जर अमेरिकन माध्यमे ज्यु लोकांच्या हाती नसती तर...?

उ. तर कदाचित ज्यू धनकोंच्या युद्धखोरीला भरीस पडून अमेरिका दोन्ही महायुद्धात पडली नसती. आजही अमेरिकेला मंदीवर युद्ध हा उपाय वाटतो.

५. गांधीजींचे नातु (सुद्धा!) अमेरिकेतील ज्यु उदोउदो करणाला का कंटाळले असावेत?

उ. सांगता येणे कठिण. नक्की कल्पना नाही.

६. अति कर्मठ व फक्त हाच धर्म चांगला व बाकी सगळे तूच्छ असे मानणारे लोक सगळ्यांना हवेसे वाटतात की नकोसे?

उ. स्वत:च्या अनेक गोष्टींबद्दल गर्व बाळगणे हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्याला आपला धर्म, भाषा, राज्य, जात, पोटजात, शाळा, गाव इ. नाही का चांगले वाटत? मात्र आजपर्यंत मी हिंदु धर्माप्रमाणेच ज्यू धर्माने सुद्धा कधी कोणाचे सक्तीने वा आमिष दाखवून धर्मांतर केल्याचे ऐकले नाही.

ज्यु म्हणजे कोणत्याही 'बावाजी' कडून व्याजी पैसे उचलण्याचा वैयक्तिक अनुभव कुणाला आहे काय?
असल्यास तो कसा होता?

--------

(बावाजी म्हणजे पारशी अशी माझी समजुत आहे आणि भारतातील ज्यू सहसा सावकारी करत नाहीत. बरेच जण तेलाचे घाणे चालवीत, म्हणून त्यांना कोकणात सरसकट "शनिवार तेली" म्हणतात. कारण ते शनिवार पवित्र समजून त्या दिवशी आर्थिक व्यवहार बंद ठेवतात. दाऊद ससून ह्यांच्या सारख्या धनिक ज्यू व्यापार्‍यांनी तर भारतात अनेक रुग्णालये, गोद्या, अनाथालये, बालसुधारगृहे, शाळा बांधलेल्या आहेत.)
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

धन्यु!

लेख आवडला.. समाज आणि समाजचं मानसशास्त्र ह्या गोष्टी अनाकलनीय आहेत (निदान माझ्यासाठी) हेच खरं

एक्सोडस या नवीन पुस्तकाचं नाव कळलं.. धन्यु!

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

ज्यू समाज

हा विषय खरं तर फार व्यापक आहे. गुंडोपंतांनी उपस्थित केलेल्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं इतिहासातच शोधावी लागतील. अगदी शेक्सपिअरनेही शायलॉकचे पात्र ज्यू धर्मीय दाखवले आहे, हे दुसर्‍या महायुद्धापूर्वीच्या समजाचे (आणि समाजाचे) प्रातिनिधिक चित्रण म्हणता येईल. मात्र त्यानंतर विस्थापित ज्यू समाजाने घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे. आतापर्यंतच्या ७८९ नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये सुमारे १६३ ज्यू धर्माचे आहेत - म्हणजे सुमारे २०%. समजा घटकाभर यातली तीन चतुर्थांश पारितोषिके भाई-भतीजावादाने, ज्यू धर्मीय असल्यामुळे मिळाली असं अवास्तव गृहीतक खरं मानलं तरी जेमतेम सव्वा कोटी लोकसंख्येच्या या समूहाची लक्ष्मीबरोबरच सरस्वतीची आराधनाही नजरेत भरते. बाकी अमेरिकेत अथवा पाश्चात्य देशांत, ज्यूंबद्दल सहानुभूती आहे हे खरं, पण थेट सगळ्या माध्यमांवर ज्यूंचे संपूर्ण वर्चस्व आहे असं वाटत नाही.

मागे कुणीतरी ज्यू लॉबीला हिलरी क्लिंटन निवडून येणे अधिक सोयीचे असल्याने काही झाले तरी तीच जिंकणार असा दावा केला होता. हे थोडे कॉन्स्पिरसी थिअरीच्या वळणाने जाणारे वाटते. शिवाय 'आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ' म्हणणारे लोक कमीअधिक फरकाने प्रत्येक धर्मात असतातच. त्यांचे प्रमाण ज्यूंमध्ये अधिक आहे असे वाटत नाही. (मी यातला तज्ञ नाही. वैयक्तिक ओळखीतल्या आठ-दहा लोकांवरून हे विधान करतो आहे.)

बाकी लिऑन युरिसचे 'एक्झोडस' नक्कीच वाचण्यासारखे आहे. ऐतिहासिक घटनांबरोबरच कादंबरीचा वेगही खिळवून ठेवणारा आहे. मात्र याच लेखकाचे 'द हज' हे पुस्तक तितकेच टाळण्याजोगे. पूर्वग्रहदूषित आणि टोकाच्या मतांनी भरलेले. 'फिडलर ऑन द रूफ' ही असाच एक पाहण्याजोगा चित्रपट. झारकालीन रशियातल्या ज्यू समाजाचे चित्रण करणारा. एक गवळी आणि त्याच्या चार मुली हा मुख्य विषय असला तरी अगदी संयतपणे पार्श्वभूमीवर येणारं तत्कालीन ज्यूंवरील अत्याचाराचं चित्रण यात आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

पहिल्या महायुद्धापूर्वी

जर्मनीत ज्यु द्वेष फारसा नव्हता, रशिया-फ्रान्स इ. च्या तुलनेत तर फारच कमी. मात्र १) पहिल्या महायुद्धात ज्यु धनकोंच्या आग्रहामुळे मंदीवर एक उपाय ह्या आशेने अमेरिका आपल्या विरुद्ध दोस्तांच्या बाजुने उतरला ही भावना सर्वसामान्य जर्मन लोकांच्यात पसरली. २) पहिल्या महायुद्धानंतर जर्मन मार्क बुडाला किंबहुना दोस्तांनी तो बुडवला. एका पावाच्या लादीसाठी एक पोते भरून मार्क द्यायची वेळ आली. मात्र त्याचवेळी जर्मनीतील ज्यु धनाढ्य लोक मजेत आयुष्य जगत होते असे हिटलर आढळून आले. ३) आज जसे २-३ भैय्या वाहनचालकांना मारून राजसाहेब हे मराठी जनतेच्या गळ्यातील ताईत बनले तसे पहिल्या महायुद्धानंतरच्या जर्मनीच्या हलाखीच्या परिस्थितीला ज्युंना जबाबदार ठरवून त्यांच्या विरुद्ध हिंसक मार्ग अवलंबून आपण जर्मन जनतेत महानायक बनू असे हिटलरला वाटले. जो त्याचा अंदाज खरा ठरला. ४) सतत स्थलांतरिताचे जिणे जगणार्‍या ज्यु समाजात पोटासाठी काहीही करण्याची तयारी होती. शायलॉक सारखे ज्यु त्या काळात युरोपियन समाजात तिरस्काराचा विषय होते. कित्येक ज्यु तर वेश्यांची दलाली ह्या व्यवसायात पण प्रकर्षाने होते. मात्र वाईझमन सारखे सज्जन, पापभीरू ज्यु सुद्धा होते पण एकदा का एखाद्या समाजाविषयी एक विशिष्ट भावना निर्माण झाली की ती बदलणे सोपे नसते. ५) सतत सर्वांकडून अव्हेरल्या गेलेल्या व सर्वत्र पोग्रोम सारख्या सामुदायिक कत्तलींना वारंवार तोंड देणार्‍या ज्यु समाजाला कोणत्याही राष्ट्राप्रति निष्ठा नव्हती. २००० वर्षे ते केवळ ज्युंचे स्वत:चे राष्ट्र ही कल्पना उराशी बाळगून होते.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

संधि मिळाली

'फिडलर ऑन द रूफ' ही असाच एक पाहण्याजोगा चित्रपट.

की नक्की पाहिन तो चित्रपट :)

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

वैचारिक लेख

दुसर्‍या महायुद्धापूर्वी ज्यू लोकांचा झालेला छळ हा मन विषण्ण करणारा आहे.

त्या नृशंस छळाचा आणि युद्धानंतरच्या इस्रायलच्या इतिहासाचा अवश्यसंबंध आहे. पण लेखात लावला आहे, तसा तो मला वाटत नाही.

