ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध
हा धागा अन्यठिकाणी टाकून मी वाट पहात होतो तेच नेमके झाले.
तेथे प्रतिसाद फार खाली गेले होते म्हणून इथे टाकत आहे.
ज्योतिष किंवा भविष्य अशा शब्दांचा नुसता संदर्भ आला की ओपन माईंडवाल्यांना अनुभव घ्यायला का अवघड जावे हा त्यांनी विचार करण्यासारखा आहे.

चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष कसे ठरवावे वगैरे याचा विचार करावा लागतो.

नाडी ग्रंथांच्या बाबत निकष कसे ठरवावेत, काय असावेत याची चर्चा जरूर करावी पण आधी अनुभव तर घ्याल. त्यालाच जर कोणी नाकारत असेल तर मग निकष कसे ठरवणार, मिपावर काहींनी नाडीग्रंथांचा आस्वाद घ्यायचे ठरवले असल्याचे म्हटले गेले पण ते अपेक्षेप्रमाणे बोलघेवडे ठरले.
फतेहपुर सीक्री सहल धाग्याने मी ते हळूवारपणे दर्शवले होते.

नाडी ग्रंथाच्या चिकित्सेसाठी मिपावरील आपणासारख्या अनेकांनी विविध टिपण्यातून व माझ्या अन्य घाग्यातून "चिकित्सा थिअरी मान्य करण्याचे निकष " माहित असून त्याकडे जाणीवपुर्वक टाळले जाते हे लक्षात येते.
आपल्या सोईसाठी इथे मी आधी उल्लेख केलेला महत्वाचा निकष पुन्हा नमूद करतो - नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीचे नाव कोरुन येते का? येत असेल तर ते कसे? याचा शोध घेणे-
आता यात भविष्य वा ज्योतिष याचा संदर्भ आला कुठे? हा तर निखळ तमिळभाषेचा -लिपीचा शोध आहे.
मी माझ्याबाजूने केलेल्या अभ्यासाचा पुरावा सादर केला. तो मिपावरील काहींनी वाचून सत्य असल्याचा निर्वाळा दिल्याचे आपणास आठवत असेल.
त्याकडे दुर्लक्षकरून मिपाचे लोक आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे ओक देत नाहीत-टाळतात असा कांगावा करतात.
मी आत्ताच नमूद करतो की - जसा पुर्वी मला अंनिसवादी लोकांनी केलेल्या बहाण्याचा अनुभव आला त्याप्रमाणे - काही मिपाकर नाडीग्रंथांचा अनुभव मी म्हणतो म्हणून घेतीलही. पण ते अशासाठी की नंतर म्हणायला की ओकांचा आग्रह होता म्हणून त्यांच्या समाधानासाठी अनुभव घेतला. अन्यथा आम्हाला तो घ्यायची गरज नव्हती. आम्ही आधीच मानतो की नाडी-वाडी सर्व थोतांड आहे.
मात्र कोवूर,बी प्रेमानंद आदी दिग्गजांपासून ते मा श्री रिसबुड, प्रकाश घाटपांडे, दाभोळकर, शाम मानव आदी ज्या सर्वांनी छातीठोकून नाडीग्रंथांना थोतांड ठरवले त्यातल्या एकानेही नाडी पट्टीचा, त्यातील भाषेचा-लिपीचा, व्यक्तीच्या नावांचा पुरावा सादर करून काही म्हणणे मांडले असेल तर ते त्यांनी सादर करावेत. मी माझ्यापरीने ते पुरावे सादर केलेले आहेत. शिवाय त्यातच आपल्याकडून माहिती काढून तीच आपल्याला सांगितली जाते या आरोपाची शहानिशा आपोआप होते. बर त्यांनी नाही केले तर मिपाकरांनी करावेत.त्यांना तर कोणी आडवले नाही ना?

Comments

अनुभव

तुमचे एक मित्र-समर्थक कायदेतज्ञ+ तामीळतज्ञ श्री हैयो हैयैयो असे मिळून संख्याशास्त्रीय विदा गोळा करून सादर करा.
मग आपण धनंजय वगैरेंना त्याचे विश्लेषण करण्याची विनंती करू.

फक्त संख्याशास्त्रीय विदा या शब्दाचा नीट अर्थ समजाऊन घ्या म्हणजे झाले.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

जंक

तुम्ही मांत्रिकावर विश्वास ठेवता का?
पोपट भविष्यावर विश्वास ठेवता का?
हवेत हात फिरवून चमत्काराने अंगारा काढणार्‍या बाबावर विश्वास ठेवता का?
मंगळ असलेल्या मुलीशी लग्न केल्याने विघ्ने येतात ह्यावर विश्वास ठेवता का?

ह्या सगळ्याचे उत्तर, "विश्वास ठेवत नाही" असे आहे! खात्रीशीर पुरावे मिळाल्याशिवाय आम्ही कशावरही विश्वास ठेवत नाही.

