सरकारी मराठी

जालावर मराठी भाषेसाठी काही साधने आहेत का?
सरकारी स्तरावर भारतीय भाषांसाठी काय प्रयत्न होत आहेत का?
असा मी मागे शोध घेत होतो.
हा शोध घेतांना खालील सरकारी स्थळ हाती लागले.

http://www.ildc.in/Marathi/mdownload2000.html

येथे मराठीच नाही तर अनेक भारतीय भाषांचे काम सुरु आहे असे दिसते आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे मराठी साठी ओ सी आर, म्हणजे मराठी मजकूर स्कॅन केला असता त्यातील अक्षरे संगणक ओळखून कॉपी वगरे करू शकेल असे तंत्रज्ञान तयार आहे.

येथे उपलबध असलेल्या सर्व साधनांची यादी खालील प्रमाणे -

(मात्र त्यातले काही काही मला कळले नाही कुणी उकल करून सांगू शकेल काय?)

 • मराठी भाषेचे ट्रू-टाईप फाँन्टस व कि-बोर्ड ड्रायव्हर म्हणजे श्री लिपीला ला टक्कर का?
 • मराठी भाषेचे ट्रू-टाईप मल्टीफाँट व कि-बोर्ड इंजिन - इंजिन आणि ड्रायव्हर मध्ये नक्की काय फरक, आणि असे वेगळे का असावे ते?
 • मराठी भाषेचे युनिकोड आधारीत ओपन टाईप फाँन्टस - म्हणजे गमभन ला पर्याय का?
 • मराठी भाषेचे युनिकोड कि-बोर्ड ड्रायव्हर
 • मराठी भाषेचे विभिन्न प्रकारचे फाँन्ट्स आणि स्टोरेज कोड परिवर्तक - म्हणजे काय असते?
 • भारतीय ओपन आँफिस (ओपन सोर्स) मल्टीप्रोटोकाँल संदेशवाहक चे मराठी स्थानीकरण - म्हणजे काय असते?
 • मराठीचे अक्षर जोडणी तपासनिस - म्हणजेच मराठीत आपले स्पेल चेकर हो!
 • मराठी-इंग्रजी शब्दकोष
 • मराठी डेकोरेटिव (अंलंकारिक) फाँन्ट डिजाईनर उपकरण - वा वा वा!!
 • मराठी डाटाबेस साँर्टींग (वर्गीकरण) उपकरण - शंतनूरावांना हे रसपूर्ण वाटावे.
 • मराठी टंकलेखन सहाय्यक
 • मराठी शब्द उपकरण
 • मराठी एक्सेल उपकरण
 • मराठी भाषेचे लिप्यंतरण उपकरण
 • मराठी इंग्रजी टायपिंग शिक्षक
 • मराठी ओसीआर - हेच ते स्कॅनींगवाले!

ही सर्व उपकरणे तुम्ही डाऊनलोड करू शकताच तसेच शिवाय हे सगळे लिनक्स बेसही मिळते! याची सीडी पण मागवू शकता.

मी मागवली, आणि आली चक्क संपुर्णपणे मोफत!
पण मी अजून यातले काही वापरले नाहीये, पण चढवून पाहतो.
मग लिहिनच. पण हा आनंद तुमच्याशी लगेच वाटून द्विगुणीत करावा असे वाटून लागलीच हे लिहिले.

तुम्हीही मागवा आणि तुमचे अनुभव कळवा.

-गुंडोपंत

Comments

उत्तम

मराठी ओसीआरबाबत सीडॅकमध्ये एक प्रकल्प सुरू होता असं समजतं. या दुव्यावरील सॉफ्टवेअर जर कार्यरत असेल, तर उत्तमच. प्रोजेक्ट गटेनबर्गसारखा प्रकल्प मराठीतही राबवता येईल. माहितीबद्दल धन्यवाद, पंत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रोजेक्ट गटेनबर्गसारखा प्रकल्प मराठीतही

प्रोजेक्ट गटेनबर्गसारखा प्रकल्प मराठीतही राबवता येईल.

ही कल्पनाच फार छान आहे.

