टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

आमंत्रण
पुण्यात येऊ शकणाऱ्या उपक्रमवासीयांसाठी खास

रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील “आकार पॉट आर्ट”तर्फे भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) कलाकृतींचे प्रदर्शन दि. १२ नोव्हें. ते १५ नोव्हें. २००९ च्या दरम्यान पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजीत करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्ग्घाटन डॉ. अभिजीत वैद्य, एम.डी. संस्थापक राष्ट्रीय आरोग्यसेना प्रमुख, यांच्या हस्ते, टेराकोटाचे तज्ज्ञ श्री. आनंद दामले यांच्या उपस्थीतीत, दि. १२ नोव्हें.२००९ रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे.
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील कलाकारांनी तयार केलेल्या कुंभारकलेच्या विविध कलाकृती मांडण्यात येणार आहेत. तसेच त्या बनवण्याच्या काही पद्धतींचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.

प्रदर्शनाची वेळ : सकाळी १०.३० ते संध्या. ८.००
प्रात्यक्षिकांची वेळ : सकाळी ११.०० ते दुपारी १.००

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

जवळच राहतो तर जायला हवं!
प्रकाश घाटपांडे

वा!

लेखच अजून कच्चाच आहे.. मातीची पात्रे मात्र पक्की असतील अशी आशा आहे ;) :) (हलके घ्यालच)
बाकी ह्याचा वृत्तांत, अनुभव आणि प्रत्यक्ष छायाचित्रे बघायला आवडतील

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

 
^ वर