उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र: मिसीसिप्पी
वैद्य
October 1, 2009 - 1:42 am
जुनी चित्रे धुंडाळत असताना हे चित्र दिसले.
दिडेक वर्षापूर्वी मिसीसिप्पी नदीला पूर येउन पाणी पात्राच्या बाहेर आलं होतं. पाण्याच्या अवाढव्य विस्तारापुढे नेहमी भव्य दिसणारा पूल अगदी छोटासा दिसू लागला.
संध्याकाळ संपून रात्र पडण्याच्या म्हणजेच दिवेलागणीच्यावेळी निरभ्र आकाश, संथ पाणी आणि त्यात पडलेले पुलाचे मोहक प्रतिबिंब टिपता आले.
दुवे:
Comments
सुरेख
मला खुपच आवडले हे छायाचित्र.
मस्त
नेहमीप्रमाणेच छान चित्र
वा!!
अत्यंत सुंदर छायाचित्र!! अग्रभूमीवरील (फोरग्राऊंडला काय म्हणतात?) दगडांवरील प्रकाश विशेष आवडला.
या चित्राची एक्झिफ मिळू शकेल काय? माझ्यासारख्या शिकाऊ फोटोवाल्यांसाठी माहिती मिळालेली बरी असते.
-- येडा बांटू
झक्कास छायाचित्र
छायाचित्राची थोडी तांत्रिक माहीती देखील आमच्या (माझ्या) डोक्यात भर घालेल.
__________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥
झकास.
झकास. फक्त एक विचारायचे होते. ही मिसीसिप्पी त्या शोलेवाल्या सिप्पींपैकीच का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
छायाचित्र
छायाचित्रातील प्रकाशरचना कृत्रिम वाटते आहे. हे छायाचित्र टच अप केलेले तर नाही?
दिनदर्शिकेवर अशी कृत्रिम वाटणारी चित्रे छापलेली असतात. हे तसेच वाटते आहे. छायाचित्र वाटत नाही
चन्द्रशेखर
टच अप
माझे प्रत्येक चित्र हे मी पोस्ट प्रोसेस (टच अप) करतो. मूळ चित्राची मजा खुलवण्यासाठी पोस्ट प्रोसेसिंग करणे गरजेचे आहे असे मी मानतो आणि माझ्या माहितीतले बहुतांश छायाचित्रकार कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पोस्ट प्रोसेसिंग करतात.
छायाचित्रांचे डिजीटल अल्टरेशन्स, मनीप्युलेशन, रेस्टोरेशन हे मात्र वेगळे हे ध्यानात घ्या. ती कला वेगळी. उपक्रमावर व्ही.के नावचे सदस्य त्यात माहिर आहेत. मला त्यात तितकी गती नाही.
मागे माझ्या खरडवहीमधे मी काही उदाहरणेही दिली होती. तीच पुन्हा देतो आहे..
> इथे मी दोन पोस्ट प्रोसेसिंग केलेली चित्रे टाकत आहे. दोनही चित्रांमध्ये रेडियल ब्लर आणि मोशन ब्लर अश्या दोन वेगवेगळ्या 'चित्रे धूसर करण्याच्या' पद्धती वापरल्या आहेत.
>
> झेब्र्याच्या चित्रात एक वेगळाच परीणाम येतो त्यामूळे इतरवेळी काहीसे नेहमीचेच वाटणारे चित्र इथं एक फ्रेश लूक देते.
>
> शाळेतल्या मुलांच्या चित्रात धुसरीकरणामूळे पार्श्वभूमीतील अनावश्यक बरकावे झाकले गेले आणि चित्र पहाणार्याचे लक्ष थेट फोरग्राउंडकडे वेधले जाते.
> त्याचबरोब हे चित्र खूप एनर्जिटीक असल्याने त्याला दिलेल्या मोशन ब्लरमूळे सगळी मूले एखाद्या गोल चक्रात बसून फिरत आहेत असा एक पूरक आभास निर्माण करता आला.
>
> दोन्हीही चित्रे पोस्टप्रोसेसिंग मध्येच कृष्णधवल केली आहेत.
>
>
>
>
>
सहमत
पूर्णतः सहमत!
व्वा!!
अतिशय सुरेख छायाचित्र आहे!! खूप आवडले... बराच वेळ बघत होते :)
चंद्रशेखर म्हणतात तसं मूळ छायाचित्रावर नंतर काही काम केलंय का?
अप्रतिम!
अप्रतिम!
मुरमाच्या दगडांवर सांडलेला संधिप्रकाश चित्रात पकडून छान संधी साधली आहे ;)
प्रकाशचित्र प्रचंड आवडलं.. एकदम कोलबेर फेम :)
(संधी'साधु')ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
फारच सुंदर
रंगसंगती बहारदार आहे.
तृतीयांशांचा "नियम" कधी मोडीत काढावा, याबद्दल उत्तम उदाहरण ठरावे.
सुंदर
मिसिसिपीच्या पुलांना अनेक वेळा ओलांडले आहे. हा पुल मेम्फिसमध्ये आहे काय?
बरोबर
बरोबर.. मेंफिसच आहे.
सुंदर फोटो!
सायंकालीन रंगांची उधळण एकदम सुंदर!
(झाडांच्या डावीकडचे तीव्र प्रकाशाचे स्रोत चित्रातून वगळले तर पूल आणि त्याच्या प्रतिबिंबावर लक्ष जास्त केंद्रित करता येईल काय असे वाटले.)
चतुरंग
सुरेख फोटो
दगड आणि पाण्यावरचा संधिप्रकाश तर क्लासच. चतुरंग यांच्या सुचवणीशीही सहमत आहे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुपर्ब
अतिशय सुंदर एच्.डी.आर.प्रकाशचित्र ! झाडाभोवतीचा halo टाळता आला असता तर और बढिया होता!
आयला
आयला हे एचडीआर आहे होय!
-- येडा बांटू
एचडीआर
एच्डीआर म्हणजे काय?
चन्द्रशेखर
दुवा
इथे पहावे.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
फोटोशॉप
फोटोशॉप वापरुन एचडीआर इफेक्ट कसा द्यावा हे इथे पाहावे.
सुरेख
डेस्कटॉपवर लावावे असे चित्र. अशा वेळी १०-१२ फ्रेम निवडून प्रयोग करायला मजा येईल.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
एच्डीआर
माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. मी आधीच्या प्रतिसादात दिलेले मत कायम आहे. आपण कोणतीही प्रक्रिया न केलेले छायाचित्र बघण्यास जास्त आवडेल. हे छायाचित्र कृत्रिम वाटते आहे.
चन्द्रशेखर
मत
तुमचे मत बदलावे म्हणून माहिती दिलेली नव्हती. तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून माहिती दिली होती.
तुमच्या मताचा आदर आहेच.
प्रक्रिया
आपल्या मताचा आदर आहे. पूर्वी मलाही असेच वाटत असे. आता माझे मत बदलले आहे. छायाचित्रांवर प्रक्रिया होतेच, पूर्वी ती डार्करूममध्ये अंडर-ओव्हर एक्सपोझर करून होत असे. आता डिजीटल तंत्रज्ञानामुळे सोपी झाली आहे. माझे मत बदलण्यास ही चर्चा कारणीभूत ठरली.
एक वेगळे उदाहरण इथे. इन्फ्रा-रेडमध्ये काढलेली छायाचित्रे. म्हटले तर कृत्रिम कारण आपल्या डोळ्यांना असे दिसणे कधीच शक्य नाही.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
वा वा वा!
एकदम कोलबेर फेम आहे या ऋषिकेशच्या मताशी सहमत....
आसमंतातली ही सायंकालीन रंग उधळण आवडली.
कोलबेर, मात्र आपल्या कॅमेर्याच्या सेन्सरवर धुलिकण (डस्ट पार्टिकल) चिकटला आहे असे वाटते. पुलाच्या रोषणाईच्या वरच, थोडे उजव्या बाजूला आकाशात एक आगंतुक ठिपका दिसतो आहे. सेन्सर क्लिनिंगने हा धुलिकण सहज निघून जाईल असे वाटते.
==================
क्लास..
चित्र क्लासच आहे!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!