राजशेखर रेड्डी आन वाढत्या आत्महत्या
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॅप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. एक नेता गेला.
लोकायच्या प्रश्नाची जाण असणारा नेता गेला. भविष्यातला हायटेक इकास पाह्यजेन का दररोजच्या पोटाचा प्रश्न सोडायला पाह्यजेन याचा मध्यमबिंदू गाठणारा ह्यो नेता व्हता अस पेप्रात वाचायला मिळालं. व्हणारी गोष्ट कोण टाळू शकते नाय का ? त्यायच्या निधनाची बातमी सहन न झाल्यामुळे काहींना हार्टटॅक आला. आन काही लोकायनी आत्महत्या केल्या. त्यायची संख्या आत्ता टीव्हीवर पाह्यली तव्हा ती शंभर झाली.
प्रश्न असा विचारायचा हाये की लोक अशा प्रसंगाने आत्महत्या का करतात ? आता आपलं कसं व्हईन अशी निराशा येऊन आत्महत्या व्हत्यात का प्रेमापोटी आत्महत्या व्हत्यात काय कळायला मार्ग नाय :(
तसं बी दक्षीनेत लोकप्रिय नेत्याच्या मागे आत्महत्या व्हायला इतिहास बी हाये म्हणत्यात ? तव्हा आपल्याला काय वाटून राह्यले त्यायचे सार्याच गोष्टीचे राजकीय,सामाजिक,आर्थिक, मानसिक, आन जमेल तस्स इश्लेषन व्हायला पाह्यजेन काय म्हणता ?
Comments
प्रशासनाने लक्ष घालावे
गडबडीत लिव्हतानी जरशीक गडबड झाली.
चर्चाप्रस्तावामधी पर्याय भाषा पडला तिथं सामाजिक राजकारण् असे बदल प्रशासनाने करावे ही इनंती
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
कुठे गेले सगळे नाडीवाले?
बाबूराव, नाडीवाल्यांकडे प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तर असते. श्रद्धा व सबुरी. अरे कुठे गेले रे सगळे नाडीवाले?
खॅ खॅ खॅ
बाबूराव, नाडीवाल्यांकडे प्रत्येक प्रश्नाला अचूक उत्तर असते. श्रद्धा व सबुरी. अरे कुठे गेले रे सगळे नाडीवाले?
भविष्यवाले आन हे नाड्यावाले दोघंबी सारखेच. :-)
यांना कायबी कळत नाय. कसं तरी पोट भरतेत बिचारे.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
ग्लॅमर
तो एक दुजे के लिए पिच्चर आल्ता तव्हा बी प्रेमी जोडप्यांनी आत्महत्या करन्याच प्रमान लै वाढल व्हत म्हंत्यात ब्वॉ! त्या पिच्चरनी आत्महत्येला बी एक ग्लॅमर दिल्त.
प्रकाश घाटपांडे
तळागाळातल्यांचा नेता
ग्राऊंड लेवलवर काम करणार्या नेत्याला ग्लॅमर राहतं.
आत्महत्याने त्या नेत्याला ग्लॅमर नाय येणार.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
ग्लॅमर
अहो या लोकप्रिय नेत्यामुळे आत्महत्येला ग्लॅमर आल अस म्हंतोय मी
प्रकाश घाटपांडे
१३३!!!!
सध्या आकडा १३३ आहे :(
मात्र यात ९४ हार्ट ऍटॅक आहेत. आणि सध्या एखाद्या व्यक्तीला हार्ट ऍटॅक आल्यावर(व त्यामुळे मृत्यू झाल्यास) तो वायएसआर गेल्यामुळेच आला असं मयताचे नातेवाईक सांगत फिरत आहेत आहेत (बहुदा संभाव्य अनुदानसाठी) अशी "मसाला न्यूज"/अफवा(?) जनसामान्यांमधे चघळली जात आहे.
तरीही उरलेल्या ह्या आत्महत्त्या आहेत आणि आजच्या जमान्यातहि एखाद्या नेत्याचा मृत्यू इतक्या जणांना आत्महत्या करायला भाग पाडतो हे खचितच विस्मयचकित करणारे आहे
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
विस्मयाचे कारण
एखाद्या नेत्याचा मृत्यू इतक्या जणांना आत्महत्या करायला भाग पाडतो हे खचितच विस्मयचकित करणारे आहे
काय विस्मयकारी गोठ नाय.
