चुपके चुपके चल री पुरवैय्या
चुपके चुपके चल री पुरवैय्या
बासुरी बजाय रे रास रचाए रे दैय्या रे दैय्या
गोपीके संग कन्हैय्या
चुपके चुपके चल री पुरवैय्या
एक प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ परिमल त्रिपाठी एका निसर्गरम्य ठिकाणी वनस्पतीशास्त्राचे संशोधन करायला आलेला असतो. सकाळी न्याहरीच्या वेळी चहा घेऊन येताना तिथल्या गेस्ट हाऊसचा चौकीदार परिमलला विचारतो ," आप घासफुस के डाक्टर है क्या?"
"घासपुसके नही काका कमसे कम फूल पत्ती तो कहो " परिमल.
त्या चौकीदाराला त्याच्या आजारी नातवाला बघण्यासाठी तातडीने जावे लागते तोपर्यंत त्याचा रोल निभावण्याची जबाबदारी खुद्द परिमल आपल्या हाती घेतो. त्याच वेळेस कॉलेजमधल्या काही तरूणी सहलीसाठी तिथे येतात. त्या सर्व डॉ परिमलच्या फॅन असतात, विशेष करून सुलेखा तर त्यांना भेटायला खूपच अधीर झालेली असते. त्या मैत्रिणींपैकी एक जण ओरडून सांगते " सुलेखा डॉ परिमल त्रिपाठी येथे आलेले आहेत!!"
"काय? डॉ परिमल त्रिपाठी!!!" सुलेखा डोळे विस्फारून त्यांच्या खोलीवर लिहिलेली पाटी वाचते. तेवढ्यात चौकीदार उर्फ परिमल त्या मुलींची चौकशी करायला येतो. सुलेखाला संशय येतो. काही वेळाने सर्व मैत्रिणींची नजर चुकवून सुलेखा चौकीदाराकडे येते
"प्रोफेसर त्रिपाठी सचमूच बुढे है क्या?" सुलेखा.
"हां बूढे है, लेकिन बहूत बूढे नही, लेकीन उनका मुँह थोडा टेढा है. बेचारे को लखवा है ना!! लेकीन प्रोफेसरके बूढे होनेसे आप क्यु निराश हो रही है" परिमल
"नही नही मै तो इसलिए कह रही हुँ की सूना है इतनी कम उम्रमे बॉटनी की तरक्की किसीने भी नही की" सुलेखा
"अरे प्रोफेसर की जवानी भी तो पचास सालकी उम्रमे आती है जब बाल झडने लगते है, दात गिरने लगते है, अकलकी जवानी है न शकल की तो नही ना!! परिमल
दुसऱ्या दिवशी त्या मुलींची निघण्याची वेळ होते आणि त्याच वेळेस खरा चौकीदार येतो आणि परिमलचे नाटक उघडकीला येते. नंतर काही दिवसात परिमल सुलेखाचे लग्न होते. सुलेखाला तिच्या जिज्ज्याजींबद्दल खूप अभिमान असतो. सतत त्यांची तारीफ, जिजाजी ये है!!, जिजाजी वो है!! त्यांची सततची तारीफ परिमलला पहावत नाही आणि तो मनाचा निश्चयच करतो की आपल्या बायकोच्या डोक्यातून तिच्या जिजाजींचे भूत उतरवायचेच.
एके दिवशी तिच्या जिजाजींचा निरोप येतो की त्यांना शुद्ध हिंदी बोलणारा driver पाहिजे. हे ऐकताच परिमल सुलेखासमोर एक प्रस्ताव मांडतो की मी driver बनून पुढे जातो, मग तू सात आठ दिवसांनी ये. तुझ्या जिजाजींना मी अजिबात ओळखू येणार नाही. तिलाही तो प्रस्ताव पटतो पण ती म्हणते "हमारी नयी नयी शादी हुई है. driver बनके जाओगे तो हम मिल भी नही सकेंगे!! मै रहुँगी उपर और तूम रहोगे नीचेवाले गॅरेजमे.
"हम छुपछुपके मिलेंगे, इस तरह छुपछुपके मिलनेमेही बीवीका प्यार बढता है.
डॉ परिमल त्रिपाठी प्यारे मोहन बनून जिजाजींकडे येतो व शुद्ध हिंदी बोलून बोलून त्याला चिडीला आणतो.
