भारतीयांच्या आगमनाचा दिवस

भारतीयांच्या आगमनाचा दिवस

'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' !

हो असा दिवस काही देशांत साजरा करतात. खरं वाटत नाही? पण हे खरे आहे.
जगात काही देशांत हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केला असतो. सुट्टीपण!!! मज्जा आहे.
हा दिवस कुठे आणि कसा साजरा करतात? कुतूहल वाढले ना?

ज्या देशात भारतीयवंशाचे लोकं १००-३०० वर्षांपूर्वी आले होते त्या देशांत हा दिवस साजरा केला जातो.

त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago ) ह्या देशात 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' पहिल्यांदा
साजरा करायला सुरूवात झाली होती. आणि त्यांचे अनुकरण इतर देशांनीपण केले आहे.
फ्रेंच वेस्टइंडिजचे ग्वादेलोप (Guadeloupe )आणि मार्टिनिक ( Martinique ) देश, गयाना (Guyana ) मॉरिशस ( Mauritius ) , सुरिनाम ( Suriname ), त्रिनिदाद आणि टोबॅगो (Trinidad and Tobago ), जमैका ( Jamaica ), युनायटेड किंग्डम ( United Kingdom )
अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा अमेरिका ( United States ) , कॅनडा ( Canada ) आणि ऑस्ट्रेलिया ( Australia ) हे देश 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' साजरा करतात. प्रत्येक देशांत हा दिवस साजरा करण्याची तारीख वेगवेगळी आहे.

हा दिवस साजरा करण्याचा त्रिनिदाद आणि टोबॅगो मधला इतिहासः
१९९० सालापासून त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' ३० मे हा दिवस राष्ट्रिय सुट्टी देवून साजरा केला जातो. ३० मे १८४५ साली, त्या काळातल्या भारत देशातील लोकं कामगार म्हणून फटेल रझाक ( Fatel Razack ) ह्या जहाजातून त्रिनिदादला आले होते.

पहिल्यांदा हा दिवस ३० मे १९४५ला भारतीय लोकं त्रिनिदादला येण्याला १०० वर्षे पुर्ण झाल्यामुळे साजरा केला गेला होता. हा दिवस सॅन फेरनान्डोच्या (San Fernando ) स्किन्नर बागेत (Skinner Park) साजरा केला होता. इथे भारतीयांना ईस्ट इंडियन असे संबोधले जाते. त्यावेळच्या युनायटेड किंग्डमच्या गव्हर्नरने ह्या सोहळ्याला सरकार तर्फे हजेरी लावली होती. टिमोथी रूदल (Timothy Roodal ) , जॉर्ज फित्झपाट्रिक (George Fitzpatrick ), एड्रीयन कोला रनझी (Adrian Cola Rienzi) आणि मुरली जे. क्रिपलानी (Murli J. Kirpalani) ह्यांची असंख्य संखेने जमा झालेल्या समुदायासमोर भाषणे झाली होती. महात्मा गांधी, लॉर्ड व्हावेल (Lord Wavell ) आणि कॉलोनेल स्टॅनली ( Colonel Stanley ) ह्यांनी पाठवलेल्या शुभ संदेशांचे वाचन करण्यात आले होते.

१९४५ साला नंतर हळू हळू हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण कमी झाले. १९५० सालापर्यंत त्रिनिदादमध्ये आलेल्या लोकांना शेतकर्‍यांचा दर्जा न देता कूलीचा (coolies ) दर्जा देण्यात आला होता. ७०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत हिंदू समूहाचे (Hindu group the Divine Life Society of Chaguanas )लोकं हा दिवस भारतीय स्थलांतर दिवस (Indian Emigration Day) म्हणून साजरा करत होते.

वर्णद्वेषाचा त्रास भारतीयांना जाणवायला लागला. भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी १९७६ साली भारतीय समुदायाने इंडियन रेव्हावल अँड रिफॉर्म असोशियसनची ( Indian Revival and Reform Association (IRRA)) स्थापना करण्यात आली. ३० मे १९४५ ह्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ भारतीयांच्या स्थलांतराचा दिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. ह्या समितीत आनंद सिंग (Anand Singh), खलिक खान (Khalik Khan ), रामदथ जगेस्सर (Ramdath Jagessar ), राजिव सीउनारिने (Rajiv Sieunarine ), अझामुद्दिन जान (Azamudeen "Danny" Jang ), मॅकेल संकर (Michael Sankar), राजेश हरिचंद्रन (Rajesh Harricharan ), रजनी रामलखन (Rajnie Ramlakhan ), आनंद महाराज (Anand Maharaj ) आणि अशोक गोबिन( Ashok Gobin) ह्यांचा समावेश होता.

