वेद.. केव्हा व कोठे ?

वेद... केव्हा व कोठे रचले ?

वेद रचनेचा (लेखनाचा नव्हे) काळ व ते कोठे रचले गेले असावेत याबद्दलचा एक आढावा.
या दोनोंबद्दल अनेक मतभेद आहेत. मतभेदाची कारणे अनेक आहेत. त्यातील काही पूर्वग्रहांमुळे मांडली गेली. काही हाताशी असलेल्या अपुर्‍या माहितीमुळे. ग्रीक संस्कृतीच्या आधी पूर्वेकडील "गुलाम" देशातही एखादी उच्च संस्कृती नांदत असावी हेच बर्‍याच "साहेबांना" पटत नव्हते. त्यामुळे एखादा ग्रंथ वा तत्वज्ञान इ.स.पूर्व ५००च्या मागचे असू शकेल ही कल्पनाच नाकारली गेली. आपल्याकडील ग्रंथकारांची लेखनकाल लिहून ठेवण्याबद्दलची उदासीनताही एक कारण. सुरवातीला भाषाशास्त्राशिवाय तुलना करावयाला दुसरे साधनही हातात नव्हते .नंतर खगोलशास्त्र व पूरातत्वशास्त्र मदतीला आले. कार्बन डेटिन्ग व जेनेटिक्स यांचा वापरही आता जास्त प्रकाश पाडू शकतो. उदाहरण म्हणून सरस्वती नदी घ्या. वेदात खळाळत वाहणार्‍या, काठांना ओढून नेणार्‍या, समुद्राला मिळणार्‍या सरस्वतीचे वर्णन आहे. आज हिन्दुस्थानात तशी नदी आढळत नाही. तेव्हा एकोणिसाव्या शतकात ही वा अशी एखादी नदी हिन्दुस्थानाबाहेरची असावी असा तर्क करून इराण-अफगाणीस्थानातील नदी शोधून काढली व भाषाशास्त्राचा आधार मिळतो म्हणून तीच सरस्वती असे सांगण्यात आले. मग भले ती समुद्राला न का मिळेना ! हे झाले अपुर्‍या माहीतीमुळे. आज हिमालयात उगम पावून, हरियाना, पंजाब, राजस्थानातून वहात जात गुजराथमध्ये समुद्राला मिळणार्‍या महानदाचे उपग्रहामधून काढलेले चित्रच मिळाल्यावर पहिला अंदाज चुकला असे कबूल करावयास काय हरकत आहे ? उत्खननात त्या काळच्या नदीकाठची शब्दश : शेकडो गावे मिळाली आहेत. कार्बन डेटिंगने त्यांचा काळही इ.स.पूर्व ३००० ते ६००० ठरवला गेला आहे. असो. हे सांगावयाचे कारण सुरवातीच्या विद्वानांची , मग ते मॅक्समुल्लर असोत वा कोसंबी, मते नवीन, शास्त्राने सिद्ध होणार्‍या कसोट्यांवर तपासून घेतली पाहिजेत.
केव्हा व कोठे ?
वेद काही एकावेळी रचलेले नाहीत ना एके ठिकाणी. त्यांचा रचनाकाळ शब्दश: शेकडोच नव्हे तर हजारो वर्षांचा असावा. तीच गोष्ट स्थळाची, त्यातील अंतरही शेकडो किलोमीटरचे आहे. वेदांमधील उल्लेखांवरून काही नित्कर्ष काढता येतात का बघू. ज्या ऋचा संपूर्ण आहेत त्या नंतरच्या व ज्या अर्धवट, लहान सोप्या आहेत त्या आधीच्या, असे म्हणावयास हरकत नाही. सुरवातीच्या काही ऋचांमध्ये रात्र मोठी आहे, धृव डोक्यावर आहे , असे जे वर्णन आढळते, ते वर्णन हिन्दुस्थानातील नसणार. पण अशी परिस्थिती उत्तर युरोपमधील आर्क्टिक सर्कलच्या भागात असते. त्यामुळे अशा ऋचा त्या प्रदेशात रहाणार्‍या किंवा एके काळी त्या प्रदेशात रहाणार्‍या पण तो प्रदेश सोडून दुसरीकडे स्थलांतरीत केलेल्या लोकांनी आठवणींनी लिहलेल्या असाव्यात. स्थलांतर करण्याची वेळ उत्तर युरोपमधील लोकांवर इ.स.पूर्व १०००० च्या सुमारास आली होती. तेथील लोक हळुहळु दक्षिणेकडे सरकू लागले व दक्षिण युरोप व मध्य एशिआ या भागात वस्ती करून राहिले.इथे एक गोष्ट लक्षात घ्यावयाला पाहिजे की उत्तर धृवापाशील लोकांकडे घोडे नसणार. तेथून ते इराण ,अफगाणिस्थान,भारत असे आले असावेत.हा काळ इ.स.पूर्व ६०००-७००० धरावयास हरकत नाही. वेदाची काही रचना या काळातील असणार. भारतात आलेले लोक काश्मिर, हिमालय, पंजाब, सिन्ध या भागात उतरले.वेदातील मोठा हिस्सा या काळातील असावा (इ.स.पूर्व ६००० ते ४०००). पंच नदांचे, विशेषत: सरस्वतीचे वर्णन या काळातलेच असले पाहिजे. ती याच काळात महानदी होती. सरस्वती बरोबर वर्णन केलेल्या इतर नद्या सतलज, बिआस या प्रदेशातील आहेत, इराणातील नाहीत. श्री.दीक्षित यांनी खगोलशास्त्रावरून शोधलेला पुरावा याला पृष्टी देतो. इ.स.पूर्व ४००० ते १९०० पर्य़ंत सरस्वती आक्रसत गेली व वेदात त्याचे परिवर्तन झालेले दिसते. आता गंगा ही जास्त पूजनीय झाली; सरस्वती मागे पडू लागली. इ.स.पूर्व १५०० ही वेदांच्या रचनेची अलिकडील मर्यादा धरावयास पाहिजे कारण नंतर ते मौखिक रीतीने बंदिस्त करण्यात आले.

तेव्हा इ.स.पूर्व ६००० ते १५०० हा काळ व आर्क्टिक सर्कल ते सरस्वती-गंगा यामधील प्रदेश एवढ्या विस्तीर्ण पटावर वेद रचले गेले असे म्हणावयास पाहिजे. व त्यातील फार मोठा भाग इ.स.पूर्व ६००० ते १५०० मध्ये भारतात रचला गेला.

एखाद्या ग्रंथात कशाचा अनुल्लेख असेल तर त्याचा विचार काळजीपूर्वक केला पाहिजे. जर उल्लेखनीय गोष्ट यावयासच पाहिजे परंतु ती आली नाही तर ते महत्वाचे. तसे नसेल तर अनुल्लेखाने काही सिद्ध होत नाही. वर उदाहरण दिले की उत्तर धृवाजवळच्या भागात घोडे नसणार, तरीही तेथील लोकांच्या पुढच्या लिखाणात अश्वांचा उल्लेख येतो. तसेच भारतातील हरप्पापूर्व संस्कृतीच्या लोकांच्या वीटांच्या घरांचा उल्लेख नसेल तर त्याने काय सिद्ध होणार ? वैदीक संस्कृतीच्या लोकांना वीटांची माहिती होती व ते त्यांचा उपयोग यज्ञवेदी करता करत होते म्हटल्यावर जर "येथे वीटांच्या घरांचा उल्लेख आवष्यक आहे पण तो दिसत नाही" अशा जागा मिळेपर्यंत हरप्पापूर्व संस्कृतीचे वर्णन नाही म्हणून वेद हिंदुस्थानाबाहेर लिहले गेले हे म्हणणे योग्य नव्हे.

आता वेद लिहणार्‍या लोकांबद्दल थोडा विचार करू. या काळात लोक युरोपपासून, पश्चिमेकडून पूर्वेकडे भारतात येत होते व चिनमधून, पूर्वेकडून युरोपात पश्चिमेकडे जात होते. मग भारतातले लोक मध्य आशियाकडे जात असणारच. अहो, कोकणातील रामा मुंबईत आला तर त्याचा पोरगा मुंबईतून कोकणात जातोच की नाही ? अगदी तसेच भारतातले लोक (इ.स.पूर्व ६००० ते इ.स.पूर्व १०००) परत पश्चिमेकडे जाताना आपली भाषाही घेऊन गेले. स्थानिक बदलामुळे सरस्वतीवरून इराणमधील हेलमंड नदीचे नाव हर्थ्वती झाले. जास्त पुरातन अशी जी संस्कृत तीच इतरांना शब्द पुरवणार. जास्त माहीती करिता राजारामशास्त्री भागवतांची पुस्तके बघा.युरोपीयन पंडितांनी देखील मूळ भाषेला "इन्डो-युरोपियन " म्हटले. इन्डो प्रथम, संस्कृत पहिल्यांदी. हे सांगावयाचे कारण काही शब्दात साम्य दिसले म्हणजे वेद भारताबाहेरच लिहले गेले असे म्हणावयाचे कारण नाही.
रामायण व होमर(अमरचा अपभ्रंश) चे काव्य यातील साम्य बघा.रामायण - महाभारताची कथा पूरातन आहे.
राम-लक्ष्मण...... मेनिलेस-आगामेमनन--- भाऊ-भाऊ.
रावणाने-अतिथीने सीता पळवली ----पॅरिसने- पाहुण्याने हेलन पळवली.
म्हातारा जांबवान हा सल्लागार--- म्हातारा नेस्टर हा सल्लागार
मारुती हा परमवीर युद्ध जिंकण्यास मदत करतो--- वडील देव-आई वानर अर्किलिस...युद्धातील श्रेष्ट वीर-- आई देवता..वडील मानव
राम-लक्ष्मण-सीता यांचे शुद्ध आचरण मात्र ग्रीकांमध्ये धूळीस मिळाले.
महाभारताचा प्रभाव
धृतराष्ट्राला १०० मुलगे..... हेक्टरचा बाप प्रायम यालाही शंभरेक मुले.
दुर्योधन कुलक्षय करणार हे भाकित .... पॅरिसबाबतही तसेच
कृष्णासारखा कपटपटू ... लाकडी घोडा करणारा युलिसिस.
बोलावणे आल्यावर सर्व राजे लढावयास जमले ...अगदी तसेच.
या साम्यावरून होमरच्या काव्यावरून रामायण लिहले गेले म्हणणे अनुचित होईल. उलट आपल्या लोकांनी राम-कृष्णाच्या कथा पश्चिमेस नेल्या हे जास्त योग्य ठरेल. काही शतकांनी आपण त्या अतिपूर्वेस नेल्याच की नाही ?

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म!

वेद इ.स.पूर्व ५०० आधी रचले गेले असावेत याबाबत आता कोणाचाही गैरसमज दिसत नाही. नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे मिळणारी नवी माहिती यामुळे कालात सुधारणा होत असतेच. परंतु आपला मुद्दा मांडण्यासाठी फुटकळ हिंदुत्त्ववादी विचारसरणी लोकांच्या माथी मारण्याची गरज कळत नाही.

सरस्वती नद्या जगात अनेक असतील. तसेही, समाज जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरीत होतो तेव्हा आपल्या नवीन वस्तीला जुनी नावे देतो. अयुथ्या हे शहर येथे संदर्भ म्हणून देता येईल. किंवा गावा-गावात आढळणारा महात्मा गांधी मार्ग. अमेरिकेतील एम. एल. के. मार्ग याचा अर्थ राम थायलंडमध्ये जन्माला आला असा होत नाही. त्याचप्रमाणे इराण, अफगाणिस्तान किंवा अझरबैझानमध्ये सरस्वती नद्या आढळल्या म्हणून त्या नैमिष्यारण्यातून वाहणार्‍या सरस्वती नद्या होत नाहीत किंवा त्यांच्या सभोवती नैमिषारण्य होते असे होत नाही किंवा त्यांच्या काठावरून सारस्वतांचे स्थलांतर झाले असेही होत नाही.

जर, वेदांची निर्मिती एका वेळेस न होता एका मोठ्या कालखंडात झाली असल्यास, दोन वेगळ्या सरस्वती नदींचा उल्लेख असणे अशक्य वाटत नाही. तसे असेल तर अफगाणिस्तानातील सरस्वती (हेलमंड) नदीही योग्य आणि सप्तसिंधुंतील सरस्वतीही (घग्गर) योग्य. इंग्लंड आणि न्यू-इंग्लंड त्यातील न्यू नसता तरी एकाच नावाचे दोन वेगळे प्रदेश म्हणून अस्तित्त्वात असतेच ना. असो.

महाभारतात सरस्वती नदीचा उल्लेख येतो. रामायणात तो येत नाही असे वाटते. (असे वाटते असे म्हणण्याचे कारण माझ्या वाचनात आलेले नाही. परंतु माझे वाचन अपुरे असू शकेल. तेव्हा तज्ञांनी चूक सुधारावी.) रामायणातील कोसल देश, अयोध्या नगरी वगैरे गंगा, शरयु नदीच्या आसपासच्या भागात वसलेले प्रदेश सप्तसिंधुंना महत्त्व देत नाहीत. याउलट, महाभारतात कोसल, किष्किंधा, दंडकारण्य वगैरे प्रदेशांना महत्त्व नाही. असे का बरे? इतकी महत्त्वाची नदी जी ऋग्वेदातून महाभारतात वाहते आणि रामायणाला कोरडे ठेवते?

कोणत्याही ठिकाणाचे संदर्भ शोधताना सबळ माहिती, आजूबाजूचा भूगोल, इतिहास, परिस्थिती, समाज यासर्वांचा विचार करणे गरजेचे असते. असा सार्वत्रिक विचार न होताच येथे मुद्दे मांडलेले आढळतात.

लोक युरोपपासून, पश्चिमेकडून पूर्वेकडे भारतात येत होते व चिनमधून, पूर्वेकडून युरोपात पश्चिमेकडे जात होते. मग भारतातले लोक मध्य आशियाकडे जात असणारच.

ठीक. जात असावेतच. अनेक कारणांसाठी जात असावेत. जसे, व्यापार, विद्याधयन, सोयरीक वगैरे. सांस्कृतिक देवाणघेवाणी होत असाव्यातच. अरेबियन नाईट्सच्या कथाही भारतीय लोककथांवरून रचल्याचे सांगितले जाते. परंतु, अरेबियन नाईट्सचा काळ जातककथा, पंचतंत्र वगैरेंच्या नंतरचा आहे. अरेबियन नाईट्समध्ये हिंदुस्थानाचे संदर्भ आहेत. अशा अनेक निकषांवर हे तपासून पाहता येते.

युरोपीयन पंडितांनी देखील मूळ भाषेला "इन्डो-युरोपियन " म्हटले.

अरेच्चा! इथे तर भलतीच कॉन्स्पिरसी थिअरी दिसते. :-)

रामायण व होमर(अमरचा अपभ्रंश) चे काव्य यातील साम्य बघा.

काहीही काय? अमरचा अपभ्रंश? कोणी कधी कसा केला? संदर्भ द्यावेत.

रामायण - महाभारताची कथा पूरातन आहे.

इलियडच्या आधीचीच आहे याचे संदर्भ द्यावेत.

राम-लक्ष्मण...... मेनिलेस-आगामेमनन--- भाऊ-भाऊ.
रावणाने-अतिथीने सीता पळवली ----पॅरिसने- पाहुण्याने हेलन पळवली.
म्हातारा जांबवान हा सल्लागार--- म्हातारा नेस्टर हा सल्लागार
मारुती हा परमवीर युद्ध जिंकण्यास मदत करतो--- वडील देव-आई वानर अर्किलिस...युद्धातील श्रेष्ट वीर-- आई देवता..वडील मानव
राम-लक्ष्मण-सीता यांचे शुद्ध आचरण मात्र ग्रीकांमध्ये धूळीस मिळाले.

ग्रीकांशिवाय जगात कोणीच महाकाव्ये रचली नाहीत काय? की ग्रीक निघाले - उडी मारून भारतात पोहोचले आणि भारतीय निघाले, उडी मारून ग्रीसमध्ये पोहोचले? जगातील प्रत्येक पौराणिककथेत, परीकथेत, लोककथेत आणि महाकाव्यांत साम्य शोधता येते. त्यानुसार इलियड आणि रामायण, महाभारतात साम्य शोधणे सहज शक्य आहे. आपण दिलेली उदाहरणे अतिशय ढोबळ आहेत. उद्या शोलेची कथा लिहिण्यासाठी सलीम-जावेद रामायणाची प्रत घेऊन बसले होते कारण जय आणि विरू म्हणजे राम आणि लक्ष्मण आणि बसंती म्हणजे सीता आणि गब्बर म्हणजे रावण असे संबंध जोडता येतील. बाकी, अकिरा कुरोसावा कोण? तो ग्रीक नाही. अमेरिकन नाही आणि भारतीयही नाही त्याला भाव द्यायची गरजच नाही. आमच्या रामायणावरूनच सर्व आले.

