ओझोन ईशारा दिवस

ओझोन ईशारा दिवस

माझ्या र्‍होड आयलंडच्या वास्तवात, मी माझ्या अमेरीकन सहर्‍या कडून पहिल्यांदा ओझोन ईशारा दिवसाबद्दल एकले. पूढच्या आठवडयात आहे. स्वतःची काळजी घे, हे सांगुन तो ४-५ दिवसांच्या "समर व्हेकेशन"/ सुट्टीवर गेला. तो "समर व्हेकेशन" मूडमधे असल्यामुळे त्याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची काही एक शक्यता नव्ह्ती.

मी पण काही जास्त लक्ष्य दिले नाही. असेल एखाद्या "डेज्" सारखे काहीतरी.
पण "ओझोन" हे तर वायुचे नावं आहे. मनात अनेक प्रश्ने उठली. ओझोनच्या नावाचा का बरे ईशारा दिवस पाळत असेल? ओझोनमुळे काय बरे त्रास होत असतील? जमिनीलगतच्या ओझोन थरामुळे माणसांना किंवा जिवंत प्राण्यांना काय त्रास होत असेल?

आतापर्यंत जे काही दिवस पाळण्याचे "नावं" आठवतात, त्यात कुठेही "ईशारा" हा शब्द आलेल्याचे आठवत नाही. हे काही तरी वेगळे आहे. अधिक माहिती कोणाला तरी विचारली पाहीजे. कुठल्या संकेतस्थळावर काही माहिती मीळते का ते पण पाहावे, असे मनात आले. आणि माहितीच्या आंतरजालावर ह्या विषयाची काही माहिती मिळते का ह्याची माझी शोध मोहिम सूरू झाली.

र्‍होड आयलंडच्या पर्यावरण व्यवस्थापन विभागाच्या (State of Rhode Island- Department of Environmental Management (DEM)) संकेतस्थळावर (http://www.dem.ri.gov/ ) बरीच उपयूक्त माहिती उपलब्ध होती. माहिती वाचत असताना ह्या विषयाचे गांभिर्य थोडेफार लक्ष्यात येत होते.

र्‍होड आयलंडला "ओझोन ईशारा दिवस" कशा पद्धतीने पाळतात, ह्याची जी माहिती मी जमवली होती त्या माहितीच्या आधारावर हा लिहीलेला लेख, मी उपक्रमावरच्या वाचकांसाठी देत आहे.

ओझोन काय आहे?
ओझोन हा रंग नसलेला, हवेत असलेला वायु आहे. पृथ्वीच्या बाहेरील आवरणालगतच्या थरावर ओझोन वायुचा थर असतो. सूर्यापासुन निघणारे "अतिनील" किरणे पृथ्वीवर येण्यास थोपवून धरण्याचे काम ओझोन वायुचा थर करतो. जेंव्हा ओझोन पृथ्वीवर आढळतो तेंव्हा त्याला " जमिनीलगतचा ओझोन थर (ground-level ozone)" असे म्हणतात. जमिनीलगतचा ओझोन थर हा वायु प्रदूषणास कारणीभुत ठरतो, तसेच तो माणसाच्या आरोग्याला घातक असतो.

ओझोनचा काय त्रास होतो?
वारंवार जमिनीलगतच्या ओझोन थराशी संपर्क आल्यास, श्वास घेण्यास त्रास होणे, सर्दि, खोकला, डोळे चुरचुरणे सारखे त्रास होतात. श्वसनासंबंधील रोग होतात. लहानमुले आणि वयोवृधांना, घराबाहेर उन्हात असल्यास ओझोनचा त्रास जास्त होतो.

जमिनीलगतचा ओझोन थर वाढण्यापाठीमागे कोणती कारणे कारणीभुत आहेत?
सूर्यप्रकाशात हवेत असलेले काही रासायनिक कण आणि नायट्रोजन वायु एकत्र आल्यास त्यांच्या प्रक्रियेतून "जमिनीलगत ओझोनचा थर" तयार होतो. हवेत असलेल्या रासायनिक कणांमुळे, वाहानांच्या धूरामुळे, कारखान्यातून हवेत सोडल्या जाणार्याा रासायनिक वायुंच्या धूरामुळे, हवेत उडणार्याह विमानांनमुळे, बांधकामाच्या वेळी तयार झालेल्या धूळीमुळे, बगीच्यात वापरल्या जाणार्या उपकरणातून हवेत मिसळनार्या् धूळीमुळे, विजेच्या उपकरणांमुळे, जमिनीलगतच्या ओझोन वायुच्या थराचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

