उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
रेषेवरची अक्षरे २००९, अंक दुसरा
मेघना भुस्कुटे
October 15, 2009 - 7:37 am
नमस्कार,
’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.
यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. तसंच हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) तिथे नोंदींवर तत्काळ प्रतिक्रिया देण्याचीही सोय आहे. काही सुचवण्या, बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास जरूर कळवा.
तुम्हां सार्यांना दिवाळीच्या मन:पूर्वक आणि भरभरून शुभेच्छा!
वाचत राहू या, लिहीत राहू या.
- ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२००९
दुवे:
Comments
सुरेख संग्रह
सुरेख आणि वाचनीय.
शरद
हे सरता संपत नाही...
पूर्वी वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंक ह्यातून जशी दिवाळीची अलवार चाहूल लागायची तशी आता ब्लॉग विश्वातील लेख, दिवाळी विशेषांक ह्यामुळे लागते. त्यातच गेल्या वर्षी पासून 'रेषेवरची अक्षरे' निघाल्यामुळे दिवाळीचा नॉस्टालजिया म्हणजे दुधावरची साय. ह्यावेळचा अंकही सुरेख झाला आहे. ब्लॉग विश्वातील समुह मनाची स्पंदने रेषेवरची अक्षरांच्या निमित्ताने सामोरी आल्यावर त्यांचा मूक साक्षीदार बनण्यात एक आगळीच शब्दातीत अशी अनुभुती मिळते. मला रेषेवरची अक्षरे मधले उदात्त लेख वाचले की आठवतो तो फक्त गुलजार! माझ्या मनातील संवेदनशील पेशी पेशींचा पोशिंदा, गुलजार!! आणि मग आठवतात कॉलेजचे ते दिवस. मुसळधार पाऊस, वडाचे ते झाड, तुकारामच्या टपरीवरचा वाफाळणारा चहा, 'हर पत्ता हर बुटा दिल मे मचाये ऐसी हलचल' अशी मनाची झालेली अवस्था आणि गुलजार! बस ह्याशिवाय कॉलेजमध्ये मी जिवंतही राहू शकलो असतो का? असा प्रश्न मनात खोलवर उमटत राहतो. गुलजार आणि ग़ालिब हेच तर दोन अढळ प्राणवायूचे स्रोत होते त्या दिवसात. तिसऱ्या सेमेस्टरमध्ये जेव्हा ७ पैकी ४ विषय राहिले तेव्हा, 'जो आँखसेही न टपका तो फिर लहू क्या है? ' ह्यातला दर्द आणि ग़ालिबच होता साथीला. ह्या लोकांच्या अलवार जाणीवेच्या, अफाट सुंदर आणि सरळ, निखळ आविष्काराच्या पासंगाला आपण काही पुरणार नाही. पण त्या 'माये'च्या गोतावळ्यात सामील होण्यासाठी फक्त लिहिण्यावर प्रेम असणं पुरेल, हो ना? ह्या भावनेतूनच तेव्हा काही बाही खरडत असे..
पत्थर की हवेली को
उंची है बिल्डिंग
शिशे के घरौंदोमे
लिफ्ट तेरी बंद है
कैसे मे आऊ?
तिनकोके नशेमन तक
तर्ककठोर माणसांकरता हे सगळे अर्थहीन वाटले असेल. (पण मी तार्किकही नाही. कठोर कसला असायचा! :) ) तरीही त्याकाळी आत कुठेतरी स्पर्श केला होता हे खरं. नंतर नंतर जसजसा ग्रेस, आरती प्रभू ह्यांच्या कविता वाचत गेलो तसा प्रत्येक कवितेला अडखळलो. एकेक कडवे वाचले की अंतर्बाह्य खिळल्यासारखा व्हायचो अजूनही होतो. 'हृदय गहिवरते' म्हणजे नक्की काय होते ह्याची प्रचिती देणारे एकेक शब्द! हे सगळे तर्काच्या कसोटीवर घासून पाहणाऱ्या रुक्ष मनांस फोल वाटेल; परंतु मला मात्र स्वतःचेच जगलेले काही क्षण नोंदल्यासारखे वाटले. 'गयीचे करुण डोळे आणि चांद निळाईतला' असा ग्रेस ह्यांना वाहिलेला अंक काढण्यात रमून गेलेलो असे ते दिवस.
तू इतका गुंतागुंतीचा का आहेस? सरळ दणादणा लिहावं स्पष्ट काय वाटतं ते. उगाच काहीतरी तुकड्यातुकड्यांत प्रतिमा आणि उपमा वापरून नंतर व्यक्त होत राहतोस. अशी तिची नेहमीची तक्रार त्यातूनच यायची. त्यावर मी, "ए माहितीये मला, तुझ्या खांद्यावर ना खूप मोठ्ठी स्वप्नं आहेत. पण तुला खरं सांगू, ओझं होतंय गं त्यांचं तुला" अस माझ्याच आतल्या मनाची समजूत काढणारं वाक्य बाहेरच्या मनावर फेकायचो. तेव्हा ती देखिल खळाळून हसून दाद द्यायची.
