कोल्हापूर या शब्दावरून तयार होणारे शब्द
"कोल्हापूर" या शब्दावरून तयार होणार्या शब्दांची जंत्री येथे देत आहे. हे सर्व शब्द यांत्रिकपणे तयार केले आहेत. मला काही प्रश्न आहेत.
१) हे शब्द बरोबर (शुद्ध) आहेत का?
२) याव्यतिरिक्त आणखी कोणते शब्द कोल्हापूरवरून तयार होऊ शकतात? असे शब्द की जे वापरात आहेत अथवा वापरात येऊ शकतात.
कोल्हापुरच्या कोल्हापुराजवळच्याच कोल्हापुरात कोल्हापुरातल्या कोल्हापुरातही कोल्हापुरातील कोल्हापुरातून कोल्हापुराबाहेर कोल्हापुरी कोल्हापुरीच कोल्हापूर कोल्हापूरकडून कोल्हापूरकर कोल्हापूरकरांचा कोल्हापूरकरांच्या कोल्हापूरकरांनाही कोल्हापूरकरांनी कोल्हापूरचा कोल्हापूरची कोल्हापूरचे कोल्हापूरच्या कोल्हापूरच्याच कोल्हापूरपासून कोल्हापूरबद्दल कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्येच कोल्हापूरमार्गे कोल्हापूरला कोल्हापूरलाच कोल्हापूरलाही कोल्हापूरवासियांच्या कोल्हापूरशी कोल्हापूरसाठी कोल्हापूरसारख्या कोल्हापूरहून कोल्हापूरात कोल्हापूरातली कोल्हापूरातील कोल्हापूरी
Comments
शुद्ध/अशुद्ध
आधी वाटले की पूर्वी एक मोठा शब्द देऊन आता यातून छोटे अर्थपूर्ण शब्द तयार करा असे काही परिक्षेत विचारत तसे काही आहे का काय!
असो.
कोल्हापूरात कोल्हापूरातली कोल्हापूरातील कोल्हापूरी हे सर्व शब्द मी कोल्हापुरात, कोल्हापुरातली (बोलताना), कोल्हापुरातील (लिहीताना), कोल्हापुरी असे वापरते. शुद्ध/अशुद्ध माहिती नाही.
सामान्य रूप आणि र्हस्वदीर्घ
कोल्हापूर हा शब्द मराठी सोडून अन्य भारतीय भाषांत कोल्हापुर(’पु’ र्हस्व) असा लिहितात. मराठी शब्दातला उपान्त्य ईकार-ऊकार नेहमीच दीर्घ, म्हणून मराठीत कोल्हापूर(पू दीर्घ!).
कोल्हापूरला प्रत्यय लावायचे दोन प्रकार. पहिला सामान्य रूप-म्हणजे कोल्हापुरा- असे करून. असे केले की विभक्ती प्रत्यय लागून कोल्हापुराला, पुराने, पुराहून, पुराचा,पुरात,कोल्हापुरीं, कोल्हापुरां वगैरे रूपे होतात. शब्दयोगी अव्यये लागून पुरातील, पुरातली, कोल्हापुरापासून, कोल्हापुराजवळ, कोल्हापुरापेक्षा अशीही रूपे होतील.
दुसरा प्रकार : सामान्यरूप न करता प्रत्यय लावणे. हे साधारणपणे परदेशी नामांसाठी, ती नामे विकृत होऊ नये म्हणून करावे लागते. लंडन-लंडनला वगैरे. ’लंडना’ला होत नाही. तसेच इराकची, इराणहून इ.(अपवाद असतात. उदा. अमेरिका(स्त्री.)-अमेरिकेला, आफ़्रिका(स्त्री)-आफ़्रिकेला, लंका(स्त्री)-लंकेला; परंतु ऑस्ट्रेलिया(पु)-ऑस्ट्रेलियाला, केनिया(पु)-केनियाला वगैरे.. )
कोल्हापूर या नामाला सप्तमीचे त, ईं, आं हे प्रत्यय सोडून इतर प्रत्यय सामान्यरूप न करता लावता येतात. कोल्हापूरला, कोल्हापूरने, कोल्हापूरहून, कोल्हापूरची वगैरे. अश्याच रीतीने, साठी, पासून, पेक्षा सारखे शब्दयोगी अव्ययेसुद्धा: उदा. कोल्हापूरकरिता, कोल्हापूरनजीक वगैरे. त, आंत, आंतून, आंतील, आंतले हे प्रत्यय/ही अव्यये लावण्यापूर्वी सामान्यरूप करावेच लागते.
विशेषण(कोल्हापुरी), सामासिकशब्द(कोल्हापूरमार्गे), कोल्हापूरकर, कोल्हापूरवासी वगैरे शब्द असेच लिहायचे.
योग्य लिखाण करण्याकरिता शुद्धलेखनापेक्षा व्याकरणाचे आणि उच्चाराचे थोडेसे भान असले की भागते, असे मला वाटते. --वाचक्नवी
येथे बघा
विकी वर बघा. यातील बरेचसे विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्यये कोल्हापूर या शब्दाला लावता येतील असे वाटते.
असेच | कोल्हापुरे
असेच.
कोल्हापुरे हे आडनाव कसे काय विसरलात!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बरे झाले विकीचा दुवा दिलांत
बरे झाले, विकीचा दुवा दिलांत. त्या पानावर भरपूर चुका आहेत, आधी माहीत असते तर त्या पानाचे पार संपादन करून टाकले असते. आता, नंतर कधी वेळ मिळाला की करीन--वाचक्नवी
शुभस्य शीघ्रम्
अवश्य! त्या विकीपानाचे लेखक बहुधा विकीचे एक संपादक आहेत असे कळले. संपादनाबरोबरच त्यांना शुद्धलेखनाची सुचवणीही करावी.
कोल्हापुरास्नं
'कोल्हापुरास्नं' = कोल्हापुरास्+ नं हा खास कोल्हापुरी शब्द आहे.
वा उ (वाक्यात उपयोग)
कवाधरनं सांगतुया कोल्हापुरास्नं जाउन युवया म्हनून..
कोल्हापुरास्नं, कोल्हापुरपस्नं
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
उच्चारी
उच्चारी "कोल्लापूरास्नं" ;-)
शब्द चालवणे
हा उद्योग एका शब्दापासून अनेक शब्द तयार करता येतात का? त्यासाठी प्रणाली लिहिता येईल का? व स्पेलचेकर मधे टाकता येतील का इकडे जाणारा दिसतो.
संस्कृतात जसे शब्द चालवणे नावाचा प्रकार असतो तसेच हे दिसते.
मराठीची वापरातली शब्दसंपदा मोठी नसली तरी विभक्तीप्रत्यय शब्दासोबत लावल्यामुळे स्पेलचेकर साठी काही पट (२०-३०?) मोठी होते. हा शब्द अनेकवचनी पण चालवला पाहिजे म्हणजे संगणकीय प्रणालीला मदत होऊ शकते.
प्रमोद