ओझोन ईशारा दिवस (Ozone Alert Day) काय आहे?
ज्या दिवशी पृथ्वीवरील जमिनीलगतच्या ओझोन थराचे प्रमाण, हवामानाच्या अंदाजाप्रमाणे आरोग्याला घातक आहे हे ठरवले जाते, त्या दिवसाला "ओझोन ईशारा दिवस" असे म्हणतात. उन्हाळा संपण्याच्या दिवसांमधे असे एका पेक्षा जास्त ओझोन ईशारा दिवस असतात. ह्या दिवसाला "अती प्रदूषण सल्ला दिवस (High Pollution Advisory Days)" असेपण म्हणतात.

र्‍हो ड आयलंड राज्यात ओझोन ईशारा दिवस कशाप्रकारे ठरवतात आणि पाळतात?
र्‍होड आयलंडच्या पर्यावरण व्यवस्थापन विभागावर ओझोन ईशारा दिवस कधी कधी पाळायचे ह्याचे वेळापत्रक ठरवायची जबाबदारी असते. हवामानाचा अंदाज घेत, ते हवेतली ओझोनचा थर आणि हवेतले त्याचे प्रमाण किती खराब आहे हे पाहुन ओझोन ईशारा दिवस ठरवतात. ओझोन ईशारा दिवसांचे वर्षाचे वेळापत्रक ठरवले जाते. संकेतस्थळांवर तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्था, कार्यालये, मॉल...इत्यादी मधे हे वेळापत्रक ठळकपणे लावलेले असते. लाहान मुलांसाठी भिंतीपत्रके तयार करण्याची स्पर्धा आयोजीत करुन, ओझोन ईशारा दिवसाबद्दलची जन जागॄकता निर्माण करतात.

ओझोनची हवेतली पातळी बघण्यासाठी राज्यात ३ ठीकाणी (Narragansett, Richmond and East Providence) नियंत्रणकक्ष आहे. प्रत्येक तासाला त्याची नोंद संगणकावर करण्यात येते, प्रोविडंसच्या मुख्य नियंत्रणकक्षाच्या संगणकाला बाकीचे दोन संगणक जोडलेली आहे.

संगणकावर झालेल्या नोंदीचा सखोल अभ्यास करून काही निकष लावले जातात. ते निकष न्यु इंग्लंड, न्यु जर्सी, न्युयार्क ह्या जवळच्या राज्यांच्या नोंदीशी पडताळून, ओझोनचा थर ह्या विभागात कधी कधी घातकारक आहे हे ठरवतात. ठरवलेले वेळापत्रक, प्रसारमाध्यमांना, राज्याच्या वाहतूक विभागाला कळवले जाते. वाहतूक विभाग, ओझोन ईशार्यां च्या दिवशी, राज्याच्या वाहतूक विभागाच्या बसने केलेला प्रवास सगळ्यांसाठी " मोफत" असे जाहीर करतो. हा मोफत प्रवास बहुतेकदा रविवारी असतो. हे वाचल्यावर माझ्या मनात आले "राज्यात कुठेही मोफत प्रवास !!!", महाराष्ट्रात असे कधी जाहीर झाले तर नागरीकांची कशी प्रतिक्रीया असेल???

राज्य सरकार, वाह्तूक विभाग (RIPTA) आणि पर्यावरण व्यवस्थापन विभाग(DEM) एकत्रीतपणे ओझोन ईशारा दिवसाच्या दिवशी नागरीकांनी कोणती खबरदारी घ्यायची, ह्याचे काही सूत्रे ठरवतात की ज्यामुळे ओझोनचे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. वाहानातून सुटण्यार्या धूरामुळे, रासायनिक प्रक्रियांच्या धूरामुळे मोठयाप्रमाणात ओझोनचे प्रदूषण वाढते.

काही सूत्रे

  • वाहाने कमी चालवा:

प्रवास करायचा असल्यास राज्याच्या बस सेवेचा उपयोग जास्तीत जास्त करा. फक्त बिचला जाणारी बस सोडुन, बाकीच्या कुठल्याही मार्गावरचा, आजचा प्रवास हा मोफत/फुकट प्रवास असेल. प्रवास टाळणे शक्य नसेल तर, आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींसोबत प्रवास करा.