एनटीरामाराव गेलते तव्हा तीस लोकायनी आत्महत्या केलत्या म्हणतात. (ऐकीव माहिती. दुवा आन विदा उपलब्ध नाय)
दक्षीणेतले लोक इतके बेभान कसे व्हतेत ते काय कळत नाय. संभाव्य फायद्यासाठी गेलेल्या लोकायचीबी नोंद
रेड्डीच्या नावावर जात असन, पर ओरीजनल पाच-पन्नास तर गेले अस्तेन का नाय ?
महाराष्ट्रात जर असा एखांदा लोकप्रिय नेता गेला तर, कोणाला धक्का तरी बसन का ?
(भविष्यात सेनेचा एखांदा मोठा नेता असा धक्का देईन. पर आत्महत्या किंवा हार्टटॅकची संख्या किती आसन काय अंदाज नाय येत)
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
गणित्
खालील आकडेवारी मिळाल्यास मजेशीर निष्कर्ष निघू शकतील.
१. भारतात दरतासाला किती लोक दगावता? पैकी हार्ट ऍटॅक ने किती?
२. आन्ध्राच्या लोकसंखेच्या प्रमाणानुसार आन्ध्रा मध्ये किती?
३. या 'प्रसारणाचा' वेळ किती होता? किती टकके लोक टीव्ही पाहतात?
४. यावरून आलेली आन्ध्रातील टिव्ही बघताना हार्ट ऍटॅक आलेल्याची संख्या किती.
(असेच आत्महत्येबाबत. टेव्ही 'बघून' केली हाच काय तो बदल.)
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
चॅलेंज
ही बातमी वाचून 'चॅलेंज' या पत्त्यांच्या (जुन्या भाषेत इस्पिटांच्या) खेळाची आठवण झाली.
'मेरे चार गोलू' यावर पुन्हा' और चार गोलू' असे काहीसे.
कोणीतरी 'चॅलेंज' म्हणावे अशी अपेक्षा.
कासूगो!
हाहाहा! तेलुगू सिनेमात दर पाच मिनिटांनी कुणीतरी कुणालातरी 'चालेंज' करत असते म्हणे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
फरक
राज्याराज्यातील लोकांच्या मानसिकतेमध्ये इतका फरक असतो हे पाहून आश्चर्य वाटले. उद्या महाराष्ट्राचा एखादा लाडका नेता गेला तर एकही हार्ट अटॅक होणार नाही याची जवळजवळ खात्री वाटते.
याचेच दुसरे उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये पोलीसांच्या अंदाधुंदी कारभाराचा निषेध म्हणून काही महीलांनी विवस्त्र मोर्चा काढला होता. असेही दुसर्या राज्यात होणे अशक्य वाटते.
----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."
महाराष्ट्र
उद्या महाराष्ट्राचा एखादा लाडका नेता गेला तर एकही हार्ट अटॅक होणार नाही याची जवळजवळ खात्री वाटते.
काही वर्षांमागे "हिंदुहृदयसम्राटां"ची प्रकृती गंभीर असल्याची बातमी होती. त्यावेळी काही बरेवाईट घडल्यास किती प्रमाणात जिवित-वित्त हानी होईल, इस्पितळाच्या चालक मालकांचे काय होईल याबाबतच्या चर्चा मुंबईकरांमधे (खालच्या आवाजात) चालल्याचे स्मरते. तस्मात, महाराष्ट्रात हार्ट् अटॅक ने नव्हे तर इतर गोष्टींमुळे काही जीव प्राणास मुकण्याची शक्यता दिसते.
बाणा
आत्महत्या करून स्वतःचा जीव घालवण्यापेक्षा जाळपोळ, दंगल करून इतरांचे जीव घालवणे याला मर्द-मराठी बाणा म्हणावे काय? :-)
----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."
काहीसे गंभीर
जर माध्यमांनी दिलेली एकूण आकडेवारी खरी आहे किंवा नाही यापैकी काहीही गृहीत धरले तरी
१. एकूण भारतीय माणूस इतरांपेक्षा (म्हणजे कुणापेक्षा?) अधिक भावनाप्रधान आहे, असा यातून निष्कर्ष निघतो काय?
२. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर चक्क आत्मघात करुन घेणे हे अपरिपक्व मानसिकतेचे - काहीशा उथळ आदर्शवादाचेच लक्षण आहे काय? (दक्षिणेतला एकंदरच उथळ/ भडकपणा ध्यानात घेता)
३. भारतीयांमधले हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे, हे तर आता उघडच झाले आहे ( मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग - तरुण पिढीच्या अकाली मृत्यूसाठीचे तीन प्रमुख घटक). टीव्हीवरील बातमी - अगदी ती प्रिय नेत्याच्या निधनाची का असेना- बघून हृदयविकाराचा झटका यावा इतके मरण स्वस्त झाले आहे काय?
४. एखादा नेता गेला म्हणजे सगळे संपले, त्याच्यामागे आपले हाल कुत्रे खाणार नाही असे लोकांना वाटावे इतकी आंध्र प्रदेशातील स्थिती दयनीय झाली आहे काय?
सन्जोप राव
ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है
मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है
मेल्यानिन! मेल्यानिन!
कारण मेल्यानिन असू शकते म्हणे ! ह्याबाबत जाणकारांचे मत जाणून घ्यावेसे वाटते आहे.
रावसाहेब, कशाला गंभीर होता आणि इतरांना करता? आनंदी व्हा पाहू. मोठ्या मुलांचा चांदोबा नियमितपणे व पुन्हापुन्हा वाचल्यामुळे असे होते का? असो. आता लहान मुलांचा, म्हणजेच खराखुरा, चांदोबा वाचायलाच हवा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
रहस्यमय प्रकार आहे खरा.
तरी नशीब रेड्डी यांचे जलचरांकरता काही भरीव कार्य नव्हते नाहीतर व्हेल व डॉल्फीन प्राण्यांनी देखील आंध्रच्या किनार्यावर जीव दिला असता.
आत्महत्त्या
एखादा जवळचा व्यक्ती गेल्या नंतर मानसिक धक्का बसणे व त्या आवेगात आत्महत्येला प्रव्रुत्त होणे हे स्वाभाविक आहे. आत्महत्येसारखा अविवेकि मार्ग अवलंबिणे हे गैर असले तरि त्यातुन त्याची भावनिक जवळिक दुर्लक्षित करुन चालणार नाहि. यामागे त्या नेत्यानी आपल्या कार्याद्वारे खरोखरच तशी जवळिक निर्माण केली असावी. राजकारणी हे आजकाल आपली तुंबडी भरण्याच्या मागे असलेले आपल्याला दिसतात म्हणुनच एखादा राजकारणी गेल्यानंतर असा परिणाम होत असावा यावर आपला विश्वास बसत नाही. पण प्रत्येक गोषटीला अपवाद असतात तसा हा अपवाद असणे गैर नाही. ईतर राजकारण्यांनी यावर जरुर विचार करावा आणि त्याचा आदर्श समोर टेवुन थोडे तरी सुधारावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
विश्वास कल्याणकर
प्रतिसाद पटला
आपल्या इचाराशी सम्मत हाये
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
अनपेक्षित प्रतिक्रिया / इजा, बिजा, तिजा...
प्रतिक्रिया अनपेक्षित, पण मजकुराशी सहमत आहे.
अडवानींनी फटका खाल्ला, जसवंतसिंह गेले...
अफवाप्रिय.
अफवाप्रिय.
उत्तरेत जशी नेतेमंडळी मेली की रडायला मूल्य मोजून माणसे बोलाविली जातात, तसे दक्षिणेत नेतेमंडळी मेली की मूल्य मोजून अशा खर्या-खर्या बातम्या छापल्या-दाखविल्या जातात. तो नेता किती मोठा हे त्या बातम्यांवरून ठरते. ज्याला खरे मानायचे त्याने ते मानावे. पत्रकारितेतील दाक्षिणात्य लोक ओळखीची असतील तर अवश्य खात्री करून घ्या.
उठसूठ कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवणे हा अफवाप्रिय लोकांचा स्थायी गुण असतो. महाराष्ट्रांत तर विकतच्या अफवांवर विश्वास ठेवून चर्चाही झडतात (मानसिकता इत्यादी!) हे पाहून सखेद आश्चर्य होते!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
अरे देवा... काय हे...
कोणे एके काळी भावनाप्रधान लोकं देशासाठी प्राण द्यायची. तमाम जनता त्यांच्या आठवणींनी दु:खी होत असे.
ह्यावरून सहज एक कविता आठवली...
स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी,
श्रृंगारली आळी, झगमगे ||
तोरणे, पताका, सांगती डोलून,
स्वातंत्र्याचा दिन, उगवला ||
स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले?