बायको पळवण्याची गोष्ट महाभारतात भृगुऋषींचीही दिसते. त्यातही भृगु आश्रमात नसताना पुलोमान राक्षस अतिथी म्हणून येऊन त्यांच्या बायकोला पळवतो. इथे नेमके काय झाले? रामायणातील गोष्ट व्यासांनी भृगुंच्या नावे टाकली असे म्हणता येईल का? का भृगुंची कथा वाल्मिकींनी रामायणासाठी वापरली? मला वाटते, प्राचीन काळापासून जमीन, संपत्ती आणि बाई यांच्यावरूनच पुरुषांत झगडे झाले आहेत आणि तेच या सर्व गोष्टींत दिसते. अशाप्रकारची तुलनाच करायची झाली तर ओडीसीची तुलना अर्जुनाच्या वनवासाशीही करता येईल. इथून तिथून आपल्याला सोयिस्कर संबंध जोडले की झाले.

ग्रीकांनी राम-लक्ष्मण-सीतेचे शुद्ध आचरण धुळीस मिळवले खरेच पण तरीही, रामायणाला इतके महत्त्व दिल्याचे श्रेय होमरला व्यासांपेक्षा अधिक देणे जरूरी आहे. व्यासांनी तर नरोत्तम रामाला महाभारतात फारसा भावच दिलेला नाही. :-)

असो.

गिल्गमश नावाचा एक प्राचीन राजा होता. तो ही अर्ध मानव आणि अर्धा देव - ओह! म्हणजे हनुमानच.

अत्रहसिसमध्ये महापूराचे वर्णन आहे. - म्हणजे काय? मनुची गोष्ट ढापली हो त्यांनी.

तिबेटीयन गेसर आपल्या आईच्या गर्भातूनच तिच्याशी संवाद साधत असे - अभिमन्यूच तो. सपशेल चोरी.

उद्या ग्रीक म्हणायचे की प्रतापराव गुजरांनी आमच्या लिओनायडसचीच गोष्ट वाचली/ ऐकली होती म्हणून सहा सरदारांनिशी बहलोलवर चालून गेले.

उपक्रमावर यापेक्षा ठोस संदर्भ देणारे लेख येऊ द्यात. नाहीतर, वेडे प्रचार करणार्‍या हिंदुत्त्ववादी संकेतस्थळांत आणि उपक्रमात काही फरकच राहायचा नाही.

बंद कपाट्

आपल्या विचारांची कवाडे एखाद्या बंद कपाटासारखी बंद करून घेऊन एकच विचार करत राहिले तर अशा प्रकारचे लेख लेखणीतून उतरतात. शरदजी जरा मनाची दारे उघडा व पूर्वग्रहाविना विचार करा म्हणजे तुमच्या लेखातील विसंगति तुमच्याच लक्षात येईल.
प्रियालीताईंच्या विचाराशी पूर्ण सहमत
चन्द्रशेखर

पु ना ओक

>>होमर(अमरचा अपभ्रंश)
पु ना ओक हे शरद या टोपणनावाने लेखन करतात काय?
Glass हा शब्द गिलास या हिंदी शब्दाचा तर Technique हा शब्द तकनीक या शब्दाचा अपभ्रंश होऊन बनले आहेत. हा हा हा.

नितिन थत्ते

शेरे,सल्ला

काही शेरे, सल्ले
फुटकळ हिन्दुत्ववादी विचारसरणी लोकांच्या माथी मारण्याची गरज कळत नाही.
माझ्या लेखात कोठेही कोणत्याही धर्माचा उल्लेख दिसत नाही. मग हा हिन्दुत्ववाद कोठून शोधला ? खरे म्हणजे वेदांच्या काळात जगात कोणताच धर्म अस्तित्वात होता असे माझ्या वाचनात आलेले नाही. इ.स.पूर्व ३०००-४००० या काळात हल्ली आपण ज्याला धर्म म्हणतो त्या अर्थाने कोणते धर्म जगतात होते त्याची माहिती वाचावयास अवष्य आवडेल. अथ तो धर्मजिज्ञासा. असो. हिन्दुत्ववाद नावाची विचारसरणी जर कोणाला फुटकळ वाटत असेल तर ( आपल्या मते) ही विचारसरणी म्हणजे काय व ती फुटकळ कशी यावर अवष्य लिहाच. पूर्वी दर्शने एकमेकांवर टीका करतांना दुसर्‍याला पाखंडी म्हणत. असे म्हटल्याने दुसर्‍याचे मतखंडन झाले असे समजत. तसेच काहीसे इथे झालेले नाही ना ? व हो, असा लेख लिहताना सबळ माहिती, आजुबाजूचा इतिहास, भुगोल,परिस्थिती, समाज इत्यादी, इत्यादी सर्वांचा विचार करा. हा सर्व प्रबंध वाचावयाला मी एक आठवडा काढून ठेवतो.
होमरने आपले काव्य इ.स.पूर्व ८०० च्या सुमारास लिहले . महाभारत इ.स.पूर्व ५००च्या आधी लिखीत स्वरूपात होते. त्याच्या आधी भारत व त्याच्या आधी जय. तेव्हा ही कथा किमान इ.स.पूर्व १००० च्या आधी हे मानावयास हरकत नाही. राम कथा भारताच्या आधीची. तेव्हा रामायण -महाभारत ही होमरच्या आधीची एवढे धरून आता मी काय लिहले ते परत बघा.
या साम्यावरून होमरच्या काव्यावरून रामायण लिहले गेले म्हणणे अनुचित होईल. उलट आपल्या लोकांनी राम-कृष्णाच्या कथा पश्चिमेस नेल्या हे जास्त योग्य ठरेल. काही शतकांनी आपण त्या अतिपूर्वेस नेल्याच की नाही.
पाश्चिमात्य पूर्वी होमर हा आद्य कवी मानत व रामायण-महाभारत ही नंतरची समजत. तेवड्यापुरते वरील वाक्य बघावयास पाहिजे. साम्य नाही किंवा दुर्लक्षणीय आहे असे जर कोणला वाटत असेल तर तसे मत नोंदावयास काहीच हरकत नाही. व अतिशयोक्ती म्हणून शोलेचे उदाहरण ( जे आधी एकदा वाचल्याचे आठवते) देण्यासही ना नाही. वरील तीनही वाक्यांपैकी एक एक निराळे करूनही काही चूक आढळत असेल तर ती अवष्य निदर्शनास आणावी.
सरस्वती हे नदीचे नाव फक्त भारतात आढळते. भारतात ते अनेक ठिकाणच्या नद्या-नाल्यांना दिले आहे व तसा उल्लेख उपक्रमवरही आहे. आता भारताबाहेर हे नाव कोठे आढळले ते कळवावे व त्याचवेळी वेदात सरस्वतीबरोबर येणार्‍या पाच नद्यांच्या उल्लेखानुसार उरलेल्या चार नद्यांचीही नावे द्यावीत. स चा ह होतो, ह चा स कोठे झाला ते पहाणेही आवडेल. नच भारतातील सरस्वतीचे नाव हेलमंडला दिले हे मान्य करून वेद भारतातल्या सरस्वतीच्याकाठी रचले गेले हे मान्य करावे.
उपक्रमावर यापेक्षा ठोस संदर्भ देणारे लेख येऊ द्यात. नाहीतर, वेडे प्रचार करणार्‍या हिंदुत्त्ववादी संकेतस्थळांत आणि उपक्रमात काही फरकच राहायचा नाही.
उपक्रमपंतांना सल्ले देण्याबाबत बरीच चर्चा झाली आहे, नाही ? तरीही...
सल्ला देण्यावरून. श्री.चंद्रशेखरजी यांनी बंद कपाटातील विचारांना कपाटाची दारे उघडून बाहेर पडावयाचा सल्ला दिला आहे. विषय वैयक्तिक आहे. पण जर श्री.चंद्रशेखरजींसारखा ज्येष्ट सल्ला देतो तर त्यातून काही तरी फायदा होईलच. तर त्यांना नम्र विनंती की मी निरनिराळ्या विषयांवर पन्नासएक लेख लिहले आहेत त्यातील कोणत्या विचारांना बाहेरचे वारे लागावयाची गरज आहे ते कळवलेत तर उपकृत होईन. विनंती एवढीच की "शरद"च्या सुधारणेत उपक्रमच्या वाचकांना कुतूहल असावयाचे कारण नाही तेव्हा खरडवहीतच लिहा.
या लेखापुरते म्हणजे "विसंगती" कोणती आढळली ते मात्र इथेच लिहा.
श्री. नितिनजी, आपला मुद्दा एकदम मान्य.व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न करीन पण त्यावरून एक आठवले. मागे "लहान मुलांचा खेळ" म्हणून एक लेख होता. त्यासारखे आता आपण मोठ्या माणसांनी असाच खेळ करावयास काय हरकत आहे ? व्युत्पत्ती व इतरांची उदाहरणे न देता स्वत:च असे साम्य, उच्चार व अर्थ दोन्हीबाबतीत असणारे, लिहावयास सुरवात करा. नाही तरी उपक्रमवर बर्‍याच दिवसात काही हलकेफुलके आलेले नाहीच.
शरद

आपल्या सोयीचा इतिहास

हिन्दुत्ववाद नावाची विचारसरणी जर कोणाला फुटकळ वाटत असेल तर ( आपल्या मते) ही विचारसरणी म्हणजे काय व ती फुटकळ कशी यावर अवष्य लिहाच.

मी फुटकळ हिंदुत्ववादी विचारसरणी असे म्हटले आहे. पुन्हा वाचावे - धर्माचे नाव घेतलेले नाही. मराठीतील अनावश्यक इंग्रजी टाळावी. या वाक्याचा अर्थ इंग्रजी ही अनावश्यक भाषा आहे असा होत नाही तसेच फुटकळ हिंदुत्त्ववाद म्हणजे सरसकट हिंदुत्त्ववादाला फुटकळ म्हटले असा होत नाही. यावर फार लिहायची गरज नाही. वर नितिन थत्ते यांनी आपल्याला पु. ना. ओक म्हटलेले आहेच. त्यांच्याबद्दल अधिक वाचावे. जमल्यास सनातन. ऑर्गला भेट द्यावी. (हे ही मागे आपल्याला कोणीतरी सांगितले होते) आपल्या लेखात आणि त्यांच्यात फारसा फरक नाही हे कळून यावे. आपल्या मनुस्मृती या लेखावर झालेली टिकाही आपल्याला आठवत असेलच. आपल्या लेखात एका सदस्याने डाव्यांवर आपण विपर्यस्त टिका करता असे पुसट अक्षरांत लिहून त्याचे स्पष्टीकरण खरडवहीत दिले होते हे ही आठवत असेलच. असो.

हिंदु हा धर्म असण्यापेक्षा विचारसरणी आहे. तेव्हा मलाही धर्माविषयी काहीच म्हणायचे नाही. ज्याप्रकारे, आमच्यावरूनच सर्व संस्कृती अस्तित्वात आल्या हे ठसवून देण्याचा भारतात हिंदु समाजातील काही प्रभृतींकडून प्रयत्न चालतो त्या हिंदुत्त्ववादाला फुटकळ हिंदुत्त्ववाद असे म्हटले आहे.

असा लेख लिहताना सबळ माहिती, आजुबाजूचा इतिहास, भुगोल,परिस्थिती, समाज इत्यादी, इत्यादी सर्वांचा विचार करा. हा सर्व प्रबंध वाचावयाला मी एक आठवडा काढून ठेवतो.

चंद्रशेखर यांनी असेच लेखन केले आहे. असो. मला असे लिहिणे शक्य असेल तर अवश्य लिहिन. शक्य नसल्यास असे लेख मी टाकणार नाही/ टाकतही नाही. उपक्रमावर एक लेख लिहिण्यास मला दोन ते तीन महिने लागतात. उचलली लेखणी काढले लिहून असे होत नाही. माहिती गोळा करूनही अनेक लेखांत माझी माहिती अपुरी असल्याचे स्पष्टीकरण मी देते किंवा तसे कबूल करते. मनाला येईल तसे "होमर म्हणजे अमर" असे पतंग उडवत नाही. जेव्हा लेखक असे अपुर्‍या माहितीनिशी लेख टाकतो तेव्हा त्याला सांगावे लागते की यापेक्षा अधिक विचार करा. यावर लेखकाने वाचकांना - मग तुम्हीच लेख लिहा असे सांगणे हास्यास्पद आहे.


या साम्यावरून होमरच्या काव्यावरून रामायण लिहले गेले म्हणणे अनुचित होईल. उलट आपल्या लोकांनी राम-कृष्णाच्या कथा पश्चिमेस नेल्या हे जास्त योग्य ठरेल. काही शतकांनी आपण त्या अतिपूर्वेस नेल्याच की नाही.

माझ्या प्रतिसादात मी हे वाक्य उद्धृत केलेलेच नाही त्यामुळे या वाक्यावर आक्षेपही नाही. ते आपल्या प्रतिसादात येण्याचे कारणही कळले नाही. असो.

होमरने आपले काव्य इ.स.पूर्व ८०० च्या सुमारास लिहले . महाभारत इ.स.पूर्व ५००च्या आधी लिखीत स्वरूपात होते.

म्हणजे होमरच्या बाबतीत त्याच पाश्चात्य तज्ज्ञांचे मत ग्राह्य धरायचे पण तेच रामायण महाभारतावर आले की उलथून टाकायचे. असे का? होमरने इ.स.पूर्व १००० च्या आधी काव्य निर्मिती केली होती का नाही हे आपण अभ्यासून पाहिलेत का?

इ.स.पूर्व ५०० आधी महाभारत लिखित स्वरुपात होते ही आणखी एक थाप. कोणत्या लिपीत होते? कोणी लिहून काढले?

सरस्वती हे नदीचे नाव फक्त भारतात आढळते. भारतात ते अनेक ठिकाणच्या नद्या-नाल्यांना दिले आहे व तसा उल्लेख उपक्रमवरही आहे. आता भारताबाहेर हे नाव कोठे आढळले ते कळवावे व त्याचवेळी वेदात सरस्वतीबरोबर येणार्‍या पाच नद्यांच्या उल्लेखानुसार उरलेल्या चार नद्यांचीही नावे द्यावीत. स चा ह होतो, ह चा स कोठे झाला ते पहाणेही आवडेल. नच भारतातील सरस्वतीचे नाव हेलमंडला दिले हे मान्य करून वेद भारतातल्या सरस्वतीच्याकाठी रचले गेले हे मान्य करावे.

भारतातील सरस्वतीचे नाव हेलमंडला दिले हे स्पष्ट करण्याइतपत पुरावे आपणच गोळा करावेत कारण हेलमंडचे नाव सरस्वती होते आणि नंतर येथील नदीचे नाव सरस्वती पडले असे वाचून मला फरक पडत नाही. ते मला सुसंगत वाटते परंतु आपण जे सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत आहात ते कोठेही सिद्ध झाल्याचे दिसत नाही.

शरदराव, केवळ आपले (चुकीचे) मुद्दे इतरांच्या माथी मारण्यापायी आपण सारासार विचार सोडता आहात असे वाटते. वर उपक्रमपंतांना कोणताच सल्ला नाही. त्यांनी वेळोवेळी आवश्यक संदर्भ लेखनात द्यावेत असे सांगितले आहे. हा सल्ला आपल्याला आहे कारण आपण लेख म्हणून जे प्रसिद्ध करता ते विचारपूर्वक केलेले नाही. इतरवेळेस आपण इतरांना सल्ले देत असता की खरडवहीत काय लिहावे, चर्चा कशी करावी, व्य. नि.तून काय लिहावे वगैरे - दुवा १, आपणही इतरांनी दिलेल्या सल्ल्यांवर थोडा विचार करावा. असो.

अनावश्यक शेरेबाजी

प्रियाली आणि नितिन थत्ते

वर नितिन थत्ते यांनी आपल्याला पु. ना. ओक म्हटलेले आहेच. त्यांच्याबद्दल अधिक वाचावे. जमल्यास सनातन. ऑर्गला भेट द्यावी. (हे ही मागे आपल्याला कोणीतरी सांगितले होते) आपल्या लेखात आणि त्यांच्यात फारसा फरक नाही हे कळून यावे.

