वैचारिक गोंधळ

वैचारिक गोंधळ

मला असे सांगा की मी जर (ज्यातले मला काहीही कळत नाही) अशा विषयांवर उदा.रिलेटिव्हिटी वा शास्त्रीय संगीत या बद्दल काही विचार मांडले तर इतर काय करतील ? सज्जन, जाणकार दुर्लक्ष करतील, ज्यांचे अज्ञान माझ्याएवढेच, ते तुटून पडतील व अधलेमधले या साठमारीतली गंमत बघतील, मधेच एखादी पिंक टाकून. खरे कीं नाही ? हल्ली असेच काहीसे इथे चालले आहे असे वाटते.

मला वाटते न्युटन-आईनस्टाईन यांनी योगशास्त्रावर बोलूं नये, किशोरीताईंनी ग्रां प्री वर लिहूं नये आणि रामदेव महाराज यांनी बिटी कॉटनवर वावदूकपणा करूं नये. कां ? तर ते आपापल्या क्षेत्रात उत्तुंग पदावर विराजमान असले तरी सर्वज्ञ नाहीत. त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणे उचित. असे सर्व थोर हे जाणून असतात. प्रश्न असतो अलबत्या-गलबत्यांचा.

माझे साधे म्हणणे असे कीं मला जर संत साहित्यावर काही लिहावयाचे असेल तर माझा त्या विषयावर थोडाबहूत अभ्यास असणे जरूरीचे आहे. मी सर्वश्री देगलूरकर-दांडेकर- करंदीकर-धोंड यांच्या इतका दांडगा अभ्यास करावयास पाहिजेच असे नसले तरी ज्ञानेश्वरी-दासबोध वाचलाच नाही असे होता कामा नये. चार टीकाकार काय म्हणतात ते मला माहिती पाहिजेच.

उदाहरण म्हणून देव रीटायर करावयाला निघालेल्या डॉ. लागूंचे घेऊं. या विषयावर आपल्या इथे शेकडो वर्षांत अगणिक लेखकांनी, संत महात्म्यांनी, जन्मभर ह्यावर आपले आयुष्य वेचले आहे. एका जन्मात ते विचार वाचणे सुद्धा अशक्य आहे, त्याचा अभ्यास तर सोडाच. काय यांचा अभ्यास ? कुठे माझ्या तरी वाचनात आलेला नाही. "रोज दारू पिणे चांगले" हे जितक्या सहजतेने सांगावे तितक्या सहजतेने देवाला रीटायर करणे हास्यास्पद नव्हे कां ? ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे महात्मे, ज्यांना इतरांकडून काही नको आहे, ते जर पोटतिडिकेने "देव आहे" म्हणत असतील तर मी विश्वास कोणावर
ठेवावा ? चार पैसे मिळतात म्हणून कोठल्याही नाटक-सिनेमात काम करणार्‍यावर कीं राजाकडून आलेल्या संपत्तीला धुडकावणार्‍या तुकारामावर ?

देव,परमात्मा,ब्रह्म, समाधी, नामसंकीर्तन यांच्या उपयोगावर लिहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीं हे सहजसाध्य नव्हे. योगाचे सोडा, ते परमकठीण आहे. सर्वांनीच सांगितले आहे, भगवानांनीही. पण "नाम" सोपे आहे असे तरी कोण म्हणतो ? तेथेही एक मोठा अडथळा आहे. सगळ्यांनी एकमताने सांगितले आहे कीं त्याकरता ’भाव’ पाहिजे,’श्रद्धा’ पाहिजे. सोपे नाही. देवळाबाहेरच्या खेटरावर लक्ष असेल तर विठ्ठल जपाचा उपयोग नाही. ’नामाची’ हेटाळणी करताना हे विसरून चालणार नाही.

पंचेंद्रियांना अगोचर असलेल्या हायड्रोजन व ऑक्सिजन या दोन वायूंच्या संयोगाने पाणी होते. माझा विश्वास नाही. दाखवा दोन वायू. असे म्हटले तर तुम्ही म्हणणार "किमान दहावी पर्यंत रसायन शास्त्र शिका, दोन्ही वायूंचे सिलेंडर आणा, मग दाखवतो पाणी तयार करून !" हे ठीक. म्हणजे साधे पाणी करावयाला दहा वर्षे अभ्यास पाहिजे. तर संत म्हणतात "परमात्मा पहावयाचा आहे, आयुष्यभर जीवापाड श्रद्धेने नाम घे, आम्हाला मिळाला, तुलाही मिळेल".Quits.

जीवनात फुकट काहीही मिळत नाही. Law of conservation of energy सारखेच . या हाताने दे, त्या हाताने घे. राम नाम घेणार्‍या गृहस्थांची बातमी आली तेंव्हा ही सुवर्णसंधी म्हणून त्याकडे पहावयास पाहिजे. एक असाधारण प्रयोग जगावेगळा माणूस करतो आहे. अथक प्रयत्नांनी त्यांच्या प्रगतीचा आलेख मिळवण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. कोण करतय ?

संतांच्या शिकवणीने समाज दुर्बल झाला ही एक समजूत. त्याला अनेक कारणे आहेत. एका घटकाने समाज दुर्बळ होतो हा वैचारिक गोंधळ्च आहे.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

सहमत आहे. किंबहुना विज्ञानाच्या एका क्षेत्रातील दिग्गजांनी दुसर्‍या क्षेत्रात ढवळाढवळ केल्यासही असे होण्याचा संभव असतो.
फ्रेड हॉइल हे कॉस्मॉलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज. पण त्यांनी उत्क्रांती आणि डार्विनबद्दल काही विधाने केल्यावर रिचर्ड डॉकिन्स यांनी त्यांच्या सेल्फिश जीन या पुस्तकात त्यांचा समाचार घेतला आहे. ते म्हणतात, "Publishers should correct the misaprehension that a scholar's distinction in one field implies authority in other. And as long as that misapprehension exists, distinguished scholars should resist the temptation to abuse it."

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ढवळाढवळ आणि आंतरशास्त्रीय संशोधन

श्री फ्रेड हॉइल आणि श्री रिचर्ड डॉकिन्स* यांचे उदाहरण रोचक आहे. परंतु त्यामुळे मूळ लेखातील निष्कर्षांना पुष्टी मिळते असे वाटत नाही. त्यात श्री डॉकिन्स यांनी एका क्षेत्रातील अभ्यासकांनी इतर क्षेत्रांविषयी अधिकारवाणीने मत व्यक्त मोह टाळावा असे म्हटले आहे. मत व्यक्त करूच नये असे मात्र म्हटलेले दिसत नाही. विविध शाखांतील संशोधक एकत्र येऊन आंतरशास्त्रीय (interdisciplinary) संशोधन करतात हे नवीन नाही. अशा संशोधनासही ढवळाढवळ म्हणावे काय हे कळत नाही.

*डॉकिन्स यांच्यासारख्या निरीश्वरवाद्याचे उदाहरण अशा चर्चेत प्रस्तावाशी सहमती दर्शवतांना येणे हासुद्धा रोचक योगायोग असावा.

फरक

हे उदाहरण म्हणून पहा:

कुठल्याही संशोधनाशिवाय अथवा तशा संदर्भाशिवाय "अध्यात्माचे खूळ नसते तर आपली आणखी कितीतरी प्रगती झाली असती." असली विधाने करणे म्हणजेच "अधिकारवाणीने" मत देणे ते देखील, "मोक्षासाठी भक्तिमार्गाचा सार्वत्रिक प्रसार कधी झाला ठाऊक नाही. ( म्हणजे मला)" म्हणजे स्वत:चा या विषयात अभ्यास नाही हे मान्य करत. वास्तवीक या अशा विषयावर समाजशिक्षण करण्यासाठी म्हणून चांगल्या भाषेत आणि चांगल्या "टोन" मधेही लिहीता येऊ शकते, ज्याचा खर्‍या अर्थी वापर होऊ शकतो. पण इथे दिसते ती केवळ इतरांबाबतची तुच्छता. मी कोणी तरी वरच्या श्रेणीचा आणि इतर काय बरं ते? हं मागासलेले!

विविध शाखांतील संशोधक एकत्र येऊन आंतरशास्त्रीय (interdisciplinary) संशोधन करतात हे नवीन नाही. अशा संशोधनासही ढवळाढवळ म्हणावे काय हे कळत नाही.

आंतरशास्त्रीय (interdisciplinary) या शब्दांमधेच सर्व येते की विविध शास्त्रांची गरज असलेले संशोधन त्या साठी त्या त्या विषयातील संशोधक/तज्ञ येणार म्हणून...

सहमतीचा मुद्दा

आंतरशास्त्रीय (interdisciplinary) या शब्दांमधेच सर्व येते की विविध शास्त्रांची गरज असलेले संशोधन त्या साठी त्या त्या विषयातील संशोधक/तज्ञ येणार म्हणून...

श्री विकास तुमच्या विधानाशी सहमत आहे. एका शाखेतील संशोधकांनी दुसर्‍या शाखेतील संशोधक जेव्हा त्या शाखेमध्ये रस दाखवतात तेव्हा तुच्छतेने असे रस घेण्यास ढवळाढवळ म्हटले तर योग्य ठरणार नाही. उदाहरणाविषयी भाष्य करण्यास असमर्थता दर्शवित आहे.

