पुरावा काय ?

पुरावा काय

श्री. संजीव नाईक लिहीत असलेल्या मालिकेवर प्रतिक्रिया देतांना श्री.नवीन व श्री प्रियाली यांनी "पुरावा काय ?" असा प्रश्न विचारला आहे. (श्री. नाईक यांनी ३ ग्रंथांचा उल्लेख केला आहे ते सोडा). मला वाटते की उपक्रमसारख्या माध्यमात येणारे लेख हे "रीडर्स डायजेस्ट" सारख्या मासिकातल्या लेखांसारखे असतात. असल्या लेखांमध्ये सगळी माहिती देणे अशक्य असते, नव्हे, ती तशी येऊच नये. कारण लेखकाला त्या विशिष्ट विषयात जेवढी रुची, अभ्यासाची आवड, खर्च करावयास असलेला वेळ वगैरे असतो तेवढा सामान्य वाचकाला असेल असे गृहित धरणे चुकीचे होईल. ओळख करून देणे एवढीच माफक अपेक्षा असावी. ज्याला जास्त माहिती पाहिजे असेल त्याने व्य.नि. पाठवून करून घ्यावी. मान्य आहे की एखादी माहिती २-३ जणांनाही आवडेल, तरीही ती सर्वांनाच पाहिजे असे धरून चालू नये. पुरावा देत बसण्यात एक अडचण अशी की असे ग्रंथ मिळवून त्यांचा अभ्यास करणे हे दुरापास्त आहे. मनुस्मृतीवरील श्री. कुरुंदकर, केळकर आदींचे ग्रंथ मिळवून कोणी वाचणार आहे का ?
असहिष्णूता
ही परत डोके वर काढू लागलेली दिसते. सभासदांनी यावर काहीतरी ठाम निर्णय घेणे आवष्यक वाटते. आपली नापसंती दाखवण्याचा सौम्य उपाय कोणी सुचवेल कय ?
मला वाटते यावर चर्चा करून एखादा मार्ग शोधून काढणे गरजेचे आहे.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत आहे

सहमत आहे!

कसे का असेना पण लेखन ज्योतिष विषयक माहिती देते आहे.
ज्यांना पटत नसेल त्यांनी वाचू नये, हा उपाय कसा वाटतो?
किंवा स्वतंत्र चर्चा सुरु कराव्यात.

उदा. मला आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 1 हा लेख भंपक वाटला.
पण माझे हे व्यक्तीगत मत आहे. मी त्या चर्चेत सहभागी होण्याचे टाळले.
परंतू तसे लेखनच येथे येवू नये अशी अतिरेकी मागणी मी केली नाही.

मी फक्त मला काय करता येईल ते केले - प्रतिसाद न देणे!

आपला
गुंडोपंत

प्रश्न आवडीनिवडीचा नाही

प्रश्न फक्त आवडीनिवडीचा नाही. ज्या लेखनात इथे म्हटल्याप्रमाणे चुकीचे आणि लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे दावे कोणत्याही आधाराशिवाय केले जातात त्याकडे सुजाण लोकांनी दुर्लक्ष करू नये.

उपक्रमावरील इतर कोणत्याही लेखात कर्करोग, देवी, गोवर, रक्तस्राव, सांपत्तिक, आर्थिक, वैवाहिक, लैंगिक गोष्टींविषयी अशास्त्रीय आणि तथ्यहीन दावे केल्याचे कधी पाहिले नाही.

मला आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 1 हा लेख भंपक वाटला.

यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही :)

-----

उद्या जर कोणी म्हटले की "राहू आणि केतू अमुक योगात असतील तर अश्या व्यक्तीला फलज्योतिषाची आवड असते. संधी मिळेल तिथे ज्योतिषाच्या समर्थनार्थ असंबद्ध प्रतिसाद देण्याची सवय असते. हा योग असणार्‍या पुरुषात पौरुषत्वाचा अभाव असतो त्यामुळे वैवाहिक जीवनात धुसफूस असते. यांच्या पत्नीचे परपुरुषांशी संबंध असतात आणि यांना होणारी संतती यांची असेलच असे नक्की सांगता येत नाही" असे बाराशर नावाच्या ऋषीने 'बाराग्रंथशिरोमणि' नावाच्या अतिशय पूजनीय ग्रंथात लिहिले आहे असे म्हटले तर? ह घ्या.

अगदी बरोबर

गुंडोपंतांच्या विचाराशी पूर्ण सहमत. त्यांच्याप्रमाणेच मी आता ज्योतिष विषयावरील लेख वाचण्याचे पूर्ण टाळतो. माझ्या धर्मग्रंथाबद्दलच्या लेखात त्यांना काय भंपकपणा वाटला ते त्यांनी जरूर कळवावे. माझ्या मताने माझा लेख शास्त्रीय रित्या सिद्ध झालेल्या गोष्टींवरच आधारित आहे. शास्त्रीय चाचण्यांवर परखून घेतलेले सत्य कितीही कटू वाटले तरी ते सत्यच असते. अर्थात ते पचवण्यासाठी मनाची द्वारे उघडी असणे आवश्यक असते. जुनाट कल्पनांच्या बंधनात अडकून बसलेल्यांना ते पचवणे शक्य नसते.

चन्द्रशेखर

अरे वा!

गुंडोपंतांच्या विचाराशी पूर्ण सहमत.
वा वा क्या बात है कशावर तरी आपली सहमती झाली म्हणायची.

शास्त्रीय चाचण्यांवर परखून घेतलेले सत्य कितीही कटू वाटले तरी ते सत्यच असते. अर्थात ते पचवण्यासाठी मनाची द्वारे उघडी असणे आवश्यक असते. जुनाट कल्पनांच्या बंधनात अडकून बसलेल्यांना ते पचवणे शक्य नसते.

या बाबतीत मी ही आपल्याशी सहमत आहे.
काही लोकांना आपले विचार म्हणजे नवीन कल्पना या विचारातच रमायला आवडते.

आपल्याला रुचत नसलेल्या विषयातही लोकांना रस असु शकतो. त्यात त्यांना अनुभवाने आलेले तथ्य वाटू शकते असा विचार करण्यासाठी मनाची कवाडे उघडून बघावे लागते या विषयी पूर्ण पणे सहमत आहे.

आपला
गुंडोपंत

~लेखनाला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९~
लेखनाला प्रतिसादच येत नाहीत असे वाटून काही लोक संसथळ जाण्याच्याच धमक्या देतात.
मग सदस्य "सोडून जाउ नका राया" असे प्रतिसाद तरी देतातच! ;)

अरे वा!