  • विजेचा सांभाळुन वापर करा:

विजेचे उपकरणे वापरात नसेल तर, त्या उपकरणाचा विजेचा पुरवठा बंद करा. घरातील तापमान नियंत्रण यंत्रणेचे तापमान थोडे वाढवा.

  • वहानांमध्ये इंधन भरण्याचे टाळा:

गरज पडल्यास अंधार पडल्यावर वहानात इंधन भरा.

  • उन्हात फिरण्याचे टाळा:

दुपारच्यावेळी उन्हात फिरण्याचे टाळा. भरपूर पाणी प्या.

माझा "ओझोन ईशारा दिवसाचा" प्रत्यक्ष अनुभव:

ओझोन ईशारा दिवसाची माहिती वाचून मिळाली होती. पण तो दिवस ह्या राज्यात कसा पाळतात हे जाणून घ्यायची उस्तुकता होतीच. जुलै महिन्याच्या एका रविवारी ओझोन दिवस होता (बहुतेक १६ जुलै २००६, नक्की तारीख आठवत नाही). आज घरा बाहेर पडायच नाही हे आधी ठरवले होते. पण हातात काहीच कामे नव्ह्ती. झोपायचा असफल प्रयत्नत करून झाला. घरातून बाहेर बघितलेतर, उनं असल्याच जाणवत होते. पण एवढे उनं आपल्या कडेपण असते. आतांपर्यंत बाहेर न जाण्याचा निश्चय ह्ळूच ढासळला. बाहेर जाण्याचा मोह आवरता आला नाही. एखाद्या मॉल मधे जावू. संध्याकाळी उनं उतरल्यावर परत येऊ, असे ठरवले. पाण्याची बाटली, सफरचंद सोबत घेवुन मी बाहेर बस थांब्याजवळ आली. उन्हाचा चटका जाणवत होता. बस थांब्यावर एक आ़जीबाई भेटली. ती सांगत होती, रविवार असल्यामुळे आज मी माझ्या मुलीकडे, माझ्या ५ वर्षाच्या नातीला भेटायला चालले आहे. उनं खुप आहे, याचा त्रास होतो पण नातीला भेटायचे असल्यामुळे, मला जायचे आहे. फक्त रविवारीच मी तीला भेटू शकते. इतर दिवस ती तीच्या बाबांकडे असते. तेवढयात बस आली. बसचा ड्रायव्हर स्वतःहा दारात आला आणि आजीबाईंचा हात हातात घेवून तीला बसमधे घेतले. तीच्या पाठीमागुन मी आत चढले. तिकीटाचे पैसे टाकण्याच्या डब्ब्यावर कापड टाकले होते. त्यावर "ओझोन ईशारा दिवस- मोफत प्रवास" असे लिहीलेले होते. तिकीटांचा गठ्ठांपण नेहमी सारखा बस ड्रायव्हरच्या बाजूला दिसत नव्हता. माझी गोंधळलेली नजर बघून ड्रायव्हर हसत आपले खांदे उडवत "फ्री राईड" असे म्हणाला. त्याने बस सुरू केली. प्रत्येक बस थांब्यावर ड्रायव्हर हसत खाली उतरून म्हातार्याय आजी आजोबांना हात देत बसमधे बसवायचा, आणि कोणाला उतरायचे असल्यास उतरावयाचा. मला हे बघून गंमत वाटत होती. शेवटचा थांबा आला. मी बस मधून खाली उतरली. रस्तावर नेहमीपेक्षा वर्दळ खूपच कमी होती. मॉलमध्ये जावून थोडावेळ घालवला. थोडा अंधार पडल्यावर मॉलमधून बाहेर पडले. आता दिवसभराचा "कफ्रु" उठल्या सारखे बाहेर रस्त्यावरचे वातावरण दिसत होते.

र्‍होड आयलंड राज्यासारखे, अमेरीकेच्या इतर काही राज्यात सुद्धा "ओझोन ईशारा दिवस" पाळतात.

Comments

छान लेख..

वा! माहिती आवडली
मला या दिवसाबद्द्ल अजिबात माहित नव्हते.. आता या निमित्ताने बरेच संदर्भ चाळले..
छान लेख.. अजून येऊ द्या!