उत्तर

इथे मत कुठल्या बाबतीत व्यक्त केले आहे ते लक्षात घ्यायला हवे. काही गोष्टींवर सर्वांची वेगवेगळी मते असतात आणि कुठलेही बरोबर किंवा चूक नसते. उदा. अमुक चित्रपट ऑस्कर-तोडीचा आहे ते भंगार आहे यापैकी प्रत्येकाला आपले मत बरोबर वाटण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखाद्या शास्त्राबद्दल मत व्यक्त केले जाते तेव्हा मात्र ते का बरोबर आहे याचा पुरावा द्यावा लागतो. इथे हॉइल यांनी उत्क्रांतीसंबंधी कुठलेही मत व्यक्त केले तरी त्यांना त्याचा पुरावा द्यावा लागेल. (दिला नाही तर डॉकिन्स त्यांना सोडणार नाही हे नक्की.) हे उदाहरण इथे यासाठी दिले की हॉइलसारखा मोठा शास्त्रज्ञही बरेचदा दुसर्‍या क्षेत्रात चुकीचे मत व्यक्त करू शकतो.

इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचा मूळ गाभा हाच असतो की तिथे वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञ लोक एकत्र येऊन संशोधन करतात. अशा वेळी रिसर्च पेपर लिहीताना प्रत्येक जण आपापल्या विषयाचा भाग लिहितो, दुसर्‍याच्या विषयात ढवळाढवळ करत नाही. जर दुसर्‍याच्या विषयातही प्रत्येकाला तितकीच गती असती तर एकत्र संशोधन करायची गरजच नव्हती.

मराठी सायटींवर प्रकार वेगळा आहे. इथेही प्रत्येकजण विविध विषयांवर आपले मत देतो. पण बरेचदा ते मत कुठल्या आधारावर दिले आहे हे स्पष्ट होत नाही. जर चर्चा पदार्थविज्ञानासारख्या काटेकोर विषयावर असेल तर हे सोपे जाते. मी अशी चर्चा काढली की न्यूटनच्या नियमांवर माझा विश्वास नाही तर त्याकडे सर्व दुर्लक्ष करतील. जेव्हा चर्चा इतिहास, समाजशास्त्र अशा काटेकोर नसणार्‍या विषयांवर होते तेव्हा मतांची सत्यता पडताळून बघणे अधिक अवघड जाते. (कित्येकदा मत मांडल्यावर याचा संदर्भ दाखवा म्हणून सदस्यांचा पाठपुरावा करावा लागतो.)

इथे शरदरावांवरच्या विरोधात इतके लोक पाहून आश्चर्य वाटले. त्यांचे म्हणणे इतकेच आहे की जर एखाद्या विषयात तुमचा अभ्यास नसेल तर पुराव्याअभावी विधाने न केल्यास बरे. यात मला तरी काही गैर वाटत नाही. तरीही मसावर सर्व लोक सर्व विषयांवर चर्चा करतातच, त्यांना हवे असल्यास अर्थातच ते तसे करायला मोकळे आहेत.

संशोधन/ मराठी संस्थळे/ अभ्यास

श्री आरागॉर्न, संशोधन करतांना - समाजशास्त्रीय असो वा वैज्ञानिक - पुराव्यांची आवश्यकता (कटेकोर नसले तरीही) असतेच. मी तुमच्याशी बराचसा (इंटरडिसिप्लिनरी संशोधन व पुराव्यांची आवश्यकता) सहमत आहे. त्या (डॉकिन्स यांच्या) वाक्याचे थोडे अधिक स्पष्टीकरण करणे मला गरजेचे वाटले.

पुरावे नसतांना शक्यता वर्तविणे व ते केवळ कयास आहेत हे नमूद केल्यास अधिकारवाणी न वापरता मत मांडणे (माझ्या नैपुण्याचा विषय असो किंवा नसो) यात मला काही गैर वाटत नाही. मराठी संस्थळांवर वावरतांना अनेकांचे अनेक उद्देश असू शकतील. पण ते उद्देश काय आहेत हे मी स्वतःपुरते माझा उद्देश काय आहे यासंदर्भात सांगू शकतो, इतरांच्या उद्देशांविषयी मला जाणून घेण्याची इच्छा नाही. पण 'मला काय वाटते' हे व्यक्त करण्याच्या सदस्यांच्या इच्छेविषयी दुमत नसावे.

अनेक समर्थनीय युक्तिवाद मराठी संस्थळांच्या बाबत असू शकतील पण मराठीतून माझे मत मांडता येणे आणि इतरांची मते वाचता येणे, या एकाच निकषावर मला मराठी संस्थळांची उपयुक्तता सिद्ध होते, असे वाटते. आता अभ्यास नसतांना सामाजिक विषयांवर मत मांडणे याबाबत असे म्हणेन की, जर मी समाजाचा घटक आहे तर माझे मत अभ्यास असो किंवा नसो मांडण्याची मला संधी असावी व त्या संधीस नाकारले जाऊ नये. चर्चाप्रस्तावात श्री शरद या संधीस नाकारत आहेत, असे मला वाटते.

पुराव्याअभावी(?)

त्यांचे म्हणणे इतकेच आहे की जर एखाद्या विषयात तुमचा अभ्यास नसेल तर पुराव्याअभावी विधाने न केल्यास बरे.

असे त्यांचे म्हणणे मला दिसले नाही. देव आहे किंवा नाही, अध्यात्माचा आनंद मिळवता येतो/ नाही याचे पुरावे कसे आणि कोणी द्यावेत म्हणा. उलट, त्यांच्या खालील म्हणण्यात

किशोरीताईंनी ग्रां प्री वर लिहूं नये आणि रामदेव महाराज यांनी बिटी कॉटनवर वावदूकपणा करूं नये. कां ? तर ते आपापल्या क्षेत्रात उत्तुंग पदावर विराजमान असले तरी सर्वज्ञ नाहीत. त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणे उचित. असे सर्व थोर हे जाणून असतात. प्रश्न असतो अलबत्या-गलबत्यांचा.

शरद यांनी पुरावे तपासून पाहिलेले नाहीत असे दिसते. ज्या व्यक्तींची नावे त्यांनी घेतली ती घेण्याआधी त्यांनीच थोडा अभ्यास करायला हवा होता नाही का? :-)

रामदेव महाराज कोणकोणत्या बाबतीत आपली अक्कल लढवत असतात ते त्यांचे कार्यक्रम खोलात पाहिले तर जाणवेलच. काही गोष्टी येथेही वाचता येतील. समलैंगिकतेवरील त्यांचे विचार वाचनीय आहेत.

किशोरीताईंनीही आशा भोसले यांचे "हो जा रंगिला रे" मधला रे ऐकून सा रे गा मा मधील "रे" इतका बेसूर असू शकतो याची कल्पना हे गाणे ऐकल्यावर आले असे म्हटले असल्याचे आठवते. (ही गोष्ट आठवणीच्या आधारावर लिहिली आहे. गोष्ट जुनी असल्याने पुरावे दाखवता येतीलच असे नाही.) परंतु या गाण्याचे चाहते ही गोष्ट मान्य करणार नाहीत.

येथे एका व्यक्तिला विषयाची जाण आहे दुसर्‍याला ती आहे याबाबत मला खात्री नाही परंतु मतप्रदर्शन करण्यात दोघांनीही माघार घेतलेली नाही आणि विषयाची जाण असून किंवा नसून त्यांचे मतप्रदर्शन पब्लिकला मानवणारे आहे असेही नाही.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेव्हा जेव्हा आपली अक्कल गरज नसताना लढवायची संधी मिळते तेव्हा तेव्हा प्रत्येकजण तिचा वापर करतो आणि करत राहील.

पुरावा

असे त्यांचे म्हणणे मला दिसले नाही.
माझे साधे म्हणणे असे कीं मला जर संत साहित्यावर काही लिहावयाचे असेल तर माझा त्या विषयावर थोडाबहूत अभ्यास असणे जरूरीचे आहे.

"या भक्तिमार्गामुळे समाजात मोठ्या प्रमाणात निष्क्रियता वाढली" या एका वाक्यावर समाजाशास्त्रातील /इतिहासातील गेलाबाजार दोन-तीन पीएचड्या सहज व्हाव्यात. आता हे वाक्य माधुरी_दिक्षित या नुकत्याच सभासद झालेल्या आयडीकडून आले तर लोक दुर्लक्ष करतील. पण हे वाक्य जेव्हा मुद्देसूद लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीकडून येते तेव्हा लोक ते गंभीरपणे घेतात. विज्ञानाविषयी काटेकोर असणारे लोक समाजशास्त्राविषयी विधाने करतान इतके निष्काळजी का होतात हे एक कोडेच आहे.
अधिक स्पष्टीकरणासाठी श्री धनंजय यांची खरडवही पहावी.

मतस्वातंत्र्य

माझे साधे म्हणणे असे कीं मला जर संत साहित्यावर काही लिहावयाचे असेल तर माझा त्या विषयावर थोडाबहूत अभ्यास असणे जरूरीचे आहे.

म्हणजे धना गड्याचा अभ्यास नाही त्याने आपल्या अनुभवावरून तोंड उघडू नये असे? पटले नाही. धनागड्याकडे पुरावे असतील तर त्याने ते मांडावे ही शक्यताही लेखक लेखात घालत नाहीत आणि लेखकाने ज्यांची नावे घेतली त्याविषयी त्यांचा अभ्यास किती की काही मते स्वतःला लागू नसतात इतरांना असतात तसेच. असो.

एखाद्याचे मत हे दुसर्‍या व्यक्तीला" ज्ञान पाजळलेले आहे" असे वाटणे शक्य आहे. आपल्या खरडवहीतील धनंजय यांची खरड वाचली आणि मी त्या खरडीशी सहमत आहे.

..

मला लेखातील मत हे सजेशन वाटते आहे. बाकीच्यांना ते लोकशाहीच्या विरूद्ध वाटते आहे. वी ऍग्री टू डिसग्री.
बाय द वे, शरदराव, आपणही आपले मत स्पष्ट करावे ही विनंती. मी एकटाच किती वेळ किल्ला लढवू? :प्

पहिल्या परिच्छेदाशी असहमत -त्यामुळे लेखाशी

ज्या-ज्या विषयाबद्दल व्यक्तीला रस आहे, त्या-त्या विषयाबद्दल मत व्यक्त करणे योग्य आहे.