परिमल, जिजाजी यांचे संवाद
"हम भीतर आ सकते है साहेब?" परिमल
"हां हां आओ आओ" जिजाजी
"प्रणाम साहेब मै श्री प्यारे मोहन इलाहाबादी आपका नया वाहनचालक" परिमल
"रास्तेमे कोई कष्ट तो नही हुआ, खाना वाना खाया?" जिजाजी
"भोजन तो हमने लवपथग्रामि स्थलपरही किया है" परिमल
"लवपथग्रामि?" जिजाजी
"हम लवपथग्रामि अग्निपथसेही आए है ना!!" परिमल
" ओ याने की ट्रेन!!" जिजाजी
"हिंदी बोलते समय हम अंग्रेजी शब्दोंका प्रयोग उचित नही समझते " परिमल
" व्हॉट नॉनसेन्स" जिजाजी
"नॉनसेन्स नही, क्या बकवास है. हिंदी बोलते समय अंग्रेजी शब्दोंका प्रयोग अच्छा नही लगता" परिमल
"अंग्रेजी जानते हो?" जिजाजी
"हमे तो ये भाषा बिल्कुलही पसंद नही साहेब, बहुतही अवैग्यानिक भाषा है. सी यु टी कट है तो पी यु टी पुट हो जाता है, डी ओ डु है तो टी ओ टु है, जब डी ओ डु , टी ओ टू तो जी ओ गू क्यु नही होता है साहेब? परिमल
"हा हा ठीक है. नीचे हमारा driver है उसे मिलो
जिजाजींचा जुना वाहनचालक याच्याशी प्यारे मोहन ओळख करून घेतो, गाडी चालवून बघतो.
जिजाजी, प्यारे मोहन, दिदी , जेम्स यांचे संवाद
"इसके डिफरन्शिअलमे लफडा है साहेब" जेम्स
"साहेब आग्या हो तो ब्रेक का निरीक्षण परीक्षण कर लुँ " प्यारे मोहन
"अरे बापरे एक लफडा कहता है, तो एक निरिक्षण परीक्षण कहता है, लगताही नही की एक ही गाडी की बात हो रही है" दिदी
"तुम्हारी तो भाषा ही नष्ट हो गयी है बंबईमे रहकर" जिजाजी (चिडलेला)
"नष्ट नही साहेब भ्रष्ट कहो, भाषा भ्रष्ट हो रही है" प्यारे मोहन
गाडीचे इंजिन तपासून म्हणतो " अब कोई कष्ट नही साहेब. तेलछन्नी जिसे आप ऑईल फिल्टर कहते है जिसका पेच ढिला हो गया था, वो कस दिया है, ध्वनी बंद. मै जरा हस्तप्रक्षालन करके आता हुँ" परिमल
आठ दिवसानंतर सुलेखाची चिठ्ठी येते " की मी येत आहे" सुलेखा आपली बायको येणार व आपल्याला भेटणार हे कळल्यावर प्यारे मोहन खूप खुष होतो आणि स्टेशनवर तिला न्यायला दिदी व प्यारे मोहन जातात. तिला पाहिल्यावर तिची जातीने चोकशी करतो. घरी आल्यावर
प्यारे मोहन, दिदी, सुलेखा, जिजाजींचे संवाद
"घासफुसके डॉक्टर नही आए?" प्यारे मोहन
" वो पटना गये है आठ दिनके बाद आएंगे" सुलेखा
"सुलेखाजी हमारी पत्नी कैसी है? वो हमे स्मरण करती है?" प्यारे मोहन
"मरण?" दिदी
"मरण नही, स्मरण जिसे हिंदुस्थानीमे याद कहते है" प्यारे मोहन
"वो आपको बहूत याद करती है" सुलेखा
"ए प्यारे मोहन तुने तो कहाँ था की तुम अकेले हो, ये अचानक तेरी बिवी कहाँसे आ गयी?" जिजाजी
"क्या करते साहेब, हम यहा बंबईमे, वो वहा इलाहाबादमे. ये सोचकर मनको शांत कर लेते थे की हम विवाहीत है ही नही. परंतु आज सुलेखाजी आ गयी है तो अचानक मनमे ये विवाहीत होनेकी भावना जागृत हो उठी, कोई हमारी पत्नी की देशसे आया है." प्यारेमोहन
"साहेब वो हमारा थायसिस का क्या हुँआ?" प्यारेमोहन
"थायसिस!! किसका थायसिस?" सुलेखा
"अरे थायसिस नही, साथमे न्युमोनिया भी है. ए प्यारे मोहन अभी अभी सुलेखा आयी है, इस शुभसमय पर ऐसे अशुभ शब्द बोलना ठीक है क्या?" जिजाजी
"यथार्थ साहेब, ऐसे शुभ अवसर पर अशुभ शब्दोंका उच्चार निश्चीत अनुचित है." प्यारे मोहन
इथे खऱ्या अर्थाने चित्रपट संपतो. सुलेखा व प्यारे मोहन मुद्दामून दिदी व जिजाजींना संशय येईल असे वागतात, व एके दिवशी चिठ्ठी लिहून पळून जातात. नंतर आठ दिवसांनी लिटरेचरचा प्रोफेसर कुमार (परिमलचा मित्र) डॉ त्रिपाठी बनून जातो पण उतरतो प्रशांतकडे (परिमलच्या मित्र) खोटं खोटं रागावतो सुलेखा प्यारे मोहन बरोबर गेली, ती आल्याशिवाय येणार नाही.