पूर्वज श्रमले, तयासाठी ||
वृक्ष लावणारे, निघोनिया जाती,
तळी विसावती, सानथोर ||
विचारी गुंतत, हिंडलो बाजारी,
पेठेत केवढी, गजबज ||
केवढी धांदल, केवढा उल्हास,
केवढी आरास, भोवताली ||
मात्र एका दारी, दिसे कोणी माता,
दीप ओवाळीता, छायाचित्रा ||
ओल्या नेत्रकडा, हळूच टिपून,
खाली निरांजन, ठेवीत ती ||
हुतात्म्याचे घर, सांगे कुणी कानी,
चित्त थरारोनी, ऐकतसे ||
होते लखाखत, पेठेतले दीप,
आकाशी अमूप, तारा होत्या ||
चित्तापुढे माझ्या, एक दीप होता,
एक अश्रु होता, माऊलीचा ||
कवी - वि. म. कुलकर्णी
भावपुर्ण कविता
धन्यवाद सृष्टीलावण्या.सुंदर कविता उधृत केलीत
प्रकाश घाटपांडे
नेत्यांबद्दल भावनिक जवळीक?
दक्षिणेमधल्या आवडत्या नेत्याच्या मृत्यूनंतर इतकेजण आत्महत्या करतात, कारण नुसतीच भावनिक जवळीक की लोकांची कमकुवत मने? महाराष्ट्रात असे कधीच का होऊ शकणार नाही? हिंदूंच्या हृदयांवर सत्ता गाजवणारा एखादा मराठी नेता अगदी वृद्धापकाळामुळे नैसर्गिकरीत्या मरण पावला तर लोक काय करतील? फक्त संप, हरताळ, बहिष्कार, लुटालूट, जाळपोळ करतील आणि बंद पाळतील. सकाळीच समजले तर लोक सुट्टी घेऊन बाहेरगांवी जातील किंवा घरीच सीडी लावून सिनेमा बघतील. कारण उघड आहे. महाराष्ट्रात ज्याच्यावर भक्ती करावी असा नेता लोकमान्य टिळकांनन्तर कोणी झालाच माही. या विषयावर आजच्या विवात आलेला ऐशा 'आत्महत्या' करण्यासी तैसे नेतेच जन्मले नाहीत... हा लेख जरूर वाचावा.--वाचक्नवी
बै चांगली लिंक दिली आन जरशीक अवांतर
हिंदूंच्या हृदयांवर सत्ता गाजवणारा एखादा मराठी नेता अगदी वृद्धापकाळामुळे नैसर्गिकरीत्या मरण पावला तर लोक काय करतील?
आपून सारे त्यायचा वाइट इच्चार कहून करुन राह्यलो. त्यायला उदंड आयुष्य लाभो.
ह्यो एकच नेता अस्सा हाये ज्याने नुसते बोलुन-बोलुन आप्पा, दादा, नाना, यायची राजकारणातली वतनदारी मोल्डी.
प्रबोधनकार ठाकरे म्हणले व्हते-
''आमचाही एक संप्रदाय आहे. सत्यशोधनाचा, सामाजिक बदल घडवून आणणार्या प्रबोधनाचा, बाळनीही आपला एक संप्रदाय काढलाय.तो शिवसेना घेऊन हिंदत्वासाठी झगडतोय. तो माझ्यापेक्षा शतपट पराक्रम गाजवील याचा मला केवढा अभिमान वाटतो.
दोघात मोठं कोण ? ते सांगणं काय तोंडचा खेळ नाय.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
शिवसेना घेऊन हिंदत्वासाठी झगडतोय?
शिवसेना घेऊन हिंदत्वासाठी झगडतोय
हे वाक्य प्रबोधनकारांचेच का?
कारण शिवसेनेने हिंदुत्वाची झूल अगदी अलीकडे अलीकडे पांघरली आहे (म्हणजे मला स्पष्ट आठवते त्याप्रमाणे १९९० च्या थोडे आधी हे घडले असावे.) सुरुवातीच्या काळात हिंदूच असलेल्या दक्षिण भारतीयांना बडवण्यात शिवसेना अग्रेसर होती तेव्हा त्यांना मराठीचा कळवळा होता. नंतर मुंबईची डेमोग्राफी जशी बदलत गेली तसे गुजराती-उत्तर भारतीय मतांसाठी सोयीस्कर हिंदुत्व अंगीकारण्यात आले असा इतिहास आहे. त्यामुळे प्रबोधनकारांना शिवसेना आणि हिंदुत्व हा संबंध आधी कसा कळला याचे नवल वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नवल वाटते खरे
सध्या काँग्रेस नेत्यांचा प्रवासाचा पब्लिसिटी स्टंट पाहून आम्हाला सुद्धा नवल वाटते खरे. याच स्टंटच्या माध्यमातून एका गांधीचा बळी देऊन पुर्ण बहुमत मिळवायचा डाव आम्हाला वाटतो आहे.