जगाभरात विखुरलेल्या ज्यू समाजाने आपली पुण्यभूमी येरुशालाइम (जेरुसालेम) येथे आपले राज्य असेल अशी इच्छा बाळगली. या भागामध्ये तोवर बाकी लोक राहू लागले होते. इस्रायलची स्थापना झाली तेव्हा त्या भागात राहाणार्‍या लोकांना घरातून हाकलण्यात आले आणि महायुद्धात होरपळलेले ज्यू तिथे राहून बलिष्ठ झाले. पण हाकललेल्या लोकांचे काय?

याबद्दल स्टिव्हन स्पिएलबर्गच्या "म्युनिक" चित्रपटातला एक प्रसंग विचार करायला लावतो.
म्युनिकमध्ये इस्रायली खेळाडूंची हत्या केली त्या अतिरेक्यांना मारण्यासाठी इस्रायलने एक गुप्त पोलिसांचे पथक उभारले, असे कथानक आहे. त्या अतिरेक्यांच्या मागावर असताना या गुप्तहेराला काही अन्य फिलिस्तीनी अतिरेकी भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारताना, त्याला कळते, की ज्या शेतांवरून त्यांच्या कुटुंबाला हुसकवून लावले होते, त्यातील झाडांबद्दल वगैरे हे अतिरेकी मोठे मातृभूमिप्रेम सांगत होते. गुप्तहेर म्हणतो - अरे बाबांनो, ती निकृष्ट शेती आहे, त्याच्याबद्दल तुम्ही इतकी आशा का लवून आहात? तर अतिरेकी उत्तर देतो - तुम्हा ज्यू लोकांनी २००० वर्षे याच जमिनीवर आशा लावून ठेवली होती, तशी आमची त्या मातृभूमीवर आशा आहे.
२००० वर्षे पराभवांवर पराभव झाले, जगभर वणवण फिरावे लागले, तरी आशा सुटली नाही, तर फिलिस्तिन्यांचीही कदाचित पराभवांवर पराभव होत हजारो वर्षे आशा सुटणार नाही, असे त्या गुप्तहेराच्या लक्षात येते. त्या विशिष्ट कामगिरीवर यशस्वी झाला तरी हे युद्ध कधी संपणारे नाही याची कडवट जाणीव गुप्तहेराला चित्रपटाच्या शेवटापर्यंत होते.

इस्रायल आता ६०-७० वर्षांचा देश आहे. तो मालवणार नाही. पण प्राग-ऐतिहासिक पुण्यभूमीवर कुठल्या जमातीला हक्क सांगता येईल, आणि जगभरात होणारे हाल थांबवायचे हे साधन उपलब्ध होईल - प्राग-ऐतिहासिक पुण्यभूमीवरील स्थायिक लोकांना हुसकावून स्वतः स्थापन व्हावे - तर २०व्या शतकाने हा अत्यंत घातक वहिवाट लावून दिली आहे.

आजही भारतात कित्येक लोक आपली प्राग-ऐतिहासिक पुण्यभूमी जाणतात - सरस्वतीच्या काठावरून विखुरलेले सारस्वत, कोकणात देव असलेले कोकणस्थ, वगैरे. उद्या (गांधीवधानंतर झाला तसा कोकणस्थ-विरोध जाचक झाला तर) पुढे कधी देशावरील कोकणस्थांनी कोकणात जाऊन, तिथे सध्या स्थायिक झालेल्या बिगर-कोकणस्थाना हुसकावून शेती-जमीन सगळे बळकावले तर हा प्रकार भयंकर आहे. आधीचा छळ भयंकर, आणि त्यावरील उपाय भयानक.

आणखी ५००-१००० वर्षांनी त्या काळातल्या उपक्रमावर असा काही लेख येईल का? राफा विस्थापित कँपाभोवतीचे विषण्ण करणारे चित्र, आणि खाली लेख - १००० वर्षे झगडून हुसकलेल्या फिलिस्तिन्यांनी आपल्या वाडवडलांच्या शेतीवर पुन्हा कब्जा मिळवला? असे होऊ नये. ज्यूंच्या छळाची समस्या त्यांना युरोपातच न्याय आणि सन्मान मिळून सुटणे उत्तम झाले असते. पण झाले नाही. आज जमल्यास फिलिस्तिनी विस्थापितांची समस्या तशीच (ते जिथे आहेत तिथे न्याय सन्मान मिळून) सुटावी. नाहीतर ही पितृभूमी-पुण्यभूमीवरून युद्धे कधी संपणारीच नाहीत.

विवाद

हाकलून?? काहीही काय?

शिवाय तेथील लोक हाकलून वगैरे दिलेले नाहीत तर ब्रिटिशांच्या कृपेने वेळोवेळी किंमत देवून गेली दोनशे वर्षे तेथे पडीक आणि नापीक जमीनी विकत घेत घेत या देशाची निर्मिति झाली आहे.
आता त्यां लोकांना आपल्या जमिनी चांगल्या भाव मिळतो आहे म्हणून ज्यु लोकांना विकाव्याश्या वाटल्या यात ज्युंचा काय दोष आहे? ज्युंचा तर तत्कालिन तोटाच झाला आहे.

इतके करून आता २०० वर्षात ज्यु संख्येने जास्त झाले तर त्यांचा अंमल मानण्या शिवाय फिलिस्तिनिंना काय पर्याय आहे? आता ओरड का?

काश्मिरातील स्वात खोर्‍यातील हिंदु मुली सुद्धा आता बुरखा घालूनच बाहेर पडतात ना? ते चालते, आवडते, त्या बद्दल सामाजिक बंदुका दाखवत नाच होतात. मग तसे फिलिस्तिनि लोकांनीही ज्युंच्या मर्जी प्रमाणे वागायला नको काय?

"प्राग-ऐतिहासिक पुण्यभूमीवरील स्थायिक लोकांना हुसकावून स्वतः स्थापन व्हावे - तर २०व्या शतकाने हा अत्यंत घातक वहिवाट लावून दिली आहे. "

२०व्या शतकाने? हे तर ऐतिहासिक काळापासून घडते आहे. मुसलमानी आक्रमणाने अनेक राजपुतांना महाराष्ट्रापर्यंत पळून जावे लागले आहे. आणि मग तोच प्रदेश त्यांनी पाकिस्तान या नावाने कायमचा हस्तगत करून टाकला आहे. तुम्हाला हा इतिहास कदाचित ज्ञात नसावा, कारण तुम्ही बहुदा उर्दु भाषेचा अभ्यास करण्यात गुंतला असावात. पण त्यातल्या एका घराण्याचे नाव सिसोदिया असे होते!
काही वर्षांनी समजा राजपुतांनी त्यांचा हा सुपीक प्रदेश परत मागितला तर चुकीचे? की मुळात असे आक्रमण करणारे यवनच चुकीचे?

तसेच याच न्यायाने तिबेटाचे साम्राज्यही तिबेटि लोकांनी परत मागु नये असेही तुमचे मत आहे की काय?

शांतपणे विचार केल्यास आपले विचार धोकादायकरित्या बुद्धीभेदी आणि निव्वळ चुकीचे आहेत हे दिसून येईल.

या शिवाय "ज्यूंच्या छळाची समस्या त्यांना युरोपातच न्याय आणि सन्मान मिळून सुटणे उत्तम झाले असते. पण झाले नाही."
हा विचार पाहा. बोटचेप्या आणि भंपक विचारांचा खास नमुना आहे हे दिसते.

युरोपात न्याय आता मिळतोच आहे ना? की अजूनही त्यांना ज्यु म्हणून तसेच वागवले जाते आहे?
पण म्हणून त्यांनी आपला देश परत मागूच नये? असे कसे बॉ?

हा विचार म्हणजे एखाद्या समाजावर अन्याय झाला तर त्यांनीयाअता शांततेचा भंग होईल म्हणून कधीच न्याय मागू नये काय?

एकदा मंदिराची मशीद झाली की त्याचे परत कधीच मंदिर होवू नये का? का म्हणून? मूळचे मंदिरच होते ना? मग ऐतिहासिक चूक सुधारली तर काय बिघडले?

