सन्मानाने मरण्याचा हक्क (पूर्वार्ध)


सन्मानाने मरण्याचा हक्क


जीवन व मृत्यु
आधुनिक मानवी जीवन हे एक अजब रसासन आहे. डॉक्टर्स, वैज्ञानिक, व संशोधकांसाठी हे चमत्कारसदृश जीवन एक न सुटणार कोडं ठरत आहे. जीवनाइतकेच मरणसुद्धा आजकाल वुचकळ्यात टाकत आहे. जीवन म्हटल्यावर मरण त्याचा पिच्छा सोडत नाही. फक्त मरण केव्हा, कुठे, कधी व ज्याप्रकारे येऊ शकतो याचा नीटसा अंदाज येत नाही. प्रत्यक्ष खून वा आत्महत्या यांचा अपवाद वगळता मरण स्वत:च्या हातात नसते. दुर्दैवी अपघात, मृत्युच्या दारात पोचवणारे दुर्धर आजार, जीव घेणारे शारीरिक डिसऑर्डर्स, आपल्या मृत्युला कारणीभूत ठरतात. मृत्युशी झुंज काही वेळा काही क्षणात आटपते. व काही वेळा संपता संपत नाही. एक मात्र खरे की काहीही करून जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात असलेले आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व त्यावर बेतलेली रोगोपचार पद्धती दिवसे न दिवस अत्यंत वेदनामय ठरत आहेत. रुग्णाचा आपल्या प्रकृतीविषयीचा हेळसांडपणा, वेळीच न केलेले रोगनिदान, रोग निदान व उपचारातील एखादी छोटीशी, क्षुल्लक चूकसुद्धा रुग्णाला असह्य वेदनेत ढकलू शकते. रुग्णाला आपले प्राण, मान-सन्मान, प्रतिष्ठा पणाला लावूनच रोगोपचाराचा सामना करावा लागतो. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा वापर करताना रुग्णाला आपण एक निर्जीव वस्तु आहोत असे वाटू लागते. आपल्या भावना, समाजातील आपले स्थान, यांना पूर्णपणे विसरण्यास ही उपचार पद्धती भाग पाडते. अशा वेळीच आपल्याला हमखास स्वेच्छामरण (युथेनेशिया) आठवू लागते. परंतु बहुतेक वेळा असे आठवणे भावनेच्या आहारी गेल्यामुळे होते. खरोखरच स्वेच्छामरण - दयामरण याबद्दल सहानुभूती असल्यास निरोगी आयुष्य जगत असतानाच काही प्रयत्न करायला हवे होते. म्हणूनच ही चळवळ तरुणांची नव्हे, तर वृद्धांची, रुग्णांची आहे असे वाटू लागते.
'चांगले मरण'
मरण यातनेतून (कायमची) सुटका मिळण्याची अंधुकशी आशा या युथेनेशियातून आहे. परंतु याला अजूनही कायदेशीर मान्यता नाही. जागतिक स्तरावर युथेनेशियाची भरपूर वाहवा होत असली तरी आपल्या देशातील कायदे - कानून, तज्ञ व सामान्यांची मानसिकता या गोष्टीला अजिबात थारा देत नाहीत. युथेनेशिया हा शब्द ग्रीक भाषेतला असून त्याचा शब्दश अर्थ 'चांगले मरण' असा आहे. अत्यवस्थ रुग्णाला कुठल्या स्टेजपर्यंत ('जिवंत' ठेवू शकणाऱ्या) वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात वा मृत्युपर्यंतचा रुग्णाचा प्रवास शक्यतो वेदनारहित करण्यासाठी कुठले उपचार करावेत यासंदर्भातील मार्गदर्शक तत्व - नियम करणारी अधिकृत संस्था म्हणून इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केर मेडिसिन कमीटी या समितीला मान्यता आहे. परंतु या समितीच्या मते युथेनेशिया हे रुग्ण व इतरांना सुटका करण्यासाठी औषधोपचाराद्वारे डॉक्टरांनी केलेली हत्या असते.
मृणाल सरकार या नोयडा येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या वरिष्ठ वैद्यकीय सल्लागाराच्या मते युथेनेशिया ही एका प्रकारे जाणीवपूर्वक केलेली सक्रीय हत्या (active killing) असते. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून व कायदेशीररित्या त्याला नाकारायला हवे. इच्छामरणाचे उदात्तीकरण करणारे या संदर्भात नवीन नवीन शब्दांची भर घालत असतात. त्यापैकी दयामरण, निष्क्रीय युथेनेशिया (passive euthenesia), या शब्दांनी अनेक सुशिक्षितांना आकर्षित केले आहे. या प्रकारात रुग्णाला जिवंत ठेवू शकणाऱी व्यवस्था (उदा अन्न - पाणी वर्ज्य करणे, व्हेंटिलेटर काढून टाकणे, औषधं बंद करणे इ, इ, ) नाकारून हृदयाला ऑक्सिजनचा वा मेंदूला रक्ताचा पुरवठा बंद करून रुग्णाला मृत्युच्या हवाली केले जाते. डॉ. सरकार यांच्या मते युथेनेशिया व उपचार नाकारणे हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे असून त्यांची सरमिसळ करता कामा नये.
इतर देशातील स्थिती