पु. ना. ओकांनी ताजमहालाबद्दल केलेल्या संशोधनातील ठळक मुद्दे खालील दुव्यावर आहेत. त्यांचे खंडन आपण (किंवा इतर कोणी) केल्याचे वाचनात नाही. तेव्हा आपण ते करावे आणि मगच इतरांना "पु. ना. ओक" अशी शिवी घालावी. अन्यथा असली विधाने मागे घ्यावीत.

विनायक

ताजमहाल आणि पु. ना. ओक

पु ना ओक

पु ना ओक यांच्याविषयी माझी मते अशी का आहेत हे मी उपक्रमावर पूर्वी येथे सांगितले आहे. शरद यांचे लेखन अशाच प्रकारचे आहे असे दिसले म्हणून त्यांची तुलना ओकांशी केली. ती मुख्यत्वे अक्षरसाधर्म्याने काही शब्द मुळात असे होते असे ठणकावण्याविषयी आहे.

अवांतर : "पु ना ओक" ही शिवी (शिवी म्हणून वापरण्यायोग्य शब्द) आहे असे तुम्हाला वाटते तर!!!

नितिन थत्ते

विधान मागे घेण्याचा प्रश्नच नाही

पु ना ओक ही शिवी बहुधा आपल्याला वाटत असावी, विनायकपंत. मी तसे म्हटल्याचे दिसत नाही, तेव्हा विपर्यासाची गरज नाही. मीही पु. ना ओकांबद्दल मागे हा लेख दाखवला होता.

बाकी राहिली पु ना ओकांची बात तर पु ना ओक किंवा प वि वर्तक हे सर्वच ठिकाणी चुकीचे आहेत असे अजिबात नाही. शरदही सर्वच ठिकाणी चुकीचे नाहीत. त्यांनीही उपक्रमावर मोलाचे लेख लिहिलेले आहेत परंतु या लेखाबाबत तसे म्हणता येत नाही. आपले मुद्दे खरे करून दाखवण्यासाठी मुहम्मद हिंदु घराण्यात जन्मला होता पासून विक्रमादित्याने काबाचा शोध लावला ही ओकांची विधाने आणि शरद यांचा वरील लेख यांत रामायण आणि इलियडपेक्षा अधिक साम्य आहे असे मला वाटते.

कोणते आधी?

>>राम कथा भारताच्या आधीची.
रामकथा अयोध्या परिसरातील (दंडकारण्य/चित्रकूट नावाचे प्रदेश छत्तीसगडमध्ये आहेत ते नाशिक वगैरेपेक्षा अयोध्येच्या जवळचे वाटतात). तर महाभारत कथा कुरुक्षेत्र (हरयाना), गांधार (अफगाणिस्थान), हस्तिनापूर (दिल्ली) अशी घडलेली.

आपण सर्वांनी दुसर्‍या एका धाग्यावर राजस्थान वगैरे पश्चिमेच्या प्रदेशातून गंगेच्या खोर्‍याकडे पूर्वेकडे स्थलांतर झाले असावे अशी चर्चा केली आहे. पूर्वेच्या प्रदेशात घडलेली घटना ही नंतरची असावी काय? (हे मत फार सिरिअसली घेऊ नये)

इरावती कर्वे यांनीही संस्कृती पुस्तकात रामायण नंतरचे असावे अशी शक्यता वर्तवली आहे.

नितिन थत्ते

एग्जॅक्टली

अगदी हेच शरद यांना मला विचारायचे आहे आणि पहिल्या प्रतिसादात विचारले आहे.

ते म्हणतात की ग्रीक आपल्याकडून शुद्ध आचरण शिकले नाहीत. आपण शिकलो का रामायणाकडून? महाभारत जर रामायणानंतर अनेक वर्षांनी लिहिले गेले तर महाभारतीय व्यक्ती का नाही शिकल्या काही रामायणातून? कसे शिकणार म्हणा? महाभारताचे निर्माते स्वतः दोन बायकांची त्यांच्यासोबत संग करण्याची इच्छा नसताना (एक पांढरीफटक पडते आणि दुसरी डोळे झाकून घेते) संभोग करतात. (अशा प्रकाराला सामान्य भाषेत बलात्कार असेच म्हटले जाते.) ते रामायणाला महत्त्व कसे देतील? एवढा मोठा विष्णूचा अवतार घेणारा राजा त्याला महाभारत किंमत देत नाही. फक्त वंशावळीत नाव येते. म्हणजे रामायणातून काहीही शिकलेले नाहीत किंवा महाभारत रामायणाआधी घडले किंवा रामायण तद्दन काल्पनिक असावे.

आपल्या पायांखाली काय जळते आहे ते न बघता ग्रीकांच्या आचरणाबद्दल बोलणे किती अनावश्यक आहे त्याचा प्रत्यय येथे येईल.

होमर म्हणजे अमर पासून पुढे

होमर म्हणजे अमर
जीनियस म्हणजे गणेश
माया संस्कृती भारताततलीच
इलियडही रामायणावरून लिहिले आहे
इजिप्तातले मम्मीवाले रामसे हे रामाचे वंशज
भयपटवाले रामसे ह्या मम्मीवाल्या रामसेंचेच वंशज

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वा सुंदर

शरदराव, सुंदर लेख आहे.
सहज मारलेल्या गप्पांमध्ये मांडलेली मते असे स्वरूप असल्या सारखे वाटले.
आवडला!

मात्र जर ही मते असतील तर संदर्भ असते तर अजून आवडला असता.

असो,

बाकी 'टिळकांची मते', रोमिला थापर आदि विषेश प्रभुती सोडून अजून कुणी काय विचार केला आहे तेही वाचायला आवडेल.
ग्रीकांनी आपल्याकडून काय घेतले हे वाचण्यासाठी खरे तर ग्रीक भाषेतूनच कुणी समतोलपणे इतिहास वाचणारा हवा.
मात्र देणे याबरोबरच घेणेही असतेच. फक्त भारतातीलच जगाला शिकवले आणि त्यांनी मात्र काही घेतलेच नाही असा विचार काही कामाचा नाही.
त्याचवेळी 'भारतीय आपली छाप काही भागवर पाडतात पण आपण आपली छाप तेथे पाडली आहे हे विसरून जातात' हाही इतिहास आहेच हे लक्षात घेतले तर बरे, असे मला वाटते.
असो, ज्याचा त्याचा प्रश्न!

असो,

आपला
गुंडोपंत

मजकूर संपादित.

रामपंथ

अयुथ्या चा दुवा फारच रोचक आहे. प्रा. सोनाळकर नावाच्या लेखकांचे अयोध्या विवादावरील पुस्तक वाचले होते. त्यात रामाच्या (की रामानंदी) पंथाचा उदय १२ व्या शतकाच्या नंतर झाल्याचे म्हटले आहे. हे अयुथ्याही त्याच सुमारास उदयाला आलेले शहर दिसते.

नितिन थत्ते

सहमत परंतु

हे सांगावयाचे कारण सुरवातीच्या विद्वानांची , मग ते मॅक्समुल्लर असोत वा कोसंबी, मते नवीन, शास्त्राने सिद्ध होणार्‍या कसोट्यांवर तपासून घेतली पाहिजेत.

सहमत. मॅक्समुल्लर यांचे लेखन मी वाचलेले नाही, कोसंबी यांचे अलिकडेच वाचले आहे/वाचते आहे. सरस्वतीवरून वाचताना माझ्या लक्षात आले की कोसंबी यांनी सरस्वतीवरून विशेष योगदान दिलेले नाही. त्यांनी Tiglath-Pileser III च्या एका शिलालेखावरून हेलमंड ही सरस्वती असू शकेल (अ फॅक्ट दॅट आर्किओलॉजिस्टस वुड डू वेल टू कीप इन माइंड फॉर फ्युचर युज डिस्पाइट दी इनकन्क्लुसिव्ह फाइंड्स ऍट मुंडिगाग) असे म्हटले आहे. त्यांनी हेलमंड हीच सरस्वती आहे असे तुम्हाला किंवा कोणालाच मान्य करायला भाग पाडलेले नाही, जरी त्यांचे तसेच मत ठाम असले तरी.
येथील पान क्र. ८९ पहा.

कोसंबी किंवा थापर किंवा लोकमान्य टिळक किंवा अजून कोणी यांचे लेखन जसेच्या तसे बरोबर आहे असे समजणे हे माझ्या मते बरोबर नाही. प्रत्यक्ष कोसंबी पुरावे गोळा करायला सांगत आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. संशोधकांची मते असणारच पण नवीन पुराव्यांनिशी पूर्वीच्या मतांची एकदा तपासणी करून बघणे कधीही चांगले असे तुम्ही सुचवत आहात हे कोणाही विचारशील व्यक्तीला मान्य होण्यासारखेच असावे. पूर्वसुरींनी करून ठेवले आहे तर आपल्याला आता नवीन पाहण्याची काय गरज असे म्हणणे उपयोगाचे नाही.

मात्र होमर (अमर), कथानायकांच्या चारित्र्याबद्दल तुमची मते असली तरी आपल्या इतर कदाचित योग्य असू शकणार्‍या महत्त्वाच्या आर्ग्युमेंटला (वादास) बाधा येते असे मला वाटते. विषय असे विस्तृत असताना बर्‍याच अवांतर वाटणार्‍या गोष्टींवर चर्चा होते, पण वादाचे मुद्दे हे शक्यतोवर विषयाला धरून ठेवावे, यामुळे तुम्हाला जो मुद्दा महत्त्वाचा आहे (नवीन पुराव्यांच्या सहाय्याने पूर्वीची मते तपासून पाहणे) त्यावरच फोकस होईल, नाहीतर हे विषय भलतीकडे जाऊन कोणालाच काही साध्य होणार नाही.

असो.

उत्कृष्ट प्रतिसाद...

या आणि तत्सम वादावरील चर्चेत चित्राताईंचा हा प्रतिसाद अतिशय संतुलित आणि निष्पक्ष वाटला. विशेषतः शेवटचा परिच्छेद. असो.

कोसंबी किंवा थापर किंवा लोकमान्य टिळक किंवा अजून कोणी यांचे लेखन जसेच्या तसे बरोबर आहे असे समजणे हे माझ्या मते बरोबर नाही. प्रत्यक्ष कोसंबी पुरावे गोळा करायला सांगत आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. संशोधकांची मते असणारच पण नवीन पुराव्यांनिशी पूर्वीच्या मतांची एकदा तपासणी करून बघणे कधीही चांगले असे तुम्ही सुचवत आहात हे कोणाही विचारशील व्यक्तीला मान्य होण्यासारखेच असावे. पूर्वसुरींनी करून ठेवले आहे तर आपल्याला आता नवीन पाहण्याची काय गरज असे म्हणणे उपयोगाचे नाही.

लोकमान्य असोत किंवा कोसंबी, त्यांची मते कोणावर लादतील असेही नाही. पण बरेचदा असेही होत असावे की त्यांची मते त्यांनी केवळ एक शक्यता म्हणून मांडली पण वाद चर्चांमधे लोक त्यांचा सोयिस्करपणे एक मान्यताप्राप्त मत म्हणून उपयोग करत असावेत. मग विरुद्ध बाजूच्या लोकांनी थेट त्या विद्वानावरच हल्ला चढवणे असे प्रकार होतात. वरती चित्राताईंनी अधोरेखित केल्या प्रमाणे कोसंबींनी 'असू शकेल' असे म्हणले आहे. पण अर्धवट ज्ञानाच्या आधारे एखादा ठोकून देतो की साक्षात कोसंबींनीच असे म्हणले आहे.

बिपिन कार्यकर्ते

सहमत

चित्रा आणि बिपिन कार्यकर्ते यांच्या मताशी सहमत आहे.

-निनाद

काही पुरावे

श्री रुपाली, श्री. नितिन व श्री. चंद्रशेखर यांनी माझ्यावर बरेच ताशेरे झाडले आहेत. थोडासा खुलासा करावयाचा प्रयत्न केला होता पण उपयोग झाला नाही असे दिसल्याने परत एकदा मी काय लिहले व त्या बाबतीत "पुरावे" काय त्याबद्दल. लेखातील एकेक मुद्दा व संदर्भ देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. जर एवढ्याने समाधान झाले नाही तर स्त्रीहट्ट व बालहट्ट पुरा करता येत नाही या बिरबलाच्या उक्तीला मान्यता देऊन हात वर करतो.(ह.घ्या.)
(१) त्यामुळे एखादा ग्रंथ वा तत्वज्ञान इ.स.पूर्व ५००च्या मागचे असू शकेल ही कल्पनाच नाकारली गेली
मॅक्समुल्लर वा इतर १८ वा १९ व्या शतकातले लेखक घ्या. सर्वांनी आर्यांना घोडदौड करून भारतात हल्ला करावयाला इ.स.पूर्व १५०० निवडले.इ.स.पूर्व ३००० च्या आधी वैदीक संस्कृती येथे होती हे पुढे पाहू.
(२) वेदात समुद्राला मिळणार्‍या, खळाळत जाणार्‍या सरस्वतीचे उल्लेख आहेत.
श्री. चित्रा यांचे लेख पहा.
या सरस्वतीबरोबर शतद्रु आदी इतर नद्यांचे उल्लेख आहेत. संदर्भ ;वरचाच
हेलमंड नदीच्या उच्चाराचा सरस्वतीशी संबंध जोडता येत असला तरी इतर नद्या हेलमंड नदीजवळ नाहीत. तेव्हा वेदात वर्णन केलेली नदी हेलमंड नव्हे. हेलमंड समुद्राला मिळत नाही हे विचारात घेऊन तीला बाद करावे.
आज सरस्वती दिसत नाही. पण तीचा मार्ग जमीनीखाली उपग्रहातील चित्रांवरून दिसतो. या बद्दल माहीती पुढील संदर्भात पहा.

