चर्चेचा प्रस्ताव - मेकॉले खरच चांगला माणूस होता का?

आजच्या लोकसत्तेतला लेख इथे देत अहे. भलती महत्त्वाची माहिती दिल्यासारखा आविर्भाव आणला आहे. आणि उलटीसुलटी माहिती दिली आहे. इथे माझ्यापेक्षा अभ्यास जास्ती असणारे खूप आहेत. कृपया त्या लेखावर चर्चा करुया.

मेकॉलेचे चारित्र्यहनन - एक लाजिरवाणा अध्याय

ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वेसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते.
पण प्रत्यक्षात अनेक लेखक ही पथ्ये पाळत नाहीत व त्यामुळे हास्यास्पद निर्णय काढतात. एक उदाहरण-
पानिपतच्या मोहिमेत सदाशिवभाऊंनी मोगलांचे सिंहासन-तख्त घण घालून तोडले, अशी कथा अनेक मराठी साहित्यिकांनी लिहिली आहे व आजही लिहिली जाते. यामध्ये मुसलमीन तख्ता फोडी, हाणुनी घणा। ध्वज तो उभवूया पुन्हा।। असे लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, तसेच इस्लामी सत्तेचे प्रतीक असणारे मुगलांचे सिंहासन हिंदू वीरांनी घण घालून तोडले, असे लिहिणारे गोळवलकर गुरुजीही आहेत आणि इतरही डझनभर कादंबरीकार आहेत.
प्रत्यक्षात मोगल बादशहाच्या संरक्षणाची जबाबदारी १७५२ सालच्या अहमदिया कराराप्रमाणे पेशव्यांनी घेतली होती. त्याच्या बदल्यात सहा मोगलांच्या सुभ्यात चौथाई वसूल करण्याचा हक्क बादशहाने पेशव्यांना दिला होता. अब्दाली दिल्लीवर येत आहे असा सांगावा आल्यावर बादशहाच्या संरक्षणासाठी सदाशिवभाऊ मोठे सैन्य घेऊन दिल्लीकडे गेले. तेथे पोहोचेपर्यंत भाऊंकडील पैसा संपला व बादशहाचा खजिनाही रिता होता. त्यामुळे शिपायांच्या पगारासाठी दिवाने खासमधील चांदीचे छत उतरवून, वितळवून चांदीची नाणी पाडली व शिपायांना पगार केला ही वस्तुस्थिती!
तरीही काहीही आधार नसता भाऊंनी इस्लामी तख्त घण घालून फोडले, असा प्रचार होतो व त्यात सामान्य जनता बळी पडते.
काही वेळा असा प्रकार अज्ञानातून होतो व ते क्षम्यही आहे. पण बऱ्याच वेळा तद्दन खोटा प्रचार जाणुनबुजून केला जातो व ते अश्लाघ्य आहे.
मेकॉलेचे चारित्र्यहनन दुसऱ्या प्रकारात बसते.
थॉमस बॅविंग्टन मेकॉले हे एका राजकीय गटाचे क्रमांक एकचे शत्रू. त्यांच्याविषयी बदनामीकारक व उघडउघड खोटय़ा माहितीचा प्रचार करणे हा या गटाचा अनेक वर्षे सतत चालू असलेला उद्योग. या त्यांच्या प्रचाराला केवळ सामान्य जनताच नव्हे तर सुविद्य नेतेही बळी पडतात. एक उदाहरण-
गुरुवार, ११ ऑक्टोबर २००७ च्या लोकसत्ता, पुणे वृत्तान्तच्या पुरवणीत प्रसिद्ध इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा ‘१८५७- समरभूमीच्या भेटीची संधी’ या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात मेकॉलेच्या भाषणातून घेतलेला एक उतारा इंग्रजीतून मुद्रित केला आहे. त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे-
मी भारतात खूप फिरलो. उभा-आडवा भारत पालथा घातला. मला तेथे एकही भिकारी, एकही चोर पाहायला मिळाला नाही. हा देश इतका समृद्ध आहे, तिथली नैतिकमूल्ये इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की, आपण हा देश कधी जिंकू शकू, असे मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा. त्यासाठी त्यांनी प्रश्नचीन शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल. भारतीय लोक जर असे मानू लागले की, परदेशी आणि विशेषत इंग्रजी ते सारे चांगले, त्यांच्या संस्कृतीपेक्षा उच्च, थोर आहे, तर ते त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतील आणि मग ते आपल्याला हवे आहेत तसे बनतील- एक गुलाम राष्ट्र!
(लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये २ फेब्रुवारी १८३५ रोजी केलेल्या भाषणाचा अंश)
श्री. निनाद बेडेकर यांच्या लेखातील उपरोक्त उतारा वाचल्यावर आम्ही दोघेही आश्चर्यचकित झालो. आमच्या शालेय शिक्षणात आम्ही मेकॉले, ग. ज. बेंटिक यांच्याविषयी वाचले होते. भारतातील रेनेसॉचे किंवा प्रबोधनकाळाचे नेते असा त्यांचा राजा राममोहन रॉय यांच्यासमवेत उल्लेख असे. भारतीयांच्या भौगोलिक, विज्ञानविषयक आणि साहित्याविषयी मेकॉलेचे मत चांगले नव्हते व तो ते परखडपणे लिहीत असे. पण वर उद्धृत केलेल्या उताऱ्यात ध्वनित होते तसा मेकॉले कुटील वृत्तीचा, बदमाष गृहस्थ होता अशी आमची धारणा नव्हती. आमच्या मनातील मेकॉलेच्या प्रतिमेला वरील उताऱ्याने छेद दिला. आमच्या मतातील मेकॉलेची प्रतिमा ही त्याच्या अनेक भाषणांच्या परिशीलनानंतर व त्याने ग. ज. बेंटिक यासाठी लिहिलेल्या शिक्षणपद्धतीविषयीच्या टिपणांच्या वाचनानंतर झाली होती. हे टिपण भारताच्या राष्ट्रीय अर्काईव्हजमध्ये उपलब्ध आहे. तसेच खालील संकेतस्थळावरही उपलब्ध आहे- http://www.languageinindia.com/april2003/macaulay.html