शास्त्रीय चाचण्यांवर परखून घेतलेले सत्य कितीही कटू वाटले तरी ते सत्यच असते. अर्थात ते पचवण्यासाठी मनाची द्वारे उघडी असणे आवश्यक असते. जुनाट कल्पनांच्या बंधनात अडकून बसलेल्यांना ते पचवणे शक्य नसते.

या बाबतीत मी ही आपल्याशी सहमत आहे.

अरे वा! हे बरे सांगितलेत. "उत्तम मंगळ आणि उत्तम राहू याच्या संयोगाने पराक्रमी आणि अतिशय मुत्सद्दी असा संतती लाभही संभवतो." आणि "हा योग आईच्या कुंडलीतून, पंचमातून असेल तर जन्म होतांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते." हे तुम्ही कोणत्या शास्त्रीय चाचण्यांवर परखून घेतले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

विरोध भविष्याला नाही

लोकांची दिशाभूल करणारे, पोकळ दावे करणारे, विनासंदर्भ पुस्तकातून उतारे चिकटवलेले असे लेखन इथे येऊ नये असे बहुतेकांचे मत दिसते. मग ते लेखन कशावरही असो. उद्या अगदी वैज्ञानिक लेखनही कुणी थापेबाजी स्वरुपात केले तर तेही इथून काढायचीच विनंती करू. ज्योतिषावर पाहिजे तितके लिहावे पण वरील पथ्ये पाळूनच असा माझा तरी आग्रह राहील.

मंगळ राहु युती विवाहित स्त्रीच्या पत्रिकेत अत्यंत अशुभ “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी परिस्थिती निर्माण होते.

हे असले काही वाचून उद्या एखाद्या मुलीचे लग्न मोडले तर तीच्या आयुष्यात होणार्‍या नुकसानीची जवाबदारी शरदराव घेणार आहेत का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

प्रतिसाद

अनेक ठिकाणच्या अनेक प्रकारच्या लिखाणामधे आपल्याला पसंत न पडणारे असे काही ना काही असतेच. अशा प्रत्येक ठिकाणी नापसंती व्यक्त करायची म्हणजे पंचाईत (एका अर्थाने ) होऊन बसते . आणि मग या असल्या पंचायतीमधे (दुसर्‍या अर्थाने) पडण्याचे कारण सामान्य वाचकाला वाटत नाही. (हां , उपरोक्त विधान करताना अर्थातच "स्कोअर् सेटलींग्" आणि "हिडन अजेंडाज्" या प्रकाराना वगळलेले आहे.)

उदाहरणार्थ, मला ज्योतिषाबद्दल कसलेच सोयरसुतक नाही. मग मी त्याचे धागे उघडत सुद्धा नाही. प्रश्नच मिटला. मात्र एका मराठी संकेतस्थळावर एका ज्योतिषाने आपल्या धंद्याची जाहिरात केली आणि वर "आम्ही चुकलेल्याना रस्ता दाखवतो , नडलेल्याना मदत करतो" असली भाषा केली तेव्हा तिथे कडकडीत निषेध नोंदवल्याचे मला स्मरते.

तेव्हा, एक तत्व म्हणून ज्योतिषासारख्या विषयावर टीका करणे, त्याच्या विश्वासार्हतेपासून मूलभूत तत्वांबद्दल प्रश्न विचारणे इथवर सगळे ठीकच आहे. परंतु "प्रेक्षागृहात जाऊन बसा" "हे असले धागे उडवा" वगैरे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधातले आहे. उपक्रमच्या ध्येयधोरणामधे बसणारे असेल , सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारे नसेल, कुणाच्या वैयक्तिक भावना दुखावणारे किंवा धार्मिक/राजकीय इत्यादि संदर्भात भडकावणारे नसेल , धंद्याची जाहिरातबाजी करणारे नसेल तर ते लिखाण उडवण्याची काही आवश्यकता नाही - किंबहुना तसे करणे म्हणजे एकंदर गळचेपी करणे आहे - असे मला वाटते.

राहिता राहिला प्रश्न "पुरावा काय ?" वगैरे विचारण्याचा. हे विचारले असता त्यात असहिष्णुता कशी दिसते ते बाकी मला समजले नाही.

विरोध पुरावा विचारण्यास नाही.

विरोध पुरावा विचारण्यास नाही.

राहिता राहिला प्रश्न "पुरावा काय ?" वगैरे विचारण्याचा. हे विचारले असता त्यात असहिष्णुता कशी दिसते ते बाकी मला समजले नाही.

वास्तविकतः पुरावा विचारणे ह्यांत काही एक चूक नाही. परंतु आजकालची काही स्वप्रीतिमग्न अभिवृत्तिग्रस्त पोरे सहसा पुरावे विचारतांना अत्यंत औद्धत्यपूर्ण भाषेचा उपयोग करताना आढळतांत.^ बहुधा श्री. शरद ह्यांस ते म्हणावयाचे असावे असे मला व्यक्तिशः वाटते.

^हे एक सामाजिक निरीक्षण असून येथील सदस्यांच्या संदर्भात उपयोजिलेले विधान नाही.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

गैरसमज

गैरसमज
पुरावा द्या व असहिष्णुता यांचा संबंध काहीच नाही. दोन निरनिराळे मुद्दे आहेत. तसे ते निरनिराळे मांडलेही आहेत. चर्चा करावयास दोघे एके ठिकाणी आलेले आहेत. पुरावा द्या असे विचारल्यावर काय प्रसंग ओढवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री.नाईक यांनी दिलेले संदर्भ.घ्या लेको. आता याचा उपयोग कितीजणांना एवढेच मला विचारावयाचे होते.
श्री.चंद्रशेखरजी यांच्या लेखावर मी प्रतिसाद दिला व तो विरुद्ध मताचा असेल तर मी पुरावा दिलाच पाहिजे. ती माझी जबाबदारी झाली. पण सिंधु संस्कृतीबद्दलच्या त्यांच्या मताबद्दल मी वैयक्तिच माहिती (पुरावा म्हणत नाही) मागणे योग्य समजतो.कारण ह्या संस्कृतीची माहिती नसलेल्या वाचकांना ती अवाजवी (Irrelevent) ठरेल.
शरद

आक्षेपार्ह.... नाहक नाव गोवण्याचा हास्यास्पद चर्चाप्रस्ताव

श्री. संजीव नाईक लिहीत असलेल्या मालिकेवर प्रतिक्रिया देतांना श्री.नवीन व श्री प्रियाली यांनी "पुरावा काय ?" असा प्रश्न विचारला आहे.

