कसाबला फाशी

कसाबचा निकाल लागण्यात आहे. त्याला फाशी द्यावी यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

अजमल कसाब हा पाकिस्तानातील "किलिंग मशीन बनविणारी फॅक्टरीच" आहे. एवढेच नाहीतर तो हिंस्र श्वापदाहूनही क्रूर आहे. त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षाही कमीच आहे. मात्र अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी व वचक बसविण्यासाठी त्याला मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली जावी. असे ऍड्. निकम म्हणतात. त्यांनी त्याला "साप" म्हटल्याचेही वाचले.

सापाला ठेचून मारायची पद्धत आहे. अजमल कसाबला फाशी दिली तर सापाला मारल्याचे समाधान लाभेल का? फाशी ही इतक्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा आहे का? फाशी ही कसाबची फायद्यात सुटका आहे का? फाशी दिल्याने कसाब हुतात्मा ठरेल अशी भीती तुम्हाला वाटते का? किमानपक्षी, त्याला वीरमरण आले असे दहशतवादी गोटात म्हटले जाईल का? या जमान्यात फाशी देणे तुम्हाला पटते का?

कसाबला कशी शिक्षा अपेक्षित आहे.

माझ्या काकांनो आणि काकूंनो चर्चेत भाग घ्या ही विनंती.

- राजीव.

Comments

सापाला ठेचून मारतात

हे मी बघितलेले आहे. आमच्या खेड्यात त्यानंतर सापाचा देह जाळत. मला मात्र सापांना ठेचून-जाळून मारतात ही गोष्ट फारशी आवडत नाही. साप घरात शिरू नये अशा प्रकारे घर बांधणे, घरात घाण-उंदीर होऊ न देणे, आजूबाजूच्या नाल्या स्वच्छ ठेवणे, हे सर्व महत्त्वाचे. तरी क्वचित घरात साप शिरतो. एकदा का तो पकडला, त्याला नेमक्या कुठल्या प्रकारे जायबंद केले तरी भविष्यातील धोका कमी किंवा जास्त होत नाही.

(हे मूळ "कसाब" मुद्द्याला अवांतर आहे, ठाऊक आहे. तरी सांगावेसे वाटले.)

पूर्णपणे अवांतर वाटत नाही.

साप घरात शिरू नये म्हणून जी काळजी घेतात हे तुम्ही लिहीलं आहेत ते दहशतवादी मुद्द्याला अवांतर वाटत नाही आहे. :-)

फाशी दिलेलीच बरी, नाहीतर पुन्हा कोणा मेहेबुबा मुफ्तीसाठी त्याला सोडून देण्याची वेळ येईल.

+१

हे मी बघितलेले आहे. आमच्या खेड्यात त्यानंतर सापाचा देह जाळत. मला मात्र सापांना ठेचून-जाळून मारतात ही गोष्ट फारशी आवडत नाही. साप घरात शिरू नये अशा प्रकारे घर बांधणे, घरात घाण-उंदीर होऊ न देणे, आजूबाजूच्या नाल्या स्वच्छ ठेवणे, हे सर्व महत्त्वाचे. तरी क्वचित घरात साप शिरतो. एकदा का तो पकडला, त्याला नेमक्या कुठल्या प्रकारे जायबंद केले तरी भविष्यातील धोका कमी किंवा जास्त होत नाही.

सापाला जाळण्याचा प्रकार आम असावा. बहुधा सापाला जाळले तर साप डूख धरत नाही असा समज आहे, असे वाटते असो. थेटच बोलायचे तर माझ्यामते माणसाला माणसाचे कायदेशीररीत्या (उदा. फाशीची शिक्षा) अथवा बेकायदेशीररीत्या प्राण घेणे ( मनुष्यवध/खून) चुकीचेच आहे.

देहान्ताच्या शिक्षेचे समर्थन करणारे दोन थेयऱ्या मांडतात. त्यातली थिअरी ऑफ रेट्रिब्यूशन (खून का बदला खून ) तर पटण्यासारखी नाहीच. कसाब तर फक्त प्यादे आहे. आणि थिअरी ऑफ डेटरन्स (फाशी दिल्याने इतर जण परावृत्त होतात/होऊ शकतात) मांडली आहे ती देखील तशी कुचकामीच आहे. तसेच कसाबाला फाशी दिल्याने पाकिस्तानची अंतर्गत स्थिती अंतर्गत स्थिती बदलणार आहे का? नवे दहशतवादी येतच राहणार. साप घरात शिरू नये ह्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. घरातल्या घाणीचा व उंदरांचा (सिम्मी, विहिंप, बजरंग दल, जमाते इस्लामी वगैरे वगैरे) नायनाट करायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्वतंत्र चर्चा

थेटच बोलायचे तर माझ्यामते माणसाला माणसाचे कायदेशीररीत्या (उदा. फाशीची शिक्षा) अथवा बेकायदेशीररीत्या प्राण घेणे ( मनुष्यवध/खून) चुकीचेच आहे.