मेकॉलेच्या अनेक भाषणांपैकी आम्हाला जे विशेष भावले होते त्यातील काही भाग खाली उद्धृत केला आहे. हे भाषण मेकॉलेने १० जुलै १८३३ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या पोर्टरच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाच्या संदर्भात केले होते.
‘आपण आपल्या समाजाबद्दल सुसंस्कृत व स्वतंत्र अशी प्रश्नैढी मिरवतो, पण हे स्वातंत्र्य व ही संस्कृती इतर समाजाला देण्यावेळी खळखळ करू लागलो तर आपला सुसंस्कृतपणाचा दावा एक ढोंग ठरेल. भारतीय लोक आपल्या अमलाखाली नोकर म्हणून राहावेत म्हणून त्यांना आपण शिक्षणापासून वंचित ठेवले तर असले वर्तन खोटारडेपणाचे ठरेल.’
मेकॉले पुढे म्हणतो, ‘आपल्या अमलाखाली भारतीयांचे सामाजिक मानस प्रबुद्ध होईल. आपल्या चांगल्या, स्वच्छ शासनपद्धतीमुळे भारतीय लोक स्वयंशासनास सक्षम होतील, शिक्षणामुळे तज्ज्ञ होतील व मग ते स्वातंत्र्याची मागणी करतील. असा दिवस केव्हा येईल ते मी सांगू शकत नाही, पण तो दिवस येत असताना दिसला तर मी त्यास कोणताही अडथळा निर्माण करणार नाही. तो दिवस ब्रिटिश राजवटीला असीम अभिमानाचा ठरेल.’
अशा तऱ्हेची अनेक भाषणे मेकॉलेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केली होती, तसेच एडमंड बर्क आदी व्हिग पक्षीय नेत्यांनीही केली होती. आमचे शालेय शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात झाले असल्यामुळे ब्रिटनचा इतिहास आम्ही तीन वर्षे शिकत होतो. त्यामुळे १७८४ सालच्या प्रश्नईम मिनिस्टरच्या भारतविषयक कायद्यातील पुढे उद्धृत केलेली वाक्ये आम्हाला आठवत होती.
‘भारतात आणखी काही प्रदेश जिंकणे ब्रिटिश जनतेच्या न्यायबुद्धीस व संस्कृतीस कलंक लावणारी आहे, अशी ब्रिटिश जनतेची भावना आहे. म्हणून कायदा केला जातो की..’
त्यामुळे आम्हा लेखकद्वयास बेडेकरांनी उद्धृत केलेल्या उताऱ्याच्या खरेपणाविषयी शंका आली व आम्ही वैद्यक व्यवसाय सांभाळून अधिक वाचनास सुरुवात केली. त्यातून आश्चर्यचकित करणारी माहिती मिळाली. तशीच मनात उद्विग्नता किंवा विषाद आणणारी माहितीही मिळाली. त्याचे थोडे स्पष्टीकरण पुढे केले आहे.
अ) १. मेकॉलेच्या नावावर खपविला जाणारा उतारा हा मेकॉलेच्या भाषणातील नाही. १८३४ ते १८३८ या काळात मेकॉले भारतात होता व त्याने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण करणे अशक्य. २. पार्लमेंटमध्ये असे उघडउघड कुटील हेतू स्पष्ट करणारे भाषण कुठलाही शहाणा माणूस करणार नाही; परंतु या विषयाची चर्चा या लेखात अप्रस्तुत आहे. ही चर्चा आमच्या आगामी पुस्तकात केली आहे.
