संकल्पनांच्या स्पष्टीकरणाबाबत मदत हवी आहे.

एका अभ्यासाच्या संदर्भात खालील शब्द व संकल्पनांची व्याख्या, प्रतिशब्द (इंग्रजी व इतर मराठी), किंवा थोडक्यात स्पष्टीकरण अशा स्वरुपात माहिती हवी आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी.

नितिशास्र
कार्यसत्र, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद
संप्रेषण
संख्यात्मक व गुणात्मक आधारसामग्री (संशोधनाच्या संदर्भात)
संज्ञापन तंत्रज्ञान
मानवी अभिवृध्दी

Comments

??

तुम्हाला नक्की काय हवे आहे ते कळले नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

संकल्पना कोष

आपण मांडलेली कल्पना ही संकल्पना कोष ची आहे. यात शब्दाची व्युत्पत्ती ते व्यावहारिक अर्थ त्याच्या विविध छटा. जेव्हा एखादी गोष्ट व्याखे मधे बंदिस्त करता येत नाही त्यावेळी विस्ताराने सांगावी लागते.
व्याखेमुळे एखादी संकल्पना बंदिस्त होते. तेव्हा त्याची व्याप्ती वाढवण्यासाठि संकल्पना कोषाची निर्मिती झाली आहे.
प्रकाश घाटपांडे

हे हवे

नितीशास्र म्हणजे काय?

कार्यसत्र, चर्चासत्र, परिषद, परिसंवाद हे कोणत्या इंग्रजी शब्दांना पर्याय म्हणून मराठी वापरले जातात? त्यांच्यातला फरक काय?

संप्रेषण म्हणजे काय?

संज्ञापन म्हणजे काय?

अभिवृद्धी या शब्दाचा अर्थ काय?

माझे अंदाज

कार्यसत्रः वर्कशॉप
चर्चासत्रः सेमिनार
परिषद: कॉन्फरन्स
परिसंवाद: डिबेट ?
संप्रेषणः याचा अर्थ ट्रान्समिशन असावा पण तो कॉम्प्रेशन् (दाबणे) या अर्थी वापरलेला पाहिला आहे (संप्रेषित नैसर्गिक वायू- कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस- सी एन जी)

संज्ञापनः माहिती नाही
अभिवृद्धी: डेव्हलपमेंट असावे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

परिसंवाद = सिंपोसियम (?)

परिसंवाद = सिंपोसियम
असा माझा अंदाज ठोकून देतो :-)

"संप्रेषण"

"संप्रेषण" = कम्युनिकेशन : पहा :
http://www.shabdkosh.com/s?e=communication&t=

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रूढ मराठी अर्थ

या शब्दांचे मराठीत रूढ असलेले अर्थ :
नीतिशास्त्र=एथिक्स.
कार्यसत्र=कार्यशाळा=वर्कशॉप.
चर्चासत्र=सेमिनार.
परिषद=कॉन्फ़रन्स.
बैठक=मीटिंग.
संमेलन=गॅदरिंग.
परिसंवाद=सिम्पोसियम.
संप्रेषण=कम्युनिकेशन(उदा. विकास संप्रेषण--डेव्हलपमेन्ट ऑफ् कम्युनिकेशन) ; (२)रेकॉर्डिंग/पोस्टिंग (बँकेमध्ये नोंदल्या जाणार्‍या रकमा आणि आदेश); (३)सुधार(रेफरमेशन) उदा.बालसंप्रेषण गृह, रेफरमेटरी स्कूल.
संख्यात्मक व गुणात्मक आधारसामग्री (संशोधनाच्या संदर्भात)=क्वान्टिटिटिव्ह आणि क्वालिटिटिव्ह रिसर्च डेटा.
संज्ञापन तंत्रज्ञान=सिस्टिम ऑफ़ नॉमिनिक्लेचर=कम्युनिकेशन सायन्स=सिस्टिमॅटिक नेमिंग
मानवी संज्ञापन सिद्धान्त=कम्युनिकेशन थिअरी
मानवी अभिवृद्धी=ह्यूमन ग्रोथ.
--वाचक्नवी

आभारी....!

शब्दांचे अर्थ आणि माहितीपूर्ण प्रतिसादाच्या बाबतीत तुम्हाला तोड नाही.
आपले मनःपूर्वक आभार...!

-दिलीप बिरुटे
[वाचक्नवीचा फॅन ]

 
^ वर