भारतातील बहुसंख्य सो कॉल्ड बुद्धीवादी असाच बुद्धीभेद करतांना अनेकदा दिसतात आणि असल्या अविचारातच आपली बुद्धीमत्त खर्च करतांना दिसतात हे आपले दुर्दैव आहे!

ज्या समाजा विषयी धनंजयांना इतके प्रेम वाटते आहे, त्यां समाजातील लोकांचे विचार मात्र जगात जगण्यास लायक फक्त त्यांचेच अनुयायी असावेत असा आहे हे मात्र ते विसरलेले दिसतात!
अन्यथा ते क्रूरकर्मा कत्तलही करण्यास मागेपुढे पाहत नाहीत हा इतिहास अनेकदा घडून गेला आहे!

आपला
गुंडोपंत

एक आवांतर दुरुस्ती:
गांधींचा वध नसून खून झाला आहे.

सहिष्णु लोकांनी आनंदाने राहण्यासाठी ही सिंधूची भूमी मानली गेली आहे. त्यात हे विनाशी आक्रमक कशाला? जर तेही तसेच आनंदाने सहिष्णुवृत्तीने राहु शकत असतील तर स्वागत आहे!

आश्चर्यकारक मुद्दे

हाकलून?? काहीही काय?

गुंडोपंत अधूनमधून विकीपेडियाचा पुरस्कार करतात. या बाबतीत त्यांचा व्यासंग माझ्यापेक्षा अधिक आहे. पॅलेस्टाइन मॅन्डेटच्या आणि इस्रायलच्या वेगवेगळ्या काळातल्या जनगणना गुंडोपंतांनी तिथून मिळवाव्यात. त्या ठिकाणी अनेक मूळ संदर्भ दिले आहेत. ते वाटल्यास तपासावेत. फिलिस्तिन्यांकडून किती प्रमाणात जमीन विकत घेतली, काय भावाने घेतली, वगैरे, ते नंतर येथे सांगून उपक्रमावरील माहिती वाढवावी.

२०व्या शतकाने? हे तर ऐतिहासिक काळापासून घडते आहे. मुसलमानी आक्रमणाने अनेक राजपुतांना महाराष्ट्रापर्यंत पळून जावे लागले आहे. आणि मग तोच प्रदेश त्यांनी पाकिस्तान या नावाने कायमचा हस्तगत करून टाकला आहे. ... पण त्यातल्या एका घराण्याचे नाव सिसोदिया असे होते! काही वर्षांनी समजा राजपुतांनी त्यांचा हा सुपीक प्रदेश परत मागितला तर चुकीचे

सिसोदिया-भोसले घराण्यातील लोकांमध्ये राजपुताना पुन्हा मागायचा विचार असू शकेल ही कल्पना मला नवी आहे. असे पुढे घडल्यास हे चुकीचे की नाही हा विचार उपक्रमावरील वाचकांना करायचा आहे. राजपुतान्यातील काही जमिनी सिसोदिया घराण्याशी संलग्न आहेत काय? कोल्हापुर-सातारा येथील भोसले घराण्यांमध्ये त्या जमिनींवर काबू मिळवायचा प्रयत्न केल्यास आपण काय विचार करावा? (हे सिसोदिया घराण्यातील मूळपुरुष दख्खनेकडे आल्यावरती कुठल्या राजाकडे सेवेला होते, याबद्दल कुतूहल वाटते.) पाकिस्तानात थार वाळवंटाचा भाग आहे असे दिसते. राजपुतान्याचा सुपीक भाग पाकिस्तानात असल्याचा तपशीलवार भूगोल आम्हाला गोवा बोर्डाच्या अभ्यासक्रमात शिकावा लागला नाही. संदर्भासह हे कळले, तर उपक्रमावर येण्याचा उत्तम फायदा मिळाला.

तुम्हाला हा इतिहास कदाचित ज्ञात नसावा, कारण तुम्ही बहुदा उर्दु भाषेचा अभ्यास करण्यात गुंतला असावात.

येथपासून पुढे "अवांतर" असे शीर्षक द्यायला हवे होते काय? स्पष्टीकरण केल्यास पुढे उत्तर देणे सोपे जाईल. यापुढील वाक्यांमधील वैयक्तिक मुद्दे कुठले आणि "या नमुन्यासारखे बोटचेपे आणि भंपक" लोकांबद्दल (वैयक्तिक नसलेले) मुद्दे कुठले हे कळणे कठिण होते आहे.

ज्या समाजा विषयी धनंजयांना इतके प्रेम वाटते आहे,

"धनंजय" हा आयडी वापरून मी हा उपप्रतिसाद आणि वरील प्रतिसादही लिहिला आहे. हा "धनंजयांना प्रेम वाटलेला समाज" कुठला हे मला ठाऊक नाही. (मानव समाजाचा भाग असल्यामुळे मला मानव समाजाबद्दल "प्रेम" वाटते, पण ते बहुधा बाकी लोकांच्या इतकेच. या "प्रेमात" अर्थातच काही प्रमाणात स्वसंरक्षणापुरता स्वार्थ आहे. हे "प्रेम" बाकी लोकांपेक्षा जास्त नाही आणि कमी नाही.)

गुंडोपंतांच्या या परिच्छेदात वैयक्तिक नसलेला एखादा व्यापक मुद्दा दडलेला असू शकेल. तो त्यांनी विशद करावा, आणि चर्चेत माहितीपूर्ण भर घालावी.

अरे काय?

हे पाहा बॉ. मला काही इंग्रजीचे वाचन जमत नाही. परंतु मराठीत तरी काही वाचल्या शिवाय मी असे लिहित सुटणार नाही हे नक्की!

तरी निळू दामले या मराठी पत्रकारने लिहिलेल्या पॅलेस्टाईन वरील पुस्तकात वरील उल्लेख आहे.
त्यात दामले, या देशाच्या निर्मिति मध्ये कुठेही फिलिस्तिनि लोकांना येथून हाकलून दिले असे म्हणालेले नाहीत.
या उपर मराठी विकि मध्ये तसे काही सापडल्यास मी नक्की शोधेन.

सिसोदिया-भोसले घराण्यातील लोकांमध्ये राजपुताना पुन्हा मागायचा विचार असू शकेल ही कल्पना मला नवी आहे.

असे मी कुठे म्हणालो? मी तर म्हणालो की "काही वर्षांनी समजा राजपुतांनी त्यांचा हा सुपीक प्रदेश परत मागितला तर चुकीचे"

यातले 'समजा' बहुदा वाचले गेले नसावे!
मला वाटते की येथे काही तरी घोळ झाला आहे. कारण माझ्या म्हणण्यानुसार मुळचे सिंधुच्या खोर्‍यातील राजे यवनी आक्रमणाने हाकलून दिले गेले. त्यांनी थरच्या वाळवंटात आश्रय घेतला.
असे माझे म्हणणे आहे आणि ते बडोद्याच्या महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारीत आहे.

हा सुपीक प्रदेश यवनांनी म्हणजेच आक्रमकांनी आता पाकिस्तानच्या नावाखाली कायमचा घशात घातला आहे. आणि त्यावर पुढे माझे असे म्हणणे की मग त्या लोकांनी सिंधुचा सुपीक प्रदेश म्हणजे आताचा पाकिस्तान परत का मागु नये? कारण येथेही अत्यंत घातक असा पायंडा पडला आहे.

या शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी सिसोदिया घराण्यातील लोक राजपुताना परत मागत आहेत असे कोठेही म्हंटलेले नाही याची नोंद घ्यावी.

आशा आहे की यातून माझा मुद्दा स्पष्ट झाला असावा.

असे पुढे घडल्यास हे चुकीचे की नाही हा विचार उपक्रमावरील वाचकांना करायचा आहे.

ठीक !ठीक!! करू देत बापडे!

कोल्हापुर-सातारा येथील भोसले घराण्यांमध्ये त्या जमिनींवर काबू मिळवायचा प्रयत्न केल्यास आपण काय विचार करावा?

आपण कसला विचार करायचा? या भानगडी करत बसायच्या की नाही हा त्यांनी विचार करायचा.

राजपुतान्यातील काही जमिनी सिसोदिया घराण्याशी संलग्न आहेत काय?

काही कल्पना नाही, परंतु योग्य ठिकाणी चौकशी केल्यास काही माहिती मिळू शकेल असे वाटते.

पाकिस्तानात थार वाळवंटाचा भाग आहे असे दिसते.