तिकडे प्रशांतची मेहुणी वसुधाही परिमल त्रिपाठींची फॅन असते. ती कुमारला सतत तिला बॉटनी शिकवण्यासाठी विनवत असते आणि कुमारला बॉटनीतले ओ की ठो येत नसते. असे करता करता कुमारचे नाटकही उघडकीला येते, मग परत एक प्लॅन रचून कुमार व वसुधाचे लग्न लावतात आणि शेवटी सगळ्यांनाच सर्व परिस्थितीचा उलगडा होतो. मंदीरामध्ये कुमार व वसुधाच्या लग्नाच्या वेळी सुलेखा जिजाजींना विचारते," क्यु जिजाजी आप तो सुंकके आदमी पहचान लेते थे ना?
हां बेटा इस समय जुकाम जरा लंबा हो गया था. यकीन मानिये जुकाममे नाक बंद होती है मगर मेरी तो अकलही बंद हो गयी थी. इस उम्रमे तो बेइज्जती होनी थी वो तो हो चुकी, मगर आप जनता जनार्दन है बाहर जाके ये मत कहना की मै उल्लू बन गया!! नमस्ते.
पात्र परिचय:
१) जिजाजी - ओमप्रकाश
२) सुलेखा - शर्मिला टागोर
३) दिदी - उषाकिरण
४) कुमार - अमिताभ बच्चन(लिटरेचरचा प्रोफेसर)
५) वसुधा - जया भादुरी
६) प्रशांत - असरनी
७) डॉ. परिमल त्रिपाठी - धर्मेंद्र
८) प्यारे मोहन - धर्मेंद्र
९) खोटा परिमल - अमिताभ
१०)पहिला वाहन चालक जेम्स - केष्टो मुखर्जी
Comments
:)
माझा आवडता सिनेमा.
पल्लवी
सुखावलो..!
वा रोहिणी,
छान लिहिलं आहेस. चुपके चुपके हा हृषिदांच्या नितांत सुंदर आणि निखळ करमणूक करणार्या चित्रपटाची या लेखाद्वारे आज अवचित आठवण करून दिलीस त्यामुळे मनोमन सुखावलो. तुझे अनेक आभार..
टेन्शन नाही, मारामार्या नाहीत, राजकारण नाही, भाईगिरी नाही, अंडरवर्ल्ड नाही, भडक रोमान्स नाही, चुंबनं नाहीत, मिठ्या नाहीत, अंगप्रदर्शन नाही, कुले हलवून केलेले वाकडेतिकडे नाच नाहीत!
बघ केवढे नकार आहेत!
पण इतके नकार असूनसुद्धा अतिशय सुरेख चित्रपट काढता येतो हे हृषिदांनी किती सहज दाखवून दिले आहे! हलकीफुलकी कथा, सुंदर गाणी, उत्तम अभिनय या तीन गोष्टींचा त्रिवेणी संगम असलेले चित्रपट हृषिदांनीच काढावेत.
बरं का रोहिणी, एक हिंदी चित्रपट आहे. तो जगातल्या ५ उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हृषिदांचाच आहे. ओळख पाहू कोणता?