कृपया मी "पुरावा काय?" हा प्रश्न संजीव नाईक यांना विचारल्याचे दाखवून द्यावे. माझे नाव ही आपल्याला पब्लिक प्रॉपर्टी वाटते काय की कुठेही संदर्भ म्हणून वापरावे. असला वाह्यात प्रकार पुन्हा होऊ नये ही माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. कृपया, नोंद घ्या. माझा प्रतिसाद नवीन यांना आहे.

पुराव्याअभावी लोकांची जाणूनबुजून दिशाभूल करणारे लेखन उपक्रमावर असावे का? या नवीन यांच्या प्रश्नावर माझे व्यक्त केलेले मत आहे. आपले मत यापेक्षा वेगळे असल्यास जसे,

पुराव्यासह लोकांची जाणूनबुजून दिशाभूल करणारे लेखन उपक्रमावर असावे.
पुराव्याअभावी लोकांची नकळत दिशाभूल करणारे लेखन उपक्रमावर असावे.
पुराव्यसह लोकांची नकळत दिशाभूल करणारे लेखन उपक्रमावर नसावे.
पुराव्यासह लोकांना जाणूनबुजून योग्य दिशा दाखवणारे लेखन उपक्रमावर नसावे.
पुराव्यासह लोकांना नकळत योग्य दिशा दाखवणारे लेखन उपक्रमावर नसावे.

तसे लिहावे. परंतु मी पुरावा काय? असा प्रश्न विचारला आहे असे सांगून लोकांची दिशाभूल करणे प्रथम बंद करावे.

जेव्हा, जाहीर वाह्यात विधाने केली जातात तेव्हा समोरची व्यक्ती पुरावे विचारते. मग पळवाट शोधण्यासाठी समोरच्याला उद्धट म्हणणे, पहले उस आदमीसे पूछो जिसने मेरे हाथपे "मेरा बाप चोर है|" ऐसा लिखा अशी फालतू कारणे देऊन आपण त्यातले नाहीच गडे असा आव आणला जातो. उपक्रमावर असे प्रकार होऊ नयेत असे वाटण्यात काहीही गैर नाही.

उद्या एखाद्याने शिवाजी महाराजांच्या राज्यात मुसलमानांची स्थिती हलाखीची असून त्यांच्यावर अत्याचार होत असत असे लिहिले तर त्याला जाहीर पुरावे न विचारता व्य. नि.तून पुरावे विचारण्याची गरज काय हे स्पष्ट करावे.

मला वाटते की उपक्रमसारख्या माध्यमात येणारे लेख हे "रीडर्स डायजेस्ट" सारख्या मासिकातल्या लेखांसारखे असतात. असल्या लेखांमध्ये सगळी माहिती देणे अशक्य असते, नव्हे, ती तशी येऊच नये. कारण लेखकाला त्या विशिष्ट विषयात जेवढी रुची, अभ्यासाची आवड, खर्च करावयास असलेला वेळ वगैरे असतो तेवढा सामान्य वाचकाला असेल असे गृहित धरणे चुकीचे होईल. ओळख करून देणे एवढीच माफक अपेक्षा असावी. ज्याला जास्त माहिती पाहिजे असेल त्याने व्य.नि. पाठवून करून घ्यावी. मान्य आहे की एखादी माहिती २-३ जणांनाही आवडेल, तरीही ती सर्वांनाच पाहिजे असे धरून चालू नये. पुरावा देत बसण्यात एक अडचण अशी की असे ग्रंथ मिळवून त्यांचा अभ्यास करणे हे दुरापास्त आहे. मनुस्मृतीवरील श्री. कुरुंदकर, केळकर आदींचे ग्रंथ मिळवून कोणी वाचणार आहे का ?

हे संपूर्ण मत आपले आहे. आपण अवश्य त्यानुसार वागावे. माझे मत असे -

उपक्रमाला केवळ "रीडर्स डायजेस्ट"चा दर्जा देऊन त्याचा अवमान करू नये. सर्व लेखांमध्ये पूरक माहिती देणे शक्य नसते परंतु जेथे जेथे देणे शक्य आहे, तेथे तेथे ती द्यावी. संदर्भही द्यावेत. अनेक लेखक तसे करतात. त्यांच्या श्रमांचा आपण अवमान करू नये. जर चर्चा किंवा लेख जाहीर टाकला आहे तर त्याविषयी माहितीही जाहीर हवी. व्यक्तिगत निरोप हे व्यक्तिगत देवाणघेवाणीसाठी असतात. त्यांचा उपयोग कसा करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पुरावे देण्यात अडचण असेल तर आपल्याला झेपत नाहीत अशी वाक्ये टाळावीत. पुरावे दिल्यास वाचन करून त्यावर टिप्पणी केल्याचे भरघोस पुरावे उपक्रमावर मिळतील.

----

असो. अशाप्रकारचे हास्यास्पद चर्चाविषय टाकण्यास आपल्याकडे भरपूर वेळ असेल. याला हे उत्तर देऊन आपण माझा वेळ आणि सकाळ दोन्ही वाया घालवलीत. आपण माझे नाव यात गोवले नसते तर हा वेळ फुकट घालवण्याचा प्रसंग माझ्यावर आला नसता. कृपया, पुढील वेळेस खबरदारी घ्यावी.

पूर्वग्रहदुषित

मनुस्मृतीवरील श्री. कुरुंदकर, केळकर आदींचे ग्रंथ मिळवून कोणी वाचणार आहे का ?

वरील विधान पूर्वग्रहदुषित आहे. मनुस्मृतीच्या चर्चेत उदाहरणे (पुरावा नाही) द्यावीत अशी विनंती केल्यानंतर आपण या दोन लेखकांचे नाव पुढे केले. जमेन तेव्हा ही पुस्तके मिळवून वाचण्याचा संकल्प आहे तसेच मनुस्मृतीचे इंग्रजी भाषांतर सध्या वाचत आहे पण आपण म्हणता तसे 'कालातीत' विचार (आत्तापर्यंत तरी) आढळले नाहीत.

जेव्हा एखाद्या विषयावर लिहिण्याचे एखादा सदस्य ठरवतो/ठरवते तेव्हा तो विषय त्याला/तिला महत्त्वाचा वाटतो आणि वाचकांपर्यंत त्या विषयाचे महत्त्व पोचवावेसे वाटते. त्रोटक लेख लिहून आपले विशेषणपूर्ण पक्षपाती विवेचन वाचकांचर लादायचे आणि वाचकांनी उदाहरण विचारल्यास दोन-तीन लेखकांची नावे उदधृत करायची, हे मात्र अभ्यासपूर्ण आणि निष्पक्ष चर्चेस घातक आहे.
________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

पुरावा/जाणूनबुजून/नकळत/दिशा/दिशाभूल.