(a) Is river Ghaggar, sarasvati ? Jayant R. Tripathee, Barbara Rock, V.Rajamani, A. Isenheur. www.ias.ac.in/currisci/
oct252004/1141
(b) www.steffen-knapp.com.recentresearchonsarasvati river.
या दोहोंचाही "हिन्दुत्ववाद्यांशी" संबंध नाही.
(३) सरस्वती नदी इ.स पूर्व ३००० च्या सुमारास आटू लागली व इ.स.पूर्व १९००-२००- च्या सुमारास लुप्त झाली. संदर्भ वरचा चालेल.
(४) सरस्वतीच्या काठावर वस्ती होती व नदी आटल्यावर ती उठली.या वस्त्यांवर हल्ले झाल्यामुळे त्या नष्ट झालेल्या नाहीत. Pre-Harappaa or Sarasvati-Sindhoo Civilisation याचा शोध गूगलवर घ्या व त्यातील हिन्दुत्ववादी स्थळे सोडून द्या. तरीही ५-२५ मिळतील. इथे यादी देण्याची गरज नाही.
(५) स चा ह झालेला सरस्वतीशिवाय इतर शब्दांतही आढळतो. उदा.असूर--अहूर. ह चा स झाल्याचे उदा. मला मिळाले नाही. कोणी शोधले तर अवष्य सांगावे. माझा मुद्दा हा की इराणमधून येताना लागलेल्या नदीचे नाव भारतात सरस्वती झाले किंवा भारतातून पश्चीमेकडे जातांना स चा ह झाला याने काही फरक पडत नाही. वेद वर्णन करतात ती नदी वर सांगितल्याप्रमाणे भारतातलीच. इराण-अफगाणीस्थानातील नव्हे.
(६) सरस्वतीचे निरनिराळे उल्लेख निरनिराळ्या काळातले. महानदाचा उल्लेख इ.स.पूर्व ३००० च्या पूर्वीचे. गंगेला मह्त्व मिळालेले नंतरचे, सरस्वती आटू लागल्यावेळचे, म्हणजे इ.स.पूर्व २००० च्या आसपासचे. याचा अर्थ वेद भारतात इ.स.पूर्व ३५०० ते इ.स.पूर्व २००० या काळात भारतात लिहले जात होते.
(७)श्री. शं.बा. दीक्षित यांनी वेदातील ऋचेवरून त्या भागाचे लेखन इ.स.पूर्व ३००० ठरवले. त्याला कोणीही बाद केलेले नाही. वरील काल निर्णयाला हा एक ठोस पुरावा.
(८) वेदांगे वेदांच्या लिखाणानंतर लिहली. त्या नतर वेद लिहले गेले नाहीत. वेदांगाचा काळ इ.स.पूर्व १५०० च्या आसपास, ज्योतिषशास्त्रावरून ठरवला गेला आहे. पहा श्री. दीक्षित. म्हणजे वेदांची अर्वाचीन मर्यादा इ.स.पूर्व १५०० ठरते. इ.स.पूर्व ५०० नव्हे.
(९) वेदांत कृषीबद्दल माहीती आहे. या ऋचा स्थिरावलेल्या समाजातील आहेत. म्हणजे घोड्यावरून दौड करतांना लिहलेल्या नव्हेत. याचा अर्थ त्या भारतातच लिहलेल्या आहेत.संदर्भ.: ऋ.४.५,७,८. १०.३४.१३.शु.यजु.१८.७ ; १८.९ ; १८.१०.;१८.१४. इत्यादी.
(१०) लो.टीळक याच्या संदर्भावरून काळ इ.स.पूर्व ४००० च्या आधीचा ठरतो. मी इ.स.पूर्व ६००० म्हणतो. पटत नसेल तर पाहीजे तो समजा. फक्त तो इ.स.पूर्व ४००० च्या अलिकडे ओढता येत नाही.
(११) आता रामायण-इलियड. रामायण (घटना) श्री. चंद्रशेखरजी इ.स.पूर्व ५००० म्हणतात. (मला पटलेले नाही, पण वाद घालावयाचा नाही.) धरून चालू. महाभारतात रामायण आहे. वाल्मिकी रामायणापेक्षा थोडे निराळे. तरीही रामायण आधीचे म्हणावयास हरकत नाही. महाभारताचा काळ निरनिराळ्या पुराव्यांवरून इ.स.पूर्व ३००० ठरतो. श्री वैद्य यांचा महाभारताचा उपसंहार पहा. वाचनीय आहे. मी पूर्वीच्या लेखांमध्येच देणार होतो, पण श्री. चंद्रशेखरजी यांनी लेखमाला बंद करावयास सांगितली व मी त्याला मान्यता दिली,असो.) तर रामकथा लिखीत इ.स.पूर्व ५०० च्या आसपासची असली तरी रामकथा फार आधीची आहे.
आता इलिअड कडे वळू. विकीवरून : प्राचीन ग्रीक भाषा ..इ.स.पूर्व १४००, ट्रोजन युद्ध ..इ.स.पूर्व ११९४-११८४. होमर ..इ.स.पूर्व ८००. इतरही संदर्भ पाहिले पण ते हाच काळ देतात. तेंव्हा रामायण आधीचे हे ठरले. आता मी साम्य दाखविले ते पटले नाही. सोडून द्या. श्री Ralf H. Griffith काय म्हणतात." Parallel to Idiud are obvious..". ग्रिफ़िथ यांचे वाल्मिकी रामायण.
शरद

निषेध

श्री रुपाली, श्री. नितिन व श्री. चंद्रशेखर यांनी माझ्यावर बरेच ताशेरे झाडले आहेत.

रुपाली कोण? शरदराव, उपक्रमावरील बाकी सर्वांची नावे आपल्याला बरोबर आठवतात. :-( माझ्या नावाचे मात्र स्वप्नाली, रुपाली होते आणि मी न म्हटलेली वाक्येही माझ्या तोंडात आपण कोंबता असे का? जर आपल्याला माझ्या नावाचा वापर योग्य प्रकारे करता येत नसेल तर तो कृपया करू नये. सध्या मी निषेध व्यक्त करून येथेच थांबत आहे.

बाकी प्रश्न राहिला आपल्या प्रतिसादाचा तर आपल्याला हे ही कळू नये की आक्षेप कशावर आहे आणि कशावर नाही ते याचा खेद होतो. जे खटकलेले आहे तेच माझ्या प्रतिसादात आहे, इतर गोष्टींबद्दल आक्षेप नाही. लेखात आपले मुद्दे मांडताना आपण इतक्या अनावश्यक मुद्द्यांचा वापर केला आहे की नेमके सांगायचे काय आहे आणि काय नाही याबाबत आपला गोंधळ निर्माण झाला असावा. जर वेदांबद्दल लिहायचे होते तर रामायण आणि इलियड हे अनावश्यक होते. इलियड आणि होमरचा संदर्भ देताना ज्या विकीचा आपण वापर करता तेच विकी, रामायण इ.स.पूर्व ७५० ते ५०० मध्ये रचण्यात आले असे सांगते. ते मात्र आपल्याला पटत नाही म्हणून प्रश्न येतो की इलियड अर्वाचीन आहे हे विकीचे संदर्भ आपण कसे पटवून घेता? त्याला काही संदर्भ आहेत का? अन्यथा, इलियड हे रामायणानंतरचे असावे हे माझ्यामते ठीक आहे.

जर वेदांची निर्मिती प्रथम आर्क्टिक्ट भागात झाली असे आपणच म्हणता आणि तसे असेल तर तेथून भारतात येईपर्यंत अनेक ठिकाणी अनेक ऋचा रचल्या गेल्या असाव्यातच. त्यामुळे वेद भारतातच रचले गेले या वाक्याला अर्थ राहत नाही. वेद थोडे थोडे इतर भागांत रचले गेले तरी त्यांचे संकलन भारतात झाले, पहिले लेखन भारतात झाले, आजवर ते वापरले जात आहेत, आजही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाचे नाही का? का केवळ महत्त्वाचे आहे ते, भारतातच सर्व निर्मिले गेले हे!

इतर संस्कृतींना झटक्यासरशी नावे ठेवणार्‍या, आम्हीच खरे- आम्हीच महान असे ठसवण्यासाठी असत्याचा आधार घेणार्‍या लेखांमुळे उपक्रमाचा दर्जा खालावतो आणि आपला लेख त्यापैकीच आहे - हे माझे मत कायम आहे.

असो. या लेखात इतके सल्ले दिलेच आहेतच, ते आपल्याला फारसे पसंत नाहीत असे दिसते. तरीही आणखी एक.

शरदराव, या संकेतस्थळावर लोक आपल्या लेखांचे चाहते आहेत. संकेतस्थळावर मत-मतांतरे होतीलच. आपल्याला पटत नाही असा एखादा लेख आला तर त्याचे खंडण करताना शांतपणे, संदर्भ शोधून, अनावश्यक वाक्ये टाळून, जमेल तितक्या निष्पक्षपणे, एखादे वाक्य अतिशयोक्त किंवा असत्य तर नाही ना याचा विचार करून टाकल्यास लेखाला अपेक्षित वजन येईल. इतर सदस्यही अशा लेखांची खिल्ली उडवताना चार वेळा विचार करतील आणि अशा लेखांत एखादा वेगळा विचार मांडला असल्यास त्यावर चर्चाही करतील. असे होत नसल्यास, लेखक म्हणून ते आपले अपयश आहे. यावर अवश्य विचार करावा.

अवांतरः महाभारतात रामायण आहे हे वाक्य चुकीचे वाटते. महाभारतात राम आहे. रामायण नाही असे मला वाटते. असल्यास त्याचेही संदर्भ द्यावेत.

हेतू

>>का केवळ महत्त्वाचे आहे ते, भारतातच सर्व निर्मिले गेले हे!

सगळे काही भारतातच निर्माण झाले हे एस्टॅब्लिश करणे ही काहींची राजकीय आणि सामाजिक गरज आहे. कारण माणसे आणि ग्रंथांचे काही भाग का होईना "बाहेरून आले" हे मान्य केले तर कुणाला तरी परके ठरवण्याचा हक्क आपण गमावून बसतो. आणि जर परके या निकषावर कोणाला दुय्यम ठरवायचे असेल तर (२००० नंतरच्या झोपड्या अनधिकृतसारखे) इ. स. १००० नंतर आलेले परके आणि आधी आलेले स्थानिक असे ठरवणे सहज शक्य नाही.

नितिन थत्ते

संशोधन हेतू आणि इतर

संशोधनाचे हेतू काय आहेत, म्हणून अमूक प्रकारचे संशोधन होऊच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. उदा. स्टेम सेल बद्दलच्या संशोधनासंबंधी अनेक समज/गैरसमज लोकांमध्ये आहेत, काही लोक या संशोधनाचा गैरवापर करतील किंवा करतात, म्हणून स्टेम सेल संशोधन होऊच नये असे मत आपले आहे का? तसे असल्यास ज्या अनेकांच्या दु:खांचे/आजारांचे नियंत्रण स्टेमसेल संशोधनाने होऊ शकते अशा लोकांचे काय? हे झाले संशोधनाच्या हेतूंचे.

राहता राहिली आर्य लोकांची गोष्ट. त्यात आर्य बाहेरून आले म्हणून ते स्थानिक संस्कृतीला परके आहेत, त्यांच्यामुळे स्थानिक संस्कृतीचे नुकसान झाले, द्रविड हे स्थानिक होते, आर्य बाहेरून आलेले. त्यामुळे बरेचसे उत्तर भारतीय (त्यात कदाचित महाराष्ट्रही आला) हे परके. अनेक संशोधक हे आर्यांना परके ठरवून द्रविडांना स्थानिक ठरवीत आहेत, म्हणून परक्या आर्यांनी द्रविडांच्या भूमीवरून चालते व्हावे, अशीही मते असल्याचे ऐकिवात असेलच. इ. इ. आर्ग्युमेंटच करायचे तर ते कसेही करता येईल/केले जाते.

"दुसर्‍याच्या" (म्हणजे "स्वतः"च्या विचारांशी ज्यांचा मेळ बसत नाही अशा लोकांच्या) संशोधनाचे हेतू काय आहेत याबद्दल प्रत्येकाच्या मनात संशय असतो. तो जसा तुमच्या मनात आहे तसाच तो इतरांच्याही मनात असावा, नाही का? आता कुठच्याही संशोधनाच्या पद्धती योग्य असाव्यात हे बरोबर, पण ज्यांनी मुळात संशोधन केले आहे, अशांच्या तरी संशोधनाच्या पद्धती बरोबर आहेत का चुकलेल्या आहेत याची तपासणी का करायची नाही? का ती केली तर ते चुकीचे हेतू ठरतील? "स्व" चा संशय अधिक योग्य आणि दुसर्‍यांनी घेतलेला संशय हा निखालस चुकीचा असे सरसकट समजणे घातक आहे.

वा!

वा!
चांगले खंडन केले आहे असे मला वाटते.
काही जमेच्या बाजू,

(५) स चा ह झालेला सरस्वतीशिवाय इतर शब्दांतही आढळतो. उदा.असूर--अहूर. ह चा स झाल्याचे उदा. मला मिळाले नाही. कोणी शोधले तर अवष्य सांगावे.

हे काही सदस्यांनी 'हळूच' बाजूला ठेवले आहे हे ही लक्षात आले.

(८) वेदांगे वेदांच्या लिखाणानंतर लिहली. त्या नतर वेद लिहले गेले नाहीत. वेदांगाचा काळ इ.स.पूर्व १५०० च्या आसपास, ज्योतिषशास्त्रावरून ठरवला गेला आहे. पहा श्री. दीक्षित. म्हणजे वेदांची अर्वाचीन मर्यादा इ.स.पूर्व १५०० ठरते. इ.स.पूर्व ५०० नव्हे.

याचे पण काही खंडन तसे कुणी करू शकले नाहीये. काही सदस्य फक्त आपले(च) मुद्दे रेटण्याचा उगाच प्रयत्न करत आहेत असे वाटले.

असो, सदस्य 'असाच' असा एकदा पिवळा चष्मा लावत असले की तो काढताच येत नसावा.
असो, एकुणच लेख आवडला आहे आणि खंडनही!

आपला
गुंडोपंत
मजकूर परत परत आणि परत संपादित??

आरं तिच्या परत आहीच का?
काय राव तुम्ही... शिल्पाला लईच मनावर घेतले म्हणायचे...?
बरं बॉ तुम्हीच पाहा शिल्पाकडे... आता खुश?
आता ती मंदिरात कशी काय येते हा मात्र आम्हाला पाण पडलेला प्रश्न आहे बरं का... आणि ते मंदिर कोणते हे पण कळले तर बरे आम्ही पण तेथेच गेलो असतो - दर्शनाला म्हणतोय मी...

लेख आवडला

लेख आवडला. भारतीय व अभारतीय संस्कृतींमधील साम्यस्थळे रोचक आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उपसंहार

वेद रचण्याची सुरवात उत्तर धृवावरील वास्तव्यातील आठवणींपासून झाली असावी हे मी लिहलेच आहे. त्याबद्दल मतभेद कोठे आहेत ? आता माझे मत "वेदांतला फार मोठा भाग भारतात इ.स.पूर्व ६००० ते इ.स.पूर्व १५०० रचला गेला ". त्याला आपल्या आताच्या लिखाणाने बाध येत नाही. खरे म्हणजे मला वाटले होते की "१०००० ऋचांमधील किती ऋचा मोजून तुम्ही या निर्णयाला आलात ? " असा प्रश्न विचारला जाईल व मला सदाशिव पेठेतील वास्तव्याला अनुसरून " ७८ %, चूक काढावयाची असेल तर मोजत बसा " असे तिर्कस उत्तर द्यावे लागणार. पण टीका करणारे सदाशिव-नारायणमधील नसल्याने फुकट गेले. असो. मुद्दा साधा आहे, "वेद भारताबाहेर रचले गेले " याला माझा विरोध आहे व ते भारतातही रचले गेले एवढे सिद्ध करावयाला पुरेसा पुरावा मी दिला आहे.

वनपर्वातल्या अ.२७३ ते अ,२९१ यात रामकथा आहे व त्याला रामोपाख्यानपर्व म्हटले आहे. सर्वसाधारणपणे रामकथेला रामायण म्हटले जाते, उदा. तुलसीरामायण, भावार्थ रामायण, वगैरे. तेव्हा श्री. नितिन यांच्या करता "महाभारतात रामायण आहे, रामायण आधीचे" असे समजावे. आपण रामायण नाही, रामोपाख्यान आहे असे म्हटले तर ते मला एकदम मान्य.

वेदांच्या संदर्भातील लेखात रामायण व इलिअड हे "अवांतर" हे मान्य. व म्हणूनच निराळा भाग करून "आता वेद लिहणार्‍या लोकांबद्दल " अशी निराळी सुरवात केली. काय होते, बर्‍याच वेळी जवळचा (पण अवांतर) भाग निराळा लेख म्हणून लिहण्याएवढा मोठा नसतो. त्यावेळी असे विभाग करून लिहणे सोयीचे जाते. साम्य दाखवतांना श्री. ग्रिफ़िथ यांचे उद्धरण द्यावयाला हवे होते का ? मला त्यावेळी गरज भासली नाही.

आता माझ्या मतांबद्दल. मी गाढा अभ्यासक नाही.तो माझा पिंडच नाही. चार पुस्तके वाचतो, ती आनंदाकरिता. आपल्याला आवडलेले चार मित्रांना सांगावे असे वाटते, त्यांनाही आनंद मिळावा म्हणून. काहींना त्यातली मते आवडतीलच, पटतीलच असे नाही. खंडन-मंडन पद्धतीने ती खोडून काढावीत इतक्या उच्च दर्जाची ती आहेत असे समजण्याचे कारण नाही. डॉ. बिरुटे यांना माझी वसंत बापट यांच्याबद्दलची मते(मत नव्हे श्रद्धाच) पटली नाहीत तर मला ते मान्य आहे.अशा गोष्टीत एकमत हवेच हा आग्रह कशाला ? मला जुई आवडते, तुम्हाला गुलाब. तुम्ही गुलाबाचा सुवास घ्या, मला जुईचा घेऊ दे." गुलाब जुईपेक्षा श्रेष्ट, तूला कळतच नाही", हा वाद कशाला ? बर्‍याच लेखात मी उपक्रमवासीयांना भाग घेण्यास सांगतो कारण मला ही असाच आनंद मिळावा म्हणून.

आज हे लिहण्याचे कारण पुढील ३-४ लेखात भारतातील इतर प्रांतातील संतांची ओळख करून देण्याचा विचार आहे. अर्थात यात माझ्या नसल्या तरी त्यांच्या श्रद्धांचा उल्लेख येणारच. माझी नम्र विनंती की ज्यांना अशा विचारांची ऍलर्जी असेल त्यांनी ते वाचूच नयेत. या बाबतीत पुरावे-संदर्भ देणे अशक्यच आहे. खालीपिली भेजा गरम कायकू करनेका ?
शरद

विचारांची ऍलर्जी

नम्र विनंती की ज्यांना अशा विचारांची ऍलर्जी असेल त्यांनी ते वाचूच नयेत.

