पी एन ओक ह्यांचा बद्दल

श्री पी एन ओक ह्यांच्या कामा बद्दल विस्तारित माहिती जालावर कुठे मिळेल? अर्थात त्यांची पुस्तकं (स्कैन किंवा टेक्स्ट), अथवा काही लेख, किंवा त्यांच्या "इतिहास शुद्धिकरण" बद्दल अन्य माहिती असल्यास. कृपा करून दुवे द्यावेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

माहिती

पु ना ओक यांच्या बद्दल अधिक माहिती आपले उपक्रमी विंगकमांडर शशिकांत ओक यांच्याकडे मिळेल
प्रकाश घाटपांडे

विनोदी

भलतेच विनोदी लेखक आहेत ते.

कशावरुन

>>भलतेच विनोदी लेखक आहेत ते.
कशावरुन हा निष्कर्ष ! काही उदाहरणे ?
कोणती पुस्तके विनोदी वाटतात, माहिती सांगाल का ?

-दिलीप बिरुटे

घोडचुका

भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका. हे एक विनोदी पुस्तक आहे. त्यातील काही भाग वाचताना ह. ह. पु. वा. होते.

ताज महल

ताज महल हे नाव तेजोमहल (चू.भू.द्या.घ्या.) यावरून आले आहे. इती. श्री पु.ना.ओक
चन्द्रशेखर

सावधान

पु. ना ओक? सावधान! निधर्मवाद धोक्यात!

पु ना ओकांबद्दल एक लेख

पु ना ओकांबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल एक लेख येथे वाचण्यास मिळेल.

एंजॉय!!

उत्तम

जे काय पु ना ओक यांच्या विषयी वाचायला मिळाले आहे त्यामुळे उत्सुकता वाढतेच आहे.

एकुणच या माणसाचे विचार वेगळे होते असे जाणवते.
ते एकुणच आंधळेपाणे पाश्चिमात्य ते सर्व महान त्यांनी आपल्यावर लादलेला इतिहासही महान वगैरे विचारधारेच्या मागे जाणार्‍यांना पचनी पडणारेही आणि परवडणारेही नाही हे पण लक्षात आले.

(परवडत नाही कारण कोणत्या तरी जुन्या इंग्रजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या भाषांतरांवर तर यांचा करीयरचा डोलारा असतो हो, मग तेच यांचे देव! ते सांगतील तोच इतिहास!!)

त्यांचे पाश्चात्य विचारवाद्यांची तथाकथित मते धुडकावून निर्भीडपणे मते मांडणे आवडले.

आपला
गुंडोपंत

उत्सुकता

गुंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे ओक यांच्या संशोधनाविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

तोवर पु ना ओक यांना आवडेल असा एक व्हिडीओ दाखवतो. गुडनेस ग्रेशियस मी मालीकेतील एक बहारदार उदाहरण

गुडनेस ग्रेशियस मी!

सहज, धन्यवाद. गुडनेस ग्रेशियस मी! इतिहासातील काही प्रसिद्ध चित्रे, शिल्पे याकडे पाहण्याची नवी दृष्टी ह्या व्हिडियोने दिली आहे; परंतु, हा व्हिडियो अतिशय गंभीर आहे, 'बहारदार' तर मुळीच नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मस्त व्हिडीऑ

एकदम मस्त व्हिडीओ. आवडली.

करेक्ट

एकुणच या माणसाचे विचार वेगळे होते असे जाणवते आणि पाश्चात्य विचारवाद्यांची तथाकथित मते धुडकावून निर्भीडपणे मते मांडणे आवडले.

पंत,अगदी सहमत आहे. इतिहासातील काही घटना, वास्तू , विचार याकडे पाहण्याची वाचकांना नवी दृष्टी पु.ना.ओकांनी दिली असे वाटते.ते चूक असेल किंवा बरोबर असेल, पण, एक वाचक म्हणून मी तरी कोणाला 'विनोदी' म्हणनार नाही.

-दिलीप बिरुटे

विनोदी

मी पु ना ओकांचे वर उल्लेख केलेले पुस्तक (भा इ सं घो चु) संपूर्ण वाचले आहे. त्या पुस्तकाला विनोदी म्हणण्याची काही कारणे देतो.