पुरावा/जाणूनबुजून/नकळत/दिशा/दिशाभूल.

पुरावा, जाणूनबुजून, नकळत, दिशा, दिशाभूल ह्या सार्‍या संकल्पनांचा एकत्रितरीत्या आणि विलगरीत्या विचार करतां, माझ्यामते जोपर्यंत खालीलपैकी एक अथवा अधिक विधाने येत नाहीत, तोपर्यंत अशी चर्चा व्यर्थ आहे.

 1. माझी/आमची जाणूनबुजून पुराव्यासह दिशाभूल करण्यात आली आहे/नाही.
 2. माझी/आमची पुराव्याअभावी नकळत दिशाभूल करण्यात आली असावी/नसावी.
 3. माझी/आमची पुराव्यासह परंतु नकळत दिशाभूल झाली असावी/नसावी.
 4. मला/आम्हाला जाणूनबुजून योग्य ती दिशा पुराव्यासह दाखविण्यात आली आहे/नाही.
 5. मला/आम्हाला जाणूनबुजून योग्य ती दिशा पुराव्यासह दाखविण्यात आली आहे/नाही.
 6. मला/आम्हाला नकळत योग्य ती दिशा पुराव्यासह दाखविण्यात आली आहे/नाही.

मुद्दा असा, की आपली दिशाभूल झाली असे म्हणणारी व्यक्ती पुढे आली पाहिजे, आणि तशी दिशाभूल झाली असल्याचे सिद्ध झाले पाहिजे.

---

ह्याहीउपर वरील प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग असा की पुरावे विचारणार्‍याने स्वतःहून पुरावे शोधावेत आणि ते मांडावेत. वर श्री. अक्षय म्हणतांत त्याप्रमाणे ते जर (स्वतःस पडलेल्या प्रश्नपूर्तिसाठी) मनुस्मृतिचे वाचन करित असतील तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे. असे केल्यामुळे अभ्यासकांस प्रश्न विचारण्यासाठी आवश्यक असणारी एक पार्श्वभूमि त्यांच्याकडे सिद्ध होईल, जी त्यांच्या त्या प्रश्नांतूनही दिसेल.

मात्र त्रोटक लेख लिहून आपले विशेषणपूर्ण पक्षपाती विवेचन वाचकांचर लादायचे आणि वाचकांनी उदाहरण विचारल्यास दोन-तीन लेखकांची नावे उदधृत करायची, हे मात्र अभ्यासपूर्ण आणि निष्पक्ष चर्चेस घातक आहे. असे ते म्हणतांत त्याशी मी सहमत नाही. माझ्यामते एखादी चर्चा अभ्यासपूर्ण, अत्रोटक आणि निष्पक्ष करणे हे लेखक-वाचक अशा दोन्हीही स्वरूपातील अभ्यासकांचे उत्तरदायित्त्व ठरते, त्यांपैकी कोण्या एकाचे नाही.

--

ज्यात स्वतःची बुद्धी चालणे अशक्य आहे असे काही विशिष्ट विषयविचार पाहिले की काही अभ्यासक हे विंचू चावल्यासारखे वागतात. हे मात्र निश्चितच घातक आहे.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

एक्सक्लुजिविटी

असे केल्यामुळे अभ्यासकांस प्रश्न विचारण्यासाठी आवश्यक असणारी एक पार्श्वभूमि त्यांच्याकडे सिद्ध होईल, जी त्यांच्या त्या प्रश्नांतूनही दिसेल.

श्री हैयैयो, प्रश्न विचारण्यासाठी कुठली पार्श्वभुमी तयार करावी लागते असे वाटत नाही. अभ्यासकांनी अभ्यासप्रक्रियेत कुठल्याही पातळीवर असलेल्या वाचकाच्या प्रश्नांची समर्थपणे उत्तरे देण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. पार्श्वभुमीची सिद्धता करायला लावणे, हे संवाद प्रक्रियेत अडथळा आणते आणि नको असलेली 'एक्स्क्लुजिविटी' संवादात येते.

माझ्यामते एखादी चर्चा अभ्यासपूर्ण, अत्रोटक आणि निष्पक्ष करणे हे लेखक-वाचक अशा दोन्हीही स्वरूपातील अभ्यासकांचे उत्तरदायित्त्व ठरते, त्यांपैकी कोण्या एकाचे नाही.

वाचक-लेखक दोघांचेही उत्तरदायित्त्व आहे. माझे मत केवळ लेखकाच्या जबाबदारीसंदर्भात आहे. अभ्यासपूर्ण चर्चेसाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीचे पूर्ण स्पष्टीकरण नाही.

________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

पार्श्वभूमि सिद्ध करणे - त्याची आवश्यकता.

पार्श्वभूमि सिद्ध करणे - त्याची आवश्यकता.

श्री हैयैयो, प्रश्न विचारण्यासाठी कुठली पार्श्वभुमी तयार करावी लागते असे वाटत नाही.

श्री. अक्षय, कुठल्याही पार्श्वभूमिचा सर्वथा अभाव असताना आपण प्रश्न विचारण्यासाठी कशाच्या कसोटीवर विचार करणार? बहुधा तर्काच्या कसोटीवर आपण असा विचार कराल, असे गृहित धरू इच्छितो. ह्या तर्कास अनेक मर्य्यादा आहेत. तर्काच्या कसोटीवर विचार करताना, इतरांनी लावलेल्या अर्थांचा अनावधानाने अथवा हेतुपुरस्सरत: चुकीचा - संदर्भविहीन अर्थ लावला जावू शकतो. ही एक शक्यता आहे. तर्काच्या कसोटीवर विचार करताना मूळ विचाराकडे संपूर्णतः दुर्लक्ष होवून; आपल्या प्रश्नांची बांधीलकी ही अभ्यासकाने व्यक्त केलेल्या विचारांच्या संदर्भात न राहता केवळ आपल्या तर्काच्या संदर्भात उर्वरित राहते.