१. अभ्यास नसलेले मत व्यक्त केल्यास त्या विषयातील अभ्यासक तपशिलांकडे दुर्लक्ष करतील, हे खरे आहे. पण जर समाजविन्मुख अभ्यासक "असे ठाम मत समाजात कोणाचेतरी आहे" याच्याकडेच दुर्लक्ष करेल, तर त्याच्या विषयाचा घात करेल.

२. अनेक गोष्टी प्रत्येक व्यक्तीला इतक्या प्राणप्रिय असतात, की अभ्यास नसूनही जर त्याला मते नसली, तर तो जिवंतच नाही. या प्रकारात अन्न, स्वास्थ्य, समाजात वागणूक, मनःशांतीची साधने, आणि सत्य जाणण्याचे प्रयत्न या गोष्टी येतात. (यादी अपूर्ण आहे.)

"किशोरीताईंनी (पर्यायी धना गड्याने) सापेक्षतावादाबद्दल बोलू नये" वगैरे वाक्यांसारखी हडेलहप्पी कोणीही चालवून घेता कामा नये. लोकशाहीत आपण सर्व सार्वजनिक विषयांच्या व्यवस्थापनाबद्दल निर्णय घेत असतो. जर कुठला विषय महत्त्वाचा वाटतो, त्या विषयाबद्दल मते प्रदर्शित करणे, आणि ग्रहण करणे आपला हक्क आणि आपले कर्तव्य होत.

आता जर शरद यांचा मुद्दा असता, की किशोरीताईंनी सापेक्षतावादाबद्दल व्यक्त केलेले मत अभ्यासपूर्ण नसेल, आणि साधारणपणे सापेक्षतावाद न-शिकलेल्या तुमच्या-माझ्याइतकेच ग्राह्य असेल, तर मी त्यांना अनुमोदन केले असते. मग त्यातून काही दुय्यम मुद्दे निघाले असते, की गायकीतील प्रसिद्धीमुळे किशोरीताईंना धना गड्यापेक्षा मोठे व्यासपीठ मिळते, म्हणून ऐकणार्‍याने भारावून जाऊ नये. मनुष्य म्हणून धना गड्याला जितका आदर देतो, तितकाच किशोरीताईंना द्यावा, वगैरे, मुद्दे त्या अनुषंगाने आले असते.

पण या अत्यंत माणूसघाण्या पहिल्या विचारसरणीने पुढील सर्व मुद्दे दुय्यम बनवले आहेत. (त्यातील काहींशी माझी सहमती आहे, तीसुद्धा दुय्यम.)

(कोणी काय लिहावे, आणि कोणी काय लिहू नये, याबद्दल आपला अभ्यास मोठ्या नम्रतेने लेखकाने प्रदर्शित केलेला नाही. त्या अभ्यासाबद्दल त्यांची प्रसिद्धी नसूनही, या विषयी मत पोटतिडकेने मांडावे, हा त्यांचा हक्क आहे, आणि त्यांचे कर्तव्य आहे. आणि "कोणीतरी गप्प बसावे" असे मत समाजाला घातक आहे, असा प्रतिवाद करणे माझा हक्क आहे आणि माझे कर्तव्य आहे. "गप्प-बसा-म्हणणारे लोक" हा माझा अभ्यासविषय नसला तरीही.)

+१

(कोणी काय लिहावे, आणि कोणी काय लिहू नये, याबद्दल आपला अभ्यास मोठ्या नम्रतेने लेखकाने प्रदर्शित केलेला नाही. त्या अभ्यासाबद्दल त्यांची प्रसिद्धी नसूनही, या विषयी मत पोटतिडकेने मांडावे, हा त्यांचा हक्क आहे, आणि त्यांचे कर्तव्य आहे. आणि "कोणीतरी गप्प बसावे" असे मत समाजाला घातक आहे, असा प्रतिवाद करणे माझा हक्क आहे आणि माझे कर्तव्य आहे. "गप्प-बसा-म्हणणारे लोक" हा माझा अभ्यासविषय नसला तरीही.)

शब्दशः सहमत.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

मराठी संकेतस्थळे बंद पडतील

ज्यातले काहीही कळत नाही अशा विषयांवर मतप्रदर्शन करणे बंद केले तर मराठी संकेतस्थळे बंद पडतील.

मी काम करतो त्या विषयाव्यतिरिक्त मला इतर विषयातील काहीही कळत नाही. आणि मी काम करतो त्या विशिष्ट क्षेत्राबद्दल कुठेच चर्चा होत नाहीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

ज्यातले काहीही कळत नाही अशा विषयांवर मतप्रदर्शन करणे बंद केले तर मराठी संकेतस्थळे बंद पडतील.

सहमत आहे. :)

+१

मी देखील सहमत!

किंबहूना जर स्वतःच्या विषयातील अगदी सध्याच्या काळातील महत्वांच्या विषयावर पण चर्चा केल्या तर जितके नंतर प्रतिसाद द्यावे लागणार नाहीत तितके अशा चर्चांच्या निमित्ताने प्रतिसाद मिळण्याचे आणि देण्याचे सुख मिळते. म्हणून मला मुर्तिपूजा आणि धर्म विशेष महत्वाचे वाटतात आणि आवडतात. :-)

:)

ज्ञानेश्वरांचे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी पुढे होणार्‍या मराठी पीएचड्यांची सोय करून ठेवली. -- पुल.. (जसे आठवले तसे)
तसेच मूर्तिपूजा, धर्म, आरक्षण, अनिवासि भारतीय, अंधश्रद्धा अशा विषयांबाबत म्हणावेसे वाटते. :)

आक्षेप!

ज्ञानेश्वरांचे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी पुढे होणार्‍या मराठी पीएचड्यांची सोय करून ठेवली. -- पुल.. (जसे आठवले तसे)

या विधानाला संदर्भ असला तरी पुरावा नाही. ज्ञानेश्वरांच्या काळी पीएचड्या अथवा पीएचड्यांची संकल्पना असणे अथवा अन्यथा त्यांना आपल्या कृत्यातून भावी पिढ्यांच्या पीएचड्यांची सोय होऊ शकेल याची कल्पना असणे शक्य आहे हे सप्रमाण सिद्ध करू शकणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही वा प्रस्तुत करण्यात आलेला नाही. पुराव्याअभावी ते श्रेय ज्ञानेश्वरांना देता येणार नाही. या कारणास्तव योग्य पुरावा सादर करावा अन्यथा हे विधान मागे घेण्यात यावे.

पु.लं. सारखे 'वाङ्मय' या एका विषयातील तज्ज्ञ 'इतिहास' (उदा. 'पीएचड्यांची ज्ञानेश्वरकालीन संकल्पना') या दुसर्‍याच विषयाच्या क्षेत्रात ढवळाढवळ करू लागले की निर्माण होणार्‍या वैचारिक गोंधळाचे हे उत्तम उदाहरण आहे. (असे माझे वैयक्तिक मत आहे.)

असुरक्षिततेची भावना.

असुरक्षिततेची भावना.

मराठी संकेतस्थळे बंद पडतील.

ह्या वाक्याने मराठी लोकांमध्ये मुळातून असलेली असुरक्षिततेची भावना एका त्रयस्थ दृष्टीकोनातून बघावयास मिळते. कोणत्याही क्षुल्लक कारणाने मराठी संकेतदळे बंद पडतील असे वाटत नाही. ती बंद पडावयाचीच असती तर आतापर्यंत सहस्त्र वेळा बंद पडली असती.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

लोकशाही तरी हवी कशाला?

केवळ संकेतस्थळेच कशाला जगरहाटीच बंद होईल. लोकशाही तरी हवी कशाला? निवडणुका बंदच करायला हव्यात. तुम्हीच सांगा अक्कल असते का ह्या आम पब्लिकला? त्यांच्या मतप्रदर्शनाला काही अर्थ आहे का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रतिवाद

लोकशाहीत लोक स्वतः मंत्रिमंडळांत (किंवा संसदेत) जाऊन राज्य चालवत (किंवा कायदे बनवत) नाहीत. आपापले हितसंबंध तेथे जाऊन सांभाळू शकतील असे ज्यांच्याबद्दल वाटते असे प्रतिनिधी निवडून पाठवतात. आणि आम पब्लिकला स्वतः राज्य चालवण्याइतकी किंवा कायदे बनवण्याइतकी अक्कल कदाचित नसली तरी स्वतःचे हितसंबंध कळण्याइतकी अक्कल निश्चित असते. म्हणून निवडणुका पाहिजेत.

बाकी 'संकेतस्थळांवरसुद्धा सदस्य आपापले हितसंबंध सांभाळण्यासाठीच लिहितात' असा जर का आपला दावा असेल तर मग आपल्या म्हणण्याचा विचार करावा लागेल. (कदाचित त्यात तथ्य असूही शकेल. नक्की माहिती नाही. थोडा अधिक विचार करावा लागेल.) फक्त, त्या परिस्थितीत मग 'माहितीची देवाणघेवाण' असे अंजिराचे पान नेसत राहण्याची गरज अजूनही आहे की अशी गरज आता कालबाह्य झाली आहे, हाही प्रश्न (पूर्णपणे वेगळा असला तरी) विचार करण्यालायक वाटतो.

(लोकशाहीत नियमितपणे काही ठराविक कालावधीनंतर निवडणुका होतात किंवा होणे अपेक्षित असते, त्यातून लोकांना आपले प्रतिनिधी नियमितपणे बदलता येतात वगैरे लोकशाहीचे गुणगान करणारे आणि लोकशाहीसंबंधी अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे प्रस्तुत चर्चेत पूर्णपणे अवांतर आहेत या कारणास्तव येथे उपस्थित करू इच्छीत नाही.)