कॉलेज संपत गेले तसे मात्र हे तरल स्पंदनाचे विश्व संपते आहे की काय असे वाटू लागले. 'आहे त्यापेक्षा अजून हवे' ह्या एकमेव गरजेतून आजूबाजूच्यांची चाललेली धडपड पाहताना मला मात्र आईन्स्टाईन आठवायचा, A table, a chair, a bowl of fruit and a violin;
what else does a man need to be happy? माझ्यासाठी तर फळांची बशी आणि व्हायोलिनही नको फक्त ढीगभर पुस्तके! मग अगदी टेबल खुर्ची नसली तरी चालेल. :) त्यांतूनच अक्षरशः वाळवीच्या किड्यासारखा पुस्तके खात सुटलो. 'पुस्तकी किडा' ही मला मिळालेली उपाधी बहुदा त्यांतूनच आली असावी. पुस्तकांच्या सहवासातून मिळणारी अजब माया आणि उब ह्यांना तोड नाही. अशातच र. वा. दिघेंचे 'पाणकळा' किंवा 'सराई' जेव्हा वाचले तसेच गज्वींचे तनमाजोरी आणि किरवंत जेव्हा बघितले तेव्हा सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य वेधकपणे समाजासमोर मांडणे किती आवश्यक आहे ते समजते. काळजाला चिरत जाणारे हे लेखन दाखवणारेही पुस्तकेच आणि त्यांवर की दिलासा देणारीही पुस्तकेच. निसर्ग माणसाला अंतर्मुख करतो त्याच्याकडे शिकण्यासारखे बरेच आहे हे दाखवणारे कृष्णमेघ कुंट्यांचे 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हाच काय तो त्या जखमांवरचा उतारा. खरं ह्या साऱ्यांना घट्ट बांधून जिवनाचा पट जसा आहे तसा आतून बाहेरून मांडणारे मात्र एकच लेखक. जीए. सुभाष अवचटांच्या 'धुरकटलेली' किंवा 'मॅडम' ह्या कादंबऱ्या कितीही प्रशंसेस पात्र असल्या तरी त्यांच्या कलात्मकतेचा सर्वोच्च बिंदू म्हणजे 'जी. ए. एक पोर्ट्रेट' हा ललित गद्यात्मक संग्रह.
असो.. पुस्तके ह्या विषयावर बोलत राहिलो तर मला उपक्रमाचा अख्खा सर्वर देखिल पुरायचा नाही आणि 'हे सरता संपत नाही' अशी अवस्था होऊन जाईल. तेव्हा पुन्हाएकदा हा अंक प्रकाशित करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून माझा हा लांबलचक प्रतिसाद आवरता घेतो..
खो खो आणि धो धो
लै भारी प्रतिक्रिया ;-) .
(याचीच अजून एक आवृत्ती येईलच !)
(स्पूफ करताना आवृत्ती किंचित भडक बनायचीच . पण इथे जरा दोन-तीन शैलींची सरमिसळ झाल्यासारखे वाटले. पण लिखाण बाकी एका विशिष्ट आणि येथे त्याज्य मानल्या गेलेल्या पदार्थासारखे चविष्ट ;-) )
ऑ?
काय हे कोलबेरपंत... धनत्रयोदशीलासुद्धा?
असो दिवाळीच्या शुभेच्छा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धन्यवाद आणी विनंती
श्री कोलबेर, तुमच्या तरल भावविश्वाचा ओझरता आलेख या दिवाळी अंकाच्या इ-प्रसिद्धिनिमित्त मांडल्याबद्दल धन्यवाद. ('गयीचे करुण डोळे आणि चांद निळाईतला' यातील 'गयीचे' हे 'गायीचे' असायला हवे होते का?) श्री मुक्तसुनीत यांची प्रतिक्रिया वाचून मात्र गोंधळात पडलो. हा प्रतिसाद समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा खरडीतून त्याविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. प्रतिसाद अवांतर वाटू नये म्हणून 'रेषेवरची अक्षरे' या दिवाळी अंकाच्या प्रवर्तकांचे आभार मानतो. वेळ मिळेल तसा हा अंक वाचण्याचा प्रयत्न करतो.
साधी सोपी प्रतिक्रिया
अहो , साधी सोपी प्रतिक्रिया आहे हो माझी. कुणा अल्पसंख्यांक बांधवांच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही ;-)
अक्षररंग
श्री मुक्तसुनीत, चलाख प्रतिसाद. पांढर्या अक्षररंगातील प्रतिसाद वाचला नव्हता. आता वाचला. भावना न दुखावता प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
क्षणभर हंभ्रमित
"रेषेवरची अक्षरे"चा अंक चाळला. छान आहे. संपादकमंडळाचे अभिनंदन.
कोलबेर यांच्या प्रतिसादाने क्षणभर(च) हंभ्रमित झालो. मग मुक्तसुनीत यांचा उपप्रतिसाद वाचून अर्थ नीट लागल्याची खात्री झाली. समीक्षेचे मूळ मुद्दे पटण्यासारखे आहेत. धोधो आणि खोखो!
पण प्रत्येक अभिरुचीगटासाठी लेखांचे असे संकलन सोयीचे आहे. मी स्वतः मनःस्थितीप्रमाणे कधी तिखटामिठाच्या फराळासाठी तर कधी मिठाईसाठी आसुसतो.
वा!
क्या बात है! जुने दिवस आठवले वरूणदेवा :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दिवाळी अंककर्त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा
अंक वेळ मिळेल तसा वाचून प्रतिक्रिया देतो. अंक तयार करण्यासाठी घेतलेल्या कष्टांबद्दल अभिनंदन व दिवाळीच्या शुभेच्छा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
+१
हेच म्हणतो.
घ्यायचा तो बोध घेतला आहे!
कोलबेरपंत, _____/\______
तुमच्या वक्रोक्तितून घ्यायचा तो बोध घेतला आहे! त्याबद्दल आभार!
तरीही, हे 'संकलन' आहे, त्याला संपादकांच्या निकषांची आणि वैयक्तिक आवडीनिवडींची मर्यादा आहे - तशीच उपलब्धतेची मर्यादाही आहे, हे लक्षात घ्यावंत, अशी विनंती!
बाकी सगळ्या प्रतिसादकर्त्यांचेही आभार.
लिहीत राहा मित्रा. बोलत राहा मित्रा.
आहाहा... काय वाक्य आहे. सलाम! तुझ्यात एक हळवं, संवेदनशील कविमनही दडलेलं आहे तर...
आहाहा. निव्वळ तरल. ग्रेस म्हणजे माझ्या भावपंढरीचा पंढरीनाथ. एवढा तरल की त्याला वाचून कुणी तरत नाही. त्याच्या कविता वाचता वाचता मन कधी विरघळून जातं कळत नाही.
असो. गेले ते दिन गेले!
खरे आहे. मी समजू शकतो.