तुमच्या परीने सादर केलेले पुरावे अनेक चर्चांमधून मोडीत काढण्यात आलेले आहेत. राजेश घासकडवी ह्यांनी तुम्हाला 'नेचर' मधे शोध निबंध छापून आणण्याचे आव्हान दिले होते. त्यासारखे काही मान्यता असलेले पुरावे असतील सादर करा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मेंदू बाहेर पडेल एवढे खुले मन नसावे

कृष्णविवरांना विरोध केला म्हणून एडिंग्टनला शाप देता येतात त्याचप्रमाणे क जीवनसत्व वाटणार्‍या लायनस पॉलिंगलाही. म्हणजे 'विच साईड टु अर ऑन' हा खरा प्रश्न आहे. आज ज्ञात विज्ञानात नाडी ग्रंथ बसणार नाहीत. संपूर्ण विज्ञान नव्याने लिहिण्याची गरज आहे असे सिद्ध करणारे भक्कम पुरावे सापडल्याशिवाय आम्ही गंडणार नाही. दोनपैकी कोणतीतरी एक बाजू चूक आहे एवढे नक्की. त्यामुळे, जी बाजू चूक नसण्याची अधिक शक्यता, त्या बाजूचे निष्ठावंत राहिलेले बरे. उगीच 'खुले मन' वगैरे कुंपणावरील भूमिका घेतली तर 'ना घर का ना घाट का' असे व्हायचे. 'अनुभूती' काय, बहुतेक बंडलच असतात.

नाडि अनुभव्

पुण्य्नगरि मधे कोथ्रुड्(शन्कर नगरि) या ठिकानि मि नाडी भविश्य बघ्यला ३ वेळा गेलो होतो. पन् येकदा हि आचुक् पत्ति सापड्लि नाहि. त्याय्न्नि मला निर्निरले प्रशन् विचर्र्ले. ते माझ्या कडुन्च् र्ऊत्तर् घेन्याचा प्रायत्न कर्तयत् आसे वाट्ट्ट्॥ हॉत

शुभेच्छा

आपला नाडीग्रंथाबाबतचा प्रकल्प चालु ठेवा. माझा असा कयास आहे की यश येणार नाही. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
आपले प्रयत्न जर आपण वस्तुनिष्ठतेने मांडणार असाल तर आपल्याला मदत करायलाही हरकत नाही. (व्यनि पाठवा)

बर्‍याच वर्षांपूर्वी कुठल्याशा दिवाळी अंकात याबद्दल वाचले होते. कोल्ड रिडींग (वैदर्भीय यांचा अनुभव), पट्टी न दाखवणे, लिपी अगम्य वाटणे (ती तामिळपण नसावी.) असे प्रकार त्यात लिहिले होते.
'भृगुसंहिता ' यावरून ते बेतलेले आहे असे म्हणतात. 'श्री' नावाच्या नियतकालिकात याबद्दल भरभरून आले होते.

गंमत अशी की यात संख्याशास्त्रीय विदा करता येणार नाही. कारण प्रत्येक माणसाचे भविष्य यात वेगवेगळे लिहिले आहे.

यातील सहभागी माणसांनी (पट्टीच्या मालकांनी) ही पद्धत खुलेपणाने (सर्व पट्ट्या खुल्या करणे, त्यांचे भाषांतर करणे) विस्तृत करून सांगणे हा यावर निर्णय करण्याचा एक पर्याय आहे. तो शक्य होईल असे दिसत नाही कारण त्यांचे पोट भरणे बंद होईल.

तुमच्याजवळ काय पर्याय आहे? म्हणजे त्यांच्याकडे जाऊन पैसे देऊन भविष्य ऐकण्याशिवाय?

या पट्ट्यांमधे माझी पट्टी असण्याची शक्यता बिलकूल दिसत नाही. कारण भृगुऋषी मी याकडे फिरकणार नाही असे आधीच जाणून असणार आणि मग माझी पट्टी बनवण्याची भानगड त्यांनी केलीच नसणार.

प्रमोद

लॉल्झ

या पट्ट्यांमधे माझी पट्टी असण्याची शक्यता बिलकूल दिसत नाही. कारण भृगुऋषी मी याकडे फिरकणार नाही असे आधीच जाणून असणार आणि मग माझी पट्टी बनवण्याची भानगड त्यांनी केलीच नसणार.

याला सेल्फ अन-फुल्फिलिंग प्रॉफसी म्हणता येईल.

मिपासाठीचा लेख

मिपावर काहींनी नाडीग्रंथांचा आस्वाद घ्यायचे ठरवले असल्याचे म्हटले गेले पण ते अपेक्षेप्रमाणे बोलघेवडे ठरले.

नाडी ग्रंथाच्या चिकित्सेसाठी मिपावरील आपणासारख्या अनेकांनी विविध टिपण्यातून
तो मिपावरील काहींनी वाचून सत्य असल्याचा निर्वाळा दिल्याचे आपणास आठवत असेल.
त्याकडे दुर्लक्षकरून मिपाचे लोक आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे ओक देत नाहीत-टाळतात असा कांगावा करतात.