एकिकडे नातेवाईकांच्या उमेदवारीच्या हट्टावरुन कार्यकर्त्यांचे कान ओढणार्या शरद पवारांचे नवल वाटते खरे. तसेच आघाडीसाठीच्या लाचारीचे लोळण पाहून सुद्धा नवल वाटते.
असो, तुम्हाला आम्हाला ९०च्या दशकात जाणवलेल्या हिंदुत्वासाठीचा झगडा हा कदाचित प्रबोधनकारांना त्यांच्या बाळाने पुर्वीच सांगून ठेवला असावा. शेवटी राजकारण आहे. कोणता पत्ता कधी काढायचा याचे ज्ञान त्यांनाच. तुम्ही आम्ही असे केतकरी वार करत बसायचे.
मला वाटते...
कारण शिवसेनेने हिंदुत्वाची झूल अगदी अलीकडे अलीकडे पांघरली आहे (म्हणजे मला स्पष्ट आठवते त्याप्रमाणे १९९० च्या थोडे आधी हे घडले असावे.)
हे वाक्य अर्धसत्य आहे. (तुम्ही अर्धसत्य सांगत आहात असे म्हणायचे नाही आहे :) )
ज्या वाक्यासंदर्भात आपला प्रतिसाद आहे ते वाक्य प्रबोधनकारांचे आहे का हे माहीत नाही. मात्र आठवते त्याप्रमाणे हिंदूत्व हे (किमान) बाळासाहेबांना कायमच जवळचे होते आणि राहीले. कदाचीत त्यांच्या सुरवातीच्या भाषणातही ते मुद्दे दिसतील. मात्र शिवसेनेचा सुरवातीचा कारभार हा राजकीय असण्यापेक्षा मराठी माणसाच्या विरुद्धच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीचा असल्याने त्यावरच जास्त भर होता.
१९८४च्या निवडणूकीच्या आधी (राजीव लाट) शिवसेनेस बदलणार्या राजकीय परीस्थितीचे आणि महत्वाकांक्षेचे भान आले. शिवसेनेचे गुजराथ्यांशी आणि गुजराथी समाजाचे शिवसेनेशी कधीच वैर नव्हते. भाजपाच्या प्रमोद महाजन यांनी युतीशिवाय पर्याय नाही हे समजून घेऊन स्वतःचे असलेले व्यक्तिगत संबंध पणाला लावून बाळासाहेबांना पटवून दिले. तसेच त्यासाठी सोबतकार ग.वा. बेहरे यांनीपण स्वतःचे व्यक्तीगत असलेले (शिवसैनिकांच्या गैरवर्तनामुळे) वैर पण विसरून यात पुढाकार घेतला होता. अर्थात ८४च्या निवडणूकीत सगळेच वाहून गेले. मात्र नंतर हिंदूत्व हा समान मुद्दा म्हणून मुंबई महापालिकेच्या (८६, भुजबळ महापौर झाले) आणि त्याहूनही अधिक ठाणे महापालीकेच्या निवडणूकीत स्थिरावला.
बाकी मूळ विषयासंदर्भात, वाचक्नवींनी नकळत टिळकांची तुलना राजशेखर रेड्डींशी केली असे वाटले... :-(
राहता राहीला आत्महत्येचा मुद्दा. मला वाटते, हा सतीच्या प्रथेप्रमाणे होत असावा. राजकीय आणि साम्हाजीक गुंड तसेच वैयक्तिक वैमनस्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या निधनाचा फायदा घेऊन काटे काढणे करत असल्यास आश्चर्य वाटायला नको... एरव्ही देश/समाज जाउंदेत स्वतःच्या कुटूंबासाठी पण जीव देयला (सर्वस्व पणाला) तयार होण्याची तयारी नसणारा सामान्य जीव एकदम असा आत्महत्या करेल ते ही इतक्या प्रमाणात, ह्यात काहीतरी सांख्यिकीच्या दृष्टीनेपण चुकते की काय असे वाटते.