पु ना ओकांचा मुख्य आक्षेप मुसलमानी आणि ख्रिस्ती लेखकांच्या लेखनावर आधारून चुकीचा इतिहास शिकवला जातो हा आहे. तो क्षणभर आपण मान्यही करू. पण त्याच पुस्तकात अकबरास थोर समजणे चूक आहे असे प्रकरण आहे. त्या संपूर्ण प्रकरणात पुरावे म्हणून ओकांनी ९० % हून जास्त विन्सेंट स्मिथचे पुस्तक आणि उरलेले काही जेम्स टॉड आणि इतर इंग्रज / ख्रिस्ती लेखकांचीच पुस्तके उल्लेखिली आहेत. म्हणजे जेथे सोयीचे तेथे इंग्रजांचेच दाखले असा प्रकार आहे.
(अवांतरः आम्ही शिकलेल्या इतिहासात शिवाजी महाराजांनी औरंगजेबास हिंदूंना सौजन्याने वागवावे असे सुचवताना 'आपल्या आजोबांचे उदार धोरण ....' असे सांगितल्याचे ऐकले होते. कदाचित ते चुकीचे असेल. म्हणजे (काँग्रेस-कम्युनिस्ट काळापूर्वी) एका भारतीय हिंदूला तरी अकबर चांगला/थोर असल्याचे मान्य होते.)

पुस्तकातील २१व्या प्रकरणाची सुरुवात "युरोपियन लोकांना इसाई म्हणून छळबळाने बाटवणार्‍यांनी त्यांचा पूर्वीचा इतिहास नष्ट केला म्हणून विश्व हे एका महास्फोटाने निर्माण झाले असावे, विविध प्राणी हे एका मूळ जीवापासून उत्क्रांत झाले असावेल अशा काल्पनिक पुस्त्या इतिहासाला जोडाव्या लागल्या" अशी आहे. त्याच प्रकरणात पुढे "उलट वैदिक परंपरेकडे विश्वनिर्मितीपासून साद्यंत इतिहास आहे. प्रथा सर्वत्र निश्चल अंधार होता. मग ॐ असा ध्वनि अवकाशात निनादित झाला वगैरे....." वर्णने आहेत.

बाकी संपूर्ण पुस्तकात सध्या वापरात असलेले उर्दू, इंग्रजी शब्द (अक्षरसाधर्म्याने) मूळ असे आहेत असे कोणताही आगापिछा न देता ठोकून दिले आहे. यासर अराफत = श्री हरिपाद (काही काळाने ग्लास आणि टेकनिक हे शब्द मुळात गिलास आणि तकनीक या हिंदी शब्दांवरून आले आहेत असे म्हटले तरी आश्चर्य वाटू नये).

त्यामुळे त्यांच्या लेखनास विनोदी म्हणणे हे योग्यच आहे.

तर मग

काही काळाने ग्लास आणि टेकनिक हे शब्द मुळात गिलास आणि तकनीक या हिंदी शब्दांवरून आले आहेत असे म्हटले तरी आश्चर्य वाटू नये

७८६ ची कुळकथा पण पहायला विसरू नका -
http://www.youtube.com/watch?v=SNraVirlP8U

:) ;)
--------------------------X--X-------------------------------

कल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती?
आकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती?
नवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे

घाटपांडे, चितरंजन ह्यांना धन्यवाद्

@ चितरंजन भाऊ - धन्यवाद
@ घाटपांडे साहेब - शशिकान्त ओक ह्यांचे सम्पर्क सूत्र मिळतील का?
पीएन ओक सम्बन्धी माहिती मला मराठी-हिन्दी अनुवादा सम्बन्धी हवी आहे, ते विनोदी आहेत किंवा नाहीत, त्यांचे लेखन कसे आहे, ह्याच्या शी मला काही देणे-घेणे नाही... दुवे दिल्याबद्दल सर्वांचे आभार...

http://sureshchiplunkar.blogspot.com

पु. ना. ओक : अशास्त्रीय दृष्टिकोन

पु. ना. ओक यांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन शास्त्रीय नव्हता. हिंदू साम्राज्य हे जगभर पसरले होते व या साम्राज्यावर ईस्लाम व ईसाई धर्मियांनी आक्रमणे केली याच अतिरंजित कल्पनेवर त्यांचे लिखाण आधारलेले आहे. आपल्या लिखाणातून भाषिक साधर्म्याद्वारे हिंदू साम्राज्य किती दूरवर पसरले होते, याचे ते दाखले देतात. केवळ हिंदूच सुसंस्कृत, अन्य धर्मीय म्हणजे रानटी आक्रमक.त्या हिंदू साम्राज्यात सर्वसामान्य माणूस कसा जगत होता, आर्थिक व प्रशासकीय व्यवस्था काय होती अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांच्याकडे नाहीत.त्यांच्या या पद्धतीच्या लिखाणामुळे त्यांना इतिहास लेखनात कोणी गांभिर्याने घेतलेले नाही. त्यांच्या कल्पनेतील दूरवर पसरलेल्या हिंदू साम्राज्याची कल्पना अनेक हिंदुत्ववाद्यांना फार भावते. त्यामुळे विचारांचा आगापिछा नसलेलं त्यांचे लिखाण हे पाश्चात्त्य प्रभावापासून मुक्त असे स्वतंत्र चिंतन होते असे म्हणणे अयोग्य तर आहेच, परंतु हास्यास्पद आहे.

 
^ वर