तो तर सुपीक प्रदेश आहे. चांगला गहू पीकतो शिवाय उत्तम तांदुळही!
राजपुतांना, स्थानिकांना (व इतरांनाही) त्या सुपीक प्रदेशातून हाकलून देण्यात आले असे मी म्हणत नाही!
बडोद्याच्या महाराजांनी 'भारतातील राजवाडे' (पॅलेसेस ऑफ इंडिया) नावाचे एक भले थोरले पुस्तक लिहिले आहे. त्यात राजस्थानची निर्मिती कशी झाली या इतिहासाचा गोषवारा आहे. त्यामध्ये हा उल्लेख आहे की सदैव होत राहिलेल्या आक्रमणांनी तेथील स्थानीकांना व राजांना पळून जावे लागले. व त्यांनी वैराण अशा वाळवंटात आश्रय घेतला. या राजांची मुले म्हणजे राज पुताना हे पुस्तक इ.स. १९८० मध्ये लंडन येथून प्रकाशित झालेले आहे.

या कळफलकावर बोटे चालवतांना अनवधानाने काही वैयक्तिक शिंतोडे उडाले असल्यास मात्र क्षमस्व!

कोणता मुद्दा भंपक आहे?
पण प्राग-ऐतिहासिक पुण्यभूमीवर कुठल्या जमातीला हक्क सांगता येईल, आणि जगभरात होणारे हाल थांबवायचे हे साधन उपलब्ध होईल - प्राग-ऐतिहासिक पुण्यभूमीवरील स्थायिक लोकांना हुसकावून स्वतः स्थापन व्हावे - तर २०व्या शतकाने हा अत्यंत घातक वहिवाट लावून दिली आहे.

२०व्या शतकाने ही अत्यंत घातक वहिवाट लावून दिली आहे. हा मुद्दा भंपक आहे. हे तर घडतच आले आहे. म्हणजे ज्यु लोकांनी काही केले तर घातक वहिवाट? मग पाकिस्तानची धर्माधारीत निर्मिति ही पण एक घातक वहिवाटच नाही का?

धनंजय विकिचा वापर करायला सांगत आहेत. परंतु विकिवरील माहितीही दूषीत असू शकत नाही काय?
उदा. मागे मी (इंग्रजी या निबिड भाषेतून कसाबसा) गुलामी वरील लेख वाचला. त्यात त्यांनी चक्क असे म्हंटले होते की 'आफ्रिकेतील लोकच आफ्रिकेतील लोकांच्या गुलामीला जबाबदार होते असे मानले जाते'. आता बोला. व्यापार केला पोर्तुगीज फ्रेंच आणि ब्रिटिशांनी. मदत केली अरबांनी. गुलाम धरायला टोळ्या तयार केल्या अरब आणि ब्रिटिशांनी. काय बोलायचे यावर? कसे संदर्भ देणार?

मी विकि चा पुरस्कार जरूर करतो. परंतु माहिती गोळा करतांना व संदर्भ देतांना पुस्तकांचा आधार घेणेच बरे वाटते. असो, हा आपापल्या मताचा भाग आहे.
----
धनंजयांचे असा उल्लेख आदरार्थी आला आहे. तसे पसंत नसल्यास कळवावे.
----

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत काही तरी लिखित हाताशी असल्याशिवाय विधान करणार नाहीत!

(प्रतिसाद संपादित केला आहे)

वानगीदाखल

इस्रायलची स्थापना झाली तेव्हा त्या भागात राहाणार्‍या लोकांना घरातून हाकलण्यात आले आणि महायुद्धात होरपळलेले ज्यू तिथे राहून बलिष्ठ झाले.

२-३ दुवे देता येतील का? कारण मी आतापर्यंत जेव्हढी ह्या विषयावर पुस्तके दोन्ही बाजुच्या लेखकांची वाचली त्यांनी स्पष्ट असे लिहिले आहे की तिथले मूळ अरब हे मागासलेले होते. काही न करता पडिक जमीनी विकल्या जात आहेत असे कळल्यावर त्यांनी भरपूर पैसा घेऊन स्वखुषीने ह्या जमिनी विकल्या (जे आज कोकणात घडत आहे) व स्थलांतर केले. जे काही अरब तिथे उरले त्यांच्यासाठी ज्यूंनी आपल्या शाळा, दवाखाने, यंत्रगृहे विनामुल्य उपलब्ध करून दिले.

अरबांना हाकलले गेले असेल असे वाटत नाही ह्याचे सबळ कारण म्हणजे तिथे ब्रिटिशांचे राज्य होते व "फोडा आणि झोडा" नीतीनुसार ते अरबांकडे झुकलेले होते. ज्यू - अरब दंगलींमध्ये अरबांना ब्रिटिश सर्व प्रकारची शस्त्रास्त्र मदत करीत असत.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

अवांतर

काही न करता पडिक जमीनी विकल्या जात आहेत असे कळल्यावर त्यांनी भरपूर पैसा घेऊन स्वखुषीने ह्या जमिनी विकल्या.

साधारण २०-१ वर्षापूर्वी तळकोकणातील एका गावात एका माणसाला माझा मामा भेटला. त्याला म्हणाला की तुमची जमीन आहे असे कळले. तो माणुस म्हणाला, गावाबाहेर २-३ काळ्या पाषाणाचे (कमी माती असलेले) डोंगर आहेत असे तो पण ऐकून आहे. माझा मामा म्हणाला, चला तलाठ्याकडे, मला ते डोंगर विकत घ्यायचे आहेत. मग सर्व कागद पत्रे होऊन साधारण रु. १००० प्रति एकर असा भाव मामाने त्याला दिला. खरे तर त्याला ही लॉटरीच लागलेली होती.

नंतर मामाने ते पडिक आणि भुंडे डोंगर कृषितज्ज्ञांकडून तपासून घेतले. पाणके आणून काळ्या पाषाणात पाणी कुठे लागेल ते शोधले. डोंगर माथ्यावर दोन विहिरी बांधल्या. सुरुंग लावून काळ्या पाषाणात खड्डे केले. ट्रकने पायथ्यापाशी माती आणून, गाढवांमार्फत ती डोंगरावर चढवून त्या खड्ड्यात माती टाकली. ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. ८०० कलमे आणून झाडे लावली. निगुतीने ती वाढवली. १५ वर्षांनी आता तिथे उत्तम दर्जाचे आंबे आले (कारण काळ्या पाषाणातील आंबा) आणि हे सर्व केले मुंबईत आपला व्यवसाय सांभाळून, जमेल तश्या सतत कोकणात फेर्‍या मारून.

हल्लीच तिथे मुंबईतील एका उपाहारगृहाचे मालक पर्यटक म्हणून गेले होते. त्यांना ती कल्पना आवडली. सहज शेजारच्या जागेची खरेदीसाठी चौकशी केली तर तोच मालक आता रु. ३५,००० प्रति एकर सांगतो. कारण काहीही कष्ट न करता पैसा दारात येणार आहे. परत मुंबईकर लोक आली आणि आमच्या जमीनी गेल्या, महागाई आली असे बोलायला हेच लोक पुढे असतात. आता बोला.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद

करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

फिलीस्तानी नेतृत्व

फिलिस्तिन्यांचीही कदाचित पराभवांवर पराभव

मूळात फिलीस्तानी नेते ह्यांना फिलीस्तानी लोकांच्या अडीअडचणी ह्यांच्यापेक्षा इझ्रायलचा समूळ नाश (जो अशक्य होता) ह्या कल्पनेत जास्त स्वारस्य होते. फिलीस्तानी जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा मध्यपूर्वेतील अरबांचे तारणहार होणे (अरब जगताचे एकमेव महानायक होणे) हे एकच ध्येय यासर अराफात आणि कंपनीचे होते. त्यामुळे चर्चेने प्रश्न सोडवण्यापेक्षा इझ्रायल बरोबर वांझोटी युद्ध करणे, दहशतवादी हल्ले करून जगभर इझ्रायली प्रवासी असलेल्या विमानांचे अपहरण, इझ्रायली खेळाडूंची हत्या, सीमेवरील इझ्रायली लोकांची हत्या-बलात्कार, पीकांची नासधूस हाच त्यांचा आवडता उद्योग होता. त्यामुळे त्यांचे जगभर हसे झाले. कोणीही त्यांच्या मदतीला येईना. प्रत्येक आघाडीवर त्यांना मार खावा लागला.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

न्याय व सन्मान

ज्यूंच्या छळाची समस्या त्यांना युरोपातच न्याय आणि सन्मान मिळून सुटणे उत्तम झाले असते.