आपल्या देशातील व इंग्लंड - अमेरीकेतील या विषयीचे कायदे व नियम यांची तुलना केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतील. इंग्लंड - अमेरीकेत ICU मधील रुग्ण यानंतरच्या कुठल्याही उपचाराला प्रतिसाद देत नसल्यास रोगोपचार नाकारणे वैद्यकीय दृष्ट्या समंजस गोष्ट ठरू शकते. या प्रगत राष्ट्रातील डॉक्टर्स नेहमीच हा समंजसपणा दाखवत आले आहेत. या देशात अती दक्षता विभागा तील (ICU) 80-90 टक्के रुग्णांचा मृत्यु रोगोपचार नाकारल्यामुळे वा बुद्ध्यापुरस्कर बंद केल्यामुळे होत असतात. अनुभवांती मिळालेल्या ज्ञानाची ही फलश्रुती आहे व आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीला हे मान्य आहे. त्यामुळेच तेथील कायदे - नियम याला अनुकूल आहेत. डॉक्टर्सचा रुग्णाविषयीचा निर्णय अंतिम ठरतो. परंतु आपल्या येथे मात्र यासंबंधी कुठलेही लिखित वा अलिखित असे कायदे, मार्गदर्शी तत्व, नियम नाहीत. रोगोपचार कुठपर्यंत चालू ठेवावीत वा केंव्हा बंद करावीत यासंबंधी कायदा मौन बाळगून आहे. त्यामुळेच भारतीय डॉक्टर्स याविषयी कुठलेही नि:संदिग्ध निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसतात. कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून (महागडी) रोगोपचार सुरू ठेवतात. यात स्वत:चे श्रम, प्रतिष्ठा, वेळ व रुग्णाचा पैसा वाया घालवत राहतात. अशा सुविधांचा तुटवडा असताना इतर रुग्णांना तातडीच्या उपचारापासून वंचित ठेवतात. काही आजारांना (आता तरी) कुठलेही औषधं नाहीत याची माहिती असूनसुद्धा काही चमत्कार घडण्याची वाट पाहतात. कायद्याच्या बडग्यातून वाचण्यासाठी रुग्णाला (व त्याच्या नातलगांना) खोटी आशा दाखवत राहतात. भरमसाठ पैसे खर्च करायला भाग पाडतात. इतर प्रगत देशामध्ये मात्र (शक्य असल्यास) रुग्णाची संमती वा जवळच्या नातेवाइकांच्या संमतीने निर्णय घेवून उपचार थांबवले जातात. काही वेळा डॉक्टर्स व रुग्ण (वा नातेवाईक) यांच्यात एकमत होत नसल्यास त्या देशातील न्यायालये या संबंधी निर्णय घेऊ शकतात. आपल्या देशातसुद्धा या प्रकारच्या लवचिकतेची आता अत्यंत गरज आहे. उपचार बंद करणे म्हणजे युथेनेशियाला आमंत्रण असा अर्थ न काढता वास्तवाचा स्वीकार करणे असा असावा. प्रसिद्धी माध्यमं या दोन्हींची सरमिसळ करत असल्यामुळे जनसामान्यापर्यंत चुकीचा संदेश पोचत आहे.
आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती
आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती आता संक्रमणावस्थेतून जात आहे. कालमान परिस्थितीनुसार हा व्यवसायही बदलत आलेला आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात आहे. आताच्या डॉक्टर्संना फार मोठी जवाबदारी पेलावी लागते. व्यवसायातील बारकावे व गुंतागुंतीचे मुद्दे वाढत आहेत. डॉक्टर्स नेमके काय करत आहेत हे समजून घेण्यासाठी रुग्ण, त्याचे नातेवाईक, (व काही वेळा न्यायालयांचेसुद्धा) प्रथमिक ज्ञान अपुरे पडत आहे. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णाचे काय करायचे हा एक यक्षप्रश्न ठरत आहे. अशा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स सातत्याने युथेनेशियाची बाजू घेत असतात व या गोष्टींचा अनुभव नसणारे डॉक्टर्स मात्र युथेनेशियाला नेहमीच विरोध करत आलेले आहेत. 2000 वर्षापूर्वीच्या हिपोक्रेटसच्या आणा-भाकांना ("इतरांना बरे वाटावे यासाठी रुग्णाला मरण यावे म्हणून मी प्राणघातक औषध देणार नाही") चिकटून राहिल्यास व सर्व डॉक्टर्स त्याप्रमाणे तंतोतंत वागू लागल्यास युथेनेशिया व त्याचे इतर प्रकार चुकीचे ठरतील. नैतिकतेच्या व्याख्या बदलत आहेत. या बदलत्या नीतीमूल्यांच्या आधारावरून युथेनेशियाचे मूल्यमापन करणे योग्य ठरेल.
युथेनेशियातील प्रकार
कुठल्या परिस्थितीत युथेनेशियाला शरण जावे असे वाटते या प्रश्नाचे उत्तर तितकेसे सोपे नाही. डॉ. सुनील श्रॉफ यांच्या नीरिक्षणानुसार युथेनेशियाची विनंती करणऱ्यात दोन प्रकार आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर रोगाने जर्जरित झालेला व अशा रोगामुळे टोकाची वेदना भोगत असलेला आणि अशा रोगातून सुटका होण्याची शक्यता नाही याची खात्री असलेला एक वर्ग आहे. त्यांना त्यांच्या वेदना सहन होत नसल्यामुळे युथेनेशिया हवीहवीशी वाटते. परंतु अशा वेदना कमी करणारे हॉस्पिटल्स आपल्या देशात आहेत. फक्त त्यांची संख्या तुरळक व त्यासाठीचा खर्च न परवडणारा असल्यामुळे मरणाची याचना केली जाते. कही वेळा ही याचना खुद्द रुग्ण वा त्याच्या जवळच्या नातेवाईकाकडून केली जात असते. अशा प्रसंगी उपचार करणारे डॉक्टर्स वेदनाशामक डोझमध्ये वाढ वा गुंगी य़ेणाऱ्या औषधांचा मारा करून रुग्णाला मृत्युच्या दारी नेऊ शकतात. परंतु आपल्या देशातील कायद्यानुसार असे काही करणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरू शकतो व डॉक्टरला अटक होऊ शकते.
दुसऱ्या प्रकारात रुग्ण पूर्णपणे कोमावस्थेत गेलेला असल्यामुळे रुग्णाला हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर कुठेही ठेवणे अशक्य असते. ही कोमावस्था किती काळ असेल याचा अंदाज नसतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकावर मानसिक व आर्थिक ताण पडतो. त्यातून सुटका करून घेण्यासाठी युथेनेशियाची याचना केली जाते.