"पगाराच्या मानाने जरा जास्तच बोललो वाटते..."

काय उत्तर द्यायला हवे?

लोकशाहीत लोक स्वतः मंत्रिमंडळांत (किंवा संसदेत) जाऊन राज्य चालवत (किंवा कायदे बनवत) नाहीत. आपापले हितसंबंध तेथे जाऊन सांभाळू शकतील असे ज्यांच्याबद्दल वाटते असे प्रतिनिधी निवडून पाठवतात. आणि आम पब्लिकला स्वतः राज्य चालवण्याइतकी किंवा कायदे बनवण्याइतकी अक्कल कदाचित नसली तरी स्वतःचे हितसंबंध कळण्याइतकी अक्कल निश्चित असते. म्हणून निवडणुका पाहिजेत.

बाकी 'संकेतस्थळांवरसुद्धा सदस्य आपापले हितसंबंध सांभाळण्यासाठीच लिहितात' असा जर का आपला दावा असेल तर मग आपल्या म्हणण्याचा विचार करावा लागेल. (कदाचित त्यात तथ्य असूही शकेल. नक्की माहिती नाही. थोडा अधिक विचार करावा लागेल.) फक्त, त्या परिस्थितीत मग 'माहितीची देवाणघेवाण' असे अंजिराचे पान नेसत राहण्याची गरज अजूनही आहे की अशी गरज आता कालबाह्य झाली आहे, हाही प्रश्न (पूर्णपणे वेगळा असला तरी) विचार करण्यालायक वाटतो.

(लोकशाहीत नियमितपणे काही ठराविक कालावधीनंतर निवडणुका होतात किंवा होणे अपेक्षित असते, त्यातून लोकांना आपले प्रतिनिधी नियमितपणे बदलता येतात वगैरे लोकशाहीचे गुणगान करणारे आणि लोकशाहीसंबंधी अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे प्रस्तुत चर्चेत पूर्णपणे अवांतर आहेत या कारणास्तव येथे उपस्थित करू इच्छीत नाही.)

प्रस्तुत चर्चेचा विषय 'संकेतस्थळांवरील लोकशाही/हुकूमशाही' नसल्यामुळे त्या अनुषंगाने अधिक चर्चा करणे अप्रस्तुत ठरेल. तुमचे 'अंजिराचे पान' सोडल्यास (ते सोडावे असे म्हणत नाही) तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी मी सहमत आहेच.

मुद्दा साधा आहे. "महाशय, आपणांस राज्यशास्त्र, राज्यघटना, कायदा, अर्थशास्त्र विषयांतले फारसे काही/काहीही कळत नाही. म्हणून आपणांस मतदान करण्याचा अधिकार नाही," असे कुणी म्हटल्यास काय उत्तर द्यायला हवे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अधिकार

>>मुद्दा साधा आहे. "महाशय, आपणांस राज्यशास्त्र, राज्यघटना, कायदा, अर्थशास्त्र विषयांतले फारसे काही/काहीही कळत नाही. म्हणून आपणांस मतदान करण्याचा अधिकार नाही," असे कुणी म्हटल्यास काय उत्तर द्यायला हवे?

असे प्रत्यक्ष कोणी म्हणत नसले तरी अशी आडून सुचवणी (विषादाच्या स्वरूपात) अनेकदा ऐकायला मिळते.
"काय करणार!! सुशिक्षित लोक मतदान करीत नाहीत त्यामुळे अशिक्षितांच्या मतांवर प्रतिनिधी निवडून येतात." अशा अर्थाची वाक्ये आपण खूप वेळा ऐकतो. म्हणजे अशिक्षित लोकांना उल्लेखलेल्या गोष्टींतले काही कळत नाही म्हणून लोकशाही नीट चालायला हवी तर अशा अशिक्षितांना खरे म्हणजे मताधिकार असूच नये असा काहीसा सुप्त सूर असतो. अर्थात असे उघड कोणी बोलत नाही.

नितिन थत्ते

उत्तर

मुद्दा साधा आहे. "महाशय, आपणांस राज्यशास्त्र, राज्यघटना, कायदा, अर्थशास्त्र विषयांतले फारसे काही/काहीही कळत नाही. म्हणून आपणांस मतदान करण्याचा अधिकार नाही," असे कुणी म्हटल्यास काय उत्तर द्यायला हवे?

असे कोणी म्हटल्यास त्याकरिता प्रत्युत्तर म्हणून "निवडणुका का असाव्यात/मतदान का असावे" याबाबतचा माझा वरील प्रतिवाद समर्पक आहे असे वाटते.

मात्र, "महाशय, आपणांस राज्यशास्त्र, राज्यघटना, कायदा, अर्थशास्त्र विषयांतले फारसे काही/काहीही कळत नाही. त्याबाबतची आपली मते (मतपेटीव्यतिरिक्त इतरत्र) अधिकारवाणीने, अखेरचा शब्द किंवा देववाणी (Gospel Truth अशा अर्थी) असल्याच्या थाटात, आणि 'माहिती' म्हणून, इतरांवर - निदान त्यातील आपल्याला थोडेफार काही कळते असे वाटणार्‍यांच्या उपस्थितीत तरी - फेकू नयेत" असे जर का कोणी म्हणाले*, तर ती एक वेगळी बाब म्हणून कदाचित विचार करण्यायोग्य ठरावी. ("तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" / "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" याचा तरी याहून वेगळा असा काय अर्थ आहे?)

*असे मी अजूनपर्यंत तरी म्हणालेलो नाही. बहुधा म्हणू इच्छीतही नाही. (खात्री नाही.)


"आणि आपला पगार किती हो, महाशय?"

कुठेच?

मी काम करतो त्या विशिष्ट क्षेत्राबद्दल कुठेच चर्चा होत नाहीत.

कुठेच!
की मराठी संकेतस्थळांवर?

तो काम करतो त्या विषयातीलही त्याला फारसे कळत नाही. याबद्दल कुठेच चर्चा होत नसेल अशी आशा आहे.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

गरज नाही

उदाहरण म्हणून देव रीटायर करावयाला निघालेल्या डॉ. लागूंचे घेऊं. या विषयावर आपल्या इथे शेकडो वर्षांत अगणिक लेखकांनी, संत महात्म्यांनी, जन्मभर ह्यावर आपले आयुष्य वेचले आहे. एका जन्मात ते विचार वाचणे सुद्धा अशक्य आहे, त्याचा अभ्यास तर सोडाच. काय यांचा अभ्यास ? कुठे माझ्या तरी वाचनात आलेला नाही.

लागूंना संत, देव वगैरेंचा अभ्यास करण्याची गरज नाही. कदाचित त्यांनी निरिश्वरवादाचा अभ्यास केलाही असेल पण खरेतर तीही गरज नाही. स्वतःच्या किंवा स्वतःला आलेल्या अनुभवांतून लोक विचार मांडू शकतात. त्यासाठी आयुष्य वगैरे वेचण्याचीही गरज नाही.

ज्ञानेश्वर-तुकारामांसारखे महात्मे, ज्यांना इतरांकडून काही नको आहे, ते जर पोटतिडिकेने "देव आहे" म्हणत असतील तर मी विश्वास कोणावर ठेवावा ? चार पैसे मिळतात म्हणून कोठल्याही नाटक-सिनेमात काम करणार्‍यावर कीं राजाकडून आलेल्या संपत्तीला धुडकावणार्‍या तुकारामावर ?

मी लागूंवरही ठेवू शकते कारण मी लागूंना प्रत्यक्ष पाहिले आहे. तसा प्रत्यक्ष त्यांच्याशी संबंध नसल्याने मी त्यांच्यावर विश्वास ठेवावा असेही नाही. तुकारामांना तर मी पाहिलेलेही नाही. अशी ऐतिहासिक व्यक्ती होती, जिच्या गाथा इंद्रायणीवर तरंगल्या, त्यांना आणायला पुष्पक विमान आले, ते सदेह स्वर्गात गेले वगैरे भाकडकथा नाहीत कशावरून ? त्या भाकडकथाच आहेत असे मला वाटते हा मुद्दा वेगळा. राजाकडून आलेली संपत्ती धुडकावली एवढेच कारण तुकारामावर विश्वास ठेवण्यास पुरेसे वाटत नाही.

देव,परमात्मा,ब्रह्म, समाधी, नामसंकीर्तन यांच्या उपयोगावर लिहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीं हे सहजसाध्य नव्हे. योगाचे सोडा, ते परमकठीण आहे. सर्वांनीच सांगितले आहे, भगवानांनीही.

हे असे सर्वच म्हणतात. या वाक्याची सत्यासत्यता तपासून पाहण्यासाठी काही प्रमाण नाही.

असो, यनांचा लेख जितका एकांगी आहे तेवढाच हा लेखही आहे असे वाचून वाटले. दोन्ही लेखांशी असहमत आहे असेच म्हणावे लागेल.

आपण वाचू नये

ज्याला ज्या विषयावर लिहावेसे वाटते त्यावर त्याने/तिने लिहावे. लोकशाही आहे. कळो किंवा न कळो. आपल्यालाही न वाचण्याचे किंवा दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आहे. जसे इथले "मागासलेपणा" , "विकृती", "अधोगती" अशी विशेषणे असलेले "मूर्तीपूजा, हिंदुत्त्व, हिटलर, नथुराम, सावरकर, संस्कृत जिवंत - मृत, प्रसार, संशोधन, ब्राह्मण, संतसाहित्य, दारूबंदीप्रसार" या विषयांवरचे इथल्या थोर विचारवंतांचे लेखन वाचून शक्यतोवर दुर्लक्ष करतो. श्री. यनावाला यांच्याकडून इतक्या उथळ लेखाची अपेक्षा नव्हती म्हणून प्रतिसाद दिला इतकेच.