न्याय व सन्मान ह्या दोन शब्दांचा युरोपशी काडीमात्र संबंध नाही.

१) युरोपातील सर्व देशांचे एकच तत्व आहे. ते म्हणतील तोच न्याय. कारण दुसर्‍यांवर अधिराज्य गाजवणे, स्वत:च्या स्वार्थासाठी इतर देशांवर स्वारी करून वसाहती निर्माण करणे, तिथे स्थानिक जनतेला नागवणे आणि वेळ प्रसंगी वंश विच्छेद हेच त्यांचे तत्वज्ञान आहे. अगदी स्वातंत्र्य, समता व बंधुता ह्यांच्या वल्गना करणारा फ्रान्स पण १९५०-५५ पर्यंत अल्जेरियावर जुलुमाने राज्य करीत होता. अल्जेरियाची स्वातंत्र्याची मागणी फ्रान्सने वेळोवेळी पाशवी बळाने चिरडली. शेकडो निदर्शकांना त्यांनी परिसच्या झाईन नदीत गोळ्या घालून मरणासन्न फेकून दिले. युरोपातील इतर देशांचा इतिहास पण अन्यायपूर्ण आणि निष्पापांच्या रक्ताने माखलेला आहे. ते काय न्याय देणार आणि कोणाला?

२) ते फक्त स्वत:चा सन्मान करणे जाणतात. कारण इतर माणसे, त्यांच्या भाषा ह्या अगदी आजही त्यांच्या लेखी क्षुद्र आहेत. ज्यु, हिंदु, आफ्रिकन आदिवासी, मूळ ऑस्ट्रेलीय तर त्यांच्या दृष्टीने क:पदार्थ. कोणाला सन्मान देणे तर दूरच. माणुस म्हणून वागविले तरी बरे. अगदी १०-१५ वर्षापूर्वीची गोर्‍या क्रिकेटपटुंची देहबोली आठवून पहा.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

सहमत

हो अगदी १००% सहमत आहे.

पण त्याच वेळी स्वातंत्र्य या कल्पनेचा जन्मही येथेच झाला हे विसरू नये...

आपला
गुंडोपंत

येथेच म्हणजे कुठे?

पण त्याच वेळी स्वातंत्र्य या कल्पनेचा जन्मही येथेच झाला हे विसरू नये...

येथेच म्हणजे कुठे? युरोपात का? कारण स्वातंत्र्य ही मानवी भावना आहे. १६ व्या शतकात शिवाजीराजांनी पुकारलेले युद्ध गुलामीसाठी होते का? आर्य चाणक्याने ऐदी, विलासी मगध राजांच्या कचाट्यातून जनतेची सोडवणूक करायची ठरवली ती कल्पना स्वातंत्र्याची नव्हती का? महाराणा प्रतापचे युद्ध पण स्वातंत्र्यासाठीच होते.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

गांधी हत्या आणि वध

लहानपणी मी "गांधीवध" हा शब्द ऐकला आणि तो लक्षात राहिला, तेव्हा त्याच्या अर्थाचे कंगोरे मला ठाऊक नव्हते. (माझ्या सदस्य ओळखीत म्हटल्यापणे अगदी हल्लीहल्लीपर्यंत माझा मराठी भाषेचा वापर घरगुती होता, आणि कुटुंबाबाहेरील समाजात मी मराठी भाषा फारशी वापरलेली नाही. मराठी संकेतस्थळांवर आल्यापासून शब्दसंपदा वाढत आहे, आणि अधिक अधिक काटेकोर होत आहे. हळूहळू.) लक्ष दिले तरी अशा प्रकारचे शब्द कधीकधी वापरले जातात. तसे वापरले जाऊ नये ही अपेक्षा योग्य आहे.

वरील प्रतिसादात शब्दप्रयोग "गांधी हत्या" असा वाचावा. नाहीतर कुठल्यातरी कुटुंबातील कंगोरे नसलेला सामान्य प्रयोग म्हणून वाचावा.

धनंजयदादा

राहून राहून मला कुतूहल वाटते - बहुतेक फिलिस्तिन्यांना भरपाई केलेली आहे, ही माहिती ना इस्रायलकडून येते, न फिलिस्तिन्यांकडून. मग तुम्ही वाचलेल्या पुस्तकांत ही माहिती आली तरी कुठून? (तुम्ही वाचलेल्या पुस्तकांत ती माहिती आहे, याबाबत मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो.)

माझ्या कुठल्याच उत्तरात भरपाई हा शब्द आलेलाच नाही. ज्या गोष्टीबद्दल मलाच ठाऊक नाही त्या बाबत मी कशाला बोलेन?

मात्र सुरवातीला जे ज्यु फिलिस्तीनमध्ये आले त्यांनी स्वत: पैसे जमवून जमिनी विकत घेतल्या, तिथे सामुदायिक शेती निर्माण केली असा स्पष्ट उल्लेख अनेक पुस्तकांत आहे. तसेच त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून अमेरिकेतील श्रीमंत ज्युंनी पैसा व शेतकी तसेच जलसिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ फिलिस्तीनमध्ये पाठवले. तो पैसा वापरून ज्युंनी पुढे बरीच जमीन अरबांकडून खरेदी केली असा स्पष्ट उल्लेख "एक्झोडस" मध्ये पण आला आहे.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आ

ज्यू!

मी लहान् असताना ज्युंचा २००० वर्षांचा इतिहास (असेच् काहीसे) नाव् असलेली मराठी कांदबरी वाचली होती. त्यानुसार् सुरुवातीचे ज्यु काही धनिक वगैरे नव्हते उलट त्यांना/त्यांचा खालच्या जातीचाच दर्जा असावा असे एकंदरीत् राहणीमान वर्णिलेले आहे. पण कांदबरी वाचल्यावरही ज्युंबद्द्ल् मनात् प्रचंड् आदर् निर्माण् झाला.

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या हल्ल्या नंतर कुठेतरी मी वाचले होते, भारत् सरकारचे माहीत् नाही पण, इत्स्रायली गुप्तहेर संस्था (पुर्वीचा इतिहास् पाहता) नक्कीच या अतिरेक्यांचा बदला घेतील, (ज्यूंच्या हत्येचा), हे वाक्य त्यांच्या दरार्‍या/आदराबद्द्ल् बरेच सांगुन जाते.

वरती धनंजय यांचा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण मग् भारत् पाकीस्तान फाळणीत अजुन काय झाले? आणि अश्या लोकांचे/लोकांनी करायचे काय्?

पुर्णपणे शत्रुंनी वेढलेल्या इस्त्रायलची वाटचाल् (पाकीस्तानशी तुलना करुन् पहा) कौतुकास्पद आहे!

खरे आहे.

सुरुवातीचे ज्यु काही धनिक वगैरे नव्हते

अपरंपार कष्ट हेच त्यांचे भांडवल. इतके कष्ट की आपण कल्पना पण करू शकत नाही. एक्झोडस कादंबरीत त्यांनी उदाहरण दिले आहे की रशियातून पळून गेलेल्या ज्यूंनी मजूरी करून, पै पैसा जोडून, तिथे दलदलीची जमीन खरेदी केली. दिवसाचे १४-१६ तास काम केले. सतत मलेरीया सारख्या रोगांना तोंड दिले. प्रथम दलदलीची जमीन कोरडी केली. नंतर ठिबक सिंचन पद्धत वापरून वाळवंटात शेती केली.

तिथल्या मूळ अरबांनी मूळची दलदलीची, ओसाड, नापीक जमीन ज्यू विकत घेत आहेत म्हटल्यावर अव्वाच्या सव्वा किमती देऊन विकायला सुरवात केली व ४-५ वर्षांनी ज्यूंनी ती जमीन सुपीक करून पीक काढायला सुरवात केली की लुटालुट, खुनाखुनी, भोसकाभोसकी करून उभे पीक लुटून नेत असत किंवा (आपल्याच गुंडांविरुद्ध स्वत:च) पैसा घेऊन पिकांना संरक्षण पुरवीत.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

चित्राचा आकार

संपादक
कृपया छाया-प्रकाशचित्राचा आकार कमी करू शकतील काय,
वाचण्यास त्रास होतो आहे.