सहमत आहे!
हिंदुत्वाचा आजार शिवनेला पूर्वीपासुनच होता. संघ/भाजपा ह्यांच्या नादी लागल्यावर तो उफाळून आला आणि मराठी प्रेमाला दुय्यम ठरव्ण्यात आले. राज ठाकरेने नेमके हेच हेरले आणि मराठी प्रेमाला पुढे आणुन स्वतंत्र पक्ष स्थापन केला. अतिशय मोजुन मापुन केलेली राजकारणी चाल. मराठी माणसांचा कैवार घेण्यापुर्वी हेच राजसाहेब एका 'परप्रांतीय' बिल्डरकडून पैसे घेऊन रमेश किणी नावाच्या 'मराठी' माणसाचा खून केल्याच्या आरोपात होते.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
आणखी
काही महिन्यांपूर्वी कुख्यात गुंड अश्विन नाईकने बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे दोघांच्याही भेटी घेतल्या. नंतर यावर कुठेही, काहीही चर्चा झाल्याचे आढळले नाही.
---
हो
हिंदुत्वाचा आजार शिवनेला पूर्वीपासुनच होता. संघ/भाजपा ह्यांच्या नादी लागल्यावर तो उफाळून आला आणि मराठी प्रेमाला दुय्यम ठरव्ण्यात आले. राज ठाकरेने नेमके हेच हेरले आणि मराठी प्रेमाला पुढे आणुन स्वतंत्र पक्ष स्थापन केला. अतिशय मोजुन मापुन केलेली राजकारणी चाल. मराठी माणसांचा कैवार घेण्यापुर्वी हेच राजसाहेब एका 'परप्रांतीय' बिल्डरकडून पैसे घेऊन रमेश किणी नावाच्या 'मराठी' माणसाचा खून केल्याच्या आरोपात होते.
नेमके. याचबरोबर हिंदू आणि मराठी अशा वेगवेगळ्या झुली पांघरण्यासाठी हिंदुत्व आमचा श्वास आहे तर मराठी आमचा आत्मा वगैरे हास्यास्पद शाब्दिक कसरती कराव्या लागतात.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हा हा हा... आजचा लोकसत्ता
आजच्या लोकसत्तामध्येच ‘मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व हा प्राण आहे’ हे विनोदी वाक्य आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शिवसेना आणि हिंदुत्व
प्रबोधनकाराचे तीन भाषणं सांबाळून ठेवलेले हायेत.
*देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे
** दगलबाज शिवाजी
*** अखेरचे भाषण
यातले अखेरच्या भाषणात वरील वळी हायेत.
इस्वास ठेवायचा का नै, ज्याची त्याची मर्जी.
त्याच अखेरच्या भाषणात ते म्हणले व्हते 'मी आज नव्वदीत हाये' प्रबोधनकाराचा जन्म १८८५ चा.
पण त्यायचे निधन तर १९७३ ला झाले. तव्हा ही गोश्ट त्र्याहत्तरच्या काही दिवस अगोदरची.
तव्हा संशोधकायनी शिवसेना आन हिंदत्वाचा आभ्यास करावा.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
नव्वदी
अवांतर वाटेल पण प्रबोधनकारांचे वय 88 आहे असे दिसते. त्यामुळे 80 ते 90 या कालखंडाला नव्वदी म्हणावे काय?
संदर्भाबद्दल धन्यवाद. शिवसेनेने हा पत्ता बराच काळ मांडीखाली दडवून ठेवला होता असे दिसते. :)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बरोबर
शिवसेनेने हा पत्ता बराच काळ मांडीखाली दडवून ठेवला होता असे दिसते. :)
बरोबर आहे. हिंदूत्ववाद हा ठाकर्यांपासून दूर नव्हता तसेच शिवसेनेपासूनही दूर नव्हता...
- आजारी विकास :-)
बरोबर
हो. काल थोडे तपशील चाळून पाहिले तेव्हा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात झालेल्या दलितांच्या (पक्षीः अहिंदू नवबौद्धांच्या) हत्या व त्याच दरम्यानच्या कालखंडात वरळीतील पोलीस चाळींमध्ये झालेले बौद्ध पोलीसांच्या घरांवरील हल्ले ह्यात शिवसेना आघाडीवर होती. ह्याच कालखंडात बाळासाहेबांनी मुंबईत सभा घेऊन बौद्धांविरुद्ध रान पेटवले होते.