मलाही फार आनंद झाला हो हे पाहून. माझे मत आपले सरकार भाषेसाठी काही करतच नाही या कल्पनेने फार कडवट झाले होते.
पण परिस्थिती तशी नाही हे पाहून बरे वाटले.

असो, प्रो.ग.प्र.म. बद्दल काही अजून विस्तारीत चर्वीतचर्वण करता येईल काय?
म्हणजे इथले ओ सी आर जर चांगले निघाले (देव करो नि निघो!) तर काय काय करत येईल आणि कसे केले पाहिजे?

ते सरकारी डिजिटळ लायब्ररी सारखे नको व्हायला. पुस्तक नको पण सर्च आवर!

आपला
गुंडोपंत

निराशा

साधरण वर्षापुर्वी माधव शिरवळकरांनी लोकसत्तेत या स्थळाबद्दल माहिती दिली होती. http://sanganaktoday.blogspot.com/2008/05/blog-post_11.html

मी त्यानंतर दोनदा सीडी मागवली पण आली नाही. :-(

पुन्हा प्रयत्न करीन.

मला मराठी ओसीआर बद्दल उत्सुकता होती पण लिनक्स वर ते उपलब्ध नसल्याने नाद सोडला.

अरे!?

अरेरे आली नाही हे वाचून वाईट वाटले.
मला तर आली आहे बॉ!

अर्थात तेथे ते सगळे उतरवून घ्यायचीही सोय आहेच ना... मग काय गरज सी डी ची?

आपला
गुंडोपंत

:(

संकेतस्थळावर रजिस्टरच होता येत नाही.


तेच आहे हो सी डी मधे

तुम्हाला शक्य असेल तर सरळ स्थळावरूनच उतरवून घ्या.
कारण हीच यादी आहे सी डी मध्ये.

शिवाय मंत्र्यांचा संदेश आणि सोनीया गांधींचे चित्रपण,
मला नाही वाटत की अगदी आपल्या हे सगळ्यांना त्याची गरज आहे ;)

असो,
मी आत्ता पाहिले तर डाऊनलोड वर टिचकी दिली तर मला येथे घेवून गेला. http://www.ildc.in/Marathi/tools/16.htm

मग एक इ एक्स ए झिप फाईल देतो आहे तो उतरवायला.

एकदा व्हायरस साठी तपासून मग चढवायला हरकत नसावी.

आपला
गुंडोपंत

संकेतस्थळावर रजिस्टरच होता येत नाही.

संकेतस्थळावर रजिस्टरच होता येत नाही.

मलापण हाच अनुभव आला.

आपल्या नशिबी मोफत/फुकट काही मिळणार नाही असे वाटते.

दोन वर्षापूर्वी

मी त्यानंतर दोनदा सीडी मागवली पण आली नाही. :-(

मी मराठी, संस्कृत, हिंदी आणि गुजराती अश्या ४ भाषांच्या सान्द्रमुद्रिका (सीडी) मागविल्या होत्या. त्यापैकी फक्त संस्कृत भाषेची सान्द्रमुद्रिका (सीडी) आली. इतर आल्याच नाहीत.

--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

मराठी ठिगळे(पॅचेस)

ऑफिस २००३ पासून पुढच्या आवृत्त्यांत वरील सर्व सुविधा अंर्तभूत असल्याने वरील मराठी ठिगळे (पॅचेस) परत संगणकात डाऊनलोड कशासाठी करायची हे कोणी तज्ञ सांगू शकेल कां?
चन्द्रशेखर

काय सांगता?

ऑफिस २००३ पासून पुढच्या आवृत्त्यांत वरील सर्व सुविधा अंर्तभूत असल्याने

काय सांगता?
म्हणजे मी एक मराठी मजकूर स्कॅन करून त्याच्या वरील सर्व अक्षरे युनिकोड मध्ये उतरवून घेवू शकतो?

खरे सांगताय?
सांगा मग टप्पेदार पणे कसे करायचे ते.

आपला
गुंडोपंत

काय सांगता?