ब) सदर उतारा अनेक लेखकांनी आपल्या लेखात उद्धृत केलेला आहे. या उताऱ्याविषयी प्रसिद्ध हिंदुत्ववादी बेल्जियमस्थित लेखक काईनराईड एल्स्ट यांनी विशेष अभ्यास केला आहे. या प्रखर हिंदुत्ववादी लेखकांची सॅफ्रन स्वस्तिक आणि रामजन्मभूमी विरुद्ध बाबरी मशीद ही दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यातील क्रमांक दोनच्या पुस्तकाचे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. हे येथे नमूद करण्याचे कारण एकच, ते म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीविरोधी त्यांच्या मनात काही आकस नाही. उलट हिंदुत्ववादी विचारसरणीविषयी त्यांच्या मनात प्रेमच आहे.
काईनराईड एल्स्ट यांचे विचार- विवेचनविषय असणारा उतारा वाचल्यावर एल्स्ट हेही आश्चर्यचकित झाले. त्या भारतातल्या आपल्या मित्रांकडे चौकशी केली असता सदर उतारा खालील संकेतस्थळावरून पाठविला जातो हे कळले. ती संकेतस्थळे खालीलप्रमाणे-
www.aryasamaj.org
www.veda.harekrishna.cz
एल्स्ट यांच्या संकेतस्थळावरील माहितीप्रमाणे पूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम दिल्लीमधील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन समारंभासाठी मुख्य अतिथी होते. (३०/०२/२००४). तेथे भाषणात त्यांची मेकॉलेच्या पार्लमेंटमधील भाषणाचा उल्लेख केला. आम्ही पूर्व राष्ट्रपतींकडे चौकशी केली. ती ई-मेल व त्यांचे आलेले उत्तर खाली दिले आहे.
एल्स्ट यांच्या माहितीप्रमाणे भारत सरकारच्या नियोजन मंडळाच्या कागदपत्रातही मेकॉलेच्या सदर उताऱ्याचा अंतर्भाव आहे.एल्स्ट आपल्या भाजपतील हिंदुत्ववादी मित्राला कळकळीचा सल्ला देतात की, उघडउघड बनावट भाषणाचा आधार घेऊ नका. अशाने हिंदुत्ववादी चळवळीचे नुकसान होणार आहे.
तरीही या वर्षी जी लोकसभा निवडणूक झाली त्यासाठी भाजपने ३२ पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात सुरुवातीसच मेकॉलेच्या १८३५ भाषणातील अंश म्हणून सदर उतारा मुद्रित केला होता. थोडक्यात पालथ्या घडय़ावर पाणी!
मेकॉलेवरील इतर आरोपांची चर्चा आमच्या आगामी पुस्तकात आहे. मेकॉलेवर त्याचा अंतस्थ हेतू ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे होता, असे बिनबुडाचे आरोप करण्याआधी त्याची पार्लमेंटमधील भाषणे (मूळ स्रोतातून) व त्याचे शिक्षणपद्धतीवर लिहिलेले टिपण आधी अभ्यासावे ही विनंती.
डॉ. जनार्दन वाटवे
डॉ. विजय आजगावकर