असे असताना, स्वतःचा अभ्यास नसल्याने आपल्यासमोर केवळ दोन पर्याय राहतात. एक म्हणजे त्या अभ्यासकाने मांडलेले विचार जसेच्या तसे स्वीकारणे, दुसरा म्हणजे ते सर्वथा नाकारणे. तिसरा एक मार्ग आपण सुचवाल तो म्हणजे अभ्यासकाच्या विचारांपैकी आपल्याला ग्राह्य वाटतात ते विचार स्वीकारणे आणि अग्राह्य वाटतात ते विचार न स्वीकारणे. ह्या परिस्थितीत हे स्वीकारणे - न स्वीकारणे हे आपल्या तर्कावर आधारित असल्याने केवळ आपल्यापुरते आहे. (सार्‍या लोकांचा तर्क एकसारखा असेल असे नाही असे तर्कशास्त्रातील एक मत आहे.) इतरांस आपले म्हणणे पटावे ह्यासाठीही आपल्याकडे अभ्यासाची पार्श्वभूमि असणे आवश्यक आहे. आपल्या प्रश्नांनी आपण अभ्यासकाच्या अभ्यासात काही योगदान करताहात असे आपणास वाटते काय? मला तसे वाटत नाही. कुठल्याही पार्श्वभूमिअभावी विचारलेले प्रश्न हे गोंधळ उत्पन्न करू शकणारे असू शकतात.

मुद्दा असा: हा गोंधळ टाळण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता भासेल. तसेही आपले प्रश्नांचे स्वरूप तर्काधारित आणि त्यामुळे वैयक्तिक असे असू शकते. अशा वेळी, सहजशक्य असल्यास पूर्वी स्वतःच अभ्यासाचा प्रयत्न करावा. थेट इतर अभ्यासकांना प्रश्न हे त्याहीनंतर विचारावेत. असे प्रश्न विचारण्यासाठी स्वतःकडेही काही पार्श्वभूमी अभ्यासाच्या रूपाने असावयास हवी असे मला वाटते.

अभ्यासकांनी अभ्यासप्रक्रियेत कुठल्याही पातळीवर असलेल्या वाचकाच्या प्रश्नांची समर्थपणे उत्तरे देण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.

अभ्यासप्रक्रियेमध्ये अभ्यासकांनी कुठल्याही पातळीवर असलेल्या वाचकाच्या प्रश्नांची समर्थपणे उत्तरे देण्यासाठी प्रयत्नशील असावयास हवे हे मान्य. त्याचबरोबर, त्यांनी समर्थपणे दिलेली उत्तरे तितक्याच समर्थपणे समजावून घेता येतील ह्या पातळीवर स्वतःस आणण्यासासाठी स्वतः वाचकांनीही प्रयत्नशील असावयास हवे. तसे न झाल्यास अभ्यासकांकडून अशा वाचकांकडे दुर्लक्ष होण्याची भीति असते. कारण असे, की अभ्यास नसलेल्या लोकांच्या प्रश्नांस उत्तरे द्यावयास गेल्यास त्या उत्तरांवर (प्रश्नकर्त्यांत अभ्यासाचा अभाव असल्याने) उलटसुलट प्रतिक्रिया उद्भवून मूळ विषयाचाच घात होऊ शकतो. अवांतरः आजकाल न्यायव्यवस्थेवर टीका करण्याची जी प्रवृत्ती बळावली आहे, त्यातही आपणांस कुठल्याही अभ्यासपूर्ण पार्श्वभूमिशिवाय प्रश्न उठविले गेलेले आढळतात. व्यवस्थानिर्वाहणाधिकार्‍यांकडून अशा प्रश्नांची दखलही घेतली जात नाही हे सत्य आहे. असो. इतर अभ्यासकांच्या विचारावर प्रश्न करणेपूर्वी स्वतःस तसे प्रश्न करण्यास पात्र करणे हे उत्तम; एवढेंच सांगावयाचा हेतु.

पार्श्वभुमीची सिद्धता करायला लावणे, हे संवाद प्रक्रियेत अडथळा आणते आणि नको असलेली 'एक्स्क्लुजिविटी' संवादात येते.

अभ्यासात अस्ताव्यस्तपणा आणि विस्कळितता नसावी असे मला व्यक्तिशः वाटते; त्यामुळे आपण म्हणतां तशी 'एक्स्क्लूजिविटि' संवादात आल्यास ती उत्तम अभ्यास - उत्तम विचारविश्लेषणासाठी अजिबात चूक ठरविण्यात येवू नये. मुळांत संवाद साधण्यासाठी अभ्यासक आणि वाचक ह्यांची पात्रता तुल्यबल होणे हे शक्य असल्यास व्हावे असे माझे मत आहे. त्यासाठी वर दिलेप्रमाणे पार्श्वभूमिची सिद्धता ही अभ्यासासाठी उपयुक्त आहे.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

क्षमस्व

क्षमस्व.
श्री. प्रियाली यांनी पुरावा काय असा प्रश्न विचारला नाही हे बरोबर आहे. चुकीचा उल्लेख झाल्याबद्दल दिलगिर आहे. पुराव्याअभावी लोकांची जाणूनबुजुन दिशाभूल करणारे लेखन उपक्रमवर असावे का ? या प्रश्नाचे त्यांनी दिलेल्या "नक्कीच नाही" या मतावरून माझी चुकीची समजूत झाली की त्यांना अशा लेखांकरिता पुरावा पाहिजे.नाह्क नाव गोवण्याचा उद्देश नव्हता. तसे काही कारणच नाही. तरीही त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल परत एकदा माफी मागतो व पुढे जास्त काळजी घेईन असे
आश्वासन देतो.
शरद

धन्यवाद आणि मीही माफी मागते

नाह्क नाव गोवण्याचा उद्देश नव्हता. तसे काही कारणच नाही.

हे मी जाणून आहे आणि तेवढा विश्वासही आहे आपल्यावर. परंतु, अशाप्रकारे नावांचा उल्लेख होऊ नये असे त्याक्षणी वाटले म्हणून प्रतिसाद लिहिला.

तरीही त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल परत एकदा माफी मागतो व पुढे जास्त काळजी घेईन असे आश्वासन देतो.

धन्यवाद.

ज्या शब्दांत मी प्रतिसाद लिहिला त्याबद्दल मीही माफी मागते.

वाचतो आहे

चर्चाविषय हळूहळू समजून घेत आहे. तोवर वाचतो आहे.

"उपक्रम" संकेतस्थळावरचे लेख एखाद्या विषयाची प्राथमिक माहिती करून द्यायला उपयोगी असावेत, याबाबत सहमत आहे. (अगदी सखोल माहिती नव्हे.)

"विषय वादग्रस्त आहे" अशी ओळखही करून देणारे लेख उपयोगी आहेत. "वादाच्या अमुक बाजूचा पुरस्कार" करणारे लेखनही वाचनीय असते. या दोन्ही प्रकारात सुद्धा वादाची प्राथमिक ओळख, आणि काही प्राथमिक मुद्देच अपेक्षित आहेत. (अगदी सखोल ऊहापोह नव्हे.) कारण २००० शब्दांच्यापेक्षा लांब लेख वाचणे कठिण जाते.