विनायक

लेख कोणाचा ? वैचारिक गोंधळ कोणाचा ?

>>श्री. यनावाला यांच्याकडून इतक्या उथळ लेखाची अपेक्षा नव्हती म्हणून प्रतिसाद दिला इतकेच.
शरदरावांच्या लेखाबद्दल चर्चा चालू आहे की यनासरांच्या ?

-दिलीप बिरुटे
(उपक्रमवरील चर्चेत भरकटलेला)

हम्म..

सर्व मते असहमत असूनही त्यांच्या विरूद्ध जाण्याचा धोका पत्करतो आहे.
शरदराव हूकूमशाही गाजवत अहेत असे त्यांच्या लेखावरून वाटत नाही. त्यांची फक्त सुचवण आहे की ज्या विषयात फारशी गती नाही त्या विषयावर ज्ञान न पाजळलेले बरे. याउपर अर्थातच प्रत्येकाला मतस्वातंत्र्याचा अधिकार आहेच.

लेखाशी पूर्ण असहमत

श्री शरद यांच्या मुद्द्यांशी पूर्ण असहमत. श्री धनंजय आणि प्रियाली यांच्या प्रतिसादांशी सहमत असून त्यांनी व्यवस्थित मांडलेले मुद्दे पुन्हा विस्कळीतपणे मांडणे टाळत आहे.

अंडी

ऑम्लेट बिघडले आहे हे कळायला स्वतः अंडी घालावी लागत नाहीत.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

अंडी...

"अंडी फेकण्यासाठी स्वतः अंडी घालावी लागत नाहीत" अशी सुधारणा सुचवू इच्छितो.

लिखाण महत्त्वाचे, लेखक नव्हे.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
जे काय लिहिले आहे ते वाचावेसे वाटले तर वाचावे.ते कोणी लिहिले आहे ,त्याची पात्रता काय ,त्याचा अभ्यास आहे काय, त्याला अधिकार आहे काय या गोष्टी अप्रस्तुत आहेत.लिहिणार्‍याचा अभ्यास नाही म्हणून त्याने लिहिलेले चुकीचे आहे,अधिकारी व्यक्तीने लिहिले म्हणजे ते योग्यच आहे असे मानणे हे तर्काला धरून नाही."यज्ञात् भवति पर्जन्यः | असे गीतेत भगवंतांच्या तोंडी आहे म्हणून ते खरे मानणार काय?
जे लिहिले आहे त्याचे लेखकनिरपेक्ष मूल्यमापन करावे. चुकीचे वाटल्यास प्रतिवाद करावा.पण अधिकार नसता लिहिले म्हणून ते चुकीचे आहे हा युक्तिवाद मुळीच पटण्यासारखा नाही.
तुकाराम महाराजांनी संपत्ती नाकारली म्हणून त्यांनी लिहिलेले सगळे बरोबर आणि डॉ. लागू पैसे घेऊन नाटकात/सिनेमात काम करतात म्हणून ते म्हणतात ते खोटे हे तर्काला धरून आहे काय?

हवेतल्या गप्पा

देव,परमात्मा,ब्रह्म, समाधी, नामसंकीर्तन यांच्या उपयोगावर लिहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीं हे सहजसाध्य नव्हे.

ह्या हवेतल्या गप्पा झाल्या. आपणांस वरीलपैकी एखादी गोष्ट साध्य झाली आहे काय? साध्य झाली असल्यास सिद्ध करून दाखवावे. अन्यथा हे सगळे निरर्थक आहे. पोकळ आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काहीही न कळणे

एखाद्या विषयातील काहीही न कळणे म्हणजे काय हे मला अजून कळले नाही.
अमुक रस्ता अरुंद आहे म्हणून त्यावरून बस नेऊ नये असे मत देण्यासाठी मला नगररचना शास्त्राचा सखोल अभ्यास करायला हवा असे काही नाही. त्यामुळे मी व्यक्त केलेले हे मत मला नगररचनाशास्त्रातील काहीही कळत नाही असे म्हणून उडवून लावता येणार नाही.
बस जायला हवी असेल तर किमान किती फुटांचा (२० की ३०)रस्ता हवा या प्रश्नाचे निश्चित उत्तर मला कदाचित देता येणार नाही. इतकेच कशाला सध्याचा रस्ता किती फुटांचा आहे (१२ की १५) हेही माहीत असण्याची काहीही आवश्यकता नाही. (हे उदाहरण चपखल आहे की नाही याच्याविषयी साशंक आहे).

धनंजय यांच्याशी सहमत आहे.

नितिन थत्ते

कळणे - न कळणे आणि हितसंबंध

कधी कधी ज्यांनतीखाद्या विषयातले कळते असे लोकसुद्धा आपले हितसंबंध - इगो जपण्यासाठी प्रामाणिकपणे लिहीत नाहीत. आईनस्टाईनचे उदाहरण घेऊ. त्याच्या कॉस्मिक समीकरणातला कॉस्मिक स्थिरांक अनावश्यक आहे असे रशियन गणिती अलेक्झांडर फ्रीडमन याने प्रतिपादन केल्यावर पहिल्याने आईनस्टाईनने फ्रीडमनचे गणित चुकीचे असल्याचे पत्र फ्रीडमनचा पेपर प्रसिद्ध करणार्‍या जर्नलला पाठवले. बहुतेक तो पेपर नीट न वाचताच केवळ आपल्या निष्कर्षाशी न जुळणारा असल्याचे बघून आईनस्टाईनने पत्र पाठवले. फ्रीडमनने माफीचा आग्रह धरल्यावर नाईलाजाने माफी लिहून दिली. तसे करतानाही " या गणिताचा भौतिक गोष्टींशी संबंध लावता येत नाही" अशी खोडसाळ ओळही त्यात होती, पण शेवटी हे माफीपत्र असल्याचे लक्षात आल्याने ती ओळ वगळली.

पुढे फ्रीडमनचे अकाली निधन झाले. त्यानंतर बेल्जियन गणिती जॉर्जेस लेमित्रे याने स्वतंत्रपणे आईनस्टाईनच्या त्रुटी दाखवणारे गणित सिद्ध केले. पण आईनस्टाईनने ते मान्य न केल्याने काही काळ प्रसिद्धच झाले नाही. स्वतःच्या नावाला असलेल्या महत्त्वाचा असा दुरूपयोग आईनस्टाईनने केला.

थोडक्यात, ज्यांना एखाद्या विषयातले समजते असे लोकही त्या विषयावर लिहिताना स्वतःचा इगो/हितसंबंध जपण्यासाठी बौद्धिक प्रामाणिकपणा दाखवतीलच असे नाही.

विनायक

सहमत

यावर सहमत आहे. आज विश्वाची निर्मिती महास्फोटातून झाली या उपपत्तीच्या पुष्ट्यर्थ खूप पुरावे आहेत आणि तसे सिद्ध(च) झाले आहे असे म्हणायला खूप वाव आहे.
याउलट विश्वरचनेची स्थिरस्थितीची उपपत्ती आज वैज्ञानिक जगात जवळजवळ ऑल्सो रॅन या स्थितीत आहे. तरीही (कदाचित नारळीकर यांचे गुरू फ्रेड हॉयल यांनी मांडली होती म्हणून) नारळीकर बर्‍याचदा त्यांच्या लेखनात (वैज्ञानिक जगातील नव्हे इतरत्र) त्या उपपत्तीचा आवर्जून उल्लेख करतात आणि महास्फोट की स्थिरस्थिती याबद्दल निश्चित कळलेले नाही असेही विधान करतात.
एकदिवसीय सामन्याची दहा षटके राहिती आहेत. अजून २०० धावा करायच्या आहेत आणि ९ विकेट गेल्या आहेत. तरी "सामना अजून संपलेला नाही" असे काहीसे हे 'टेकनिकली करेक्ट' विधान आहे.

(याने माझा नारळीकर यांच्या कर्तृत्वाबद्दलचा आदर मुळीच कमी होत नाही. विनायक यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ आणखी एक उदाहरण म्हणून हे दिले आहे)

नितिन थत्ते

विचारपुर्वक गोंधळ

बर्‍याचदा आपल्या मताशी एखादा सहमत नसेल व आपल्या प्रतिपादना/ प्रतिवादामुळे समोरच्या व्यक्तित काही फरक पडत नाही असे दिसल्यास त्याचा वैचारिक गोंधळ झाला आहे असे म्हणणे हे बर्‍याचदा दिसुन येते. कधी कधी आकलनाच्या मर्यादा,बौद्धीक खुजेपणा/तोकडेपणा, संकुचित विचारसरणी इत्यादी पिंकाही टाकल्या जातात. त्यात आत्मप्रौढी अहंकार चा (कुजकट?)वास देहबोलीतुन्/ट़ंकबोलीतुन येत असतो. तो येउ नये म्हणुन जर 'वैचारिक गोंधळ' हा शब्दप्रयोग वापरल्यास तर तो लपुन जातो. शिवाय विनयतेचा सुगंधही येतो.
बर्‍याचदा आग्रही वा ठाम मते मांडल्यावर त्याला टोकाची मते म्हटले जाते. हल्ली कार्पोरेट सेक्टर मध्ये लेटस अग्री टू डिसऍग्री असे म्हणुन कॉमन मिनिमम प्रोग्रामवर् सहमती होते. त्यात परस्पर स्वार्थ व उपयुक्तता असते
आपले विचार वा आपले जग म्हणजे शेवटी मेंदुतील केमिकल् लोच्याच ना!
विचारपुर्वक गोंधळ घातला कि त्याला वैचारिक गोंधळी म्हणण्या ऐवजी विद्वान म्हटले जाते.
प्रकाश घाटपांडे

संतसाहित्याचा अभ्यास

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"नामसंकीर्तन...." या चर्चा प्रस्तावात मी संतसाहित्याची समीक्षा केलेली नाही.परीक्षण लिहिलेले नाही. जे लिहिले आहे ते संतशिकवणी संबंधीचे सामान्य ज्ञान आहे. एव्हढी माहिती कोणाही सर्वसामान्य वाचकाला असू शकते. त्यासाठी संतसाहित्याच्या सखोल अभ्यासाची काहीही आवश्यकता नाही.
जे लिहिले आहे ते स्पष्ट आहे.कुठेही संदिग्धता नाही.व्यामिश्रता नाही.वैचारिक गोंधळ मुळीच नाही. लेखनात व्यक्त केलेल्या विचारांत एकवाक्यता नसेल, संदिग्धता असेल, "वदतो व्याघातः"प्रकारचे लेखन असेल, तर्कसुसंगत नसेल तर त्या लेखनात वैचारिक गोंधळ आहे असे म्हणता येईल.