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=186...

Comments

बनावट विचार

मेकॉलेचे 'विचार' पूर्वी ढकलपत्रांतून वाचले होते. (त्यावेळी ते खोटे की खरे याची शहानिशा केली नव्हती/करायची तसदी घेतली नव्हती). परंतु ते खोटे असावेत अशी शंका त्या ढकलपत्राला उत्तर म्हणून व्यक्त केली होती. याचे कारण मेकॉलेने हे १८३५ मध्ये म्हटले असेल तर आपण हा देश कधीही जिंकू शकणार नाही असे म्हणायची त्याला आवश्यकता नव्हती कारण १८३५ पर्यंत इंग्रजांनी उभा भारत अगोदरच जवळजवळ जिंकला होता. दुसरे म्हणजे एखाद्या देशाची शिक्षणपद्धती बदलणे वगैरे विचार देश जिंकल्यावरच केले जाऊ शकतात. शिक्षण पद्धती बदलून देश जिंकण्याची आयडिया अगदीच बालिश.

सामान्यपणे असले मजकूर जुन्या भारतीय संस्कृती वगैरे बद्दल (वृथा) अभिमान न बाळगणार्‍या भारतीयांना "मेकॉलेच्या कारवायांनी तुमचे कसे ब्रेनवॉशिंग झाले आहे ते पहा" असे दाखवण्यासाठी आणि इतरांना "यांच्या म्हणण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका" असे सांगण्यासाठी सर्क्युलेट केले जातात.

माजी राष्ट्रपतींचे मेल दिसले नाही.

नितिन थत्ते

आभार

सर्वप्रथम बिलंदर बक्कू ह्यांचे आभार मानायला हवेत. ह्या चर्चेमुळे एकाप्रकारे ह्या हिंदुत्ववाद्यांचा ढोंगीपणा, अप्रामाणिक उघडकीस आणण्यास मदत होणार आहे. राष्ट्रभक्तीच्या/देशभक्तीच्या नावाखाली असला प्रकार खपून जातो. मंचप्रेमी, माध्यमचतुर इतिहासकार संशोधन कधी करतात कळत नाही. खऱ्या इतिहासकारांकडे असल्या फालतूपणासाठी वेळ नसतो.

माहितीसाठी:
काईनराईड एल्स्ट ह्यांचे विचार.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मेकॉले खरच चांगला माणूस होता का?

मेकॉले खरच चांगला माणूस होता का?

होता असा हा लेख वाचून वाटले. काही चावट लोकांचा बनावटपणा कधी ना कधी बाहेर पडतोच हे दिसले हं बक्कूबाई.

-राजीव.

माझे विचार

मेकॉले चांगला माणूस होता की वाईट होता याबद्दल मला विशेष रस नाही, पण त्याचे भाषण या नावाखाली जे काही पसरले जात होते त्यातल्या प्रत्येक वाक्याचे विवेचन मी माझ्या या लेखात केले होते. अखेर मी काढलेले तात्पर्य असे आहे. " त्यामुळे मेकॉलेचे भाषण म्हणून जे कांही प्रसारित केले गेले त्यात मला तरी कांही तथ्य दिसत नाही."