हारलीस??? ;)
त्याचं नांव आहे -
गो ल मा ल.....!!
काय बरोबर की नाही? ;)
असो, आता थोडं अवांतर आणि व्यक्तिगत बरं का! ;)
तुला इथे उपक्रमावर पाहून आनंद वाटला. बाय द वे, आमचे जिज्जाजी विनायक त्रिपाठी कसे आहेत? :))
उपक्रमराव, रोहिणी या आमच्या भगिनी असून सदर वैयक्तिक लेखनाला संबंधितांची परवानगी घेतली आहे. तेव्हा आपल्याला मध्ये पडण्याचं काम नाही! ;)
आपला,
परिमल अभ्यंकर! ;)
खरडवही/व्यक्तिगत निरोप
परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांना उद्देशून टिप्पणी/लिखाण करण्यासाठी आवश्यकतेनुसार 'खरडवही' किंवा 'व्यक्तिगत निरोप' या सुविधांचा वापर करता येईल. लेख, चर्चा आणि प्रतिसाद याद्वारे होणारे लेखन सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी प्रत्येकाने घेणे अपेक्षित आहे.
हो,
लेख, चर्चा आणि प्रतिसाद याद्वारे होणारे लेखन सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी प्रत्येकाने घेणे अपेक्षित आहे.
हो, यापुढे घेऊ. पण आजच्या दिवस जरा सूट द्या! ;)
तात्या.
छान जमलंय!
लेखन छान जमलंय! इतके सारे संवाद लिहून काढणं म्हणजे कमाल आहे. हा चित्रपट माझाही आवडता आहे. धर्मेंद्र आणि ओमप्रकाश ह्यांची जुगलबंदी श्रवणीय आहे.
गोलमाल हा देखिल मला आवडलेला चित्रपट आहे.
मस्त!
रोहिणी,
छानच लिहीलं आहेस..यांतील जिज्जाजी,परिमल,सुलेखा यांबरोबर कुमार हे पात्र विशेष आवडले. पिक्चर धमाल आहे..
धमाल आहे
मला परिमल आणि कुमारचे पात्र विशेष आवडले.
शेवटी वसुधा नकार देत असल्यावर कुमारची सगळ्यांना 'मै आप कौन है बता दूंगा' वाली धमकी, त्यावर असराणीचे 'अरे लेकिन मै तो मै ही हूं!' आणि अमिताभचे 'फिरभी बता दूंगा! बतानेमे क्या हर्ज है?' वाला बिनडोक प्रश्न हा सीन भयंकर आवडतो.
असेच एकदा छोटीसी बात वर लिहा कोणीतरी.
सुंदर चित्रपट.
चुपकेचुपके, गोलमाल म्हणजे कधीही पाहावेत आणि ज्यांचा कधीही क़टाळा येत नाही असे चित्रपट!
गोलमालमधील उत्पल दत्त यांची भूमिका तर फारच सुरेख. गोलमालबद्दलही कुणीतरी लिहावे अशी सभासदांना विनंती.
माधवी.
धन्यवाद
पल्लवी, तात्या, अत्यानंद, प्राजक्ति, अनु,माधवी , प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
अनु, 'छोटीसी बात' वर पण लिहिणार आहे.
माधवी, 'गोलमाल' वर पण लिहिणार आहे.
अनु व प्राजक्ति, मला पण परिमल बरोबर कुमारचे पात्रही खूपच आवडले.
आणखी काही
धर्नेंद्रचे इंग्रजी शिकण्यासाठी ओमप्रकाशला छळणे ( 'साहब, कल आप क्लांत थे, लेकिन आज तो व्याख्या कर दीजिये...' ),केश्तोबरोबरची शेरोशायरी (आज बागमें खिलेंगा एक गुलाब, पिला दे पिला दे एक गिलास जुलाब - यार तू शेर सुना रहा है की नुक्सा बता रहा है...), 'पी' अक्षर लिहिलेला रुमाल सापडल्यावर 'रत्ना का नाम पत्ना नही है, सुलेखा का नाम पुलेखा नही है, मेरा नाम पाघव नही है, अगर पी से इस घरमें कोई नाम शुरु होता है ते वो है 'प्यारेमोहन', इलाहाबादहून पाठवून देत असलेल्या वाहनचालकाचे वर्णन करताना 'हिंदी और संस्कृतमें महापंडित - और तुम तो जानतेही हो - ऐसे लोग थोडेसे पागल होते है - जैसे तुम हो' असे डेव्हिडचे ओमप्रकाशला सांगणे, शेवटी प्रचंड घोटाळा झाल्यावरही मंदिरात जायला निघाल्यावर ' साहब, कौनसी गाडी निकालूं - मर्सिडीस या फियाट' असा धर्मेंद्रचा साळसूद प्रश्न, अमिताभचे बॉटनीने हैराण होणे, 'गेंदे का फूल फूल होकरभी फूल क्यों नही है...' आणि वारंवार जया भादुरीला 'लिटरेचर' कडे वळवण्याचा प्रयत्न करणे.... सगळेच धमाल!
