हिटलर

दुसऱ्या महायुद्धाची आपत्ति जगावर लोटनारा हिटलर , याचे व्यक्तिमत्व होते तरी कसे ? या विषयी आजवर खुप लिहिले गेले व पुढेही लिहिले जाईल. काही ना तो देशभक्त वाटतो तर काहीना माथेफिरू . युद्धानंतर जन्मलेल्या नव्या पिढीला मात्र हिटलर प्रिय नाही. जर्मनीवर संकटे आणणारा व एक जर्मन पिढी नष्ट करणारा मनुष्य म्हणुनच जर्मन तरुण त्याच्याकडे पाहतात. ज्याला नवनाझीवाद म्हणतात अशी काही माणसे जर्मनीत आहेत, पण ती फारच अल्पसंख्य आहेत. १९३० पर्यंत हिटलर जर्मनी मध्ये फारसा कुणाला माहित नव्हता त्याचा उदय व त्याला मिळालेली सत्ता ही उदारमतवादी जर्मनीच्या इतिहासातील एक अपघात आहे.
हिटलर चे विचार फार एकांगी व टोकाला जाणारे होते . व आपल्या कृतीच्या परिणामांचा विचार तो करीत नसे. असे एकारालेल्या विचारांचे व टोकाला जाण्याची मनःस्तिथी असलेले लोक सर्व देशात सर्वकाली आढ़लतात . पण त्यांच्या हातात सत्ता येत नसते. हिटलर च्या हाती सत्ता पराकोटीची एकवटली आणि त्याने सर्व जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाइत ढकलले . चर्चिल सारखे नेते नंतर ही महनत होते की, "दुसरे महायुद्ध कोणत्याही परिस्थितीत टालायला हवे होते." जर्मनीतील सत्तर टक्के पुरुष - प्रजा या महायुद्धात नष्ट झाली. इतके बलिदान देउनही हिटलर ला युरोपच्या नकाशात थोडाही बदल करता आला नाही. म्हणुनच जगाच्या इतिहासात हिटलर एक क्रूरकर्मा म्हणुनच सदैव नोंदलेला राहील.

Comments

हिटलर

असे नाहि ,नाझि भस्मासुराचा उदयास्त ले. वि. ग. कानितकर ..वाचावे..

 
^ वर