ह्यावर स्वतंत्र चर्चा व्हायला हवी.

साप घरात शिरू नये ह्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. घरातल्या घाणीचा व उंदरांचा (सिम्मी, विहिंप, बजरंग दल, जमाते इस्लामी वगैरे वगैरे) नायनाट करायला हवा.

सहमत आहे. सिम्मी, विहिंप, बजरंग दल, जमाते इस्लामी वगैरे वगैरे एकाच ओळीत वाचून प्रचंड आनंद झाला. 'स्युडो सेक्यूलर' ह्या 'कॉप आऊट' शब्दाचा सतत जप करणार्यांनी ह्याची नोंद घेतलीच असेल.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

डिटरन्स

किंबहुना त्याचा हुतात्मा होण्याचा उद्देश सफल झाला तर इतर अनेकांना प्रोत्साहनच मिळेल.

त्याची सर्वात चांगली शिक्षा म्हणजे १९८४ कादंबरीप्रमाणे त्याला रीप्रोग्रॅम करून त्याच्याच तत्त्वज्ञानाविरुद्धचा प्रचारक बनवावे (अर्थात ब्रेनवॉश कायमस्वरूपी टिकेल अशी खात्री असेल तरच). किंवा त्याला गुप्तपणे मारून टाकून त्याच्यासारख्या दिसणार्‍या सैनिकाकडून प्लॉसिबल डिनाएबिलिटी आवश्यक असणारी (देशहितार्थ) कामेही उरकून घेता येतील, पण हे फारच फिल्मी होते आहे :D

पाकिस्तानची अंतर्गत स्थिती

कसाबला फाशी दिल्याने पाकिस्तानची अंतर्गत स्थिती आणि भारताचीही अंतर्गत स्थिती काडीमात्र बदलणार नाही ही वस्तुस्थिती आहे. धनंजय आणि धम्मकलाडू यांच्या प्रतिसादांशी सहमती आहेच. कसाबच्या फाशीचे उदात्तीकरण होण्याची आणि त्यातून नवे दहशतवादी घडण्याची शक्यताही आहे. पण मग सद्यस्थितीत कसाब सारख्यांचे करावे काय (आता तो निर्णय न्यायालय घेतच आहे त्यामुळे मी डोके फोडायची गरज नाही. तरीही....) हा प्रश्न शिल्लक राहतोच.

माझ्या डोक्यातील अतिरेकी विचार असे सांगतात की

१. कसाबचे धर्मांतर करून त्याला हिंदु करावे.
२. दररोज सकाळी त्याला उठवून गीता पठण वगैरे ऐकायला लावावे.
३. स्नान-संध्यादि कर्मे त्याच्याकडून रोज पार पाडून घ्यावेत.
४. त्याच्याकडून रोज एखादे सामाजिक कार्य करून घ्यावे. धार्मिक कार्य करून घेण्यासही हरकत नाही.
५. त्याला भजने आणि संतवचने शिकवावीत आणि रोज म्हणून घ्यावीत.

दुसरे काही नाही तरी जन्नतमधील अप्सरा वगैरे मिळण्याची आपल्याला सूतराम शक्यता नाही इतकी त्याची खात्री पटवून द्यावी.

डिस्क्लेमरः वरील मुद्द्यांवर विचार करणे ही स्वतःची जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे. त्यावर गंभीरपणे विचार करणार्‍यांची जबाबदारी माझ्यावर नाही. ;-)

आणखी

६. त्याला मराठी सायटींवरील काही सदस्यांच्या शंकांचे समाधान करण्यास सांगावे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पेक्षा ब्लॉग

पेक्षा कसाबला ब्लॉग काढायाला सांगावे. त्याचा तरल, मृदू, मुलायम शैलीतला एखादा 'जीवघेणा' लेख 'रेषेवरील अक्षरे' च्या आगामी अंकासाठी घ्यावा. मग उपक्रमावर आम्ही आहोतच!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

एक मस्त ब्लॉगपोष्टची कल्पना सुचली आहे. कमिंग सून. :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

:)

पण आधी होमीपदीच्या गोड गोळ्या घ्या बरं..