खरंय. "लगी है है चोट कलेजे पे उम्रभर के लिये" असे हे लेखन. "तुम्हीने दर्द दिया है, तुम्हीने दवा देना!" अशी ही अवस्था.
(खरं तर तुझ्या ह्या प्रतिसादाबद्दलही असेच काहीसे म्हणावेसे वाटते आहे. कट्यार काळजात घुसवलीस मित्रा!)
पण हे अक्षरधन मिळणार नाही. लिहीत राहा मित्रा. बोलत राहा मित्रा.
अवांतर:
अंकाची ब्लॉग आवृत्ती चाळली. छान झाली आहे. मिनिमलिस्टिक (किमानतावादी?) रंगसंगती, लेआउट आवडले. ही कल्पना अतिशय चांगली आहे. पण अनुदिनींचे विश्व बरेच मोठे आहे असे वाटते. त्यामानाने हा अंक आपापसातला (आपापसातले उत्तम लेखन) वाटला. म्युच्यल ऍडमिरेशन सोसायटीबाहेरच्या चंद्रशेखर ह्यांच्यासारख्या अनेक अनुदिनीकारांचे उत्तम लेखन वेचता आले असते तर बरे वाटले असते. पुढच्या वर्षीच्या अंकासाठी हार्दिक शुभेछा!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अभिनंदन
अंकाबद्दल अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा. पीडीएफच्या ब्याकग्राउंडचा रंग बदलल्यास बरे.
---
अवांतर :
सत्याचे चित्रिकरण चालू होते तेव्हाची गोष्ट. गुलजार रामूला भेटायला गेले.
"क्या बात है गुलजारजी? एनी प्रॉब्लेम?" रामूने विचारले.
"अहो प्रॉब्लेम म्हणजे ही तुमची कथा आहे ग्यांगवॉरवर. यात गाण्याला एकतर चान्स नाही आणि त्यात माझ्यासारखा कवी काय लिहीणार?"
"अरे गुलजारसाब, डोंट वरी. मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, स्पिलबर्ग, कपोला.. पूरा शूटिंग यूएस में होगा.
ये जो गाना है ना, ये मिसिसिपी रिव्हर पे शूट होगा, शाम का समय, रिफ्लेक्टेड लाइट, पानी धीरे-धीरे जा रहा है.. एक एक ऐसा फ्रेम लगाता हूं, सिर्फ शॉट देखकेही पब्लिक को सब समझ में आ जाएगा. कॅमेरा पानी से पॅन होकर हिरोइन पे और वापस पानी पर पॅन होगा..फिर पानी पे झूम होगा..फिर वाइड अँगलसे हिरोइन और पानी का शॉट..आप सिर्फ लिखिए.."
गुलजारनी वैतागून कपाळावर हात मारला आणि गाणे लिहायला घेतले, गीला गीला पानी...
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
तोवर सांभाळून घेणे
रंग बदलून पीडीएफ चढवली की कळवू. तोवर सांभाळून घेणे. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
"आहे मनोहर् तरी..."
अशा प्रकारचा उपक्रम सुचणे, तो लागोपाठ दोन वर्षे अंमलात आणणे आणि तो लोकांपर्यंत पोचवणे ह्या सगळ्याच उत्तम पेललेल्या जबाबदार्यांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन.
आता 'उदास का' त्याबद्दलः
संपादन ही एक अतिशय मोठी जबाबदारी आहे. साहित्य मूल्यमापनकौशल्य आणि चौफेर वाचन ह्याच बरोबर 'तटस्थ आणि अलिप्त वृत्ती' ह्यांची देखिल मागणी करणारी - म्हणजे निवड तर उत्तम(च) व्हावी तरी अन्याय होउ नये ही तारेवरची कसरत. संपादक मंडळी स्वतः उत्तम लेखक असली (माझ्या गुगल रीडर मधे चारही समाविष्ट आहेत) तरी केवळ वीसच कलाकॄती निवडताना स्वतःला वगळायला हवे होते. (असे माझे प्रामाणिक मत)
अजिबात आवडला नाही
संपादक मंडळींनी स्वतःला वगळावे असे माझे मत नाही. पण का कुणास ठाऊक हा दिवाळी अंक दिवाळी अंक वाटलाच नाही. आधी पीडीएफ मधील काळ्या पानांवरील पांढरा मजकुर नीट वाचता येईना म्हणून ब्लॉगवर जाऊन वाचला तर त्यात कविताच अधिक दिसल्या. लेखातही कविता आणि एका लेखात तर इंग्रजीचा अतिरेक. काही लेख समजले नाहीत, तो कदाचित माझ्या आकलनशक्तिचा दोष असावा. एन. आर. आय. मराठी माणूस तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी माणसाची, मेन स्ट्रीम मराठी भावनाविश्वाशी असलेली नाळ तुटत चालली आहे की काय आणि हा अंक "त्या" ठराविक वर्गासाठी असावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
असा उपक्रम सलग दुसर्या वर्षी चालवल्याबद्द्ल संपादकाचे अभिनंदन. गेल्या वर्षीच्या अंकाने वाढविलेल्या अपेक्षा या वेळी पूर्ण झाल्या नाहीत असे मात्र खेदाने लिहावेसे वाटते.
शंतनूशी सहमत
१. आपणच खोबरं-भंडारा आणून आपणच आपली तळी उचलायचा हा प्रकार वाटला.....
२. धम्मकलाडवाने म्हटल्याप्रमाणे म्युच्युअल अॅडमिरेशन क्लबच्या सदस्यांनी थोडे दरवाजे किलकिले करायला हरकत नव्हती.
३. इंग्रजी हिंदीचा अतिरेक उबग आणणारा वाटला.
४. एक प्रथितयश ब्लॉगर नेमाने आपल्या ब्लॉगपोष्टचे शीर्षक हिंदीत देत असते.
५. अशी कोणती भव्यदिव्य अभिव्यक्ती तिला करायची असते की तिला मराठीत काही मिळतच नाही?