लेख चांगला आहे

लेख पटण्यासारखा आहे.

इमेलातून असे काहीतरी भडक पसरवत राहणे हा काहीजणांचा उद्योग असतो.

सोनिया गांधी, राजीव गांधी, नेहरूंवरूनही असे अनेक इमेल पाठवले जातात.

*

दोनदा आल्याने काढून टाकत आहे.

हिंदुत्ववाद्यांचा कांगावा

श्री बिलंदर, हा लेख येथे डकवल्याबद्दल धन्यवाद. मेकॉले यांचे विपर्यस्त चित्रण हा हिंदुत्ववाद्यांचा आवडता उद्योग अनेक दशके सुरू आहे. श्री बेडेकरांना इतिहास संशोधक असे उल्लेखने म्हणजे इतिहास या अभ्यासशाखेचा घोर अपमान करण्यासारखे आहे.

रोचक लेख

लेख आणि प्रतिक्रिया वाचतो आहे.

- - -
मॅकॉलेचे लेखन वाचताना मला अस्वस्थता (ऐतिहासिक व्यक्तीबद्दल क्रोध कसा येणार, म्हणून अस्वस्थता) वाटते. ही अस्वस्थता त्याच्या इंग्रज-दुरभिमानाबद्दल वाटते. या दुराभिमानामुळे "आपण या मागास हिंदुस्थान्यांचे कल्याण करत आहोत" अशा प्रकारच्या त्याच्या लेखनातील वाक्ये दोष देण्यासारखी आहेत, खचित.

"दुरभिमानाने स्वतःला पुण्यवीर मानणारा" आणि "कुटिल वागण्यात आनंद मानून कारस्थाने रचणारा" दोन्ही निंदनीय प्रकार असले, तरी त्यांत जमीन-आस्मानाचा फरक आहे. ब्रिटिश सरकारात कुटिल कारस्थाने करणारे लोकही खूप सापडतील. रॉबर्ट क्लाइव्ह, डलहौसी वगैरेंनी आधी मोडायचे ठरवून करार केलेत. त्यांचा दोष दुसर्‍या प्रकारचा आहे, त्याच्यापासून सावध होण्याचा बोधही वेगळा आहे.

प्रथम प्रकारच्या दोषात कमी-अधिक प्रमाणात आपण सर्व पडत असतो. उद्या भारत अधिक शक्तिशाली झाला आणि (चीनसारखा) कुठल्या आफ्रिकी देशात खनिज तेलासाठी आपले अधिकारी पाठवू लागला तर काय होईल? (अफगानिस्तानात आजही अधिकारी पाठवत आहे.) कुठला राष्ट्राभिमानी भारतीय तरुण आफ्रिकन लोकांना सुसंस्कृत+संगणकीकृत करायच्या ध्येयाने जाईल. असे काही करताना त्याने स्वतःला किंवा आपल्या राष्ट्राला "पुण्यवीर" मानून फार चुरगळा करू नये, अशी काही शिकवण मॅकॉलेच्या लेखनातून मिळू शकेल.

शीर्षकात "मॅकॉले खरंच चांगला माणूस होता का?" असे म्हणण्यापेक्षा "मॅकॉलेला योग्य तो दोष देण्याऐवजी भलताच दोष देण्यात येत आहे का?" असे काही म्हटले असते, तर अधिक पटले असते.

(संस्कृत आणि अरबी-फारशी भाषांमधील ग्रंथांबद्दल मॅकॉले याने तुच्छता दाखवली आहे, तशी लोकहितवादी आणि राजारामशास्त्री भागवत यांनी सुद्धा दाखवली. लोकहितवादींच्या मते भारतीयांनी इंग्रजी विद्या थेट आणि भाषांतर करून शिकावी. राजारामशास्त्री यांनी मराठी भाषेचा किल्ला लढवताना संस्कृत-फारशींचे वाभाडे काढले.)