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गरज नाही

मला इतरांचे चांगले ब्लॉग बघितले तरी जळजळ होत नाही.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

त्यापेक्षा

जर वरील मुद्यातील पहील्या मुद्यात कसाबचे धर्मांतर न करता त्याला निधर्मी केले तर अधिक बरे होईल. त्यामुळे पुढची टू-डू लिस्ट कमी होईल ;) फार तर दरोज त्याला, (साने गुरूजींची क्षमा मागून, त्यांचे गाणे मजा म्हणून वापरत आहे, त्यांची थट्टा अपेक्षित नाही!) "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" हे गाणे सुनवत, "अर्प, अर्प, अर्पतोस की नाही" असे ओरडता येईल. (कसाबला मराठी चांगले येते तरी देखील त्याला "अर्प" हा शब्द प्रयोग कळणार नाही त्यामुळे होणारा त्रास वेगळाच!)

असो, माझे गंभीर उत्तर, तात्काळ फाशी द्यावी हे आहे. मी काही फाशीच्या शिक्षेच्या बाजूने नाही, मात्र वर अदितीने सांगितलेले कारणच असे वाटण्यामागे आहे - रूबिया सईद, एअर इंडीया प्रकरण आणि त्याही आधी ज्यांना मकबूल भट्ट मुळे खरेच प्राण हकनाक गमवावे लागले ते रविंद्र म्हात्रे अशी अनेक उदाहरणे त्या संबंधात येतात.

बाकी दूरगामी उपाय म्हणून धनंजयशी पूर्ण सहमत. मात्र ते केवळ सरकारचेच काम नाही तर सामान्य जनतेचे देखील आहे. एका ९/११ नंतर अमेरिकेवरील अनेक हल्ले हे सामान्य जनतेमुळे वाचले: शू बाँबर, अंडरवेअर बाँबर, टाईम्स स्क्वेअर मधे बाँब हल्ल करण्याचा झालेला दोन दिवसांपूर्वीचा प्रकार...प्रत्येक ठिकाणी जनतेमुळे अतिरेक्यांना अपयश आले. त्या उलट पुण्यातील हल्ल्यात बाँब असलेली बॅग तास-दिड तास तशीच हॉटेलात होती, तरी देखील कुणाचे लक्ष गेले नाही.

असो.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अर्प, अर्प, अर्पतोस की नाही..

खो खो खो... मस्त!

सन्जोप राव
मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया
हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बक्षी थी हमें एक ही धरती
हमने कहीं भारत कहीं इरान बनाया

वाह्यात अर्प

अर्प, अर्प मस्तच... आम्हाला वाह्यात अर्पही आठवला.

बाकी वरील प्रतिसाद वाचून आम्हाला आमच्या एका मित्राने धाडलेली टिप्पणी फार मार्मिक आहे. तो म्हणतो:

प्रतिसादकर्त्याची नथुराम / गांधी वगैरेंबद्दलची मतेही "पोलिटिकल करेक्टनेस"ची एकापेक्षा एक उत्तम उदाहरणे म्हणून टेक्स्ट बुकात घालता येतील :)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छ्या...

च्यायला, त्या कसाबला फाशीची शिक्षा होईल तेव्हा होईल.
म्हणजे त्याला आता फाशीची शिक्षा सुनावली जाईल. तो अपील करेल.
पुढे तो राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करेल.
२८ वेटींग फाशीच्या अर्जानंतर कसाबचा २९ वा अर्ज असेल.
पाकिस्तान सरकार त्याला दया दाखवा म्हणून विनंती करेल.
च्यायला, या कसाबने खूपच चेष्टा केली राव..आपल्या व्यवस्थेची.
छ्या, त्याला आता त्याला गोळ्या घाला रे..........!

-दिलीप बिरुटे
[संतप्त]

कसाबसारख्यांसाठी वेगळी लिस्ट

अफझल गुरु, कसाब यांच्या सारख्या देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली फाशी झालेल्यांची वेगळी यादी तयार करावी.

कोणी सांगीतलं आहे २८ होईपर्यंत वाट बघायला? रेल्वे, बस सगळीकडे आरक्षणासाठी अनेक रांगा असतातच की...

नाहीतर वरचे २८ संपेपर्यंत खाली १०० झालेले असायचे..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

काही कळत नाही

आता ह्याला फाशी दिली किंवा कसेही मारले तरी अजूनही दहशतवादी येताच राहणार...बाहेर हे मुसलमान आणि घरात माओवादी....सामान्य जनतेने जागरूक राहायला हवे...बेवारस वस्तू आढळली तर report करावा...त्यात काही असेल किंवा नसेल पण रिस्क का घ्या? आणि जर मारायचे असेच ठरले तर मात्र त्याचे हाल हाल करून मगच मारा....म्हणजे त्या लोकांना कळेल तरी कि मरण सुखासुखी येणार नाही...