(पूर्वार्ध)

Comments

सन्मानाने मरण्याचा अधिकार तरी देण्यात यावा.

thanthanpal.blogspot.com
आजची नोकरशाही आणि राजकारणी मंडळी सन्मानाने जगू देत नाही. कमीत कमी सन्मानाने मरण्याचा अधिकार तरी देण्यात यावा. यामुळे यांच्या पाशातून सुटका तरी होईल.

स्वेच्छामरण

इच्छामरण, स्वेच्छामरण,दयामरण यातील पदर अधिक स्पष्ट व्हावेत. युथेनेशिया हा शब्दाला मराठी प्रतिशब्द नेमका काय असावा?
प्रकाश घाटपांडे

युथेनेशियाची व्याख्या

युथेनेशियाची व्याख्या अशी असू शकेल:
अतीव वेदनेतून मुक्त होण्यासाठी वा वेदनारहित मृत्यु यावा म्हणून केलेला शेवटचा उपाय
युथेनेशियाला योग्य असा मराठीत शब्द न सापडल्यामुळे हाच शब्द लेखात वापरला आहे. दयामरण, इच्छामरण व स्वेच्छामरण या युथेनेशियाच्या छटा आहेत. दयामरणात दुसऱ्या व्यक्तीला (वा प्राणीला) अतीव वेदना होत असावेत असा आपणच निष्कर्ष काढून त्याला मृत करणे. इच्छामरण व स्वेच्छामरण यात फरक नसावा. परंतु इच्छामरण हे व्यक्तीच्या इच्छेखातिर डॉक्टरांच्या (वा इतरांच्या) मदतीने ओढवलेला मृत्यु असे म्हणता येईल. स्वेच्छामरणामध्ये मात्र खुद्द व्यक्तीच काही उपायाने स्वत:च ओढवून घेतलेला मृत्यू असे ढोबळमानाने म्हणता येईल.
या विषयी या चळवळीत कार्य करत असलेले अभ्यासक/तज्ञ जास्त प्रकाश टाकू शकतील.
मुळात युथेनेशिया या प्रकाराला आत्महत्या व/वा प्रत्यक्ष खून यांच्याशी जोडत असल्यामुळे अनेक गैरसमजुतींचा सामना करावा लागत आहे.

