वेदकालीन ज्ञानाची शास्त्रीयदृष्ट्या पडताळणी- एक माहितीपट

नमस्कार मंडळी,
आर्य भारतात बाहेरून आले की ते भारतीयच होत ?!. या विषयी अनेक संशोधकांनी आपापल्या पद्धतीने संशोधन करून मते मांडलेली आहेत. त्यासाठी निरनिराळे पुरावे दिले जातात आणि मग त्यांचे खंडन-मंडन होत असते.

या मध्ये टिळकांसारख्या विद्वानाचे 'आर्टिक होम इन द वेदाज'* हा संशोधन ग्रंथ आपल्या परिचयाचा आहेच. त्यात ते वेद, त्यातील वर्णन केलेल्या खगोलीय घटना आणि इतर भौगोलिक संदर्भ तसेच त्या काळी विकसित भूशास्त्रीय मते यांना अनुसरून आर्यांचे मूलवस्तिस्थान हे उत्तरध्रुव प्रदेशात होते असे म्हणतात. तर माझ्या वाचनात विवेकानंदांचे असे मत आले आहे आहे की आर्य भारतात इतरत्र कठून तरी आले हा भ्रम आहे. या साठी ते काय पुरावे देतात ते माझ्या वाचनात नाही. तर या प्रश्नावर अनेक वर्षे उहापोह चालूच आहे.

या विषयी काही मते मांडणारा 'सायन्टिफिक व्हेरिफिकेशन ऑफ वेदिक नॉलेज' हा माहितीपट आताच काही दिवसांपूर्वी माझ्या पाहण्यात आला. तो गुगल व्हिडियोज वर पाहता येईल. ( http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587 )
या मध्ये आर्य हे भारतीयच होत असा मुख्य सूर आहे. आर्किओलॉजीतील संशोधनाच्या सहाय्याने ते पुढील मते मांडतात.
१. वेदात आणि इतर भारतीय प्राचिन ग्रंथांमध्ये वर्णिलेली स्थळे म्हणजे सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यांचा प्रदेश आहेत.
२. सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यांत प्रचंड प्रमाणात मिळणारे प्राचीन संस्कृतीचे पुरावे आणि त्याला निगडित असणार्‍या साहित्याचा अभाव तर दुसर्‍या बाजूला प्रचंड प्राचीन साहित्य आणि त्याच्याशी निगडित असणार्‍या स्थळांद्दल काहिच माहिती नसणे या व्याघातातून सुटका.
३. वेद आणि इतर साहित्यातील संदर्भांचा पुरावा उत्खननातील वस्तूंवरील खोदकामात आणि द्वारिके सारख्या नगरींच्या भग्नावशेषांमध्ये.
४. या सर्वांचे खंडन आणि मंडन करणार्‍या विद्वानांच्या मतांचा विचार आणि आर्य भारतातून आले हा समज पसरवणे हा इंग्रजांच्या कूटनितीचा भाग होता असे मत प्रतिपादन.
अशा तर्‍हेचा हा माहितीपट आहे. आपण सर्वांनी तो अर्धा तास सवड काढून पहावा आणि आपणाला या माहितीबद्दल आणि तसेच मूळ प्रतिपाद्य विषयाबद्दल काय वाटते ते सुद्धा येथे मांडावे. ही चर्चा आपणासारख्या माहितगार आणि व्यासंगी उपक्रमींमुळे उद्बोधक होईल अशी खात्री वाटते.
आपला,
-- (इतिहासप्रेमी) लिखाळ.

Comments

भलतेच उशीरा पाठवलेले उत्तर

तो व्हिडियो माझ्या एका आप्तांनी मला पाठवला. वेदकालीन, मध्ययुगातील आणि हल्लीहल्लीच्या तपशिलांचा सावळा गोंधळ घालून ऐतिहासिक पुराव्यांचा विपर्यास केलेला आहे.

थोड्याच वेळात मी जे सांगत होते त्याच्यापेक्षा जसे सांगत आहेत (style rather than content) याच्याकडे जास्त लक्ष देऊ लागलो. उदा. सूत्रधार कोणी काळासावळा भारतीय नसून भगवा सदरा घातलेला गोरा कशाला निवडला, वगैरे. परंतु पाच मिनिटांत त्याचाही कंटाळा आला.

पदोपदी जर चुका असल्या तर त्यांचे मुद्देसूद खंडन करणे केवळ मुश्किल होते.

अशा प्रकारचे "सबळ पुराव्यासकट" व्हिडियो अधूनमधून काही ख्रिस्ती आप्तही पाठवतात. त्यांचेही मुद्देसूद खंडन करावे की नाही असा धावता विचार मनात येतो. पण साधारणपणे त्या प्रकारात मी पडत नाही.

पण येथे आप्त स्वकीयही असल्यामुळे मनाची आणखी ओढाताण!

धनंजय

आर्य्

वरील वाचले...प्रश्न असा पडला कि...प्राचीन काळी बरीच जमीन जोडलेली होती (बरेच वेगवेगळे खंड नव्ह्ते ) तेंव्हा जे काही घडले ते एकाच खंडात...अफगाणिस्तान सुद्धा भारताचा भाग होता. गांधारी कंधार ची होती...कालांतराने खंड वेगवेगळे झाले तेंव्हा लोक सुद्धा विभागले गेले असतील ना? जमिनीबरोबरच !! म्हणजे दोन तीन जमाती असाव्यात व नंतर विभागल्या गेल्या असाव्यात असे वाटते.

