२२ जुलै २००९ च्या सकाळचे सुंदर सूर्यग्रहण

गेल्या जुलैच्या २२ तारखेला एक सुंदर सूर्यग्रहण झाले. या ग्रहणाची काही सुंदर छायाचित्रे माझ्याकडे आहेत.. या छायाचित्रांबरोबरच सूर्यग्रहणावर चर्चेद्वारे माहिती व्हावी यासाठी अल्पसा हा प्रयत्न ...

छायाचित्र - १

From Solar Eclip 22-July-2009 5 AM to 7.41 AM

छायाचित्र - २

From Solar Eclip 22-July-2009 5 AM to 7.41 AM

छायाचित्र - ३

From Solar Eclip 22-July-2009 5 AM to 7.41 AM

~सागर

Comments

व्वा!!

सागर,
अतिशय सुरेख आणि अप्रतिम छायाचित्रे आहेत.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

पहिली २ चित्रे आधी पाहिली होती. तिसरे चित्र पहिल्यांदाच बघत आहे. ते फारच मोहक आहे.

ग्रहणाचे फोटो

हे फोटो काढताना कॅमेरा कोणता? अपरर्चर आणि स्पीड काय वापरले? ट्रायपॉड वापरला का? वगैरे माहिती ऐकायला आवडेल
चन्द्रशेखर

कृपया गैरसमज नको...

चंद्रशेखरभाऊ,

वरील छायाचित्रे मी नाही काढलेली. ई-मेलद्वारे एका मित्राने पाठवली होती. तीच देत आहे...
कृपया गैरसमज नको... तेव्हा इतर टेक्निकल डिटेल्स् माझ्याकडे उपलब्ध नाहीत ...

सागर

धन्यवाद स्मिता

तिसरे सुंदर छायाचित्र बिहारच्या पाटणा येथून घेतलेले आहे...

माझ्यामते यावेळच्या सूर्यग्रहणाचे सर्व जगभरातून घेतलेल्या छायाचित्रांपैकी हे सर्वोत्कृष्ट छायाचित्र आहे :)

(खगोलप्रेमी) सागर

खग्रास सूर्यग्रहण

कोणत्याही खग्रास सूर्य ग्रहणाच्या वेळेस दोन वेळा हिर्‍याच्या अंगठीचे दृष्य (डायमंड रिंग इफेक्ट) हे दिसतेच. आपल्या पहिल्या दोन फोटोत हे दृष्य फार सुरेख चित्रित झाले आहे.तिसर्‍या फोटोतील दृष्य कितीही मोहक दिसत असले तरी प्रत्यक्षात कॅमेरा हलल्यामुळे मल्टीपल इमेजेस आल्या असल्याने चित्रित झाले असावे असे वाटते.
अवांतर
आइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताची, पहिली निरिक्षण करता येऊ शकणारी सिद्धता, खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी संशोधकांना मिळाली होती. ग्रहणाच्या वेळच्या सूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणारे तारे, ग्रहणाच्या वेळी सूर्याच्या जवळ दिसतात. या तार्‍यांचे, ग्रहणाच्या वेळी दिसणारे स्थान हे इतर वेळी दिसणार्‍या स्थानापेक्षा, थोडे बाजूला असल्यासारखे दिसते. याचे कारण असे आहे की या तार्‍यांपासून निघणारे प्रकाशकिरण, जेंव्हा सूर्याच्या जवळून जातात तेंव्हा सूर्याच्या आत्यंतिक गुरुत्वाकर्षणामुळे, हे प्रकाश किरण थोडे वाकतात व त्यामुळे त्यांचे स्थान बदलल्यासारखे दिसते. आइनस्टाईनच्या अवकाश-काल संकल्पनेची ही निरिक्षण करण्यासारखी सिद्धता असल्याने अतिशय महत्वाची आहे.
चन्द्रशेखर

इतर वेळी दिसणार्‍या ?

आइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताची, पहिली निरिक्षण करता येऊ शकणारी सिद्धता, खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी संशोधकांना मिळाली होती. ग्रहणाच्या वेळच्या सूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणारे तारे, ग्रहणाच्या वेळी सूर्याच्या जवळ दिसतात. या तार्‍यांचे, ग्रहणाच्या वेळी दिसणारे स्थान हे इतर वेळी दिसणार्‍या स्थानापेक्षा, थोडे बाजूला असल्यासारखे दिसते. याचे कारण असे आहे की या तार्‍यांपासून निघणारे प्रकाशकिरण, जेंव्हा सूर्याच्या जवळून जातात तेंव्हा सूर्याच्या आत्यंतिक गुरुत्वाकर्षणामुळे, हे प्रकाश किरण थोडे वाकतात व त्यामुळे त्यांचे स्थान बदलल्यासारखे दिसते

सूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणारे तारे इतर वेळी कसे दिसतात ? ते फक्त ग्रहणाच्या वेळीच दिसू शकतात.
सूर्याच्या स्थानाच्या अगदी मागे असणा-या तार्‍याचे गणीतानुसार काढलेले स्थान व प्रत्यक्ष दिसणारे स्थान यातील तफावत हे सिद्ध करते की गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाश किरण थोडे वाकतात. हे तारे फक्त ग्रहणाच्या वेळीच दिसू शकल्याने हि सिद्धता फक्त खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीच करता येते.

तार्‍यांचे एकमेकांसापेक्ष स्थान

याबाबत सिद्धांताचे गणित तपासायचे आहे. सूर्येतर तार्‍यांचे एकमेकांच्या सापेक्ष दिसणारे स्थान (म्हणजे कोनीय अंतर) हे आदल्या आणि नंतरच्या सिद्धांतांमधल्या गणितात वेगळे आहे.