६. मात्र अभिजित बाठे व तत्सम शिवराळ ब्लॉगरांचे लेखन समाविष्ट न करणे ही संपादन मंडळाची जमेची बाजू आहे.
७. बाकी एनारायलोकांची मराठी भावविश्वाशी नाळ.... हा हा हा हा हा हा...
--आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!
कारण नसताना ओशाळवाणा सूर लावणं, म्हणजे
कारण नसताना ओशाळवाणा सूर लावणं, म्हणजे ठेवलेला आरोप नकळत मान्य करणंच आहे. तसलं काही मी करणार नाही.
मुख्य आरोप हे असे:
१) अंक ’गुलजार खवा’ प्रकृतीचा झाला आहे. त्यात काही उत्तम ब्लॉगर्सचं लिखाण घेतलेलं नाही.
माहितीपर, समीक्षात्मक, प्रतिक्रियात्मक नसलेलं ललित प्रकृतीचं लिखाण अंकात असेल, असं पहिल्या अंकापासूनच निश्चित होतं. इतर अनेक उत्तमोत्तम ब्लॉग्स आहेत. उदाहरणार्थ कुणीतरी म्हटल्याप्रमाणे चंद्रशेखर यांचा कायम अपडेट होणारा आणि विलक्षण नेटकी माहिती / विश्लेषण असणारा ब्लॉग आहे. सिनेमा पॅरेडिसोचा वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाची दर्जेदार समीक्षा करणारा ब्लॉग आहे. पण या जातीचं लिखाण न घेण्याची अट पहिल्या अंकापासून होती आणि आहे. त्यामुळे काही गोष्टी सुटून बाहेर राहणारच. पण असं बंधन नसेल, तर या अमर्याद पसार्यात थांबणार तरी कुठे? उपक्रमावर माहितीपर असण्याचं बंधन आहे, मिसळपाववर ’मनाला वाटेल ते, आनंद देईल ते’ करण्याची मुभा आहे - या ठरवून घेतलेल्या भूमिका आहेत. तसं करताना काही तोटे होणार, याची जाणीव निर्णयकर्त्यांना असेलच. तरीही काही हेतू मनात ठेवून घेतलेल्या या भूमिका आहेत. तशीच अंकाची ही भूमिका. फायदे-तोटे, समज-गैरसमज, टीका-दाद या सगळ्यांच्या स्वीकारासकट.
२) संपादकांनी स्वत:चं / आपापसांतलं / एकमेकांचं लिखाण छापण्यासाठी काढलेला हा अंक आहे.
वर्षभरातल्या सर्वोत्तम ललित पोस्ट्स असा अंकाचा निकष. त्याकरता किमान ६० ते ७५ ब्लॉग्सवरच्या वर्षभरातल्या नोंदी वाचून काढणं, त्यावरून सर्वोत्तम पोस्ट्सची एक कच्ची यादी तयार करणं, मग अंतिम पोस्ट्सचा एक नक्की आकडा न ठरवता - कच्च्या यादीतल्या ’नाही आल्या तरी चालतील’ अशा - नोंदी कमी करत अंतिम यादी अधिकाधिक चिरेबंदी करत जाणं - ही प्रक्रिया केली. असं करताना काही ब्लॉगर्सच्या एकापेक्षा अधिक पोस्ट्स अंतिम यादीत आल्या - निव्वळ दर्जाच्या निकषावर. मात्र एका ब्लॉगरच्या दोन पोस्ट्स आणि इतरांची एक अश्या निवडीला पक्षपातीपणाचा वास येऊ नये, म्हणून - काहीश्या अनिच्छेनंच - ’एक ब्लॉगर - एक पोस्ट’ हे सूत्र ठरवलं. जी पोस्ट्स एकमेकांशी संबंधित / एकमेकांवाचून अपुरी आहेत त्यांचा अर्थातच अपवाद. (उदा. गेल्या अंकातली अनुची पोस्ट्स किंवा यंदाच्या अंकातल्या निवेदिताच्या टिंबकथा). या निकषानंतरही सीतेच्या चारित्र्यावर कुणी धोबी शिंतोडे उडवू नये, म्हणून तिला रामराज्यातून हाकलून लावली तशी संपादकांची पोस्ट्स अंतिम यादीतून बाहेर ठेवायची, तर (आत्मश्लाघा गेली खड्ड्यात - संवेद आणि ट्युलिप या खणखणीत लेखकांबद्दल तरी कुणाचं दुमत नसावं) त्यांच्या लिहिण्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे अंकाच्या मूळ उद्देशावरच अन्याय करण्यासारखं होतं. केवळ त्याकरता स्वत:च्या ब्लॉगवरच्या पोस्टबाबतचा निर्णय स्वत: न करता इतर तिघांवर सोपवायचा ठरला.
इतकं सगळं केल्यानंतरही पक्षपातीपणाचा / म्युच्युअल ऍडमायरेशनचा / एकमेकांच्या पाठी खाजवण्याचा / आपापसांतला अंक काढण्याचा आरोप करणारे लोक आहेतच. तसे ते कायम असतील. पण अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही एकमेकांना म्हटलं होतं तसंच - आपल्या लिखाणाच्या प्रसिद्धीकरता आपापले ब्लॉग्स आहेतच. अंक काढायचा, तो उत्तमोत्तम लिखाणाचं संकलन मिळावं म्हणून. त्याच्याशीच कुणाचे मतभेद असतील, तर आपण त्याचं किंवा सर्वांचंच एका वेळी समाधान करू शकत नाही, हे आधी लक्षात ठेवू या. ब्लॉग हे माध्यम, आपली ताकद, आपला वेळ, आपली निर्णयप्रक्रिया या गोष्टी इतर तथाकथित नि:पक्षपाती लोकांनाही तितक्याच खुल्या असणार आहेत, जितक्या आपल्याला आहेत.
मी माझ्या बाजूनं हा वाद / संवाद इथेच संपवते आहे.
मोकळेपणानं केलेल्या मतप्रदर्शनाबद्दल मन:पूर्वक आभार. त्याचं नेहमीच स्वागत आहे.