रोहिणीताई, परीक्षण आवडले. असेच आणखी लिहा.
सन्जोप राव
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल् धन्यवाद संजोप राव,
परिमलच्या तोडीस तोड कुमारचाही अभिनय जबरदस्त झाला आहे. करोला च्या ऐवजी करेलाची माहिती देणे. वसुधाने प्रश्न् विचारल्यावर वेळ मारून नेण्यासाठी खोटे खोटे जोरजोरात हसणे. आणि "मै मेरे दिलकी बात कह नही सकता ना !"असे म्हणून रडकुंडीला येणे. एकुणच धमाल चित्रपट आहे. कितिही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही.
एक मुद्दा.
चुपके चुपके हा मस्तच सिनेमा आहे.
एक मुद्दा -
आज दुपारी धोंडोपंत या सदस्यांचा चाफ्याच्या फुलांवर एक छान लेख वाचनात आला होता. तो येथून काढून टाकलेला दिसतो आहे. रोहिणी यांनी जरी या सिनेमाचे कष्टपूर्वक संवाद लिहिलेले असले तरी त्यात नावीन्य काहीच नाही. येथील सर्व प्रतिसादांनी तो सिनेमा पाहिलेला दिसतो आहे. तरीही हा लेख ठेवला आहे. याचा अर्थ हा लेखही प्रशासनाने काढून टाकावा असे नाही. परंतु धोंडोपंतांचा लेख चाफ्याच्या फुलांवर होता आणि स्वानुभवावर अधारीत होता. तो मात्र काढून टाकलेला दिसतो आहे.
कोणते लेख ठेवावेत आणि कोणते काढून टाकावेत याबद्दल या संकेतस्थळाचे मापदंड समजले तर येथे वावरायला आनंद होईल!
धोंडोपंतांचा लेख का काढला आणि चुपके चुपके वर आधारीत काहीही नावीन्य नसलेला हा लेख का ठेवला याबाबत उपक्रम काही खुलासा करू शकेल का?
दो बिघा जमीन, सुजाता, हे बिमल रॉय यांचे, परिचय, खुशबू हे गुलजार यांचे उत्कृष्ट आणि गाजलेले सिनेमे आहेत. या चित्रपटांचे काही संवाद मी इथे लिहिले तर चालतील का? आणि चालतील तर कोणत्या निकषावर चालतील हे समजेल का?
ईश्वरी.
उत्तर नाही?
धोंडोपंतांचा लेख का काढला आणि चुपके चुपके वर आधारीत काहीही नावीन्य नसलेला हा लेख का ठेवला याबाबत उपक्रम काही खुलासा करू शकेल का?
दो बिघा जमीन, सुजाता, हे बिमल रॉय यांचे, परिचय, खुशबू हे गुलजार यांचे उत्कृष्ट आणि गाजलेले सिनेमे आहेत. या चित्रपटांचे काही संवाद मी इथे लिहिले तर चालतील का? आणि चालतील तर कोणत्या निकषावर चालतील हे समजेल का?
उपक्रम प्रशासनाकडून माझ्या प्रश्नांची अजून काहीच दखल घेतली गेली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
-ईश्वरी.
निराशाजनक लिखाण.
केवळ संवाद का लिहीले आपण? चुपके चुपके चित्रपट पाहिला नाही अशी व्यक्ती विरळा, आपण काय सांगू इच्छिता?
संकेतस्थळावर रोचक वाचायला मिळावे ही अपेक्षा पूर्ण होत नाही.
-राजीव.