सहमत... नेमके!

जे लिहिले आहे ते स्पष्ट आहे.कुठेही संदिग्धता नाही.व्यामिश्रता नाही.वैचारिक गोंधळ मुळीच नाही. लेखनात व्यक्त केलेल्या विचारांत एकवाक्यता नसेल, संदिग्धता असेल, "वदतो व्याघातः"प्रकारचे लेखन असेल, तर्कसुसंगत नसेल तर त्या लेखनात वैचारिक गोंधळ आहे असे म्हणता येईल.

अधोरेखिताशी तंतोतंत सहमत आहे. किंबहुना, वैचारिक गोंधळ नसण्याबाबतचे हे निकष त्या चर्चाप्रस्तावाच्या मसुद्यातून जर पूर्ण होत असतील, तर inasmuch as that, it would be a perfect science. इतरत्र आधी म्हटल्याप्रमाणे, विज्ञानास गृहीतके आणि निष्कर्ष यांच्यातील (आणि एकंदर प्रतिपादनातील) अंतर्गत तर्कसुसंगतीशी कर्तव्य असते. गृहीतकांचा तथ्याशी मेळ बसतो अथवा नाही यांच्याबद्दल विज्ञानास सोयरसुतक नसते. (कमीअधिक प्रमाणात मेळ बसला तर उत्तम, नाही बसला, तरीही उत्तम!)

पूर्ण विचाराअंती, यनावालांच्या प्रतिपादनातील गृहीतके आणि निष्कर्ष यांच्यात अंतर्गत तर्कसुसंगती असल्यास त्यांचे प्रतिपादन तर्कशुद्ध आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय राहणार नाही, अतएव त्यात 'वैचारिक गोंधळ' आहे असे म्हणता येणार नाही. या दृष्टीने त्या लेखनातील त्यांची नेमकी गृहीतके काय आहेत, त्यावरून त्यांनी मांडलेले नेमके निष्कर्ष काय आहेत आणि त्यांच्या गृहीतकांत आणि निष्कर्षांत तर्कसुसंगती आहे किंवा नाही याचा अभ्यास करावा लागेल. अशा तर्कसुसंगतीकरिता (आणि तर्कसुसंगतीच्या निदानाकरिता) संतसाहित्याच्या सखोल तर सोडाच, पण वरवरच्या अभ्यासाचीही गरज नसावी.

(यनावालांच्या लेखातील गृहीतके नेमकी कोणती, त्यावरून त्यांनी काढलेले निष्कर्ष नेमके कोणते, आणि त्या गृहीतकांत आणि निष्कर्षांत तर्कसुसंगती अथवा एकवाक्यता आहे किंवा नाही, या बाबींचा पृथक्करणात्मक अभ्यास - analytical study - मी केलेला नाही. या कारणास्तव त्यांचे प्रतिपादन विज्ञानाच्या कसोटीवर उतरते किंवा नाही - आणि म्हणूनच त्यात 'वैचारिक गोंधळ' आहे अथवा नाही - याबाबतचे कोणतेही भाष्य मी - यापूर्वी मी काहीही म्हणालो असलो अथवा नसलो तरी - असा अभ्यास केल्याशिवाय करणे हे योग्य ठरणार नाही. तूर्तास असा पृथक्करणात्मक अभ्यास करण्यात मला रस नाही. गरजूंनी आणि/किंवा इच्छुकांनी असा अभ्यास जरूर करून पहावा.)

यनावालांची गृहीतके (आणि म्हणूनच त्यांतून निघणारे निष्कर्ष) ही तथ्यास धरून आहेत की नाही हा मात्र एक पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे. याबाबत काही निदान करण्यासाठी कदाचित संतसाहित्याचा आणि तत्कालीन परिस्थितीचा सखोल अभ्यास आवश्यक ठरावा, आणि किमानपक्षी उपयुक्त तर नक्कीच ठरावा. असा अभ्यास मी केलेला नसल्यामुळे (किंबहुना माझी अशा अभ्यासाशी तोंडओळखही नसल्यामुळे) अशा निदानाच्या स्वरूपाचे कोणतेही विधान मी करणे उचित ठरणार नाही. अभ्यासूंनी असे निदान जरूर करावे. व्यक्तिशः मला त्यात रस नाही.

मात्र अभ्यासूंच्या अभ्यासाअंती 'यनावालांची गृहीतके आणि/किंवा निष्कर्ष तथ्यास धरून नाहीत' असे जरी निदान झाले, तरी केवळ त्या आधारावर त्यांचे प्रतिपादन हे 'वैचारिक गोंधळ' ठरू शकणार नाही. जोपर्यंत त्यांची गृहीतके आणि निष्कर्ष (म्हणजेच त्यांचे एकंदर प्रतिपादन) यांच्यातील अंतर्गत तर्कसुसंगतीस बाधा येत नाही, तोपर्यंत केवळ तथ्याशी संबंध नसल्याकारणाने त्यांचे प्रतिपादन माझ्या मते 'वैचारिक गोंधळ' ठरू नये. 'तर्कसुसंगत आणि विज्ञानाच्या कसोटीस उतरणारे परंतु तथ्याशी काहीही संबंध नसलेले प्रतिपादन' होईल कदाचित, पण 'वैचारिक गोंधळ' निश्चितच नव्हे.

यनावालांचे प्रतिपादन हे 'वैचारिक गोंधळ' तेव्हाच होऊ शकेल, जर त्यांच्या गृहीतकांत आणि निष्कर्षांत / एकंदर प्रतिपादनात तर्कसुसंगती नसेल तर. (Clumsy वाक्यरचनेबद्दल दिलगीर आहे.) अशा परिस्थितीत असे प्रतिपादन तथ्याशी शंभर टक्के मिळतेजुळते जरी निघाले तरीही ते 'वैचारिक गोंधळ'च ठरेल.

'एखादे प्रतिपादन किंवा प्रतिपादनाचा भाग तथ्याशी मिळताजुळता नसणे' आणि 'प्रतिपादनात वैचारिक गोंधळ असणे' या दोन सर्वस्वी भिन्न आणि स्वतंत्र बाबी आहेत. (थोडक्यात, आरोप करताना आरोप काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे.)

अवांतर: याच कारणास्तव, केवळ 'फलज्योतिषाची भाकिते आणि वास्तव यांचा काहीही संबंध नसतो' या आधारावर 'फलज्योतिष हे विज्ञान नाही' या निष्कर्षाप्रत येण्याची घाई मी करणार नाही. किंबहुना, या निष्कर्षाप्रत येण्याकरिता तो आधारही होऊ शकत नाही. या निष्कर्षाप्रत येण्याकरिता फलज्योतिषाची गृहीतके काय आहेत, त्यावरून काढलेले निष्कर्ष काय आहेत, अशी गृहीतके आणि असे निष्कर्ष यांच्यात या 'विज्ञाना'च्या कक्षेत सर्वत्र तार्किक सुसंगती आहे किंवा नाही या सर्व बाबींचा अभ्यास करून मगच आणि केवळ त्याच आधारावर हे 'विज्ञान' आहे किंवा नाही याबद्दल निष्कर्ष काढता येईल. 'भाकिते तथ्याशी मिळतेजुळते असणेनसणे' हा निकष येथे पूर्णपणे अवांतर ठरावा. अशी तर्कसुसंगती न सापडल्यास फलज्योतिषाची सर्व (शंभर टक्के) भाकिते जरी खरी निघाली, तरी त्याला 'विज्ञान' म्हणता येणार नाही. उलटपक्षी, अशी सार्वत्रिक तर्कसुसंगती सापडल्यास फलज्योतिषाचे एकही भाकीत जरी वास्तवात उतरले नाही, तरी त्यास 'विज्ञान' मानण्यावाचून पर्याय राहणार नाही. त्या परिस्थितीत ते 'वास्तवाशी काहीही संबंध नसलेले विज्ञान' ठरेल कदाचित, परंतु तरीही विज्ञानच ठरेल.

(फलज्योतिषाचा माझा अभ्यास नसल्याकारणाने - आणि त्यात रसही नसल्याकारणाने - 'फलज्योतिष हे विज्ञान आहे अथवा नाही' याबद्दल कोणतेही प्रतिपादन मी करू शकत अथवा इच्छीत नाही.)