धन्यवाद.
पुन्हा एकदा शुभेच्छा!
धन्यवाद. फारच आवडला शब्द. मी अशा लेखनाला 'बाजारू'च्या धरतीवर 'गुलजारू' म्हणतो.
अंकात ललितलुलित प्रकृतीचेच लिखाण असेल असे लेखात किंवा अंकाच्या संपादकीयात कुठेही नमूद झालेले अद्यापही मला दिसलेले नाही. "मराठी ब्लॉगविश्वातील उत्तम प्रतीचं लेखन" वेचण्याचा हा प्रयत्न आहे असेच वाटले.
पुन्हा एकदा आपापसात चालू! कुणाच्या आत्मश्लाघेची किंवा ओशाळण्याची परवा करायला इथे कुणाला वेळ आहे?
एक तो ख्वाब लिये फिरते हो ग़लियों ग़लियों
उसपे तक़रार भी करते हो ख़रीदार के साथ
असेच म्हणावेस वाटते आहे.
"रेषेवरची अक्षरे" ह्या अंकामागची कल्पना उत्तम आहे. पुढच्या वर्षी अधिक जोमाने, अधिक चांगला अंक काढाल ह्याची खात्री आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
लिहिणाऱ्याचे लिंग ओळखा
होडावडेकर मास्तरांचा लेख वाचला होता आधी. मस्तच झाला आहे. कविता थोड्या जास्त झाल्या आहेत. (आता त्यांना मस्त म्हटले आहे तर थोडे दोषही काढायला हवेत.)
"चल तर जाऊ...चा" शेवट वाचेपर्यंत हा "पीस" एका बोकिलबुवाने लिहिला आहे असे वाटणारच नाही. जाह्नवीबिन्हवी, गायत्रीफायत्री अशी नावे एक्सपेक्टेड होती. असो. ह्या ब्लॉगवरील लेखनासाठी 'लिंग ओळखा पाहू!' अशी स्पर्धा घ्यायला हवी. नाव न देता उतारा द्यायचा आणि लिहिणाऱ्याचे/लिहिणारीचे लिंग ओळखायला सांगायचे. काय म्हणता?
मेघना भुसकुटे ह्यांचा आरसाही वाचला..
"पण तेंडुलकरांनी तिला हाताला धरून मधोमध कधी आणलं, ते तिचं तिलाही कळलं नसणार."
ओहोहो. ह्या असल्या नाटकी वाक्यांनी फार हसू येतं. पण त्या मोकळं लिहितात (भक्त प्रह्लाद सिनेमा वगैरे). ते आवडलं. एकंदर छान.
'कधी जाणवलं नव्हतं भारतात असताना, की एक "सांस्कृतिक सत्ता" असते. तुम्ही तिचे सभासद असाल, तर तुमच्याकडे देण्यासारखं खूप असतं.'
हं भारतीय सांस्कृतिक सत्ताधाऱ्यांची अमेरिकन शोकांतिका. प्रामाणिकपणा आवडला.
आता थोडी अमृता, थोडा गुलज़ार, थोडी मेघना (हो, हो! पेठेच) वाचायला हवी. एकदा का मौसम पकडला की मग इतर लेखही वाचेन म्हणतो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अभिरूचींमधील जातिभेद थांबवा
इथे जे चालले आहे त्याला अभिरूचींमधील जातिभेद असे म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. थोडक्यात म्हणजे तुम्हाला समुद्र हेलावताना जे वाटते ते खरे, आम्हाला पहिला पाऊस आल्यावर जे वाटते ते बेगडी. आम्हाला गुलजार आठवला तर तो बाजारू, तुम्हाला एखादा तुर्की, अरबी कवी(ज्याचे फारसे कुणाला नावही माहित नाही असा) आठवला तर वाह, वाह! आम्हाल अमेरिकेत बसून काही सुचले तर ते नाटकी, तुम्ही शनवारात बसून काही लिहीले तर क्या बात है! संवेदनांचे हे पेटंट तुमच्याकडे दिले कुणी? सत्यामध्ये भिकू म्हात्रे म्हणतो त्याप्रमाणे "तेरी गर्लफ्रेंड तेरी गर्लफ्रेंड है, मेरी बीवी मेरी बीवी नही है."
शेतकयापासून पंतप्रधानांपर्यंत प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. त्यात एखादा कवी असतो, एखादा लेखक असतो, एखादे गाणे असते, एखादी आठवण असते. प्रत्येकाच्या कोपर्यातील फुलांचा सुगंध, गाण्याची तान त्याच्या/तिच्यापुरतीतरी १००% खरी असते. एकाचा कोपरा दुसर्याच्या कोपर्याशी बहुधा जुळणारच नाही, पण म्हणून त्याने/तिने निगुतीने सजवलेल्या फुलांवर नाचून त्यांचा चेंदामेंदा करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
इथे नंदनच्या अनुदिनीतील विंदा करंदीकरांच्या मुलाखतीमधील एक उतारा आठवतो.
"काही लोकप्रिय लेखकांचं उदाहरण घेऊ. मी ते वाचलेले नाहीत, वाचू शकत नाही, हे सोडा. पण असं वाटतं की, नवशिक्षित समाजासाठी या लेखकांची आवश्यकता आहे. त्यांची सांस्कृतिक भूक हे लेखक भागवतात. त्यांची वाचनाची सवय वाढवतात. सामान्य वाचक बिचारे स्वतःच्या आनंदासाठी वाचतात; कसलाही आव नसतो. 'उच्चभ्रू'पणाची ऐट आणणारी माणसं त्यांच्याहून अधिक घातक असतात. सामान्य माणूसही आपल्या कुवतीनुसार निवड करत असतो. आपण त्यांना काहीच कळत नाही असं कसं म्हणायचं? आणि उच्चभ्रूंना तरी सगळं कळतं असं कुठं आहे? वाचकांचे अनेक थर आहेत, यांतला कोणताही एक थर वंचित ठेवणं हे पाप आहे. म्हणून त्या लोकप्रिय लेखकांनी लिहू नये असं म्हणण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. आपल्याला ते आवडत नसेल तर आपण वाचू नये. ही गुळमुळीत तडजोड नव्हे; ही जीवनाच्या वस्तुस्थितीची थोडी उशिराच घेतलेली दखल आहे. मी जोपर्यंत लिहीत होतो तोपर्यंत ही दखल मी घेतलेली नव्हती. लोकांनी हे वाचू नये, ते लिहूही नये, असा आग्रह असे. पण आता अनेक प्रकारच्या व अनेक दर्जाच्या लेखनव्यापारांची अर्थपूर्णता पटू लागली आहे."
