एके-४७, पुस्तक व चांदणी
AK-47, पुस्तक व चांदणी!
काय ? AK-47 वाचल्यावर थोडे घाबरलात ना? नाही!
अरे हो! आता तर लहान लहान मुलांच्या खेळात सुद्धा AK-47 असते.
AK-47, पुस्तक व चांदणी! हे काय काँबिनेशन? ही ३ मंडळी एकत्रीत काय शोध लावणार आहे?
एखाद्या देशाच्या ध्वजावर ही चिन्हे आहे असे म्हटल्यास तुम्ही गोंधळात पडणार.
पण हे खरे आहे. मोझांबिक ह्या देशाच्या ध्वजावर ही तींन्ही चिन्हे एकत्रित पाहायला मिळतात.
मोझांबिक हा आग्नेय आफ्रिकेतील एक देश आहे. मोझांबिकचा शोध वास्को दा गामाने १४९८ साली लावला व १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी तेथे आपली वसाहत स्थापन केली.
१९७५ साली पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७७ ते १९९२ दरम्यान मोझांबिकमध्ये अंतर्गत युद्ध चालू होते. ह्या युद्धात सुमारे ९ लाख लोक मृत्यूमुखी पडले.
मोझांबिक जगातील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. सरासरी आयुष्य, बालमृत्यूचे प्रमाण इत्यादी बाबींमध्ये मोझांबिक हा जगातील सर्वात मागासलेला देश आहे
ह्या देशाच्या ध्वजावर AK-47 (http://en.wikipedia.org/wiki/AK-47) ही आधुनिक बंदुक रेखाटलेली आहे.
हा जगातला पहिला ध्वज आहे की ज्याच्यावर असे आधुनिक शस्त्र रेखाटलेले आहे.
ही बंदूक संरक्षणाचे प्रतिक आहे. उघडलेले पुस्तक हे शिक्षणाचे महत्व दर्शवते.
ध्वजावरची चांदणी ही पिवळ्या रंगाची ५ कोन असलेली चांदणी आहे. ही चांदणी मार्कसवादाचे आणि जागतिकतेच प्रतिक म्हणून रेखाटलेली आहे.
ह्याच चांदणीवर बंदूक आणि पुस्तक रेखाटलेले आहेत.
(http://en.wikipedia.org/wiki/Flag_of_Mozambique)
१ मे १९८३ पासुन हा ध्वज वापरात आहे.
२००५ साली नविन ध्वजासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. ११९ स्पर्धकांनी त्यात भाग घेतला होता त्यातून एक ध्वज निवडण्यात आला होता. पण तरी सुद्धा आज पर्यंत जूनाच ध्वज वापरात आहे. देशाच्या नागरिकांनी ध्वजावर असलेल्या एके-४७ चे प्रतिक काढून टाकण्यास विरोध केला.
ही बंदूक देशाचे मानचिन्ह आहे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतिक आहे त्यामुळे ते चिन्ह ध्वजावरून काढण्यास विरूद्ध पार्टीच्या लोकांनी त्याला विरोध केला होता.
३१ डिसेंबर २००९ च्या सकाळ पेपरमध्ये भारत-आफ्रिका नवे मैत्रीपर्व ह्या मथळ्याखाली ह्या देशाचे नाव वाचण्यात आले होते. (http://www.saptahiksakal.com/sapsakal/12312009/NT00057316.htm)
Comments
चांगली माहीती
मोझँबिक बद्दल कधी वाचले नसल्याने ही थोडक्यात पण चांगली माहीती एकदम आवडली. धन्यवाद!
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
छान महिती
एके ४७ ही जगातील बहुदा सर्वाधिक लोकप्रिय बंदुक असावी. बर्फाच्छादित शिखरे असोत वा रणरणती वाळवंटे कधीही जाम न होता चोख काम बजावणारी रायफल म्हणजे एके ४७. इतकी प्रसिद्ध असुनही ह्या बंदुकीचे कारखाने सध्या बंद पडायच्या मार्गावर आहेत. रशियन बनावटीच्या ह्या बंदुकिची निर्मिती प्रक्रियेत कसलीही गुप्तता न पाळल्याने जवळपास प्रत्येक देशात बनावट एक ४७ बनवल्या जातात आणि त्यामुळे प्रचंड मागणी आणि खप भरपूर असला तरी मूळ कंपनी डबघाईला आली आहे.
फावडे
एके-४७, पुस्तक व चांदणी आणी हो एक फावडे पण आहे!
माहीती आवडली.