वर म्हटल्याप्रमाणे, 'फलज्योतिषाच्या भाकितांचा वास्तवाशी काही संबंध आहे किंवा नाही / अशी भाकिते वास्तवात उतरतात किंवा नाही' हा 'फलज्योतिष हे विज्ञान आहे अथवा नाही' हे ठरवण्याकरिता निकष होऊ शकत नाही. मात्र, 'फलज्योतिष हे विज्ञान व्यवहार्य आहे किंवा नाही', 'फलज्योतिषावर श्रद्धा ठेवून व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यावर अवलंबून राहणे हे कितपत इष्ट आहे' आणि कदाचित म्हणूनच 'फलज्योतिषावरील विश्वास ही अंधश्रद्धा आहे किंवा नाही' हे पूर्णपणे वेगळे प्रश्न आहेत, आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता 'फलज्योतिषाच्या भाकितांचा वास्तवाशी कितपत संबंध आहे' हा कदाचित एक निकष होऊ शकावा असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

मत स्वातंत्र्य...

देव,परमात्मा,ब्रह्म, समाधी, कळो की न कळो, आपण बॉ आपले मत टाकत राहू. कोणाला पटो की न पटो. आता ज्या विषयात गती नाही (विषयात गती असली काय अन नसली काय उपक्रमवर अक्कल पाजळल्याशिवाय आम्हाला तरी होत नाही ) तिथे आम्हीच स्वतःहून सहभागी होत नाही. उदा. यनासरांचे कोडे,विज्ञान, अशा विषयांपासून दूर राहतो. पण, ज्या विषयात गती नाही त्या विषयाबद्दल बोलूच नये. हा असा आग्रह धरु नये असे वाटते. मत स्वातंत्र्य वगैरेचे प्रश्न निर्माण होतात. चूक असेल की बरोबर असेल,ज्ञान असेल की नसेल, बोलणार्‍याला बोलू द्या...काय व्हायचा तो वैचारिक गोंधळ होऊ द्या...!

बाकी उपक्रम सध्या फार्मात आहे :)

-दिलीप बिरुटे

थोडा खुलासा

माझे मत
(१) प्रतिसाद देतांना अभ्यास पाहिजेच असे नाही. आपल्याला वाटते ते लिहावे.लेख किंवा चर्चा म्हणून लिहतांना अभ्यास असावा हे माझे मत. सगळ्यांना पटलेच पाहिजे असे नाही. मला ही कविता आवडली (किंवा नाही) असे लिहले तर फार अभ्यास नसला तरी चालावे,कारण ही वैयक्तिच आवडनिवड झाली परंतु सामाजिक, आर्थिक,इ. विषयांवर लिहताना जास्त काळजी घेतली पाहिजे. या लेखात श्री. यनावालांच्या लेखाबद्दल काहीही तक्रारीचा वगैरे सूर नाही. आम्ही रोज भेटतो, तिथे बोलता आले असतेच कीं.
(२) तज्ञांनी आपल्या विषयांबाहेर बोलू नये असे माझे अजूनही मत आहे. उदाहरणे देतांना चूक झाली असेल तर दिलगीर आहे. क्षमस्व.
(३) किशोरीताईंनी रिषभ बेसूर लागला असे सांगितले असेल तर मी मला गाण्यातले काहीही कळत नसले तरी मान्य करीन कारण माझ्यासमोर त्यांनी केलेली तपस्या आहे. इथेही श्री. प्रियाली यांचे म्हणणे मान्य; त्यांना डॉ. लागू पटतात, मला किशोरीताई.
(४)" तुकाराम महाराजांनी राज्य नाकारले म्हणून त्यांचे सगळे बरोबर असले पाहिजे हे तर्कदुष्ट आहे’". मान्य. माझे म्हणणे एवढेच कीं असा माणूस त्याच्या आयुष्यभराच्या परिश्रमांनंतर त्याच्या विषयात जे सांगतो, ते मला विश्वासार्ह वाटते.
मी ते इतिहासातूनच वाचले ना? या प्रश्नावर काय टिपणी करावी?
(५) संतांच्या शिकवणीने समाज दुर्बल झाला कां? अभ्यासू लोकांच्या मतांचा आढावा दिवाळीनंतर घेऊं.
(६) हुकुमशाही पद्धतीने मी कोण सांगणार ? कृपया गैरसमज करून घेऊं नयेत.तसा काहीही उद्देश नाही.
शरद

हुकुमशहा तुम्ही नाही - गैरसमज नको

जर माझ्या प्रतिसादातून तसा अर्थ निघत असेल तर दिलगीर आहे.

जर समाजात सामान्य लोक एकमेकांना "तज्ज्ञ नसल्यामुळे मतप्रदर्शन करू नये" असे सांगतील, तर त्या समाजात कोण्या हुकुमशहाकडून हुकुमशाही सुकर होईल. त्यामुळे सामान्य लोकांत असा घातक विचारप्रवाह माजू नये. म्हणून तुमच्या लेखाचा प्रतिवाद करत आहे.

घरोघरचे आप्तस्वकीय, सामान्य लोक, हे हुकुमशाहीचे (किंवा कुठल्याही तज्ज्ञपूजक स्थितिवादाचे) बिनपगारी कार्यवाहक होऊ नयेत.

"विषयातील तज्ज्ञांनी केलेले युक्तिवाद हे पुष्कळदा अधिक ठोस असतात, हे ऐकाणार्‍या-वाचणार्‍याने लक्षात ठेवावे. अन्य विषयातील तज्ज्ञांचे विचार हे अन्य सामान्य माणसांइतकेच तुलावेत. ते कधी प्रबळ सयुक्तिक असतील, कधी तितके सयुक्तिक नसतील." या मर्यादित आणि उपयोगी तत्त्वाने तुमच्या लेखातील सर्व फायदे समाजाला मिळतात. तज्ज्ञांना योग्य तो मान मिळतो, पण समाजात फाजिल भिडस्त बुजरेपणाही बोकाळत नाही. मत सांगणार्‍याच्या अधिकाराबद्दल चर्चा घसरवून युक्तिवादातून निसटायचा मार्गही आयता मिळत नाही.

तज्ञांनी आपल्या विषयांबाहेर बोलू नये असे माझे अजूनही मत आहे.

अरेरे. असे असल्यास कोणत्याही एका विषयात कोणी तज्ज्ञ का म्हणून व्हावे, हा प्रश्नच पडतो. कारण कुठल्याही विशेषज्ञ क्षेत्रापेक्षा जीवनावश्यक विषय हे खूप अधिक असतात. गणितात विशेष प्राविण्य मिळवल्यावर "खाद्यपदार्थांबद्दल, आरोग्याबद्दल, पर्यावरणाबद्दल, राजकारणाबद्दल, मनःशांतीबद्दल बोलू नये" असे होत असेल नकोच तो गणिताचा अभ्यास.

आता काय करावे? मला माझा पूर्वीचा अभ्यास परत करता येत नाही, आणि शिवाय व्यवसायही पोटापाण्यासाठी जरुरीचा आहे. अर्धे आयुष्य सरल्यामुळे साहित्यशास्त्रात अवघे आयुष्य वेचणे आता शक्यच नाही. तरी काव्याच्या रसग्रहणाबद्दल आकर्षण आहे. तरी माझ्याशी या बाबतीत संवाद साधाल अशी इच्छा आहे. तुमचे वरील वाक्य वाचल्यानंतर दुर्भिक्षातल्या भिकार्‍यासारखी इच्छा करण्यावेगळे माझ्या शक्तीत आहे तरी काय?

लागूंचे वाक्य लागू नाही

किशोरीताईंनी रिषभ बेसूर लागला असे सांगितले असेल तर मी मला गाण्यातले काहीही कळत नसले तरी मान्य करीन कारण माझ्यासमोर त्यांनी केलेली तपस्या आहे. इथेही श्री. प्रियाली यांचे म्हणणे मान्य; त्यांना डॉ. लागू पटतात

माफ करा मला लागू यांचे म्हणणे मान्य आहे असे मी म्हटलेले नाही केवळ एक उदाहरण म्हणून लागू मान्यही होऊ शकतील असे लिहिले आहे परंतु किशोरीताईंचे म्हणणे अनेकांना त्या विषयातील तज्ज्ञ असूनही पटलेले नाही हे त्या गाण्याची प्रसिद्धी पाहून म्हणता येईल.

मतप्रदर्शन.

मतप्रदर्शन.

एक अवांतर :- काही दिवसांपूर्वीच मुंबई विक्रीकर न्यायाधिकरणामध्ये चालु असलेल्या एका खटल्यात एका विशिष्ट वस्तुच्या संदर्भात 'सामाजिक उपयुक्तता' ह्याविषयी एक प्रश्न उद्भवला. त्याच वेळी श्री. वसुलि ह्यांची 'मूर्तिपूजा म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे का' ही चर्चा येथे उपक्रमावर जोरात चाललेली होती. त्याचा विचार करता करता 'मूर्तिपूजेच्या' प्रश्नाशी 'सामाजिक उपयुक्ततेची' सांगड घालता येईल असा विचार करून 'सामाजिक उपयुक्तता' ह्याविषयीचे घोडे पुढे दामटण्यासाठी आणि त्यावर लवकरांत लवकर उत्स्फूर्त मते मागविण्यासाठी येथे 'भाग दोन' आरंभिला. असे करताना मूळ खटल्यातील प्रश्न येवू न देण्याची खटपट केल्यामुळे 'भाग दोन' फसला हा एक भाग, तर तो प्रश्न ज्या दिवशी मांडला त्याच्या दुसर्‍या दिवशीच माझा प्रश्न परस्पर सुटल्यामुळे माझा त्या चर्चेतील रस संपून मी चर्चेतून अंग काढून घेतले हा दुसरा भाग. तरीही त्या चर्चेत मांडण्यात आलेल्या काही परस्परविरोधी मतांचा मला स्वतःला छान उपयोग होतो आहे. ;-)