१९७८ मध्ये त्यांनी एक पत्रक काढून भारतीय स्थलांतर दिवस ३० मे १९७८ला होणार आहे हे जास्तीत जास्त भारतीय समुदायाला सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या पत्रकात, ह्या दिवसाचे महत्व आणि हा दिवस कसा साजरा करणार हे नमूद केले होते. ह्यात १८४५ सालापासून त्रिनिदादमधल्या कामकाजात आणि भरभराटीत भारतीयांचा महत्वाचा वाटा कसा आहे हे ठळकपणे नमूद केले होते.
सॅन र्फेनँडो ह्या माध्यमिक शाळेने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. १९७९ साली ह्या सोहळ्याला खर्‍या अर्थाने एक दिशा मिळाली. सनातन धर्म महासभेची ह्या समूहाला जोड मिळाली. आणि मोठ्या प्रमाणावर हा सोहळा २७ मे १९७९ला मूलींच्या लक्ष्मी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. ह्यात सनातन धर्म महासभेने 'भारतीय हे १३४ वर्षे झालेले स्थलांतरीत नागरिक नसून ते ह्या देशाचेच नागरिक आहेत. ह्या मुद्दाच्या चर्चेतून 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' ही कल्पना पुढे आली होती.

१९७९ सालचा सोहळा खूप मोठ्याप्रमाणात चांगल्या प्रकारे यशस्वी साजरा झाला होता. ह्या सोहळ्यात भारतात जन्म झालेली स्थलांतरीत भारतीय नागरिकांचापण समावेश होता. रकारी क्षेत्रातील आमदार शाम आणि कमल मोहमेद (Kamal Mohammed ) ह्यांचीपण ह्या सोहळ्याला उपस्थिती होती. ह्या सोहळ्याची प्रसार माध्यमांनीपण चांगल्या प्रकारे दखल घेतली होती. ह्या सोहळ्याला सगळया त्रिनिदादमधल्या भारतीय समुदायाने पाठिंबा दिला होता.

१९८० पर्यन्त हा दिवस भारतीय वसाहतीच्या आणि कामांच्या ठिकाणी साजरा करण्यात येत होता.

१९८५ सालापर्यंत जवळपास नावाजलेल्या १०-१२ ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येत असे. हा दिवस चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी हिंदू संघाने पुढाकार घेतला होता.

१९९१ला त्रेवोर सुदाम (Trevor Sudama )आणि रेमंड ल्लाकड्रायसिंह (Raymond Pallackdarrysingh ) ह्या पार्लमेंटच्या सदस्यांनी 'भारतीयांच्या आगमनाच्या दिवसाला सार्वजनिक सुट्टी असावी असा प्रस्ताव सरकारपुढे मांडला आणि तो मान्यपण झाला.

१९९५ पर्यन्त हा दिवस 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून पाळण्यात येत होता. १९९५ सालच्या पंतप्रधानांनी ( Prime Minister Patrick Manning ) १५० वा 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून पाळण्यात यावा पण त्या नंतर ह्या दिवसाला 'आगमन दिवस' म्हणायचे आणि ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल असे घोषित केले होते.

१९५०चा सोहळा हा १९४५च्या सोहळ्याच्या मानाने खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला होता.

१९९५ सालच्या नविन पंतप्रधांनानी (Prime Minister Basdeo Panday) ३० मे हा भारतीयांच्या आगमनाचा दिवस म्हणूनच असावा आणि तो 'आगमन दिवस' म्हणून नसावा असे घोषित केले. ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल असे ही घोषित केले.

त्रिनिदादमधील भारतीयांच्या आगमन दिवसाची अधिक माहिती ह्या दूव्यावर वाचायला मिळेल.

२००९ साली झालेल्या सोहळ्यासाठी त्रिनिदादच्या राष्ट्राध्यक्षकांनी पाठवलेला संदेश इंग्रजीत ह्या दूव्यावर वाचायला मिळेल.

फ्रेंच वेस्टइंडिजच्या ग्वादेलोप (Guadeloupe) आणि मार्टिनिक ( Martinique):

ग्वादेलोप आणि मार्टिनिक ह्या देशांत संपूर्ण २००३ आणि २००४ हे साल ह्या देशातल्या भारतीयांच्या आगमनाला १५० वर्षे झाल्या प्रित्यर्थ भारतीयांच्या आगमनाचे वर्षे म्हणून साजरे केले होते.

ग्वादेलोप (Guadeloupe) ह्या देशात भारतातले तामिळ लोक पहिल्यांदा आले होते.

मार्टिनिक ( Martinique) ह्या देशात भारतातले तामिळ लोक पहिल्यांदा ऊसाच्या मळ्यात कामं करण्यासाठी कामगार म्हणून आले होते.