असल्या हिणकस प्रतिसादांना खणखणीत उत्तर देणारा एकही प्रतिसाद येऊ नये याचा खेद झाला. यालाच हितसंबंध जपणे म्हणत असतील तर असे संबंध नसलेलेच बरे.
अवांतर : दारूबंदी करावी किंवा नाही यावर दुमत असू शकेल पण दारूबंदीचा एक ठळक फायदा म्हणजे मराठी सायटींवरचे असले कैच्याकै प्रतिसाद तरी बंद होतील.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
कशाला आणली फुले बाजारात?
रेषेवरची अक्षरेवरील माझे भाष्य हे केवळ लिखाणावर आहे लेखनावर आहे. कशाला आणली फुले बाजारात? कशाला करायच्या जाहिराती? ठेवायची ना देवघरातल्या तबकात.
उगाच हळवेहुळवे होऊ नका. तुमचे हात कुणी बांधले आहेत का? माझे मत व्यक्त करण्याचा मला अधिकार आहे. तुम्हाला तुमचे मत व्यक्त करण्याचा. रेषेवरची अक्षरे च्या अंकातल्या काही लेखांवर मी जे काही लिहिलेले आहे ते खोडून काढा. उगाच विषयांतर करू नका. एखादा मुद्दा खोडता येत नसला की असे पवित्र पवित्रे घेण्यात येतात.
माझे मत तुम्हाला पटायलाच हवे, नव्हे खूप खूप आवडायलाच हवे असा माझा अट्टाहास नाही. तरीही कुणाच्या कोमल भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.
अवांतर: ह्या अशा बायकी रडण्याने काही हशील होणार नाही आहे. मराठी सायटींवर अशाच बायकी तक्रारी, रडणेच, हळवेहुळवे लेखन होत राहणार असेल तर मायमराठीचे काही खरे नाही. ग्रो अप!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अवांतरावर अवांतर
>ह्या अशा बायकी रडण्याने काही हशील होणार नाही आहे. मराठी सायटींवर अशाच बायकी तक्रारी, रडणेच, हळवेहुळवे लेखन होत राहणार असेल तर मायमराठीचे काही खरे नाही. ग्रो अप!
अच्छा! म्हणजे बायका बहुतेक तुमच्या मते ग्रोन अप्स नाहीत तर! किंवा बायका करतात त्या तक्रारी "बायकी" असतात, म्हणजे नक्की काय कसे ते कळले नाही. आणि बायकांचे रडणे हे पुरूषांच्या रडण्याहून वेगळे असते असे दिसते आहे.
क्षमस्व. माफी मागतो.
अच्छा! म्हणजे बायका बहुतेक तुमच्या मते ग्रोन अप्स नाहीत तर! किंवा बायका करतात त्या तक्रारी "बायकी" असतात, म्हणजे नक्की काय कसे ते कळले नाही. आणि बायकांचे रडणे हे पुरूषांच्या रडण्याहून वेगळे असते असे दिसते आहे.
क्षमस्व. माफी मागतो. मी केवळ मुसमुसून रडणाऱ्या बायकांबद्दल बोलत होतो. तुमच्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रियांना दुखविण्याचा कुठलाही हेतू नव्हता.
अवांतर
बायका व स्त्रिया ह्यांत मी भेद करतो. पण ते परा-अवांतर होईल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शंका
श्री आरागॉर्न, प्रतिसादात व्यक्त केलेल्या भावना पोहोचल्या. खालील परिच्छेद वाचून श्री खेचर यांची आठवण झाली. त्यांच्या शैलीकडे थोडेसे खोडकरपणे पाहण्याचा श्री कोलबेर यांच्यासारखा प्रतिसाद/ प्रयत्न आहे का? (श्री कोलबेर यांचा प्रतिसाद वाचून थोडा गोंधळात पडलो होतो म्हणून विचारले. रोष नसावा.)
आधी हे थांबवा!
आरागॉर्न,
अभिरुचीतला जातिभेद थांबवण्याआधी तुम्ही रामूचे चित्रपट पाहाणे थांबवावे अशी माझी तुम्हाला कळकळीची/हात जोडून विनंती आहे.
कुठलेतरी फालतू/निर्बुद्ध संवाद (असंबद्धरित्या) तुम्ही फेकत असता त्याने काय साध्य होते ते समजत नाही.
त्यामूळे,
ह्याच्याशी सहमत आहे.
(स्पष्ट) बेसनलाडू
व्यक्तिगत रोखाची वाक्ये संपादित केली आहेत.
आभार
बेसनलाडू,
आपल्या सल्ल्याबद्दल आभार. तो मानता येणार नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. याचबरोबर मी गोविंदा-डेव्हिड धवन-शक्ती कपूर यांचेही चित्रपट बघतो हेही जाताजाता सांगून टाकतो.
जातिभेद आणि रामूचे चित्रपट यातील संबंध कळला नाही, असो.
आपल्याला माझ्या प्रतिसादांनी त्रास होत असेल तर आपण ते वाचू नयेत. माझे प्रतिसाद मी असेच देत रहाणार.
राहता राहीला प्रश्न की असले प्रतिसाद मी मद्याच्या अमलाखाली देतो किंवा नाही तर याबद्दल आपल्याला जी शक्यता योग्य वाटेल ती धरून चालावी. आपल्याला काय वाटते यामुळे माझ्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही.