बरोबर
बरोबर फावडे पण आहे.
चांगली माहीती
चांगली माहीती एकदम आवडली.
या देशाबद्दल पहिल्यांदाच वाचले . तेवढीच माहितीत भर पडली .
ही बंदूक संरक्षणाचे प्रतिक आहे. त्याना काय बंदुकच सापडावी
रोचक माहिती
वाचून मजा वाटली.
काही झेंड्यांवर तलवारी, भाले वगैरे असतात. कालांतराने त्यात विचारांमधून बंदूक आली म्हणावे लागेल.
बंदूक
ह्या बंदूकीमूळे मला वाटले होते की हा देश गुन्हेगारीत सर्वात वरच्या नंबर वर असेल असे वाटले होते. पण तशी माहिती वाचण्यात आली नाही.
माहिती आवडली
झेंड्यांवर कुर्हाडी, कोयते, तलवारी पाहिल्या होत्या, त्यात आणखी एक भरती. फक्त कुर्हाडी, कोयते आणि तलवारी यंत्रे नसल्याने अद्यापही पूर्वापार चालत असलेल्या आकारांत आणि धाटणीत उपलब्ध असतात आणि वापरल्या जातात. एके-४७ चे मॉडेल मात्र कधीतरी कालबाह्य होईल आणि वापरात येणे बंद होईल. त्यानंतरही या देशाच्या झेंड्यावर ते राहिल का हा प्रश्न मनात आला.
प्रश्न
'त्यानंतरही या देशाच्या झेंड्यावर ते राहिल का हा प्रश्न मनात आला'
कदाचित एके-४७ ची जागा त्यावेळच्या अत्याधूनिक शस्त्राने घेतली जाईल असे वाटते.
चिह्नं
लेख वाचून मजा वाटली.
कुर्हाडी, कोयते आणि तलवारी ही यंत्रेच आहेत. ती बलाचं केंद्रिकरण करून विशिष्ट कार्ये सुकर करतात. आणि इतर पुरातन यंत्रांप्रमाणे तीही कालबाह्य होत चालली आहेत. वस्तू कालबाह्य झाली तरी तिची प्रतीकात्मक किंमत वर्षानुवर्षे टिकून राहाते. आपल्या भाषेतच अनेक अवशेष दिमाखाने टिकून राहिलेले दिसतात.
पण लेखाची खरी गंमत आहे ती या विशिष्ट प्रतीकाच्या दुधारी अर्थात. आपण एके ४७ चा दुवा दहशतवाद्यांशी जोडतो...
राजेश
अद्यापतरी नाही
मान्य
अमान्य. माझ्या स्वतःच्या घरी आणि अनेकांच्या घरीही असावेत - कुर्हाड, कोयते, कुदळ, फावडी पूर्वी होती त्याच स्वरुपात आहेत. फारतर लाकडी दांडे जाऊन प्लास्टीकचे दांडे आले आहेत इतकेच. तलवार घरात नसली (खरे म्हणजे त्याही आहेत फक्त माझ्या स्वतःच्या घरी नाहीत. कुटुंबात आहेत.) तरी तिचेही स्वरुप बदललेले नाही असे म्हणता येईल.
ही यंत्रेही कधी ना कधी कालबाह्य होतीलच परंतु गेल्या दोन-चारशे वर्षांत त्यांच्या धाटणीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. एमएस-१६५० चे मॉडेल रद्द होऊन सध्या एसएस-२०१० चे मॉडेल चलतीत आहे असे दिसत नाही.
कालबाह्य...
कुर्हाड, कोयते, कुदळ, फावडी यांचे स्वरूप बदलेल असा दावा नाही. फक्त त्यांची जागा नवीन तंत्रावर आधारलेली यंत्रे घेतील - घेत आहेत. उदा: कुर्हाड जाऊन यांत्रिक करवत वापरून झाडे तोडली जातात... कोयत्यांऐवजी कापणीची यंत्रे, कुदळीऐवजी जॅक हॅमर इत्यादी. आपण तलवारीबाबत जे म्हटलं आहे तेच लागू आहे. तलवारीचं स्वरूप बदललेले नाही. किंबहुना आता ते मुळीच बदलणार नाही - कारण ती वापरलीच जात नाही. स्वरूप न बदलणे हे उत्कृष्ट डिझाईनचे किंवा पूर्ण कालबाह्यतेचे लक्षण मानता येईल.
नाही म्हणता कुदळ, फावडी घरगुती बागकामासाठी शिल्लक राहातील.