असा पायंडा जर उपक्रमावर पडणार असेल तर तो घातक आहे असे आता वाटू लागले आहे. कदाचित पूर्वी मी देखील अशा विचारांना पाठिंबा दिल्याचा संभव आहे परंतु अधिक विचार करता हे धोक्याचे वाटते. मी मला हवे तसे लिहिणार, मला पटते म्हणून - मला आवडते म्हणून इतरांनी संदर्भ विचारू नयेत, प्रश्न पुढे करू नयेत, त्यातील चुका दाखवू नयेत अशी विचारसरणी धोकादायक आहे. जर लेख प्रकाशित केला आहे तर त्यावर येणार्‍या उलटसुलट प्रतिक्रियांसाठी लेखकाने तयार असावे.

गुलाब आणि जुईचे उदाहरण येथे गैरलागू वाटते. कला, साहित्य येथे ते लागू आहे. इतिहास, गणित, भविष्य, राजकारण, सामाजिक प्रश्न, विज्ञान यांना ते लागू होईलच असे नाही. त्यापेक्षा मी २+२=५ म्हणेन हे उदाहरण येथे योग्य आहे आणि या विधानावर मला कोणी प्रश्न विचारू नयेत ही विचारसरणी धोकादायक वाटते.

ज्याप्रमाणे शरद म्हणतात की ज्यांना विचारांची ऍलर्जी आहे त्यांनी ते वाचू नयेत त्याचप्रमाणे इतर सदस्य त्यांना "तुमचे लेख तुमच्या ब्लॉगवर प्रकाशित करा. येथे प्रकाशित करूच नये." किंवा "हा लेख काढून टाकावा." असेही सांगू शकतील*. हे देखील धोकादायकच आहे.

अशाप्रकारची विचारसरणी संकेतस्थळावर लागू होऊ नये असे वाटते. प्रत्येक सदस्याला संकेतस्थळाच्या धोरणाप्रमाणे लेख टाकण्याचा आणि प्रतिसाद देण्याचा अधिकार आहे.

* चंद्रशेखर यांनी अशाप्रकारे सांगितल्याचे आठवत असावेच. त्यांना बहुतांश सदस्यांनी विरोध केला होता. त्याचप्रमाणे वरील वाक्याला विरोध आहे.

सहमत

प्रियालीतैंच्या प्रतिसादाशी सहमत आहे. विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी एकमेकांची मते पटलीच पाहीजेत असे नाही. श्री शरद आपल्या लेखनात बर्‍याचदा आक्षपार्ह विधाने करतात पण त्या विधानांचा पाठपुरावा करण्याची चिकाटी दाखवत नाहीत. अनेक लेख लिहिण्यापेक्षा कमी व सकस लेखन केल्यास ही अडचण दूर होऊ शकेल असे वाटते. त्याच वेळी श्री शरद व एकूणातच उपक्रमावरील (अभ्यासपूर्ण) लेख व वाचकांचे (अभ्यासपूर्ण) प्रतिसाद (काही अपवाद वगळता) यांच्यामुळे मला स्वत:ला प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये रस निर्माण झाला आहे, हेही नमूद करावेसे वाटते.

पटले नाही राव !

शरदराव आपण वयानं मोठे आहात. अनुभव आणि ज्ञानानेही. आपले लेखन माहितीपूर्ण आणि ज्ञानात भर घालणारे असते. आपले लेखन प्रतिसाद लिहायला प्रवृत्त करतात. भारतातील संताचा परिचय आपण करुन देत आहात ही आनंद देणारी गोष्ट आहे. त्यातला पहिला भाग वाचला आणि तो आवडला हे वेगळे सांगणे न लगे. फक्त माझी नम्र विनंती की ज्यांना अशा विचारांची ऍलर्जी असेल त्यांनी ते वाचूच नयेत. हे वाक्य मात्र बिल्कुल आवडले नाही. असतील तिथे संदर्भ द्यावे, नसतील तर नाही म्हणून मोकळे व्हावे. त्यासाठी भेजा कशाला गरम करायचा आणि ऍलर्जी असेल त्यांनी लेख वाचूच नये, असे कशाला म्हणायचे नै का ?
[का थर्टीफस्ट सिलेब्रेशन सुरु झाले. ह.घ्या ]

-दिलीप बिरुटे

द्रौपदीहरण पर्व

वनपर्वातील द्रौपदीहरणपर्वात रामकथा येते. रामोपाख्यानपर्व नावाचे पर्व मला महाभारतात सापडले नाही (चू. भू. दे. घे.) इतर पौराणिक कथांप्रमाणेच ती एक कथा आहे. संदर्भाबाबत धन्यवाद.

रामोपाख्यान

माझ्याकडील श्रीमन्महाभरत,भाषांतरकार, विद्यावाचस्पती अप्पाशास्त्री राशिवडेकर, प्रकाशक : वरदा प्रकाशन यातील खंड -२
वनपर्व, दौपदीहरणपर्व , अ.२६२ ते अ.२७१ आहे. त्यानंतर जयद्रथविमोक्षणपर्व अ.२७२ आहे. त्यानंतर रामोपाख्यानपर्व
अ.२७३ ते अ.२९१ आहे. द्रौपदीहरणपर्वात रामकथा मिळाली नाही.
शरद

येथे पहा

मला के. एम. गांगुली यांच्या महाभारतात ती येथे मिळाली. त्यात रामोपाख्यान पर्व दिसले नाही.

सेक्रेड टेक्स्टवर असणारे संस्कृतमधील इलेक्ट्रॉनिक टेक्स्ट अ.२६१ मध्ये आणि पुढे(द्रौपदीहरणात) रामकथा दाखवते.

मुंबई प्रत व बंगाल प्रत

श्री शरद यांनी उल्लेख केलेले भाषांतर कदाचित मुंबई प्रतीचे असावे तर प्रियालीतैंनी दिलेल्या गांगुलींच्या भाषांतराच्या दुव्यात बंगाल व मुंबई प्रत दोन्हींचाही वापर केलेला दिसतो. हे कदाचित रामायणाचा उल्लेख नेमका कुठे आहे याबाबत गोंधळाचे कारण असावे. श्री गांगुली यांच्या प्रस्तावनेतून:

About the readings I have adopted, I should say that as regards the first half of the work, I have generally adhered to the Bengal texts; as regards the latter half, to the printed Bombay edition. Sometimes individual sections, as occurring in the Bengal editions, differ widely, in respect of the order of the verses, from the corresponding ones in the Bombay edition. In such cases I have adhered to the Bengal texts, convinced that the sequence of ideas has been better preserved in the Bengal editions than the Bombay one.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रामायण आधीचे की महाभारत(?)

महाभारतात (विविध प्रतींनुसार) रामोपाख्यान किंवा द्रौपदीहरणाच्या पर्वात रामकथा येते म्हणून महाभारत हे रामायणानंतरचे आहे हे सिद्ध होत नाही. महाभारतातील रामकथा वापरून वाल्मिकींनी रामायण फुलवले अशीही शंका येथे घेता येईल. महाभारतातील रामकथा रामाला देवत्वाचा दर्जा देत नाही असे वाटते. (चू. भू. दे. घे.) त्यात राम हा राजपुत्र आहे आणि त्याच्या पत्नीचे हरण होते ही कथा मिळते. रामायणात ही कथा विस्ताराने सांगितलेली आहे. दोन्ही कथा तंतोतंत मिळत नाहीत. त्या सारख्या असल्या तरी त्यात फरक आहेत त्यामुळे महाभारतातील कथा हे रामायणाचे संक्षिप्त रुप आहे असे सुखटणकर यांचे (भांडारकर प्राच्य संस्था) मत होते. महाभारतातील रामकथेत वाल्मिकी नाहीत. त्यांचा संदर्भही नाही. यावरूनही रामायण हे महाभारताच्या नंतर रचले गेले असे गृहितक मांडता येईल.

ज्याप्रमाणे इलियडमधील ओडायससला घेऊन ओडीसीची निर्मिती झाली त्याप्रमाणे महाभारतातील राम घेऊन विस्तृत रामायणाची निर्मिती झाली असे गृहितकही मांडता येईल.

दुसरे गृहितक असे की

रामायण महाभारतापूर्वीचे किंवा समकालीन* असून रामायणाची मूळ गोष्ट महाभारतात आली आणि नंतर रामायणाची इतर कांडे, भरीचे श्लोक घातल्याने वाढ झाली.

केवळ एका कथेत दुसरी कथा येते म्हणून काल ठरवणे योग्य असेलच असे नाही.


* येथे रामायण आणि महाभारत ही काव्ये असे गणले आहे आणि समकालीन म्हणजे एकाच वेळी असे नव्हे पण हजारो वर्षांचा फरक नाही, शे-दोनशे वर्षांचा असा नजिकचा कालावधी.

ऍलर्जी

थोडे जास्त स्पष्ट केले पाहिजे होते. मी लिहले
आज हे लिहण्याचे कारण पुढील ३-४ लेखात भारतातील इतर प्रांतातील संतांची ओळख करून देण्याचा विचार आहे. अर्थात यात माझ्या नसल्या तरी त्यांच्या श्रद्धांचा उल्लेख येणारच. माझी नम्र विनंती की ज्यांना अशा विचारांची ऍलर्जी असेल त्यांनी ते वाचूच नयेत. या बाबतीत पुरावे-संदर्भ देणे अशक्यच आहे.
इथे श्रद्धा या कडे आपले लक्ष वेधू इच्छितो. बर्‍याच जणांना याची ऍलर्जी असते असे दिसते. व ही
एक गोष्ट अशी आहे की जा बाबतीत पुरावे देता येत नाहीत. रामानंदांच्या बाबतीतच त्यांचा अपमृत्यु समाधीमुळे टळला ही
श्रद्धा आहे व त्या बद्दल पुरावा देणे अशक्य आहे. मी काय, कोणीही देऊ शकणार नाही. व जे लोक अशा गोष्टींवर विश्वास
ठेवत नाहीत त्यांना त्याचा त्रास होतो. वाचू नये हे एवड्यापुरते. स्वामी रामानंदांवरील लेखात हे एक वाक्यच असे आहे पण
त्यांच्यावरील लेखात ते गाळण्यासारखे नाही. लक्षात घ्या, पंधराव्या शतकात त्यांच्यावर लोकांची अपार श्रद्धा होती त्यात ही
एक (दंत)कथाही कारणीभूत असणार. जवळ जवळ सगळ्या संताच्या चरित्रात या गोष्टी अपरिहार्य आहेत.
आता थोडे वैयक्तिक. इथे अशी माहीती देणे अयोग्यच. पण मित्रामित्रात गैरसमज नसावेत म्हणून. मी देवळात जातो तेव्हा
नमस्कार करतोच असे नाही, माझे लक्ष शिल्पाकडे असते. सत्यनारायण माझ्या घरी होत नाही, दुसरीकडे बोलावणे आले
तर मी अवष्य जातो, मला शिरा आवडतो म्हणून. मी श्री. ओक वा वर्तक यांची पुस्तके वाचलेली नाहीत (ही बहुदा चूक
असावी!) मी लहानपणी राष्ट्रसेवादलात जात होतो, शाखेवर नव्हे, तेंव्हा लौकिक अर्थाने मला "हिंदुत्ववादी" म्हणावयाचे कारण
नाही. तरीही ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्यावर माझी अढळ श्रद्धा आहे.गाथा=ज्ञानेश्वरी (व त्यांवरील टीका) यांना माझ्या पुस्तक
संग्रहात मेघदूत-गाथासप्तशती यांच्या बरोबरच स्थान आहे. त्यामुळे कोणाची कशावर श्रद्धा असावी यावर मी टोकाची भुमिका
घेत नाही. "बुडती हे जन" म्हणून त्यांना सुधारावे असेही मला वाटत नाही. खैर. खयाल अपना अपना.
आता पुरावे. मी पुरावे देत नाही याचे कारण मला उपक्रम हे स्थळ त्याकरिता नव्हे असे वाटते म्हणून. पण माझ्या विधानांपुरते बोलावयाचे झाले तर किमान ९०% वेळी मी ते देऊ शकेन. व त्याचा मला त्रास नाही. तर मित्रांनी असे प्रश्न
बिनधास्त विचारावेत.
शरद

प्रगल्भ भूमिका

शरदराव,

तरीही ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्यावर माझी अढळ श्रद्धा आहे.गाथा=ज्ञानेश्वरी (व त्यांवरील टीका) यांना माझ्या पुस्तक
संग्रहात मेघदूत-गाथासप्तशती यांच्या बरोबरच स्थान आहे. त्यामुळे कोणाची कशावर श्रद्धा असावी यावर मी टोकाची भुमिका
घेत नाही. "बुडती हे जन" म्हणून त्यांना सुधारावे असेही मला वाटत नाही.

व्व्वा!!

तुमची प्रगल्भ भूमिका आवडली, पटली. तुम्ही निःसंकोचपणे येथे लिहावे असे वाटते. ज्यांना तुमचे लेखन आवडत नाही त्यांचे बोलणे तुम्ही फारसे मनावर घेऊ नये.

(उडाले ते कावळे, राहिले ते मावळे या विचारसरणीचा पुरस्कर्ता) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आजानुरावांशी सहमत

तुम्ही लिहित जा..तुमचे लेख अभ्यासपूर्ण असतात. मनुस्मृतीच्या लेखावेळी मला पडलेला प्रश्न सहजप्रवृत्तीने पडला होता. त्यात कोणताही खोचक आविर्भाव नव्हता. हे मी तेव्हाही लिहिले होते..

अभ्यासपूर्ण लेख कादंबरी प्रकारात लिहिताना लेखकाकडून स्वतःच्या भावना किंवा विचार त्यात प्रवर्तित होण्याची हमखास शक्यता असते..ती जर काळजी घेतली तर उत्तम..(उदाहरण दिलेलं बरं: ग्रीकांनी राम-सीता-लक्ष्मणाच्या शुद्ध आचरणाची लावलेली वाट वगैरे..) त्यामुळे आपलं ते श्रेष्ठ या भूमिकेतून लेख लिहिला गेला आहे असा निष्कर्ष कोणीही काढणं शक्य आहे.

आता मागचं जाऊ द्या..संतांच्या लेखांची वाट पाहतोय...सुरुवातीलाच तुम्ही डिस्क्लेमर दिलाच आहे..की काही कथा दंतकथा असू शकतील. वाचणारेही ते लक्षात ठेवून वाचतील. तुकाराम आणि ग्यानबा सोडून इतर संतांच्या दंतकथा किंवा प्रचलित गोष्टी मला माहीत नाहीत. त्यांची माहिती करून घ्यायला आवडेल..म्हणजे आपल्या पोराबाळांना/पोरीबाळींना सांगता येतील.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

काही शुद्धीकरणे

शरद म्हणतात :

हिमालयात उगम पावून, हरियाना, पंजाब, राजस्थानातून वहात जात गुजराथमध्ये समुद्राला मिळणार्‍या महानदाचे उपग्रहामधून काढलेले चित्रच मिळाल्यावर पहिला अंदाज चुकला असे कबूल करावयास काय हरकत आहे ?