आणखी काही वैयक्तिक सल्ले द्यायचे असल्यास कृपया देऊ नयेत ही विनंती. त्याचा उपयोग होणार नाही.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
अनाकर्षक मांडणी
पाट्या टाकल्याप्रमाणे आपल्या आणि आपल्या मित्रमंडळाच्या अनुदिन्यांची यादी देणे याला दिवाळी अंक म्हणत असतील तर ज्यांच्या अनुदिनींवर ब्लॉगविश्वधारकांच्या लिंका दिलेल्या असतात तेथे दररोज दिवाळी साजरी होते असे म्हणावे लागेल. अंकात वाचण्यासारखे आणि आवडण्यासारखे काही विशेष दिसले नाही. तेच दोन चार लेखक आणि आपापले लेख वर काढणे याला दिवाळी अंक म्हणणे जिवावर येते.
आरागॉर्न काकांचा राग या अंकातील एक लेखक म्हणून समजण्यासारखा आहे. काही लोकांचे प्रतिसाद उगीच पाठ खाजवणारे आहेत आणि काहीजणांचे खाजवून ओरबाडणारे. शंतनु ओककाकांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे.
अंकात दम नाही हेच खरे. संपादक मंडळाने आपले लेख टाकावेत पण आपल्यापेक्षा उत्तम लिहिणारे अनुदिनीधारक आहेत याकडे लक्ष द्यावे.
-राजीव.
सहमत आहे :) पण
मीदेखील सहमत आहे :) पण आरागॉर्न साहेबांचा लेखदेखील आहे की त्या अंकात!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
निवेदन
या चर्चेतील(!) हा माझा शेवटचा प्रतिसाद. माझे प्रतिसाद, लिखाण कसे असंबद्ध असतात याबद्दल आणखी सूचना, सल्ले आल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही तरी तसदी घेऊ नये ही विनंती.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
काही फरक् पडेल् का?
कोणत्याही मराठी साईटवर ब्लॉगवर वावरणारी व्यक्ती तिच्या आवडीनिवडीचे एक् मोठे पॅकेज घेऊन येत् असते. दिवाळी निमित्त्याने आपली आवडनिवड जरा जास्त डो़के वर काढते असे अनेकांचे होते,माझे सुद्धा होते. मग चर्चा आणि वादाला उधाण येते. कोणत्या दिवाळी अंकात काय घ्यायचे आणि काय नाकारायचे ते संपादक ठरवतात. त्यांनी त्यांचे काम करावे. ते करतातच. प्रतिसाद देणारे प्रतिसाद देतात.
अंकाची घोषणा केल्यापासून ते अंक आल्यावरही -दिवाळी बाजूला राहिली आणि शिमगा चालू असतो. वाचकांनी वा वा! चा वर्षाव करावा वा शिव्यांची लाखोली वहावी. निदान मूग गिळून गप्प बसण्यापेक्षा इतर काही केलेले बरे असे मी मानते.
[(पुढच्या वर्षी नेटावरचे म्हणजे रेषेवरचे काही खास दिवाळीअंक फक्त अनुमती असलेल्यांनाच बघता येतील :)]असे माझ्या कानावर आले आहे.
आजकाल फुले बाजारात ठेवतांना कोणी नाचले तरी त्यांचा चेंदामेंदा होणार नाही, (म्हणजे निदान तसे आपण दाखवणार नाही ) अशीच फुले ठेवण्याची दक्षता घेतलेली असते.
नाचणार्याची हौस भागते आणि फुले ठेवणार्याची सुद्धा. शेवटी दिवाळी, दिवाळी अंक , त्यातून नेटावरचे खास ब्लॉगर्सचे दिवाळी अंक हा सगळाच हौसेचा मामला आहे.
फुकट मिळाला ,न मागता मिळाला म्हणून प्रत्येक सल्ला चुकीचा असतो असे नाही हे अनुभवाने कळते म्हणून अशा चर्चा / प्रतिसाद / वाद चालू ठेवावे. जिवंतपणाचे लक्षण आहे.
साहित्यिक रेव पार्ट्या
'रेषेवरची अक्षरे'बद्दल तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते काही कळले नाही.
हे कुठेही वावरणाऱ्या कुठल्याही व्यक्तीबद्दल, किंबहुना कुठल्याही प्राण्याबद्दलही, म्हणता येईल. उदाहरणार्थ, पांडा म्हटला की कोवळा बांबू आवडणार. अस्वल म्हटले की मध. सुखवस्तू बोके-मांजरी म्हटल्या की 'गुलजार खवा.' त्यात नवल ते काय.
खास अनुमती असलेले दिवाळी अंक, ब्लॉग...ओह. साहित्यिक रेव पार्ट्या का. अशा पार्ट्यांत तुम्हाला का बरे जावेसे वाटते?
बहता पानी निरमला, बन्दा गन्दा होय ।
साधू जन रमा भला, दाग न लागै कोय ॥
असे कबीर म्हणून गेला आहे. ते लक्षात ठेवा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
थोडा फ्लॅशबॅक
अंकाची घोषणा केल्यापासून ते अंक आल्यावरही -दिवाळी बाजूला राहिली आणि शिमगा चालू असतो.
हा उल्लेख बहुतेक २००७ आणि २००८ साली आपण संपादक असलेल्या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकाबद्दल अस्मादिकांनी विचारलेल्या प्रश्नांबद्दल असावा. संपादक निवडायची प्रक्रिया पारदर्शक असावी, लायक लोकच संपादक म्हणून घ्यावेत किंबहुना संपादक असावेतच कशाला, निवडीचे निकष काय तसेच प्रक्रिया काय असावी तसेच ज्या लेखकांना आपले लेखन स्वीकारण्या/नाकारण्याइतकी संपादकांची लायकी नाही असे वाटते त्यांचे काय, पूर्वप्रकाशित नसलेले म्हणजे नक्की काय, ईप्रसारणावरून प्रसारित झालेली मुलाखत किंवा ब्लॉगावर आधीच प्रसिद्ध झालेली पाककृती पूर्वप्रकाशित नसते काय वगैरे अडचणीचे प्रश्न विचारणे याला आपण शिमगा म्हणता का? की या वर्षी आपण संपादक नसतानाही (किंबहुना नसल्यानेच) भरघोस प्रतिसाद मिळून अंक निघाला याचा विषाद आहे?