बर त्यांनी नाही केले तर मिपाकरांनी करावेत

हा लेख मिपाच्या वाचकांसाठी असताना इथे देण्याचे प्रयोजन समजले नाहि. असो.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

हा लेख

व्य. नि. नेही पाठवण्यात आला आहे. :-( मराठी संकेतस्थळ चालकांनी "स्पॅम"ची सुविधा द्यावी.

मूळ बातमी

वरुण यंत्राविषयीच्या बातमीमुळे हा धागा सुरू झाला. त्या बातमीतील डॉ. मराठे यांना आयआयटी बॉम्बेच्या पुणे चॅप्टरने, संशोधकांच्या प्रदर्शनात बोलाविले होते. त्यांच्या दाव्यात तसेच प्रायोगिक निरीक्षणांमध्ये काही दम नव्हता परंतु ही बाब त्यांना मान्य होती. स्वतःच्या खर्चाने मला प्रदूषणकारी खेळ करू द्या एवढीच त्यांची अपेक्षा दिसली.

मला तसे मान्य करायला काहीच अडचण नाही.

जर मोकळेपणाने डॉ.मराठ्यांनी तसे मान्य केले असेल तर छान आहे.
आपली नाडी ग्रंथांच्या बाबत अशी अपेक्षा असेल तर मी पुर्वी पासून जे म्हणतो वा मानतो की नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे सिद्ध झाले तर मला तसे मान्य करायला काहीच अडचण नाही. उलट अशी शास्त्रोक्त चाचणी करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. यासाठी मी माझ्यापरीने प्रयत्नही करत आहे. हे आपणास माझ्या पुर्वलेखनावरून व केलेल्या प्रयत्नांवरून लक्षात आले असेल. इच्छुकांनी मला अभ्यासकार्याच्या मदतीचा हात पुढे करावा अशी माझी मित्रांना विनंती आहे.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.

वृत्तांत

सर्व संशोधकांच्या उत्पादनांची माहिती देऊन झाल्यावर, बहुदा गंमत म्हणूनच, मराठे यांना त्यांच्या 'वैयक्तिक अनुभव'/संशोधनाची माहिती देण्यास वेळ दिली गेली. मराठे यांनी फारच कमी प्रयोग, तेही वैज्ञानिक पद्धत न वापरता केल्याचे सांगितले. परीक्षकही साशंकच दिसत होते. २०१० च्या मे-जूनमध्ये सविस्तर प्रयोग करता येतील असे ते म्हणाले.

चाचणी

>>नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे सिद्ध झाले तर मला तसे मान्य करायला काहीच अडचण नाही.
उलट अशी शास्त्रोक्त चाचणी करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.

शास्त्रोक्त चाचणीची आपली व्याख्या बहुधा जगातील ६००+ कोटी लोकांपैकी प्रत्येकाने नाडीकेंद्रावर जाऊन अनुभव घेणे ही असल्याचे आपल्या आजवरच्या लेखनातून दिसते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पत्रिका पाहून वधू वरा॑चे जीवनातील दु:ख सा॑गता येते का?

प्रति,
समाधान करणारे कोणीही!

माझा असा अनूभव आहे की, बरेचसे ज्योतीषी केवळ मुला-मूली॑ची पत्रिका पाहून सा॑गतात की ह्या॑ना आयूष्यात मरणप्राय यातना भोगाव्या लागतील. स॑तती होणार नाही आणि झालीच तर अप॑ग वगेरे होईल. आमच्या नात्यातील तर एका मूलाचे लग्न ठरले असता केवल मूहूर्त पहाण्याकरीता म्हणून पत्रिका दाखवीली तर म्हणे लग्न ताबडतोब मोडा काय तर म्हणे मूलगा बाहेरख्याली आहे. लग्न झाले तर ह्यान्ना स॑तती होणार नाही. खूप मरणप्राय यातना भोगाव्या लागतील. खर॑ तर तो प्रेम विवाह होता. मुलगा हा गोल्ड मेडॅलीस्ट होता, पाहण्यातला पण होता, पर॑तु 'विषाची परिक्षा कशाला' म्हणून काही विचार न करता लग्न मोडण्यात आले. काय म्हणावे ह्याला आता?
माझा मूद्द आहे की, स॑तती होणार नाही, झालीच तर अप॑ग वगेरे होईल ई. बाबी डॉक्टर कडे न जाता केवल पत्रिका पाहून ठरवता येतात का? दोघेही जर लग्नाआधी शरीरीक द्रुष्ट्या सक्षम असतील तर लग्नान॑तर ग्रहात असे काय बदल घडतात की त्या॑न्ना अपत्ये होणार नाही त व झालेच तर अप॑ग होतील? असे झाले तर गर्भ् -लि॑ग निदान विरोधी कायदा करून काही फायदाच झाला नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण मग लोक ज्योतिषा॑कडे पत्रिका घेवून जातील आणि विचारतील मूलग होणार की मूलगी ते? आणि ज्योतिषी लोक॑ ते सा॑गतील पण!
ईतर लोका॑ना असे काही अनूभव आल्यास येथे मा॑डावे.

आपला,
मनिष

 
^ वर