राष्ट्रध्वजावरचे हिंदू मंदिराचे प्रतिक!

राष्ट्रध्वजावरचे हिंदू मंदिराचे प्रतिक!

हिंदू मंदिरावरच्या कळसावर आपण ध्वज आपण नेहमीच पाहात असतो. तो जर नसेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल.
कंबोडिया ह्या देशाच्या ध्वजावर मध्यभागी मंदिराचे प्रतिक आहे. १९९३ सालापासून हा राष्ट्रध्वज अस्तित्वात आला आहे.
(http://en.wikipedia.org/wiki/Flag_of_Cambodia)

नीळा-लाल-नीळा अश्या आडव्या पट्टया ह्या ध्वजावर आहे. लाल पट्टीचा आकार हा नीळ्या पट्टीपेक्षा दूपट्ट आहे. लाल पट्टीवर मध्यभागी पांढर्‍या रंगात आंग्कोर वाट (http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%...) ह्या हिंदू मंदिराचे प्रतिक रेखाटलेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून ज्याप्रकारे हे मंदिर दिसते त्या प्रकाराची प्रतिमा ध्वजावर रेखाटलेली आहे.
१८६३ सालापासून ह्या मंदिराचे प्रतिक कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर दिमाखात विराजमान आहे.

आज ही कंबोडियामध्ये हे मंदिर सुस्थितीत आहे. हिंदू व बौद्ध स्थापत्यशास्त्रांचा उपयोग करून बांधलेले आंग्कोर वाट हे भगवान विष्णूंचे जगातील सर्वात मोठे मंदिर समजले जाते. या मंदिराची निर्मिती भारतीय खगोलशास्त्राचे नियम वापरून करण्यात आली आहे असेही सांगितले जाते.

मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.

आंग्कोर वाट हे मंदिर आता कंबोडियातला मुख्य 'टुरिस्ट स्पॉट' आहे.

Comments

संदर्भ हवाय ...

मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.

कृपया या माहितीचा संदर्भ द्याल का ?

संदर्भ

'मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.' ह्या माहितीचा संदर्भ मी विकीवरून घेतला आहे.

थोडी अधिक माहिती :

आंग्कोर वाटची स्थापना सूर्यवर्मन दुसरा (राज्यकाळ: इ.स. १११३- इ.स.११४५) याच्या काळात सुरू झाली. सूर्यवर्मनचा राज्यकाळ तसा धामधुमीचा गेला, तरीही सुमारे ३७ वर्षे हे बांधकाम अखंडित चालले. राजा सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबून राहिले. पुढे जयवर्मन सातवा (राज्यकाळ: इ.स. ११८१- इ.स.१२१९) याच्या काळात बांधकाम पुन्हा रुजू करण्यात आले. परंतु या वेळेपर्यंत कंबोडियात थेरवाद बौद्धधर्माचा प्रसार झाल्याने बांधकामात बौद्ध स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आढळतो.

डिस्क्लेमरः काही विकी लेखक हौशी असतात

'मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.' ह्या माहितीचा संदर्भ मी विकीवरून घेतला आहे.

काही विकी लेखक आणि त्यातही मराठी विकीवरील लेखक हे हौशी लेखक ;-) असतात. त्यांच्या लेखांचे संदर्भ देताना विकीबाहेर जाऊन थोडी अधिक शहानिशा करणे आवश्यक आहे.

याचबरोबर, कोणतेही लेख लिहिताना विकीखेरीज अधिक संदर्भ देणे योग्य ठरेल.

संदर्भ

मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.

संदर्भ बरेच मिळू शकतात... येथे एक देत आहे: The Buddhist world of Southeast Asia, By Donald K. Swearer

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अंग्कोर वट

मी अंग्कोर वट येथे गेलो आहे. हे एक न चुकविण्यासारखे स्थळ आहे.

साधारण हजार वर्षापूर्वी कंबोडियातील राजघराण्याने हिंदु धर्म स्वीकारला. त्यानंतर राजाने पहिल्यांदा अंगकोर् वट येथे ब्रह्मा-विष्णु-महेशाचे मंदीर उभारले. त्यानंतरच्या पिढ्यांनी आसपास जवळपास हजार (निदान शेकड्यात) मंदीरे उभारली. ही अतीशय विशालकाय मंदीरे आहेत. एककेका ठिकाणी गाव वसु शकेल एवढी त्याची जागा आहे. (बघताना खूप पायपीट होते.) हे इतके प्रसिद्ध ठिकाण आहे (भारतात नाही) की कंबोडियात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. अत्यंत गरिबी व युद्धामुळे झालेली हानी यामुळे देश गांजलेला आहे. अंग्कोर् सारखे ठिकाण त्यांच्या अर्थव्व्यवस्थेचा मोठा भाग असणे स्वाभाविक आहे. झेंड्यावर मंदीर असणे हे स्वाभाविक आहे.

दक्षिणपूर्व देशात हिंदु धर्माचा प्रचार व र्‍हास झाला. दोन्ही प्रकार बहुतेक करुन कुठल्याही राजकीय दबावाखाली झाले नसावेत. त्यानंतरच्या पिढ्यांनी अंग्कोर्ची तशी उपेक्षा केली. कित्येक मंदीरावर मोठमोठी झाडे उगवली. काही मंदीरात हिंदु मूर्तींच्या ऍवजी बुद्ध मूर्त्री आल्या. पण त्या सगळीच कडे आल्या असे नाही. माझ्या आठवणीत अंगकोर् वट (मुख्य मंदीर) येथे अजुन् ती मुर्ती तशीच आहे. (माझा जवळ त्याचे प्रकाशचित्र आहे पण मला इथे कसे टाकायचे ते कळले नाही.)

प्रमोद

धन्यवाद

प्रत्यक्ष अंग्कोर वट मंदिराला भेट दिल्याची माहित अधिक रोचक वाटते. आपला अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.

 
^ वर