विनायक
फ्लॅशबॅक कसले देता?
हिंदी पिच्चर बघणे बंद करा.
हे संकेतस्थळ चालू नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलेत ते सांगा आधी. दिवाळी उपक्रम अंकात तुमचा लेख कुठे आहे तो सांगा काका?
हे काय आहे? मा सुवर्णमयी कधी बरे उपक्रम अंकाच्या किंवा रेषेवरील अंकाच्या संपादिका होत्या? की ही आपापसांतली लढाई आहे? हे प्रतिसाद बरे चालतात उपक्रमावर?
-राजीव.
काही मजकूर संपादित.
कोणत्याही एका संकेतस्थळाला उद्देशून् नाही
माझ्या प्रतिसादात कोणत्याही अमूक एका संकेतस्थ़ळाचा उल्लेख नाही तेव्हा त्या एका संकेतस्थळाचा विषय काढणे आणि स्वतःवर सगळे ओढवून घेण्याचे काही कारण नाही.
विचारलेच आहे म्हणून सांगते की त्यापैकी कोणतेही प्रश्न अडचणीचे नाहीत/ नव्हते. त्याची उत्तरे का दिली / दिली नाहीत याचे उत्तर मी आता इथे देणे योग्य नाही.
ज्या चार जणांमध्ये एखादी व्यक्ती जायचे नाकारते किंवा त्यांच्या लायकीचे प्रश्न उपस्थित करते , पुढे त्या चार जणांनी केलेल्या कामाकडे दूर्लक्ष व्हावे अशा हेतूने जर कोणतीही कृती करते त्याला काय म्हणायचे? माझ्यामते आपुलकी नाही, विश्वास नाही म्हणून असे घडते. अन्यथा हे सर्व टाळता आले असते. केवळ एका संकेतस्थळावर नाही सगळीकडेच.
मी संपादक असले आणि नसले तरी (मनोगताच्या) संकेतस्थ़ळाचा अंक उत्तम निघेल, कारण त्यात मोलाचा वाटा लिहिणार्यांचा असतो याची खात्री आहे. मी नाही असे म्हणून ज्या कोणी लेखन दिले त्या सर्वांची मी अतिशय ऋणी आहे कारण त्यांचे लेखन आले हे महत्त्वाचे आहे. मी नाही म्हणूनच भरघोस लेखन आले असा एकतर समज मी करून घेणार नाही आणि तसे खरच असेल तरी त्याचा मला विषाद नाही.असा विषाद वाटून घेण्याइतके माझे संस्कार कच्चे नाहीत.
पण एखाद्याला विनंती करून त्याचे लेखन आले नाही, आणि मी आहे म्हणूनच लेखन न देण्याचा निर्णय आहे असे कळले तर माणसे जोडण्यात मी कमी पडले याचे मला नक्की वाईट वाटते. लेखन देणे न देणे हा प्रश्न माझ्या लायकीचाही असू शकतो किंवा इगोचा. मी त्यांना लेखन देण्याची विनंती केली म्हणून कोणी लेखन द्यावे अशी मी कोण लागून गेले? त्यामुळे माझ्या या वाईट वाटून घेण्यात माणसे जोडण्याबरोबर एक सूक्ष्मसा अहंकार दडला आहे. तो मला जाणवला आहे.
प्रश्न माझ्या पात्रतेचा असेल तर मी जास्तीत जास्त चांगले लिहिण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करते आहे पण मी सर्वांना खूष करू शकतच नाही. मी कदाचित माझी पात्रता वाढेल आणि त्या व्यक्तींचे मतपरिवर्तन होईल. सध्या मुद्दा एकच उरतो की माझ्यातील दोषासकट त्या व्यक्ती मला आपले मानू शकत नाहीत. पण नाही तर जा , मला काही फरक पडत नाही, असे धोरण मला राबवता येत नाही. प्रत्येक व्यक्तीत जे चांगले दिसते त्याचा उल्लेख करावा, कौतुक करावे अशी शिकवण मिळाली आहे. त्याचा परिणाम असेल.
तुम्ही माझ्याहून मोठे आहात, तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करून पहा, दोषांऐवजी काय चांगले दिसते त्याचाच विचार करून बघा. एखादी गोष्ट वाईटच आहे म्हणण्यापेक्षा त्यात काही थोडेतरी बरे आहे का पहा. असो. यापुढे असे जुने मुद्दे, निदान ज्याचा माझ्याशी संबंध आहे ते ज्या त्या संकेतस्थळावर काढावे अशी विनंती.
का जावेसे वाटते?
इथे अंक निघाला आहे अशी घोषणा केली होती. त्यावर प्रतिसाद कसे आले ते बघणे मजेशीर् अनुभव् आहे. त्यांनी अंक काढून इथे का माहिती दिली, नेटावर तर् कळतेच ना. इथेच का यायला हवे?
सरळ मार्गाने चर्चा का गेली नाही , किंवा मला तुम्ही म्हणता तशा रेव पार्ट्यांना का जावेसे वाटते याचे उत्तर अगदी सोपे आणि एकच आहे -तुमचा ,आमचा, त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे - इगो प्रॉब्लेम...
काहीजण आम्ही लिहितो, वाचतो,ऐकतो / जे काही करतो तेच खास/ अथवा खासजणांकरताच असे मान्य करतात, काही नाकारतात,तर् काही मुद्दाम तसे काही नाही असे भासवतात, ढोंग करतात. मी मान्य करते. एवढच.(इगो असायला काही तुम्ही फार मोठे असायचे कारण नसतेच, वयाने नाही किंवा कर्तृत्त्वाने सुद्धा.. आजकाल इगो वय वर्षे तीन पासूनच् दिसू लागतो.)