ह्या कारणाकरिता तरी प्रत्येकाने मतप्रदर्शन केलेच पाहिजे असा माझा आग्रह आहे. ते मत अभ्यासपूर्ण आहे की नाही हा भाग निराळा; कोणते मत अभ्यासपूर्ण आहे, कोणत्या मताचा विचार करता येईल ते पाहणे हे अभ्यासकाचे काम होय. मत मांडणार्‍याने ते खुशाल मांडत सुटावे. ;-)

ह्याबाबतीत माझे वैयक्तिक मत असे :- आपल्या मतांस काही मूल्य आहे असा विश्वास असणारे लोक आपली मते जेथे त्यांची कदर होईल अशा योग्य त्या ठिकाणीच मांडतात असे माझे एक निरिक्षण आहे. अभ्यासपूर्ण मते ही शक्यतो कुठेही - कशीही - कधीही - कशाहीसाठी मांडली जातच नसावीत. माझा स्वतःचा ह्या गोष्टीस विरोध आहे. स्वत:च्या अभ्यासाच्या विषयात मी विनामूल्य सल्ला कदापि देणार नाही, परंतु आवश्यक तेथे विनामूल्य मत मात्र अवश्य नोंदवेन. अर्थात हे केवळ ज्या गोष्टीत माझा अभ्यास आहे त्या गोष्टींस लागू आहे, कारण छायाचित्र-तर्कक्रीडा इत्यादि विषयांमध्ये मी माझी मते मांडण्याचा मोह झाला तरी शक्यतो मांडित नाही.

एक अति अवांतर :- ह्या प्रतिसादास वाचून माझ्या पुढील चर्चाप्रस्तावास प्रतिसादच येणार नाहीत अशी एक भीति वाटते आहे. तेंव्हा आपल्याच प्रचलित भाषेत एक सांगतो, ह.घ्या.!!!!! ;-)

धन्यवाद.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

श्री हैयैयो हलके घ्या

ह्या प्रतिसादास वाचून माझ्या पुढील चर्चाप्रस्तावास प्रतिसादच येणार नाहीत अशी एक भीति वाटते आहे. हे होऊ शकेल त्यातील एक कारण असे असू शकेलः कोणते मत अभ्यासपूर्ण आहे, कोणत्या मताचा विचार करता येईल ते पाहणे हे अभ्यासकाचे काम होय.

तरीही!

तरीही!

हे होऊ शकेल त्यातील एक कारण असे असू शकेलः कोणते मत अभ्यासपूर्ण आहे, कोणत्या मताचा विचार करता येईल ते पाहणे हे अभ्यासकाचे काम होय.

ह्यास भिवून एखाद्या व्यक्तीने स्वतःस मतप्रदर्शन करणेपासूनच रोखले, तर भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीस प्रदान केलेल्या स्वतंत्र मत बाळगण्याच्या अधिकाराचा घात होईल!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

खरे आहे.

काही सदस्य भारतीय राज्यघटनेच्या कक्षेबाहेरच्या विधीव्यवस्थेत असू शकतील अशी अपवादात्मक शक्यता नोंदवून सहमती दर्शवितो.

मतप्रदर्शन - २.

मतप्रदर्शन - २.

श्री. शरद सर ह्यांनी सुचविलेले मुद्दे रास्त असूनही केवळ त्यांच्या मांडणीमुळे सदस्यांमध्ये थोडी चित्तभ्रांति झाली असावी, परंतु मूळ मुद्दा मात्र चूक नाही असे माझे एकूण वैयक्तिक मत आहे. माझ्या मते, आणि बहुधा श्री. शरद सरांच्याही मते, कोणत्याही अभ्यासकाने मूळ विषयाचाच घात होणार नाही अशाप्रकारे मतप्रदर्शन करावे. ज्या ज्या राज्यव्यवस्थांनी व्यक्तीस मतस्वातंत्र्याधिकार प्रदान केलेला आहे, त्या त्या राज्यव्यवस्था बहुधा त्या मतस्वातंत्र्याधिकारास अंशतः प्रतिबंधित करणांरे काही नियम करित असतांत; त्या नियमांमधील एक मुख्य नियम असा की आपल्या मतप्रदर्शनामुळे समाजामध्ये सावळागोंधळ माजणार नाही ह्याची काळजी घेतली जावूनच मतप्रदर्शन केले जावे. असो. मूळ चर्चाप्रस्तावामधून मला आकलन झालेला मूळ मुद्दा मी अशाप्रकारे मांडू इच्छितो :-

  1. खरे अभ्यासक हे ज्या विषयातले त्यांना काहीही कळत नाही अशा दुसर्‍या विषयांवर काही मतप्रदर्शन करतांना शक्यतो त्यांच्या मतांवर उलटसुलट प्रतिक्रिया उद्भवून मूळ विषयाचाच घात होऊ नये अशी अत्यंत काळजी घेत असतांना दिसतात. असे अभ्यासक बहुधा आपला त्या विषयाचा अभ्यास अधिक व्हावा ह्या सद्हेतुने विचारप्रदर्शन करित असतांत. मतप्रदर्शनाचा मूळ गाभा हा ह्याप्रकारे अभ्यासाशी संबंधीत असेल तर अशी मते अभ्यासासही गतिदायक असतांत.
  2. इतर काही अभ्यासक, ते मात्र आपल्या एकाद्या विषयावरील मतांना समाजाकडून मिळालेले मूल्य विचारांत घेवून त्याचा करता येणारा उपयोग ध्यानात घेवून आपल्याच क्षेत्रातील अथवा इतर क्षेत्रातील आपल्या मतांना प्रामाण्य मिळावे ह्यासाठी खटाटोप करित असतात. असे करतांना मूळ विषयाचाच घात झाला तरीही त्यांना काही अंतर पडणार नसते, कारण मूळ विषयाची उपस्थितीच त्यांस सलत असते. अशी मते ही मुख्यतः ईर्ष्या, अहंकार, आत्मप्रौढी ह्या आणि तत्सम गुणांमधून आलेली असू असतात. कमी अभ्यासातूनही आलेली असू शकतात, परंतु अधिक अभ्यास करा असे सुचविले आणि त्या ठिकाणी त्यांचा अहंकार आड येत असेल, तर सुज्ञानींनी काय ते ओळखावे. अशी मते शक्यतो अभ्यासास गतिदायक नसावीत.

दुसर्‍या प्रकारात मोडणार्‍या मतांच्याकडे काही सुज्ञानी लोक दुर्लक्ष करतात. इतर काही लोक मात्र त्यांवर तुटून पडतात. अधल्यामधल्या काही लोकांस मात्र मधेच एखादी वादग्रस्त पिंक टाकून ह्या साठमारीतली गंमत बघण्यातच खरा रस असतो!

काही लोक तर ही ’गंमत’ बघण्यासाठीच 'गंमतीशीर मतप्रदर्शन' करित असतांत!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

हम्म!

पण "नाम" सोपे आहे असे तरी कोण म्हणतो ? तेथेही एक मोठा अडथळा आहे. सगळ्यांनी एकमताने सांगितले आहे कीं त्याकरता ’भाव’ पाहिजे,’श्रद्धा’ पाहिजे. सोपे नाही. देवळाबाहेरच्या खेटरावर लक्ष असेल तर विठ्ठल जपाचा उपयोग नाही. ’नामाची’ हेटाळणी करताना हे विसरून चालणार नाही.

दाखवा दोन वायू. असे म्हटले तर तुम्ही म्हणणार "किमान दहावी पर्यंत रसायन शास्त्र शिका, दोन्ही वायूंचे सिलेंडर आणा, मग दाखवतो पाणी तयार करून !" हे ठीक. म्हणजे साधे पाणी करावयाला दहा वर्षे अभ्यास पाहिजे.

हम्म!

शरदराव, असा वैचारिक गोंधळ बरा नाही. अहो आपण सामान्य माणसं. आपले विचार ते काय! त्यात गोंधळ उडण्यासारखं मला तरी काही वाटत नाही. वैचारिक गोंधळ वगैरे गोष्टी विचारवंतांना लागू होतात. त्यामुळे तुमच्या-माझ्यासारखे सामान्य जेव्हा मापात न बसणारा विचारवंतांचा सदरा घालू पाहतात तेव्हा असा वैचारिक गोंधळ उडू शकतो. तेव्हा त्या पासून जपा, काळजी घ्या इतकाच अनाहूत सल्ला! फार विचार करू नका म्हणजे वैचारिक गोंधळ होणार नाही. मनसोक्त खा, प्या, नाटक-सिनेमा पाहा, मनसोक्त संगीत ऐका, भरपूर झोप काढा, सर्व प्राणिमात्रांवर (विशेषत: स्त्रियांवर!) प्रेम करा, मजेत रहा -- इतकेच सांगणे!

तात्या.

--
"स्थितप्रज्ञ! हम्म! तो गधा चाल्लाय ना सडकेवरून, तसा दिसतो स्थितप्रज्ञ. जो आंब्याच्या साली आणि कागद एकाच चवीने खातो तो स्थितप्रज्ञ!"
"अरे श्याम, ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला. बाबारे, फार थोर पुस्तक आहे ते! पण आपण नाही ना तितके थोर! आपली पट्टी काळी दोन. पांढरी तीन, काळी तीन जमायची कशी?!" (इति काकाजी, नाटक - तुझे आहे तुजपाशी)

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

काहीजणांना

...इति काकाजी, नाटक - तुझे आहे तुजपाशी

काहीजणांना "तुझे आहे तुजपाशी" मधे गीता (तत्वज्ञान) दिसते तर काही जण गीता (तत्वज्ञान) वाचून "तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी" याचा नेमका अर्थ समजला असे म्हणावेसे वाटते ... ;)

 
^ वर