आपण जेंव्हा एखादा स्कॅन करतो तेंव्हा एक चित्र म्हणून तो कागद वाचवला जातो. या चित्रातून बाहेर काहीच काढणे शक्य नसते.
मग हे या ओ.सी.आर मधे कसे शक्य होते? ही सोय ऑफिसमधे नाही. पण बाकीच्या आहेत.
चन्द्रशेखर

स्कॅन केलेल्या कोणत्याही मजकूरातील

स्कॅन केलेल्या कोणत्याही मजकूरातील
भाषा इंग्रजी (अथवा रोमन लिपीतील असेल) तर अक्षरे ओळखून ती कॉपी, पेस्ट वगैरे करता येतात.
मात्र स्कॅन करतांनाच तसे सेटींग करावे लागते.

मजकूर, चित्र प्रतिमा म्हणून स्कॅन केले तर अक्षरे उचलता येत नाहीत.

मात्र ही सुविधा भारतीया भाषांसाठी विकसित झालीच नाही, कारण जो तो आपली भाषा पुढे रेटणार. अणि भारतीयांना एकुणच 'लिपी' या प्रकाराबद्दल बर्‍यापैकी अनास्थाच आहे असे वाटते.
मग ज्यांना आपल्या भाषेची काळजी नाही ते बसणार तसेच.

(तसेच मा सॉ ऑफिस मध्ये श्री लिपी सारखे अक्षरांशी खेळता येत नाही. वर्ड आर्ट वापरून मर्यादित स्वरूपात मांडणी करता येते.
श्री लिपी वापरून कोरलड्रॉ मध्ये सुंदर प्रकारे अक्षरे वळवता येतात. पण दुर्दैवाने कोरलड्रॉ युनिकोड ओळखत नाही!)

असो,
स्कॅनिग करतांना देवनागरी अक्षरे 'उचलता' आली, म्हणजेच ऑप्टिकल रेकग्निशन ऑफ कॅरॅक्टर करता आले तर खुपसे काम सोपे होईल!

आशा आहे हे प्रगत रितीने काही दिवसात साध्य होईल.

आपला
गुंडोपंत

इंकस्केप

कोरलड्रॉ ला पर्याय म्हणून इंकस्केप वापरून बघा.
इंकस्केप ही मुक्तस्रोत (व फुकट !) प्रणाली आहे.

माझा संगणक

माझा संगणक इतका हळू चालतोय की मी अजून त्यातले काहीच वापरून पाहु शकलो नाहीये.
आज २ वेळ बंद पडला.
:(

आपला
गुंडोपंत

माझा संगणक

श्री गुंडोपंत
हार्ड डिस्क साफ करून घ्या. आणी ऍन्टीव्हायरस कार्यक्रम पण चालवा एकदा.
चन्द्रशेखर

लायनक्ससाठीची फाईल उघडत नाही

लायनक्ससाठीच्या फाँटांचे गाठोडे (झिप फाईल) उघडू म्हणता उघडत नाही. गाठोड्याची गाठ चांगलीच पक्की बसलेली दिसते. ह्या गाठीने गाठोड्यातील काही फाँटही चेंगरुन गेले आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उपयुक्त माहीती

एकदम उपयुक्त माहीती आहे. मराठी ओपन ऑफिस डाउनलोड करून केवळ उत्सुकता म्हणून बघणार आहे. डाउनलोडच्या पानावर सहज जाऊ शकलो.

बाकी बाजूला ज्ञानेश्वर आणि त्यांच्या खाली पंतप्रधान मनमोहनसिंग, (औपचारीक सरकारी पद नसूनही) सोनीया गांधी, आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे चेहरे झळकलेले पाहून "अरे अरे विका झालासी पावन" असे स्वगत म्हणले गेले ;)

व्हायरस

ओ सी आर मध्ये भानगड आहे!
झिप् फाईल ओपन करतांना, सेट अप फाईल ओव्हर राईटकरू का असे विचारल्यावर नो म्हणा नाही तर सेट अप चालत नाही!

शिवाय माझा संगणक यातील ओ सी आर मध्ये व्हायरस आहे असे म्हणतो आहे.
त्यामुळे काय करावे कळत नाहीये मला.

कुणाला ही अडचण आली आहे का? काय केले तुम्ही?

आपला
गुंडोपंत

 
^ वर