ह्या देशांत कोणत्या साली भारतीय लोकं आले होते त्याची अधिक माहिती मिळाली नाही.

गयाना :

५ मे १९३८ साली भारतीय कामगार ऊसाच्या मळ्यात कामं करण्यासाठी पहिल्यांदा गयानामध्ये आली होती. भारताच्या पूर्वेकडील कलकत्ता, बिहार ह्या राज्यांतील हे कामगार होते. गयानात ४४ % भारतीय वंशाचे लोकं आता आहेत. ह्या देशात हिंदी भाषेला राज्यभाषेचा मान दिलेला आहे. होळी (Phagwah) आणि दिवाळी हे सण गयानामध्ये साजरे केले जातात. ह्या हिंदू सणांला सार्वजनिक सुट्टी असते.
५ मे , भारतीयांच्या आगमनाचा दिवस हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

गयानाचा भारतीय वंशाच्या युवकाचे मत ह्या दूव्यावर वाचायला मिळेल. त्याच्या मते गयानामध्ये आलेले त्याचे पूर्वज हे खूप श्रीमंत असा माजिक वारसा घेवून आले होते.
अजून एक दूवा

मॉरिशस:

मॉरिशसमध्ये २ मे हा दिवस भारतीयांच्या आगमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. २ मे १८३४ (किंवा कितेक वर्षे आधी ) ला भारतीय वंशाच्या कामगारांचे ह्या देशात आगमन झाले होते. १८३४ साली आलेले कामगार करार करून (Indentured Labourers ) ऊसाच्या मळ्यात कामं करण्यासाठी आले होते. त्यांना सरदारांच्या (Sardaar ) हाताखाली कामं करणारे कूली (coolies ) म्हणून संबोधले जात होते.

गुजराती,तामिळ आणि तेलगू हे १९३८ सालाच्या आधीपासून ह्या देशात कुशल कामगार म्हणून कामं करत होते. ही कामगार मंडळी बहूतेक करून फ्रेंच लोकांनी आपल्या बरोबर आणली असावी असा अंदाज आहे.

ह्या देशातल्या भारतीयांना इंडो-मॉरीशीयन (Indo-Mauritian) म्हणून संबोधतात.

२००७ च्या गणनेनुसार भारतीय वंशाच्या लोकांचे प्रमाण ६८% आहे. ह्यात बिहारी लोकांचे प्रमाण जास्त आहे. मराठी लोकं ही ह्या देशात आहे. इंडो-मॉरीशीयन हे अजूनही आपल्या भारतात राहाणार्याे नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. लग्नासाठी ही मंडळी भारतातल्या मुला मुलींना प्राधान्य देतात. ह्यामुळे ते भारतीय संस्कृतिचा वारसा जतन करत आहेत. ह्या देशात बोलली जाणारी मराठी भाषा कदाचित शुद्ध मराठी भाषा असावी.

सुरिनाम :

सुरिनाम दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. सुरिनाम हा नेदरलँड्स व्यतिरिक्त पश्चिम गोलार्धातील एकमेव देश आहे जेथे डच ही भाषा राष्ट्रीय भाषा म्हणुन वापरली जाते. सुरिनामची संस्कृती अत्यंत विभिन्न आहे. सुरिनामच्या जवळजवळ ५ लाख लोकसंख्येपैकी ३७% लोकं भारतीय वंशाचे ( Hindoestanen)आहेत. १९व्या शतकात बिहार व पूर्व उत्तर प्रदेश भागातून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले व त्यांचे वंशज सुरिनामच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहेत.
भोजपुरी हिंदि ही भाषा सुरिनामीयानमध्ये बोलली जाणारी तिसर्या नंबरवरची भाषा आहे. करार करून आलेली भारतीय कामगारांची पिढी ही भाषा अजून ही बोलतात.
सुरिनाम ह्या देशात ५ जून हा भारतीयांच्या स्थलांतरचा दिवस म्हणून साजरा करतात. ५ जून (June 5 - Immigration of the Indians ) हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. दिवाळी आणि होळी (Phagwa)ह्या हिंदूंच्या सणांला इथे सार्वजनिक सुट्टी असते.

ह्या देशात भारतीयांच्या आगमन दिवसा बरोबरच जावा आणि चिनी लोकांची पहिली बोट ज्या दिवशी ह्या देशात आली त्या दिवशी त्यांच्या आगमनाचा दिवस साजरा करतात व त्या दिवशीपण सार्वजनिक सुट्टी असते. ८ ऑगस्ट हा आशियन वंशीयानसाठी (August 8 - Day of the indigenous people) व जावा वंशीयानसाठी ९ ऑगस्ट (August 9 - Immigration of the Javanese) साजरा केला जातो.
सुरिनाममध्ये झालेल्या १३६व्या भारतीयांच्या स्थलांतरच्या दिवशी (Immigration of the Indians) कंवलजीत सिंग सोधी (Kanwaljit Singh Sodhi - Ambassador of India to Suriname ) ह्यांनी पाठवलेला संदेश ह्या दूव्यावर
इंग्रजीत वाचायला मिळेल.

