मृतांचा दिवस / श्राद्ध

मृतांचा दिवस / श्राद्ध

सध्या आपल्याकडे पितृपक्ष चालू आहे. भाद्रपद महीन्याच्या कृष्णपक्षातले १५ दिवस पितृपक्ष (पितृ = पिता) ह्या नावाने ओळखले जाते. ह्या १५ दिवसात लोकं आपल्या पितरांची (पूर्वजांची) आठवण ठेऊन त्यांच्या नावाने पाणी सोडतात. त्यांच्या मृत्युतिथीला श्राद्ध करतात. माता-पिता आणि परिवारातील सदस्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या तृप्तीसाठी श्रद्धापूर्वक केलेल्या कार्याला पितृश्राद्ध म्हणतात.

श्रद्धया इदं श्राद्धम्‌ - जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध.

सर्वकालेषु पिण्डं दधाद्विपक्षणं’ असे म्हणून आपल्याकडे पिंडदान केले जाते.

ह्या दिवसात कावळ्यांना खूप भाव येतो.
घरी गोडा धोडाचे जेवणं तयार केले जाते. जमल्यास नातेवाईकांना जेवायला बोलावतात. वैगरे. असो.

हे झाले आपल्याकडेच्या पितृपक्षाची परंपरा.

मेक्सिको मध्ये १ नोव्हेंबर हा दिवस ' Day of the Dead ' म्हणून पाळला जातो. इतर देशांत पण हा दिवस साजरा/पाळला जातो.
ह्या दिवसाची अधिक माहिती संकेत स्थळावर बघत असतांना काही फोटो बघून मला गमंत वाटली. ती फोटो तुमच्या संदर्भासाठी इथे देत आहे.

Day of The Dead -01
Day of The Dead -02
Day of The Dead -03

तुमच्या 'Day of The Dead ' वरच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

Comments

चिनी लोकांचा पितृमहिना

चिनी लोक हा संपूर्ण महिना, 'भुकेल्या भुताचा महिना' (मन्थ ऑफ द हन्ग्री घोस्ट) म्हणून पाळतात.या काळात ते पितरांना फक्त जेवूच घालत नाहीत तर त्यांचे परलोकातील आयुष्य सुखकर जावे म्हणून मोटर गाड्या, बंगले, घरात काम करण्यासाठी मोलकरीण अशा गोष्टीही पुरवतात. या सर्व गोष्टी पितरांना पोचवण्यासाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या लोखंडी पिंपांत ते विस्तव पेटवतात व त्यात खाण्याचे पदार्थ व या इतर वस्तूंची छापलेली चित्रे किंवा पुठ्याची मॉडेल्स टाकतात.
चन्द्रशेखर

चित्रे

अंजली,
माझ्याकडे चित्रे दिसत नाहीयेत. ती चढवतानाच गडबड झालीये की माझ्या प्रणालीची त्रुटी असावी?

मला पण

मला पण चित्रे दिसत नाहीत. :(

नितिन थत्ते

फ्लिकर

सध्या फ्लिकर साईट 'नादूरूस्त' आहे. म्हणून फोटो दिसत नाही आहे. 'फ्लिकर इज डाऊन फॉर मेन्टेनस अन्ड वूई विल बी बॅक शॉर्टली' असा मेसेज येतो आहे.

01

:)

जोडपं छानच दिसतंय! :)

आपला,
(भाताची खीर, भाजणीचे वडे, विनाहळदीची कढी, अळूची भाजी, आमसुलाची चटणी वगैरे असलेला श्राद्धाचा स्वयंपाक मनापासून आवडणारा) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वा

पितरांची आठवण काढण्याची पद्धत इतर देशांतही आहे आणी याच महिन्यात हे ऐकून नवल वाटले.
याबद्दल अजून वाचायला/माहिती करुन घ्यायला उत्सुक आहे.
--लिखाळ.

५ ऑक्टोबर - मुनडूस

रोमन सणात ५ ऑक्टोबर हा दिवस - मुनडूस उघडायचा दिवस किंवा मुनडूस पटेट - ' अ हारवेस्ट फिस्ट इनव्हालविंग दि डेड' म्हणून साजरा करतात.

 
^ वर