अशी सरस्वती नदी होती ते उपग्रह-चित्रावरूनच कळलेले आहे अशी समजूत चुकलेली आहे. शरद कोसंबी यांचा नामोल्लेख करतात, तर त्यांनी १९५६ साली लिहिलेले (किंवा प्रसिद्ध केलेले) हे उद्धरण बघावे (वर चित्रा यांनी उल्लेख केला आहे, पण त्यात पंजाबातल्या नदीलाच सप्तसिंधूंपैकी मानल्याचे स्पष्ट करण्यासाठी उद्धरण देतो आहे) :

सात नद्यांची भूमी ही अवेस्त्याला आर्यभूमींपैकी एक म्हणून ज्ञात होती. मूळच्या सात महान नद्यांपैकी दोन सुकून गेल्या आहेत : ऋग्वेदातली दृशद्वती ही घग्गर नदीचे कोरडे पात्र आहे, तर सरस्वती (जी त्या काळात तिला मिळत होती आणि सिंधुनदीसह समुद्रात वाहात जात होती) नदी वेदस्पष्टीकरणात्मक जे ब्राह्मण नामक ग्रंथ आहेत त्यांच्या काळात वाळवंटात समाप्त होऊ लागली होती. आज ती पूर्व पंजाबातली एक छोटीशी नदी आहे; तिचे नाव इराणी हरह्वैतीवरुन स्थलांतर केलेले असू शकेल - ही तिग्लाथ-पिलेसेर ३ [असिरियामधील ईसपूर्व ११०० काळातला शिलालेख] लेखातील अरक़त्तु होय. असे असल्यास मूळची सरस्वती ही हेलमंद नदी आहे ; मुंदिगाग [कंदाहार पासून ६० किमी हे गाव आहे] येथील उत्खननातील शोध निष्कर्षाप्रत पोचू शकले नाहीत, तरी पुढील पुरातत्त्वसंशोधकांनी हे तथ्य लक्षात ठेवण्याजोगे आहे. इरावती हे नाव रावी नदीपासून स्थलांतर करून बर्मामधील [म्यानमारमधील] एका नदीला मिळाले ; पंढरपूरजवळ वाहाणारी छोटीशी चंद्रभागा ही चिनाब नदीच्या नावावरून आलेली आहे. [नावांची] अशी स्थलांतरे सामान्य असतात.
An Introduction to the study of Indian History - लेखक : दामोदर धर्मानंद कोसंबी, प्रथम प्रकाशन १९५६. (पॉप्युलर प्रकाशनाच्या २००२ सालच्या पुनर्मुद्रणात वरील परिच्छेद पान ८९ वर आहे.) करड्या ठशातील स्पष्टीकरणे अनुवादक (धनंजय) याची

स्पुटनिक हा उपग्रह १९५७मध्ये अवकाशात गेला हे लक्षात असू द्यावे. आजकालच्या उपग्रहाच्या चित्रातून सरस्वतीच्या खोर्‍याबद्दल अधिक माहिती मिळते आहे, ते उत्तम आहे, शंका नाही. शिवाय उत्खननामुळे तिच्या पात्राच्या शेजारी वस्त्या कुठेकुठे होत्या तेही नेमके कळत आहे. पण उपग्रहामुळे आणि उत्खननामुळे आपल्याला पंजाबातल्या सरस्वतीबद्दल नुकतेच कळले आहे असे म्हणणे अयोग्य आहे. आणि नुकतेच कळले आहे या चुकीच्या कल्पनेतून पूर्वीचे सर्व इतिहाससंशोधन वाचायचे टाळून चालायचे नाही. नवीन माहिती कळेल तशी मते बदलली पाहिजेत हे खरे, पण येथे आमूलाग्र नवीन अशी काय माहिती आहे?

सरस्वतिबद्दलचे सूक्त आणि नदीस्तुतीचे सूक्त - तसेच ऋग्वेदातील खूपच सूक्ते - सप्तसिंधुप्रदेशात रचली गेली हे भारतातील इतिहाससंशोधकांचे मत फार आधीपासून आहे. (वरील उद्धरणात "ऋग्वेदातील दृशद्वती आणि सरस्वती" हा वापर बघावा.) शरद यांनी वाचलेली पुस्तके आधी असा खोटा आरोप करतात, की हल्लीच्या काळाच्या आधी इतिहाससंशोधक समुद्राशी जाणारी सरस्वती काल्पनिक मानत (कोण काल्पनिक मानत? प्रयागक्षेत्रीच्या सरस्वतीचे भक्त समुद्राशी जाणार्‍या सरस्वतील काल्पनिक मानत असतील तर असतील, इतिहाससंशोधक नव्हेत) आणि नदीसूक्तातील सरस्वती हीच अफगानिस्तानात मानत (नदीसूक्तातील सरस्वती ही सप्तसिंधू प्रदेशातलीच असे खरे मत आहे), आणि या खोट्या नाट्या आरोपाला उपग्रहचित्राने "असिद्ध" करतात. उलट उपग्रह-चित्राने आधीच्या कल्पनांना पुष्टी दिली आहे, आणि त्यात तपशील भरले आहेत.

वरील लेख काही युरोपियन लोकांच्या पूर्वग्रहावरून सर्व युरोपियनांबद्दल आपला पूर्वदूषितग्रह करून घेणारा आहे, अशी शंका मला येत आहे. काही युरोपियन लोक अशिक्षित आणि अहंमन्य असतात, आणि काही अभ्यासकांमध्ये युरोपियन वर्चस्व सिद्ध करायची इच्छा सर्वतोपरी असते, हे खरे आहे. पण ई.स.पूर्व ५-६व्या शतकात गौतम बुद्ध झाला, तेव्हा उत्तर भारतात तरी पंजाबापासून बिहारापर्यंत प्रगत नागर संस्कृती होती असेच कुठलाही गंभीर युरोपियन अभ्यासक म्हणतो. मग तो भारतीयांना महान म्हणणारा मॅक्सम्युल्लर असो की भारतीयांना हीन म्हणणारा मॅकॉले असो. येथे सुद्धा युरोपियन अभ्यासकांचे संशोधन तपासल्याशिवाय त्यांच्या हेतूबद्दलच्या पूर्वदूषितग्रहामुळे संशोधन बाद करणे म्हणजे घिसाडघाईच होय.

ऋग्वेदामधील सूक्तांपैकी किती भारतात (सप्तसिंधू प्रदेशात) रचली गेलीत याबद्दलही पूर्वीच्या इतिहाससंशोधकांना लेखात दूषण दिल्यासारखा भास होतो आहे. ऋग्वेदात १०२८ सूक्ते आहेत. पैकी त्यातल्या त्यात "नव्या" अशा पहिल्या आणि दहाव्या मंडलांत १९१+१९१= ३८२ सूक्ते आहेत. त्याच्यापेक्षा थोड्याच जुन्या ८व्या आणि नवव्या मंडलांत १०३+११४ = २१७ सूक्ते आहेत. म्हणजे १, ८, ९, १० या त्यातल्या त्यात नवीन मंडलांत मिळून ५९९ सूक्ते आहेत - अवघ्या ऋग्वेदाच्या अर्ध्यापेक्षा अधिक सूक्ते. ही मंडले नवीन आहेत याबाबत अन्य इतिहास-संशोधकांमध्ये मतभेद नाहीत. तर मग वरील लेखात नेमके काय सांगितले जात आहे, ते कळत नाही.

शरद म्हणतात की ऋग्वेदरचनाकाळ इतका मोठा आहे, की त्यातील काही भाग उत्तरध्रुवप्रदेशात रचला गेला (लोकमान्य टिळकांच्या या कल्पनेला आणखी कुठलाही आधार नाही असे मला वाटते, ते क्षणभर बाजूला ठेवूया, येथे लेखातील मत विचारात घेतो आहे), आणि काही भाग सप्तसिंधू प्रदेशात येइपर्यंत रचला गेला आणि त्यातल्या त्यात मोठा भाग सप्तसिंधू प्रदेशात रचला गेला.

"उत्तरध्रुव" हा तपशील बाजूला ठेवला तर कोसंबी तरी वेगळे काय मत सांगतात? मग पूर्वीच्या इतिहाससंशोधकांना दूषण देण्याचे कारण काय. फार तर इतकेच, की अफगानिस्तानातील (किंवा अवेस्त्यातील) हरह्वती ही (कधीच) सरस्वती नसल्याचे खूळ विनापुराव्याने काढणे. कोसंबी यांनी असिरियन शिलालेखाचा उल्लेख दिला आहे, तो अरकत्तु. अवेस्त्यात हरह्वती या नदीचा उल्लेख आहे.

आवेस्त्यातील भाषेचा आणि संस्कृत भाषेचा तौलनिक अभ्यास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पाणिनीच्या महत्कार्यामुळे लौकिक आणि वैदिक "संस्कृता"चे (त्या काळात त्या भाषेला "संस्कृत म्हणत नसत) उत्तम वर्णन आपल्यापाशी आहे, मात्र पुरातन पारसीक भाषेचे तसे उत्तम वर्णन उपलब्ध नाही. अर्थातच तौलनिक अभ्यास संस्कृताला ठाम पाया मानून त्या ठाम पायाशी तुलना करत झालेला आहे. संस्कृत ही अवेस्त्याच्या भाषेपेक्षा पुरातन आहे म्हणून नव्हे.

स->ह आणि ह->स हा मुद्दा कोड्यात टाकणारा आहे. पैकी कुठली अपेक्षा शरद करत आहेत, आणि का? अवेस्त्यातली भाषा ही संस्कृताची जननी नव्हे, आणि संस्कृत ही अवेस्त्यातील भाषेची जननी नव्हे. त्या दोन्ही भगिनी-भाषा आहेत. हरह्वतीचे पुरातन इराणी रूप "सरस्वन्ती" आहे असे विकीपेडियामध्ये दिसते.

अवेस्त्यात देवासुरवितुष्टाची वार्ता असुरांच्या बाजूने मांडली आहे. असुरांच्या यज्ञांमध्ये विघ्नकर्ते हे देव ("दएव") होते. वेदांमध्ये देवासुरवितुष्टाची वार्ता देवांच्या बाजूने मांडली आहे. सप्तसिंधूमधले लोक (कोकणातल्यासारखे) इराणात गेले आणि आपल्या सप्तसिंधू सरस्वतीचे नाव तिथल्या नदीला दिले, असा अट्टाहास करायचा, तर मग देवासुरवितुष्टही सप्तसिंधूप्रदेशातच घडवावे लागेल. आवेस्त्यात सप्तसिंधूप्रदेश वेगळा सांगितला आहे, त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करावे लागेल. हे सर्व कसल्या अट्टाहासापायी? देवासुरवितुष्ट कुठेतरी झाले, त्यातील असुरांचे वंशज (किंवा असुरांचा महिमा गाणारे लोक) हे इराणातले पारशी, तर देवांचे वंशज (किंवा देवांचा महिमा गाणारे लोक) हे वैदिक हे सध्याचे स्पष्टीकरण टाळून अवेस्त्याच्या पूर्ण अभ्यासाचे पुन्हा काही सयुक्तिक वर्णन द्यायला पाहिजे. हे सर्व कसल्या अट्टाहासापायी? उपग्रहचित्रापूर्वी पंजाबातल्या सरस्वतीची कुणकुण नव्हती असे म्हणण्यासाठी?

मला आसे वाटते आहे, की काही दशकांपूर्वी जे लोक गंगा-यमुनेच्या प्रयागातच सरस्वती बघत त्यांना काही कारणासाठी हल्लीच पंजाबातील सरस्वतीचा साक्षात्कार झाला आहे. त्यांच्या नावडत्या इतिहास-संशोधकांना हे आधीच माहीत होते, पण त्या इतिहाससंशोधकांचा दु:स्वास अबाधित करता यावा म्हणून याच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का?

काही शंका

उत्तर ध्रुवावरून आर्य भारतात आले या संकल्पनेला टिळकांशिवाय आणखीही कोणी मान्यता दिली आहे काय? किंवा यावर अधिक संशोधन झाले आहे काय?

जेथे वातावरण खडतर आहे, पशुपालन करणे थंडीच्या दिवसांत कठिण आहे, जेथे काही पिकत नाही, ज्या भूमीवर जगण्यासाठी खडतर परिश्रम करावे लागतात, हजारो वर्षांपूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी उत्तम सामग्री नाही, तेथे तथाकथित आर्यांनी जाऊन राहण्याचे प्रयोजन काय असावे? प्राचीन काळी - मेसोपोटेमिया, इजिप्त, भारत वगैरे प्रदेशांत नद्यांच्या काठी वस्ती फुलल्याचे दाखले दिसतात. उत्तर ध्रुवावर नदी नसताना पाण्याचा स्रोत कोणता असावा? माणसाला [ माणसाला म्हणजे एका माणसाला नव्हे तर समाजाला कारण ही एका माणसाची वेडी दौड नाही] ध्रुवापर्यंत गेल्यावर तो प्रदेश वस्ती करण्यालायक नाही याची उपरती झाली असावी का? तेथे जाऊन दिवस-रात्री व्यतीत करण्याचे नेमके कारण कोणते असावे? की येथे पृथ्वीचा उत्तर ध्रुव अपेक्षित नसून स्वीडन, नॉर्वे, कॅनडा सारखे आजूबाजूचे देश गणायला हवेत? तसे असल्यास तेथे ध्रुव तारा डोक्यावर दिसू शकतो का?

संदर्भ/आर्य/उत्तर ध्रुव?

यासंबंधी धनंजय यांच्या माझे काल/आजच खरडवहीत बोलणे झाले, त्या खरडी बघाव्यात.
त्यापैकी माझ्या एका खरडीतला काही भाग इथे देते आहे.

" मी सध्या ओरायन नाही, पण आर्क्टिक होम वाचत आहे. ओरायन वाचले की काय वाटले ते लिहीनच. पण या दुसर्‍या पुस्तकात आधी दिलेल्या ऋचेखेरीज ध्रुव प्रदेशाशी उषांचा संबंध लावला आहे. उदा.
पर ऋणा सावीरध मत्कृतानि माहं राजन्नन्यकृतेन भोजम् |
अव्युष्टा इन्नु भूयसीरूषास आ नो जीवान्वरूण तासु शाधि || २.२८.९
Move far from me what sins I have committed: let me not suffer, King, for guilt of others.
Full many a morn remains to dawn upon us: in these, O Varuna, while we live direct us. (ग्रिफिथ)

Remove far the debts (sins) incurred by me. May I not, 0 King ! be affected by others' doings. Verily, many dawns (have) not fully (t») flashed forth. 0 Varuna ! direct that we may be alive during them." (टिळक)

दोन्हीत तसा फार भेद नाही. पण याचा संबंध phenomenon of the long continuous dawn in the Arctic regions, a dawn, that lasted for several day-long periods of time before the sun's orb appeared on the horizon. असा मी लावला नसता.. मला फार तर असे वाटते की अजून अशा अनेक उषा पाहण्याची (पहाटींची) अपेक्षा आहे (अधिक जगण्याची आहे)..

शिवाय ही ऋचा ज्या मंडलात आली आहे त्यातच जे वर्णन खालीलप्रमाणे (ग्रिफिथ) दिलेले आहे, ते पाहता हा ध्रुव प्रदेश वाटत नाही. नद्या वाहत आहेत (अथक), पक्षी इ. उपमा आल्या आहेत. ही ऋचा याच कॉन्टेक्स्टमध्ये पाहिली पाहिजे.

4. He made them flow, the Aditya, the Sustainer: the rivers run by Varuna's commandment.
These feel no weariness, nor cease from flowing: swift have they flown like birds in air around us.
5. Loose me from sin as from a bond that binds me: may we swell, Varuna, thy spring of Order.
Let not my thread, while I weave song, be severed, nor my work's sum, before the time, be shattered.

त्यामुळे आर्क्टिक होमबद्दलची कल्पना अजिबात पटत नाही. त्यापेक्षा आर्य सध्याच्या भारताच्या जवळच्या प्रदेशात होते असे समजणे अधिक इष्ट आहे."

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

मानवी स्थालांतर

मानवी स्थलांतराबद्दल हा दुवा बघावा. इ.स.पूर्व ४०००० ते २५००० वर्षांपूर्वी आधुनिक मानवाने प्रथम सैबेरियाच्या दिशेने, हवामान अनुकुल असल्याने, स्थलांतर केले . यापैकी काही लोक इ.स.पूर्व २५००० ते २२००० या कालात पुढे अलास्कावरून अमेरिका खंडात पोचले. यानंतर इ.स.पूर्व २२००० ते १९००० या कालात बर्फयुग सुरू झाले व आर्टिक सर्कलमधील लोक परत दक्षिणेकडे परतले तर अमेरिका खंडात पोचलेले मानव अमेरिकेत दक्षिणेला गेले. इ.स.पूर्व १९००० ते १५००० या कालापर्यंत तरी आधुनिक मानव परत आर्टिक सर्कलमधे गेला नव्हता. इ.स.पूर्व १२५०० ते १०००० या कालात मानव परत आर्टिक सर्कल मधे गेला.
या टाइमलाईन वरून असे दिसते की आर्य हा गट जर सैबिरियामधून परत दक्षिणेला आला असला तर त्यासाठी इ.स.पूर्व २२००० ते १९००० हाच कालखंड शक्य आहे. ऋग्वेदातील वर्णनांप्रमाणे सर्वात पुरातन ज्ञात काल हा इ.स.पूर्व १०००० आहे.( वसंतसंपात बिंदू, आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रांमधे आहे) त्याच्या १०००० वर्षे आधीचा इतिहास काव्यातून जतन झाला असेल असे मानणे खूप कठिण आहे.