बोस्टन लीगल

इथे बोस्टन लीगल या मालिकेतील एक भाग आठवला. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा होते. त्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जातो. ऐन वेळी काहीतरी गडबड होते आणि कैदी बेशुद्ध होत नाही. कैदी असह्य वेदना होऊन तडफडत असतो तरीही कुणीच पुढे येत नाही. शेवटी एक पोलिस अधिकारी कैद्यावर गोळ्या झाडतो आणि त्याच्या यातना थांबवतो. त्या अधिकार्‍यावर खुनाचा खटला भरण्यात येतो. अशा परिस्थितीत तो अधिकारी दोषी की निर्दोष?

--
What other people think about you is none of your business because it really isn't about you, it is about them. -- Sean Stephenson

उपचार थांबवणे

भारतातही डॉक्टर असा उपचार थांबवण्याचा 'सल्ला' रुग्णाच्या नातेवाईकांस देतात असे अनुभवांती म्हणू शकतो.

इंग्लंड अमेरिकेत आरोग्य आणि उपचाराचा खर्च बहुधा सरकारी असतो. त्यामुळे डॉक्टर लोक उपचार थांबवण्याचा 'निर्णय' घेत असतील.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बातमी

नुकतीच ही बातमी वाचनात आली. या संदर्भात कायद्याची भूमिका यामुळे स्पष्ट होईल असे वाटते.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

दयामरणाचा अर्ज फेटाळला

आज सुप्रीम कोर्टाने दयामरणाचा अर्ज फेटाळला.

The bench, however, said since there is no law presently in the country on euthanasia, mercy killing of terminally ill patient “under passive euthanasia doctrine can be resorted to in exceptional cases.”

The bench clarified that until Parliament enacts a law, its judgement on active and passive euthanasia will be in force.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

योग्य निर्णय

मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे.

द्यामरण (कर्टेसी: चाणक्य) असे सांगणे सोपे आहे, किंबहुना, रुग्णाच्या नातेवाईकांची अगतिकताही समजण्यासारखी आहे परंतु असे कायदे करण्यासाठी योग्य ती व्यवस्था आणि यंत्रणा आपल्याकडे नाहीत. याशिवाय, हा अतिशय नाजूक भावनिक प्रश्न आहे. दयामरण रुग्णाला द्यायचं कुणी?

फाशी देणारे जल्लाद* आपल्या देशात मिळणे कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी असे काम करावे असे सुचवणे धाडसी वाटते. विशेषतः रुग्णाला मरण देणे हा डॉक्टरांचा पेशा नाही. अशाप्रकारे कायदे झाले तर त्याचा मानसिक त्रास किती होईल याची कल्पना नसावी.

अवांतरः हेल्थ केअरच्या संदर्भात माझे इमर्जन्सी रुममधील काही नर्सेस आणि डॉक्टरांशी सहज (कामाव्यतिरिक्त) बोलणे झाले होते (माझ्यासाठी क्लायंट्स) त्यातून समजले की इमर्जन्सी रुममधील स्टाफ हा मनाने अतिशय कणखर असणे आवश्यक असते. तिथे स्टाफ फारसा टिकत नाही. सतत बदल होतात. जे राहतात त्यातल्या बर्‍याचशांना मानसिक उपचार घ्यावे लागतात.

तात्काळ उपचारांसाठी आणलेल्या पेशंटला आपण वाचवू शकलो नाही आणि तुमची प्रिय व्यक्ती जिवंत नाही हे त्या रुग्णाच्या नातेवाईकांना जाऊन सांगणे हे भयंकर कठिण काम असते. (विशेषतः लहान मुलांना घेऊन आलेले आई-वडिल) बर्‍याचदा ही बातमी सांगण्यापूर्वी स्टाफ मनाची तयारी करतो. त्यासाठी त्यांना विशेष रुम वगैरे असते.

बातमी पोहोचवल्यावर धाय मोकलून रडणार्‍या नातेवाइकांकडे पाहून अपराधीपणाची जाणीव येऊ शकते/ येते. आपण उपचार करण्यात कमी तर पडलो नाही ना अशी टोचणी लागू शकते/ लागते.

स्पेअर देम!

* फाशी देणार्‍यासाठी चपखल मराठी शब्द आठवला नाही. मारेकरी?

 
^ वर