- - -
लेखक म्हणून काही विचार :

लेखामध्ये लेखकाने वादग्रस्त मुद्दे मांडले, तर त्याविषयी मतभेद प्रतिसादकर्ते सांगतील.

लेखाचा उद्देश काय आहे हे लेखकाने सांगितल्यास बरे. उदाहरणार्थ मागे मी ब्रह्मसूत्रातील एका अधिकरणावर लेखमाला लिहिली होती (अणुवाद वगैरे). पण त्या संदर्भात कालातीत/कालबाह्य असा वाद प्रतिसादकर्त्यांनी उपस्थित केला नव्हता.

शरद यांच्या मनुस्मृतीबद्दल लेखात मात्र सद्यस्थितीला कायकाय लागू आहे, याबाबत लेखकाचे मत सांगितले होते. तो संदर्भ दिल्यामुळे, त्या संदर्भात वाद होणे क्रमप्राप्त आहे.

त्याच प्रमाणे हल्लीच्या "ग्रह-फलज्योतिष" या विषयावरच्या लेखमालेत कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नात्यागोत्यांच्या बाबतीत काही भाकिते होती. याचा संदर्भसुद्धा माझ्या (किंवा वाचकाच्या) सद्यपरिस्थितीत लागतो. उदाहरणार्थ कुठल्याशा ग्रहयोगामुळे माझा भाऊ संशयास्पद होतो. हे जर खरे असेल, तर ही माहिती नि:संशय माझ्या उपयोगाची आहे - या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तर माझे नुकसान आहे. मात्र हा सल्ला बिनबुडाचा असेल, तर मी संशयी राहिल्यास भावाशी मनमोकळेपणाने वागणार नाही. माझ्या कुटुंबाच्या सुखात विष कालवले जाते. अशा लेखनाबद्दल पूर्णपणे तटस्थ राहाता येत नाही. कारण सल्ला योग्य असल्यास प्रचंड फायदा, तर सल्ला अयोग्य असल्यास नुकसान आहे. इतकेच काय, मी स्वतः दुर्लक्ष करायचे ठरवले, पण माझ्या भावाने सल्ला मनावर घेतला, तरी कुटुंबाचे मनःस्वास्थ्य दाव्यावर लागते. अशा परिस्थितीत लेखात माहिती मिळाल्यावर माहितीचा पाठपुरावा करणे योग्य आहे. मग "पुरावा मागणे" वगैरे प्रतिसाद येतील. (कारण मूळ संशय उत्पन्न करणार्‍या लेखकालाच फारसे स्पष्ट समजावून सांगता आले नाही, तर मग अधिक पुस्तके स्वतःहून धुंडाळणे तातडीचे राहात नाही.)

लेखात वाचकाच्या प्रत्यक्ष आयुष्याबद्दल लेखात माहिती मिळणे हे चांगलेच आहे. (म्हणजे हजार वर्षांपूर्वीच्या अणुवादापेक्षा, आज लागू करायच्या मनुवचनाबद्दल लेख अधिक उपयोगी आहे, हे नि:शंक.) पण "आज वागणे बदल" असे म्हटल्यास "का म्हणून बदलू?/पुरावा दाखव" वगैरे प्रतिसाद येतील, ही अपेक्षा ठेवली पाहिजे.

ज्या माहितीच्या बाबतीत तटस्थ राहाता येत नाही, त्या बाबतीत तरी या संवादाला "असहिष्णुता" म्हणता येत नाही. माझा लेख वाचकाला "ग्रहयोगानुसार वागणे बदल", किंवा समाजाला "मनुस्मृतीमधील तत्त्वे अंगीकार" असे सांगत असेल, तर मी काय करावे? अगदी थोडक्यात (रीडर्स डायजेस्ट सारखे) त्याचे मतपरिवर्तन करण्यात, भूमिका समजावून सांगण्यात लेखाचा थोडा तरी भाग खर्ची घालावा.

- - -

उपक्रमाला मंदाश्री पुरस्कार मिळायला हवा का?

छान. श्रीकृष्ण जकातदार ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्याच्या दादासाहेब जकातदार प्रतिष्ठानातर्फे ज्योतिषशास्त्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मंदाश्री (मंदश्री नव्हे, मंदाश्री!) पुरस्कार देण्यात येतो. उपक्रमाला मंदाश्री पुरस्कार मिळायला हवा का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लोकांची फसवणूक करणारे चुकीचे दावे

लेखनात जर खालीलप्रमाणे दावे केलेले असतील तर पुरावे नक्कीच मागितले पाहिजेत. हे दावे कोणत्या आधारावर केले आहेत हे स्पष्ट केले नाही तर ही लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल आणि त्याही पुढे जाऊन फसवणूक/शोषण आहे.

 1. राहूपासुन आजोबा आणि केतूपासून आईचे वडील यांचा बोध होतो. देवी, गोवर यासारखे रोग, विषारी प्राण्यांपासून पीडा, शत्रूची गूप्त कारस्थाने, हलक्या जातीच्या लोकांपासून पीडा
 2. जर राहू नीच असेल व चंद्रही नीच असेल, तर राहूची दशा चंद्राचे अंतरदशेमध्ये व्यक्तीस मिरगी नावाचा रोग होईल किंवा चक्कर आल्यासारखे वाटेल, याप्रमाणे बुध व शुक्र नीच असेल तर राहूचे दशेत शरीरावर कोड किंवा डाग होण्याचा संभव आहे.
 3. जर केतूची दशा असेल, जर शुक्र नीच असून त्याची अंतरदशा चालू असेल तर योनीचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. किंवा योनीचा दाह, पीडा, शक्यता आहे. जर केतुच्या दशेत चंद्राची अंतरदशा चालू असेल, तर गुप्त रोगाची चिंता वाढेल. रवीची अंतरदशा असेल तर शरिराचे आतील बाजूस हाड मोडेल. केतू व मंगळ दोन्ही नीच असतील किंवा दोन्ही ग्रहापैकी कोणताही एक ग्रह तूळेत असेल, केतूच्या दशेत मंगळाचे अंतरदशेत रक्तदाब विकार होईल,
 4. राहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते. मनावर सतत दडपण राहते. मानसिक कोंडमारा होतो. प्रकृतिस्वास्थ्य नसल्याने कामसुखात बाधा येते. विवाह ठरतानाही विलंब होतो. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. पत्रिकेत सप्तमस्थान अथवा चंद्र केतुने बिघडला असल्यास्स वैवाहिक जीवनात उदासीनता निर्माण होते. जीवनसाथीदाराचा वियोग सहन करावा लागतो. कामसुखातील चैतन्यही हरवून जाण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते.
 5. प्रवासात अपघातांचे संभव अशाच व्यक्तींचे जीवनात उद्दभवतील. घरातील वडीलधारी माणसे पटापट थोड्याच काळात दगावण्याचे योगही याच धाक्यातून येतात.