करणे बरीच असतात अश्या लोकांना सामील होण्याची अथवा दुर्लक्ष करण्याची पण जोपर्यंत आपल्या घराशी येत नाही तोपर्यंत वाट बघण्यात काय अर्थ आहे ?

हिंस्र व हिंसक प्रत्युतर

त्यात काही असेल किंवा नसेल पण रिस्क का घ्या? आणि जर मारायचे असेच ठरले तर मात्र त्याचे हाल हाल करून मगच मारा....म्हणजे त्या लोकांना कळेल तरी कि मरण सुखासुखी येणार नाही...

हिंसेचे प्रत्युत्तर देताना माणूस नावाचा प्राणी अधिकच हिंस्र व हिंसक होतो की काय!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

महारोग

क्यांसर , एड्स , प्लेग ह्यां महारोगाप्रमाणे दहशतवाद हा एक माणसाच्या मनाला जडलेला महारोग आहे.
मेडीकल क्षेत्रात आपल्याला प्रगतीची आवश्यकता हवी आहे. देवीचा रोग न होण्यसाठी जशी लस दिली जाते तशी
"नो दहशतवाद" ची लस जन्मताच देण्याची सक्ती व्हावी.

वेळ लागेल , पण हा मार्ग सोलीड आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

देवीचा रोगी कळवा

"नो दहशतवाद" ची लस जन्मताच देण्याची सक्ती व्हावी.

जरी अजून लस निघाली नसली तरी "देवीचा रोगी कळवा, १००० रूपये मिळवा" प्रमाणे बक्षिसे दिली जातात...

बाकी अशी लस निघू शकेल या आशावादाला सलाम!

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

समजले नाही

(नक्की) कसली लस अजून निघालेली नाही? आणि कसली बक्षिसे दिली जातात? (काहीच) कळले नाही.

(संभ्रमीत) बेसनलाडू

बक्षीस

दहशतवाद्याविषयी माहिती कळवल्यास बक्षीस मिळत असावे.
(देवीचा रोगी कळवल्यास १००० रु मिळतात या चालीवर)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बरोबर

(देवीचा रोगी कळवल्यास १००० रु मिळतात या चालीवर)

बरोबर, फक्त ते प्रत्येक वेळेस नसते आणि गावागावात एस्टी अथवा (आता) गाडीमधून जाताना भिंतींवर लिहीलेले अजून आढळत नाही इतकेच... :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

बक्षीस

लोक सरकारकडून एक हजार मिळवण्याऐवजी दहशतवाद्यांकडून पाच हजार मिळवतील
आणि सर्व गोपनिय खबरा त्या दहशवाद्यांना पुरवतील.

सर्व उलटे सुरु आहे.

-दिलीप बिरुटे

कुठच्या कुठे राव ..

अहो , सगळ्यांना ही लस टोचवली जायील (कम्पलसरी). मग नो दहशतवादी. दहशतवाद्याला माहिती पुरवणारा दहशतवादीचं नां.

एकदा का लस टोचवली की तो एक्दम टकाटक सिव्हीलाइझ्ड बननार. मग नो हेल्प टू एनी दहशतवादी, हेल्प टू सरकार !

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय

तोंडात साखर पडो!

एकदा का लस टोचवली की तो एक्दम टकाटक सिव्हीलाइझ्ड बननार. मग नो हेल्प टू एनी दहशतवादी, हेल्प टू सरकार !

असे काही होणार असेल तर तुमच्या तोंडात अगदी साखर पडूंदेत! बाकी दहशतवादी हे धर्म/जात/भाषा/देश या सर्वांच्या कारणाने तयार होतात असे वाटते. त्यामुळे तुमची ती लस, ट्रिपल पोलीओ सारखी, लहानपणीच टोचून, खर्‍या अर्थाने, "माणूस" करून करून टाकता आले पाहीजे.... मग शांततेची दिल्ली दूर रहाणार नाही!

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मलाही समजले नाही

दहशतवाद्यांविषयी, फरारी असलेल्या गुन्हेगारांविषयी इ.इ. माहिती कळवल्यास बक्षिस हे सगळीकडेच दिले जाते. त्याचा देवीच्या लसीशी काय संबंध आहे?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

 
^ वर