चार्वाक: पुरोगामी की उच्छृंखल?

"यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?"

'चार्वाक' हे नाव उच्चारताक्षणी हा श्लोक, किंबहुना त्यातला "ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" हा भाग अनेकांना सर्वप्रथम आठवतो.
सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत ही आस्तिक दर्शने, तर बौद्ध, जैन आणि चार्वाकाचे लोकायत ही नास्तिक (पक्षी: वेदप्रामाण्य नाकारणारी ) दर्शने होत.
या सर्वांमधे सर्वाधिक बदनाम आणि बहुचर्चित असे तत्त्वज्ञान चार्वाकाचे आहे.

चार्वाकाने वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धांत, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारले. केवळ 'प्रत्यक्ष' प्रमाण मानले. चार्वाकाचा काळ लक्षात घेता, त्याचा हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवाद आणि तो मांडण्याचे अलौकिक धैर्य कौतुकास्पद आहे. कदाचित यामुळेच, त्याच्या कार्याचा/तत्वज्ञानाचा काहीही अंश आज शिल्लक राहिला (ठेवला गेला?) नाही. आज चार्वाक जो काही थोडाफार आपल्यापुढे आहे, तो त्याच्या टीकाकारांच्या साहित्यामधून आपल्याला दिसतो. हे चित्र नक्कीच एकांगी, अपूर्ण आणि धूसर असणार, हे निश्चित.
काही विचारवंतांच्या मते चार्वाकाने सर्व काही फक्त नाकारलेले आहे, आणि त्याऐवजी नवे काहीही मांडलेले नाही, सबब त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही, किंबहुना चार्वाक हा दार्शनिकच नाही. त्याचवेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारखे काही विद्वान चार्वाकाचे जोरदार समर्थन करतांना दिसतात.

आपल्याला याबद्दल काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

हे पाहा

सुस्वागतम!

हे पाहा - पूर्वी येथे चर्चा झाली होती
पुस्तकविश्व वर माहिती आहे
काही ज्ञानकण येथेही दिसतील.

याशिवाय विकी वर सापडलेले येथे.

सध्या यावर तहान भागवा.
पुढे चर्चा होतीलच.

आपला
गुंडोपंत

धन्यवाद गुंडोपंत

सर्व दुवे वाचून काढतो.

(उपक्रमावर यापुर्वी ही चर्चा झाल्याचे मला माहित नव्हते. संपादकांना हरकत असल्यास हा धागा अप्रकाशित केला तरी चालेल.)

सुस्वागतम् !

सुस्वागतम् !

जडवादावर, चैतन्यवादावर, लोकायतवादावर पुन्हा नव्याने चर्चा झडल्यास माझ्यासारख्या चार्वाकचाहत्याला आवडेलच. शक्य झाल्यास वकुबानुसार सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच.

डॉ. आ. ह. साळुंखे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची नासधूस करणाऱ्या मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे बौद्धिक मार्गदर्शक आहेत असे कळते. तूर्तास त्यांच्या विद्वत्तेविषयी एवढाच पुरावा मिळाला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

म्हणजे

तूर्तास त्यांच्या विद्वत्तेविषयी एवढाच पुरावा मिळाला.

म्हणजे ज्यांचे पूरावे (?) तुमच्यासमोर नाही ते निर्बुद्धच म्हणायचे का?

येथे तुमच्या माहितीत थोडी भर पडू शकेल.

बाकी सनातन प्रभात चे बौद्धीक मार्गदर्शक कोण यांचा शोध घेऊन तुम्हाला पून्हा भेटतोच.

विद्वत्ता वाया घालवलेली दिसते

म्हणजे ज्यांचे पूरावे (?) तुमच्यासमोर नाही ते निर्बुद्धच म्हणायचे का?

बाबासाहेब दुव्याबद्दल धन्यवाद. पुस्तकांवरून तरी डॉ. साळुंखे विद्वान असावेत असे वाटते आहे. एवढे विद्वान असताना संभाजी ब्रिगेडसारख्या दहशतवादी संघटनेचे बौद्धिक मार्गदर्शक कसे झाले? विद्वत्ता वाया गेली किंवा घालवली असेच म्हणायचे.

बाकी सनातन प्रभात चे बौद्धीक मार्गदर्शक कोण यांचा शोध घेऊन तुम्हाला पून्हा भेटतोच.

कोण आहेत बरे मार्गदर्शक? माझ्यालेखी सनातन प्रभात आणि संभाजी ब्रिगेड दोन्हींत काही फरक नाही. एक ग्राम्य म्हण वापरायची झाल्यास गुवाचा भाऊ पाद. असो. तुम्ही चुकीच्या दारावर थाप देत आहात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मान्य

माझ्यालेखी सनातन प्रभात आणि संभाजी ब्रिगेड दोन्हींत काही फरक नाही.

फरक नाहीच.

चुकीच्या दारावर थाप

बौद्धीक मार्गदर्शक कोण यावर अनुयायांचे वर्तन काय हे फारसे अवलंबून असते काय याबद्दल जरा सांशकता आहे.

अजून

ज्ञानेशराव,

येथे वृत्तिप्रभाकर मध्ये
काही माहिती आहे

अजून मायबोलीवर काहीश्या वेगळ्या अंगाने जाणारी ही चर्चाही चांगली वाटेल, ही बेष्ट पैकी आहे!
(तर्कटांना आता या चर्चेच्या निमित्तने मायबोलीवर जावेसे वाटले तर त्याहूनही बरे! ;)) )

जिप्सीनेही चार्वाकावर चांगले लेखन केले आहे.

आशा आहे याचा उपयोग होईल.

आपला
गुंडोपंत

यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?"

हा शंकराचार्याचा हलकटपणा आहे.

यावज्जीवेत् सुखं जीवेत्, नास्ति मृत्युअतगोचरः
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:

मूळ श्लोक असा आहे.

हलकटपणा

हा शंकराचार्याचा हलकटपणा आहे.

हलकटपणा असो की अजून काही, हा बदल शंकराचार्यांनीच केला हे म्हणावयास पुरावा काय?

 
^ वर