- संजीव नाईक

देवी, गोवर हे रोग अवकाशातील बिंदूंमुळे होतात.
गुप्त रोगाची चिंता वाढेल. रवीची अंतरदशा असेल तर शरिराचे आतील बाजूस हाड मोडेल.
योनीचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. किंवा योनीचा दाह, पीडा, शक्यता आहे.

ही चुकीची माहिती नाही?? या दाव्यांना पुरावे नकोत????

 1. उत्तम मंगळ आणि उत्तम राहू याच्या संयोगाने पराक्रमी आणि अतिशय मुत्सद्दी असा संतती लाभही संभवतो.
 2. मात्र हा योग आईच्या कुंडलीतून, पंचमातून असेल तर जन्म होतांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते.

- गुंडोपंत

उत्तम मंगळ आणि उत्तम राहू हा रक्तस्राव कसा काय घडवून आणतात? आणि असा योग नसलेल्या स्त्रीला रक्तस्राव होत नाही का? आणि होत असेल तर कसा काय? याची माहिती नको??

मुळात अवकाशातील निर्जीव ग्रहांचा पृथ्वीवरील करोडो लोकांवर (त्यातही कुंडली प्रमाणे वेगवेगळा) परिणाम 'कसा' होऊ शकतो हे सिद्ध केल्याशिवायच 'काय' होतो याचे दावे केले जात असतील तर ती लोकांची फसवणूक आहे. उपक्रमावर इतर कोणत्याही लेखनात हा दोष नाही त्यामुळे अशी सिद्धता देईपर्यंत असे दिशाभूल करणारे लेखन इथे प्रकाशित होऊ दिले जाऊ नये.

-----

उद्या जर कोणी म्हटले की "राहू आणि केतू अमुक योगात असतील तर अश्या व्यक्तीला फलज्योतिष शास्त्राची आवड असते. संधी मिळेल तिथे ज्योतिषाच्या समर्थनार्थ असंबद्ध प्रतिसाद देण्याची सवय असते. हा योग असणार्‍या पुरुषात पौरुषत्वाचा अभाव असतो त्यामुळे वैवाहिक जीवनात धुसफूस असते. यांच्या पत्नीचे परपुरुषांशी संबंध असतात आणि यांना होणारी संतती यांची असेलच असे नक्की सांगता येत नाही" असे बाराशर नावाच्या ऋषीने 'बाराग्रंथशिरोमणि' नावाच्या अतिशय पूजनीय ग्रंथात लिहिले आहे असे म्हटले तर? ह घ्या.

वाचा.

वाचा.

...नाही तर ही लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल आणि त्याही पुढे जाऊन फसवणूक/शोषण आहे.

http://mr.upakram.org/node/2171#comment-34751

पुरावा, जाणूनबुजून, नकळत, दिशा, दिशाभूल ह्या सार्‍या संकल्पनांचा एकत्रितरीत्या आणि विलगरीत्या विचार करतां, माझ्यामते जोपर्यंत खालीलपैकी एक अथवा अधिक विधाने येत नाहीत, तोपर्यंत अशी चर्चा व्यर्थ आहे.

1. माझी/आमची जाणूनबुजून पुराव्यासह दिशाभूल करण्यात आली आहे/नाही.
2. माझी/आमची पुराव्याअभावी नकळत दिशाभूल करण्यात आली असावी/नसावी.
3. माझी/आमची पुराव्यासह परंतु नकळत दिशाभूल झाली असावी/नसावी.
4. मला/आम्हाला जाणूनबुजून योग्य ती दिशा पुराव्यासह दाखविण्यात आली आहे/नाही.
5. मला/आम्हाला जाणूनबुजून योग्य ती दिशा पुराव्यासह दाखविण्यात आली आहे/नाही.
6. मला/आम्हाला नकळत योग्य ती दिशा पुराव्यासह दाखविण्यात आली आहे/नाही.

मुद्दा असा, की आपली दिशाभूल झाली असे म्हणणारी व्यक्ती पुढे आली पाहिजे, आणि तशी दिशाभूल झाली असल्याचे सिद्ध झाले पाहिजे. जोपर्यंत ह्याविषयी निर्णय होत नाही तोपर्यंत दिशाभूल/फसवणूक/शोषण हे शब्दप्रयोग करणे म्हणजे सर्प सर्प असे म्हणत भूमिवर दांडुके आपटणे होय.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

बेसलेस

मुद्दा असा, की आपली दिशाभूल झाली असे म्हणणारी व्यक्ती पुढे आली पाहिजे, आणि तशी दिशाभूल झाली असल्याचे सिद्ध झाले पाहिजे. जोपर्यंत ह्याविषयी निर्णय होत नाही तोपर्यंत दिशाभूल/फसवणूक/शोषण हे शब्दप्रयोग करणे म्हणजे सर्प सर्प असे म्हणत भूमिवर दांडुके आपटणे होय.

हास्यास्पद मुद्दा आहे! म्हणजे गळाला मासा लागे पर्यंत हे प्रकार थांबवायचे नाहीत का? उपक्रम पंतांनी असल्या फालतू युक्तिवादांना बळी न पडता एखादे लेखन मनोरंजनाच्या नावाखाली गैरसमज आणि भोंदू दावे पसरवत असेल तर एक नैतिक जवाबदारी म्हणून ते लेखन काढून टाकावे. एखादा मनुष्य रस्त्यावर बंदुकीने अंदाधुंद गोळ्या झाडू लागला तर जो पर्यंत त्याने एखाद्याचा बळी पडत नाही तोपर्यंत त्याला तसे करू द्यावे का? बेसलेस आर्ग्युमेंट आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

आक्षेप

श्री हैयो हैयैयो हे उगाचच वकीली युक्तिवाद करीत आहेत.

एखाद्या गोष्टीवर आक्षेप घ्यायला लोकस स्टॅण्डाय असायला हवा (दिशाभूल झाली असणे गरजेचे आहे) हे म्हणणे उपक्रमावरील चर्चेत अयोग्य वाटते.

शेजारच्या घरात नवरा बायकोला मारहाण करीत आहे पण मी त्यात पडत नाही कारण त्या बाईने तक्रार केलेली नाही आणि माझ्याकडे मदत मागितली नाही हे म्हणणे जितके अयोग्य तितकेच संजीव नाईक यांनी जे दावे केले आहेत त्याबाबत पुरावे व स्पष्टीकरण मागू नये कारण कोणी दिशाभूल झाल्याचे म्हटले नाही (यात हैयोंनी सांगितलेले सगळे १५-२० प्रकार येतात) हे म्हणणे ही अयोग्य.