त्यामुळे शिवसेनाप्रणित तथाकथित हिंदुत्व हे १९८० च्या थोडे पूर्वी सुरु झाले असावे असे वाटते. (मात्र १९६० च्या दशकातील हिंदू मद्राश्यांना ठोकणारी शिवसेना थोडी वेगळी होती.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
विद्यापिठ नामांतर
काल थोडे तपशील चाळून पाहिले तेव्हा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात झालेल्या दलितांच्या (पक्षीः अहिंदू नवबौद्धांच्या) हत्या व त्याच दरम्यानच्या कालखंडात वरळीतील पोलीस चाळींमध्ये झालेले बौद्ध पोलीसांच्या घरांवरील हल्ले ह्यात शिवसेना आघाडीवर होती. ह्याच कालखंडात बाळासाहेबांनी मुंबईत सभा घेऊन बौद्धांविरुद्ध रान पेटवले होते.
मराठवाडा विद्यापिठ नामांतराचा प्रश्न हा शिवसेनेने तयार केलेला नव्हता. किंबहूना मूळ दलीत दंगलीत शिवसेनेचा अथवा हिंदूत्ववाद्यांचा काहीच संबंध नव्हता. त्याहूनही पुढे एक लक्षात घेतले तर कळेल की शिवसेना ही नामांतराचा जेंव्हा पहील्यांदा प्रश्न आला तेंव्हा मराठवाड्यात काय मुंबई-ठाण्याच्या बाहेर कुठेच नव्हती. त्यावेळेस दंगली झाल्या असल्या तरी त्या मराठवाड्यापुरत्याच मर्यादीत होत्या. मुंबईत झाल्याचे ऐकीवात नाही. मात्र आपल्याकडे माहीती असल्यास अवश्य सांगावी. हा प्रश्न राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसने तयार केला खरा मात्र त्याला मराठवाड्यातील सामान्यआणि स्थानिक पुढार्यांचाच विरोध होता.
८०च्या दशकात जेंव्हा हा प्रश्न परत आला तेंव्हा परत दंगली होणार का असा प्रश्न आला. त्यावेळेस बाळासाहेब यांनी (अर्थात राजकीय फायदा उचलण्यासाठीच असणार) त्यावर भाष्य केले. त्यावेळेस देखील त्यांचे असे म्हणणे होते की आंबेडकरांच्या नावाने नविन विद्यापिठ चालू करा. ज्याला आधीच स्थानिक नाव आहे त्याचे नाव जनतेच्या विरोधात बदलू नये. तसेच केवळ नाव बदलण्याने दलीतांचा विकास होणार आहे का ते आंबेडकरांसारखे शिकणार आहेत हा प्रश्न विचारणे त्यांचे सभांमधे चालू होते. अर्थात यामुळे (वचनपुर्तीच्या अभावाने) काँग्रेस कॉर्नर होत होती...
सरते शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी (चाणाक्षपणे) योग्य तोडगा काढून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ" असे नामांतर सर्व पक्षांच्या सहमतीने ठरवले. त्यातून काँग्रेसने नामांतराचे वचन पण पाळले आणि मराठवाडा पण त्यात राहीले. :-)
मात्र याचा सगळ्याचा संदर्भ हिंदूत्वाशी नसून निव्वळ तत्कालीन राजकारणाशी होता. तशा राजकारणात अनेक तडजोडी (अर्थात घोडचुका) सर्वच करतात, ठाकर्यांनीपण केल्या, मात्र हिंदूत्वाशी काडीमोड घेतला असे मात्र झालेले नाही. देशाचा संबंध येतो तेंव्हा सर्व एकत्र जेंव्हा राज्याचा संदर्भ येतो तेंव्हा अर्थातच स्थानिक राजकारण महत्वाचे...
संकुचित हिंदुत्वाचे परिणाम
मराठवाडा विद्यापिठ नामांतराचा प्रश्न हा शिवसेनेने तयार केलेला नव्हता. किंबहूना मूळ दलीत दंगलीत शिवसेनेचा अथवा हिंदूत्ववाद्यांचा काहीच संबंध नव्हता.
शिवसेनेने हा प्रश्न तयार केला नव्हता हे खरे. पण या प्रश्नाचा जातीयवादी दृष्टीकोणातून वापर करुन स्वतःचा राजकीय फायदा शिवसेनेने नक्कीच घेतला. मूळ दलित दंगलीत शिवसेनेचा किंवा हिंदुत्ववाद्यांचा काही संबंध नव्हता हे हास्यास्पद आहे. दंगल करणाऱ्यांना राजकीय आश्रय आणि नंतर पाठिंबा शिवसेनेनेच दिला.