सहमत + थोडे अधिक

शीर्षकात "मॅकॉले खरंच चांगला माणूस होता का?" असे म्हणण्यापेक्षा "मॅकॉलेला योग्य तो दोष देण्याऐवजी भलताच दोष देण्यात येत आहे का?" असे काही म्हटले असते, तर अधिक पटले असते.

धनंजयच्या या विधानाशी पूर्ण सहमत.

आता थोडे अधिक - कोलंबिया विद्यापिठाच्या संकेतस्थळावरून खालील उतारा:

Minute by the Hon'ble T. B. Macaulay, dated the 2nd February 1835.

[34] In one point I fully agree with the gentlemen to whose general views I am opposed. I feel with them that it is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern, --a class of persons Indian in blood and colour, but English in tastes, in opinions, in morals and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.

ऑक्टोबर १८३६ ला वडिलांना लिहीलेल्या पत्रातील खालील विधान (पहीला परीच्छेद संदर्भासाठी आहे)

संदर्भः Leipsic edition of the Life and letters of Lord Macaulay, Volume 1, By Sir George Otto Trevelyan

बाकी चालूद्यात...

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ईश्वरी इच्छा

शीर्षकात "मॅकॉले खरंच चांगला माणूस होता का?" असे म्हणण्यापेक्षा "मॅकॉलेला योग्य तो दोष देण्याऐवजी भलताच दोष देण्यात येत आहे का?" असे काही म्हटले असते, तर अधिक पटले असते.

असे शीर्षक असायला हवे होते. कुठल्याही, विशेषतः साम्राज्यवादी, राज्यकर्त्यांप्रमाणे इंग्रजही अहंगडांने पीडित होते हे खरेच. भारतीयांवर गोऱ्या इंग्रजांनी आम्ही राज्य करावे आणि त्यांचा उद्धार करावा ही तर ईश्वरी इच्छा होती. किपलिंगने एका ठिकाणी म्हटलेच आहे: "The responsibility to govern India has been placed the inscrutable decree of providence upon the shoulders of the British race".किपलिंगची 'व्हाइट मॅन्ज़ बर्डन' ही कविता वाचल्यास तेव्हाच्या इंग्रजांची मानसिकता कळू शकायला मदत होऊ शकेल.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

छान!

छान!

अशा चर्चा व्हाव्यात. ह्या चर्चांमुळे कोण किती पाण्यात आहे ते तरी दिसून येते.

बाकी, मॅकॉले च्या एका वचनाबद्दल एक प्रश्न आहे. आपले येथील इतिहासाभ्यासक मान्यवर सदस्य तो सोडवू शकतील असे वाटते.

भारतीय लोक आपल्या अमलाखाली नोकर म्हणून राहावेत म्हणून त्यांना आपण शिक्षणापासून वंचित ठेवले तर असले वर्तन खोटारडेपणाचे ठरेल.

हे मराठीत भाषांतरीत केले गेलेले वाक्य: भारतीय लोक आपल्या अमलाखाली नोकर म्हणून राहावेत; म्हणून त्यांना आपण शिक्षणापासून वंचित ठेवले तर असले वर्तन खोटारडेपणाचे ठरेल. असे अथवा: भारतीय लोक आपल्या अमलाखाली नोकर म्हणून राहावेत म्हणून, त्यांना आपण शिक्षणापासून वंचित ठेवले तर असले वर्तन खोटारडेपणाचे ठरेल. अशा दोन प्रकारे वाचता येते. तर मूळ इंग्रजी वाक्याचा संदर्भ कोणांस ठावूक आहे काय? तो कळला तर विचारांच्या संदर्भासाठी बरे.

तसेच श्री. विकास ह्यांनी दिलेले चित्र माझ्या संगणकावर उमटले नाही. ते पाहण्याची उत्सुकता आहे.

असो. धन्यवाद.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

 
^ वर