लोकांनी असे लेखन वाचू नये हे ठीक पण पटले नाही तर आक्षेप घेऊ नये हे अयोग्य.

नितिन थत्ते

योग्य बोललात

श्री हैयो हैयैयो हे उगाचच वकीली युक्तिवाद करीत आहेत.

अगदी योग्य बोललात. आपला मुद्दा रेटण्यासाठी काहीतरी किसपाडू पोकळ लांबलचक प्रतिसाद देत राहायचे. ह्या भंपकपणाला कंटाळून शेवटी समोरचा थकून जातो. असले प्रकार मी पाहिलेले आहेत.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सहमत आहे

श्री हैयो हैयैयो हे उगाचच वकीली युक्तिवाद करीत आहेत.

सहमत आहे. यातील उगाचच हा शब्द महत्त्वाचा वाटतो. :-)

बाकी चालू दे, दुर्लक्ष करणे आपल्या हातात असते.

बरोबर

लोकांनी असे लेखन वाचू नये हे ठीक पण पटले नाही तर आक्षेप घेऊ नये हे अयोग्य.

सहमत आहे. वाद-प्रतिवाद झाले पाहिजेत. यातुनच विषयाची व्याप्ति वाढते.
प्रकाश घाटपांडे

मताधिक्याची गंमत.

मताधिक्याची गंमत.

मी 'वकीली युक्तिवाद' करत असल्याचे सदस्यांनी आपापसातच मताधिक्याने ठरवून टाकले हे पाहून गंमत वाटते. अंमळ बालपणाची आठवणही झाली. असो.

एखाद्या गोष्टीवर आक्षेप घ्यायला लोकस स्टॅण्डाय असायला हवा असे माझे विधान नाही. वरील संदर्भात 'दिशाभूल होणे' हे एकाच बाजूने एकाधिकारशाहीने ठरविले जावू नये हेच मला सुचवावयाचे आहे. त्यात लोकशाहीतील मूलभूत तत्त्वाचा विचार आहे. तो हास्यास्पद आहे असे म्हणावयाचे तर लोकशाही हास्यास्पद आहे असे काहीजण म्हणतांत तेच मान्य केल्यासारखे वाटते!

वास्तविक पाहता 'दिशाभूल होणे - न होणे' हे एकाधिकारशाहीने ठरविले जावू नये असा विचार येथे आधीच यावयास हवा होता. ज्या अर्थी तो आला नाही त्या अर्थी येथील सदस्यांचा लोकशाहीच्या तत्त्वांवर विश्वास नाही असा घ्यावयाचा कां? तसे असल्यास येथे उगाचच लिहित राहण्यात काहीएक अर्थ उरणार नाही, होय ना? ;-)

वकीलीतले एक महत्त्वाचे तत्त्वः स्वतःचा ज्या विषयांवर विश्वास नाही त्या विषयांवर युक्तीवाद करू नये. परंतु त्या विषयासंबंधी इतरांच्या युक्तीवादां/विचारां/मांडणीमध्ये त्यास अनुसरून काही न्यायशास्त्रसंबंधी सूचना असतील तर त्या अवश्य सुचवाव्यात.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

लोकशाही

एखाद्या गोष्टीवर आक्षेप घ्यायला लोकस स्टॅण्डाय असायला हवा असे माझे विधान नाही.

म्हणजे तो असावा की नसावा मग?

लोकशाही हास्यास्पद आहे असे काहीजण म्हणतांत तेच मान्य केल्यासारखे वाटते!
आपापसातच मताधिक्याने ठरवून टाकले हे पाहून गंमत वाटते.

सदस्यांनी 'मताधिक्याने' म्हणणे हाणून पाडले म्हणताय आणि त्यांनाच लोकशाही हास्यास्पदही वाटते आहे म्हणताय..कमाल आहे!

वरील संदर्भात 'दिशाभूल होणे' हे एकाच बाजूने एकाधिकारशाहीने ठरविले जावू नये हेच मला सुचवावयाचे आहे.

मग 'दिशाभूल नाही' ह्याबाजूने प्रतिवाद करा. नविन ह्यांनी विचारलेले प्रश्न खोडून काढा. त्याबाजूने एकही ठोस आर्ग्युमेंट आले आहे का? मग एकाधिकारशाही कुणाची चालू आहे?
पडलो तरी नाक वर असं करू नका.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सोयिस्कर अनुमानाची गंमत

मी 'वकीली युक्तिवाद' करत असल्याचे सदस्यांनी आपापसातच मताधिक्याने ठरवून टाकले हे पाहून गंमत वाटते.

आपापसात? काहीही वाट्टेल ते. या संकेतस्थळावर फार अवांतर लिहू नये असे धोरण असताना लोकांना आपल्याविषयी हे जाहीर लिहावे लागते त्यावरून तरी समजून घ्या.

आपण केवळ वकीली युक्तिवाद करता हे अन्यत्र अनेकदा लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दर्शवून दिले आहे. तरीही, सदस्यांनी आपापसात ठरवून टाकले असे म्हणून जो खोटा युक्तिवाद आपण करता आणि सोयिस्कर अनुमान लावता त्याबद्दल काय बोलावे? नितीन थत्ते, लिमये, मी किंवा आणखी कोणी आपापसात कोणतीही बातचीत केल्याचे मला आठवत नाही.

आपल्याकडे दुर्लक्ष करणे हा सर्वात सोपा उपाय दिसतो आणि तसे मी करेनच.

खटले

या चर्चेतून इतर कसला नाही तरी न्यायालयात प्रकरणे दशकानुदशके प्रलंबित राहण्याच्या कारणांचा जरूर उलगडा होतोय.

नितिन थत्ते

चालू द्या...!

चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद...!

सभासदांनी यावर काहीतरी ठाम निर्णय घेणे आवष्यक वाटते
काहीही आवश्यकता वाटत नाही.

आपली नापसंती दाखवण्याचा सौम्य उपाय कोणी सुचवेल कय ?

वाटतं ते खरडत राहा राव, कशाला उपाय,बिपाय शोधत आहात.
लेखनात समजेल इतकी माहिती आणि आवश्यकतेनुसार संदर्भ लेखनात आले म्हणजे झाले.

-दिलीप बिरुटे

डज्झड सक्कयकव्वं सक्कयकंव्वच निम्मियं जेण |
वंसहरम्मि पलित्ते तडयडतट्टत्तणं कुणइ ||
 
^ वर