त्याहूनही पुढे एक लक्षात घेतले तर कळेल की शिवसेना ही नामांतराचा जेंव्हा पहील्यांदा प्रश्न आला तेंव्हा मराठवाड्यात काय मुंबई-ठाण्याच्या बाहेर कुठेच नव्हती.
होय. आणि शिवसेनेने या नामांतर आंदोलनाचा फायदा घेऊन मराठवाड्यात पाय रोवले.
त्यावेळेस दंगली झाल्या असल्या तरी त्या मराठवाड्यापुरत्याच मर्यादीत होत्या.
हा प्रश्न राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसने तयार केला खरा मात्र त्याला मराठवाड्यातील सामान्यआणि स्थानिक पुढार्यांचाच विरोध होता.
विरोध कशाला होता? नामांतराला की प्रश्नाला? नामांतराला स्थानिक पुढाऱ्यांचा विरोध असण्याचे कारण म्हणजे त्यांच्या जातीय अस्मिता दुखावल्या गेल्या. त्यामुळे या पुढाऱ्यांनी नंतर शिवसेनेची वाट धरली.
८०च्या दशकात जेंव्हा हा प्रश्न परत आला तेंव्हा परत दंगली होणार का असा प्रश्न आला. त्यावेळेस बाळासाहेब यांनी (अर्थात राजकीय फायदा उचलण्यासाठीच असणार) त्यावर भाष्य केले. त्यावेळेस देखील त्यांचे असे म्हणणे होते की आंबेडकरांच्या नावाने नविन विद्यापिठ चालू करा. ज्याला आधीच स्थानिक नाव आहे त्याचे नाव जनतेच्या विरोधात बदलू नये. तसेच केवळ नाव बदलण्याने दलीतांचा विकास होणार आहे का ते आंबेडकरांसारखे शिकणार आहेत हा प्रश्न विचारणे त्यांचे सभांमधे चालू होते.
बाळासाहेबांचे हे मत हास्यास्पद आहे. महाराष्ट्रभर रस्ते, गल्ल्या आधी शिवाजीच्या आणि नंतर माँसाहेबांच्या नावाने कोणी केल्या? आणि तसे केल्याने मराठी माणसांचे काय भले झाले. नामकरण जाऊ द्या. ज्या बाबरी मशीदीच्या नावाने शिवसेना बांग देत असते ती पाडल्याने कोणाचा विकास झाला?
मात्र याचा सगळ्याचा संदर्भ हिंदूत्वाशी नसून निव्वळ तत्कालीन राजकारणाशी होता.
बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा काहीच संबंध नव्हता. सोयीस्कर राजकारणासाठी अनेकदा रंग बदललेले दिसले आहेत एवढेच म्हणायचे होते. मात्र बौद्धांच्या विरोधात जनमत भडकवण्यासाठी आता हिंदू म्हणून एकत्र या अशा प्रकारच्या सभा बाळासाहेबांनी वरळीत घेतल्या आहेत. वरळीमधील दलितांच्या वस्त्यांवर फरशा, विटा वगैरेंचे हल्ले शिवसैनिकांनी केले आहेत. याचा पूर्ण इतिहास अनिल अवचटांनी एका पुस्तकात लिहिला आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
पुस्तीः राज ठाकरे यांचे कालचे वक्तव्य
शिशिर शिंदे यांच्या प्रचारासाठी भांडुप येथे घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेचा प्रवास सांगताना, शिवसेनेला हिंदुत्वाचा पुळका ८५-८६ च्या सुमारासच आला, तोपर्यंत शिवसेने मराठी-मराठीच करत होती. मात्र केवळ या मुद्द्यावर व्यापक जनाधार मिळणे कठीण आहे हे लक्षात आल्यावर हिंदुत्वाच्या वळचणीला उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असे म्हटले आहे.
यावरुन शिवसेनेला हिंदुत्वाचे (मतांसाठीचे) प्रेम कधी उत्पन्न झाले हे लक्षात येईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
फशीव गंडीवचे पोलखोल
आजच्या टाईम्स ऑफ इंडिया हैदराबाद आवृत्ती मधला मथळा पहा.
"जगनभजन" सुरू आहे.