आर्य हा गट इ.स.पूर्व १०००० मधे सैबेरियाहून परत मध्य एशियामधे आला असेल हे संभवनीय वाटत नाही. आर्य लोक मध्य एशियामधलेच असावेत ही शक्यता जास्त योग्य वाटते. ऋग्वेदातल्या मोठ्या रात्री अनुभवण्यासाठी आर्टिक सर्कलमधेच गेले पाहिजे असे नाही. अर्थात हे सर्व तर्क आहेत. आधार पुरावा काही नाही.
चन्द्रशेखर

प्रश्न

ऋग्वेदातल्या मोठ्या रात्री हे नक्की कुठच्या ऋचांवरून म्हटले जाते?

धन्यवाद

चित्राच्या खरडवहीतील खरडी (वरील प्रतिसाद) आणि चंद्रशेखर यांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद. आर्यांचे स्थलांतर खरेच उत्तर ध्रुवापासून झाले असावे का काय याबाबत नेहमीच मनात शंका होत्या. असो.

सार

सगळ्या चर्चेवरून खालील गोष्टी मान्य करायला हरकत नाही.

१. आर्य केव्हातरी पश्चिमेकडून भारतात आले.
२. जरी ते बाहेरून आले असले तरी वेदांची काही रचना भारत- पाकिस्तान-अफगाणिस्तान या भागात झाली. आणि कदाचित वेदातले काही उल्लेख भारताबाहेरच्या घटना/परिस्थितीचे वर्णन करीत असल्या तरी त्यांची रचना जुन्या आठवणी म्हणून इकडेच झाली असावी.
३. आर्य आणि एतद्देशीय यांची युद्धे लौकिकार्थाने झाली नसावीत. परंतु संघर्ष झाला असावा.
(युद्धे सहसा प्रदेश अधिपत्याखाली ठेवण्यासाठी किंवा मालमत्ता बळकावण्यासाठी होऊ शकतात. अशा स्वरूपाची मालमत्ता म्हणजे घरे-दारे इत्यादि पशुपालन करणार्‍या आर्यांच्या दृष्टीने निरुपयोगी होती. बाकी मालमत्ता म्हणजे गुरे आणि शेते. त्यासाठी संघर्ष झाला असावा).

चू भू दे घे

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

संघर्ष

हे सर्व अजून मान्य करता येईल (निदान वरील चर्चेवरून) असे मला वाटत नाही.

काही शुद्धीकरणे

आपल्याच लेखाची वाट पहात होतो. नाही तर १०००० ऋचा ही थाप तरी कोणी शोधेल अशी आशा करण्यात अर्थ नव्हता.
(१)सरस्वती-हरहृती यांच्या बद्दल लिहण्याचे एकमेव कारण वेदात वर्णन कोणत्या नदीचे एवढ्यापुरतेच.
नद्या दोन. एक भारतातील हरियाना-पंजाब-राजस्थान-गुजराथ मधून वाहणारी , समुद्राला मिळणारी ..... सरस्वती.
दुसरी इराणमधील हरहृती.(हेलमंड) ही अफगाणीस्थानात उगम पावून इराणमध्ये प्रवेश करते.ही नदी समुद्राला मिळत नाही तर दलदलीमध्ये नाहीशी होते.
प्रश्न ; वेदात वर्णन केलेली सरस्वती कोणती ?
वेदात वर्णन केलेल्या, सरस्वतीला मिळणार्‍या, इतर नद्या भारतात आढळतात. सरस्वती नदी इ.स.पूर्व ३००० पर्यंत मोठी नदी होती.
भौगोलिक व हवामानातील बदलांमुळे तीला मिळणार्‍या नद्यांनी दिशा बदलल्या व हळुहळु सरस्वती आक्रसू लागली. समुद्राला मिळावयाऐवजी ती जेमतेम राजस्थानापर्यंतच वाहू लागली. इ.स.पूर्व १९०० च्या सुमारास ती जवळजवळ नाहीशी झाली. हे सर्व बदल वाङ्मयात पहावयास मिळतात. प्रथम ती धोंधों वहाणारी होती तेव्हा ती गंगेपेक्षा श्रेष्ठ होती. नंतर ती लहान होवू लागली तसे गंगेचे माहात्म्य वाढले. बलराम तीच्याबाजूची तिथे करतो तेव्हा ती आक्रसलेलीच होती. राजस्थान-पंजाब-हरियाना येथील उत्खननात सापडलेली गावे तीच्या लुप्त होणार्‍या प्रवाहाची साक्ष आहेत. ती सिन्धूला मिळत नव्हती तर जवळजवळ समांतर वहात वहात समुद्रालाच मिळत होती.
आता अफगाणीस्थान-इराण मधून वाहणारी नदी. वेदात वर्णन केलेल्या इतर नद्या सापडत नाहीत. ही समुद्रालाही मिळत नाही. नामसादृशाशिवाय इतर कोणताही पुरावा तीला वेदात वर्णन केलेल्या नदीशी जोडत नाही.
वेदातील सरस्वती व अवेस्तातील हरहृती एकच हा निष्कर्ष पूर्वीच्या विद्वानांनी काढला. तो पटत नाही.
वेदात वर्णनेली सरस्वती ही भारतातीलच व तीचे वर्णन जेथे आहे तो वेदाचा भाग भारतातच रचला गेला. याची सुरवात साधारणत: इ.स.पूर्व ३००० वा त्याच्या आधी. हे माझे मत.

(२)आता स आणि ह चा विचार. एकोणिसाव्या शतकात हिमालयापासून समुद्रापर्य़त वाहणारी सरस्वती पहाता येत नव्हती. पण संस्कृतमधील स चा अवेस्थामध्ये ह होत असेल तर (जसे असूर=अहूर) तर सरस्वतीचे नाव हरहृती होईल. त्या नावाच्या नदीचा उल्लेखही मिळतो व प्रत्यक्षात ती नदीही पहाता येते. यावरून असा निष्कर्ष काढला गेला की वेदात वर्णन केलेली नदी म्हणजे हरहृती. केवळ भाषाशास्त्रातील एकमेव साम्यावरून असे ठरवणे योग्य वाटत नाही.
यातील आणखी एक मुद्दा म्हणजे कोणते नाव पहिले ? सरस्वती की हरहृती ? समजा आर्य इराण-अफगाणिस्थानातून भारतात येतांना त्यांना हरहृती नदी लागली. पुढे भारतात आल्यावर त्यांना एक नदी लागली , त्यांनी जुन्या नदीचे नाव या नव्या नदीला ठेवले. पण संस्कृतात ते झाले सरस्वती. शक्य आहे. दुसरी शक्यता ही की भारतात नदीचे नाव सरस्वती, तेथून पश्चिमेला जाणार्‍य़ा लोकांनी तेथील नदीला तेच नाव ठेवले पण ते झाले हरहृती. दोन्ही गोष्टी शक्य आहेत. पण आता काळ बघा. वेद लिहले गेले इ.स.पूर्व ३००० च्या सुमारास. अवेस्थाचा काळ दिला आहे इ.स.पूर्व १००० च्या आसपास. झरस्तृष्टाचा काळ मागे गेला तरीही इ.स.पूर्व १२०० ते १४००. तेव्हा वेदातल्या सरस्वतीचे नाव अवेस्तात हरहृती झाले असावे हे जास्त संयुक्तिक वाटते. अर्थात हे पटले न पटले तरी वेदातील सरस्वती भारतातील याला त्याने बाधा येत नाही.

(३)आता कोसंबींबद्दल. मी कोठेही डॉ. कोसंबी चूक असे लिहलेले नाही. लिहले एवढेच की
सुरवातीच्या विद्वानांची , मग ते मॅक्समुल्लर असोत वा कोसंबी, मते नवीन, शास्त्राने सिद्ध होणार्‍या कसोट्यांवर तपासून घेतली पाहिजेत.
काय चुकले ? या विद्वानांबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांनी अपार परिश्रमाने काही सिद्धांत मांडले त्या बद्दल आपण त्यांचे उपकृत आहोत. पण म्हणून वरील विधान चूकीचे होत नाही. आता श्री. धनंजय म्हणतात त्याप्रमाणे उपग्रह १९५७ मध्ये सोडले असले तरी नदीची उपग्रहातून काढलेली चित्रे १९८०-९० च्या आसपासचीच. कोसंबींच्या काळातील नाहीत. १९५७ ला सरस्वतीची चित्रे उपग्रहातून काढली गेली असे माझ्या वाचनात नाही.संदर्भ मिळाला तर माझी माहीती/ मत दुरुस्त करून घेईन. " ऋग्वेदातील दृशद्वती ही घग्गर नदीचे कोरडे पात्र आहे तर सरस्वती ( जी त्याकाळात तीला मिळत होती आणि सिंधुनदीसह समुद्राला वाहात जात होती " हे पटणे जरा कठीण आहे. एक तर सरस्वती दृशद्वतीपेक्षा बरीच मोठी
होती व दुसरे म्हणजे सिंधु-सरस्वती कधीच मिळत नव्हत्या, त्यामुळे सिंधुनदीसह वाहात जाणे बरोबर वाटत नाही. सिंधुनदीसारखी तर म्हणावयाचे नाही ना ?
(४)लेख लिहण्याचे प्रमुख कारण श्री. चंद्रशेखर यांनी ऋग्वेद मध्य एशियामध्ये रचला असे लिहले ते पटले नाही म्हणून. आपणच सांगा किती भारतात व किती भारता बाहेर. आपला निर्णय मला मान्य. केवळ ही मंडले जुनी, ही नवी म्हणून मला तरी काय कळत नाही बुवा.
(५)काश्मीरमधील चंद्रभागा (चिनाब) नदीवरून भीमेचे नाव चंद्रभागा पडले ही माहीती नवीन. भीमा पंढरपूरजवळ चंद्रकोरीसारखा बाक घेते म्हणून तीला चंद्रभागा म्हणतात अशीच समजूत आहे. बाकी एका नदीचे नाव अनेक नद्यांना मिळते हे सर्वमान्य.
(६) देवासूर वितुष्टाबद्दल: एक देवांना विघ्नकर्ता म्हणतो तर दुसरा असूरांना. या संदर्भात राजारामशास्त्रींनी मांडलेले विचार आपल्याला पटतात का ? आम्हाला कळेल असे सांगा ना.
(७) देव-असूर हे भाऊबंद हे मत मागेच मांडले आहे. राजारामशास्त्री त्याला पाठिंबा देतात म्हणून.
(८) " प्रयागमध्ये सरस्वती गुप्त रूपाने मिळते " ही भंपकबाजी असे मागेच लिहले आहे. ते मानणार्‍या लोकांचा इथे संबंध काय ?
उत्खनने व उपग्रह-चित्रे यांच्या आधी सरस्वतीबाबत Visual Proof नव्हते हे तरी खरे आहे ना ?
शरद

ऋग्वेद आणि मध्य एशिया

लेख लिहण्याचे प्रमुख कारण श्री. चंद्रशेखर यांनी ऋग्वेद मध्य एशियामध्ये रचला असे लिहले ते पटले नाही म्हणून.
मी माझे मत परत एकदा सांगतो. ऋग्वेदातील जुन्या ऋचा मध्य एशियामधे रचल्या गेल्या असाव्यात. त्या मानाने नवीन किंवा पुढील काळात रचलेल्या ऋचा कोठे रचल्या गेल्या असतील ते सांगणे कठीण आहे. परंतु त्यापैकी काही भारतीय द्वीपकल्पात रचल्या गेल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरा महत्वाचा मुद्याकडे श्री शरद सतत काणाडोळा करत आहेत तो असा की सिंधु खोर्‍यातील उत्खननात आर्य संस्कृतीच्या कोणत्याही खुणा सापडत नाहीत. इ.स.पूर्व १७०० या कालापर्यंत आर्य भारतात नव्हते असेच या वरून सिद्ध होते.
चन्द्रशेखर

काही स्पष्टीकरणे

१. उपग्रह चित्र आणि चक्षुर्वै सरस्वती :
"पुस्तक १९५६मध्ये लिहिले, पहिला उपग्रह १९५७ मध्ये सोडला" याचा अपेक्षितापेक्षा उलट अर्थ घेतला जात आहे :-)
१९५६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात चक्षुर्वै जमिनीवरून बघितलेल्या सरस्वतीचा उल्लेख आहे. जर प्रथम स्पुटनिकच १९५७ मध्ये सोडला गेला तर उपग्रह चित्रे येणारच नाहीत. ([आजकालच्या] हरियाण्यातली सरस्वती नदी ही राजारामशास्त्री भागवतांनाही माहीत होती - तीसुद्धा चक्षुर्वै जमिनीवरून बघितलेलीच!)
माझे म्हणणे स्पष्ट नसल्यामुळे शरद यांनी म्हटले :

उत्खनने व उपग्रह-चित्रे यांच्या आधी सरस्वतीबाबत Visual Proof नव्हते हे तरी खरे आहे ना ?

खरे नव्हे! उपग्रह आणि उत्खननापूर्वी सरस्वतीचे चक्षुर्वै दर्शन झाल्याचा आलेख [फार पूर्वी राजारामशास्त्र्यांच्या लेखांत] आणि १९५६ मध्ये कोसंबींच्या लेखात झालेला आहे. या सरस्वतीवर अनेक तीर्थे, देवळे वगैरे आहेत. जुन्या नकाशांमध्ये मुघल आणि इंग्रज काळातही हिच्या वाहात्या प्रवाहाला सरस्वती/सरसुती/सरसुत्ती वगैरेच म्हणत असत. भागवत किंवा कोसंबी यांच्या संदर्भाची गरज नाही. बाकी भरपूर संदर्भ मिळतील.

१९८० मध्ये यश पाल यांनी प्रसिद्ध केलेल्या चित्रातून काहीतरी दिसले. विहंगावलोकनाचा काही फायदा असतोच. पण कुठली "नदी" दिसली नाही. आधीच्या जमिनीवरील सर्वेक्षणांनी दिसलेले "ड्रेनेज स्कार" (प्रवाहांच्या सुक्या खरड-रेषा) त्याच दिसल्या. विहंगावलोकनाचा फायदा आहे (सर्व खरड-रेषा एका कॅमेर्‍यातून घेतल्यामुळे जोडणे सोयीस्कर होते) हे आहेच. पण आधीच्या सर्वेक्षणांतही त्यातल्या त्यात मोठ्या खरड-रेषा - म्हणजे घग्गर-हाकरा पात्रे ही चक्षुर्वै दिसलेली होती. शिवाय आधीच्या सर्वेक्षणांत काही नाल्यांची नोंद चुकलेली होती, ते नकाशे उपग्रहचित्राने ठीक करता आली. हासुद्धा फायदाच आहे. (पुनश्च : उपग्रहचित्राचा फायदा आहे. पण आमूलाग्र नवीन माहिती नाही.)

उपग्रहातील छायाचित्रांनी जुने पात्र अवघे जोडलेले दिसते असा काही गैरसमज पसरलेला दिसतो. तर तसे नव्हे. हरियाण्यातून कच्छच्या रणापर्यंत अशी एक (वळणदार) रेषा दिसलेली नाही. अनेक तुटक रेषा दिसतात. (म्हणजे व्हिजुअल प्रूफ वगैरे नाही. पूर्वीच्या जमिनीवरील चक्षुर्वै सर्वेक्षणांना मदत करणारे हेसुद्धा सर्वेक्षणच होय.) इतकेच काय. जमिनीवरील सर्वेक्षणांत घग्गर/हाकराचे रुंद पात्र बहावलपूर जिल्ह्यात फुटून अनेक पात्रे होतात असे दिसले होते, तेच उपग्रहातील चित्रांत दिसते. म्हणजे बहावलपूरच्या पुढे ही नदी कशी जात होती, हे अजून "चक्षुर्वै" नव्हे तर अनुमानितच करावे लागते आहे. (पुढे नारा नदीच्या पात्राला सरस्वती म्हटले आहे, पण भंगलेले हाकरा पात्र आणि नारा पात्र यांची जोड उपग्रहचित्रातही चक्षुर्वै नव्हे, तर अनुमानितच आहे.) देरावरच्या पुढे उत्खननातही काही सापडलेले नाही, त्यामुळे हे कोडे अजून सोडवण्यासाठी भविष्यातील संशोधनाची गरज आहे.