सदस्यांनीही कृपया चित्रे डकवतांना ८०० गुणिले ६०० बिंदुंचीच चित्रे डकवावीत.

आपला
गुंडोपंत
(शीर्षकावरून कृपया चित्राताईंनी गैरसमज करून् घेऊ नये! ;) )

वरच्या प्रकाशचित्रात

एक गोष्ट मुद्दाम सांगावी अशी आहे. त्यात एक फाटक दिसत आहे ज्याच्या कमानीवर जर्मन भाषेत "आर्बाइट माख्ट फ्राय" असे लिहिले आहे. ज्याचा अर्थ लेबर लिबरेट्स (कार्य मुक्ती मिळवून देते) असा होतो. हे फाटक ऑश्विझ छळछावणीचे आहे. बर्‍याच ज्यूंना श्रम शिबिरांकडे नेणार सांगून, फसवून ह्या छळछावण्यांकडे आणण्यात आले होते. म्हणून ही फसवी पाटी. :(

किती हा छद्मीपणा.

काही दुवे

यू एन रेफ्युजी एजन्सीकडून रेफ्युजी कँपांच्या लोकसंखेचे आकडे (दुवा)
(इस्रायलच्या सुरुवातीचे युद्ध १९४८ मध्ये झाले, येथील पहिला आकडा १९५०मधला आहे. म्हणजे रेफ्युजी कँपातील प्रत्येक स्त्रीला खूप मुले झाली असण्यापुरता काळ गेलेला नव्हता.)
या आकडेवारीप्रमाणे १९५०मध्ये ९,४१,२२१ विस्थापित होते. इस्रायल सरकारच्या मते फार फार तर ६,५०,००० विस्थापित होते, पण बहुधा ४-५ लाख विस्थापित होते.

याआधीच्या १९४५च्या जनगणनेत ७,५६,००० अरब पॅलेस्टाईन मॅन्डेटच्या भावी इस्रायली भागात होते. १९४९च्या इस्रायल सरकारच्या जनगणनेत १,६०,००० अरब इस्रायल भागात होते. (आकडे पुढे दिलेल्या मिचेल यांच्या लेखामधून दिलेले आहेत.) विकिपेडियावरील दुव्यावर पॅलेस्टाईन मॅन्डेटमधली १९४५ मधली लोकसंख्या १७,६४,५२० इतकी होती, तर त्यांत बिगर-ज्यू लोकांची संख्या ~१२लाख होती. या वेगवेगळ्या आकड्यांमध्ये काही गूम्तागुंतीचे फरक आहेत. पण पूर्ण लोकसंख्येपैकी ४-९ लाख लोक विस्थापित झाले, ही टक्केवारी बरीच मोठी आहे.

(हा आकडा विचारांना सुरुवात ठरू शकतो. स्वत:चा कुठलाच देश न राहून विस्थापित होण्यास तयार व्हावे तर त्या जमिनीची किंमत नेमकी किती योग्य आहे? जर बहुतेक अडाणी लोकांना किंमत दिली असेलही, तर अडाणी नसलेल्या विकत घेणार्‍यांनी नीतिमत्तेला साजेशी किंमत दिली का?)

पण अशी किंमत दिली गेल्याचे इस्रायली लोकही मानत नाहीत. पुढील दुवा अमेरिकन-इस्रायली को-ऑपरेटिव्ह एन्टर्प्राइझ संस्थेच्या ज्युइश व्हर्च्युअल लायब्ररी मधून आहे (फिलिस्तिनी विस्थापित - लेखक मिचेल बार्ड). त्यात अन्य दुवे दिले आहेत, ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतले आहेत आणि काही सरकारी वक्तव्ये आहेत.

यात सांगितले आहे, की हे लाखो लोक इस्रायल भागातून युद्धाला भेदरून पळून गेले. किंवा अरब राज्ये जिंकतील, आणि आपल्याला घरी परत जायला मिळेल या "अवास्तव गर्विष्ठ आशेने" (boastings of an unrealistic Arabic press and the irresponsible utterances of some of the Arab leaders) पळाले.
हागाना संस्थेने इस्रायली फार थोड्या लोकांना हुसकावून लावले, आणि ते जिथे झाले त्याचे उल्लेख आहेत.

अर्थातच मिचेल बार्ड "हाकलून दिले" कल्पनेच्या विरोधात आहे. पण "पैसे देऊन जमिनी विकत घेऊन लोकांना विस्थापित केले" हा विचार नेमका कुठून आला, हे मला माहीत नाही.

इस्रायल सरकार विस्थापितांना अजून भरपाई देणे आहे, हे कबूल करते, पण त्याचबरोबर इस्रायलमध्ये आलेल्या ज्यू विस्थापितांना अरब सरकारांकडून भरपाई मिळाली पाहिजे, असा इस्रायल सरकारचा मुद्दा आहे. "फिलिस्तिनी विस्थापितांना आधीच पैसे दिले आहेत" असे इस्रायल सरकार म्हणत नाही.

"भेदरून पळाले" आणि "हाकलून पळाले" मध्ये काय विशेष फरक आहे, हे आपण काळजीपूर्वक ठरवले पाहिजे. युरोपात हिटलरचा-मुसोलिनीचा उदय होत असताना कित्येक ज्यू लोक हाकलले जायच्या आधीच स्वतःहून अमेरिकेत विस्थापित झाले. या लोकांना काही प्रमाणात नात्झी लोकांनी हाकलले, असे म्हटले तर मला तरी सत्याचा मोठा विपर्यास केल्यासारखे वाटत नाही. खुद्द ज्यू लोकच याला "हिटलरने हाकलले" म्हणतात - आणि मी त्यांच्याशी सहमत आहे.

हिटलर-नात्झींनी कित्येक ज्यू लोकांना बळेच हाकलले, (आणि हागाना ने काही अरबांना हाकलले). फक्त तितक्याच लोकांना जर्मनीतून (फिलितीनमधून) "हाकलले" असे म्हणणे, जे हाकलण्यापूर्वी पळून गेले त्यांना "स्वखुषीने गेले" म्हणणे म्हणजे ज्यू लोकांच्या वेदनेचा अनादर आहे (आणि फिलिस्तिन्यांच्याही).

राहून राहून मला कुतूहल वाटते - बहुतेक फिलिस्तिन्यांना भरपाई केलेली आहे, ही माहिती ना इस्रायलकडून येते, न फिलिस्तिन्यांकडून. मग तुम्ही वाचलेल्या पुस्तकांत ही माहिती आली तरी कुठून? (तुम्ही वाचलेल्या पुस्तकांत ती माहिती आहे, याबाबत मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो.)

युरोपातील लोकांबद्दल जे सामान्यीकरण केलेले आहे "न्याय व सन्मान ह्या दोन शब्दांचा युरोपशी काडीमात्र संबंध नाही" त्याबाबत मी नि:शब्द आहे. जगातील प्रत्येक जमातीबाद्दल तुम्ही म्हणता तशी वेगवेगळ्या काळातली रक्तरंजित उदाहरणे दिली जाऊ शकतात. त्यांनी नेमके काय सिद्ध होते, ते कळत नाही.

तरी या बाबतीत तथ्यांचाच विवाद आहे असे दिसते. अशामुळे तथ्यांच्या विश्लेषणाबद्दल चर्चा निष्फळ ठरू शकते. म्हणून या चर्चेतून मी अंग काढत आहे.

