विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे

सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता किंवा त्या विभागातील नागरिक सुद्धा करत नाही.
कोणतीही नवीन योजना,कॉलेज, शासकीय संस्था या महा. उघडण्याचे ठरले तर फक्त वरील भागाचाच विचार होतो. विदर्भ मराठवाड्यात मुलभूत सुविधा नाही म्हणून डावलले जाते.
विकसित भाग अधिकाधिक निधी स्वत; ओरबाडून घेतात. पुण्यात असंख्य शैक्षणिक संस्था असताना नवीन सरकारी शैषणिक प्रकल्पा करता मराठवाडा विदर्भाचा विचार न करता प्रकल्प पुण्यास टाकणे कसे सोयीचे आहे किंवा मागसभागात टाकणे कसे गैरसोयीचे आहे याचाच जास्त विचार नोकरशाह,राजकारणी करतात . आणि मागास भाग मागासच राहतो.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात पण त्यांचा अभ्यास करणाऱ्या कमिशनर चे कार्यालय नोकरशाच्या बायको मुलांच्या सोयी साठी पुण्यात उघडले जाते. हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा उद्योग आम्ही का सहन करावयाचा ? राज्याचा मुख्यमंत्री मान्य करतो की मागास भागात सरकारी अधिकारी, डॉक्टर्स जाण्यास तय्यार नाहीत. आम्ही मजबूर आहोत. आता त्या करता कायदा करणार आहेत म्हणे? मग तुमच्या बरोबर लंगडी करत संसार आम्ही का म्हणून करायचा .
रस्ते,पाणी,वीज याबाबत सुद्धा हेच होते. हा भाग ११-१२ तास अंधारात असतो पण मुंबई पुण्यात मात्र दिपौत्सव चालू असतो. आंतरराष्ट्रीय नावाखाली मुंबई चे चोचले आम्हाला अंधारात ठेवून तहानलेले ठेवून जर पुरवत असाल तर आम्ही वेगळा विचार तर करणारच ना. आम्हाल पाणी ८/१० मैलां वरून आणावे लागते,याचा तुम्ही कधी विचार केलात. एक दिवस नळ नाही आला तर आपला टी.व्ही समोर धिंगाणा चालू असतो. तुम्हाला फक्त तुमचेच पश्न अडचणी महत्वाच्या वाटतात मग आम्ही वेगळे होण्याचा विचार केल की अखंड एकसंघ महाराष्ट्रा ची आठवण येते. गेल्या चाळीस वर्षात मराठीचे राजकारण करून देखील मुंबई तरी कोठे महाराष्ट्राची राहिली. मुंबई ही ना मराठी माणसाची ना बिहारी,ना गुजराथी ना मद्रास च्या लोकांची राहिली आहे. ती तर अवैध बांधकाम करणारे बिल्डर, झोपडपट्टी दादा,गुंड मवाली गुत्तेदार नगरसेवक यांची झाली आहे हे कटू सत्य तुम्ही का स्वीकारत नाही.आम्ही तुमच्या स्वार्था साठी आमचा, आमच्या विकासाचा बळी का द्यावा? याला एकाधे कारण तुम्ही सांगू शकाल का?
शहरातील या हावरटपणा मुळे आमच्या तोंडाचा घास जर कोणी हिरावून घेत असेल तर तुमच्या अखंड महा. जबरदस्ती चे आम्ही ओझे का उचालावयाचे . पंजाब पासून हरियाना वेगळा झाल्यावर त्या राज्याचा विकास झपाट्याने झाला. आज आंध्रात आणि इतर राज्यात सुद्धा मागास भागात सुद्धा वेगळेपणाची मागणी वाढीस लागत आहे, हे आपणास मिडिया मार्फत समजलेच असेल.
तुमची वृत्ती म्हणजे जुन्या जुनाट विचाराच्या एकत्र कुटुंब प्रमुखा सारखीच आहे. कोणी वेगळ राहण्याचा निर्णय घेवू पाहणाऱ्या तरुणास बंडखोर ठरवून त्याच्या मार्गात अडथळे आणावयाचे , भावनिक नात्याच्या आधार घेत black मेल कारणे , त्यास त्रास देणे, एकत्र राहणाचे काल्पनिक फायदे सांगणे असा प्रकार करत आहात. काळा बरोबर मुंबईत तुम्ही सख्खे भाऊ भाऊ एकत्र राहत नाही तर one room kitchen flat घेवून जन्मदात्यास वाऱ्यावर सोडून राजाराणीच्या संसारात मग्न असतात. पण म्हातारपणी तुमची मुले जेंव्हा तुम्हाला सोडून जातील तेंव्हा तुम्हास मायबापाचे दुख: समजेल. स्वतः; ला एक न्याय आणि आम्हाला दुसरा न्याय असे दुप्पटी वागणे झाले
कोणी बाबा आमटे,डॉ. अभय बंग राणी बंग अविकसित भागा करता काम करत असतात तर तुम्ही तुमची नोकरशाही त्यांनाच खोटे पाडण्याचा उद्योग करतात. साहित्य संमेलना करता तंबाखूची जाहिरात घेण्या एव्हढे तुम्ही संवेदनाहीन झालात. या विरुद्ध डॉ. अभय बंग यांनाच आवाज उठवावा लागला. पुण्या मुंबईतील लोकांना बाबा आमटे अभय बंग फक्त स्वत:ची समाजसेवेची नसलेली तळमळ मिरवण्या पुरता लागतात. कधी मुंबई बाहेर पडलात तर फक्त मोज्जमाज कारणे शिर्डी दर्शन या पुढे जात नाही.
आजच मिडिया द्वारे नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ मध्ये जवानांना मारल्याची बातमी जेवण करत पाहत असाल आणि देशात अंतकवाद कसा फेलावला सरकारने कठोर कारवाई करावी म्हणून लोकल ट्रेन मध्ये वांझोट्या चर्चा जोरजोरात करत असाल. पण हा नक्षलवाद का निर्माण झाला याचे आपल्याला कांही देणे घेणे नाही. कारण तुमची पोटे भरलेली आहेत. त्या प्रांतात आपलेच देश बांधव कुपोषणाने भुके पोटी मरत आहेत याची तुम्हाला कल्पना तरी आहे? गेल्या साठ वर्षाचा विकास फक्त तुमच्या INDIA पुरता झाला बाकी भारत कोणत्या भयाण अवस्थेत जगत आहे याची तुम्ही कधी काळजी केली आहे का?
जावू द्या तुमच्या वागण्याचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळा आहे . आम्ही सुसंकृत पणे आमच्या वेगळ्या राज्या ची मागणी करत आहोत आपण समजूतदार पणे एकली तर ठीक . नाही तर आम्हास सुद्धा इतर मार्ग अंमलात आणावे लागतील. आणि हो ! वेगळे झालो तरी आम्ही कांही उर्दू, कन्नड तमिळ बोलणार नाही मराठीच बोलणार. मुंबईच्या मराठीच्या पोकळ राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला. गेल्या चाळीस वर्षात स्वत: ची करोडो रुपयांची मालमत्ता जमा करण्या पलीकडे काय केले? मराठीच्या विकासा साठी मराठीच्या शब्द संग्रह वाढविण्या साठी काय केले. आधुनिक शाखां करता बँक, मेडिकल, संगणक विद्याना साठी लागणारा शब्द साठा आहे कोठे तुमच्या कडे?
तर दूसरीकडे बेळगाव आपल्यापासून तोडण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणत्या जगात वावरत आहात बेळगाव कधीच महाराष्ट्रा पासून वेगळे झाले बेळगाव चे घोंगडे बीजात ठेवण्यात राजकारणी लोकांचा स्वार्थ: आहे त्याचे कांही होणार नाही उगीच अश्रू ढाळू नका, बेळगाव आहे त्या राज्यात विकास करू द्या ते कांही काश्मीर सारखे भारताचे राज्य नाही. आणि आहेत त्या भागाचा विकास करा .नाही तर लवकरच मुंबई चंदीगढ प्रमाणे केंद्रशासित होईल नंतर हाती कांहीच उरणार नाही.

Comments

वाचतोय...

मराठवाडा कधीच महाराष्ट्रातून वेगळे होण्याचा विचार करीत नाही.
बाकी विकासाच्या गोष्टी जिथे अधिक विकास होत आहे अशाच विभागात जातात याच्याशी सहमत.

असो, ही केवळ पोच. बाकी आपले लेखन वाचतोच. लिहित राहा....!

-दिलीप बिरुटे
[वरीजनल मराठवाड्यातला ]

मराठवाड्याचे दूखणे

मराठवाडा कधीच महाराष्ट्रातून वेगळे होण्याचा विचार करीत नाही.

मराठवाडा महाराष्ट्रातून वेगळे होण्याचा विचार करत नाही हे काही प्रमाणात खरे असले तरी तरी या मागचे कारण म्हणजे मराठवाड्याला महाराष्ट्रातील विषमतेचे चटके सोसावे लागत नाहीतच असा नाही. विकासाच्या दृष्टीने विचार करता विदर्भसुद्धा मराठवाड्याच्या तुलनेत विकसितच आहे. मराठवाड्याचे खरे दुखणे हे की मराठवाडा साधनसंपत्तीच्या बाबतीत अगदीच कोरडा आहे. विदर्भाचे तसे नाही. स्वतंत्र राज्य म्हणून विदर्भाकडे त्याचे स्वतःचे असे उत्पन्नाचे स्रोत असतील मराठवाड्याकडे तेही असणार नाहीत. स्वतंत्र राज्य होऊन नंतर केंद्राकडे भीक मागण्यापेक्षा महाराष्ट्रीयन म्हणून हक्काचे माप पदरात पाडून घेण्यातच शहाणपणा आहे.

याशिवाय मराठवाड्यातील कणाहीन नेतृत्व, लोकांची अल्पसंतुष्ट वृत्ती अशी इतरही कारणे आहेत.

कायच्या काय ?

>>मराठवाड्यातील कणाहीन नेतृत्व, लोकांची अल्पसंतुष्ट वृत्ती अशी इतरही कारणे आहेत.

एकतर नेतृत्त्व म्हटलं की ते कणाहीन[च] असते असे आपण सर्वांनीच समज करुन घेतला आहे. तसेच असते तर जो काही थोडाफार विकास दिसतो तो दिसलाच नसता. नेतृत्त्व सर्वत्र सारखेच फक्त कोणी दोन पावले पुढे तर कोणी दोन पावले मागे इतकाच काय तो फरक. त्यासाठी 'मराठवाडा' हे उदाहरण ठरू शकत नाही. चौपदरी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, त्याचबरोबर समाजकारण,राजकारण, कला, संस्कृती,यात मराठवाडा अग्रेसर होत आहे. तेव्हा अल्पसंतुष्ट वगैरे काही नाही. महाराष्ट्राला मराठवाड्यातील नेतृत्त्वच लाभते आहे हे कसे विसरता !

असो, तुम्ही मराठवाड्यातलेच आहात तुम्हाला पुन्हा नेतृत्त्वाचा इतिहास आणि आत्तापर्यंतच्या विकासाच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. मराठवाड्याची प्रगती होत आहे आणि ती पुढेही होत राहील. असो, वेळ काढून जरा इथे भर घाला.....! :)

अवांतर : डॉ. जनार्दन वाघमारे यांनी दोन वर्षापूर्वी मराठवाड्याला 'ग्लोबल होशील का?' असे विचारले होते. लेख जरुर वाचा..! आणि त्यावर एक सकारात्मक लेखाजोगा व्यक्त करणारा प्रतिसाद लिहा.

-दिलीप बिरुटे
[मराठवाड्याचा अभिमानी]

मी सुद्धा

महाराष्ट्राला मराठवाड्यातील नेतृत्त्वच लाभते

मराठवाड्याच्या या नेतृत्वाने त्यांच्या कार्यकाळात आपले पद टिकवण्याच्या नादात पश्चिम महाराष्ट्राला मिळणारे झुकते माप शांतपणे सहन केले. (असे नेतृत्व उर्वरीत महाराष्ट्राला हवेच आहे.)

कोणी दोन पावले पुढे तर कोणी दोन पावले मागे इतकाच काय तो फरक.
हा मनाचा मोठेपणा म्हणायचा की अल्पसंतुष्टपणा.

तुम्ही मराठवाड्यातलेच आहात तुम्हाला पुन्हा नेतृत्त्वाचा इतिहास आणि आत्तापर्यंतच्या विकासाच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही.
हा तुमचा अंदाजच. आम्ही अजून (आणि यापूढेही) माहित करुन घेण्याच्या अवस्थेतच आहोत.

मराठवाड्याची प्रगती होत आहे आणि ती पुढेही होत राहील.
हे एकदम मान्य. ती तशी विदर्भाची, बिहारची सुद्धा होतेच आहे. आणि होतच राहील. मुख्य मुद्दा विषमतेचा आहे. आणि विकासाची विषमता ही विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्याच्या बाबतीत वाढते आहे एवढेच मलाम्हणायचे आहे.

मराठवाड्याचा अभिमानी
मी सुद्धा (खरंच हो !)

आ.डॉ.वाघमारे यांच्या म्हणण्याचा सारांश आम्हाला समजला तो असा.

मराठवाड्याच्या मागासलेपणाला इतिहास , भूगोल , शासन आणि त्याची स्वत:ची मानसिकता कारणीभूत आहेत.

मराठवाड्याच्या मानसिकतेत सरंजामशाहीची बीजे अद्याप आहेतच. त्याची मानसिकता पुरेशी विकासाभिमुख नाही. नेतृत्व फारसे लोकाभिमुख नाही आणि लोक विकासाभिमुख नाहीत आणि म्हणून मराठवाड्याला क्षितिजाच्या पलीकडे पाहता आलेले नाही. ' संथ वाहते गोदामायी ' असे या ठिकाणचे जनजीवन आहे. विकासाच्या प्रश्नावर मराठवाड्यातले लोकप्रतिनिधी सटीसणालाही एकत्रित येत नाहीत. ते पक्षभेद विसरायला तयार नाहीत आणि म्हणून विकासाचे प्रश्न धसास लागत नाहीत. आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे ते सहसा जात नाहीत. प्रश्नांच्या खोलात जाऊन ते अभ्यास करीत नाहीत. सध्या मराठवाड्याला सर्वमान्य असे नेतृत्व नाही.

मी वरील विधानांशी सहमत आहे.

बाकी विकीपिडीयात मराठवाड्याविषयी लिखाणाची भर टाकण्यापेक्षा मराठवाड्याच्या विकासात काय भर टाकता येईल हे पहाणे महत्त्वाचे.

हम्म

>>विकासाची विषमता ही विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्याच्या बाबतीत वाढते आहे एवढेच मलाम्हणायचे आहे.

आपल्याला जसे वाटते तसे मला वाटत नाही. वीस वर्षापूर्वीचा मराठवाडा आणि आत्ताचा मराठवाडा बदललेला दिसेल.

>>>आम्ही अजून (आणि यापूढेही) माहित करुन घेण्याच्या अवस्थेतच आहोत.
डोळे उघडे ठेवून समाजातील बदल पाहात गेलो तर सर्व माहिती घेता येते.

>>>बाकी विकीपिडीयात मराठवाड्याविषयी लिखाणाची भर टाकण्यापेक्षा मराठवाड्याच्या विकासात काय भर टाकता येईल हे पहाणे महत्त्वाचे.

आम्ही आमदार किंवा खासदार झाल्यावर आमच्या मतदार संघात विकासकामे करु.त्याचबरोबर सामान्य माणूस म्हणून जे काय करता येत असेल तेही करु. तो पर्यंत मिळालेल्या वेळात मराठवाड्यात काय आहे आणि काही नाही त्याची माहिती विकीपिडियात भरु...!

अवांतर : विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या नक्कीच कमी आहेत. [आधार काही नाहीत पण कारणे शोधली पाहिजेत]

-दिलीप बिरुटे

शेतकऱ्यांच्या आत्मह्त्त्या

बाकी सगळे आक्षेप ठीक आहेत पणः
विदर्भाची लोकसंख्या २ कोटि आहे. तेथे दरवर्षी २२०० आत्मह्त्त्या अपेक्षितच आहेत.
बहुतेक आत्मह्त्त्या कपाशीच्या नाजूक (अधिक उत्पन्न देणार्‍या) प्रकारांचा जुगार खेळणार्‍यांच्या असतात. सर्वच प्रकारच्या कापसांचे शेतकरी तेव्हढ्या प्रमाणात आत्मह्त्त्या करीत नाहीत. किती भूमिहीन मजूर आत्मह्त्त्या करतात?

अपेक्षित ?

आत्मह्त्त्या अपेक्षितच आहेत.

म्हणजे ?

अपेक्षा

लाखात अकरा भारतीय आत्महत्त्या करतातच.
एन्डेमिक डिप्रेशनमध्ये आत्महत्त्या करण्यासाठी कारण लागत नाही.

वेगळे

विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्राबरोबर राहिले नाहीत तर महाराष्ट्राला काय तोटा होईल? तात्कालिक म्हणावे तर वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होईल. आणखी काय?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

गरज

शेतमाल, खनिजे, पुढे कार्बन क्रेडिटचे खूळ वाढले तर जंगलांवर मिळणारे उत्पन्न
उर्वरित महाराष्ट्र पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी आहे की नाही ते मला माहिती नाही.

उलट

आता उलट प्रश्न.

वेगळे झाल्याने त्यांचा काय तोटा?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

आपण आणि ते

वैद्यकीय शिक्षणाचे मला माहिती आहे. 'आपल्या' महाविद्यालयांमध्ये ७०*०.८५=६०% जागांवर 'त्यांच्या' मुलांना बंदी आहेच. ती १००*०.८५=८५% जागांवर् होईल. उर्वरित १५% जागा संपूर्ण भारतासाठी असतात. इतर उच्च शिक्षणाचेही असेच असेल. राज्याचे डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्र नसल्यामुळे या राज्यात सरकारी नोकरी मिळणार नाही ना? तेथील डॉक्टरांना गडचिरोलीत नोकरी 'करावी' लागेल का?
नोकर्‍यांमध्येसुद्धा भूमिपुत्रांना आरक्षण देण्याची सक्ती, काही सवलतींच्या बदल्यात, खासगी उद्योगांवरही राज्य सरकार करू शकते का?

 
^ वर