२. "गिरी फोडून, किनारे फोडून समुद्रापर्यंत जाणारी नदी"
सरस्वती नावाच्या अनेक नद्या आहेत. आता त्यांच्यापैकी गिरी-काठ फोडून "समुद्रा"पर्यंत जाणार्‍या किती? हरियाण्यातील सरस्वतीबद्दल चर्चा झालीच आहे. शरद यांची शंका अफगानिस्तानामधील नदीबाबत आहे.
डोंगर/काठ फोडणारी : हेलमंद नदी हिंदुकुशाच्या बर्फाळ डोंगरातून उगम पावते. गंगा-सिंधूंसारखी ती मोठी नसली (गंगा-सिंधूंइतक्या कृष्णा-गोदावरीही मोठ्या नाहीत), तरी हिमालय आणि हिंदुकुशांच्या मधल्या विस्तीर्ण देशातली ती सर्वात मोठी नदी आहे. हिंदुकुश हे बर्‍यापैकी उंच डोंगर आहेत. "डोंगर फोडणारी" ही आहे. दर हिवाळ्यानंतर या (हेलमंद ही अवेस्त्यातील हएतुमंत, अर्ग़ंदब ही हरह्वैती) नद्यांमध्ये प्रचंड पूर येतो (येत असे, आजकाल बांध आहेत). १९०६ मध्ये रॉयल जियोग्राफिकल संस्थेत एच. मॅकमहोन यांनी अफगा़निस्तानातील सेइस्तान प्रांताचे सर्वेक्षण सादर केले. त्यात वर्णन आहे, की दर वर्षी पाण्याचा जोर कमी होता शेतकरी हेलमंद नदीवर लाकूडफाटा टाकून प्रचंड बांध बांधीत, आणि आडलेल्या पाण्यावर गुजारा करीत, पण दरवर्षी नदीच्या पुरात ते बांध वाहून जात. मॅकमहोन यांनी मोजमाप केले की सेइस्तान मध्ये पोचेपर्यंत हेलमंद नदीत दर १२७ भागांत १ भाग रेतीचा साका असे (आणि हे बाकी नद्यांपेक्षा अधिक आहे, असे म्हटले आहे.) अर्थातच ही नदी किनार्‍यांची धूप (फोड) करणारी आहे, गिरीची फोड करणारी आहे.

"समुद्राला मिळणारी नदी" : "समुद्र"चा अर्थ "पाणी एकत्र मिळते ते ठिकाण" (धातु सम्+उत्+ऋ). हे ठिकाण खूप मोठे असते. मध्य आशियातील भल्या मोठ्या सरोवरांना आजकालही "अमुकतमुक समुद्र" म्हणतात (उदा. : अराल, कास्पियन समुद्र). हेलमंद ज्या तळ्यात समाप्त होते, त्या हामुन-(ए)-हेलमंद तळ्याला "हेलमंद समुद्र म्हणत नाहीत. (हामुन = पूर्वीचे सामुन? पण फारसीचा व्युत्पत्तिकोश माझ्यापाशी नाही, म्हणून हे सोडूया.) या भागाला पूर्वी कधी समुद्र म्हणत असत का? तर होय. आजही या भागाला "जी़र्रा" म्हणतात, आणि अवेस्त्यात याला "ज्रयह" हे नाव होते. "ज्रयह"चा अर्थ समुद्र होतो. (फारसीमध्ये ज्रयह् ->द्रयह् होतो, अर्थ मोठी नदी किंवा समुद्र. ("ज्रयह्"बद्दल - केम्ब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया, १९३८ प्रत गूगलवर उपलब्ध आहे.) पण या "द्रयह्" चा संबंध संस्कृत "समुद्र"शी व्युत्पत्तिजन्य नाही, केवळ अर्थ-संबंधच आहे. (हे वाक्य माझे मत.)
अराल "समुद्र" जसा आता आटला आहे, तसेच हामुन-ए-हेलमंद सरोवरही आता आटले आहे. या तळ्याच्या प्राचीन विस्ताराचे मरुस्थल ५०० किमि * ३०० किमि असे मोठे आहे. या तळ्याला अवेस्त्यात "समुद्र" म्हणत असत. तोच समुद्रार्थक शब्द अपभ्रष्ट स्वरूपात आजही वापरात आहे. तर याला मिळणार्‍या नद्या "समुद्राला मिळाल्या" असे म्हणण्यास हरकत नसावी. (तिरप्या ठशातील मत माझे. बाकी भूगोल वगैरे अन्य स्रोतातून.)

"स आधी की ह" विरुद्ध "अवेस्ताभाषा आधी की संस्कृत" :
शब्दाद्य-स आधी, शब्दाद्य-ह नंतर. पण त्याच प्रमाणे आवेस्त्यातला "ज्द" आधी, त्या ठिकाणी संस्कृतातला "द/ढ" वगैरे नंतर.(संस्कृत मीढ, अवेस्त्यात मिज्द, ग्रीकात मिस्तोस्). त्याच प्रमाणे अवेस्त्यातले ज्द जुने, संस्कृतातले द्द/हत नवे (अवेस्त्यातील मज्द, विस्त, संस्कृतातले महत्, वित्त).
अवेस्त्यातली भाषा संस्कृताच्या आदली नाही की नंतरची नाही - समांतर आहे. आदल्या भाषेत शब्दाद्य-स आणि शब्दमध्य-ज्द दोन्ही होते. संस्कृतात जुन्या (आता लुप्त) आद्यभाषेतील शब्दाद्य-स आला, पण शब्दमध्य-ज्द आला नाही. अवेस्त्यात जुन्या (आता लुप्त) आद्यभाषेतील शब्दमध्य-ज्द आला पण शब्दाद्य-स बदलून स->ह झाला. अवेस्त्यातही "जुनी अवेस्त्याची भाषा/नवी भाषा" असा फरक आहे. वाहावत जाऊ नये म्हणून येथेच थांबवतो.

३. कुठल्या नदीच्याशेजारी उत्खननात अधिक प्राचीन स्थाने सापडतात :
हेलमंदच्या शेजारी मुंदिगाक येथले अवशेष ~३०००-२००० ई.स.पूर्वचे आहेत, तर हरियाणामधील बहुतेक अवशेष "लेट-हराप्पा" ~२००० ई.स.पूर्व काळातले आहेत. (मुंदिगाक येथे हराप्पा शैली तसेच अन्य शैलीचे अवशेष दिसतात.) दोन्ही नद्या वेगवेगळ्या काळातल्या "वैदिक सरस्वती" असण्यास मुभा आहे.

वेदातील सरस्वती व अवेस्तातील हरहृती एकच हा निष्कर्ष पूर्वीच्या विद्वानांनी काढला. तो पटत नाही.

वेदातली जुन्या मंडलातली आणि नव्या मंडलांतली सरस्वती ती एकच असे म्हणणारे पूर्वीचे विद्वान कोण आहेत?

राजारामशास्त्री भागवत यांचे मत :
राजारामशास्त्री भागवत यांच्या लेखांपैकी "ब्राह्मण आणि त्यांचा धर्म" असा लेख "लेखसंग्रह -२" मध्ये सापडला. भागवत वेद, स्मृतींपैकी मुख्य म्हणून मनुस्मृती यांना समसमान महत्त्व देतात. (त्यांना हरियाणामधल्या दृश्य सरस्वतीबद्दल माहीत आहे, हे आधी सांगितलेच आहे.) पुराणांतील तीर्थमाहात्म्यावरून ते सप्तसिंधूंमध्ये गंगा-यमुनेचा समावेश करतात. राजारामशास्त्र्यांकडे संशोधनाची साधने फार कमी होती. त्यांचे बहुतेक निष्कर्ष शब्दांच्या नव्या व्युत्पत्ती काढून झालेल्या दिसतात. त्या काळासाठी त्यांचे कार्य मला प्रशंसनीय वाटले, तरी संशोधन-साहित्याच्या अभावामुळे मला त्यांचे निष्कर्ष फारसे लागू वाटत नाही. (आणि "संस्कृताला इतिहास आणि सारस्वत=साहित्य नाही" वगैरे निष्कर्ष ते वेगळ्या लेखांत काढतात, तेव्हा भावनेने वाहून जायचा धोका त्यांच्या विचारपद्धतीत दिसतो. त्याही ठिकाणी, त्यांचा मराठी-भाषाभिमान मला प्रशंसनीय वाटतो, पण त्यांचे निष्कर्ष आज फारसे लागू करावेसे वाटत नाहीत.) अवेस्त्यातील अहूर आणि वेदांतील देव हे बंधू होते, हे त्यांचे वर्णनही योग्यच आहे. पण अवेस्त्याचा तौलनिक अभ्यासही आता पुष्कळ अधिक झाल्यामुळे राजारामशास्त्र्यांना मराठी संशोधनाच्या ऐतिहासिक प्राथमिकतेचे श्रेय देण्याहून अधिक त्याचेच पुनर्वाचन तोकडे पडते. "मराठी संशोधनाचा इतिहास" का म्हटले? माझ्याकडे ऐतरेय ब्राह्मणाची १८६३ प्रत (स्कॅन) आहे, त्यात ही दीर्घ चर्चा शब्द तसेच कर्मकांडांचे दाखले देऊन इंग्रजी भाषांतरकार मार्तिन हाउग यांनी प्रस्तावनेत केलेली आहे. पुन्हा येथेसुद्धा भरकटणे शक्य आहे, म्हणून अलम्!

जनुकशास्त्रीय अभ्यास: हा येथे अवांतर ठरेल का अशी शंका वाटते. पण या वादाचा मला कंटाळा आला असल्यामुळे येथेच लिहितो आहे.
हल्लीच वेगवेगळ्या बेटीबंद समाजांतील लोकांचा जनुकीय अभ्यास प्रसिद्ध झाला (Nature. 2009 Sep 24;461(7263):489-94). त्याबद्दल भारतीय वर्तमानपत्रांमध्ये असे काही वर्णन आले की "युरोपियन लोकांशी भारतातील उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या लोकांचा काहीएक संबंध नाही, (त्यामुळे आर्यांचे आगंतुक असल्याचे असिद्ध होते)."
मात्र "उत्तर भारतीयांत युरोपीय अंश आहे" असे कोणाचे तरी मत होते असा कांगावा केला जातो, आणि मग हे मत (कोणाचेच नसलेले मत) असिद्ध केल्याचे सांगितले जाते. परंतु युरोपियन शाखेचा भारतातील बेटीबंद समाजांशी काहीएक संबंध कोणीही आधीही सांगत नव्हते! आता या अभ्यासात उत्तरेकडच्या बेटीबंद समाजाचा मध्य-आशियाई लोकांशी संकर झाला असे दाखवले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे येता, हा संकर कमीकमी झालेला दिसतो. यातील सर्वात जुना संकर ~२०० पिढ्यांपूर्वी झाला असे जनुकांवरून ढोबळ अनुमान करता येते... २०० पिढ्या म्हणजे आजपूर्वी ४०००-५००० वर्षे असे माझे अनुमान. (जनुकांची मिसळ प्रत्येक पिढीत होते. त्यामुळे पिढी->वर्षे गणित अनुमानितच असते.) "य" रंगसूत्र आणि "मायटोकॉन्ड्रियल डीएनए" यांच्याबाबतसुद्धा विदा प्रसिद्ध झालेला आहे. त्यातही खूप काही वेगळे दिसत नाही. दाक्षिणात्य पूर्वज-मातांची जनुके आणि मध्य-आशियाई पूर्वज-पित्यांची जनुके यांची सरमिसळ उत्तर भारतात दिसते, वगैरे.

- - -
हल्लीच्या काही स्तंभ लेखकांमध्ये मला अशी प्रक्रिया दिसते.
पायरी अ) आधी कुठल्यातरी खुळचट संकल्पनेचा आरोप अन्य अभ्यासकांवर करायचा (उदाहरणार्थ : भारतात स्वतःला आर्य म्हणवणार्‍यांचा संबंध युरोपियनांशी आहे ही खुळचट कल्पना, किंवा ऋग्वेदपूर्व इतिहास ग्रीक सिद्ध करायचा आहे ही खुळचट कल्पना),
पायरी आ) मग त्या खुळचट संकल्पनांचे (योग्य) खंडन करायचे. (म्हणजे दहाव्या मंडलातले नदीसूक्त, हरियाणातली सरस्वती नदी, जनुकांचा युरोपियनांशी जवळचा संबंध नसल्याचे दाखवणे. खंडन झालेल्या खुळचट संकल्पना कोणाच्या नव्हत्याच याच्याकडे डोळेझाक करायची.)
पायरी इ) मग तो आरोप उगाच केला आहे त्या लोकांचे खंडन झाल्याचे सांगायचे.
पायरी ई) मग ज्या संकल्पनांचे खंडन अजून व्हायचे आहे, जिथे अजून संशोधन चालू आहे, त्या ठिकाणीसुद्धा सिद्धता झाल्याचे सांगायचे. (म्हणजे भारतीयांचा मध्य आशियाई लोकांशी जनुकीय संबंध पुष्कळ आहे, किंवा सरस्वती नद्या अनेक आहेत... वगैरे पूर्णपणे असिद्ध झाल्याचे सांगायचे.)

अति-अवांतर : शंकराचार्यांच्या अणुवादाबद्दल लेखामध्ये मी मुद्दामून ही प्रशंसा केली होती की सुरुवातीला आपले विरोधी मत जास्तीत जास्त पटवून सांगितले, मगच त्याचे खंडन केले. या प्रकारे विरोधी मताचा विपर्यास झाला आहे का? अशा प्रश्नाचे उत्तर सुरुवातीलाच मिळते. (विपर्यास नाही, असे.) (हीच पद्धत उत्तम विज्ञान-संशोधनात दिसते, असेही नमूद करतो. आणि याचे स्खलनही कधीकधी दिसते, तेही नमूद करतो.) वरील वादपद्धतीत मात्र विपर्यास करून विपर्यासाचे खंडन करायची प्रवृत्ती दिसते.

शरद यांच्यासारखे मीसुद्धा बहुतेक वाचन दुय्यम (सेकंडरी) स्रोतांमधून करतो. अशा परिस्थितीमध्ये स्रोताचा दर्जा कसा ठरवावा? "विरोधी मताचा विपर्यास केला नाही असे किती स्पष्टपणे दाखवले आहे" अशा प्रकारचा निकष दुय्यम स्रोतांची उपयुक्तता ठरवताना मला उपयोगी वाटतो. अन्य वाचकांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

(या विषयावर खूप चर्वण केले. मजा आली हे खरे - प्रदीर्घ खरडचर्चासुद्धा खूप झाल्या. पण आता मला पुरे झाले आहे.)

खरे आहे

मजा आली हे खरे, आणि चर्वितचर्वणही खूप झाले, आणि पुरे झाले असणे अगदी शक्य आहे! आणि पुन्हा नव्याने वाद सुरू करायला म्हणून लिहीत नाही, फक्त एका बाबतीत माझे एक मत नोंदवू इच्छिते.


अशा परिस्थितीमध्ये स्रोताचा दर्जा कसा ठरवावा? "विरोधी मताचा विपर्यास केला नाही असे किती स्पष्टपणे दाखवले आहे" अशा प्रकारचा निकष दुय्यम स्रोतांची उपयुक्तता ठरवताना मला उपयोगी वाटतो. अन्य वाचकांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

दुय्यम स्त्रोत कसे असावेत हे झालेच. पण पहिले स्त्रोत अनेकदा अशा विषयांवरच्या गंभीर लेखांमध्येसुद्धा कोपरखळ्या, चिमटे, प्रसंगी वेडेवाकडे उल्लेख मिळतात हे काही या विषयांवर पूर्ण वेळ संशोधन करणार्‍या अभ्यासकांनाही लागलेले दोष आहेत असे म्हणावे लागते. याची काही उदाहरणे देता येतील. पण विषय वाढवत नाही.

ऋग्वेदातील मोठ्या रात्री

तानीदहानि बहुलानास्यन या प्राचीनमुदिता सूर्यस्य ! (ऋ.७.७६.३.)
अर्थ :- उषेचा उदय झाल्यापासून सूर्य उगवेपर्यंत किती तरी दिवस झाले.
(टीप : दुय्यम दुवा. जास्त माहीती तज्ञांना विचारा.)
शरद

मजा आली हे खरे

एकदम सहमत.
शरद

ऋग्वेदातील मंडले २ ते ७

बरं अजून येक शंका. ऋग्वेदातील मंडले २ ते ७ हा सर्वात प्राचीन भाग म्हटले जाते. तर ह्याला पुरावा काय???? मी नेटवर पाहिलेल्या साईट्स् असोत अथवा रिसर्च पेपर्स असोत, तिथे हे जणू गृहीत धरले जाते. ज्या अर्थी इतके मातब्बर संशोधक असे म्हणतात, त्या अर्थी काहीतरी तथ्य असले पाहिजे, परंतु मला अजूनतरी नाही दिसला याचा उहापोह केलेला कोणी. कोणाला मिळाल्यास कृपया खव अथवा व्यनि करणे ही लै नम्रतेची विनंती.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर