छायाचित्रे आणि इमेज प्रोसेसिंग

परवा आंतरजालावर भटकताना एका अमेरिकन अनुदिनीत उत्कृष्ट छायाचित्रे बघायला मिळाली. नंतर कळाले की छायाचित्रकाराने फोटोशॉप वापरून इमेज प्रोसेसिंग केले आहे. हे कळाल्यावर मला थोडे फसवणूक झाल्यासारखे वाटले. पण मग विचार आला की छायाचित्र काढताना क्यामेर्‍याच्या एक्स्पोझर/शटर स्पीड वगैरेंशी खेळणे हे ही एका प्रकारचे इमेज प्रोसेसिंगच आहे. मग ते फोटोशॉपने केले तर त्यात गैर काय? की यामध्ये काही मर्यादा आहेत? म्हणजे जोपर्यंत तुम्ही आकाश निळ्याचे लाल करत नाही तोपर्यंत चालेल वगैरे. (कारण फोटोशॉपने तुम्ही छायाचित्रातील जवळजवळ सर्वच बदलू शकता.) माझी एक मैत्रिण उत्कृष्ट छायाचित्रे काढते आणि तिचा नियम म्हणजे ती कुठलेही इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर वापरत नाही.

तुम्हाला काय वाटते? इमेज प्रोसेसिंग केलेली छायाचित्रे बघताना तुम्हाला तितकाच आनंद मिळतो का?

लेखनविषय: दुवे:

Comments

छाया...

छायेचा खेळ दाखवणारी छायाचित्रे काढणे हि एक कला आहे. पण या सोबत आजच्या घडीला हिच चित्रे आणखीन सुंदर बनवणे हि सुद्धा कलाच आहे. मला अर्थातच मुख्यचित्र ज्यावरून सुधारीत छायाचित्र बनवले आहे ती आवडतात. त्यामागे शब्द नसलेली एक कथा आहे असे वाटून जाते.

उपक्रमावर कोणी पट्टीचा छायाचित्रकार असेल तर छायाचित्रणावर अभ्यासपूर्ण लेखमालिका यावी असे वाटते. :) आणि एखादा समुदाय देखील बनायला हरकत नसावी.





सहमत

आणि एखादा समुदाय देखील बनायला हरकत नसावी.
चर्चाविषय देताना माझ्या मनात अगदी हाच विचार आला होता. आणि बरेच उपक्रमी सुंदर छायाचित्रकारही आहेत असे माहितगार सूत्रांकडून कळते. :-) तेव्हा समुदाय बनायला काहीच हरकत नसावी.

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

चांगली कल्पना

मूळ विषय आवडला. तसेच चाणक्यांनी आणि तुम्ही मांडलेली कल्पना पण आवडली.

फोटॉशॉप मी कधी वापरलेले नाही पण जींप हे मुक्तस्त्रोतातील सॉफ्टवेअर वापरले आहे. केवळ उत्सुकता म्हणून

+१ सहमत

कलात्मक चित्रांत काही वर्ज्य नाही. सुंदर वस्तू घडवण्यास जे काही उपयोगी आहे, ते-ते वापरावे.

(टीप १: शाळेतील स्पर्धांबाबत मात्र काटेकोर नियम असावेत. म्हणजे स्पर्धकांत समानपातळी राहील.)
(टीप २: वर्तमानपत्रातील कलात्मक नसून वार्तात्मक चित्रांबाबत अनेक प्रसारमाध्यमांनी आपले धोरण दिलेले असते. याचे कारण की येथे कला असल्यास (महत्त्वाची असली तरी) गौण असते. कला असते तथ्यातील तपशील खुलवून दाखवण्यासाठी. तथ्याशी विसंगत चित्र नसावे, हे सर्वतोपरी आवश्यक. "खुलवणे" कधी संपते, आणि "विसंगती" कधी सुरू होते, ही बाब कृष्णधवल नसून राखी-करडी आहे. त्यामुळे विचारपूर्वक, आक्रसताळी-नसलेली, तरी काटेकोर धोरणे लागतात.)

प्रोसेसिंग

बरीचशी छायाचित्रे प्रोसेस्ड असतात हे खरेच. पण आजकाल आपल्या आजूबाजूच्या बहुतेक सर्वच गोष्टी प्रोसेस्ड असतात. क्वचित खडतर वास्तवाला सुसह्य करण्याचा प्रयत्न म्हणता येईल. पण याचा अतिरेक होऊन वास्तव काय आहे याची जाणीव बोथट होऊन जाईल असे वाटते. कालांतराने अश्या प्रोसेस्ड जगात राहून आपल्याला खरे काय याचा विसर पडेल असे वाटते. (सत्य म्हणजे काय? च्या वाटेवर जाणारा विचार :)

माझे मत

प्रकाशचित्रण करताना प्रकाश योजना (कृत्रीम अथवा नैसर्गीक) आणि पात्रयोजना यावर भर असतो.
१. नैसर्गीक रंग-प्रकाश योग्य तर्‍हेने चित्रफितीवर यावा म्हणून चित्रण करताना शटर-ऍपरचर नियंत्रण करतात.
२.कृष्णधवल प्रिंटींग मध्ये डोजींग-बर्नींग (चित्राचा काही भाग प्रक्रिया करताना जास्त वेळ प्रकाशात ठेवणे इत्यादी) करुन चित्र सुधारतातच.
३.रंगीत चित्र छापताना सुद्धा सर्व रंग योग्य झाले की नाही ते डेवलपर-प्रोसेसर (रसायन), प्रिंट करतानाचा एक्स्पोजर वेळ, तपमान याने नियंत्रित करतात.
पण वरील सर्व प्रकार हे दृष्य जसे दिसते आहे तसे च्या तसे प्रिंटवर यावे यासाठी केलेली धडपड आहे. यामध्ये कुशल प्रिंटर अवास्तव रंग-प्रकाश येवू नयेत अशीच काळजी घेतो आणि एका फोटोचा प्रिंट चांगला यावा यासाठी तास-तास मेहनत घेतो.

आता वरील सर्व कामे डिजीटल चित्रांबाबत काही अंशी संगणकावर केली जावू शकतात. आपल्या मॉनिटरचे रंग आणि प्रक्रियेतून (कलर प्रोसेसिंग) कागदावर येणारे रंग थोडे फार आपण जूळवलेत (किंवा अंदाज घेतला ) तर पाहिजे तसे रंग संगणकावर आणून मग प्रत्यक्ष प्रिंटींगच्या वेळेची थोडीशी बचत होते. तसेच फोटोमधले कंपोजीशन थोडे-फार बदलायचे असेल तर ते पूर्वी प्रिटींग करताना बदलावे लागे ते आता संगणकावर आपले चित्र कापून बदलता येते.

बाकी सर्व कागद, रसायनांचे मिश्रण, त्यांचे तपमान आणि इतर अनेक बाजूंबवर आपले चित्र कसे दिसेल ते अवलंबून असते.
थोडक्यात चित्र वास्तवदर्शी दिसावे यासाठी प्रयत्न करायचे असतील तर संगणक मदत करतो. थोडा वेळ वाचवतो. तर त्याची मदत घ्यावीच. असे माझे मत.

काल्पनिक चित्र बनवण्यासाठी सुधा याचा उपयोग होतोच. तशी गरज असल्यास तसे सुद्धा करावे की. पण जसे चित्राच्या खाली आपण शटरस्पीड-ऍपरचर-लेन्स यांचे वरण लिहितो तसे हे सुद्धा नमूद करावे.
उदा. नदी आहे, त्यावर पूल आहे, त्यावरुन आगगाडी जाते आहे वर आकाशात विमान आहे, वैमानिक मोठा गॉगल लावून खाली पाहत आहे, नदीकाठी एक राजवाडा आहे, त्याच्या मकमानीवर वेलकम असा बोर्ड आहे, समोर बाग आहे, बागेत कृष्ण बासरी वाजवतो आहे आणि राधाबाला मुग्ध होवून आगगाडीकडे पाहत आहे.... :) (पानवाला-पुल)

--लिखाळ.

दुवे

माझा एक मित्र भालचंद्र (हा ही उत्तम छायाचित्रकार आहे) याला ह्या चर्चेचा दुवा पाठवल्यावर त्याने हा दुवा पाठवला. यावरील लेख विचार करण्यासारखा आहे.

टीप : चर्चेला आलेले प्रतिसाद पाहून आनंद झाला, माझिया जातीचे भेटल्याचा. :-)
सविस्तर प्रतिसाद नंतर देतोच, दरम्यान प्रकाशचित्रांची एक उत्तम अनुदिनी इथे.

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

समुदाय, लेखमाला +१.. माझं मत

समुदायासाठी +१
लेखमाला हवी +१ :)

बाकी मलातरी प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचा खूप उपयोग होतो. बर्‍याचदा घाईत काढलेला सुंदर फोटो अचानक आलेल्या नको त्या प्रकाशझोतामुळे खराब होतो / थोडा हलतो. पुन्हा तो क्षण आणणं केवळ अशक्य. एके काळी अश्या वेळी काहिच करता येत नसे. पण जर तो सुंदर क्षण प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचा उपयोग करून सगळ्यांनाच आनंद देणार असेल तर काय हरकत आहे?

राजेंद्र म्हणतात त्या प्रमाणे आकाश निळ्याचे लाल करणे काहींना खटकेल पण मुळ चित्र जे होतं ते दाखवत नसेल तर मुळ परिस्थिती दाखवण्याला मदत करणार्‍या सॉफ्टवेअर ला ना नसावी

-ऋषिकेश

फोटोग्राफी

माझ्या मते फोटोग्राफी हे आता उपभोक्ता सुलभ तंत्रकुशल बाब आहे. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर. छायाचित्राऐवजी 'प्रकाशचित्र' हा शब्द जास्त योग्य वाटतो.
प्रकाश घाटपांडे

आवडता विषय

वा! आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय.
ह्या विषयी खूप उलट सुलट मते ऐकायला/वाचायला मिळतात. काहींच्या मते चित्र जसे च्या तसे सादर केले पाहिजे. साधे क्रॉपींग केले जरी तरी ते चित्र भ्रष्ट झाले. तर काहींच्या मते चित्रात कसलेही फेरबदल करा शेवटी चित्र कसे दिसते ते महत्वाचे.

माझे मत ह्या विषयी धनंजय सारखेच् आहे. अंतिम चित्र कसे दिसते ह्याला महत्व. (ह्या चित्रावर सोपस्कार झाले आहेत इतके नमूद करा म्हणाजे झाले) अगदी आकाश निळ्याचे हिरवे केले तरी चालेल. कारण हे करण्यास देखिल खूप कला लागते. वाटते तितके हे इमेज प्रोसेसिंग सोपे नसते.आणि त्यातुनही ते चित्रात चपखल बसणे महत्वाचे.

काही इंडोनेशियन प्रकाश चित्रकार हे फारच प्रोसेसींग फारंच छान करतात. उदा इथली चित्रे बघा. अप्रतिम चित्रे आहेत. पण जवळपास सगळीच फोटॉशॉप मध्ये मॅन्युपुलेशन केलेली आहेत. पण इतके सुंदर प्रोसेसींग करुन कुणीही दाखवावे त्याची तारिफच होईल.

आणखी एक मुद्दा ऋषीकेश ह्यांनी मांडलेला, बर्‍याचदा हे प्रोसेसींग चित्र अधिक सुंदर करण्यापेक्शा त्यातल्या त्रुटी झाकण्यासाठी केले जाते. त्यावर सहसा कोणाचाच आक्षेप नसतो.

बर्‍याचदा कसलेही (पोस्ट) प्रोसेसींग न करता वेगवेगळे फिल्टर्स वापरुन देखिल हे करता येते.. तसेच शटर स्पीड अतिशय स्लो करुन लाईट पेंटींग पण करता येते (जे आपल्या डोळ्यांना कधीच दिसत नसल्याने अनैसर्गिक वाटते पण चित्राचे ऍस्थेटीक्स वाढवते)

ह्यावर चर्चा सुरु केल्याबद्दल राजेंद्ररावांचे आभार!

-कोलबेर

अवांतर : मी 'छायाचित्रण' हा समुदाय सुरू केला होता. त्याचे उद्घाटन मी एक चित्र टाकुन केले होते.. पण त्याखाली व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा असे लिहिल्याने इथल्या धोरणात ते बसले नाही. ;)

चांगली कल्पना

आणि चित्रे फारच सुरेख बघायला मिळाली. माझ्या वडिलांनी त्यांच्याकडील जुन्या कॅमेर्‍याने अत्यंत सुरेख प्रकाशचित्रे काढली आहेत (काळी पांढरी). इमेज प्रोसेसिंगचा अजिबात काळ नसताना. ती चित्रे अजूनही पहायला आवडतात. तरी आताच्या काळात इमेज प्रोसेसिंग करून जर चित्रातील एखादा भाग खुलवता आला तर काही चुकीचे नाही असे आपले माझे मत. प्रकाश, शटर स्पीड, चौकट, इत्यादीचे भान ठेवून चांगली चित्रे काढणे हे सर्वांनाच जमते असे नाही, (मला तर नाही).. त्यामुळे थोडेफार प्रोसेसिंग केले तर हरकत नाही, पण त्या तंत्राने चित्रातील मूळ गोडी/ चित्रकाराचे कौशल्य हरवू नये असे वाटते.

समुदायाची कल्पना छान. लवकरच एखाद्या लेखाने अशा समुदायाची सुरूवात जरूर करा असे आवाहन.

सहमत

चित्रा यांचे मताशी पुर्णत: सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

एच डी आर

'हाय डायनॅमिक रेन्ज' हा फोटोग्राफीचा प्रकार फोटोशॉपमुळे शक्य होतोय.
ही प्रकाशचित्रे पाहताना दृष्टीपलिकडले काही पाहिल्यासारखे वाटते.

अधिक माहितीसाठी हे दुवे क्र. आणि

एचडीआर विरोधी विचारांबद्दल ही चर्चा.

आभार

उस्फूर्त प्रतिसादांबद्दल सर्वांचे अनेक आभार. चर्चा वाचून माझे मत बदलले आहे. फोटोशॉप वापरून चित्र अधिक सुंदर करायलाही कौशल्य लागते हे चाणक्य यांचे मत पटले. (विकास म्हणतात ते जिंप मीही गंमत म्हणून वापरले आहे. फोटोशॉपमध्ये बहुधा अधिक पर्याय असावेत. चूभूद्याघ्या) फक्त असे चित्र दाखवताना यावर प्रक्रिया केली आहे असा उल्लेख हवा. हा एवढ्याचसाठी की चित्रात दाखवलेली संध्याकाळ तशीच खरी होती किंवा कसे हे लक्षात यावे*. कोलबेरराव आणि विसुनाना यांनी दिलेली चित्रे पाहिली तर त्यात एक प्रकारचे सरिअल वातावरण असल्याचे भासते. असाच अनुभव उत्कृष्ट विशेष परिणाम असलेले चित्रपट बघतानाही येतो उदा. लॉर्ड ऑफ द रिंग्ज किंवा सिन सिटी. विसुनानांचे दुवेही खूपच माहितीपूर्ण आहेत. शिवाय लिखाळ, चित्रा, ऋषिकेश यांनी म्हटल्याप्रमाणे बरेचदा चित्र वाचवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. कारण ती परिस्थिती परत येणे काही वेळा अशक्य असते. यावर लिखाळ यांचे विश्लेषण सुरेख आहे. आता हे किती केले म्हणजे ठीक यावर धनंजय म्हणतात त्याप्रमाणे काटेकोर धोरण प्रत्येकाचे प्रत्येकाने ठरवायला हवे. बहुधा नवीन यांचे मत प्रोसेसिंगच्या बाजूने नाही. कोलबेरराव म्हणतात त्याप्रमाणे यावर अनेक मते आहेत, तेव्हा जो जे वांछील.. असे म्हणायला हरकत नसावी.

चर्चेचा दुसरा सुंदर परिणाम म्हणजे समान आवड असलेले उपक्रमी एकत्र आले तर या निमित्ताने विचार, दुवे, कल्पना, क्यामेरा, लेन्स वगैरे बद्दलची तांत्रिक माहिती, डिजीटल क्यामेर्‍यांच्या जगातील लेटेष्ट घडामोडी अशी बरीच देवाणघेवाण करता येईल. माझे काही मित्र उत्तम प्रकाशचित्रे (हा सुरेख शब्द सुचवल्याबद्दल घाटपांडेसाहेबांचे आभार!) काढतात पण उपक्रमी नाहीत. अशा प्रकारच्या चर्चा/लेख त्यांना इथे आकर्षित करू शकतील.

*भयाण अवांतर : इथे अंदाज अपना अपना मधला सलमानचा डायलॉक आठवला, " मै स्विट्झरलँड अक्सर जाते रहता हूं. मुझे वहांकी शाम बहोत पसंद है." :-)

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

तसेच

फोटोशॉप हे अतिशय पॉवरफुल साधन आहे. आणि त्यात शिकण्यासारखेही बरेच आहे. (फोटोशॉप इन् अ क्लासरूम हे पुस्तक चांगले आहे.)
-------
मात्र जे रंग तुम्ही पाहता तेच रंग इतर लोक त्याच छटेने पाहत नसतात हे सत्य आहे. म्हणजे प्रत्य्काचे डोळे हे वेग-वेगळ्याप्रकारे रंगांना कॅलिब्रेटेड असतात.

म्हणजे तुम्हाला आवडलेली क्रिमझन रेड ची छटा ही समोरच्या व्यक्तीला तुम्हाला दिसते आहे तशीच दिसत नसते. यामुलेच रंगांना क्रमांक आले.

या शिवाय, आपल्या मॉनिटरचा कलर बॅलन्स महत्वाचा. प्रत्येक कंपनीचा मॉनिटर वेगळा रिझल्ट देतो असा माझा अनुभव आहे. म्हणजे तेच चित्र प्रत्येक वेगळ्या मॉनिटर वर वेगळे दिसु शकते. (अगदी निळ्याचे लाल दिसत नाही पण छटांमध्ये फरक असतो.) - याचा फोर् कलर ऑफसेट प्रिंटींगमध्ये काही वेळा त्रास होवू शकतो. त्यामुळे मॉनिटर फोटोशॉप अथवा तत्सम सॉफ्टवेयरला कॅलिब्रेट करून घेणे उत्तम. घरीच प्रिंटींग करणार असाल तर तुमचा प्रिंटरही कॅलिब्रेट असणे महत्वाचे आहे.

म्हणजे थोडक्यात डिजिटल (मराठी शब्द?)मूळ प्रतिमा म्हणजे काय हाच एक प्रश्न आहे.
(काही अंशी सोडवण्याचा प्रयत्नही झाला आहे पण वाद आहेत.)

आशा आहे माहितीचा उपयोग होईल.

-निनाद

धन्यवाद

माहितीबद्दल आभार. सध्या बरेच लोक प्रकाशचित्र काढून लगेच फ्लिकर वगैरेवर लावतात, आधीसारखे फोटो छापण्याच्या भानगडीत विशेष पडत नाहीत. असा परिस्थितीत वरचे मुद्दे महत्वपूर्ण ठरतात. हल्ली प्रकाशचित्रे ठाकठीक करण्यासाठी आंतरजालावरही सुविधा उपलब्ध आहेत (बहुधा फुकट नाहीत, पण यात पिंपल्स किंवा डोळ्यांखालची वर्तुळेही नाहीशी होऊ शकतात! अर्थात प्रकाशचित्रांमध्ये असे करून नेमके काय साध्य होणार आहे याचा उलगडा झाला नाही.)

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

मॉनिटर

प्रत्येक कंपनीचा मॉनिटर वेगळा रिझल्ट देतो असा माझा अनुभव आहे. म्हणजे तेच चित्र प्रत्येक वेगळ्या मॉनिटर वर वेगळे दिसु शकते.

हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. त्यामुळे प्रोसेसिंग करताना चुका होतात.

माझ्या मते छायाचित्रामध्ये इलेक्ट्रिक तारा, डांब वगैरे अनावश्यक गोष्टी येत् असतील तर् त्या काढून टाकायला हरकत नाही. पण चित्राचे मूळ रंग बदलणे योग्य नव्हे.

अवांतरः

खरंतर डिजिटल कॅमेरा मानवी डोळ्याला दिसते तसे चित्र न दाखवता खरोखर् असते तसे चित्र दाखवतो. त्यामुळे कधीकधी डोळ्यांना सुखद वाटणारा सुर्योदय किंवा सुर्यास्त कॅमेर्‍यातून वेगळा दिसू शकतो. मानवी मेंदू हा एक प्रोसेसर आहे. आपण बघतो त्या प्रत्येक दृष्याचे मेंदूने प्रोसेसिंग केलेले असते. त्यामुळे सभोवताली दिसणार्‍या सृष्टीतील सूर्याची अनावश्यक किरणे किंवा रंग आपल्याला दिसत नाही. कॅमेरा असले काही शक्यतो करत नाही.

अभिजित...

मेंदूचे प्रोसेसिंग

>> आपण बघतो त्या प्रत्येक दृष्याचे मेंदूने प्रोसेसिंग केलेले असते.

लाख रूपये की बात. दृश्याचेच नाही प्रत्येक संवेदनेचे.

अवांतर - scene, spectacle या अर्थी वापरला जाणारा शब्द 'दृश्य' असा आहे. 'नेहमी चुकणारे शब्द' मध्ये समाविष्ट करायला हरकत नाही.

पोस्ट प्रोसेसिंग

इथे मी दोन पोस्ट प्रोसेसिंग केलेली चित्रे टाकत आहे. दोनही चित्रांमध्ये 'रेडियल ब्लर' आणि 'मोशन ब्लर' अश्या दोन वेगवेगळ्या 'चित्रे धूसर करण्याच्या' पद्धती वापरल्या आहेत.

झेब्र्याच्या चित्रात एक वेगळाच परीणाम येतो त्यामूळे इतरवेळी काहीसे नेहमीचेच वाटणारे चित्र इथं एक फ्रेश लूक देते.

शाळेतल्या मुलांच्या चित्रात धुसरीकरणामूळे पार्श्वभूमीतील अनावश्यक बरकावे झाकले गेले आणि चित्र पहाणार्‍याचे लक्ष थेट फोरग्राउंडकडे वेधले जाते.
त्याचबरोब हे चित्र खूप एनर्जिटीक असल्याने त्याला दिलेल्या मोशन ब्लरमूळे सगळी मूले एखाद्या गोल चक्रात बसून फिरत आहेत असा एक पूरक आभास निर्माण करता आला.

दोन्हीही चित्रे पोस्टप्रोसेसिंग मध्येच कृष्णधवल केली आहेत.

सुंदर प्रकाशचित्र

झेब्रा चे हे फरकाटे किती सुंदर दिसतात. मी वहीवर नाव ,वर्ग, इयत्ता, शाळा/महाविद्यालय वगैरे मजकूर लिहून त्याभोवती टाईमपास (ड्रायक्लिनिंग) म्हणुन काढलेल्या अंगावरच्या मळकुट्या कडेने ठेवून त्यावर उलटे बोट ठेवून नखाच्या सहाय्याने फरकाटे मारत एक चांगली नक्षी तयार होत असे. (अगदी सुर्याची किरणे काढल्या सारखा) आता काही लोक याकडे (माझ्याकडे) 'घाणेरडा' म्हणून पहात असत. मी मात्र याकडे 'कचर्‍यातून कलानिर्मिती ' म्हणून पहात असे. पार्वतीच्या मळातुन् निर्माण झालेला गणपती हा दाखला मी 'पुरावा' म्हणुन देत असे.
प्रकाश घाटपांडे

मुलांचे चित्र

पुन्हा देतो आहे..

शिरसाष्टांग नमस्कार

कोलबेराव,

तुमच्या प्रकाशचित्रप्रतिभेला शिरसाष्टांग नमस्कार!!!
तांत्रिक लेख वेळात वेळ काढून लिहा हो प्लिज

-ऋषिकेश

धन्यवाद

ऋषीकेशराव आणि प्रकाश अंकल, :)
सध्या जरा कामाचा लोड वाढला आहे..(मध्ये कमी होता तेव्हा (सर्किट रावांच्या भाषेत) नुसताच मोकाट फिरण्यात वेळ घालवला :))..
तरीही सवड काढून लिहायचे नक्की ठरवले आहे. प्रोत्साहना बद्दल दोघांचेही आभार!

फोटो पाहिला होता,

आवडला म्हणून सांगायला उशीर झाला.
मुलांचा फोटो छानच. हा क्षण सुरेख टिपला आहे.

असेच

असेच म्हणतो. मुलांचा फोटो फारच सुंदर


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

ऋषिकेशच्या प्रतिसादाशी सहमत.
लेखाची आतुरतेने वाट पहातो आहे.





सुंदर

कोलबेरराव,
दोन्ही चित्रे अप्रतिम. प्रोसेसिंग केल्याने काय काय करता येते याचे उत्तम उदाहरण!
----
"सब चीज टाइम टू टाइम होनी चाहिये"

फोटोशॉप

शरद
फोटोशॉप बद्दल थोडेसे .......
मी गेली कांही वर्षे फोटोशॉप पुढील कारणांसाठी वापरत आहे.
१] जुने फोटो दुरुस्त करावयाला. प्रत्येक घरात ५०-६० वर्षांपूर्वीचे किंवा त्या आधीचेही फोटो असतात.हे सर्व जीर्ण,पिवळ्या रंगाचे,भेगा पडलेले,डाग पडलेले असेच असतात.फोटोशॉपवर साधारणत: अर्ध्या-एक तासांत त्यांचे रुपांतरएकदम नव्या फोटोत होते. यांत कुणालाही फसावयाचा संबंध नाही.सत्तर वर्षांपूर्वीची माझी मावशी मी पाहिलेली नाही
पण त्या वेळी काढलेले सुन्दर प्रकाशचित्र आज सुस्थीतीत मला पहावयास मिळते.
२]कित्येक वेळी फोटो काढतांना अनेक गोष्टी आपल्या हातांत नसतात.विशेषत: समारंभांत काढ्लेल्या फोटोंत नकोअसलेले हात-पाय-डोकी टाळणॆ अवघडच असते.तेथे आपले डोके गरम करून घेण्यापेक्षा नंतर सावकाश त्यांनाकाढून टाकणे जास्त सोयिस्कर नव्हे काय?
३] वाईला अनेक वाड्यांमध्ये भींतींवर काढलेली सुरेख चित्रे आहेत;,पण दुरावस्थेत.
restoration[मराठी प्रतिशब्द ?]विसराच,पण काही दिवसांतच ती चित्रे व वाडे कायमचीच नाहीशी होणार. वैयक्तिक समाधानासाठी त्या चित्रांची छायाचित्रे मी फोटोशॉपवर नीटनेटकी करू शकतो
४] फोटोशॉपचा उपयोग चित्रे काढण्यासाठी . शाळेंत चित्रकलेंत मला कायमचेच १० पैकी ३ गुण मिळावयाचे. पण आता१००० ब्रश,१६०००० रंग.पाहिजे तेव्हढा कागद,केंव्हाही, कुठेही कसेही पुसावयाला परवानगी, इत्यादीमुळे मी भरपूर वेळचित्र काढण्यात घालवतो. परत हे सर्व चकट्फू. पाहिजे तेंव्हा , पाहिजे त्या आकाराचा प्रिंट काढावा, नाहींतर लाल फूली.
शरद

.

फोटोशॉप बद्दल थोडेस

आपला प्रतिसाद आवडला...
आपण फोटोशॉप वापरता. या वापरा बद्दल एखादा लेख या समुदायासाठी लिहिलात तर उपक्रमींना आनंद होइल. तसेच आपला पहिला मुद्दा हा एका एखाचा विषय होऊ शकेल :)





फोटोशॉपबद्दल परत थोडेसे

शरद
फोटोशॉपबद्दल परत थोडेसे .
फोटोशॉप ज्यांनी अजून वापरलेले नाही त्यांच्यासाठी ...
वापारवयास सोपे असलेले एक सॉफ्टवेअर .छायाचित्रण करणाऱ्याने म्हणजे जवळजवळ प्रत्येकाने याची माहिती करून घ्यावी.
याचा मुख्य उपयोग छायाचित्र सुधारण्याकरिता असला तरी चित्रे[paintings] काढण्यासाठी व आलंकारिक लिखाणासाठीही आपण फोटोशॉपचा उपयोग करू शकता.छायाचित्रांमध्ये रि-टचिन्ग व कॉंपोझिशन करता फोटोशॉप वापरतात.
रि-टचिंग...... आपण जेंव्हा फोटो काढतो तेंव्हा सर्व गोष्टी आपणास पाहिजेत तश्या असतातच असे नाही उदा. दुपारी १२ वाजता फोटो काढला तर चेहरा काळपट य़ॆतो हे माहित असलेतरी इलाज नसतो.चांगल्या कॅमेरांत यांकरिता उपाय असतो पण आपणास
सर्व तांत्रिक गोष्टी लक्षात राहतात असे नाही.घाईघाईने काढलेला बायकोचा फोटो हातांत पडतो तेंव्हा लक्षात येते बायको छानच दिसते आहे पण तीच्या डॊक्यातून एक झाड उगवले आहे. फोटोशॉपमध्ये चेहरा उजळ करणे,झाड काढून टाकणे वगैरे गोष्टी किरकोळ
आहेत. over/under exposure,out of focus ,against light, इत्यादी चूका आरामात दुरुस्त करता येतात. थोडक्यात,aim and shoot कॅमेऱ्याने काढलेला फोटो निकॉनने काढलेल्या फोटोच्या जवळपास नेता येतो. प्राचीन,पिवळे,जीर्ण फोटो नवीन सारखे करणॆ, ग्रूप
फोटोतून एखादी व्यक्ती निराळी करणे आदी गोष्टी करून आपण स्वता:चे समाधान व आप्तेष्टांचे धन्यवाद मिळवू शकता.
कॉंपोझिशन ........ कॉंपोझीशन म्हणजे काढलेल्या फोटोमध्ये फ़ेरफ़ार करणे.असलेल्या गोष्टी काढून टाकणे वा नसलेल्या गोष्टी मिसळणॆ.
हे का करावे लागते? एक उदाहरण घेऊं.प्रवासांत तुम्ही काढलेल्या फोटोत डोंगर, झाडी, पाणी,वगैरे छान आहे. पण आकाश पाहिजे तेव्हडे निळे आले नाही व त्यात ढगांचा आकारही हवा तितका सुन्दर नाही.फोटोशॉपच्या सहाय्याने तुम्ही तसे करू शकता. यांत तुम्ही
कोणाला फ़सवले कां? म्हटले तर हो, म्हटले तर नाही.तुमचा उद्देश एक रमणीय छायाचित्र बघणे हा आहे. त्यांत कुरुप दिसणारे खांब.तारा दिसावयासच पाहिजेत हा नाही. original काय ते दाखवा म्हणणे म्हणजे तरूणीला तू स्नो-पावडर लावूं नकोस,चांगले कपडे घालू
नकोस, थोडक्यांत लावण्यवती दिसूच नकोस म्हणणे झाले. फोटो तर सोडाच, Eischer च्या म्हणण्याप्रमाणे Every painting is deciption. Vanishing Point चा निकष लावून प्रत्येक चित्रांत ऊंच इमारत तिरपी काढतात, ती काय खरीच निमुळती असते? तुमचे फोटो काय
पोलिस चौकशीकरता काढलेले असतात? फोटो चांगला येण्याकरिता कॅमेऱ्यातल्या सुविधा वापरावयास चालतात तर फोटोशॉपमधील का नाहीत?
एक उदाहरण देतो.आफ़्रिकेत गेलो असतांना ईतर प्राण्यांबरोबर चिंपाझीचे फोटो काढले होते. नेहमीप्रमाणे सहलीला गेल्यावर काढावयाची पध्दत आहे म्हणून प्रत्येकाने [आपल्या आपल्या] बायकोबरोबर " हात तुझा हातातून " धर्तीचे फोटोही काढले होते. मी पुण्यात आल्यावर
एका फोटोंत बायकोऐवजी चिंपांझी जोडून दिला.अजूनही, इतक्या दिवसांनंतरही, तो फोटो पाहिला की आम्हा सर्वांची हसून हसून पुरेवाट होते..
शरद

फोटोकट्टा

एक नवीन अनुदिनी फोटोकट्टा इथे बघता येईल.

----

आणखी एक

अप्रतिम संकेतस्थळ सापडले. इथे.

असे सर्व दुवे एका ठिकाणी साठवण्याची व्यवस्था करता आली तर छान होईल.

----

 
^ वर