गल्लत

आपल्यातील विसंवादाचे कारण कदाचित् काळाची गल्लत हे असू शकेल. म्हणजे असे पहा - १) सुरवातीला जे ज्यू १८५०-१९३० च्या दरम्यान तिथे बाहेरून गेले त्यांनी तिथे जमिनी विकत घेतल्या. तिथे सामुदायिक शेती केली. नवे तंत्रज्ञान आणले. साधारण १९४० पर्यंत ज्यू आणि सामान्य अरब जनता एकत्र नांदत होते. २) १९४० च्या सुमारास युरोपात दुसर्‍या महायुद्धाचे पडघम वाजायला सुरवात झाली. काऊकजी, जनरल फौजी सारख्या अनेक इस्लामिक नेत्यांनी ब्रिटिशांनी त्यांना वेळोवेळी दिलेला पाठिंबा विसरून उघडपणे जर्मनीला पाठिंबा दिला. ३) त्याच वेळी फिलीस्तान मध्ये मुस्लिम बंधुत्वाची हाक दिली व अरबांना ज्युंच्या विरोधात युद्ध पुकारायला प्रोत्साहन दिले व तिथे नौआखाल सारखी परिस्थिती झाली. त्याचवेळी युरोपात जर्मनी इंग्लंडला भाजून काढत होता. अश्यावेळी ज्युंच्या मदतीकडे दुर्लक्ष करून केवळ युरोपातून मोठ्या प्रमाणात ज्यू फिलीस्तानात येतील ह्या एका भितीपोटी ब्रिटिशांनी जास्तीत जास्त मुस्लिम लांगुलचालनाचे धोरण स्विकारले. ४) ह्या मुळे मुफ्तीसारखे विध्वंसक इस्लामिक नेते जे फिलीस्तानी सुद्धा नव्हते ते शेफारले. त्यांनी विनाकारण विदेशी दहशतवादी, गुंड, शस्त्रास्त्रे ह्यांना फिलीस्तानात पाठवून तेथील मूळ जनतेला ज्युंच्या विरुद्ध युद्धास प्रवृत्त केले. बर्‍याच मुस्लिम बहुल गावांमधून राजरोजपणे दहशतवाद्यांना आश्रय देण्यात आला. त्याबदल्यात दहशतवाद्यांनी युद्ध संपल्यावर ज्युंच्या वसाहती व ज्युंची शेती व इतर उद्योग त्या त्या गावांना बक्षिस म्हणून देण्याचे कबुल केले. ६) मात्र ब्रिटिशांनी ह्या गोष्टींकडे काणाडोळा केला व मुस्लिम नेत्यांना गोंजारायचे धोरण पुढे रेटले. ७) ह्या परिस्थितीत ज्युंच्या पुढे आत्महत्या किंवा शेवटचा ज्यु शिल्लक असेपर्यंत अस्तित्वाची लढाई हे दोनच पर्याय शिल्लक राहिले. ज्यात ज्यु लोकांनी दुसरा पर्याय स्विकारला व आपली जमीन इंच इंच लढताना असे काही शौर्य गाजवले की भाडोत्री विदेशी दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली. ८) मात्र हे भाडोत्री दहशतवादी पळाल्यामुळे ज्यु लोक आपल्यावर आता सर्व राग काढणार असा विचार करून हजारो फिलीस्तानी कुटुंबे स्वत:हून फिलीस्तान सोडून जायला लागले. ज्या प्रक्रियेला "दुसरे एक्झोडस" असेही म्हटले जाते.

वेस्ट बँक मधील फिलीस्तानींचे स्थलांतर हा मात्र १९५५ नंतरचा इतिहास आहे.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

सुफळ

तरी या बाबतीत तथ्यांचाच विवाद आहे असे दिसते. अशामुळे तथ्यांच्या विश्लेषणाबद्दल चर्चा निष्फळ ठरू शकते. म्हणून या चर्चेतून मी अंग काढत आहे.

जिथे तथ्ये, विचार, माहितीसाठा, दावे, सिद्धांत असणार तिथे सर्वत्र विवाद असणारच. मग आपण भविष्यात सर्वच चर्चांतून अंग काढून घेऊन लेखन संन्यास घेणार का? धनंजयदादा, विचारांचा मुकाबला विचारांनी, मुद्द्यांचा मुकाबला मुद्द्यांनीच करायचा असतो. चर्चेपासून पळ काढून काय नक्की साध्य होणार? मते आहेत तो पर्यंत मतभेद राहणारच. त्याला का घाबरायचे?

उलट मी म्हणेन की चर्चा घडत राहिल्या की विचारमंथन होऊन समाज प्रबोधन सुफळ संपूर्ण होते.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

व्यापक विषय तसेच दुर्लक्षिला जाणारा मुद्दा

हा विषय असा आहे की ज्यावर विविध अंगाने तितकेच मुद्देसूद लिहीता, बोलता येऊ शकते, वादही घालता येऊ शकतील...

वर धनंजयच्या प्रतिसादातील बरेचसे पटले. (इतर पटले नाही असे नाही, पण जरा वेगळे वाटते).

धनंजयचे म्हणणे: जगाभरात विखुरलेल्या ज्यू समाजाने आपली पुण्यभूमी येरुशालाइम (जेरुसालेम) येथे आपले राज्य असेल अशी इच्छा बाळगली.

हे खरेच आहे. फक्त असे त्यांना जेंव्हा इस्त्रायलमधून २००० वर्षांपुर्वी हाकलण्यात आले तेंव्हापासूनचे म्हणणे आहे. असे ऐकले आहे की त्या संदर्भातील उल्लेख त्यांच्या लग्नानंतरच्या काही वचनात नवरा-बायकोस म्हणावे लागतात का ऐकावे लागतात. दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांच्या मागणीला बळकटी आली. त्याचे एक कारण आईनस्टाईन आदी ज्यू शास्त्रज्ञांची आणि बँकर्सची अमेरिकेस होणारी मदत आणि त्यांची तयार झालेली लॉबी, ती पण अमेरिका एक महासत्ता म्हणून उदयास येत असताना आणि रशियाची (कम्युनिझम पसरण्याची) भिती जगभर असताना... आणि अर्थातच मध्यपुर्वेतील तेलाचे महत्व समजायला लागल्यावरही असेल कदाचीत! थोडक्यात हे अचानक दुसर्‍या महायुद्धानंतर पडलेले स्वप्न नाही.

याचा अर्थ तेथील स्थानिक पॅलेस्टाईन्सना घालवून् देयला हवे होते असा अजिबात नाही. तेंव्हा दोस्त राष्ट्रांनी तेंव्हाच जर तडजोड केली असती तर नंतरची बरीचशी अस्थिरता अस्तित्वातच आली नसती. त्याच बरोबर तेंव्हा पॅलेस्टाईन्स आणि इतर अरब राष्ट्रे ही इस्रायलला ज्यूंसाठी मान्यता देण्यास तयार नव्हते. आजही इजिप्त आणि काही अपवाद सोडल्यास देत नाहीत. पाकीस्तानने पण मान्यता दिली नव्हती / नाही आहे असे वाचल्याचे आठवते. भारताचे पण आधी पूर्ण राजनैतिक संबंध नव्हते असे वाचल्याचे आठवते. १९९२ साली, राव सरकारच्या काळात ते पूर्ण संबंध स्थापित करण्यात आले.

त्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात एक भारत आणि नंतर अमेरिका सोडल्यास बर्‍याच ठिकाणी ज्यूंचे स्वागत झाले नाही अथवा आपले मानले गेले नाही. त्या कारणामुळे इस्त्रायलला भारताबद्दल आणि ज्यूंना भारतियांबद्दल आत्मियता आहे असे म्हणले जाते. त्यात तथ्य आहे असे स्वानुभवांवरून तरी वाटते.

आता दुर्लक्षिलेला मुद्दा:

नाझी जर्मनीतील ज्यूंच्या अनन्वित अत्याचारांप्रमाणेच तसेच आणि काही प्रमाणात अधिकही असतील असे भिषण अत्याचार हे जिप्सींवर झाले होते. २५०,००० ते ५००,००० जिप्सिंना युद्धाअखेर पर्यंत मारले गेले होते. ७५% जर्मनितील तर ५०% ऑस्ट्रीयातील जिप्सी मारले गेले होते. तसेच इतर अनेकांना अनेक वैद्यकीय चाचण्यांसाठी वापरले गेले, त्यांचे कॅस्ट्रेशन (मराठी?) केले गेले... सुरवातीस त्यांचे काय करायचे हे नाझींना कळले नाही कारण ते मूळचे भारतीय म्हणजे (त्यांच्या लेखी) एका अर्थी "आर्यन्"! मग त्यांच्यासाठी "धोरणे" तयार केली गेली...असो.