जमैका:

१० मे १८४५ ह्या दिवशी जमैकात भारतीय वंशाचे कामगार ऊसाच्या व केळींच्या मळयात काम करण्यासाठी आले होते.
१८४५ साली एस्. एस् ब्लुंदेल्ल ह्या बोटीतून आलेले आणि १९१७ साली आलेले कामगार मिळून जवळ जवळ ३६००० भारतीय हे जैमेकात आले होते.
१० मे हा 'भारतीय संस्कृतिचा वारसा दिवस'(Indian Heritage Day ) म्हणून साजरा करतात.
जैमेकेत राहणार्‍या भारतीयवंशाच्या लोकांना इंडो-जैमिकनस् (Indo-Jamaicans ) म्हणतात.
युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांत हा दिवस कसा साजरा करतात ह्याची अधिक माहिती मिळाली नाही.

कॅनडा:
२०व्या शतकाच्या सुरूवातीला भारतातल्या पंजाब प्रांतातील शीख समुदाय पहिल्यांदा कॅनडामध्ये आले होते. त्यातील बरेच भारतातल्या ब्रिटिशराजमध्ये सैनिक म्हणून होते.
कॅनडात भारतीयांच्या आगमनाचा दिवस कशा प्रकारे साजरा करतात ह्याची अधिक माहिती मिळाली नाही.

ऑस्ट्रेलिया :
असे म्हटले जाते की पहिला भारतीय ऑस्ट्रेलियात आला तो कॅपटं कूकच्या जहाजा बरोबर. ऑस्ट्रेलियात आलेल्या भारतीयांमध्ये पंजाबी समुदायाचे लोकं जास्त प्रमाणात होते. १९९५ साली सरदार बीर सिंग जोहल व १९९८ साली सरदार नारायण सिंग हेयेर आले होते.

ऑस्ट्रेलियात भारतीयांच्या आगमनाचा दिवस कशा प्रकारे साजरा करतात ह्याची अधिक माहिती मिळाली नाही.

सारांश :

iad summary

संदर्भ दूवे:
Indo-Guyanese
Indo-Jamaican
Indo-Trinidadian
Indo-Caribbean
Indo-Canadians
Indo-Mauritian

लेखनविषय: दुवे:

Comments

वेगळी आणि रोचक माहिती

लेख आवडला.

धन्यवाद.

फारच छान

एकदम फ्रेश् माहिती. आवडला लेख. सर्वात गंमतीचे हे वाटले की पावणे दोनशे वर्षांपूर्वी या देशात आलेले लोक अजून स्वतःला भारतीय वंशाचे समजतात व आगमन दिवस साजरा करतात. गेल्या वीस पंचवीस वर्षात भारतातून बाहेर गेलेल्या लोकांपैकी काही आपण कसे अभारतीय आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. निदान माझा तरी तसा अनुभव आहे.
चन्द्रशेखर

फरक

माझ्या मते १००-३०० वर्षापूर्वी भारता बाहेर गेले लोकं नाईलाजाने ब्रिटिशराज च्या काळात गेलेली आहेत.

२०-२५ वर्षापूर्वी गेलेले स्वखुषीने गेलेले असावे.

रोचक

माहिती रोचक आहे. लेख आवडला आणि दोनेकशे वर्षांपासून भारतीय संस्कृती जपण्यासाठी या सर्व लोकांचे जे काही प्रयत्न सुरू आहेत ते पाहून खूपच आदर वाटला.

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

माहितीबद्दल धन्यवाद

अतिशय चांगली माहिती दिली आहे. हल्ली माझे गाव आणि तुझे गाव असली क्षुद्र भांडणे जालावर लढविली जात असलेली पाहून आलेली विषण्णता जरा दूर झाली.
अन्य देशातील नागरिकांच्या आगमनदिनी सुट्टी देणार्‍या देशांकडून सद्भावाचे सुखद दर्शन झाले.

३१ मे २००९, ऑरेंज काऊंटी, फ्लोरीडा

ऑरेंज काऊंटी, फ्लोरीडाला ३१ मे २००९ रोजी ९वा 'भारतीयांच्या आगमनाचा दिवस' साजरा करण्यात आला. अधिक माहिती ह्या दूव्यावर इंग्रजीत वाचायला मिळेल.

फोटो

काही फोटो:

IAD Trinidad
IAD Design on hand
guyana-1
Guyana-2
Guyana-3
 
^ वर