वैदिक धर्म कोणाचा? आर्य आणि द्रविड यांच्यात काय फरक? आपण जर आर्य असू तर द्रविड कोठे गेले? गोरे लोक स्वतःला आर्य म्हणवतात आणि सावरकरांनी त्यांच्या इतिहासाची ६ सोनेरी पाने पुस्तकात आर्यांचा वैदिक धर्म म्हंटले आहे आणि आपला धर्म जो कि हिंदू वैदिक परंपरा सांगतो मग आपण आर्य का?

आर्य जर बाहेरून आले तर आधीची संस्कृती (म्हणजे लोक)कोठे गेली?. हिटलरने आर्य संस्कृतीच्या नावाखाली स्वस्तिक चिन्ह घेऊन थैमान मांडले...आपण स्वस्तिक पुरातनकालापासून वापरतो...मग काय समजायचे? अजूनही खूप प्रश्न आहेत...सध्या यांची उत्तरे मिळाली तरी खूप.

अफगाणिस्तान आणि भारत

अफगाणिस्तान आणि भारत/ पाकिस्तान हे अद्यापही जोडलेलेच आहेत. जेव्हा खंड सरकले तेव्हा मानववस्ती नसावी, असल्यास मानवी संस्कृती नसावी असे वाटते.

बाकी प्रश्न उपक्रमावर अनेक चर्चा आणि लेखांतून सोडवले आहेत. थोडे शोधल्यास नक्की मिळतील.

भ्रमण

मी दाखल्यादाखल दिलेले देश आजही जरी जोडलेले आहेत हे खरे असले तरी मला settlers च्या भ्रमणाबद्दल म्हणायचे होते...आता अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इ. खंड विभागलेले आहेत. ग्रीनलंड चा सुद्धा कोणत्याही देशाशी जमिनीवरून संबंध नाही...प्राचीन काळी इतक्या तुकड्याऐवजी २-३ खंडच अस्तित्वात होते (भूगोल)...तेंव्हा माणूस भ्रमण करत असणारच...आणि जेंव्हा हे खंड वेगवेगळे झाले तेंव्हा लोकही विभागले गेले असणारच....उदा. अमेरिकेतील नोवाहो जमात वगैरे. नाहीतर तिथे हे अप्रगत लोक कसे गेले असतील ...त्या काळी.

माझ्या म्हणण्याचा अर्थ असा कि जगातील लोक ज्यांना आपण आर्य, द्रविड इ. म्हणतो त्यांचा अंश सगळीकडे असणारच.. नाही का? असो...अजून माझे या विषयावरील सगळे धागे वाचून झालेले नाहीत...काही न कळल्यास परत विचारेन.

ग्लोबल वॉर्मिंग

पूर्वी समुद्राची पातळी कमी होती त्यामुळे रशियातून अलास्कात जाता आले असे वाचल्याचे आठवते.

सुमारे १२००० वर्षांपूर्वी

सुमारे ११-१२००० वर्षांपूर्वी काही जमाती सायबेरिया ओलांडून अलास्काकडून द. अमेरिकेकडे वळल्या. तो काळ खूप जुना नाही. त्यांना छातीठोकपणे आर्य किंवा द्रवीड म्हणता येत नाही असे वाटते. आर्य आणि द्रवीड यांच्या व्यतिरिक्त अनेक जमाती अस्तित्वात होत्या.

इतके मात्र खरे की माणूस नावाचा प्राणी आफ्रिकेत प्रथम जन्मला आणि तेथूनच बाहेर पडला.

सरस्वती

माझ्या मते, सरस्वती नदी बद्दल अजुन माहिती देता आली असती.

ऋग्वेदामध्ये सरस्वती चा उल्लेख सिन्धु आणि गंगे पेक्षा अधिक वेळेस येतो. भुगर्भशास्त्रज्ञांनी सरस्वती नदी आटण्याचा कालावधी ४००० ते ३००० ई.स.पु ठरवलेला आहे. महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्णा ने सरस्वती नदीच्या आटण्याचा उल्लेख केलेला आहे.

१. महाभारतात् दिलेल्या ग्रहमानानुसार ई.स.पु. ३१०१ हा काळ दिसतो.
२. सरस्वती नदी साधारण त्याच सुमारास लुप्त झाली.
३. चालुक्य राजा पुलिकेशी याच्या ऐहोल शिलालेखा वरुन सुद्धा महाभारत युद्धाचा काळ ३००० ई.स.पु येतो.
४. भारतात प्रचलित असलेला युगाब्द संवत्सर सुद्धा ई.स.पु ३००० या काळाकडे अंगुलीनिर्देश करतो.

श्री. निकोलस कझानास यांच्या रीसर्चनुसार सुद्धा ऋग्वेदाची रचना सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या आधी झाली असण्याची शक्यता अधिक आहे.

या सर्व गोष्टींवरु वाटते की या दोन महाकाव्यांमध्ये भारताचा इतिहास दडलेला आहे..

 
^ वर