पण त्याबद्दल गाजावाजा होत नाही. इतिहासाच्या पानात माहीती आहे पण त्यापानांवरील धूळ कोणी निव्वळ वाचण्यासाठीपण फुंकत नाही. अर्थात जिप्सी ही भटकी जमात. संघटीत नाही, पैसा नाही आणि बुद्धी असली तरी त्याचे व्यापक अधुनिक जगतात उपयुक्त असे काहीच योगदान नाही. जे झाले त्याच्यातून काहीच शिकल्याचे किमान ऐकिवात नाही... या उलट कोणे एके काळी एका ज्यू व्यक्तीने म्हणल्याचे ऐकले होते की, आज जे जगात ज्यू आहेत ते केवळ बलवान ज्यूच आहेत. जे दुर्बळ होते त्यांना हिटलरने मारले...थोडक्यात जिप्सी एक जमात म्हणून दुर्बळ. आणि आपल्याला माहीत आहेच की दुर्बळाला मित्र नसतो की हितचिंतक...

वा!

जिप्सींबद्दलची माहिती नव्याने कळली. धन्यु!
त्यावर माहिती देणारे आणि ती माहिती कथानकात गुंफलेले असे पुस्तक आहे का?

ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

अजून एक

त्यावर माहिती देणारे आणि ती माहिती कथानकात गुंफलेले असे पुस्तक आहे का?

मी स्वतः वाचलेली नाहीत पण तुम्ही विचारल्यावर उत्सुकतेपोटी बघितले तर ही यादी ऍमेझॉनवर मिळाली. तरी अर्थातच तशी कमिच पुस्तके आहेत! (८०च्या दशकापासून साधारणपणे प्रत्येक दशकात एक पुस्तक!)

नाझींनी जसे ज्यूंचे आणि जिप्सींचे हाल केले तसेच सृष्टीलावण्यांनी ख.व. मधे आठवण करून दिल्यामुळे लक्षात आले की मी त्याने समलिंगी व्यक्तींचे पण तसेच हाल केले. कदाचीत एकूण आकडा कमी असेल पण प्रपोर्शन् पाहीले तर त्यांचे आणि जिप्सिंचे जास्त असू शकेल. अर्थात हा सर्वच प्रकार या लेखाच्या शिर्षकाप्रमाणे नृशंस असल्याने कोणाचेच कमी अथवा जास्त नाही. विषमता आहे ती केवळ पब्लीसिटीत...

विषमता

विषमता आहे ती केवळ पब्लीसिटीत...

विषमता असे नक्की काही म्हणता येणार नाही कारण असे धरून चाला की ४०-५० स्त्रिया आणि १-२ पुरुष एकत्र सहलीला गेलेले आहेत. पाहणारा म्हणतो की बायकांची सहल आलेली दिसते. त्या सहलीची संयोजिका / संयोजक विश्रामगृहाच्या संचालकांना म्हणतात, "साहेब, तुमचे विश्रामगृह चांगले सुरक्षित आहे ना? बायकांची सहल घेऊन येणार आहोत म्हणून विचार आहोत". तशीच स्थिती ह्या छळ छावण्यांच्या बाबतीत झाली. जवळपास ६० लाख ज्युंचे शिरकाण झाले. त्या हिशोबाने भटके, समलैंगिक, रशियन सैनिक इ. ची संख्या किरकोळच म्हणावी लागेल. म्हणून ज्युंचे हत्याकांड असे सरसकट म्हटले जाते.

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

“संतोष. परम संतोष."

थोडे वेगळे

आपण म्हणता त्या मुद्यासंदर्भात मी विषमता म्हणत नाही आहे. ते समजू शकतो. आणि म्हणून आपला मुद्दा मान्यच आहे.

पण समलिंगी मान्य नाहीत म्हणून आणि जिप्सिंचे धार्मिक आचरण हे अब्राहमिक धर्मांपेक्षा वेगळे असल्याचे कारण करत कदाचीत, पण त्यांच्याकडे नंतर एक समाजाचा ज्यूं इतका नसेल पण बर्‍यापैकी घटक असूनही मदत आणि पुनर्वसनाकडे दुर्लक्ष झाले असे वाटते. मानवाधिकार हीत्यासुमारासच अस्तित्वात येऊ घातलेली संकल्पना होती पण या दोन्ही समाजासंदर्भात मात्र त्यांना मिळालेली वागणूक ही ते कोण आहेत यावरून मिळाली आणि म्हणून विषमता म्हणले.

भटक्या

भटक्या समाजाचा सुद्धा जर्मनांकडून छळ छावण्यांमध्ये छळ व मृत्यु झाला हे मला आपल्याकडूनच प्रथम ह्या मंचावर कळले. धन्यवाद.

जालावर अधिक शोधाशोध करता जे वाचायला मिळाले ते भीषण आहे.

आपण म्हणता त्याप्रमाणे त्यांच्या हत्याकांडाची पण पुरेशी दखल घेतली गेली हवी होती.
_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

मराठी शब्द

कॅस्ट्रेशन = खच्चीकरण

प्रतिशब्द्

कॅस्ट्रेशन् = इंद्रियछेदन

अजुन १

कॅस्ट्रेशन = वंध्यकरण

_______________________________________________
“आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? “
“नाही महाराज. “
“इतर कोणाच्या पाहण्यात?”
“नाही महाराज. या प्रश्नाचे ‘होय’ असे उत्तर देणार्‍या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज."

"संतोष. परम संतोष."

इस्त्रायल

इस्त्रायलच्या निर्मीतीची कथा वाचतांना अंगावर शहारे आल्याचं आठवतं. आपल्या जमीनीचा आग्रह त्यांनी २००० वर्षे कायम ठेवला आणि शेवटी ते धेय्य साध्य केलेच. त्यासाठी जगभरातील ज्यु लोक आहे तो देश सोडून त्या वैरान वाळवंटाकडे धावला होता. जगातील फक्त नागवलेले किंवा गांजलेलेच लोक इस्त्रायल मध्ये आले नव्हते तर अमेरिकेसारख्या देशात सुखाने जगणारे धनाढ्य लोक सुध्दा आपल्या देशाची निर्मीती करण्यासाठी सुखाचं आयुष्य सोडून धावले होते. आपला देश आपल्या मातीवर नव्याने उभा करायचा आणि गेल्या २००० हजार वर्षांत हे करण्याची संधी आपल्याला भेटते आहे हा विचारच तमाम ज्यु जनतेला किती तरी भारावून सोडणारा असेल.

इस्त्रायल बद्दल खुपदा वाचलेलं आहे. आणि वाचायला आवडतं सुध्दा. आपला देश स्वतंत्र झाला आणि इस्त्रायल निर्माण झाला ह्या साधारण एकाच काळातील घटना.

इस्त्रायल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान विशेषतः शेती तंत्रज्ञान , जलसंधारण आणि संरक्षण अश्या क्षेत्रात आघाडी घेतलेला देश. अतिशय कठीण परिस्थीतीत देशहितासाठी कठोर पावलं उचलणार्‍या बेन गुरीयान आणि गोल्डा मायरांचा देश अशी ओळख होती.

वर इस्त्रायलबाबत अनेक संदर्भ नव्याने मिळालेले आहेत. इस्त्रायलबाबत आता नव्या आयामाने वाचन होईल.

- नीलकांत

साम्य

आपला देश स्वतंत्र झाला आणि इस्त्रायल निर्माण झाला ह्या साधारण एकाच काळातील घटना.

अजून एक साम्य म्हणजे इझ्राएल जन्मत: च सहा खुनशी अरब राष्ट्रांनी वेढलेला होता तर भारत तीन खुनशी राष्ट्रांनी वेढलेला आहे आणि ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच तिथे पण इस्लामी कट्टरवाद्यांनी दबाब आणण्यासाठी खुलेआम लुट-हत्या-बलात्कार अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात दंगली घडवून आणल्या होत्या. फक्त तिथे इझ्राएली नेतृत्वाने धर्मांधांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून उपोषण वैगरे केले नाही हाच मोठा त्यांच्यात आणि आपल्यात भेद होय.

अवांतर : एक्झोडसचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.
--------------------------X--X-------------------------------
फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा,
वरूनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा ।
त्यांतहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी,
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचें पाणी ।।

ऑश्विट्झ विषयी

ऑश्विट्झ विषयी आणि संजय दाबके यांच्या पोलंड आणि जर्मनीतल्या छळछावण्यांविषयीच्या पुस्तका बद्दल लोकप्रभेतला लेख.
--लिखाळ.

 
^ वर