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

+१

चांगली माहीती, असेच म्हणतो.

चांगला लेख, पण..

लेख चांगला आणि समयोचित आहे. या विषयावर लिहिणे-बोलणे आता मागासलेपणाचे लक्षण वाटावे, इतका समाज आत्मकेंद्रित होतो आहे, त्यामुळे अभिनंदन.
तथापि लेखातील शुद्धलेखनाच्या (अनेक) चुका फारच खटकल्या (जुनी खोड! स्वतःलाही सोडलं नाही!) इषारा, पुढच्या, सांगून, वायूचे, मिळते, उपयुक्त, गांभीर्य, वायू, कारणीभूत, मोहीम, सर्दी, वयोवृद्ध, उडणार्‍या, जाणार्‍या, ठिकाणी, सोडून, विजेची उपकरणे, उत्सुकता, मी आले, तिला, कर्फ्यू वगैरे.
(आपण शुद्ध लिहिण्याचे प्रयत्न करत राहू, मग शुभानन गांगल आणि सतिश रावले काही का म्हणेनात!)

सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!

सतिश रावले?

रावले नाही, रावलॅ. त्यांचे खरे आडनाव रावलॅ आहे. त्यांनी नाव बदलले?
मूळ अरबी शब्द इशारा. 'इषारा' न लिहिता 'इशारा' लिहिले तर अधिक चांगले. अरबी-फार्सीत 'ष' नाही. आपण खूष आणि पोषाख लिहितो, ते चालून जाते; हेही जाईलच.
आणखी काही सुधारणा करता येतील असे शब्द: सहर्‍या(x),बिचला(x) , प्रोविडंस(x), उनं(x), ह्ळूच(x)--वाचक्‍नवी

छान

चांगला लेख.

राज्य सरकार, वाह्तूक विभाग (RIPTA) आणि पर्यावरण व्यवस्थापन विभाग(DEM) एकत्रीतपणे ओझोन ईशारा दिवसाच्या दिवशी नागरीकांनी कोणती खबरदारी घ्यायची, ह्याचे काही सूत्रे ठरवतात
बापरे आणि ते करतातही?
असे कसे काय होत असावे?
आमच्या कडे असे व्हायला फार म्हणजे फार वेळ लागतो बॉ!
म्हणजे आपल्या गणपतीच्या मिरवणूकीचेच घ्या ना. दरच वर्षी असते तरीही त्याचे कोणते रस्ते या काळात बंद असणार आणि पर्यायी रस्ते कोणते घ्यावेत पत्रकही कधी दिसत नाही हो आम्हाला. गाडी पार जाऊन तेथे अडली, की मगच कळते, आर्र्! आज मिरवणूक नाही का!! चला शालिमारला जाऊच नका, गंजमाळवरूनच वळा! पण शहरात नवीन येणारे कुठे जात असतील ते तर देवालाच ठाऊक!

त्यामुळे उन्हाळयात घेण्याची काळजी वगैरे असे ही काही दिसत नाही. अर्थात त्यांनी इषारे दिले तरी लोकांनी ते ऐकले पाहिजेत म्हणा...

असो,
आपली माहिती देतांना आपला अनुभवही त्यात गुंफण्याची शैली छान आहे. त्यामुळे निव्वळ खडखडीत आकडेमोड किंवा रटाळ गिळगीळीत माहितीपूर्ण लेख वाचला, असे न होता काही तरी 'छान' वाचायला मिळाल्याचा आनंद मिळतो.
एकुण लेख आवडला!

आपला
(वाचक)
गुंडोपंत

गणपतीच्या मिरवणूकीच्या काळात

आपल्याकडे गणपतीच्या मिरवणूकीच्या काळात कोणते रस्ते या काळात बंद असणार आणि पर्यायी रस्ते कोणते हे २-३वर्षांपासून टिव्हीवर दाखव आहे. निदान मुंबईच्या वाहतूकीची माहिती काही वाहिन्यांवर २-३ दिवस आधी पासून दाखवतात. पण आपला जो गोंधळ व्हायचा तो होतोच.

१६ सप्टेंबर - वर्ल्ड ओझोन डे

१६ सप्टेंबर - वर्ल्ड ओझोन डे हा दिवस वर्ल्ड ओझोन डे म्हणून पाळला जातो.

 
^ वर