आदल्या सिद्धांताप्रमाणे प्रकाशकिरण सरळ मार्गाने जातात. अध्येमध्ये एखाद्या प्रचंड गुरुत्वाकर्षक पिंडाजवळून किरण गेले तरी काही फरक पडत नाही. तारा 'अ' आणि तारा 'ब' या दोहोंमधले कोनीय अंतर हे तिथपासून पृथ्वीपर्यंत सरळ येणार्‍या किरणांमधील साधा कोन आहे. तो दिवसा-दिवसाला फारसा बदलत नाही. (दूरवरचे तारे हलतात खरे, पण कोनीय अंतर बदलण्याइतपत हलायला शेकडो हजारो वर्षे लागतात.)

सामान्य सापेक्षता सिद्धांताच्या अनुसार प्रकाशकिरण गुरुत्वाकर्षणाने वाकतात. पण ते आपल्या यंत्रांना तपासण्याइतके वाकण्यासाठी गुरुत्वाकर्षण उत्पन्न करणारे पिंड प्रचंड असावे लागते. असे एक पिंड म्हणजे सूर्य आहे. म्हणजे तारा 'अ' किंवा तारा 'ब' यांच्यापासून येणार्‍या प्रकाशकिरणांमधला रात्री दिसणारा कोन 'क' आहे समजा. त्या तार्‍यापैकी एकाचे किरण सूर्याजवळून पृथ्वीवर पोचत असेल, तर ते वाकेल, आणि अशा परिस्थितीत 'अ' आणि 'ब' यांच्यातले कोनीय अंतर रात्री दिसले त्यापेक्षा वेगळे असेल. असे गणित आहे. पण थोडी गडबड होते. अशा परिस्थितीत जर 'अ'चे किरण सूर्याजवळून पृथ्वीवर पोचत असेल, तर पृथ्वीवरून 'अ' तारा हा सूर्याच्या खूप जवळ दिसते. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे या 'अ' तार्‍याकडून येणारे किरण झाकोळले जाते. इतकेच काय दिवसाउजेडी 'ब' तार्‍याकडून येणारे किरणही दिसत नाही! मग सूर्याजवळून प्रकाशकिरण आल्यास कोनीय अंतर बदलले, हे मोजताच येत नाही.

मात्र सूर्यग्रहणाच्या वेळी, 'अ' आणि 'ब' हे तारे दिवसाही स्पष्ट दिसतात, आणि त्यांच्यामधले कोनीय अंतर मोजता येते. हे रात्री मोजलेल्या कोनीय अंतरापेक्षा वेगळे आहे, असा ताळा लावता येतो. शिवाय कोन किती वेगळा आहे, त्याचे नेमके गणित करून त्या गणिताचा ताळा लावता येतो. पुढे असे सांगता येते, की जुन्या सिद्धांताच्या गणितापेक्षा नवीन सिद्धांताचे गणित अधिक नेमका ताळा देते. अशा प्रकारे नवा सिद्धांत अधिक ग्राह्य ठरतो.

तात्पर्य हे : सूर्याजवळ तारा 'अ' असताना, म्हणजे दिवसा, त्याचे तारा 'ब'पर्यंत कोनीय अंतर मोजण्यासाठी सूर्याचा प्रखर उजेड झाकला जावा लागतो, म्हणून सूर्यग्रहणाचा फायदा या निरीक्षणासाठी होतो.

मल्टीपल इमेजेस

तिसऱ्या छायाचित्रात मल्टीपल इमेजेस असाव्यात अशी शंका मलासुद्धा आली होती. पण रिंगची डाव्या बाजूची कडा थोडी जास्त तेजस्वी आहे तशी कडा उजव्या बाजूला दिसली नाही त्यामुळे ते तसेच दिसले असावे असे वाटले.

त्याच छायाचित्रात रिंगच्या खाली लागूनच आणखी काहीतरी दिसतेय. तो लेन्सचा डाग आहे की प्रकाशाचा काही परिणाम?

बहुधा....

तिसर्‍या छायाचित्रात रिंगच्या खाली लागूनच काहीतरी आहे ते म्हणजे लेन्स फ्लेअर असावी. लेन्सचा डाग नाही. दुसर्‍या छायाचित्रातही चंद्राच्या मध्यभागी असे काही दिसत आहे.

-सौरभ.

==================

इतर वेळी दिसणार्‍या?

आकाशातील सर्व तारे(सूर्य सोडून) रोज ४ मिनिटे लवकर उगवताना दिसतात. त्यामुळे सूर्याच्या ग्रहणकालाच्यावेळी त्याच्या अगदी मागे असलेले व अर्थातच दिवसा उगवलेले तारे, काही महिन्यांनंतर रात्री उगवतात. त्या वेळचे त्यांचे स्थान व ग्रहण कालात दिसलेले त्यांचे स्थान यात हा फरक दिसतो.
चन्द्रशेखर

मागचे तारे / लपलेले तारे

माझ्या (अत्यल्प) ऐकीव माहितीनूसार खग्रास ग्रहणाच्यावेळी जे तारे एरवी सूर्यामागे लपायला हवे होते ते तारेही दिसतात /दिसले व त्यावरून हा नियम सिद्ध झाला.

असो चित्र आवडली.. पण स्वतः काढलेली चित्र दिली असती तर अधिक रोचक वाटले असते

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

मागचे तारे

अगदी बरोबर
चन्द्रशेखर

 
^ वर